जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Bharat Khanderao
09-10-2021
bpkhanderao3@gmail.com

वडीलांची बॅकेत ५५हजार रू आहेत वडील मयत झाले तर ती रक्कम वारसांना कोणत्या GR नुसार मिळतील
GR कश्याला हवा आहे .
वारसांची नावे लागणे आवश्यक आहेत Succession Certificate काढा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Gayatri Pande
06-10-2021
gayatripande840@gmail.com

माझ्या वडिलांनी 1993 मध्ये 25*45 फूट प्लॉट मधून 12.5*45 फूट प्लॉट विकत घेतला होता.त्याच प्लॉट मधला अर्धा भाग आजपर्यंत पडीत आहे.28 वर्षात त्या प्लॉट चा कोणी वारस नाही आला.तो प्लॉट विकत घ्यायचा आहे तर काय करावे?
बिनशेती/ विकास परवानगी दिलेला प्लॉट असेल, तर ज्या अधिकार्याने/नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे , त्याची परवानगी लागेल .
शेती प्लॉट असेल व प्लॉट बिनशेती झोन मध्ये असेल तर परवानगीची गरज नाही . मात्र शेती प्लॉट बिनशेती झोन मध्ये नसेल तर परवानगी मिळणार नाही .विकत घेता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे की मी जेथे राहतो त्या गावी आमच्या नावे कुठेच जमीन जागा नाही पण आम्ही गेली 40 वर्षे पासून त्या सरकारी जागेवर पुनर्वसन वसाहती मध्ये खाली जागेवर जेथे कोणाला काही अक्षेप नाही अशा जागी राहतो तर ती जागा आता आमच्या नावे होईल का. आणि ग्रामसेवक करू शकतो का?
पुनर्वसन जागा नसती व अन्य शासकीय असती तर आपण अतिक्रमण नियमानुकूल करू शकला असता . मात्र पुनर्वसन जागा असल्याने आपण प्रकल्प ग्रस्त व्यक्ती असाल तरच आपला विचार होऊ शकला असता .
या जागेवरच अतिक्रमण दिवाणी न्यायालयात प्रतिकूल ताबा ( Adverse possession ) दावा दाखल करून मिळकतीची मालकी दिवाणी न्यायालयाकडून आपले नावावर जाहीर करून घेऊ शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pranay
04-10-2021
pkumar.barde@gmail.com

