जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by प्रदिप
19-11-2015
pradipmore@gmail.com

सर नमस्कार , हे सकेंत स्थळ अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगी आहे, त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.

मी माझा प्रश्न खाली लिहित आहे.

सर, आम्ही एकत्र कुटुंबामध्ये वाढलो. माझ्या दोन्ही भावांच्या आणि वडिलांच्या नावानावर सर्व जमीन आणि घर होते. सर्व संपत्तीची आणेवारी आधीच झालेली होति. माझ्या नावावर जी जमीन होती ती एकत्र कुटुंबामध्ये विकली गेली. आता आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला . माझ्या नावावर समान हक्क मिळण्यासाठी आम्ही न्ण्यायालायातून हुकूमनामा करून घेतला आणि सर्व संपत्तीचे तिघा भावामध्ये समान वाटप केले . त्या साठी कुणाचाही विरोध नव्ह्ता. तो हुकूमनामा घेऊन आम्ही गाव तलाठी यांच्याकाढे अर्ज केला . त्यांनी नकार दिला आणि आम्हाला सांगितले कि तो तो अर्ज तहसीलदार यांना करा . आम्ही तो अर्ज हुकुमनाम्यासाहित आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला . त्यांनी आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सांगितले .

प्रश्न क्रमांक १⇒ येथे मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे का?

जमिनीचे मुल्यांकन आणि मुद्रांक शुल्क किती भरावें लागते यासाठी जिल्ह्यामध्ये अर्ज केला. मुद्रांक शुल्क प्रचंड झाले. त्यामध्ये आमची चुक झाली. जमिनीमध्ये काही वर्ष्यापुर्वी डाळिंब होते, ते दुष्काळामुळे जळून गेले, परंतु सात बारा वरून ते कमी केलेले नव्हते. त्यामुळे जमिनीची किंमत प्रचंड झाली .

प्रश्न क्रमांक २⇒ यामध्ये आता आम्ही दुरुस्ती करू शकतो का?

हुकूमनामा करून एक वर्ष झाले आणि मुल्याकन आणि मुद्रांक शुलाकासाठी अर्ज करून सहा महिने झाले. मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्हाला सांगितले कि, ४% मुद्रांक आणि २% प्रत्येक महिन्याला दंड भरावा लागेल.

प्रश्न क्रमांक ३⇒दंडाची रक्कम हि हुकूमनामा झाला तिथून धरतात कि मुद्रांक किती असावे यासाठी अर्ज केला तिथून?

प्रश्न क्रमांक ४⇒ मुद्रांक शुल्क भरून नोंदणीसाठी अर्ज तहसीलदार यांना करावा कि सहाय्यक निभंधक यांना करावा?

प्रश्न क्रमांक ५⇒ जर आम्ही मुद्रांक शुल्क भरले तर, आम्हाला नोंदणी फी भरावी लागेल का?

प्रश्न क्रमांक ६⇒ मुद्रांक शुल्कामध्ये बचत करण्यासाठी आता आम्ही बक्षीस पत्र करू शकतो का?

प्रश्न क्रमांक ७⇒ मुद्रांक शुल्क भरून आम्ही काय करायला हवे?

कृपया मार्गदर्शन करा . धन्यवाद.
हुकूमनामा झाला तेव्हापासून मुद्रांक शुल्क भरावे लागेल. उशीर केल्यास प्रती महिना दोन टक्के दराने ज्यास्तीत ज्यास्त ४०० टक्के इतका दंड भरावा लागेल.............एकदा कोर्टाचा हुकूमनामा झाल्यावर परत दुसरा दस्त करणे रीतसर नाही. मुद्रांक शुल्क भरल्यावर आपण नोंदणी फी भरून नोंदणी करून घ्यावी.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,इनामवर्ग ६ब बाबत ५०%नजराणा रक्कम भरणेकामी ग्रास चलनाद्वारे ७ दिवसाची मुदत मिळते.त्यामुळे फक्त पत्र घेऊन २ महिन्याने चलन घेतले तर चालेल का?त्यासाठी किती दिवसाची मुदत असते.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
आदरणीय सर ,एखादी व्यक्ती परागंदा असल्यास तिच्या वारसांना जमिनीमध्ये किती वर्षांनी हक्क प्राप्त होतो?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
हरवल्याची नोंद केल्यानंतर सात वर्षांनी .............दिवाणी न्यायालयात केस केल्यावर ते निर्णय घेते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

