जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अभिनव.उ.कदम
28-11-2015
abhinavukadam@gmail.com
दिवाणी न्यायालयात मनाई साठी व मामलेदार यांचे न्यायालयात बी.एन.डी खाली एकाच case साठी दावा दाखल करता येऊ शकतो का?
Question by अभिनव.उ.कदम
28-11-2015
abhinavukadam@gmail.com
माझे वडील वन विभागाकडे असणारी ३०० एकर क्षेत्रापैकी २० एकर क्षेत्र १९५०ते१०७५ पर्यंत खंडाने वाहिवाठीत होते.तरी १९७५ सालानंतर ७/१२ सदरी पुन्हा forest लागले आहे.परंतु त्रयस्त व्यक्ती ती जमीन आनाधीकृतपणे वाहिवाठ्तात.तरी ती जमिन आम्ही पूर्वी खंडाने करीत असल्याने आम्हाला वाहिवात्न्यासती मिळू शकेल का?त्यासाठी काय करावे ?
मार्गदर्शन करावे,हि विनंती.
Question by शिवाजी बनसोडे
27-11-2015
shivajikb17@gmail.com
सर नमस्कार शैक्षणीक कारणाने बिनशेती करायचं आहे जी जमिन बिनशेती करायची आहे ती भूमिअभिलेख कार्यालयाकडून रितसर मोजणी करून हद्द निच्चित केली आहे व त्या जमिनी भोवती तार कूंपन केले आहे व सर्व कागदपत्राची पुर्तता करून प्रांत अधिकारी यांचेकडे रितसर प्रस्ताव सादर केला आहे शेजारच्या शेतकर्याचे संमतीपत्र तहसिलदार यांचेसमोर करून दिले आहे परंतु एका शेतकर्याने त्याच्या शेतावर अतिक्रमण केल्याची बाब रेटून धरत प्रांत अधिकारी यांचेकडे बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे वास्तव असे आहे की अतिक्रमण त्या शेतकर्याच्या शेतावर झालेले नाही त्याची जमीन त्याने 20 वर्षामध्ये एकदाही मोजून घेतली नाही तरीही तो चांगल्या कामात अडथळा करत आहे काय करावे सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती
Question by कृष्णकांत पुजारे
27-11-2015
krishnakantpujare@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब
नमस्कार,
खालील दिलेल्या प्रश्नास उत्तर दिल्यापाद्दल धन्यवाद.
प्रश्न असा आहे कि मयत व्यक्तीची पत्नी वृद्धापकाळामुळे हिंडूफिरू शकत नाही आणि त्यांची दोन्ही मुले त्यांच्या काम धंद्यामुळे आमच्या सोयीनुसार हक्कसोड पत्र करण्यासाठी तालुक्याला दुय्यम निबंडक कार्यालयात येउ शकत नाहीत पण ते इतर सहकार्य करण्यास तयार आहेत.
सदर काम मार्गी लागण्यास मार्गदर्शन करावे.
नमस्कार,
प्रश्न : सात बारामधून कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे नाव कमी करावयाचे आहे. माहिती खालील प्रमाणे आहे.
सात बारा मधील कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे निधन झालेले आहे तसेच वारस तपास पूर्ण झालेला आहे आणि ज्याचे नाव कमी करावयाचे आहे त्यांच्या कुटुंबाची काही हरकत नाही आहे. तसेच मयत व्यक्तीची पत्नी , त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नी जमिनीवरील हक्क सोडण्यास तयार आहेत. तर काय करणे उचित ठरेल. हक्क सोड पत्र का बक्षीस पत्र ? त्याची प्रक्रिया काय आहे ? का अजून काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल काय ? हक्क सोड पत्र किंवा बक्षीस पत्र कुठे व कसे करावे ? त्याचे मुद्रांक शुल्क किंवा अजून कुठले शुल्क असेते का ? जर ती जमीन अविकसित किंवा पड जमीन असेल तर एकरी काय शुल्क असेल. कृपया मार्गदर्शन करावे.
हक्क सोड पत्र करावे
जमीन ज्या ठिकाणी आहे , त्या तालुक्याचे दुय्यम निबंडक कार्यालयात , आपणास हक्क सोडपत्रकरता येयील
नोंदणी व मुंद्रंक शुल्क माहिती तेथे मिळेल.
