जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Akshay Bharat Patil
13-09-2021
theAkshaypatil01@gmail.com
नमस्कार सर , भोगवटादार २ ची जमीन भोगवटादार १ मधे कशी आणि कोणत्या पद्धतीने करावी ?
२०१८ मध्ये , नवीन नियम प्रसिद्ध झाले आहेत . त्या नियमनांतर्गत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन देशमुख
13-09-2021
deshmukh.sachin500@gmail.com
2003 मध्ये वडिलोपार्जित जमीनीचे (वाटप झाले नव्हते) तलावासाठी जमीन भूसंपादन केली, त्यावेळी गट नं. 401 असा एक होता , त्यामध्ये माझे वडील आणि 2 चुलते वारस होते, भूसंपादनाच्या वेळी माझे वङिल कामानिमित्त पुण्यामध्ये होते. भूसंपादनाच्या वेळी गावी 2 चुलते होते , त्याने 401/1, 401/2 ,401/3 मध्ये असे वेगवेगळे गट सांगून 8 एकर जास्त क्षेत्र लावून घेतले होते. माझ्या वडीलाच्या नावावर 401/4 मध्ये 3आर लावले गेले. आज पण चालू घडीला 401 गट नं. निघतो.वरील वेगवेगळ्या गटाची व क्षेत्राची नोंद निवाडा मध्ये नोंदविले गेले त्यांना जास्तीचा मोबदला पण मिळाला पुढील येणारी नुकसान भरपाई त्यांना मिळणार .भूसंपादनानंतर कोर्टात वाटपाचा दावा 2008 मध्ये दाखल झाला. 2018 मध्ये कोर्टाने भूसंपादनानंतर शिल्लक राहिलेल्या जमीनीचे 1/4 प्रमाणे वाटप केले पण भूसंपादन झालेल्या जमीनीचा विचार केला नाही, दोन्ही चुलते 8 एकर जमीनीचा पुढील येणारा मावेजा निवाड्याच्या आधारे घेणार आहेत. निवाडा होऊन 16 वर्षे झाली . पुढे काय करावे , कलेक्टर साहेब आम्हाला येणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये पार्टी करुन घेतील का? पुढे कोर्टात आपील चालू आहे ... पुढे किय करावे..
कोणतीहा हक्क बजावयाचा असेल तर तो विहित मुदतीत बजावणे आवश्यक असते . एकदा मुदत संपली केली , हक्क हि संपुष्टात येतो हे न्यायिक तत्व आहे . भू संपादन निवाडा २००३ साली झाला . आज या गोष्टीला १७ ते १८ वर्षे झाली .
असोत भू संपादन अधिनियम १८९४ च्या कलम ३१ च्या तिसऱ्या परंतुकानुसार , पात्र व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीने भू संपादन नुकसान भरपाई स्वीकारली असल्यास , अशी निवाडा रक्कम स्वीकारलेली व्यक्ती ,पात्र व्यक्तीस निवाडा रक्कम परत करण्यास/ देण्यास जबाबदार असते .
या तरतुदीच्या आधारे , आपला हिस्सा /हक्क संपादित जमिनीत असेल , तर आपण दावा दाखल करू शकतात . मात्र झालेला विलंब न्यायालयाने माफ करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ghanshyam
10-09-2021
rathodghansham24@gmail.com
My question is . I purchased one farm form one seller but seller had already taken loan from the bank and He hid from us .now there is problem of registration of my farm on my name , please suggest
Dear Ghanshyam
If the land cannot be registered as the land to be purchased is encumbered , better not to purchase the same .
However the Registration Authorities cannot refuse to register the property for the reason that the land to be purchased is encumbered . If the loan is not paid by the vendor , you will have to pay the debt amount in case you purchase the encumbered property
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर शिवाजी नकाते
10-09-2021
sagarnakate512@gmail.com
बिगर येणे प्लॉट मधून जर रोड गेला तर त्याचे पैसे मिळतात का किंवा जेवढा रोड गेला आहे तेवढी जागा दुसरीकडे नगरपालिका देते का???
