जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by vijay gade
07-02-2016
vijaygade1986@rediffmail.com
माहिती अधिकार २००५ नुसार अर्ज केला तो तहिसिलदार राजगुरू नगर खेड पुणे यांना त्याचे मला ४० दिवस झाले उत्तर मिळाले नाही व तसेच सर्कल अधिकारी सुधा काम करीत नाही मी काय करू ?
Question by योगेश जंगम
07-02-2016
jangamy422@gmail.com
माझ्या वडिलांना नात्यातील आजीने तिचा सांभाळ केलामुळे शेती १९७५ साली बक्षिस पत्र दिली होती पण वडिलांनी ७/१२ वर नाव लावले नाही व शेती एका इसमास करण्यास दिली पण त्याने तलाठ्याशी संगनमत करून खोट्या सौदा पावती द्वारे आपले नाव ७/१२ लावले माझे वडिल आजीच्या पहिल्या पतिचा मुलगा आहे व ते १९९८ साली वारले जमिन ताब्यात असलेल्या इसमाने तालुका दिवाणी कोर्टात आम्ही त्यास खरेदी द्यावी विरोधात दावा केला त्या निकालत कोर्टाने बक्षिसपत्रास निशाणी दिली नाहि व पुराव्यात वाचले नाहि सध्या केस जिल्हा कोर्टात चालु आहे आम्हि आजींचे वारस आहोत हे सिध्द करण्यासाठी ३० वर्ष जुने
बक्षिसपत्र हा एकमेव पुरावा आहे
बक्षिस पत्र वडिलांच्या नावे ७५ पैसे ३रूपये अशा स्वरूपातील बॉंडवर आजीचा अंगठा दस्तूर साक्षीदारांच्या सह्यासह अस्सल आहे पण त्याकाळी दप्तरी नोंदवलेले आहे का नाहि हे सांगता येणार नाहि पण त्यामागे अँफेडेविट प्रमाने तहसिल चा लाल नोटरी केल्यासारखा शिक्का आहे
तालुका कोर्टाचे निकालात खालील म्हणणे आहे
बक्षिसपत्र व अधिकार पत्र यास भारतीय पुरावा कायदा ९० नुसार निशाणी देऩ्यात यावी अशा विनंतीचा अर्ज प्रतिवादी तर्फे करण्यात आला त्याकामी
वादी यांचे म्हणणे विचारात घेवून सदर अर्ज दिनांक २०/११/२००९ रोजी फेटाळण्यात आला त्यामधे भारतीय पुरावा कलम ६७ व ६८ नुसार मृत्यृपत्रासाठी आवश्यक तरतुदी बाबत तसेच तथाकथित बक्षिसपत्र व अधिकारपत्र सिध्द करण्यासाठी प्रतिवादी तर्फे देण्यात आलेल्या पुराव्याचा उहापोह करण्यात आला होता. त्या आदेशास प्रतिवादी यांनी वरीष्ट न्यायालयात आव्हान दिले नसल्यामुळे दिनांक २०/११/२००९ रोजीचा आदेश कायम झाला.
आता ही केस जिल्हा कोर्टात सुनावणीस असुन बक्षिसपत्र पुरावा होण्यास आपण योग्य तो सल्ला वा कलम सुचवावेत हि विनंती
Question by कृष्णा परबत
06-02-2016
krishnaparbat9@gmail.com
सर मी राम या व्यक्ति कडून १९९५ साली जमीन विकत घेतली. परंतु आज पण ७/१२ इतर आधिकार विहिर मध्ये तयाचे नावे हिस्सा दिसतो.विहिर समाईक आहे तो हिस्सा काढनयासाठी काय करावे लागेल. कृपया माहीती दयावी
खरेदी दस्तात तसा उल्लेख असल्यास तहसीलदारकडे अर्ज करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
06-02-2016
swati.swami@yahoo.com
आदरणीय सर मार्गदर्शन केल्यामुळे धन्यवाद ...पण गावठाण हद्दीबाहेरील बांधकाम परवाना/परवानगी नगर रचनाकार यांनी द्यावी लागते का उपविभागीय अधिकारी यांनी हे समजत नाही .. कृपया मार्गदर्शन करावे .
