जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर माझ्या घरासमोर ग्राम पंचायतीची बखल जागा असून ती आमची रहदारीची वाट होती.काकांना काम करण्यास जागा नव्हती म्हणून वडिलांनी त्यांना ती दिली .परंतु आता ते त्या जागेवर त्यांचा मालकी हक्क सांगत आहेत. ते असाही सांगतायत कि त्यांनी २००७ मध्ये ग्राम सेवक व पंचायत सदस्यांना लाच देवून ती जागा नावे करून घेतली. या बाबतीत चौकशी केली असता पंचायत हि त्यांचाच मालकी हक्क सांगत आहेत. भविष्यात जर आम्ही घर बांधले तर ती जागा आमचे आंगणच असणार आहे .कारण घराच्या उतार्यावर त्या जागेचा उल्लेख बखल जागा असा केला आहे.नवीन उतारा आणला तेव्हा त्यात ती जागा त्यांची आहे असे नमूद केले गेले.सदर जागेवर ती व्यक्ती घरकुल बांधण्याचा प्रयत्न करत आहे त्यास आम्ही विरोध करत आहोत त्यामुळे त्या व्यक्तीने पोलिस पाटीलच्या सल्ल्याने आमच्यावर केस केली आहे.यात सर्व पंचायत सदस्य त्यांचीच बाजू घेत आहेत.
माझा प्रश्न असा आहे कि काय ग्राम पंचायत सरकारी जागा खाजगी व्यक्तीला विकू शकते का ?किंवा नाही ?
मी असा ऐकलय कि सरकारी जमिनीची खरेदी विक्री करण्याचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी यांना आहेत काय हे खरे आहे का ? मग ग्राम पंचायत ती जागा त्यांना कशी विकू शकते किंवा त्यांच्या नवे करू शकते ?
गावातील काही व्यक्ती आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत व त्रास देत आहेत .
या बाबतीत न्यायासाठी काय मी कोर्टात किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतो का ?
कृपया मार्गदर्शन करा.
महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५५ चे परंतुक अन्वये ग्रामपंचायत स्वताचे मालकीची जमीन केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगीने विकू शकते . आपण ,जर अशी परवानगी न घेता जमीन विकली असेल तर , मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे अर्ज करा व दाद मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खाजगी जमीन बदल्यात गावठाण जमीन मिळवण्याबाबत पद्धती ..
मा. महोदय माझ्या वडील दलित समाजासाठी आणि सटवाई मंदिरासाठी १ गुंठ जागा सन २००७ साली बक्षीस पत्र मा.सरपंच ग्राम पंचायत यांनी खासदार निधी मिळण्याकरता दिले आणि त्या बदल्यात संबंधित गावांनी २००७ साली ठराव करून गावठाण हद्दीत सरपंच ग्राम पंचायत हि १ गुंठ जागा दिली परंतु वडीलना कायदया बाबत सरकारी कागदपत्रात काय माहिती नसल्यामुळे त्यावेळी कर्ते माणूस असल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी गाळे बांधले परंतु त्यानंतर वडील वारले आता २०१५ साली आमच्या हाती कारभार आला असून आम्हाला समजले हि गाळे अनिधिकृत आहे संबंधील जागा नावे करिता आणि अधिकृत करण्याकरिता काय करावे लागेल याबद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि आपणास विनंती
गावठाणातील जागा ग्राम पंच्यात यांचे मालीकीची असते . ग्राम पंच्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगीने जागा विकू शकते . आपण ग्राम पंच्यातीस त्या प्रमाणे , मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे प्रसात्व पाठवण्यास सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by santosh jaware
08-12-2015
jaware_sb@rediffmail.com