जागा जरी नगरपालिका हद्दीत असेल तरीही जमिनीची नुकसान भरपाई मिळते . नुकसान भरपाई पैस्याच्या स्वरूपात किंवा TDR स्वरूपात दिले जाते . संपादित झालेल्या जागेच्या बदल्यात जागा देण्याची तरतूद नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ANIL Chaudhari
09-09-2021
anilchaudhari4141@gmail.com
सर जमिनीवरील वारसा हक्क सोडण्याविषयी माहिती मिळावी म्हणजे ( हक्क सोडने) व सदर प्रक्रिया ही onnline करता येते का? किंवा प्रत्यक्ष संबधित विभागात जाऊन करावी लागेल. कृपया आपण माझ्या संबधित विषयावर योग्य ते मार्गदर्शन करावे धन्यवाद.
श्री . अनिल चौधरी
महोदय
हक्क सोडपत्रक ज्याचा हक्क सोडवायचा आहे त्याचे इच्छेवर अवलंबून आहे .
हक्क सोड online पद्धतीने सोडता येत नाही
संबंधित निबंधक कार्यालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश चौधरी
09-09-2021
nileshchoudhari2018@gmail.com
ऑनलाईन 7/12 च्या तांत्रिक अडचणी मुळे एका व्यक्तीची जमिनीची खरेदी होत नाही म्हणून आम्ही त्या व्यक्तीकडून साठेखात करून घेतले व त्या व्यक्तीला त्याचा पूर्ण मोबदला दिला आणि त्या व्यक्तीने जमिनीचा पूर्ण ताबा आम्हाला साठेखता मध्ये दिला आणि नंतर सातबारा दुरुस्ती नंतर त्या व्यक्तीने आम्हाला न कळवता ती जमीन एका तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली त्या व्यक्तीची सातबाऱ्यावर नोंद झाली . तर आम्हाला ती जमीन साठेखताच्या पुराव्यांवर पुन्हा मिळू शकते का ? आणि त्यासाठी काय करावे ?
Question by दीपक आदमणे
09-09-2021
dipakadmane@gmail.com
सर माझे वय 27. आजोबांनी माझ्या वडिलांच्या नावारील जमीन 1988 साली विकली. परंतु वडिलांचा येरवडा हॉस्पिटल पुणे येथे उपचार चालू होता. वेडेपणात सही घेऊन हा व्यवहार झाला. जमीन विकत घेणार्यांनी परत दुसर्या व्यक्तीस विकली . तर मी त्या खरेदी विरुद्ध अपील करू शकतो का? वडील मयत आहे.
वडील वेडे असताना आपल्या आजोबांनी , वडिलांची सही घेउन जमीन विकली अशे आपण कथन करत आहेत . आपणाकडे वडील वेडे होते याचे वैद्यकीय पुरावे आहेत का ? हे पुरावे हे बाब सिद्ध करू शकतात का , वडील वेडे असताना त्यांना , निबंधक कार्यालयात घेउन अथवा निबंधक यांचे समोर त्यांची सही घेतली ?
अशे पुरावे असतील व झालेला विलंब न्यायायलायाने माफ केला तर खरेदी दस्त आपण अहवानीत करू शकता . अपील करून उपयोग होणार नाही . ज्या दस्ताचे आधारे जमीन विक्रीची नोंद करण्यात आली तो दस्त न्यायालयाने रद्द करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित सिद्राम जाधव
08-09-2021
sujitjadhav4895@gmail.com
नमस्कार सर मी आचेगाव ता दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथिल रहिवासी असून माझा असा प्रश्न आहे की - मी बिनशेती न झालेल्या एका शेतजमीन गटातील 5 घुंटे जागा नोटरी द्वारे खरेदी केलेली आहे. रजिस्टर ऑफिस मध्ये 5 घुंटाची खरेदी किंवा विक्री होत नाही आणि 7/12 नाव येत नाही. मग मला 7/12 वर नाव कसे लागेल किंवा 7/12 च्या इतर अधिकारात मला नाव लावता येईल का? नाव लावता आले तर कशा पद्धतीने नाव इतर अधिकारात लावता येईल ? या बाबत मार्गदर्शन व्हावे.