पोलिस स्टेशनला हरव्लेची नोंद केलेवर .................व्यक्ती न सापडल्यास ............दिवाणी कोर्टालात्याबाबत अधिकार आहेत

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Grampanchat hadditil shetrachi bigar sheti karnyche adhikar kona kade ahet (national banka n.a plot aslyshivay housing loan det nahit)
ग्राम पंचायत हद्दीतील बिन शेती करण्याचे अधिकार , जिल्हाधिकारी यांना आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री पाणबुडे साहेबांचे आभार, (प्रश्न ०३.११.१५ ,०७.११.१५) ला अनुसरून माझे प्रश्न असे आहेत
माझ्या आजोबांची व वडिलांची शेतजमीन १४.६५ हे होती, परंतु २.४.१९९० मध्ये आजोबांनी व वडिलांनी तलाठी दफ्तरी अर्ज केला कि आमच्या वयो मानानुसार आमची जमिनीची देखभाल होत नाही म्हणून जमीन आमच्या मुले,सून ,नातू यांचे नावें करण्यात यावी नंतर तलाठी साहेबांनी खाते फोड केली (फेरफार नोंद-अर्जावरून व जंगल वहिवाटवरून नोंद केली)
१.सावत्र (मोठा)भाऊ २.० हे +पो ख १.१४ हे
२. सावत्र (मोठा)भावाची बायको २.० हे +पो ख १.१४ हे
३.मी स्वत(अ प क माझीआई):२.० हे +पो ख १.१४ हे
४.माझी आई १.० हे
५.आमचे वडील १.९९ हे +पो ख१.१६ हे
६. आमची आत्या १.०८ हे
असे विभागले असून नंतर आजोबा २.११.१९९० ला वारले नंतर वडिलांनी २००४ ला तलाठी दफ्तरी अर्ज केला कि माझ्या नावावर असलेले क्षेत्र पत्नीच्या नावें करण्यात यावे(फेरफार नोंद- तहसीलदार वाटप रजिस्टर २४८/२००४ प्रमाणे नोंद मंजूर) आता आईच्या नावावर २.९९+१.१६,माझ्या २.०+१.१४,भाऊ २.०+१.१४,वाहिनी २.०+१.१४,आत्या १.०८,असे क्षेत्र होते/आहे कब्जे वहिवाट प्रमाणे भावाकडे त्याचे व वहिनीचे क्षेत्र(जमीन)त्याच्याकडे आहे व आईचे,आत्याचे व माझे क्षेत्र (जमीन)माझ्याकडे(आई,वडील व मी एकत्र राहतो)आहे,भाऊ विभक्त राहतो १९९० पासून,माझ्या वडिलांना पहिल्या पत्नीपासून
१ मुलगा
३ मुली आहेत
(पत्नी वारली आहे ~१९७०)नंतर माझ्या आई शी विवाह झालेला आहे ,एक मुलगा(मी) व २ बहिणी आहेत .
माझे प्रश्न असे आहेत
१)भावाने आत्याची जमीन (त्याच्या बहिणीला आत्या धाख्वून तिचे सर्वे पुरावे तसे बनवून मंजे ओळखपत्र
आधार कार्ड,रहिवासी धाख्ला)माघील १५ दिवसात बनवले आहे व त्या जमिनीचे खरेदी करण्यासाठी
प्रयत्नशील आहे,तरी मला यावर कायदेशीर रित्या काही करता येईल का? आत्याला कोणीही वारस नाही(माझे वडील मंझे तिचा भाऊ आहे)
२)भावाला आता ६.२८+१.०८ हे जमीन होत आहेव मला ३.१४ हे व आईची ४.१५ हे पण मला आई कडची जमीन माझ्या नावावर करायची आहे(आई तयार आहे)परंतु मला भावाची संमती लागेल का?तो कायदेशीर रित्या वारसा हक्क सांगू शकेल का?मला माझ्या हिस्स्यात बहिणीचे(माझ्या सक्ख्या बहिणी २)हक्क सोड पत्र करायचे आहे
(त्या तयार आहेत) परंतु मला सावत्र बहिणीचे हक्क सोड पत्र करावे लागेल का?त्या देणार नाहीत काही कायदेशीर मार्ग आहे का?
३)आपण DUAL OWNERSHIP हि संकल्पना आहे असे सांगितले आहे,परंतु याला काय
करावे लागेल मार्ग सांगावा.
४)जंगल वाहिवती वरून नोंद म्हणजे काय?याचा अर्थ काय होतो.

