जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सीमा गजभीये
14-09-2014
gajbhiyeseema2@gmail.com
तहसीलदार कोणकोणत्या तालुकास्तरीय समित्यांचा प्रमुख असतो?
Question by Pradip Namdeo Borle
13-09-2014
pradip.borle6226@gmail.com
सन २०११ ची जनगणना मधील तालुका तसेच गावनिहाय लोकसंख्या,पुरुष,स्त्री,अ जा,अ ज व इतर ची माहिती पहावयाची आहे.कृपया वेब साईट ची माहिती द्यावी.
Question by gajbhiye seema manohar
13-09-2014
gajbhiyeseema2@gmail.com
various committes headed by tahsildar, inter departmental coordination
Question by rahul Sawant
12-09-2014
rahul9619309796@gmail.com
सर माजी मावशी विधवा आहे तिचि ४९ गुंटे ज़मीन आहे तर त्या जमनीच्या सात बारा वर एका राकान्या मधेनिसबर लहिलेले आहे तर निसबर म्हनजे काय ?तिलाकोन्हि मूल बाल नाही आपल्या उधर निर्वहासाटि या जमनितिल २० गुंटे जगा विकायची आहे तर ती २० गुंटे जगा वीकू शकते काय ?
नि.स. प्र अशी नोंद असावी .
mhanje नियंत्रित सत्ता प्रकार
विक्रीसाठी परवानगीची आवश्यकता aahe.
२० गुंठे जागा विकू शकते
नवीन सुधारणा कुल kaydyanusar , vikri किंमत निस्षित होऊन १० वर्षे zali astil tar परवानगीची garaj nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रांत खरतडे
12-09-2014
vikrantkhartade@yahoo.co.in
नवीन परिभाषित अंशदान याजानेत समाविष्ट असणारे कर्मचारी यांना जुनीच पेन्शन यजन लागू करता येईल काय ?
होय तर ती किती कालावधीत लागू करता येईल ?
सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या सर्वाना नवीन परिभाषित अंशदान योजनाच लागु असेल
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by mahendra
12-09-2014
mahendraj165@gmail.com
सर...
कुलकायद्याची जमीन NA करता येते का? व कुलकायद्याची शर्थ ७/१२ वरून कमी होऊ शकते का ?
३२ म होऊन जर १० वर्ष झाले असेल तर चाळीस पट रक्कम शासन जमाकरुन वर्ग १ करता येईल आणि त्यानंतर आपण एन ए करु शकता
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by निलेश फेगडे
12-09-2014
nileshfegade@yahoo.co.in
नमस्कार किरण सर,
९ तारखेला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
त्या प्रश्नाला अनुसरून दोन प्रश्न होते,
१) शेतकरी दाखल्याची खरोखर गरज कुठे असते?
२) दुसऱ्या जिल्ह्यात जमीन विकत घेतली असेल तर त्या जमिनीच्या ७/१२ वर नाव टाकण्यासाठी शेतकरी दाखल्याच्या ची गरज असतेच. मी चुकत असेल तर कृपया चूक दुरुस्त करावी.
१. महाराष्ट्रात कुल कायद्याचे कलम ६३ अन्वये बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करता येत नाही.
२. बरोबर.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुप्रिया काकडे
11-09-2014
supriyakakade16@gmail.com
नमस्कार सर
मी पुणे जिल्यातील पुरंधर तालुक्याची रहिवासी आहे ...सर आमची जमीन गावातील एका माणसाने २००६ साली आजोबानाची व चुलत आजोबांची फसवणूक करून नावावर करून घेतली आहे .माज्या आजोबाना २००० सालापासून बोलता येत नाही .त्यांचे वय ८५ वर्षे आहे .सासवड कचेरीत त्यांना नेले व फसवून फोटो पण काडले आहेत ...त्या माणसाने आता २ वर्षापूर्वी आम्हाला या बाबत तसे सांगितले ..याबाबत सासवड कोर्टात केस पण चालू आहे ...या खरेदी खतावर माज्या चुलते कोणाच्याच सह्या नाहीत शिवाय असे घडताना आजोबांचे वय पण जास्त होतो ...याबाबत काही करता येईल का? प्लस मला याबाबत मार्गदर्शन करावे ....सुप्रिया काकडे साकुर्डे पुरंधर पुणे
तुमच्या प्रश्नावरून असे लक्षात येते कि तुमचे आजोबा व चुलत आजोबा हे संयुक्त मालक होते.तसेच आजोबा ची फसवणूक करून विक्री झालेली आहे.court प्रकरण चालू असल्याचे आपले म्हणणे आहे.या प्रकरणी दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही मार्गाचा वापर करायला पाहिजे.आजोबांनी आपल्या हिश्यात येणाऱ्या जमिनी पुरते विक्रीपत्र करून दिले आहे कि संपूर्ण जमिनीचे विक्रीपत्र करून दिले आहे हे लक्षात येत नाही.जर संपूर्ण जमिनी चे विक्रीपत्र करून दिले असेल तर तुम्हाला जास्त काळजी कराचे कारण नाही कारण तुमच्या आजोबाना असे विक्रीपत्र करण्याचा अधिकार नाही व आजोबांच्या वयाचा व मनस्थितीचा गैरफायदा घेऊन असे विक्रीपत्र केलेले आहे हे साक्षी पुरावे यावरून court मध्ये असे विक्रीपत्र रद्द करता येईल.पण आपल्या हिश्या पुरते विक्रीपत्र झाले असेल तर हे कसे फसवून केले आहे त्यासासाठी फौजदारी प्रकरण चालवावे लागेल.