कोणताही दस्त यथोचित मुन्द्रांकित असल्याशिवाय , दस्तास पुरावा - मूल्य नाही . त्यामुळे अश्या मिळकतीतील हक्क दस्त मुन्द्रांकित असल्याशिवाय हस्तांतरित होत नाहीत . नोंदणी कायदा १९०८ च्या कलम , १७ अन्वये खरेदी दस्त नोंदवणे बंधन कारक आहे .
५ गुंठे शेतजमीन क्षेत्र विक्री दस्त नोंदवता येत नाही त्यास निर्बंध आहेत . नोटरी केलेल्या दस्ताद्वारे मिळकतीतील हक्क हस्तांतरित होत नाही . त्यामुळे आपल्या ला ५ गुंठे क्षेत्र नोटरी द्वारे खरेदी करून काही उपयोग नाही . आपले नाव मिळकतीस लागू शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dattatry Sonavane
07-09-2021
sonavanedt7@Gmail.com
वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे 6 गुंठे जागा ही शेती सत्ता प्रकारात आहे व ती माझे मयत आजीचे नावे आहे. सन 2018 मध्ये सिटी सर्व्हे ऑफिस सिन्नर इथे वारस नोंदी साठी अर्ज केला पण ते ऑफिस ने पत्र दिले की सदर जागा आधी बिनशेती. करून तसा दाखला द्या. मग वारस नोंद होईल . हे कोणत्या नियमात आहे .
तसेच म.ज.म.अधि.1966 कलम 42 क आणि ड प्रमाणे अकृषिक आकारणी व परवानगी साठी लागणारा अर्ज व त्यासाठी कोणते उतारे जोडावे लागतील यासाठी कृपया मला मोबाईल नंबर 9870767328 यावर किँवा sonavanedt7@gmail.com यावर कृपया कळवावे ही विनंती
वारस नोंद करणे आवश्यक आहे . नगर भूमापन अधिकारी वारस नोंद करणे नाकारू शकत नाही .
४२ क अन्वये , जमीन नगर पालिका क्षेत्रात असल्यास अथवा प्रादेशिक योजनेत असल्यास , विकास परवानगी नियोजन प्राधिकरणाकडून घेणेची आहे . विकास परवानगी घेण्यासाठी चे आवश्यक कागदपत्र दाखल करावे .
४२ d नुसार गावठाणापासून २०० मी आतील जागा मानीव बिनशेती असल्याचे मानण्यात येते . या साठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही . केवळ बिन शेती आकार भरणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप विलास पाटील
07-09-2021
patil.pradeep33@gmail.com
साहेब
गाव नमुना सात बारा मधील वारस नोंद दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयात सादर केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठीची कार्यपद्धती व कालमर्यादा किती असते यासंबधी माहिती द्यावी.