Sir माझ्या आजोबांनी त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन माझ्या नावे बक्षीस पत्र द्वारे केली आहे.तर यावर माझ्या आत्या ऑब्जेक्शन करू शकतात का.
वडिलोपार्जित जमीन केवळ नातवाच्या नावे दाखल कशी करता येईल . आत्याकडून हरकत येणार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबाला एकूण 6 मुले व 1 मुलगी असा परिवार होता, त्यापैकी माझे आजी आजोबा वारले असून, त्या 6 पैकी माझे 4 चुलते देखील वारले, त्या 4 पैकी 3 चुलत्यांना मुले आहेत, माझ्या आजोबाला गावी जमीन वगैरे काही नाही फक्त 1000 स्क्वेअर फूट जागा पिढीजात होती, व आहे, ती जागा मागील2 वर्षापर्यंत माझ्या आजोबाच्या नावाने होती,
त्या जागेवर व त्या घरात माझे सगळ्यात लहान चुलते व वारलेल्या एका चुलत्याचा मुलगा व त्याचा परिवार राहत होता, बाकी सर्व चुलते त्याच गावात वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेऊन घर बांधून वेगळी राहिली, व त्यांच्या नावे घर आहेत,
परंतु माझ्या वडिलांनी 1975 साली कामधंद्यासाठी ते गाव सोडून नाशिक ला शहरात आले, तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही नाशिक येथे राहतो आमचे देखील नाशिकला स्वतःचे घर आहे,व आम्ही, लग्नं किंवा इतर काही कार्य असले तरच आमच्या मूळ गावी जातो परंतु 4 वर्षांपूर्वी माझे छोटे चुलते यांनी नगरपरिषद रेकॉर्ड ला आजोबाच्या नावाच्या जागी फक्त त्यांचे नाव लावून घेतले, कालांतराने म्हणजे 2 वर्षांपूर्वी त्या जागेवर त्यांनी घरकुल योजनेचा लाभ तसेच स्वतःचे काही पैसे खर्च करून त्या जागेवर rcc बांधकाम केले आहे, परंतु घर बांधायच्या आधी त्यांनी जे भाऊ, किंवा मयत झालेल्या चुलत्यांची वारसदार यांना बोलावून घेऊन हक्कसोड कागदपत्रांवर सर्वांच्या सह्या घेऊन रजिस्ट्री ऑफिसमध्ये बोलावून सह्या घेतल्या, व घर बांधले, परंतु माझ्या छोट्या चुलत्यानी माझ्या आई वडिलांना असे सांगितले की मी त्या जागेवर आपण 1+1 rcc बांधकाम करू त्यावर मी ग्राऊंड म्हणजे खाली बांधतो, तुम्ही वरचा मजला बांधा त्यांपैकी पायाभरणी मजबुतीकरण ला जो खर्च येईल तो दोघात अर्धा अर्धा करू अशी तोंडी चर्चा होऊन सर्व भावासमोर संमती दर्शविली, परंतु आम्ही नाशिकला आल्यास त्यांनी 1+1 घराचे पूर्ण काम माघारी केले, आता आम्ही म्हंटल की आता आम्हीठरल्याप्रमाणे घर कुठे बांधायच तर ते मी असं बोललो नाही असे म्हणत आहेत, आणि विश्वास दर्शवून आम्ही सर्व म्हणजेच माझे चुलते व चुलत भाऊ सर्वांनी हक्कसोड कागदपत्रांवर सह्या घेतल्या आहेत,परंतु त्यावर माझे वडील निरक्षर असल्याने त्यांचा अंगठा घेतला आहे, परंतु वारसदार या नात्याने माझी कुठेही कोणत्याही कागदपत्रांवर सही घेतली नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे की मला आता त्या जागेवर कोणत्या कायद्याचा आधार घेऊन, किंवा माझ्या वडिलांचा हिस्सा घेता येईल याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपले चुलत्यांनी त्या जागेवर खर्च करून घर बांधले आहे . घर बाधत असताना आपण दिवाणी न्यायालयात जाऊन त्यांचे विरुद्ध मनाई हुकूम घेणे आवश्यक होते मात्र विहित वेळेत आपण दावा दाखल केला नाही . त्यामुळे मिळकत/हिस्सा आपणास मिळण्याचा दावा दाखल करता येणार नाही अथवा दावा दाखल केला तरी आपल्या लाभात होणार नाही .
आपण Mesne Profit चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करु शकता त्याद्वारे नुकसान भरपाईची रक्कम मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir sr no 127 chi jamin setinavikas zone la hoti ti NA zali aahe ka techa vikas kar 1R la kiti yeto te sanga sir
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२४ब व अनुसूची ब/२ पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by B.G solnar
01-10-2021
balajisolnar35@gmail.com

नमस्कार सर. आमच्याकडे वर्ग 2 ची जमीन आहे. 7/12 आहे व 8 अ आहे फेरफार आहे. या सर्व नंबरची जमीन कोनत्या ठिकाणी आहे ते माहिती आहे . पण या सर्व नंबर मध्ये अन्य 7 शेतकरी आहेत . आमची जमीन कोणत्या ठिकाणी आहे ते आम्हाला माहिती नाही .भूमी अभिलेख मध्ये गेले असता ते म्हणत आहेत की तुमच्या सर्वे नंबर ची अद्याप मोजणी झालेली नाही . व आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही . सर आमची जमीन कशी मिळेल सर.कृपया मार्गदर्शन करावे
बालाजी राव
आपली जमीन वर्ग २ ची आहे . मग गायरान जमीन असण्याचा प्रश्न येतो कुठे ?
असो आपण जमीन मोजणी अर्ज दाखल करा . अन्य ७ शेतकऱ्यांना भूमिअभिलेख खात्यामार्फत नोटीस जाईल व ते हजर राहतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas Bhosale
29-09-2021
Vikasbhosale2012@gmail.com

नमस्कार सर आम्ही 2007 साली एका जमिनीचे 6 एकर क्षेत्राचे साठेखत केले होते तर त्या जमिनीला पुनर्वसन ची परवानगी लागत होती परंतु मूळ मालकाने आम्हाला पुनर्वसन परवानगी अनु दिल नाही त्यामुळे आम्ही 2013 साली एका व्यक्तीला विकून टाकली साठे खत रद्द लेख अनुसार विकून टाकली पाच एकर परंतु त्याचे पैसे आम्हास अद्याप दिलेले नाहीत व टाळाटाळ करीत आहे.व उरलेली एक एकर ही त्याने परस्पर त्याच्या नावावर करून घेतली आहे व आमची फसवणूक केली आहे व साठे खत रद्द केल्या पासून आम्हाला पैसे दीले नाही टाळाटाळ करीत आहे आज देतो उद्या देतो तरी यासाठी कृपया आम्हाला पर्याय सांगा ही विनंती.
The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कुल कायदा म्हणजे काय
कुल व मालक यांचे संबंध , या संबंधीचा कायदा .
कृपया हा कायदा वाचा . असं दोन तीन परिच्छेदामध्ये उत्तर देता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Arjun mayane
27-09-2021
arjunmayane976@gmail.com