Question by राजेंद्रप्रसाद राउत ( ग्रामसेवक )
27-11-2015
rajendraprasadraut@gmail.com
सात/बारा मध्ये नाव लावण्यास तलाठी साहेब वेळकाढूपणा करत आहेत. वारस तपास व इतर अधिकृत योग्य मार्गाने नाव लावण्यास कार्यालयामध्ये गेलो असता, तलाठी साहेब सांगतात की, अगोदर मयत व्यक्तींचा वारस करून घ्या नंतर नावे लावतो. परंतु मयत इसमाचा मुलगा वापस तपास करण्यास वेळपणा काढत आहे. ते तलाठी साहेबांना तोंडी सांगतात की, आमची कोणतीही हरकत नाही आपण यांची नावे नोंद करून घ्या परंतु तलाठी साहेब अगोदर इतर नातेवाईकांच्या वारस करण्यास प्रथम सांगत आहे. हे योग्य आहे का...योग्या नसल्यास आम्ही काय करावे.
Question by गणेश शिंदे
27-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,विश्वस्त संस्थेच्या नावे पूर्वी जमीन आहे.पुन्हा जमीन घेताना ६३ ची परवानगी घ्यावी लागेल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
Question by SACHIN
27-11-2015
sachin.tetgure1992@gmail.com
नमस्कार सर,
अमक्या वडीलनाची गावी जमीन आहे , त्यावर चुलत भावकी व सकखी भावकीची नावे लागली आहेत.. तर 7/12 वरुण त्यांची नावे कशा प्रकारे कमी करता येतील? कायदेशीर खटला न चालवता? काही वायक्तिक वादामुळे खातेफोड करण्यास अडथळा तयार करत आहेत ...कृपया याबद्दल मार्ग द्यावे ही विनंती?
Question by तिर्थकर अनिल बब्रुवाहन
27-11-2015
tirthkaranil@gmail.com
आदरणीय सर,
तलाठी संवर्गातुन मं अ संवर्गात दि.14/12/2010 रोजी झालेल्या बैठकीत माझी निवड झाली .मी फेब्रुवारी 2011मध्ये माझे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले.निवड समितीच्या बैठकीच्या 1 वर्षाच्या मुदतीत पदोन्नतीकरीता पद रिक्त असतानाही अस्थापना लिपीक/अका यांनी जाणिवपुर्वक वरीष्ठांकडे टिप्पणी सादर न केल्याने मला पदोन्नती मिळाली नाही.माझ्या पुढे निवड यादीत नाव असणा-या तलाठी यांनी 1वर्षाची मुदत संपल्यानंतर वाढीव 6महिन्याच्या कालावधीत त्याचे जातवैधता प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर व त्यावेळी नवीन जागा रिक्त झाल्यावर त्याला पदोन्नती देण्यात आली .मधील 6महिन्याचा कालावधी जाणिवपुर्वक (15.11.2011 ते26.05.2712)वाया घालविला.व मुदत संपली म्हणून मला डावलले.मला कळविण्यात आले नाही.
नंतर परीक्षा पास झालेप्रमाणे निवड यादी केली.त्याप्रमाणे मला 21.11.2014 रोजी पदोन्नती दिली.त्यानंतर 05.04 2015रोजी नव्याने आदेश काढला की,जरी पदोन्नती दिली असली तरी आपणास ज्या जागेवर पदोन्नती दिली ती जागा 28 फेब्रुवारी रोजी रिक्त झाल्याने पदोन्नतीचा लाभ 1मार्च 2015पासुन मिळेल.
माझा प्रश्न
प्रशासनाची ही क्रुती योग्य आहे काय ?
Question by विनय राऊत
27-11-2015
Vinayrt05@gmail. com
हिंदु एकञित कुटुंबा मध्ये एखाद्द्याला एकच मुलगी असेल तर तिला वारसा हक्क मिळु शकतो का?
तिचे वडील २००५ च्या आधी वारले
Question by गणेश शिंदे
27-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, बिनशेती सनद म्हणजे काय?याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती....
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
25-11-2015
ravindra.golesar@rediffmail.com
मा. सर सन २००३ मध्ये वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी मृतुपत्र द्वारे झालेली आहे. परंतु नवीन हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ नुसार मुली वडिलांची वडिलोपार्जित मिळकत मागू शकतील काय ?