सर, मा.तहसिलदार महाेदयांना एखादया कोतवालास गैरकृत्य केल्याने बडतर्फ करावयाचे असल्यास कोणत्या अधिनियमान्वये बडतर्फ करता येईल. या बाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती.
एखादी जमिन ही कुळ कायदयाने श्री.राम मिळलेली आहे. त्या जमिनीमध्ये राम यांचे इतर भावांचे नांव मा.दिवाणी न्यायालयाने सहमालकी असल्याचा आदेश दिला आहे. तर निसप्र जमिनीला दिवाणी न्यायालयाचे आदेशानुसार इतर भावांचे नांव दाखल करणे योग्य राहिल अगर नि.स.प्र. असल्याने सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहिल. याबाबत मार्गदर्शन करावे.
दिवाणी न्यायालयाने अन्य भावांची मालकी The Specific Relief Act खाली जाहीर केलेली आहे . या मध्ये जमिनीचे हस्तांतरण झालेले नाही . त्या मुले परवानगीची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पितृत्व रजा ८ दिवस मिळते असे मला उत्तर देण्यात आले आहे परंतु सदर निर्णय कुठल्या विभागाचा आहे त्याबाबत माहिती मिळावी किवा पितृत्व रजे बाबत शासन निर्णय अथवा परिपत्रक असल्यास मिळावे
एखाद्या प्रकल्पासाठी अधिसूचना निघाली त्या दिनाका आगोदर संभाधित खातेधारक हा २० एकर चा एकत्र कुटुंब मनेजर होता त्याला ३ भाऊ होते अधिसूचना निघाली त्या दिनाका नंतर तो खातेदार विक्री परवानगी घ्याला गेला असता त्याला १ हे ६१ आर एवढा इतर अधिकारात शेरा ठेवून परवानगी मिळाली परंतु अधिसूचना निघाली त्यावेळेस २० एकरस ४ खातेदार होते त्यामुळे प्रत्येकाच्या नवे ८ एकराच्या आत क्षेत्र येते तर १ हे ६१ आर एवढा इतर अधिकारात शेरा कमी होऊ शकतो का त्याशाठी कोणाकडे अपील करावे लागेलं
आपण ज्यांचे कडून परवानगी घेतली त्यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मुलगा एकटा आहे व त्याच्या नावावर २१गुंटे शेती नावावरती आहे ८अ वरती २१ गुंटे आहे ७/१२ वरती २१गुंटे आहे इतर हक्कात आई व३ बहिणीची नावे आहेत मुलाला स्वताचे हक्क सोड पत्र करून आई व ३ बहिणीच्या नावावर जमिन करायचे आहे तसे होऊ शकते क?
सर वडलाना वडलोपार्जित जमिन विकताना जर मुलगा नसेल तर मुलीची समंती किंवा हक्कसोड पत्र न घेता लहान भावाच्या मुलाला जमिन विकता येऊ शकते का दोन मुलीची लग्न झालेले आहेत जर विकली असेल तर काय करावे
वडिलोपार्जित जमीन , वडील बक्षीस पत्र द्वारे , मुलींची संमती न घेत देऊ शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर १) पहिली गटाची मोजणी झाली त्यावेळेस पुर्वे कडे १५ फुट शेत सरकले व शेजारील शेतकरयाने हरकत घेऊन मोजणी केली असता शेत पश्चिमेकडे १५ फुट सरकले व त्यांनी कायम हद्दी केल्या २)पहिली मोजणी झाली त्यावळेस क पत्रक तयार झाले होते व नकाशा तयार झाला होता क पत्रक व नकाशा मिळेल का ? ३) दुसरी मोजणी झाली त्यावेळेस सुदधा क पत्रक व नकाशा तयार झाला व कायम हद्दी केल्या आहेत तर क पत्रक व नकाशा मिळेल का?४) जर ३एकर शेता मध्ये मोठा भाऊ पुर्वेकडे १.५ शेत वहिवटेत असेल व लहान भाऊ पश्चिमेकडे १.५ शेत वहिवटेत असेल व पश्तिमेकडे बांध असेल व दुसरी मोजणी बांधाच्यावर १५ फुट वर शेत सरकले असेल तर वरिल शेतकरयास मोजणी मंजुर नसेल तसेच त्या व्यक्तीस मोजणीचे नोटीस दिले नसेल तर तो हरकत घेऊ शकतो का? ४) लहान भावाचे पश्चिमेस वहिवट असल्यामुळे व बांधाच्या वर शेत सरकल्यामुळे वहिवट शेत कमी झाले बांधा वरील शेतकरी बांध फोडुन देत नाही काय करावे? ५)जर गटाची मोजणी झाली आहे मोठा भाऊ त्याच्या नावावर ६० गुंठे व लहान भाऊ त्याच्या नावावर ६३ गुंठे शेत आहे मोठा भाऊ वाटणी करताना शेताच्या मधोमत करत आहे त्यामुळे लहान भावाचे शेत कमी होत आहे काय करावे? ६) जर गटाची मोजणी झाली असेल तर पोट हिश्यांची मोजणी मागवता येईल का जेने करुन शेतीचे ७/१२ उतारया प्रमाणे वाटप होईल सर आपला योग्ये तो सल्ला मिळावा हि विनंती
सर वडलोपार्जित शेती मुलगा खरेदिखताने वडलांकडुन घेऊ शकतो का तसेच मुलाच्या नावावरती कुठलाच ७/१२ नाही तो शेतकरी नाही म्हणुन त्याला वडीलांची जमिन विकत घेता येईल का तसेच वडीलांच्या ७/१२ मध्ये नाव नाही त्यामुळे त्याच्या नावावर कुठलीच शेती नाही त्यामुळे तो शेतकरी नाही
वडिलाकडे कसी जमीन आली आहे ?
त्यांचे वादिलाकडून ( आजोबा ) कि वाडीला स्व कष्टार्जित आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,
माझ्या आईला व इतर तीन बहीणी व आजी यान्ना वडीलोपार्जीत जमीन वारसाने 1973 ला मिळाली.
1) 1977 ला त्याच्या चुलत चुलत्यानी ति जमीन मोठ्या दोन बहिणींची तलाठी साहेबा समोर सही घेउन 7 /12 ला नाव लावले.
2) फेरफार ला खंडन खत म्हणुन नोंद आहे.
3) सर्वजण अडाणि आहेत. व त्यावेळेस मोठ्या तीन बहीणींची लग्न झाले होते व लहान बहीणीचे 18 वर्षा पुर्न झालेले नव्हते त्यान्ना सख्खा भाऊ व चुलते नाहीत
तरी मला ती जमीन परत मिळवायची असेल तर काय करावे ? mail id – dudhanigs2001@yahoo.co.in
Ganesh Dudhani
Pune


