जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by वैशाली तोटे
07-02-2015
vaishalirudre@gmail.com
लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्नतीसाठी पात्रता ही महसुल अर्हता पास होण्याची दिनांकावर कि लिपीक पदावर रुजु दिनांकावर ग्राहय धरली जाते याची माहीती सांगणे तसेच पदोन्नतीच्या वेळेस अनु.जमातीत जागा शिल्लक नसल्यास इतर प्रवर्गात जागा रिक्त राहत असल्यास त्या पदावर अ.ज.च्या उमेदवारास जागा रिक्त होईपर्यंत पदोन्नती देता येते का.
लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्नतीसाठी पात्रता लिपीक पदावर रुजु दिनांकावर ग्राहय धरली जाते.
अनु.जमातीत जागा शिल्लक नसल्यास इतर प्रवर्गात जागा रिक्त राहत असल्यास त्या पदावर अ.ज.च्या उमेदवारास जागा रिक्त होईपर्यंत पदोन्नती देता येत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by वैशाली तोटे
07-02-2015
vaishalirudre@gmail.com
अनु.जमातीकरीता लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्नतीसंदर्भात काही न्यायालयीन निर्णय झालेले असल्यास देण्यात यावे.
Question by सागर कुंभार
07-02-2015
sagarkumbhar0@gmail.com
सत्ताप्रकार ब ची मिळकत अ करता येते का ? येत असलेस कोणाची परवानगी घ्यावी लागेल ? प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय असलेस सदर शासन निर्णयाची प्रत मिळावी ही विनंती आहे.
ब सत्ता प्रकारची जमीन अ सत्ता प्रकारात रुपांतरीत करता येते .
जमीन कोणत्या कायद्याने व कोणत्या उद्देअशने दिली आहे त्या वर परवानगी कोणाची लागेल हे अवलंबून आहे .
१. शाशानाने जमीन भोगवटा अधिकारात जमीन दिली असेल तर , शाशानाची परवानगी लागेल
२. कुल कायद्या खालील जमीन असल्यास , प्रांत अधिकारी यांची परवानगी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपला प्रश्न माोघम आहे. कृपया खुलासेवार .विचारणा करावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Ram Phadatare
06-02-2015
ram.p.phadatare@gmail.com
Sir,
1997 roji tondi waatap zale aahe tya waatapapramane jaminichya record la nondi howun vahivati aahet n tyapramane shetsara bharla aahe. Tyach waatapane milaleli jamin mazya bhawane vikali aahe. mag aaj roji tya waatapane nondi nondanikrut dastashivay zalya aslyane registration act khali radd karta yetil ka?
१९९७ साली झालेली वाटप सर्वाना मान्य आहे का?
एवढ्या विलंबाने हरकत का ?
जर भावाने त्याचे तोंडी हिस्स्याने आलेली जमीन विकली( नोंदणीकृत दस्ताने ) असेल तर , आता विक्री व पर्यायाने विक्री खात रद्द करणे दुरापास्त
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by लक्ष्मण हरीभाऊ दिवटे
06-02-2015
d.lakshya.mann@gmail.com
ननं.७/१२ तयार होण्यापूर्वी जमिनीची रेकॉर्ड कोणत्या दस्तऐवजा मध्ये ठेवले जात होते व ते पहावयास मिळेल काय? असल्यास कोठे पहावयास मिळेल?
आपण आपले भूमी अभिलेख खात्यास भेट द्या
पूर्वी कायम धार तक्ता , सूड पत्रक अशे अभिलेख ठेवले जात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र पाटील
06-02-2015
patil.rajendra@gmail.com
अ.पा.क कर्त्यास जमीन विक्री अथवा सदर जमिनीवरती कर्ज काडता येते का ?
