जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर मला नवीन भूसंपादन कायदा 2013 हवा आहे. तर तो कुटे शोधावा वेबसाईट????
Website
https://rfd.maharashtra.gov.in/Default.aspx#MainPage

Reply by श्री.ओ.आर. अग्रवाल | उप जिल्हाधिकारी

केंद्र सरकारचे ग्राम विकास या संकेत स्थळावर मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, फेरफार म्हणजे काय...
नातेवाईक जर खाते पुस्तक देत नसतील तर खाते पुस्तकाची दुसरी प्रत मिळविण्यासाठी काय करावे लागेल.. कृपया मार्गदर्शन मिळावे
खातेपुस्तक कालबाह्य झाले आहे.
तलाठी यांचे कडे आपणास फेरफार मिळेल.
फेरफार म्हणजे जमीन हस्तांतराचा नमुना.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, ग्रामीण भागातील नवीन शर्तीचे (बखळ प्लॉट) चे विक्रीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी प्रांताधिकारी यांना आहे या बद्दलचा जी आर हवा आहे किवा कोणत्या आशयाखाली ते विक्रीची परवानगी देऊ शकतात या बद्दल माहिती हवी आहे कृपया लवकर मिळाली तर बर होईल माझ प्रकरण थांबल आहे (प्रांताधिकारी यांचे म्हणणे आहे कि एन.ए. ओर्डेरवर जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय विक्री करू नये असे म्हटलेले आहे त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नाही कृपया मार्गदर्शन करा हि विनंती.)
सर ,
प्रकल्पग्रस्त दाखला हस्तांतरणीय होऊ शकतो का?
म्हणजे दाखला माझ्या नावे असेल आणि माझ्या भावाला सरळसेवा भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर दाखला त्याच्या नावे करता येतो का ?

Question by atul
05-08-2014
atulpuntambekar@gmail.com

सर, माझा आत्याने वडिलांना फसवून बक्षीस पत्र बनविले आहे. त्यावेळी वडिलांना न सांगता फसवून सही करून गेतली आहे आत्ता ती जागेवर हक्क सांगत आहे. वडिलांना काहीच हिस्सा मिळत नाही तर मार्ग सुचवावा.
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा व बक्षीस पत्र रद्द करून घ्या.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मंत्रालयीन कर्मचारी तून पोलिस विभागात लिपिक या पदावर कार्यरत आहे तरी मला इतर विभागात बदली करून जाता येईल का
सर
फेरफार मध्ये १९५५ साली माझ्या आजोबांनी हरी या व्यक्तीस जमीन विकल्याचा उलेख आहे परतू सदर जमीन आजतागायत माझ्या ताब्यात आहे व त्या जमिनीपैकी एकावर सोसायटीचा बोजा आहे व दुसर्या जमिनीवर तागैतीचा बोजा असताना सदर फेरफार मंजूर केला आहे
सर बोजा असताना फेरफार मंजूर करता काय
नसल्यास मी सदर फेरफार विरुद्ध दावा करू शकतो काय
बोजा असला तरी जमीन विकत येते.
घेणार्यावर बोजा कर्ज फेडण्याची जबाबदारी राहते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir gaav namuna 6 k manje kay

व्यक्ती (खातेदार) मयत झालेवर , त्याचे वारस कोण याचा तपास तलाठी करतो. या वारसांची नो द या नोंदवहीत असते. याला वारस नोंदवही म्हणतात. या नोंदवहीतील nondivarun , त्या वारसांची नावे फेरफार नोंदवहीत घेतली जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

|| महसूल दिनाच्या हार्दिक शूभेच्या ||
R/sir,
I am a member of your orgiation.
but i login in maharashtra civil services website is ok but after that i click on MAHSUL VYASPITH but display a message member login. I was filled user id & password but not entry in Mahsul Vyaspith.
Mahsul Vyaspith is for Revenue Officers only so it will not be available for all members. But that doesn't affect viewing website any way. This restriction is for only answering queries in janpith and discussions in Mahsul Vyaspith. For Karmachari we are starting seperate Karmachari Vyaspith, it is taking time due to some technical problems..but it will be operational in 2 months.
If any Karmachari is interested in giving reply to Janpith Queries please give us their details , we will give them access to this field.
Thanks.
MCS.