आदरणीय सर
अ व्यक्तीस क व ख ही दोन मुले होती.अ व्यक्ती १९/११/१३ रोजी व क व्यक्ती १९२० ला मयत झाली.क व्यक्तीस मुले नव्हती.३मुली होत्या.क व्यक्तीची पत्नीही पूर्वीच मयत झाली होती.सन १९३५ रोजी फाळणी मोजणी होऊन क च्या एका मुलीचे नाव (श)७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल होऊन अपाक.म्हणून ख व्यक्तीच्या मुलाचे म्हणजेच चुलत भावाचे नाव दाखल झाले.सदर मुलगी (श) १९४६ रोजी मयत झाली.तिला मुले होती.
परंतु सन १९७९ साली ख व्यक्तीच्या मुलांच्या मुलांनी (नातवांनी) श व्यक्ती १९७५ साली मयत झाली (४ वर्षापूर्वी )असा अर्ज का.त.यांचेकडे देऊन स्वतःची नावे लावून घेतली.(जबाबामध्ये शासनाची दिशाभूल करुन श व्यक्ती ख च्या मुलाची मुलगी आहे,(म्हणजेच स्वतःची बहिण) असे दाखवले आहे.)त्यानुसार गावदप्तरी ७/१२ उताऱ्यास नोंदी करुन घेतल्या.
सदर जमिनीची चुलत भावांच्या मुलांनी सन १९९४ रोजी करारनामा करुन सदर जमीन इनामवर्ग ६ ब ची असल्याने शासनाची बिनशेती प्रयोजनार्थ जुनी शर्त विक्री परवानगी घेऊन सन २००८ मध्ये तिऱ्हाईत व्यक्तीस विक्री केली .आज रोजी ७/१२ सदरी तिऱ्हाईत व्यक्तींची नावे आहेतव्यक्तीचे नाव आहे.
तरी श व्यक्तीच्या मुलांना /बहिणीच्या तरी ‘श’व्यक्तीच्या मुलांना,बहिणीच्या मुलांना,नातवांना सन२००५ च्या वारसा अधिनियमानुसार प्रस्तुत जमिनीत हक्क मागता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
सर computer किंवा information technology मध्ये engineering केलेल्या मुलांना सूद्धा mpsc exam साठी Ms -IT certificate गरजेचे आहेका?
आदरणीय सर,एलिनेशन रजिस्टर ,वंशावळ ,कैफियत,विविध इनाम इ.मोडी लिपीतील कागदपत्रे किती सालापर्यंत उपलब्ध होऊ शकतात?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
शिंदेसाहेब हे त्या त्या ठिकाणी रेकॉर्ड चे जतन कसे केले आहे यावर अवलंबून आहे .............सर्वसाधारणपणे सर्व कायम रेकॉर्ड संबंधित निश्चित केलेल्या रेकॉरड रूम मध्ये असणे अपेक्षित आहे ..........परंतु असे जरी असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची परिस्थिती ...तत्कालीन जागेची उपलब्दता....इत्यादी बाबीवर आजची वास्तविकता अवलंबून आहे .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आमचे चार भावांचे सात बा-या मध्ये नाव नाही आहे. चुलत भाउ नाव लावण्यास तयार नाही.. तलाठी त्यांना नावे लावण्यासाठी नोटीस पाठवितो. पण ते काही न करता नाव न लावण्याबाबत हरकत घेतात. जमीन वडिलोपार्जित आहे. पण कागदोपत्री सिध्द करण्यासाठी आम्हांला कोणता नमुन नं कींवा सातबारा वा फेरफार तलाठी कार्यलायामधून घ्यावे लागतील.
वाडवडिलांचे ७/१२, ८अ, वारस नोंदी , व सर्व फेरफार .....................मिळावा . ते पाहिल्यावर वस्तुस्थिती समजेल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय
7/12 एकञित आनेवारीत आहे,एकूण 84 लोक आहेत, इतर हक्कात संरक्षित कुळाची नोंद आहे, सदर क्षेञ 25 वर्ष पडीक आहे, तर नवीन पिक पाण्याची नोंद स्वताच्या हिस्सा पुरती होऊ शकते
सर नमस्कार शैक्षणीक कारणाने बिनशेती करावया ची आहे तसा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांचेकडे सादर केला आहे पण बाजुच्या शेतकर्याने आमच्या जागेवर अतिक्रमण केल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशन व प्रांत अधिकारी यांचेकडे दाखल केली आहे बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे आता आम्हाला काय करावे लागेल या विषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
मोजणी करून आपले क्षेत्र व हद्दी कायम /निश्चित करून घ्या .....................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबा च्या नावे असलेल्या जमिनीतून सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
या नुसार आपण सांगितल्या प्रमाणे जुने १९७४ सालचे ७/१२ हि काढले आहेत यात सर्व जमीन व्यवस्तीत आहे
परंतु सन १९८२-८३ साली सर्वे नंबर मधून गट नंबर होत असताना ८ आर जमीन क्षेत्र कमी झाले आहे.
तरी याबाबतची सर्व कागदपत्रे मी तहसील मधून सर्व ७/१२ व फेरफार घेतली आहे . तरी आता हि कागदपत्रे कोठे द्यायची व कोणता अर्ज करायचा या बाबत संपूर्ण माहिती मिळावी
धन्यवाद
जमीन एकत्रि कारण योजनेवेली जर क्षेत्र..कमी /ज्यादा झाले असेल तर त्याबाबत उप संचालक भूमी अभिलेख यांचेकडे दाद मागता येते