गावठाण हद्दीबाहेरील जमीन असेल तर आणि त्याठिकाणी प्रादेशीक योजना मंजुर असेल तर तहसीलदार/उपविभागीय अधिकारी देतील आणि प्रादेशीक योजना मंजुर नसेल तर संबंधीत ग्रामपंचायत देते
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by स्वाती स्वामी
06-02-2016
swati.swami@yahoo.com
तहसीलदार यांचे माषिक डायरीचे समीक्षण उपविभागीय अधिकारी करतात यासाठी त्यांचे उद्दिस्त / इस्तांकन बाबत नमुना कोठे मिळेल ?
Question by स्वाती स्वामी
06-02-2016
swati.swami@yahoo.com
मंडळ अधिकारी यांचे मासिक डायरीचे समीक्षण कोण करते ?
Question by स्वाती स्वामी
06-02-2016
swati.swami@yahoo.com
नवीन कर्मचारी यांना तीन वर्ष पूर्ण होईपर्यंत परावर्तीत , अर्धवेतनी रजा मंजूर करता येते का ?
Question by संदीप jadhav
05-02-2016
manu.23081991@gmail.com
Namskar, maza prashna asa ahe mazi aai 2008 year la expire zali ahe. tichya nave nashik yethe ghar ahe
pan tya veles varas nond lagtana vadil,bhau,bahin yanche nav lagle ahe.
maze nav talathi yanche kadun
lavayche rahile ahe va tyachi hard(Affidivate) copy mazya kade ahe. tar mala maze nav lavayche asel tar
process kay ahe?
bhau,bahin,vadil yanchi parvangi lagel ka? ani te permission nasel det tar?
mahiti adhikara marfat kahi paryay ahe ka?
Question by गजानन कुरणे
05-02-2016
gajanan.kurane@gmail.com
माननीय सर कर्मचारी यांचे वेतन मधून संघटना वर्गणी वजावट करता येते का
Question by Rohit Jathar
05-02-2016
www.roraj8@gmail.com
केलेले बक्षिसपत्र रद्द कसे करता येईल.?
आमच्या कोणच्याही परवानगी शिवाय बक्षिसपत्र केलेले आहे.
ते सद्या दुय्यम निबंधक याच्याकडेच केलेले आहे.
तलाठ्याने नोंद केलेली नाही.
ज्याने बक्षिसपत्र केले आहे ती व्यक्ती दारू पिऊन हे काम केले आहे.
सादर जमीन हि दोन भावाच्या नावे आहे त्यापैकी एकाने बक्षिसपत्र केले आहे.
हि जमीन वडिलोपाजीत आहे.
बक्षिसपत्र करताना सदर व्यक्तीने वारसांना विचारलेही नाही.