ती सविस्तर माहिती आहे. तहसीलदार कार्यालयात विचारणा करणे उचित
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रमाकांत
07-09-2021
ramad_patil@rediffmail.com
नमस्कार सर, आदिवासी जमिनीवर 7/12 मध्ये इतर हक्कात ३६ व ३६अ ची नोंद घेतांना अनुसूचीत जमातीचे प्रमाणपत्र लागते का. कृपया उत्तर ढ्यावे
होय . तलाठी यांनी मागणी केल्यास लागेल . या पेक्षा वैधता प्रमाणपत्र सुद्धा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन पांडुरंग पाटील
06-09-2021
patilsachin935@gmail.com
आपणास या उपक्रमाबाबत कृतज्ञतापूर्क नमस्कार. अलिबाग तालुक्यातील मल्याण गावात माझ्या मालकीच्या गट क्र. २९४ वर माझी आजी व वडिल यांची नावे आजोबांच्या मृत्युपश्चात सातबारासदरी लागली आहेत. १९७० मध्ये माझ्या आत्याने आपला हक्क आजीच्या लाभात सोडला म्हणून तिचे नाव सातबारा सदरी लागले असे फेरफार क्रमांक १६६२ सांगतो. माझे वडिल व आजी हयात नाहीत. वारसनोंंद करताना वडिलांच्या जागी आम्हा भावडांची नावे लागतील. आजीच्या जागी आत्याचे नाव लागेल का की फेरफार उल्लेखितो त्याचा विचार करून आत्याची तत्कालीन हक्कसोड ग्राह्य धरली जाईल. कृपया मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद
आजोबांचे मृत्युननंतर वारस म्हणून आजी(१/३/) , वडील(१/३) व आत्या (१/३)आहेत . आत्या ने तिचा हक्क आजीचे लाभत सोडला .(१/३+१/३=२/३) मात्र आजी मयत झाल्यावर आजीचे वारस म्हणून तिचे नाव लागणे आवश्यक आहे . (२/३ भागिले २ = १/३ क्षेत्रास )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ravi Warghade
06-09-2021
raviwarghade405@gmail.com
सर नमस्कार माझे वडिल व आमचे शेजारी राहणारे शेतकरी एक गटातील शेती अर्धी अर्धी जमीन कसत होते कालांतराने कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर हा कायदा अस्तित्वात आला. दोन्ही शेतकर्यांनी पूर्ण मिळकतीसाठी आपले दावे तहसिलदारांकडे दाखल केले. त्यावेळी तहसिलदारानी दोन्ही शेतकर्यांची बाजू ऐकली तसेच मिळकती वरील वस्तुस्थितीचा पंचनामा करून दोन्ही शेतकर्यांना कुळकायदा अन्वये अर्धी अर्धी जमीन वाटून दिली आणि मिळकतीची होणारी रक्कम ३ वर्षात हफ्त्याने भरण्याचे आदेश दिले. दोन्ही शेतकर्यांनी रक्कम भरून टाकली त्यामधील एकाने ३२ म चे प्रमाणपत्र घेतले तर दुसर्याचे राहून गेले त्या शेतकर्याने उशीराने म्हणजे वीस वर्षानंतर हे प्रमाणपत्र घेतले त्यामुळे पहिल्या शेतकर्याचा असा समज झाला की ह्याने रक्कम उशीरा भरल्याने त्यांना जमिन मिळवण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. सदर गैरसमजातून त्याने प्रांतांकडे आदेश रद्द होणेबद्दल दावा दाखल केला आहे. सर तुम्हाला काय वाटते ह्या प्रकरणा मध्ये काही तथ्य आहे का ?
