जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश शिंदे
03-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, दि.२२/१/१६ च्या शासन निर्णयानुसार अकृषिक परवानगी मिळणेकामी मा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडून साधारणपणे अंमलबजावणी केव्हा होईल ?संबंधित कार्यालयात चौकशी केली असता निश्चितपणे उत्तर मिळत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by गणेश शिंदे
03-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,गटवारी होणेपुर्वी अंदाजे ४० वर्षापूर्वी रजि.खरेदीखताने शेतजमीन खरेदी घेतली असून ताबाही आहे,परंतु गटवारीचा फायदा घेऊन आज रोजी तिर्हाईत व्यक्तीस मूळ मालकाने जमिनीची विक्री केल्यास काय करावे ? कृपया मार्गदर्शन होनेस विनंती
उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अपील करून प्रथम , गात स्कीम मध्ये आपले नाव समाविष्ट करा
तसेच अधिकारी अभिलेख सदरी , गात स्कीम मध्ये नाव समाविष्ट झाल्यास , त्या प्रमाणे नाव येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जगन्नाथ मदने
03-03-2016
sanjaymadanepatil@gmail.com
सर्व अधिकारी वर्गाला नमस्कार
भूधाराना प्रकार - .भोगवटादार -२ [देवस्थान इनाम ]मध्ये माझे आजोबा वहिवाट दार होते ते आता मयत झाले आहेत . तसेच माझी आज्जीही मयत आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांचे वारस माझे वडील , ३ काका व ३ आत्या असे एकून ७ जन वारस आहेत. ७ पैकी ३ आत्या व २ काका ,असे ५ जन माझे वडील व दुसरे १ काका यांचे नावाने नोंदणीकृत हक्कसोड पत्र करण्यास तयार आहेत .तरी ७/१२ वरती ७ पैकी ५ नावे कमी करत येतील का ? किवा त्यांची नावे कमी करण्याची दुसरी कोणती पद्धत आहे. आणि तसे होत असेल तर भविष्यात हि जमीन कोणत्याही प्रकारे भोगवटादार वर्ग -१ या प्रकारात आली . तर या ५ जनाकडून परत या जमिनीवरती हक्क सांगितला जाऊ शकतो का ?
योग्य मार्गदर्शन व्हावे हि अपेक्षा .
संजय
जमीन हि देवस्थान जमीन आहे
आपले पूर्वजांना केवळ जमीन कसण्याचा हक्क होता . त्या मध्ये आपला मालकी हक्क नाही . त्या मुले हक्क सोडून दिली तरी इतर इसमांना , मालकी हक्क प्राप्त होणार नाही . जयंचे लाभत हक्क सोडून दिला आहे त्यांना केवळ जमीन कसण्याचा हाक मिळेल
देवस्थान जमीन हि वर्ग १ होत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जगन्नाथ मदने
03-03-2016
sanjaymadanepatil@gmail.com
कुन्देटकर सर माझ्या प्रश्नाचे ऊतर दिल्याबद्दल धन्यवाद
पण .हक्कासोड पत्राने [भोगवटादार -२ ,इनाम जमीन ] प्रकारातील ७/१२ वर वारस म्हणून लागलेल्या भाऊ -बहिण यांची काही नावे कमी करता येतील का ?
Question by virangana salve
03-03-2016
sangita112001@yahoo.com
Sir mazha ek prashna ahe Ki konti vyakti shet jamin vikat gheu shekte,jar tya vyakticha Janna gavcha asel pan lagna zhalyawar Mumbai madhe gele 40 varshyapasun rahat asel tar to vyakti shet jamin vikat gheu shkte ka?