नमस्कार सर
भूमिहीन सैनिकांना शासनाकडून गायरान जमीन किंवा सरकारी जमीन मिळण्याची तरतूद आपल्या कायद्यात आहे का ❓
असल्यास कृपया माहिती मिळावी
महाराष्ट्र जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१ अंतर्गत ,आजी/ माझी सैनिक यांना जमीन मिळू शकते
आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पुनर्वसन शेरे 7/12वरती पडुन 25वर्षे पूर्ण झाली आहे तर ते कमी कधी होतील ।गावी एकत्रीकरण योजना लागु झाली नाही तर शेरे कसे कमी होतील
पुनर्वसन कायद्यानुसार जर संपादित केलेली जमीन वर्ग २ ची असेल तर , नवीन जमीन वर्ग-२ धारणाधिकाराची असते अन्यथा ती वर्ग १ ची असते . त्यामुळे शेरे असण्याचा प्रश्न नाही
मात्र ज्या जमिनी महसूल अधिनियम व त्या खालील नियमांतर्गत दिली असेल तर अशी जमीन वर्ग २ ची असते . मध्यंतरी २०१४ चे आस पास अशे शेरे काढण्याचा शासन निर्णय झाला आहे . तो शा नि पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
शेत जमिनींचा नंबर बाध , उरळी शेजाऱ्यांनी ठेवली नाही. दुसऱ्या बाजूने नदीच्या पलीकडे शेत असणारा शेतकरी त्याच्याकडे 7/12 वरील असणाऱ्या क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्र वर (नदीत एक दोन विहिरी खोदून त्याचा भराव नदीत त्याच्या बाजूने भराव करून )अतिक्रमण करत आहे,त्याच्या या भरावा मुळे आमचा बांध तब्बल 10 ते 12 फूट खसळला आहे.त्यांना विनंती करूनही ते ऐकत नाहीयेत.शिवाय ते लोक चोऱ्या , दरोडे,हाणामारी ,दादागिरी करणारे आहेत .सदरील विषयात आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात यावे ,ही नम्र विनंती.
नदी हि कोना एकाच्या मालकीची नसते . नदी जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे . हि बाब जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून द्या . त्याचे मार्फत नदीत भराव करन [यात्रा अरुंद करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Even when a retired employee retires, his successor case is not completed on time. Whatever you do for this will get you justice
सेवा निवृत्त कर्मचारी निवृत्त झाल्यावर सुद्धा त्यांचे वारस प्रकरण वेळेवर पूर्ण होत नाही. याकरिता आपण काय केल्यास न्याय मिळणार
आपणास निवृत्ती वेतन प्रकरण अंतिम होत नाही कि शासकीय कर्मचारी मयत असल्याने , त्याचे वारस निश्चित होत नाही असे आपणास म्हणायचे आहे ? जर मयत कर्मच्रायच्या वारस निश्चित होत नसतील तर त्याचा दोष संबंधित विभागास देता येणार नाही . कायदेशीर प्रक्रिया पडून वारस प्रमाणपत्र सादर करावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अदखलपात्र गुन्ह्याबाबत दंडाधिकारी यांच्या कोर्टात वादी स्वतः(वकील न करता) फौजदारी कलम १३३ अंतर्गत दावा दाखल करू शकतो का?
नमस्कार सर , आम्ही अज्ञान असताना वडिलांनी जागेमधील दुकान गाळा ओनरशिप पदतीने विक्री केला आहे.पण आम्हाला तो आता पर्येंत त्यांनी किरायाने दिले आहे असे सांगत असत आता आम्हाला हे बाब निदर्शनास आली आहे कि ती जागा ओनरशिप पदतीने विक्री केली आहे.तरी सदर विक्री करार कसा रद्द करता येईल
सुनीलराव
वडिलांनी गाला नोंदणीकृत दस्ताने विक्री केला असेल व सदरचा गाला जर वडिलांचा स्वकष्टार्जित असेल तर , विक्रीव्यवहार रद्द करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर/मॅडम
माझे वडील व त्यांचा मित्र यांच्या दोघांमध्ये जागा आहे म्हणजेच सामाईक क्षेत्र आहे, त्यापैकी निम्मा हिस्सा वडिलांचे मित्र यांच्या मुलीच्या नावाने केला मग राहिलेला हिस्सा वडिलांच्या नावाने लागेल का आणि जर लागत नसेल तर त्याची प्रकिया काय आहे? याबद्दल कुपाया मार्गदर्शन करावे ही आपणास नम्र विनंती....
जागा खरेदी करताना जर वडील व त्यांचे मित्र यांचे नावे खरेदी केली असेल तर , वडिलांचे नाव अगोदरच ७/१२ सादरी दाखल असेल . आपण जमिनीचा ७/१२ पहा .
मात्र खरेदी करताना केवळ वडिलांचे मित्राचे नावे केली असेल व आता वडिलांचे निम्म्या हिस्स्याला नाव लावायचे असल्यास , वडिलांच्या मित्रांनी अर्धा हिस्सा वडिलांना नोंदणीकृत दस्ताद्वारे विक्री करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कूळ कायद्याची जमीन विक्री करण्याचा अर्ज नमुना असल्यास पाठवा. Whatsapp no -9049473624
आपण आपल्या प्रांताधिकारी कार्यालयात जा . आपणास नमुना मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji Solnar
19-09-2021
balajisolnar35@gmail.com