नमस्कार सर
जमिन विक्री करणारा व्यक्ती मयत आहे सातबारा वर क्षेत्र 2एकर आहे व खरेदीखतावरील क्षेत्र ८ हेक्टर आहे तर सातबारा वरील क्षेत्र व खरेदीखतामधिल क्षेत्र यात तफावत आहे त्यामुळे सदर खरेदीखता वरून घेतलेला फेर रद्द होईल का किंवा खरेदीखत दुरूस्ती करता येईल का दुरूस्ती करावयाची झाल्यास जमिन विक्री करणार व्यक्ती मयत आहे खरेदीखतावरून घेतलेला फेर रद्द करण्यासाठी मयत व्यक्ती च्या वारसाने प्रांत कडे अपिल केले आहे काय करावे लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हिच विनंती
The Specific Relief Act च्या कलम २६ अन्वये , दस्त दुरुस्त करून मिळणे बाबतचा दावा , मयत व्यक्तीचे वारसा विरुद्ध दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुजित
04-12-2015
sujitchavan456@gmail.com

सर वडोलोपाजीत जमीन विकताना मुलीची समती किंवा हक्कसोड पत्र असने गरज असते का
वडिलोपार्जित जमिनीवर भविष्यात कोणी हक्क सांगू नये म्हणून काही तरतूद आहे का ?? वडिलोपार्जित जमीन हि माझे वडील आणि तीन काकामध्ये सामायिक आहे. तसेच माझे वडील अशिक्षित असल्यामुळे आणि मी बाहेरगावी असल्यामुळे माझे गावी येणेजाणे कमी असते आणि या परिस्तिथिचा कुटुंबातील चुलते फायदा घेऊ शकतात. तसेच माझे नाव सात बारा मध्ये नाही आहे.
कृपया भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही मार्ग दाखवा .