मुंबई कुल्वहिवत व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ प्रमाणे केवळ शेतकरी व्यक्तीच शेत जमीन खरेदी करू शकते
बिन शेती जमीन करण्यासाठी कोणतीही अट नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
02-03-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,नोटरी असलेले कुलमुखत्यार मोबदला देऊन १५ वर्षापूर्वी घेतलेले आहे परंतु त्यातील ३ पैकी १ व्यक्ती मयत झाली असल्यास सदरचे कुल्मुख्यार रद्द होईल का?किंवा त्याआधारे रजि.खरेदीखत केल्यास जिवंत असणारया व्यक्तीच्या क्षेत्रापुरती गावी नोंद मंजूर करता येईल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती...
आपले कुल मुखत्यार पत्र १५ वर्ष जुने आहे . व ते नोटरी समोर केलेले आहे .
कुल अखत्यारपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक आहे
त्यामुळे नोंद मंजूर करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by म न khule
01-03-2016
madhavnkhule@gmail.com
क्ष गावातील एका ७ १२ उतारामध्ये ७ १२ चे मालकी हक्कामध्ये एका व्यक्तीचे नाव,कुळ कॉलमध्ये दुस-या व्यक्तीचे नाव तसेच तिस-या व्यक्तीला मालकी हक्कामध्ये नाव असलेल्या व्यक्तीने १०० वर्षाचे भाडेपटे करून दिलेले आहे व सदर जमीनीचा ताबा भाडेपटा करून घेणा-या व्यक्तीकडे आहे. सदर जमीनीतील ७ १२ चे मालकी हक्कातील व्यक्ती तसेच कुळामध्ये नाव असलेली व्यक्ती तसेच भाडेपटा करुन घेणा-या दोन सामाईक व्यक्तीपैकी एक व्यक्ती मरण पावली आहे सदर जमीनीच्या ७ १२ अभीलेखात कोनाची वारस नोंद म्हणुन घेता येईल
Question by prashant sure
01-03-2016
prashantsure1707@gmail.com
कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ नुसार तक्रार कोणास दाखल करता येते व त्या नुसार पोलिस कार्यवाही करू शकतात का ? असल्यास त्याची तरतूद सांगावी हि विनंती .
कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम २(अ ) व २(फ ) वाचा .
२ (अ) -व्यथित व्यक्ती म्हणजे - कौटुंबिक नात्यातील कोणतीही व्यक्ती जिने कौटुंबिक हिंसाचारस सामोरी गेलेली आहे
२(फ)-कौटुंबिक नाते - एकच घरात , पती-पत्नी / वडील -मुलगा अश्या स्वरूपाच्या linear descendant नात्यातील व्यक्ती
या दोन्ही व्याख्या वाचून , आपले मत बनवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay g wagh
01-03-2016
sanjaygwagh@gmail.com
उत्पन्न ठरविण्याचा अधिकार तलाठी ह्यांना आहे का,किंवा कोणास आहे .
Question by प्रदीप नामदेव बोरले
27-02-2016
pradip.borle6226@gmail.com
महसूल विभागातील कार्यरत कर्मचारी/ अधिकारी ह्यांना ते ज्या ठिकाणी काम करीत आहे.तेथील आपले नाव पद व कार्यालयाचे नावाचा भेटकार्ड (Visiting Card) तयार करण्याची नियमात तरतूद आहे काय ?
Question by गणेश शिंदे
27-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,म.न.पा.कडून भोगवटापत्र प्राप्त झाल्यानंतर दि.२२/१/१६ च्या निर्णयानुसार सदर जमीन बिनशेती करणेकामी मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे का?किवा कसे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
कृपया म.ज.म.अ १९६६ चे कलम ४२ अ वाचा .
विकास आराखड्यातील क्षेत्रास , बिन शेती करण्याची आवश्यकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
26-02-2016
swati.swami@yahoo.com
वाटणी पत्राच्या आधारे फेर घेण्यात येऊ नये असे परिपत्रक आहे काय ?
Question by r.e toradmal
26-02-2016
ravitoradmal@rediffmail.com
sir मला भूदान जमिनीविषयी माहिती पाहिजे सदरची जमीन केवळ पिक घेनेकारिता वापरता yete kiva tawar ghar kiwa दुकान इत्यादी चमर्चिअल वापरता येते vikata येते का? rent var देत येते का?
