जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात
Mananiy Mahoday,

Namaskar,

Vishay : Saat Bara Madhil Naav Kami Karanya babat

Maze vadil ani tyanchya mitrachya family che balpanapasun mhanje 40 varshapasun jast sambanth hote. Ani te aamche hitchantak asalya mule 20 Varshapurvi mazya vadilani ani tyancha mitrane bagayatisathi jameen vikati ghetali. Mazya vadilani 10 Acre and tyancha mitrane 50 Acre. Mazya Vadlinani tyanchya mitrache naav aaplaya saat baara madhye takale jenekarun tyanche udyogvishwat sambandh changale aslyamule tyanchi and amachi jameen ekatra develop keli yeil ya uddeshane.

Jameen ghetalyanantar kahi varshani vadilanchya mitra ajari padle ani tyanche nidhan (dead) zale ani ghetaleli jameen kahihi develop na hota tashich padun rahili. Vadilanchya mitrachi mule sadhan alalyamule tyana aata bagayati madhy interest nahi. Aata aamhala vadilanchaya mitrache naav saat baara madhun kami karavayache aahe ani tyancha mulanchi kahich harkat nahi ani te sod partra dyayala tayar aahet.

Vadilanchaya mitrache naav saat baara madhun kami karanaya sathi kaay karave lagel ? Tasech kontya kagad patranchi purtata karavi lagel ? Tyanchi sampoorna family mumbait aahe ani vadilanchay mitrachi baiko ati vruddha aslyamule jasti hindu phiru shakat nahi.

Krupaya ya vishayavar salla dyava he vinanti.

Aapla Vishvasu

Krishnakant Pujare

E-mail : krishnakantpujare@outlook.com
Cell No. : 09867391555
आपले वडिलांचे मित्राचे जे कायदेशीर वारस आहेत व ज्यांची नावे आता ७/१२ आहेत ( लावली असतील तर ) त्या सर्वांनी , ४० एकर क्षेत्र आपणास नोंदणीकृत दास्ताने विकणे आवश्यक

नोंदणीकृत दस्त द्वारे आपले वडील मित्र /त्यांचे वारस यांची नावे ७/१२ वरून कमी होतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
एखादी जागा सुरवातीला सर्वे नंबर मध्ये ६ गुंठे असेल आणि सिटी सर्वे ला गावठाण मध्ये वाढून ७ ते ८ गुंठे लावली असेल तर चालेल का ?
जर सर्वे नंबर चा प्लॉट सिटी सर्वे ला गावठाण मध्ये घ्यायचा असेल तर काय करावे लागेल ? का एकदम सिटी सर्वे ला गावठाण चा नंबर मिळतो.
कोणतीही सर्वे नंबर स्वतंत्र रित्या एकटाच कधीच ज्यादा किंवा कमी होत नाही ..................थोडक्यात जमिनीचे क्षेत्र कमी - ज्यादा होण्यासाठी कमीत कमी दोन सर्वे नंबर लागतात ............उदा. जमीन एकत्रीकरण योजनेवेळी / जमीन सम्पदनवेलि तसे आदेश झाले असतील तर मग तो सर्वे नंबर दुसर्या सर्वे नुंबर बरोबर कमी ज्यास्त होतो .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
वाणी समाजाची स्मशान भूमीची जागा सुरवातीला सर्वे नंबर मध्ये ६ गुंठे असेल आणि सिटी सर्वे ला गावठाण मध्ये वाढून ७ ते ८ गुंठे लावली असेल तर चालेल का ?
जर सर्वे नंबर चा प्लॉट सिटी सर्वे ला गावठाण मध्ये घ्यायचा असेल तर काय करावे लागेल ? का एकदम सिटी सर्वे ला गावठाण चा नंबर मिळतो. त्या जागेचा वापर आता स्मशानभूमी म्हणून होत नाही आणि स्मशानभूमी गावठाणात येते का ?