Question by अरुण मांडवे
06-09-2021
arun_mandve@yahoo.co.in
नमस्कार साहेब
मी 2020 मध्ये उरण जिल्हा रायगड येथे 2 गुंठे जमीन infratek प्रॉपर्टी यांच्या कडून घेतली खरेदीखत झाले आहे त्या मध्ये 20 लोकांची नावे आहे कंपनी नि खरेदीखत ची प्रत अजून दिली नाही. 7/12 नमुना 6,8, पण नावा वर झाला आहे पण खरेदीखत ची प्रत अजून दिली नाही ती ऑनलाइन मेल वर दिली आहे पण मला प्रमाणित प्रत हवी आहे , कृपा करून मार्गदर्शन करावे
Question by Manish Prakash Raut
05-09-2021
manishraut88340@gmail.com
आम्ही आमची जागा काही वर्ष्यापूर्वी एका व्यक्तीला विकत होतो परंतु संपूर्ण पैसे न मिळाल्या मुळे आम्ही त्यांना कन्व्हेन्स दिला नाही, समोरची व्यक्ती 3 वर्ष्यापूर्वी मयत झाली, सदर जागेचा सातबारा अजूनही आमच्याच नावाने आहे परंतु त्या मयत माणसाची मुलगी जबरदस्ती करून जागा कब्जा करत आहे, ती जागा आम्हाला परत मिळण्यासाठी आम्ही काय करावे?? कृपया मार्गदर्शन करावे
Question by Ravindra Ganesh Phansalkar
04-09-2021
ravindraaircraft@gmail.com
The area of 72 sq.ft. has been erroneously shown in property card instated of 41.4 sq.ft. In fact the area of 41.4 was to be divided among two successors as 20.2 sq. ft. for each, but revised property card shows it as 36.0 sq. ft. for each successor. I want to rectify this error, because the sum of holdi of land of all holder exceeds the total area of City Survey No.
Please guide me. Thanks.
Question by संजय पाटिल
04-09-2021
online.crms@gmail.com
सर ,
माझा प्रश्न असा आहे की, मुलींना आई वडिलांचे संपत्ति जमीन मध्ये समान हक्क मिळतो हे मान्य, परंतु मुलगी विवाहित झाल्यास सासरी नवर्याच्या संपत्तित जमीन मध्ये ही समान हक्क मिळतो , म्हणजे दोन्हीं बाजूने हक्क दाखवता येतो ही कायद्यतिल चूक अस म्हणता येत नही का ?
Question by Kunjan Landge
04-09-2021
kunjan79.kl@gmail.com
सर,
माझे पूर्वजांचे एकूण 100 एकर जमीन असल्याचे समजले असून मला त्यापैकी 9 एकर जमीनीचे Mahabhulekh वर शोध घेतला असता ज्यांना पूर्वी सांभाळायला दिले होते त्यांची नांवे एकीवात असल्याने त्यांची नांवे असलेले 7/12 उतारे मिळाले, तसेच जुन्या स.नं. वर आजी-आजोबांची नांवे आहेत. याबाबत मी 1950 ते आजपर्यंत फेरफार नोंदी व 7/12 उताऱ्याचे नोंदी काढण्याकरीता अर्ज दिला आहे. आजरोजी सदर गावात इतर उर्वरित कुठे कुठे पुर्वजांचे नांवे असलेले जमीन आहे याबाबत आजींना माहिती होती पण त्यांचे फार पूर्वीच निधन झाले आहे. मात्र इतर जमिनीचे गटांबाबतचे उतारे कशा पध्दतीने सर्च करता येतील? तसेच जुना रेकॉर्ड सर्च करण्याकरीता कोणत्या गाव नमुन्याची नक्कल काढावी लागेल याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे विचारणा करावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विजय गोसावी
03-09-2021
victorgosavi77@gmail. com
नमस्कार साहेब
माझे वडील व्यसनाधिन आहेत ते सतत आमच्याकडे व्यसनासाठी पैसे मागत असतात व नाही दिले तर मी घर विकून टाकील असे म्हणतात, व्यसनामुळे त्यांनी त्यांच्या नावे असलेले गावातील घर भावास बक्षीस पत्र करून देऊन टाकले आहे, आता स्वतःच्या चैनी साठी व व्यसनासाठी राहत असलेले घर विकायचे म्हणत आहे,सदरचे घर वडोलोपार्जित नाही, घर त्यांच्या नावे असल्यामुळे त्यांनी ते घर विकू नये म्हणून आई व आम्ही काय करू शकतो त्याबाबत मर्गदर्शन करावे ही विनंती
स्वकष्टार्जित मिळकत विकण्यापासून एखाद्याला प्रतिबंध करण्याबाबत कायद्यामध्ये तर अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. मात्र सामाजिक प्रयत्न करून, नातेवाईकांचे सहकार्य घेऊन कदाचित हा प्रश्न सुटू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विकास शांताराम शिर्के
03-09-2021
shirkevikas3@gmail.com
चार भावांच्या जमीन वाटप करताना पूर्वी त्या जमिनीत अस्तित्वात असलेल्या आणि ग्राम पंचायतीला नोंद असलेली घरे दुसऱ्या भावाच्या वाटनित जात असतील तर त्याबाबत काय निकाल दिला जातो .