मिळकतीची वाटणी मृत्य पत्र द्वारे २००३ मध्ये झाली आहे . त्या मुले हिंदू वारसा कायदा २००५ च्या कलम ६ (५) अन्वये , मुलीना आता हिस्सा मागता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण mudpe
25-11-2015
spmudpe@gmail.com
आई वडील हयात असताना वडिल व इतर तीन mulanchyaइच्छेविरुद्ध ek मुलगा वाटणीसाठी जबरदस्ती करू शकतो का? असे केल्यास कायद्यानुसार उपाय suchava
Question by दिनेश दाभोलकर
25-11-2015
dinesh.dabholkar@rediffmail.com
नमस्कार सर ,
नवीन घर घेताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कुठले कागदपत्रे पहावी किवा बिल्डरकडून आपल्याला कोणती कागदपत्रे घर घेताना आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपली कुठे फसगत होऊ नये . या वर कृपया मार्गदर्शन करावे .
Question by दिनेश दाभोलकर
25-11-2015
dinesh.dabholkar@rediffmail.com
नमस्कार सर ,
एखाद्याचे नाव सर्वप्रथम सातबारा मध्ये कसे आले हे कसे शोधून काढावे
Question by रामधन ठोंबरे
24-11-2015
ramdhanthombre99@rediffmail.com
सर माझ्या वडिलांच्या नावावर २० आर जमीन क्षेत्र आहे मला अल्प भुधारक म्हणुन विहीरीचा लाभ घेता येईल का
नवीन भू संपादन कायद्या नुसार ,
अल्प भू धारक म्हणजे , ५ एकर बिगर बागायती जमीन व २.५ एकर बागायती जमीन .
आपण ज्या योजनेखाली विहीर घेत आहात ती योजना कोणती ?
त्या योजनेत अल्पभू धारक काय हे पाहणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर पाटील
24-11-2015
patildnyaneshwar10@gmail.com
respected sir,
recently i have come to notice that there is a tax exemption on property for army and paramilitary forces.
therefore it is requested to you that kindly send me the copy of the said govt order to my mail id so that i alongwith my friends can facilated.
your kind co-operation in this regard will be highly appreciated.
yours
Dnyaneshwar Patil
A local body es-specially in states other than Maharashtra have given tax exemption to residential properties .
however such tax exemption is not given for agricultural properties in Maharashtra
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश बबन साखरे
24-11-2015
sakharep26@gmail.com
वनशेती जमीनीवरील नविन शर्तीची अट काढून,वारसांचे नावे खातेवाटप करून प्रत्येकाच्या नावे 7/12 उतारे मिळतील का?
वनशेत जमीन , शासन प्रदान करत नाही
त्या मुले त्या द्वारे अतो घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही
७/१२ स्कॅन करून पाठवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
24-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर ,गावठाणा मधील जमिनीचा ७/१२ असतो का?एखाद्या गावातील काही भाग गावठाण हद्दीत समाविष्ट झाल्यास त्या जमिनीचा ७/१२ बंद होतो का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
गावठाणातील जमिनीस मिळकत पत्रिका असते
७/१२ बंद करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वागतकर परमेश्वर
23-11-2015
Parmeshwarwagatkar@gmail.com
आदिवासीची जमीन आदिवासीला घेण्यासाठी विकणा-या आदिवासीला सर्व जमीन विकता येते काय ?
मात्र त्याचे एकूण धारण क्षेत्र , शेत जमीन कमाल मर्यादा धारण कायद्या नुसार, कमाल मर्याद्या पेक्षा जादा होता कामा नये
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
23-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची आहे.८ अ च्या उताऱ्यावर क्षेत्राचा उल्लेख आहे.परंतु ७/१२ सदरी क्षेत्राचा उल्लेख नाही .तरी ७/१२ सदर क्षेत्राचा अंमल देणेकामी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
अशी वस्तुस्थिती असणे अनाकलनीय आहे
८ अ ला जमिनीचे क्षेत्र आहे परंतु ७/१२ सादरी नाव नाही
आपण तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by yogeshpatil
23-11-2015
yogeshpatil373@gmail.com
आतरजिल्हा बदली मध्ये लिपिक/तलाठी सवर्गच्या बदली होत त्याप्रमाणे अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी यांची आंतरजिल्हा बदली होते का . जर होते असेल मी अव्वल कारकुन या पदवर कार्यरत असून पालघर जिल्हायातुन जळगाव जिल्हाबदली बाबत परिपुर्ण प्रस्ताव शासनाला सादर केले आहे तर मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी हे जागा ही आंतरजिल्हा/ आंतरविभाग बदलीने भरली गेल्यास सध्या कार्यरत लिपिक/तलाठी कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतेवर परिमाण होणारे आहे अव्वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील पदे पदोत्रतीचे असल्याने सदरची पदे हे आंतरजिल्हा/ आंतरविभाग बदलीने भरण्यात येऊ नये असे या कार्यालयाचे मत आहे असे शासनाल पत्र सादर केले आहे.