सात बारावर काही शेरा (रिमार्क ) टाकता येतो का जेणे करून जमीन विकत घेणाऱ्याला कळेल कि या व्यवहारात सर्वांची संमती नाही किंवा काहीतरी काळेबेरे आहे.
आदरणीय सर,जमिन सरकारी आकारी पड कोणकोणत्या कारणांमुळे होते सदर शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
आदरणीय सर,७/१२ सदरील इतर हक्कात खाजगी/राखीव वन असा शेरा असल्यास सदर जमीन विक्री करण्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
खाजगी वन विक्रीस बंधन नाही मात्र राखीव वन विक्री करता येनात्र नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी आपल्या दिनांक १०/११/२०१५ व ११/११/२०१५ रोजी अनुकंपा विषयी व कुटुंब निवृत्ती वेतन विधूर विधवा यांच्या पुनर्विवाह नंतर पेन्शन मिळते का या विषयी माहिती विचारली होती परंतु आपण कुठल्याही माहिती दिली नाही तरी कृपया माहिती द्यावी ही विनंती
नमस्कार किरण सर माझा प्रश्न असा आहे की माझी सरकारी मोजणी २००७ मधे झालेली असून सर्व लगतदाराना ती मान्य होती. माझ्या घराच्या उत्तर कडील कबजेदारान १८ जून रोजी मोजणी केली असता माझ्या हद्दीत आडीच फुट आली. मी तुमच्या सल्लाया प्रमाणे जीलहा अधीक्षक भूमी अभिलेख येथे तक्रार केली. त्याप्रमाणे मी जीलहा अध्यक्ष यांच्या कडेही तक्रार केली . त्याप्रमाणे २७ ऑगस्टला फेर मोजणी झाली व ती २००७ प्रमाणे आली. व १८ जून ची मोजणी रद्द करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र माला देण्यात आले. परंतु उत्तर कडील कबजेदार सरकारी करमचारी असून हे मान्य करायलाच तयार नाह. सतत शीवीगाळ करणे धमक्या देत आहेत. सततच्या मानसिक त्रासामुळे जगणे कठीण झाले आहे. आता पुढे माला काय करावे लागेल? मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
दिवाणी कोर्टातून मनाई हुकुम ghyava

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार
सातबारा वर एकत्र पुढारी म्हनुन नाव असनारी व्यक्ती ती जमिन विकु शकते काय?
विकली असल्यास तो व्यवहार रद्द होउ शकतो काय?
होय
नोंदणीकृत विक्री असल्यास दिवाणी न्यायालाय्तून विक्री रद्द करावी lagel

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर नमस्कार
सातबारा वर ए.कु.प्र. असनारी व्यक्ती ती जमिन गहानवत ठेऊ शकते काय?
तसे झाल्यास तो व्यवहार रद्द होऊ शकतो काय?
ए क पु ने अन्य सह धारकाची संमती घ्या वि