आपण जे वाटप बाबत प्रश्न मांडलेला आहे ते वाटप जर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये न्यायालयामार्फत जर होत असेल तर न्यायालय त्यामध्ये घर हे नक्की कोणत्या व्यक्तीच्या हिस्स्याला जाणार याबाबत स्पष्ट उल्लेख प्राथमिक हुकूमनामा मध्ये करते.
मात्र जर हे वाटप दिवाणी न्यायालय मार्फत नसून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अथवा परस्पर संमतीने असणारे वाटप असेल तर जे सह- धारक आहेत त्यांनी याबाबत घर कोणाला जाणार याचा निर्णय घ्यावयाचा असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गजेन्द्र माळी
02-09-2021
sachinmali6641@gmail.com
ज्यांच्या नांवे 7/12आहे त्यांच्याकडून आमच्या वडीलांनी जमीन खरेदी केली त्यावेळी त्यांची मुलं आणि आम्ही अज्ञान होतो पण आत्ता ती मुले म्हणतात आम्ही जमीन परत घेऊ अस होऊ शकते का सर.?
एकदा विकलेली जमीन परत घेता येत नाही. आपण जर जमीन विकण्यास तयार झाला तरच ते जमीन घेऊ शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास अशोक हिवरे
31-08-2021
suhash1 756@gmail.com
माझ्या घराच्या शेजारी बिल्डर ने ५ फूट जागा सोडलेली असून ती जागा माझ्या मालकी हक्कात आहे. परंतु माझ्या पाठीमागे बिल्डर ने दुसऱ्या घराला त्या जागेतून वापर दिला आहे. त्या जागेची घरपट्टी मी भरत असून मला त्या जागेचा उपयोग करता येत नाही कारण बिल्डर ने भिंत घालून दिलेली आहे. मागील शेजारी त्या जागेत टू व्हीलर सायकल पार्किंग करतात. व येता जाता घरात बघत असतात. त्याचा मानसिक त्रास होतो. सदर जागेचा ताबा कसा मिळवता येईल.
Question by Amol Mali
31-08-2021
maliamol9245@gmail.com
गावठाण जागा आणि सिटी सर्व्हे नोंदणीकृत जागा फरक काय ?
Question by प्रदीप तुळशिराम अवसरमोल
30-08-2021
pradipawasarmol143@gmail.com
नमस्कार सर,
मला सरकारी जमीनीचा भाडेपट्टा कसा काढावा व त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील व अर्ज कोणकोणत्या ठिकाणी करावा लागेल याची सर्व माहिती पाहिजे होती.
तरी कृपया करून मला माहिती देण्यात यावी.
धन्यवाद.
Question by अभिजीत लक्ष्मण रांजणे
30-08-2021
ranjaneabhijeet.ar@gmail.com
Sir माझे वडील नगर पालिका हद्दीत असलेल्या मिळकतीचा कर भरत होते । पण 1991 मध्य नगरपालिकेने अचानक प्रॉपर्टी टॅक्स पावती देने बंद केले व वडिलांना पण त्याच्याकडे विचारणा केली नाही । आता तो टॅक्स परत लागू होऊ शकतो का । आमच्या कडे दुसरे कोणते document नाही फक्त जुन्या टॅक्स पावत्या आहेत भरलेल्या
कर नेहमीच वसूली योग्य असतो. स्वतः जाऊन चौकशी करावी य कर थकीत असल्यास अदा करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