हि जमीन फक्त दोन भावाच्या नावे आहे.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by ARJUN
04-02-2016
mohanms9775@gmail.com
साहेब , x या व्यक्ती १९७३ मध्ये वारल्यानंतर x या व्यक्तिंचे वारसदार AB दोन मुले व PQR तीन मुलींचे नांव व B या व्यक्तिंचे नांव इतर हक्कात ठेवले . ग A या व्यक्ती कुटुंब प्रमुख होते.सदर B या व्यक्तीने १९९० मध्ये वाटणी करून घेतले , वाटणी करून घेताना B व्यक्तिंचे ७/१२ उतार वर PQR या बहिणींचे नांव आढळून येत नाही सदर PQR बहिणींचे नांव A या भावांचे ७/१२ उतार वर वारसा लागले पासून कायम आहे ,१९९७ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर बहिणींचे हक्क सोड पत्र द्यावे असे बोलतात सदर तिनी बहिणींचे २००१ पूर्वी मयत झालेले आहे,बहिणींचे वारसा लावले नाही व A या व्यक्तिंचे २००१ मध्ये मृत्यू झाले नंतर त्यांचे वारसदार चे नाव लावले, सदर भूसंपादन रक्कम आजतागायत मिळाले नसून रक्कम मिळवणे साठी इतर हक्कातील व्यक्तींचे २००५ पूर्वी मृत्यू झालेने १६/१०/२०१५ या सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार रक्कम मिळवणेसाथि पुढील मार्ग दर्शन मिळावे .विनंति
Question by गणेश शिंदे
03-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,अकृषिक वापर करणेकामी सहायक नगरसंचालक यांचेकडे अर्ज दाखल केल्यानंतर दि.२२/१/१६ च्या शासन निर्णयानुसार विनिश्चीती बाबत प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून घेणेकामी तहसील कार्यालयात नव्याने अर्ज दाखल करावा लागेल का?नियोजन प्राधिकरण यांचेकडून त्याबाबत तहसील कार्यालयास पत्र दिले जाते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
नियोजन प्राधिकरण यांचेकडून त्याबाबत तहसील कार्यालयास पत्र दिले जाते
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM YADAV
03-02-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार.
साहेब तुम्ही सागीतल्या प्रमाणे मी मुंबई अध्निअम १९५८ चे कलम ४१ खालील कमी पडलेले मुद्रांक शुल्क बरण्या साठी अर्ज केला आहे .( तःशील ओफ्फिचे मधून तसा हुकुम घाला आहे .ह्क्कासोड पत्रावर मुद्रांक शुल्क भरा ) मी अर्ज करून ८ दिवस झाले आहेत तरी ताय्नी कोन्तीच माहिती दिली नाही कि किती मुदारंक शुल्क भरावे लागेल ,चलन मिळण्यास किती दिवस लागतात .त्या मुले मी नोदेची प्रक्रिया फ्हुडे नेहु शकत नाही कृपया मार्ग सांगा . धन्यवाद !
मुद्रांक शुल्कासाठी सब रजिस्ट्रार क्षेत्राचे सह जिल्हा निबंधक यांचे कार्यालयातून आपला दस्त अभिनिर्णीत करून घ्या . त्यामध्ये आपल्याला भरावयाचे मुद्रांक शुल्क किती हे नमूद केलेले असते.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by Yogesh Hande
03-02-2016
yogesh12321@gmail.com
नमस्कार,
चार भावांपैकी महेश कामानिमित्त परगावी स्थायिक आहे. गावी वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड झालेली नाही. महेशला कोणीही वारस नाही. त्याला त्याच्या हिश्याची शेतजमीन गावी असणा-या भावाच्या एका मुलाला हस्तांतरित करायची आहे. काय करावे लागेल?