Question by narshing
05-02-2015
narshingtugave@gmail.com
sir
25/10/1980 nantr kalm 22 A khali punrsthapit N zalelya kiwa adyap chaukashisathi pralmbit aslele tsech kendr shasnachi adyap maneta N milalelya prakrnatil jminivr Bhogvtdar sadri MAHARASHTRA SHASAN RAKHIV VANE ashi tr etr hkkat sambhtitt khatedarachi nave aslelya jminis 1/4/1957 purvichi kulachi nave 1/5/1957 roji kmi zalene sdr nave hi 1/4/1957 ya maniv dinankanatr 70 B nusar kamkaj n chalvta kmi zalene v sdr nave aaj roji 70 B anve aadesh houn ya jminis jmin malkacha navakhali etr hkk sdri sanrkshit kul mhnun lagu shaktat ka ? asa aadesh prapt zala asun tya babt gavi ferfar nond ghyavi ka ? v sdr ferfar nond mnjur krta yeil ka ?
२२ अ खाली चौकशी खाली प्रलंबित आहे .
२२ अ खाली पुर्नार्स्थापन आदेशः यास वन विभागाने ( भोपाल /नागपूर) यांनी मान्यता दिल्यानंतर , मुल मालकास जमीन पुनर्स्थापित होईल . जमीन पुनर्स्थापित झाले तर , अश्या जमिनीस कुल नोंद घेण्यास हरकत नाही
तथापि क्षेत्र पुनर्स्थापित झाले नाही तर कुल व विक्री किंमत निच्छित होणे या करता येणार नाही
मात्र मिळणाऱ्या नुकसान भार्पैच्या वेळी अश्या कुलाचा विचात करावा लागेल
सध्या स्थितीत नोंद घेऊन , इतर हक्कात thevnyas हरकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिरीष सोरटे
05-02-2015
shrisshri@gmail.com
सर क्र ८ला अनुसरून गट नं ३३३ मधे एकुण क्षेत्र ८.५ एकर आहे सातबारयावर थोरल्या व दोन नंबरचा भाऊ याच्या नावावर आहे हे क्षेत्र घेणाराने कुठल्याही प्रकारची पेपर नोटीस बजावली नाही खरेदीखतामधे भावाची संमती घेतलेली नाही आम्ही तिन भाऊ एकत्र कुटुंब पद्धती राहतो आमचे वाटप झालेले नाही कोणाचा हिस्सा कुठे हे निश्चित नाही जे क्षेत्र दिले त्यात विहीर व बोअर पड दोन नंबरचा भाऊ याच्या नावावर आहे आम्ही सर्व जण विवाहित आहोत वडीलो पारजीत जमीन असून माझे वडील मयत आहेत सर फेरफार नोंद रद्द करता येईल का याबद्दलचे अधिक माहिती मार्गदर्शन करावे
घेणाराने वर्तमान पत्रात सूचना प्रसिद्ध केली नसेल तर , खरेदी घेणार Bonafide -Purchaser होत नाही
न्यायालयात अशे खरेदी खंत रद्द होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिकेत पखाले
05-02-2015
aniketpakhale39@gmail.com
sir, mi 'A'ya malkachya gharacha thoda tukda kharedi karu pahtoy tar mala kharedi chi kaydeshir prakriya sanga ani kharedi che veli konti kalji gheu te sanga.
Question by राजेंद्र पाटील
05-02-2015
patil.rajendra@gmail.com
अ.पा.क. कर्त्यास जमीन विक्री करता येईल का ?
Question by BHARAT DUTONDE
04-02-2015
rutuja.dutonde@rediffmail.com
सर स.कु. कुळाची नोंद इतर अधिकार या रकान्यांत आहे.मालकाने सदर जमीन विक्री केली आहे व त्याचा फेरफार सुद्धा झाला आहे.कुळ मयत असून कुळाच्या वारसाने वारस कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.जमिनीवर कुळाचे वारसाचा ताबा नाही फक्त वहीती रकान्यात मागील १०-१५ वर्षापासून नाव येते.पिकाच्या रकान्यात पडीत आहे.व प्रत्यक्ष जमीन सुध्दा २०-२५ वर्षापासून पडीत आहे.अशी वारस कार्यवाही तलाठ्यांना करता येते का? किंवा वरिष्ठांचे आदेश आवश्यक आहे का?काय करावे कृपया सविस्तर मार्गदर्शन व्हावे
कुल जर सुरक्षित असेल तर , कृषक दिनी तो मालक झालेला आहे .
त्यामुळे मालकास क्षेत्र विकण्याचा हक्क नाही .