Question by pranit bhapkar
27-02-2015
bhapkarpranit@gmail.com

सात बारा उताऱ्या साठी अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मिळणे अपेक्षित आहे?
आपण जेथे ७/१२ मिळणे साठी अर्ज केला आहे ( तहसील/तलाठी ) तेथे नागरिकांची साहिन्ता , ज्या मध्ये , ७/१२ अर्ज केल्या नंतर किती दिवसात मिलेले याची माहिती नमूद असेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांना पुढील अधिकार असतात किंवा नाही याबाबत माहिती द्यावी
१. पोलिसांकडून कामे करून घेण्याचा अधिकार ?
२. पोलिसांना निलंबित करण्याचा अधिकार ?
३. जर पोलीस एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना त्रास देत असतील तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते का ?
४. जिल्हाधिकाऱ्यांना कोणकोणते अधिकार असतात ?
आपण मुंबई पोलिस कायदा वाचा

निलंबित करण्याचा अधिकार नाही

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने जे , कर्तव्य पार पडणे , आवश्यक , तेवढे काम पोलिस द्वारे करता येयील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
माझे शाळेच्या दाखल्यावर, मार्कशीटवर, पदवीच्या मार्कशीटवर नाव विद्या असे असून इतर सर्व कागदोपत्री म्हणजे आधारकार्डवर, मतदानकार्डवर, बँकेच्या पासबुकवर, प्यान कार्डवर ते विद्याकुमारी असे आहे. तरी मी कुठे नोकरीसाठी गेले असता ते मला ओळखपत्राची मागणी करतात आणि मी त्यांना विद्याकुमारी या नावाचे ओळखपत्र देते परंतु ते मला विद्या या नावाच्या ओळखपत्राची मागणी करतात तरी मी काय करावे ?
१. मला माझे नाव विद्याकुमारी हेच ठेवावयाचे असल्याने मी नोकरीसाठी जाताना काय पुरावा सोबत न्यायला हवा ?
२. नोकरीसाठी मी कोणत्या नावाने अर्ज करावा ?
आपण आपले जे नाव ठेऊ इच्छिता त्या बाबत , राजपत्रात सूचना प्रसिद्ध करा .
राजपत्र प्रत सदर करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
औरंगाबाद मध्ये हर्सूल येथे गात नुम्बेर १६६ मध्ये इनामी जमिनी मध्ये प्लॉट घेनास मार्गदर्शन देणे बाबत मुल मालकाने कलेक्टर ऑफिस मधून परवानगी घेतली आहे तसेच आकृषक कर भरला आहे प्लॉट घेनास योग्य आहे का ७/१२ मध्ये भोगवटा २ आहे
कुल कायद्या अंतर्गत किमत निश्चित करून घ्या, म्हणजे नक्की काय ?
कुल किंमत निच्छित करणे म्हणजे , कुळाचे नाव मिल्कतीस लावण्यासाठी ,मालकास द्यावयाच्या किंमत निच्छित करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जमीन मोजणी केली मोजणी
केलि नतर क प्रत मिलते ती क प्रत टिपण प्रमाणे नाही आरज केला आसता भूमि आभिलेख उडवाउडवीची उत्तर दिली मी काय करावे

Question by ओमेश
25-02-2015
omeshbarapatre@yahoo.com

सर,
महसूल लिपीक संवर्गातून तलाठी संवर्गात प्रवेश करता येईल काय ? असल्यास त्याबाबतचा शासन निर्णय इत्यादी कळवावा, हि विनंती.
सरपंच पदाच्या निवडणुकी बाबत तारीख ठरून नोटीस देण्यात आली व सर्व सदस्यांना नोटीस तमिळ झाली. निवडणुकीची तारीख येण्यापुर्वीच सर्व सदस्यांनी राजीनामा दिला. अशावेळी निवडणूक घ्यावी किवा काय कार्यवाही करावी. (सरपंच पद हे नुसुचीत जमाती करिता राखीव आहे )
अशा प्रश्नावर महसूल व्यासपीठ येथे चर्चा अपेक्षित आहे. कारण हा महसूल अधिकाऱ्यांशी संबंधित असून तेथे चर्चात्मक मार्गदर्शन मिळू शकते ...