आदरनिय सर
सर माझ्या वडीलाच्य नावे वर्ग 2 ची जामीन आहे त्या जमिनीचा 7/12 आहे,8 अ, आहे सर्वे नंबर माहिती आहे. हिस्सा क्रमांक माहिती आहे .पण त्या सर्वे नंबर मध्ये इतर शेतकऱ्यांनी अधिक जमीन धरल्या मुळे आमची जमीन नेमकी कुठे आहे हे माहिती नाही . जमीन मोजणी साठी भूमी अभिलेख विभागात विचारले असता ते म्हणाले की आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही. काय करावे लागेल सर मार्गदर्शन करावे विनंती
आपणास शासनाने प्रदान केलेली जागा आहे . ती जागा गायरान असू शकत नाही . अश्या जागेवर ( गायरान ) शासनाचीच मालकी असते . आपणास
दिलेली जागा /प्रदान केलेली जागा हि अन्य शासकीय जागा असेल अथवा शासनाने /जिल्हाधिकारी विहित कायदेशीर प्रक्रिया पार पडून आपणास दिलेली असेल . जर अशी जागा आपले नावावर असेल तर , जागेची मोजणी होऊ शकते . मात्र भूमी अभिलेख खाते मोजणी करण्यास तयार नसल्यास , जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर गायरान जमीन मोजणीसाठी काय करावे लागेल
गायरान /गुरुचरण जागा हि ग्रामपंच्यातीस दिलेली जागा आहे . मात्र त्यावर मालकी हि शासनाचीच असते . त्यामुळे त्याची मोजणी करणे हि बाब मा जिल्हाधिकरी /शासन यांचे अखत्यारीतील आहे .
आपण अर्ज करून गायरान जागेची मोजणी होऊ शकत नाही अथवा मोजणी केली जाणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanket durgude
18-09-2021
Sanketdurgude54@gmail.com

सर मी बिगर शेती च्या 5 गुंडे प्लॅट घेतला असून त्यावर मी 1000 sq foot घराचे बांधकम चालू केले आहे पण त्या बांधकामत कडू लिबाची फांदी येत आहे तो लिब हद्दी लगत बांदा वर आहे म्हणून त्याला विचारले तर तो शेतकरी नाही तोड्याचे बोलतो तर मी काय करू तो जीवे मारण्याची धमकी देतो तर काय करू आता त्याची जमीन ही वर्ग 2 ची जमीन आहे खंड ची जमीन आहे..
https://indiankanoon.org/doc/1732448/
https://www.casemine.com/judgement/in/5767b11be691cb22da6d36d3