कुळाचे वारसांची नोंद घ्यावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सु. माजरेकर
04-02-2015
mjrkrganesh@gmail.com
साहेब, धोकादय परिस्थितीतील ( जीवित व वित्तहानी) होणारे कडूनिंबाचे व नारळाचे झाड तोडण्यासाठी घरातील म्हणजेच चुलते यांनी विरोध केल्यास ते तोडून घेण्याससाठी वा फाटे मारण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा.. कृपया सल्ला द्यावा. ( साहेब मी ग्रामपंचयात ,तलाठी,तहसिलदार, प्रातं , जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज केला आहे. परंतु अद्याप त्यांची काहीच चौकशी वा अर्ज निकली काढला गेला नाही. तर मी काय करू..)
तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांचेमार्फत स्थळ पंचनामा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
कलम १३३ दिवाणी प्रक्रिया संहिता .....सार्वजनिक उपद्रव . प्रांत अधिकारी यांचेकडे प्रकरण दाखल करा ...ते पोलिस मार्फत चौकशी करून व स्थळ पंचनामा करून निर्णय घेतील .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीष गायकवाड
03-02-2015
girishgaikwad1967@gmail.com
इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्यानंतर पुन्हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्या वर्षी पुन्हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्कम भरणे आवश्यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
Question by Neha
03-02-2015
neha_kulkarni_2001@yahoo.com
बक्षिसपत्र जमीन विकता येते का?
या जमिनीवर इतर कोणी हक्क, जे वारसदार नाही , सांगत असेल तर काय करावे?
बक्षिसाने मिळालेली जमीन विकत येते.....हक्क सांगणार यांना सांगू देत तो दिवाणी कोर्टाचा विषय आहे .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित जगताप
02-02-2015
spj100@rediffmail.com
महोदय
पुनर्वसन शेत जमीन मिळाल्यानंतर किती कालावधीनंतर विकता येते आणि त्यासाठी कुठल्या परवानगीची आवश्यकता आहे, याची माहिती मिळावी
संपादित होणार्या जमिनीच्या विक्रीस परवानगीची गरज असल्यास , पुनर्वसित क्षेत्रात मिळणारी जमीन त्याच धारणा प्रकाराने मिळते . म्हणजे संपादित झालेली जमीन वर्ग-२ ची असेल तर , पुनर्वसित क्षेत्रात ( लाभक्षेत्रात ) दिली जाणारी जमीन , वर्ग २ धारणा प्रकारची मिळते .
लाभक्षेत्रात दिलेली वर्ग २ जमीन १० वर्षापर्यंत विकत येत नाही . १० वर्षानंतर , शाषन शुल्क ( Premium ) भरून विकत येते .
कलम १६ (१) (ब) (इ) - महाराष्ट्र प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन कायदा 1999
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित जगताप
02-02-2015
spj100@rediffmail.com
महोदय
वडिलोपार्जित जमीन नावावर असताना इतर चुलत भाऊ वहिवाट करून देत नसतील तर जमीन ताबा मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
आपणास दिवाणी न्यायालयात , ताबा मिळणे बाबत व चुलत भाऊ यांना मनाई करणे बाबत दावा करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिरीष सोरटे
02-02-2015
shrisshri@gmail.com
सर माझी वडीलोपारजीत जमीन असून माझे वडील मयत आहेत आम्ही तिन भाऊ एकत्र राहतो माझा प्रश्न असा आहे माझ्या थोरल्या भावाने एकत्रीत क्षेत्रातील चार महीनयापुरवी चार एकर जमीन आमच्या संमतीशिवाय चार खरेदी दिले आहे ही बाब लक्षात आली आहे तरी त्याला विचारले असता त्याची पण फसवणूक झाली आहे तलाठी कार्यालय मधुन कुठलेही नोनोटीस बजावली नाही सर आम्हाला यातील मार्गदर्शन लवकर करावे ही विनंती
आपले क्षेत्रापुरते खरेदी खात रद्द करणे बाबत दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
फसवणूक म्हणजे नक्की काय झाले आहे ?