दुसरे सदर जमिनी बाबत प्रकरण न्याय्प्रविस्त असल्याबाबत महसुली अभिलेखात ७/१२ मध्ये इतर अधिकार सदरी नोंदणीकृत लीस पेंडन्सी दस्ताची नोंद घेण्याबाबत आपण दक्षता घ्यावी म्हणजे पुन्हा या जमिनीची विक्री करता येणार नाही,
Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार
Question by विवेकानंद बबनराव पाटील
10-09-2014
vedantikadad@gmail.com
माझे आजोबा सन १९४१ पूर्वीपासून जमीन कसत होते. त्यांच्या म्रुत्युननतर मुले कसत आहेत. सातबारा उतरयावर आजोबांचे नाव सं कुल३अ कलम म्हणून आहे. परंतु आजपर्यंत त्या जमिनीच्या सातबारा उतरयावर मालक सदरी कोणाचेच नाव नाही. मालक म्हणून नाव येण्यासाठी काय करावे लागेल कि शासन निर्णयाने आपोआप व्हायला हवे. सदर जमीन मालकाने जमीन विकायला काढली आहे काय करून जमीन वाचवता येइल.
कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
मा .तहसिलादारसो यांचेसमोर प्रकरण १ वर्ष झाले आहे.
कृषक दिनी म्हणजे १ एप्रिल १९५७ रोजी आपले आजोबा/वडील हे मालक झालेले आहेत.
तहसीलदार यांनी या जमिनीची विक्री किंमत तत्काळ निश्चित करणे आवश्यक. मुल मालकास जमीन विकत येणार नाही. मुल मालक कायदेशीर रित्या जमिनीचा मालक रीहिलेला नाही . त्या मुले त्यास जमीन विकण्याचा हक्क नाही.
तहसीलदार किंमत ठरवण्याचे अर्जावर विनाकारण विलंब करत असतील तर , त्यांचे प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास सदर वस्तुस्थिती आणून द्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय जालिंदर राखुंडे
10-09-2014
shreejay9696@gmail.com ...
वडीलांचे जागेवर नगर पालिक मधे अनुकंप ततवावर ति नोकरी मिळेल का .मि तेनचा मुलगा आहे.
मो:919765099696
ता:बारामती जि:पुणे
अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्यासाठी , वडील मृत्य समयी वर्ग ३ अथवा ४ सेवेत कार्यरत असणे आवश्यक.
वर्ग २ अथवा त्या पेक्षा वरिष्ठ श्रेणीत कार्यरत असतील तर , अनुकंपा तत्व लागू होत नाही.
अनुकंपा तत्वावर वर्ग ३ अथवा ४ या सेवेतच नोक्सरी मिळते . कार्यालय आपले इच्छे प्रमाणे मिळणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश फेगडे
09-09-2014
nileshfegade@yahoo.co.in
नमस्कार सर,
सगळ्या कागद पत्रांची पूर्तता केल्या नंतर शेतकरी दाखला मिळण्याचा कालावधी किती असतो?
आणि जर तो २-३ महिन्यांचा कालावधी उलटूनहि मिळत नसेल तर कुठे तक्रार करावी?
शेतकरी दाखला किती दिवसात मिळेल या बाबत नागरिकांची सनद , जी कार्यालयाचे बाहेरील दर्शनी भागावर लाण्याची आहे त्या वर नमूद केलेला असतो. कृपया आपण त्या मध्ये नमूद केलेला कालावधी पहा.
सर्वसाधारणपणे ७ दिवसात शेतकरी दाखला देण्यास हरकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
08-09-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
नागरिकांना तहसील कार्यालयामधून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांबाबताची माहिती व त्यांचा कालावधी माहितीचा अधिकार नुसार कार्यालयातील फलकावर लावणे बंधनकारक आहे का व ते फलकावर लावले नसल्यास कोणाकडे तक्रार करावी.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम व विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांची सनद प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. या सनदे मध्ये त्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व त्या साठी लागणारा कलावधी व नमूद कालावधीत काम न झाल्यास त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.. अशी सनद प्रसिद्ध न केल्यास लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते.
Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी
Question by swami swati
05-09-2014
swati.swami@yahoo.com
कोतवाल या पदावर कार्यरत असताना त्या कोतवालास इतर कार्यालयामध्ये नोकरी करता येते का ? जसे - होमगार्ड नोकरी
Question by Pradip Namdeo Borle
05-09-2014
pradip.borle6226@gmail.com
अ ह्या व्यक्तीला ब ह्यांनी सब रजिस्ट्रार ह्यांचे कडे दत्तकविधान नोंदणी करून दि २७.१०.१९७७ ला दत्तक घेतले.अ चे नाव दत्तक विधाननंतर क झाले.दत्तकविधान पूर्वी अ ह्यांचे नावे शेती होती.आजही अ चे नावे शेती आहे अ म्हणजेच दत्तकविधान नंतर क दि १९.०४.२०१० ला मयत झाले.क चे पत्नीने उ वि अ ह्यांचेकडे वारस नोंदीसाठी अर्ज केला.तो अर्ज उ वि अ ह्यांनी तलाठी ह्यांचे कडे पाठविला.तलाठी व मंडळ अधिकारी ह्यांनी ह्या अर्जावर नियमानुसार कोणती कारवाई करावी ? कृपया मार्गदर्शन करावे ?
Hindu Adoption and Maintenance Act 1956 च्या कलम १२(ब) अन्वये दत्तक घेण्यापूर्वी क चे नावे जी मिळकत होती ती दत्तक गेल्यानंतर हि त्याचे नावे राहते. त्यामुळे हिंदू वारसा कायदा प्रमाणे जे वारस असतील त्यांचे नाव मिल्कातील लावणे आवश्यक.
पत्नी
मुलगा
मुलगी
आई ( दत्तक ज्या कुटुंबात गेला आहे त्या कुटुंबातील)
....
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर पाटील
04-09-2014
kpatil162@gmail.com
सर जर सिटी सर्व्हे मिळकत नं.मध्ये ६ जन भाऊ आहेत आणि त्यापेकी एकास त्या मिळकती वर आपला हक्क मिळवायचा आहे सदर मिळकत मधील ६ पैकी ४ जन जर हक्कसोड पत्राच्या आधारे आपला हिस्सा a यास द्यावयास तयार आहेत तर त्याची नोंद होऊन ह.सो.पत्र लिहून देणाऱ्या भावांचे क्षेत्र लिहून घेणाऱ्याच्या नावे होईल का(हक्कसोड पत्राच्या आधारे) ? हक्कसोड पत्र व खरेदीपत्र यातील फरक काय?
हक्क सोड पत्राचे आधारे ४ भावांचा हक्क अ स मिळेल.
हक्क सोड पत्र व खरेदी पत्र यात फरक नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर पाटील
04-09-2014
kpatil162@gmail.com
मुद्रांक रजिस्टर करताना त्याचे अंतर्गत येणाऱ्या जमीन,घर यांचे मुल्यांकन यांचे सविस्तर माहिती कोणाकडे निशुल्क मिळेल ?
आपल्या तालुक्यातील सब रजिस्टर कार्यालय योग्य ती फी आकारुन सदर माहिती देऊ शकेल
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by santosh जवरे
02-09-2014
jaware_sb@rediffmail.com
मृत्यू पत्र अमेरिकाचे असेल तर त्यनुसार फेरफार नोंदविता येईल का? तसेच वारस तपास करणे गरजेचे आहे का?
मृत्यापत्रामध्ये वारस दिलेले नसणार. वारसतपास करावा लागेल.
मात्र मृत्य पत्र भारतीय दुतावासाने अधिप्रमाणित केलेले असावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अविनाश रामदास ननवरे
01-09-2014
avinash.nanaware@rediffmail.com
शैक्षणिक संकुल उभारणीसाठी भाडे तत्त्वावर घेतलेल्या जमिनीच्या भाडे कराराची नोंदणीकरिता मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मधून सूट आहे किंवा कसे?
Question by संतोष जवरे
01-09-2014
jaware_sb@rediffmail.com
रु १००/- चे प्रतिज्ञापत्र वर जर आजोबांनी नातवाना बक्षीस पत्र नोंदणी कृत नसलेले दिले तर अधिकार अभिलेख नुसार फेरफार नोंदून वारस दाखल करता येईल का?