Reply by MCS Maharashtra | इतर

साहेब मला "इंदिरा गांधी भूमिहीन शेतकरी योजना "बद्दल माहिती पाहिजे आहे .web link,concern department,or concern person office contact no. पाहिजे
लिपिक संवर्गातील यांना कर्मचारी महसूल विभागात नियुक्त झाले वर , साधारपणे १ वर्षनंतरदुय्यम सेवा परीक्षेस बसू शकतो याबाबत कोणता शासन निर्णय आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
सर नमस्कार ,माझी ९ एकर जमीन ३ वर्ष खंडाने देनेची आहे तर मला त्या बाबतचा (Agreement)करारनामा शेतकऱ्याकडून करणे भविष्यच्या दृष्टीने योग्य आहे का?धन्यवाद सर


सर आपण दिलेले उत्तर मला नीटपणे समजू शकलो नाही. त्यामुळे मी पुन्हा आपणास प्रश्न विचारात आहे.
१.करारनामा शब्दांकन म्हणजे काय? त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.व अशा स्वरूपाचा करारनामा शब्दांकन कुठे करता येइल. जेणे करून मला भविष्या मध्ये फसवणूकि पासून सावध राहता येईल.व
२. करारनामा का करू नये.
कुल वहिवाट कायद्यात मानीव कुलाची तरतूद आहे. ज्यास तुम्ही खंडाने जमीन देणार आहात तो भविष्यात कुक वहिवाट हक्क मागू शकतो. त्यामुळे करारपत्राचे शब्दांकन महत्वाचे त्यामुळे कुल वहिवाट हक्क सांगू शकणार नाही असे हवे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब मी आमच्या सार्वजनिक दहा गुंठे जमीनीपैकी माझ्या वाटणीच्या दीड गुंठे जमीनीमध्ये दहा दिवसांपूर्वी आंब्याची कलमे व इतर झाडे लावली आहेत. तर साहेब मला आपण कृपया माहीती द्यावी की, मी झाडे कीती वर्षां होई पर्यंत वा आता ७/१२ मध्ये त्या झाडांची नोंद सात बारा वरती करू शकतो का. आणि नोंदणी साठी इतर सात बारा वरील हीश्येदारांची समतीची आवश्यकता आहे का... सदर नोंदणी तलाठी वा इतर दुस-या कोण-कोणत्या कार्यालयात करू शकतो.
आपणास सामायिक म्हणायचे आहे का?
सार्वजनिक जागेत आपणास झाडे लावण्याचा अधिकार नाही.
सामायिक जागेत झाडे लावली असतील तर नोंद करता येईल. पण आता केवळ १० दिवस झाले आहेत. ........

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि आमची जागा ग्रामपंचायतीने त्यांच्या नावावर १९७० पूर्वी केली होती त्यावर आमच्या आजोबांनी हरकत घेतली होती परंतु ग्रामपंचायत आमच्या विरोधातली असल्यामुळे आमचे नाव सदर मिळकतीस लावले नाही आता आम्ही नाव लाऊन घेतले आहे मग आम्हाला आता त्या जागेचा कब्जा घ्य़ायचा आहे परंतु त्या जागे मध्ये ग्रामपंचायतीने दोन भाडेकरू ठेवले होते ते अजून तसेच आहेत मग आम्हाला आमची जागा ताब्यात घेण्यासाठी काय करावे लागेल
आपणास दिवाणी न्यायालाय्त दावा करावा लागेल.
प्रथम त्यांना आपली जागा सोडण्यास लेखी सूचना द्यावी.
जागा सोडली नाही तर , दिवाणी न्यालयात दावा दाखल kara

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी जमीन २ वारस - बहिण आणि भावू यांच्या नावावर आहे तरी
कुळकायद्याने भावाच्या संमतीने जमीन दुसर्या कुळाच्या नावे झाली
पण
बहिणीला याची माहिती नाही आणि तिची कोणतीच कायदेशीर अथवा लेखी संमती घेतली नाही

तर

बहिण आपल्या हिस्याची जमीन कुळाकडे परत मागू शकते का ?
किंवा
माझा हिस्सा मला मिळावा म्हणून कुठे अपील करू शकते का?
जमीन मालक खर्याखुर्या बिन शेती वापरासठी अथवा स्वत जमीन कसण्यासाठी जमीन मागू शकतो . मात्र हि मागणी ३१ डिसेंबर १९५७ पुरवू लेलेली असणे avshyak