फसवणूक बाबत आपणास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा लागेल
भावाने तुमच्या हिस्सायाची जमीन , विकली असेल अशे खरेदी रद्द करणेसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा खरेदी खताचे अनुषगाने होणार्या फेरफार नोंदीस तलाठी/मंडळ अधिकारी यांचे कडे हरकत दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीष गायकवाड
02-02-2015
girishgaikwad1967@gmail.com
इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्यानंतर पुन्हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्या वर्षी पुन्हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्कम भरणे आवश्यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
सदर जमीन विक्री करताना पुन्हा 50% नजराणा रक्कम भरणे आवश्यक आहे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by महादेव गोरोबा शिंदे
02-02-2015
mahadeoshinde3594@gmail.com
महसूल विभातून वन विभागात सेवा वर्ग होते का ? क्रपया मार्गदर्शन व्हावे.
सेवा वर्ग होत नाही
आपणास भरती प्रक्रिये द्वारे वन विभागात प्रवेश करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by narshing
02-02-2015
narshingtugave@gmail.com
Sir Namste
Sir Mahangar palika yriyamadhe mahsul khatyala vasuli krnyacha adhikar aahe ka ? mahanagr palika pn binsheticha tax vasul krtat v tahsil office pn vasul krto .Nemke konala vasuliche adhikar aahet mahanagar palike madhe asnarya gavachi vasuli krnyache adhikar tahsil officela aahet ki mahanagarpalikela ? jr tahsil officela binsheti tax vasul kraycha adhikar asel tr kontya shasn nirny aahe ka ? mahanar palika pn tax v tahsil office pn tax gola krtat tyamul nemka adhikar konala aahe vasulicha ?
महानगर पालिका क्षेत्रात बिनशेती आकार वसूल करण्याचा अधिकार महसूल विभागास आहे
प्रकरण XI - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by narshing
02-02-2015
narshingtugave@gmail.com
sir kharya khurya aavdogik proyojnasthi bhogvtdar varg 2 chi jmin kharedi kru shakto ka ? v tyasathi collector chi permission lagte ka ? tsech ykun kiti njrana bharava lagto ? tasech kharya khurya prayojnasathi vapr kraycha asel tr registri madhe aavdogik prayojnasathi mhnun registeri kravi lagte ka ? v aavdogik prayojnasathi jr jmin kharedi kraychi sel kiva krnyasathi to area aavdogik zone mhnun mnjur zalela pahije ka ? Tahsildar yanche kadil ptr aahe ki 2 pt njrana bharun 149 /150(2) pramane karyvahi tatkal kra ase ptrat mhnle aahe e brobr aahe ka ? Thodisi deetel mahiti milavi
१. आपण कलम ६३-१ अ वाचा . खर्याखुर्या औद्योगिक कारणासाठी आपण वर्ग २ ची जमीन खरेदी करू शकता .
२. १० हेक्तर पेक्षा क्षेत्र कमी असल्यास परवानगीची गरज नाही , मात्र १० हेक्तर पेक्षा क्षेत्र जादा असल्यास , आयक्त विकास यांची परवानगी घेणे आवश्यक
३.खरेदी खतात औद्योगिक वापर लिहिणे तर आवश्यकच आहे पण अशी खरेदी केलेली जमीन ५ वर्षात औद्योगिक वापरात आणली पाहिजे
४.तहसीलदार यांचे पत्र बरोबर आहे - होणार्या खरेदी खताचे अनुषगाने फेरफार नोंद मंजूर करण्याचे दृष्टीने
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिरीष सोरटे
01-02-2015
shrisshri@gmail.com
सर माझी वडीलो पारजीत जमीन असून माझे वडील मयत आहेत आम्ही तिन भाऊ एकत्र राहतो माझा प्रश्न असा आहे माझ्या थोरल्या भावाने एकत्रीत क्षेत्रातील चार एकर आमच्या संमतीशिवाय चार महीनयापुरवी खरेदी दिले ही बाब आमच्या लक्षातआली तलाठी कार्यालयामधुन आम्हाला कोणतेही नोटीस आले नाही भावाला विचारले असता त्याची पण फसवणूक झाली आहे सर आम्हाला यातील मार्गदर्शन करावे ही विनंती
वाटप झालेले नसल्यास सर्वांचा समान .हिस्सा गृहीत धरला जाताो. थाोरल्या भावाने त्याच्या .हिस्स्याचे क्षेत्र सहधारकांच्या संमतीने .विकणे अपेक्षीत आहे. संबंधीत .विक्री फेरफारा.विरूध्द प्रांताकडे अपील दाखल करू शकता.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश thorat
01-02-2015
thorat.yogesh4@gmail.com
सर
मी पुणे जिल्यात खेड तालुका हद्दीत धानोरे गावा लागत १००० चौरस फुट जागा घेत आहे. मी आणि माझे मित्र एकून ११ गुंठे गेट आहोत तर सर्वांचे वेगवेगळे खरेदी खत होईल का. आम्ही एक एजंट कडून जागा घेत आहोत तरी काय अडचण येईल मार्ग दर्शन करावे.