माझ्या माहिती प्रमाणे सदरची जमीन केवळ पिक घेण्यासाठीच वापरता येते
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM YADAV
26-02-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझे दत्तक पत्र १९८८ साली झाले अह्हे ,माझे दत्तक वडील २००१ मध्ये मयात झाले. त्या आधी त्यांनी (वडील परजीत व खारेधी ) एकूण ४ गट माझा नावे २ (वडील परजीत व खारेधी ) गट केले व त्याचा नावावर- २ (वडील परजीत व खारेधी ) गट ठेवले ,मला २ बहिणी सुधा आहेत .माझा गटवार जो मरणा पूर्वी वडिलांनी माझा नावे केला आहे ,तय्वर तयंचे नवरे आत्ता हिस्सा मागत आहेत.वडिलाच (गटावर फक्थ आई व बहिणीची नावे अह्हेत) तर मला काय करावे लागेल मला हिसा दायचं नाही .कारण माझे उपजीविकेचे तेवढेच साधन अह्हे.
तुमच्या नावे असलेले गट तुमच्या संमती व कायदेशीर दस्ताशिवाय हस्तांतरित होउ शकत नाही
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by prashant Patil
26-02-2016
pbpatil.mca13@gmail.com
१) आम्ही १९५४ पासूनचे कुळ आहोत.२)१९५४ मध्ये जमीन सरकार ताब्यात होती .३) आमच्या आजोबांनी जमीन सरकार कडून १० वर्षासाठी (१९५४ ते १९६४) खंड रूपाने भाडेतत्वावर घेतली होती.४) मुदत संपल्यानंतर जमिनीच्या मूळ मालकाने जमिनीचा कब्जा मिळावा म्हणून मा.मामलेदार यांचेकडे अर्ज केला ५ ) दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीचे नाव ७/१२ सदरी नोंद झाली.६)परंतु कुळ यांच्याकडून कब्जा काढून घेण्यात आला नाही ७) जमिनीला ३२ व ३२ र लागू नाही असा हुकुम मा.मामलेदार यांनी केला ८) आम्ही १९५४ पासून जमिनीचे कुळ आहोत व जमीन १९५४ पासून आज रोजी आमच्या ताब्यात आहे परंतु ती जमीन मूळ मालक विकण्याचा प्रयत्न करत आहे.याबाबत कुळाना किती संरक्षण आहे या बाबत आम्हाला मार्गदर्शन करावे हि विनंती........ धन्यवाद
जमिनीला ३२ व ३२ र लागू नाही असा हुकुम मा.मामलेदार यांनी केला असेल तर ३२ ग होणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
25-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामीण भागात रहिवासी झोनमध्ये ०-०४ आर जमीन घेतल्यास तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा लागू होईल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by पवार बाजीराव
25-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर मला शेती विषयी प्रश्न आहे
गट क्रमांक १६१/१ १६१/२ असा आहे
माझा गट क्रमांक १६१/१ आहे तर माझे शेती रोडला लागून आहे तर १६१/२ साटी मला तनया शेतात बैलजोडी वापरासाठी रस्ता द्यावा लागेल का
Question by संजय जगन्नाथ मदने
25-02-2016
sanjaymadanepatil@gmail.com
आदरणीय किरण पाणबुडे व सर्व अधिकारी वर्गाला नमस्कार
भूधाराना प्रकार - .भोगवटादार -२ [देवस्थान इनाम ]मध्ये माझे आजोबा वाहिवातदार होते ते आता मयत झाले आहेत . तसेच माझी आज्जीही मयत आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांचे वारस माझे वडील , ३ काका व ३ आत्या असे एकून ७ जन वारस आहेत. ७ पैकी ३ आत्या व २ काका , माझे वडील व दुसरे १ काका यांचे नावाने नोंदणीकृत हक्कासोड पत्र करण्यास तयार आहेत .तरी ७/१२ वरती ७ पैकी ५ नावे कमी करत येतील का ? किवा त्यांची नवे कमी करण्याची दुसरी कोणती पद्धत आहे. आणि तसे होत असेल तर भविष्यात हि जमीन कोणत्याही प्रकारे भोगवटादार वर्ग -१ या प्रकारात आली . तर या ५ जनाकडून परत या जमिनीवरती हक्क सांगितला जाऊ शकतो का ?