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय,
मी मुम्बई येथे राहत असून माझे रायगड ता. ऊरण येथे वडिलोपार्जित घर आहे. घरपट्टी माझ्या नावावर आहे. मला त्या घराचा व लागून असलेल्या जागेची मोजणी करायची झाल्यास कोणती कागदपत्रे लागतील. माझ्याकडे घरपट्टी सोडल्यास इतर कोणतीही कागतपत्रे नाहीत, ती मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल.
मोजणी जागेची करायची झालेस आपले घर कोणत्या जागेत आहे त्याची संबंधित तलाठी यांना भेटून खात्री करा ...............नगरपालिका असेल तर प्रोपेर्ती कार्ड तपासा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

आपल्या न्यायालयीन निर्णय सदरात अपलोड केलेले साहीत्य कसे पहावे,open होत नाही ?
नोंद घेतली आहे. धन्यवाद.

Reply by MCS Maharashtra | इतर

नमस्कार सर पत्नीच्या मृत्यू नंतर पतीने पुनर्विवाह केला तर अनुकंपा तत्वावर पतीला नोकरी मिळते का मार्गदर्शन करावे ही विनंती
नमस्कार सर विधवाने पुनर्विवाह केला तर त्यांना फॅमिली पेन्शन मिळते परंतु विधूराने जर पुनर्विवाह केला तर त्यांना फॅमिली पेन्शन मिळत नाही विधूर फॅमिली पेन्शन साठी न्यायालयात दाद मागु शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
आदरणीय सर,
अ व्यक्तीस क व ख ही दोन मुले होती.अ व्यक्ती १९/११/१३ रोजी व क व्यक्ती १९२० ला मयत झाली.क व्यक्तीस मुले नव्हती.३मुली होत्या.क व्यक्तीची पत्नीही पूर्वीच मयत झाली होती.सन १९३५ रोजी फाळणी मोजणी होऊन क च्या एका मुलीचे नाव (श)७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल होऊन अपाक.म्हणून ख व्यक्तीच्या मुलाचे म्हणजेच चुलत भावाचे नाव दाखल झाले.सदर मुलगी (श) १९४६ रोजी मयत झाली.तिला मुले होती.
परंतु सन १९७९ साली ख व्यक्तीच्या मुलांच्या मुलांनी (नातवांनी) श व्यक्ती १९७५ साली मयत झाली (४ वर्षापूर्वी )असा अर्ज का.त.यांचेकडे देऊन स्वतःची नावे लावून घेतली.(जबाबामध्ये शासनाची दिशाभूल करुन श व्यक्ती ख च्या मुलाची मुलगी आहे,(म्हणजेच स्वतःची बहिण) असे दाखवले आहे.)त्यानुसार गावदप्तरी ७/१२ उताऱ्यास नोंदी करुन घेतल्या.
सदर जमिनीची चुलत भावांच्या मुलांनी सन १९९४ रोजी करारनामा करुन सदर जमीन इनामवर्ग ६ ब ची असल्याने शासनाची बिनशेती प्रयोजनार्थ जुनी शर्त विक्री परवानगी घेऊन सन २००८ मध्ये तिऱ्हाईत व्यक्तीस विक्री केली .आज रोजी ७/१२ सदरी तिऱ्हाईत व्यक्तींची नावे आहेत व्यक्तीचेआहेत व्यक्तीचे नाव आहे.
तरी ‘श’व्यक्तीच्या मुलांना,बहिणीच्या मुलांना,नातवांना सन२००५ च्या वारसा अधिनियमानुसार प्रस्तुत जमिनीत हक्क मागता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
नमस्कार सर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अनुभवाचा नियम आहे काय विस्तार अधिकारी शिक्षण विभागा मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी तीन वर्षेचा अनुभव सर्टिफिकेट मागितले आहे बीएबीपीएड पात्रता विस्तार अधिकारी शिक्षण विभागा मध्ये नियुक्ती साठी पात्र आहे काय मार्गदर्शन करावे ही विनंती