खातेफोड होउन किवा वारसाने महेशचे नाव लागल्यावर नोंदणीकृत बक्षिस पत्र करता यॆइल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र
02-02-2016
jyotitandel82@gmail.com
सर
माझ्या मालकीच्या ७/१२ उतारा असलेल्या जमिनीवर २०१० साली दुसर्याने घर बांधले आहे ग्रामपंचायत कार्यालयाने त्यास घरपट्टी दिली असून
माझा प्रश्न असा आहे कि घरपट्टी बाबत मालकी जमिनीबाबत शासनाचा शासन निर्णय काय आहे त्याबद्दल माहिती द्यावी
Question by श्री. जी पी भोपाळे
02-02-2016
medsto.daryapur@gmail.com
माझ्या आईचे वडील ३० वर्ष अगोदर वारले, शेत जमीन दत्तक पुत्राला मिळाली मुलीला हिस्सा देण्याबाबत मुतृपत्रात नोंद नाही आजीच्या मुतृपत्रात तिच्या मालकीची काही जमीन मुलीला देण्याबत नोंद होती परंतु तीच जमीन आजीने हयात असताना विकली आता आजोबाची जमीन दत्तक पुत्राकडे आहे यामध्ये मुलीला हिस्सा देण्याबाबत काही प्रावधान आहे का न्यायालयात जायचे झाल्यास मुलीच्या सासरे कडील शहरातील न्यायालयात दाद मागितल्या जाउ शकते का क्रुपया सविस्तर प्रक्रिया सांगावी हि विनंती
Question by श्री जी पी भोपाळे
02-02-2016
medsto.daryapur@gmail.com
नमस्कार सर,
मी माझ्या शेताची पोटहिस्सा मोजणी केली माझी जमीन सात बारा नुसार २ एक्कर कमी भरत आहे भूमी अभिलेख कडे ७/१२ नुसार नकाशा उपलब्ध नसल्यामुळे हद्दकायम होऊ शकत नसल्याचे कळविण्यात आले माझी तरी आपणास विनंती कि ७/१२ नुसार संपूर्ण शेत मिळविण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
Question by गणेश शिंदे
02-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मनपा.हद्दीत गृहप्रकल्प सुरु करावयाचा असल्यास म्हाडास किती flat /क्षेत्र हस्तांतरित करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by प्रमोद भागोजी जाधाव
02-02-2016
pramodjadhao2gmail.com
नमस्कार सर माझ्या वडिलाच्या नावावर ७/१२ वर वि. हि.हिस्सा असे यते त्यमुळे त्यच्या नावावर कोणतेही अनुदान मिळत नाही तर काय करावे
Question by श्रीकांत पिसाळ
30-01-2016
shreekantpisal1@gmail.com
नमस्कार सर,
सर जमिन देवस्थान ईनाम वर्ग ३ च्या मिराशी कुळाची माहिती हवी अाहे.
प्रश्न १) मिराशी कुळ हक्क हस्तांतर करण्याकरता परवानगीची अावश्यकता अाहे का?
प्रश्न २) कायम कुळ अाणि मिराशी कुळ यामध्ये फरक काय अाहे?
प्रश्न ३) अशा पद्धतीचे दस्त होतात का?
प्रश्न ४) स्वकष्टार्जित मिळकत हस्तांतर करता येते का?
प्रश्न ५) सन १९९८ ते १९९९ या कालावधीत देवस्थान ईनाम वर्ग ३ चे मिराशी कुळाचे दस्त दुय्यम निबंधकाकडे कोणत्या अाधारावर केले जात किंवा कोणत्या act ने केले जात याची माहीती मिळावी.
ही विनंती.
Question by गणेश बाबासाहेब गीते
30-01-2016
ganesgite39922gmail.com
सर
आमच्या आजोबंच्या वाट्याला दीलेली २० आर ईतकी जमिन सध्या आमच्या ताब्यात सूमारे २५ सालापासून आमच्या ताब्यात आहे .मात्र ती जमिन सध्या आमच्या चूलत चूलत्याच्या वारसांच्या नावावर आहे . चूलत चूलते ते हयात असताना ती जमिन आमच्या वाट्याला दिल्यामूळे ती जमीन आमच्या नावावर करुन द्यायला तयार होते मात्र आता ते मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी सदर जमिनी वर त्यांच्या नावाची वारस नोंद लावली आहे आता ते सदर जमिन आमच्या नावावर करुन देत नाहीत . आमच्या आजोंबाच्या वाट्याला सदर जमिन दिली असल्याबाबत आमच्याकडे सध्या कोनताही पूरावा नाही मात्र सदर जमिन २५ सालापासून आमच्याच ताब्यात आहे सदर जमिनीत आमचे १० सालापासून घर आहे त्या घराची ग्रामपंचायत ला तेव्हापासून नोंद आहे तेव्हापासून सदर घराची दरसाल आम्ही ग्रामपंचायतीकडे पट्टी भरत आहोत तसेच महावितरनाने आम्हाला सदरजमिनीतील आमच्या घराला विज मिटर दीले आहे त्याचेही आम्ही विजबिल भरत आहोत त्या जमिनीत आमचे २० नारळाचे झाडे आहेत व दरसाल आम्ही सदर जमिनीत विविध पिके घेत आहोत मात्र पिक पाहणीला आमचे नाव तलाठीने घेतलेले नाही अशी स्थिती असताना आम्हाला आमचे चूलत चूलत्याचे वारसदार ती जमिन आमच्या नावावर करुन देत नसल्यामूळे आम्हाला सदर जमिन आमच्या नावावर कायदेशिर मागाने करावयाची आहे .