योग्य मार्गदर्शन व्हावे हि अपेक्षा .
संजय
देवस्थान इनाम जमीन आहे .
आपले पूर्वजांचा या मिळकतीत मालकी हक्क नाही केवळ वहिवाटीचा हक्क आहे
हक्क सोड पत्र घेऊन उपयोग नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Arjun
25-02-2016
mohanms9775@gmail.com
साहेब , x या व्यक्ती १९७३ मध्ये वारल्यानंतर x या व्यक्तिंचे वारसदार AB दोन मुले व PQR तीन मुलींचे नांव व B या व्यक्तिंचे नांव इतर हक्कात ठेवले . ग A या व्यक्ती कुटुंब प्रमुख होते.सदर B या व्यक्तीने १९९० मध्ये वाटणी करून घेतले , सदर PQR बहिणींचे नांव A या भावांचे ७/१२ उतार वर वारसा लागले पासून कायम आहे ,१९९७ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर बहिणींचे हक्क सोड पत्र द्यावे असे बोलतात सदर तिनी बहिणींचे २००१ पूर्वी मयत झालेले आहे,बहिणींचे वारसा लावले नाही व A या व्यक्तिंचे २००१ मध्ये मृत्यू झाले नंतर त्यांचे वारसदार चे नाव लावले, सदर भूसंपादन रक्कम आजतागायत मिळाले नसून रक्कम मिळवणे साठी इतर हक्कातील व्यक्तींचे २००५ पूर्वी मृत्यू झालेने १६/१०/२०१५ या सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार रक्कम मिळवणेसाथि पुढील मार्ग दर्शन मिळावे .विनंति
सुप्रीम कोर्ट निकाल हा , वडिलोपार्जित मिळकत या मध्ये बहिणीचा/मुलीचा जन्मापासून हक्क आहे का ? या साठी मर्यादित आहे . या निकालानुसार , वडिलोपार्जित मिळकती मध्ये , जर वडील ९ सप्टेंबर २००५ या दिवशी/ त्या ननतर हयात असतील , तसेच मुलगीही हयात असेल तर , मुलीस मुला इतकाच मिळकतीत हक्क आहे
वरील उदाहरणानुसार , , त्यांना , वडील मयत झालेवर , प्रत्येक मुलीस १/५ हिस्सा आहे . बहिणीच्या वारसांना , बहिंचे १/५ हिस्सा मध्ये मालकी हक्क राहतो त्या प्रमाणे , नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
24-02-2016
rohidaspable@yahoo.in
एखाद्या प्रकल्पासाठी ४ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली असेल परंतु सदर अधिसूचनेप्रमाणे १५ वर्षे होऊन भूसंपादन झाले नसेल परंतु ७/१२ च्या इतर अधिकारात पुनर्वसनासाठी असे शेरा दाखल आहे तर खरेदी विक्रीसाठी शेरा कायम ठेवून परवानगी मिळेल काय किवा सदर शेरा ७/१२ वरुन कमी होऊ शकतो काय
४ ची आधी सूचना निर्गमित होऊन १५ वर्षे होऊन हि , जर भू संपादन झाले नसेल तर , भू संपादन व्यपगत झाले आहे
इतर हक्कातील शेर कमी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी /जिल्हाधिकारी यांचे कडे अपील/अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
24-02-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, माझे वडील मूळ गावी मयत जाले असता , आम्ही तीन भाऊ दुसरया गावी कामा करिता निघून गेलो आमच्या गावी वडिलोपार्जित जमीन होती. परंतु आमचे काका यांनी ती जमीन आम्ही परागंदा आहे अशी नोंद करून ती काकांनी त्याचे नावे केली. आता काकाही मयत आहे व ती वडिलोपार्जित जमीन तांच्या मुलांच्या नावे आहे. व त्यातील काही जमीन काकांच्या मुलांनी विकून टाकली आहे. आमच्या हिस्स्याची वडिलोपार्जित जमीन आम्हास आता मिळू शकेल काय? व आमच्या नावे ७/१२ नोंद होईल काय ?