Question by प्रशांत कदम
01-09-2014
prashant.kadam7@gmail.com
दिव्यभारती दि.1-9-2014 नाशिक बातमी
इनामी जमीन कायदा बदल हिताचा
मराठावाड्यातील मदतमाश इनाम जमिनींचे हस्तांतरण नियमानुकूल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असुन त्याचा लाभ मराठवाड्यातील शेतक-यांना होईल. यासंदर्भात इनाम जमिनींना लागू असलेल्या हैदराबाद इनाम निर्मूलन अधिनियम 1954 चे कलम (3) मध्ये सुधारणा करण्यात येईल.
अशा आहेत सुधारणा
मदतमाश इनाम जमिनी सक्षम प्राधिका-याच्या पुर्वपरवानगीशिवाय शेतीच्या प्रयोजनासाठी हस्तातरित झाल्या असतील तर अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून त्याचे खरेदी खत , बक्षीस पत्र, इत्यादीसारखेनोंदणीकृत संलेख सादर केल्यानंतर असे हस्तातरण नियमित करता येईल. त्यासाठी नजराणा आकारण्यात येणार नाही.
याबाबत मर्गदर्शन करावी ही विनंती. अथवा याबाबत शासन निर्णय असल्यास त्याची माहिती मिळावी.
Question by राहुल सावंत
28-08-2014
rahul9619309796@gmail.com
sir
आमचे आजोबा वरल्या नंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली तेव्हा कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव ७/१२ वर लावले व त्यांचे वारस म्हणून माज्या वडिलांचे नाव लावले७/१२ वर नाव लावलेले नाही ,तर माज्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये आहे तर त्यांचे ७/१२ उतार्यावर नाव कसे लावायचे . आतातर आमचे मोठे काका वारलेले आहेत तर काय करावे याची आपण माहिती द्याव्ही हीच नम्र विनंती .
कृपया आपण उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करा.
म.ज.म.आ. १९६६ चे कलम १५५ अन्वये तहसीलदार स्तरावरही ६ का चा अंमल देनेबाबत कार्यवाही करता येयील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
28-08-2014
mohanmsutar@gmail.com
saheb
आमचे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झाले . त्यानंतर आमचे आजोबाने नातुला प्रकल्पग्रस्त दाखल दिले .सदर दाखल्याचे आधारे आमचे भवानी २००९ मदे नोकरी मिळाले . सदर शेत जमिनीचे भूसंपादन होऊन सुद्धा राहिलेले शेत जमिनी मदे ३५ आर जमीन वारंवार पाण्याखाली जातात .आता आमचे आजोबा मयत झाले असून आमचे वडील व काकांचे नावाने वारसा झाले आहे.सदर पाण्याखाली शेत जमिनीचे भूसंपादन करून मंजूर झाल्यानंतर त्याच कुटुंबातील दुसर्या भावना दाखल देणेसाठी कुटुंबातील सर्वांचे समती असल्यास त्यांचे काय अडचण आहे का? जुना भूसंपादन झालेले व नवीन भविष्यात भूसंपादन होणारे शेत जमीनचे सर्वे नंबर एकच आहे व आता भूसंपादन होतंन नवीन जी आर नुसार होणार काय ?माहिती मिळावे
Question by swami
27-08-2014
swati.swami@yahoo.com
तहसील कार्यालय मध्ये किती विभाग असतात ? सर्व विभागनिहाय जॉब चार्ट कुठे मिळेल .कृपया मार्गदर्शन व्हावे .
मॅडम तहसील कार्यालयाती संकलननिहाय असलेले विषय आपल्याला मेल केले आहे.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by Shrikant Pisal
27-08-2014
shreekantpisal1@gmail.com
नमस्कार सर,
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले
त्याबद्दल धन्यवाद.
पण सर आम्ही देवस्थान ईनाम खरेदी न
करता त्या जमीनीचा संपुर्ण मिराशी हक्क खरेदि केलेला आहे
जो त्या मालकाने
पुर्वी खरेदि केलेला होता तद्नंतर
तो मिराशी हक्क आम्ही खरेदि केला व
तरी माझा आपणास प्रश्न आहे की जर· प्रथम व्यक्ती दुसर्या व्यक्तीस हस्तांतर
करु शकतो तर दुसरा व्यक्ति तोच
मिराशी हक्क
तिसर्या व्यक्तिला का हस्तांतर होऊ
शकत नाहि?
Question by तानाजी रघुनाथ तनपुरे
27-08-2014
tanajitanpure111@gmail.com
नवीन भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी सद्या करता येईल का ? म्हणजे जे प्रस्ताव कलम ४ करनेवर प्रलंबित आहेत त्या प्रस्तावा मध्ये कलम ४ काढता येईल का?
आता कलम ४ खालील प्रारंभिक अधिसूचना काढता येणार नाही.
नवीन कायद्याखालील कलम ११ अन्वये अधिसूचना काढणे आवश्यक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