Reply by MCS Maharashtra | इतर

Question by Balaji sawant
25-02-2015
Balaji.sawant44@gmail.com

सर एका शेतकऱ्याने गावालगत न मोजणी करता 1985 साली जमीन खरेदी केली खरेदी करण्यापूर्वी पासून त्या जमीनीच्याकाही भागावर अतिक्रमण होते त्या अतीक्रमण धारकाना ग्रामपंचयतीने नियमित करुन त्याजागेचे8अ दिल्यामुळे त्या ठिकाणी काही जणांनी घरे बांधली दिले आहेत तर त्या शेतकऱ्याने आता मोजणी केली असता ती घरेत्
त्याच्या हद्दीत आली आहेत यामध्ये अतिक्रमण धारकाना काही हक्क किंवा आधीकार आहेत का
अतिक्रमण किती दिवसाचे आहे त्या वर अवलंबून आहे
आपण दिवाणी न्यायाय्लायात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महार वतनाची जमीन असून भावकीतील एकानेच जी आर १९७७ नुसार खरेदी केली आहे(कुटुंबातील सदस्याला खरेदी घेता येते).परंतु वंशवेल पाहील असता सदरचे नाते संबध कागदोपत्री कुठेच जुळत नाही तर सदरचे खरेदीखत शर्तभंग होऊ शकते का अथवा सदरचे खरेदीखत रद्द करणे योग्य आहे का ?
amravati city sathi nazul tax che zonewise rate konte aahe
कुल कायद्या अंतर्गत किमत निश्चित करून घ्या, म्हणजे नक्की काय ?
मा.सर,माझे आजोबा वारून ३५ वर्ष झाली आहेत आजोबा मायेत झाल्यावर ६ क फेर्फारला माझ्या वडिलांची व आत्यांची नावे वारसदार म्हणून लागलेली आहेत तेंवापासून ७/१२ वरती माझ्या मोठ्या चुलत्याचे नाव ए.कु. में.म्हणून लागलेले आहे चुलत्याने आमची कुणाची आणेवारी न लावता जमीन विकलेली आहे आमचे वाटप पत्र ,साम्म्न्ति पत्र ,हक्क सोड पत्र झालेले नाही .तसेच आमच्या वडिलांच्या/ आत्यांची सह्या घेतलेल्या नाहीत.आता चुलत्याचे नावे ०.५८ गुंठे जमीन शिल्लक आहे ती पण मुदेत खरीदी दिली आहे ,तरी आम्हला विकलेली जमीन प्रेत मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल.आणि चुलता कोणतेही भारपाय्य देत नाही आणि त्याच्क्ध्ये देण्या सारखे काहीही नाही (पैसे ,जमीन ) ( वारसदार एकून मुले -४ आणि मुली -२ )
दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

दावा दाखल करणे ......मुद्दत खरेदीखताला स्थगिती घेणे

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर,कृपया सांगा - आता आन्नेवारी का लावता येणार नाही आणि आम्ही दावा करू का नको शिल्लक राहिल्लेल्या जमिनीवर, कारण वडिलांचा हिस्सा मुलाला मिळतो हा हाक्क आहे निदान शिल्लक जमीन तर आम्हला मिळेल का कृपया सांगा सर.
एकत्र कुटुंबाचा फेरफार बरोबर असेल तर व त्यामध्ये सर्वांची नवे असतील तर ................तुम्ही सदर फेरफाराच्या आधारावर प्रांत यांचेकडे अपील करून, शिल्लक जमिनीमध्ये तुमची नवे लावू शकता.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर मी कनिष्‍ठ लिपीक म्‍हणून कार्यरत असून मला सेक्रेट्रिएट स्‍टाफ आणि मिनीस्‍ट्रीअल स्‍टाफ यामध्‍ये कोणता फरक आहे आणि त्‍याबद्दल कोणती शासनाने यादी प्रसिध्‍द केली आहे का याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
मा. सर
माझे आजोबा व त्यांचे बंधू यांचे नावे सात-बारा उताऱ्यावर अनुक्रमे २०, २० एकर एवढी जमीन आहे, आम्ही एके दिवशी आमची जमीन मोजली असता ती १५ एकर भरली व चुलत आजोबांची जमीन २५ एकर भरली आहे, म्हणजे आमची ५ एकर एवढी जमीन चुलत आजोबा वहिवाटत आहेत. तरी आम्ही चुलत आजोबांकडे आमच्या जमिनीची मागणी केली असता त्यांनी आम्हाला आमची जमीन देण्यास नकार दिला आहे व आम्हांलाच उलट त्यांच्याकडे असलेली आमची ५ एकर एवढी जमीन त्यांच्या नावावर करून देण्यासाठी दमदाटी करत आहेत.
१. आम्हाला आमची जमीन मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?
२. आम्हाला आमची जमीन मिळेल का ?
३. आमचे चुलत आजोबा आमच्या नावावरील जमीन त्यांच्या नावावरती दमदाटी करून घेवू शकतात का ? तसे घडल्यास काय करावे ?
या साठी आपणास दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल व मनाई हुकुम घ्यावा लागेल.

Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी

Question by Akshay
21-02-2015
akshaydchavan007@gmail.com

MPSC Training for Engineering services exam for ST cateogery students is it only allowed for Civil Branch, Can Mechanical Branch people can also apply?
१९७० साली माझे आजोबा मयेत झाले आहेत ७/१२ वरती माझ्या चुलत्याचे नाव (ए.कु.म.),म्हणून नाव लागलेले आहे परंतु फेरफार्वर्ती माझ्या आजोबांच्या सगळ्या वारसांची नावे लागलेली आहेत आता चुलत्याने १९८० साली जमीन विकलेली आहे आमची कोणाचीही समंती सही घेतलेली नाही तरी ती जमीन आम्हला परेत मिळेल का त्यासाठी काय करावे लागेल.कृपया सांगा.
१९८० साली जमीन विल्क्लेली आहे . त्यामुळे जमीन परत मिळणे अवघड आहे
मात्र आपले हिस्सायाचे जमिनीचे मुल्य , चुल्त्याकडून वसूल करू शकता
त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by nilesh furade
21-02-2015
nileshfurade@gmail.com

मी भूमीअभिलेख कडून जमीन मोजणी केली आमच्या आजोबा नी अ या व्यक्ती ला 3.5 गुंटे जमिन राहण्यासाठी विकली आज त्याचे 7 गुंटे वापरत आहे त्यात त्याचे घर आहे जनावरासाठी गोठा आहे त्याचे आतिक्रमण कसे काडावे आमचे शेत गावालगत आहे मोजणीदाराने गावाकडील बाजूची खून कशाच्या आधारे कायम केली मोजणी करताना गाव मोजले नाही पूर्व बाजूला रस्ता आहे पश्चिम बाजूला नदी दक्षिण ला गाव उत्तरे ला जो शेतकरी आहे त्याचेच फक्त शेत मोजले सर्व्हे नं 18.एकर25 गुटेचा आहे आज रोजी 20 एकर क्षेञ भरत आहे त्या त आमचा हिस्सा 9एकर 14 गुटे आहे त्यात शेजारच्या हिस्सा 9/9 आहे मग मोजणीदाराने त्याच्या हिस्सा चे 9/9 क्षेञ सोडून खून करणे आवश्यकतेप्रमाणे होते मोजणीदाराने मोजणी चुकीची केलयामळे गावठाण चे बरेच क्षेञ आमच्या हद्दीत आले आहे तर काय करावे मोजणीदारावर कारवाई कशी करावी
आपण उप अधिक्षक भुमी अभिलेख यांचेद्वारे निमताना मोजणी करुन घेऊ शकतात. ही मोजणी वरिष्ठ अधिकारी करतात.

Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी

सर आपले उत्तर मिळाले परंतु चुलत्याकाढे आता काहीही नाही जी जमीन शिल्लक राहिलेली आहे ती पण मुदेत खरेदी दिली आहे आता आम्ही आनेवारीसाठी अर्ज केला आहे.ती आम्हला मिळेल का तसेच जर आम्ही ज्यानि जमीन घेतली आहे त्या लोकांना सरकारी नियमाने पैसे दिले तर ती जमीन मिळेल का आणि चुलता आम्हला काहीही देऊ शकत नाही कारण त्याचकाढे काहीही देण्य्सारखे नाही ..
आता आणेवारी करता येणार नाही

ज्यांनी जमीन kharedi कली त्यांनी तुम्हास परत देण्यासाठी भाग पडता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by pranit
21-02-2015
bhapkarpranit@gmail.com

मी माझी पाणलोट क्षेत्रातली जमीन विकली परंतु त्या जमिनीचे कागदपत्र झाले नाहीत, व माझ्याच गट no . मधली दुसर्या व्यक्क्तीची जमीन सात बारा वरून कमी झाली व त्या तिसऱ्या व्यक्तीच्या नवे झाली आहे, अशा parishithi मध्ये तो इसम मला जमीन मागत आहे , मला काय करावे लागेल???
आपली जमीन विकली असताना , दुसर्याच्या क्षेत्रातून कशी कमी होईल ?
खरेदी खतात जमिनीचे वर्णन स्पष्ट करणे आवश्यक
दुरुस्त करून घ्या . नाहीतर खरेदी घेणार व ज्याचे शेत्र कमी झाले आहे ते अपना विरुद्ध कायदेशीर कारवाई करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3