तुम्ही परागंदा आहे अशी खोटी माहिती देऊन काकांनी नोंद करून ती त्याचे नावे केली असेल तर फौजदारी तक्रार दाखल करा किवा दिवाणी दावा करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
24-02-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, माझे वडील मूळ गावी मयत जाले असता , आम्ही तीन भाऊ दुसरया गावी कामा करिता निघून गेलो आमच्या गावी वडिलोपार्जित जमीन होती. परंतु आमचे काका यांनी ती जमीन आम्ही परागंदा आहे अशी नोंद करून ती काकांनी त्याचे नावे केली. आता काकाही मयत आहे व ती वडिलोपार्जित जमीन तांच्या मुलांच्या नावे आहे. व त्यातील काही जमीन काकांच्या मुलांनी विकून टाकली आहे. आमच्या हिस्स्याची वडिलोपार्जित जमीन आम्हास आता मिळू शकेल काय? व आमच्या नावे ७/१२ नोंद होईल काय ?
आपणास जी जमीन अद्याप विल्क्लेली नाही ती परत मिळू शकते . त्या साठी आपणास दिवाणी न्यायालयात The Specific Relief Act खाली दावा दाखल करावा लागेल .
तसेच जी जमीन विकली आहे त्या साठी , याच कायद्या खाली , आपण जमिनीचे आपले हिस्स्या पुरते पैसे मागणी बाबत हि दावा दाख्जल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
24-02-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, फक्त बहिणीचे हक्क सोड करता येते का, भावाचे हक्क सोड करता यईल का ?
फक्त बहिणीचे हक्कसोड पत्र करता येते, भावाचे नाही अशी तरतूद नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by नमस्कार सर , भोगवटादार वर्ग २ या प्रकारातील जमिनीच्या ७/१२ वरती मयत वाविवात्दाराच्या जागी त्याच्या वारसाची नोंद करता येते . परंतु अशा एकून ९ वारासापैकी ७ वारसांची तेथे वहिवाट हि नसेल आणि त्यांना त्या जमिनीवर हक्कही नको असेल तर ते ७ जन 'हक्कसोड पत्र'/'संमत
24-02-2016
sanjaymadanepatil@gmail.com
नमस्कार सर , भोगवटादार वर्ग २ या प्रकारातील जमिनीच्या ७/१२ वरती मयत वाविवात्दाराच्या जागी त्याच्या वारसाची नोंद करता येते . परंतु अशा एकून ९ वारासापैकी ७ वारसांची तेथे वहिवाट हि नसेल आणि त्यांना त्या जमिनीवर हक्कही नको असेल तर ते ७ जन 'हक्कसोड पत्र'/'संमती पत्र 'किंवा 'ना हरकत पत्र' देऊन आपले नाव कमी करू शकतात का? आणि असतील तर योग्य मार्ग दर्शन मिळावे हि विनंती.
वहिवाट आणि वारसा वेगळे विषय आहेत. वहिवाट नसली तरी वारस हक्क डावलता येत नाही. हक्कसोड पत्र करता येईल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सय्यद मोहम्मद सालिम
23-02-2016
mod154@yahoo.com
पुनर्वासनासाठी सरकारने घेतलेली जमीन परत घेता येते का? कशी करता येते? कृपया मार्गदर्शन करावे
पुनर्वसनासाठी घेतलेली जमीन हि The Land Acquisition Act खाली घेतलेली असते .
जर जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नसेल तर , अशी जमीन जिल्हाधिकारी संपदान संस्थेकडून काढून घेऊन त्याचा लिलाव करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