तसेच अव्वल कारकुून सवर्गतील एकुण १७ पदे जळगाव आस्थपनेवर रिक्त आहे तसेच इतर १ अव्वल कारकुन यांनी आंतरजिल्हा बदली जळगाव जिल्हामध्ये अव्वल कारकून संवर्गात सामावुन घेण्यात हरकत नसलेल्या पत्र दिली आहे. या प्रकरण आपले मागदर्शन मिळवो
Question by प्रमोद पवार
23-11-2015
pramodpawar23@gmal.com
१९८९ साली वडिलोपार्जित जमीन वाटणी पत्राने भाव बहिणींना वेग वेगळी मिळाली होती ...२०१० साली तहसीलदारांनी सक्ख्या भावाला बहिणीच्या जमिनीवर कुळ असल्याचा निर्णय देऊन आदेश दिला होता. ३/८/२०१५ रोजी उपविभागीय अधिकार्यांनी बहिणीचे अपील मान्य करून तहसीलदारांचा निर्णय आणि त्यानंतर झालेले सर्व फेरफार रद्द करण्याचे आदेश पारित केले . मात्र या आदेशात अपिलासाठी किंवा अंमलबजावणी साठी किती दिवसाची मुदत वैगेरे नमूद केले नाही .
या आदेशानंतर तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांनी 23/९/२०१५ रोजी फेरफार करून ७/१२ दप्तरी पुन्हा बहिणींची नवे दाखल केली . त्यानंतर भावाने एम आर टी मध्ये अपील दाखल करून २९/९/२०१५ रोजी या आदेशाविरोधात स्थागिती आदेश आणला आणि तो तलाठी यांनी त्याच दिवशी नोंदवला.
त्यानंतर परवा त्या भावाने आत्महत्या केली. आणि आता त्याचे कुटुंबीय आरोप करतात कि तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांनी नोटीस देऊन ६० दिवस थांबून फेरफार करायला हवा होता.
तलाठी मंडळ निरीक्षक दोषी आहेत का ???
नाही
स्थगती आदेश असल्याशिवाय , नोंद मंजूर करणे थाबवता येणे , उचित नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
21-11-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडील ह्यात असताना मुलगी तिचा हिस्सा मागू शकते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
नाही
हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ नंतर , वडिलांचे मर्त्य ननतर , त्यांना हिस्सा मिलेले
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय भोयर
21-11-2015
bhoyars600@gmail
मा.सर मि आदिवासी समाजाचा आहे माजी शेती ही माजी सैनिकाची असून माननीय तहसीलदार सा यांनी माझ्या बाजूनि निर्णय दिला ७/ १२ माझ्या नवानी करुण दिला पण माला आज रोजपर्यन्त शेतीचा ताबा मिळवुन दिला नहीं तरी मला ताबा कोणच्या पदतींनी मिळेल याचे उपचार सूचवा।।
ही विनंती
Question by vishal eknath khairnar
19-11-2015
vishalkhairnar84@rediffmail.com
आदिवासी व्यक्ती ची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्ती विकत घेऊ शकतो का? त्याबाबत चे शासन निर्णय / परिपत्रक मिळावे
अधिवासीची जमीन बिगर अधिवासी सक्षम प्रधीकार्याची / शासनाची परवानगी घेवून विकत घेऊ शकतो ..............कृपया आपण जवळच्या तहसील/प्रांत कार्यालयात संपर्क साधा आपल्याला शासन निर्णय मिळेल
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