जिल्हा भूमी अभिलेख यांनी सर्वे द्वारे घोषित केलेल्या महाराष्ट्र शासन असा शेरा असलेल्या गावठाण हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण असल्यास ते काढण्यासाठी अतिक्रम नित जागाची मोजणी करणे कामी भूमी अभिलेख कडे मोजणी शुल्क भरण्याची जबाबदारी नेमकी कुणाची असते याची तपशीलवार माहिती द्यावी .
आदरणीय सर,सिलिंग मध्ये एखाद्या व्यक्तीची काही जमीन गेल्यास पुन्हा त्याची जमीन एखाद्या प्रकल्पासाठी संपादित होऊ शकते का?त्याबाबत शासन निर्णय आहे का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
सिलिंग मध्ये , आपणाकडे कमाल धारण मर्यादेपेक्षा अतिरिक्त जमीन असल्याने , शाषण निहित झाली आहे . मात्र त्या मुले , आपली जमीन संपादित होणार नाही असे नाही. आपली जमीन संपादितहोऊ शकते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...आदरणीय सर,जमिनीचा ९९ वर्षाचा भाडेकरार संपल्यास व त्यावर इमारतीचे बांधकाम असल्यास सदर जमीन मूळ मालकाच्या ताब्यात द्यावी लागते का?
कराराची मुदत संपल्यावर , जरी जमिनीवर बांधकाम असले तरी , जमीन मुल मालकास परत करावी लागते . बांधकाम निश्काशित करून , बांधकाम धारक , समान परत घेऊ शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया खालील प्रश्ना सबंधी जि आर असेल तर आय डी वर पाठवण्यात यावा.
८एकरच्या वरी जमींन असेल तर त्याचा हककसोड होतो का?
उदा.१२ आणि १३ असे दोन गट नंबर आहे.त्यांचे एकूण क्षेत्र ६.८६ आहे.गट नंबर १२ वरुन सहा व्यक्तीचे व् गट नंबर13वरुण सहा व्यक्तीचे हककसोड करुण घ्यायचे आहे.तर हककसोड होउ शकतो का?
जमिनीवर काही निर्बंध ( उदा. जमीन पुनर्वसनासाठी राखीव , सिलिंग मधील तरतुदी लागू , नियंत्रित सत्ता प्रकार इत्यादी ) नसतील त्तर हक्कासोड पत्र करता येईल

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by अनिल koli
08-11-2015
kolianil79@gmail.com

नमस्कार सर माझी पत्नी नगर पंचायतच्या निवडणूकीत मागास प्रवर्ग याआरक्षीत जागेवर उमेदवारी करीत आहे. त्यासाठी जात पडताळणी करायची आहे परंतु अॉनलाईन अर्ज भरतांना निवडणुकचा अॉप्शन येत नाहीये.फक्त शैक्षणिक व नोकरी हेच अॉप्शन येत आहेत कृपया मार्गदर्शन करावे.
सर नमस्कार सातबारा वरील क्षेत्र व खरेदीखत वरील क्षेत्र जुळत नसल्यास फेरफार रद्द होतो का किंवा खरेदीखत दुरूस्ती करता येते का याविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
इतर अधिकार मध्ये
हस्तांतरणास बंदी
नाला
5लिंब 7 स्तवंञ (1)
अशी नोंद आहे याचा अर्थ काय हस्तांतरणास बंदी संपूर्ण जमिनीवर आहे कि फक्त नाला व झाडांवर आहे
भोगवटादार क्र. 1 आहे
सदर जमीन हि काही तरी अति /शर्थी / इनाम/नियंत्रित सत्ता प्रकार इत्यादी असू शकते ..............कृपया मागील फेरफार पहा. हस्तांतरास बंदी हा शेर जमिनी साठी आहे ..झाडांसाठी नाही

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.29 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3