मी आणि माझे मित्र ११ गुंठे घेत आहोत , पण आपण किती मित्र ११ गुंठे घेत आहात ?
जात जमीन बिन शेती असेल तर , क्षेत्र बिन शेती आदेशातील भूखंड प्रमाणे घेऊ शकता
मात्र जमीन शेती असल्यास , बागायत शेत्र कमीत कमी ५ गुंठे , भात शेती अथवा एक पिकी १५ गुंठे व जिरायत असल्यास २० गुंठे असणे आवश्यक आहे
११ गुंठे क्षेत्र जमीन काय स्वरुपाची आहे ? त्या वर अवलंबून आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश थोरात
01-02-2015
thorat.yogesh4@gmail.com
सर
माझ्या वडिलांच्या नावे २ एकर शेती आहे.तर ते अल्प भूधारक आहे का. शेती पुणे जिल्यात आहे आणि बागायती आहे. उत्तर मिळावे.
धन्यवाद
भूसंपादन योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम २०१३ नुसार
अल्पभूधारक( Small Farmer ) म्हणजे -२.५ एकर बागायती / ५.० एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी
अत्यल्प भू धारक ( Marginal Farmer ) म्हणजे - १.२५ एकर बागायती / २.५ एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
भूसंपादन योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम २०१३ नुसार
अल्पभूधारक( Small Farmer ) म्हणजे -२.५ एकर बागायती / ५.० एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी
अत्यल्प भू धारक ( Marginal Farmer ) म्हणजे - १.२५ एकर बागायती / २.५ एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी
आपले शेतीचे स्वरूप काय आहे ?
बागायती कि जिरायती ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीकांत राऊत
01-02-2015
raut1959@gmail.com
नमस्कार सर ,
ऐका खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने माझे वडील हयात असताना आमच्या शेत जमिनीवर विनापरवानगी अतिक्रमण करून २८ वर्षापूर्वी इमारत बांधली आहे ते 14 वर्षापूर्वी निवर्तले त्याचे नंतर सर्व देखभाल माझी आई करत होती ती पण 10 महिन्यापूर्वी निवर्तली त्यानंतर मी कायदेशीर जमीन मोजणी करून घेतली असता १९.५ आर जमिनीवर अतिक्रमण असल्याचे दिसून आले हे अतिक्रमण कसे दूर करता येईल माझे नावे {3 हिस्सेदार } मिळून फक्त ४७ आर जागा आहे संस्थेने N A परवानगी घेतलेली नाही फक्त ग्रामपंचायती मधून N O C घेतली आहे . हे अतिक्रमण कसे दूर करता येईल कृपया मार्गदर्शन करा
आपण खूपच विलंब केलेला आहे .
२८ वर्षे अतिक्रमण झाले नंतर आपण आता , अतिक्रमण दूर करू ईश्हिता .
प्रथम आपण शाषण दरबारी म्हणजे तंत्र शिक्षण विभागाकडे अतिक्रमण दूर करणे बाबत अर्ज करा. त्या नंतर आपणास न्यायालयच न्याय देऊ शकेल
अतिक्रमण दूर जरी झाले नाही तरी , नुकसान भरपाई मिळू शकते
आपण अथक प्रय्तन करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