१. तरी आम्ही सध्या काय करु
२ कामगार तलाठी सदर जमिनीवर आमचे पिकपाहणीला नाव लावू शकतो का?
३ सदर जमिन आमच्या नावावर करण्यासाठी आम्ही काय करु
४ महसूली अधिकारी सदर जमिन आमच्या नावावर करुन देऊ शकतिल का त्या साठी काय करा वे
१. आपली जर २० वर्षा हून अधिक काळ वहिवाट असेल तर , आपण Adverse -possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा .
२.पिक पाहणीला नाव लावण्यासाठी , जमीन मालकाने त्याचे संमतीने जमीन आपल्याला कसण्यास दिलेलेइ असणे आवश्यक आहे . आपले जमीन कसणे किंव्हा आपली वहिवाट कायदेशीर असणे आवश्यक आहे . आपली वहिवाट आपले , चुलत चुलत्यांचे वारसांचे , इच्छे विरुद्ध असणार , त्यामुळे आपली वहिवाट हि कायदेशीर नाही . पर्यायाने , आपले नाव पिक पाहणी सादरी लावले जाणार नाही
३. उत्तर क्रमांक १ प्रमाणे , उपाययोजना करणे उचित
४. नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
29-01-2016
swati.swami@yahoo.com
ग्रामीण पेयजल योजनेतील टाकी बांधकाम करण्यास जागा मिळणेबाबत वस्तीवाधीसाठी संपादित केलेली जमीन इतर प्रयोजनासाठी देता येते का ? कृपया शासन तरतुदी सह मार्गदर्शन करावे हि विनंती .
जमीन ज्या कारणासाठी संपादित झाली असेल त्याच कारणासाठी जमिनीचा वापर होणे आवश्यक आहे .
नवीनभू संपादन कायद्याच्या कलम ९९ नुसार , अन्य कारणासाठी जमिनीचा वापर अनुद्नेय नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
29-01-2016
swati.swami@yahoo.com
बांधकाम परवानगी /परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत का ? असतील तर कोणत्या शासन तरतुदीनुसार कृपया मार्गदर्शन करावे .
बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार , नियोजन अधिकार यांना आहेत .
प्रादेशिक योजना असेल तर - जिल्हाधिकारी नियोजन अधिकारी आहेत
कलम ११३ प्रमाणे Special Township असेल तर - अशे प्राधिकरण
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh
28-01-2016
gawandestate@gmail.com
aaicha mrityu patr ani bahinicha khredi khat banvlela ahe pn talathi karyalay nondani kryala kahi tharavik mudat aste ka krupya madat kra.
Question by चेतन घोड्के
26-01-2016
rajughodke40@gmail.com
जमीन चा निकाल नाशिक कोर्टाने आमच्या बाजूने दिला आहे तर समोरच्या ने मुम्बई हाइ कोर्ट मधी अपील केला आहे तर काय होइल क्रुपया सांगा
hmmmmm
या प्रश्नाचे उत्तर आपणास काय अपेक्षित आहे.
एक तर निकाल आपले बाजूने लागेल अथवा विरोधी पक्षाचे बाजूने लागेल ................................
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