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार ,माझी ९ एकर जमीन ३ वर्ष खंडाने देनेची आहे तर मला त्या बाबतचा (Agreement)करारनामा शेतकऱ्याकडून करणे भविष्यच्या दृष्टीने योग्य आहे का?धन्यवाद सर
करारनामा शब्दांकन म्हत्वाचे आहे.
कारनामा न केलेला योग्य

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र चे हस्तांतातरण चे पत्र मिळेल काय ?
२ माझी लिपिक पदावर निवड झाली आहे परंतु माझ्या सख्या भावाच्या नावे असलेले प्रमाणपत्र माझ्या नावे परीक्षे नंतर हस्तांतर झाले .
३ ज्या जिल्ह्यात निवड झाली त्याच जिल्ह्यात प्रमाणपत्र साठी परीक्षे आधी अर्ज केला होता
नमस्ते सर, महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम ४४अ प्रमाणे औद्योगिक प्रयोजनार्थ बिनशेती सनद देणेची कार्यपध्दती कळवावी. मागणी जमिन नगर रचना अधिनियमान्वये औद्योगिक झोनमध्ये प्रारुप /अंतिम प्रादेशीक योजनेच्या अथवा प्रारुप, अंतरिम असणे आवश्यक किंवा सदर ठिकाणी नगर रचना अधिनियम अस्तित्वात नसने या बाबत शंका निरसन होणेस विनंती आहे. शेती झोन आहे (नगर रचना झोन दाखला दिला आहे) बिनशेतीची सनद देवू शकतो का? याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
माथाडी बोर्डात नौकरी करीत असलेल्या एका कर्मचाऱ्याची नौकरी विषय माहितीचे दस्तएैवज हवे आहे जसे नौकरी मिळण्यासाठी केलेला अर्ज अर्जासोबतचे दस्तएैवज त्याला मिळालेली पदोन्नती आदेश माहिती अधिकार २००५ अन्वये अर्ज करता येईल का किंवा कशा प्रकारे सदरचे दस्तऐवज मिळवता येतील. कारण सदर कर्मचाऱ्याने स्वातंत्रा सैनिकाचे नामनिर्देशन लावून नौकरी मिळवली आहे तो स्वा.सै. नातेवाईक नाही
सदरची माहिती माहितीचा अधिकार २००५ खाली घेत येईल कारण जी माहिती न्यायालयास सदर केली जाऊ शकते ती माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जात देणे बंधनकारक आहे. माहिती न मिळाल्यास अपिलात जाऊन माहिती मिळविता येईल.

Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी

मा.सर महसुल विषयक अ.ब,क व ड वर्गीकरणा बाबत मराठीतील सुची उपलब्ध होऊ शकेल का? असल्यास माझ्या ईमेल मेल करावा ही विनंती किंवा वेबसाईट असल्यास वेबसाईटचा ऍ़ड्रेस मिळावा ही विनंती.
सर माझ्या प्रश्ननाचे उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद
सर मी दिनांक १३/५/२००८ रोजी क लि या पदावर रुझू झालो आणि दुय्यम सेवा सातव्या संधी मध्ये जुलै २०१३ मध्ये पास झालो ta mazi seva jestata कोणती
सर माझा सिनिअर बाबू पहिल्या संधीत दुयाम सेवा पास झाला व पाचव्या संधीत महसूल अर्हता पास झाला आणी मी सातव्या संधीत दुयाम सेवा व पहिल्या संधीत महसूल अर्हता पास झालो तर सेवा जेष्टत कोणाची पहिले राहील

Question by gurayya
22-07-2014
gurayyamathapati@gmail.com

नमस्ते सर
भूसंपादन कार्यालयाकडून १२(२) नम्बरचे notis दिलेनंतर त्यामाडे इतर hakkatil varasadaranche म तहशिलदार यांचे समोर १०० स्टंप पापेरावार्हक्का सोड पत्र करून
देनेबाबत उल्लेख आहे पण इतर हक्कातील वारसदारांचे मृय्तुय्झाल्यास त्या वारसदाराला कोणीही वारसदार नसल्यास जमीन मालक भूसंपादन मिलावानेसाठी म. तहशिलदार यांचे समोर कोर्या कागदावर ५रु तिकीट लावू अपडेट केलेले प्रतिज्ञा पत्र रक्कम
मिळणेसाठी सादर केला तर
चालेल का? माहिती द्यावे

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3