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय सर,
मला विहीर मालकी हक्क संबधी माहिती हवी,
सविस्तर खालील प्रमाणे.
सर आमच्या वडिलांनी आमच्या शेताच्या बांधला लावून २० ते २५ वर्ष्या आगोदर दोराच्या सहायाने जमीन मोजून विहीर खोदली देवाच्या कृपेने विहिरीला फुल पाणी लागले,लगेच वडिलांनी ती विहिरीची विदुयत मोटरची ५ ह प डिमांड कडून आत्ता प्रेयंत चालू आहे. परंतु शेजार च्या शेत मालकाने शेत १५ वर्ष आगोदर शेताची नवीन मोजणी केली असता ती विहीर त्याच्या शेतात गेली,तशी त्याने तलाठ्या च्या मदतीने त्याच्या शेतात तिची नोदनि करून घेतली.त्या विहिरीची नोदनि आमच्या ७/१२ उतार्यावर पण आहे. नंतर त्या मालकाने त्या विरीवर ३ ह प चा मोटार डिमांड न काढता चालवत आहे जवड १२ ते १३ वर्ष पासून.परंतु ह्या वर्षी कमी पावसाडा झाल्या मुळे त्या विहिरीची खोदाई व बांधणी करावी लागणार आहे. या साठी आम्ही त्या मालकाला निमे निमे पैश टाकू आसे सांगितले तर तो म्हणतो मी पैसे देणार नाही.मग त्याला आम्ही सांगितले कि तू ह्या विहिरी मध्ये मोटार ठेउ नको, जर तुला मोटार ठेवाचीच असेल तर तू कैदेशीर ३ह प ची डिमांड काढ.
तर सर मला ह्या वरून एवढीच माहिती हवी आहे कि ह्या वीरची खोदाई व बांधणी आम्ही करू शेकतो का थोडक्यात म्हणजे मालकी हक्क आमचा कि त्या शेती मालकाचा .जर समजा मालकी हक्क त्या शेती मालकाला दिला तर मग आम्ही २० वर्ष पासून जे विदूत बिल भरतो आहे ती विहीर चोरीला गेली का. कृपया आम्हाला मदत करा या विषयी, आणि आजून एक तो मालक आमच्या जातीचा आहे पण कुटुंबातला नाही. तसेच आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही
विहीर त्याचे मालकीचे जागेत आहे .
आपण विहीवर केलेला खर्च मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझ्या शेताला जानारी वहिवाट अडवली आहे .या संदर्भाग 18-2-2015 रोजी मामलेदारर कोर्ट अॅक्ट 5 नुसार अर्ज दिला .माझे शेत पंतप्रधान योजने अंतर्गत झालेल्या मुख्य रस्त्या पासुन 100 ते 150 फुट अंतरावर आहे.परतु तलाठी ;मं.अ; ना.तहसीलदार साहेबांनाी चुकिचा पंचनामा केला.त्या पंचनाम्यात माझ्या शेता पासुन 600 ते 700 फुट लांब असलेली शिव दाखवुन तेथिल अतिक्रमण काढुन त्या शिव रस्त्याचा वापर करावा असा आदेश 9 महीन्यानी दिला .शिव ही 3 ते 4 km आहे .पुन्हा शिव पासुन माझ्या शेतात यावे लागनार.मुख्य रस्त्यासुन शेतात जाण्यासाठी या आदेशामुळे धुय्रावरुन सुध्दा महिलांना जावु देत नाहीत .या बाबत तहसीलदार साहेबांना सांगितले असता ते ऐकायला तयार नाहीत .काय करावे मार्गदर्शन करावे ही विनंती

Question by Rameshwar kashte
01-12-2015
kashte876@gmail.com

8 वर्षापुर्वी आम्ही सहा शेतकरयांनी मिळून संतोषकडून स.नं.437 मधील त्याची सर्व 16 एकर शेती कायम खरेदी खताद्वारे खरेदी केली आहे.संतोषकडे व त्याचे चुलत भावाकडे अजुन 20एकर शेती आहे.आता संतोषच्या आत्या त्याच्या वडीलांना आपला हिस्सा मागुन दिवाणी कोर्टात दावा केला आहे.संतोषच्या अजोबांनी त्यांची सर्व जमिन 1986 पूर्वी मूर्त्यू अगोदर संतोषचे वडील व चुलते यांचे नावे करून दिली.संतोषच्या वडीलांनी व चुलत्याने सदर जमिन आपापले मुलांचे नावे केली. आत्यांची लग्न 1987 पूर्वी झालेली आहेत .सदर वाटण्या ह्या खाजगी परंतू बहिणीच्या देखत झाल्या होत्या.माझा प्रश्न आहे की,संतोषकडून आम्ही शेती घेतली आहे आम्हाला काही होईल का ?
सर,notaryविसार पावती ची वैधता किती काळ असते.
नमस्कार सर
जमीनीचे सातबारा वरील क्षेत्र व त्याच जमीनीचे खरेदीखतावरील क्षेत्र जुळत नसल्यास फेरफार रद्द होतो का किंवा खरेदीखत दुरूस्ती करता येते का याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
खारेदिखातावरील क्षेत्र ७/१२ वरील क्षेत्र पेक्षा जास्त असेल तर केवळ ७/१२ प्रमाणे फेरफार घेत येयील.
दुरुस्ती खरेदी खत करता yeyil

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3