जर बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतातील झाडाच्या फांद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मिळकतीवर overhang झाल्या असतील तर , अश्या बाजूच्या शेतकऱ्यास नोटीस द्यावी व फांद्या काढण्यास सांगावे .
नितीस देऊन हि फांद्या काढून टाकल्या नाही तर , आपण फांद्या काढून टाकावयात . त्यास बाजूच्या शेतकऱ्याने अडथळा केला अथवा करत असल्यास , न्यायालयाकडून आदेश घ्यावेत .
उपरोक्त न्यायालयाचे संदर्भ आपले सुलभ माहितीसाठी आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की मुद्रांक शुल्क विभागाने प्रमाणभूत shetra पेक्षा कमी shetracha एकत्रीत सातबारा होणार नाही व रजिस्ट्रेशन होणार नाही असा आदेश 12.07.2021 रोजीच्या आदेशात नमूद आले आहे मला mandangad Ratnagiri येथे 88 गुंठे शेतजमीन एकत्रित 8 जणांमध्ये खरेदी करायची आहे तरी त्या बाबत मार्गदर्शन व्हावे PRAMOD DEREPATIL
८८ गुंठे शेतजमीन ८ जणांमध्ये खरेदी करावयाची आहे म्हणजे प्रत्येकाचे नावे ११ गुंठे क्षेत्र खरेदी केले जाईल . सदर क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत आहे . त्यामुळे खरेदी दस्त नोंदवला जाणार नाही .
आपण सदर जागा जर बिनशेती वापरविभागात ( रत्नागिरी प्रादेशिक योजनेनुसार ) येत असेल तर , दस्त नोंदवयण्यस काही अडचण येणार नाही . अन्यथा जागेची विकास परवानगी घ्या म्हणजे जमीन आपोआप बिनशेती होईल व प्रमाणभूत क्षेत्राची बाधा खरेदीसाठी येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर, माझे आजीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात नाव दाखल आहे. माझी आजी मयत असुन 7/12 रेकॉर्डला तिचे वारसांनी नावे दाखल न होता वारसांचे प्रतिज्ञापत्रावरुन आजीचे मयत भावांचे लाभात विनामोबदला हक्कसोडपत्र लिहुन दिले आहे. तसा दस्त दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेला आहे. त्यानंतर गावकामगार तलाठी यांचेकडे सदरचा हक्कसोडपत्राचा दस्त नोंदीसाठी दिल्यावर त्यांनी 7/12 रेकॉर्डला वारस नोंद नसताना हक्कसोडपत्राचा दस्त करता येत नाही व त्यानुसार मी 7/12 रेकॉर्डला नोंद करणार नाही असे सांगीतले आहे. तरी विनंती की सदरील वारसांनी लिहुन दिलेला हक्कसोडपत्राचा दस्त वैध असेल का किंवा प्रतिज्ञापत्रानुसार 7/12 रेकॉर्डला वारसांची नावे दाखल करुन दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेल्या हक्कसोडपत्रानुसार नावे कमी करता येतील का त्याबाबत मार्गदर्शन करावे
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असल्यास त्याची नोंद ७/१२ सदरी घेण्यास गाव कामगार तलाठी नाकारू शकत नाही .
मात्र आजीचे इतर हक्कात ती हयात असताना नाव असन्याचे काही कारण नव्हते , आजीचे नाव भोगवटादार सदरी असणे आवश्यक होते . असोत . आजीस जमिनीची विल्लेवाट लावण्याचा हक्क होता का ? हे तपासून पहा . जर आजीस केवळ मर्यादित अधिकार होते ? इतर हक्कात नाव केवळ या कारणासाठी होते कि , हयात असे पर्यंत , उदर्निर्वाहासाठीचा हक्क होता का ?
जत आजीस हक्क सोड पत्र करण्याचा अधिकार न्हवता अथवा फसवून हक्क सोड पत्रक करून घेतले असेल सर्व, अश्या हक्कसोड पत्रकाची वैधता आपण न्यायालयात अहवाणीत करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत च्या हद्दितील गावठाण्यातील जमीन घर बांधण्यासाठी नावावर करण्याची प्रक्रिया काय आहे व त्यासाठी काही फीस द्यावी लागते का?
गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण झाले असेल तर , अश्या जमिनीची मिळकत पत्रिका असते . मिळकत पत्रिका असलेली जमीन नावावर करावयाची असल्यास , नगर भूमापन अधिकारी / उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा . अर्जासमवेत आपला जमिनीमध्ये हक्क कसा प्राप्त झाला , जसे वारसाने / खरेदीने या बाबत माहिती देणे आवश्यक .
वारसाने हक्क प्राप्त झाला असल्यास , मयत व्यक्तीचे वारसांचे प्रतिज्ञापत्र . खरेदीनि हक्क प्राप्त झाला असल्यास , खरेदी दस्त .
जर मिळकतीचे सर्वेक्षण झाले नसल्यास , अश्या जमिनीचे अधिकार अभिलेख नसतात . मात्र ग्रामपंच्यात प्राधिकरणाचे अखत्यारीतील गावठाणात अशी जमीन असल्यास , ग्राम पंचायतीकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul Desai
14-09-2021
desai.rahul86@gmail.com

नमस्कार सर माझ्या वडिलांना व माझ्या आत्या याच्या साह्य न घेता आमच्या वेगवेगळ्या जमिनेचे विक्री झाली आहे काय करावे .काही विक्री करताना माझ्या वडिलांना मृत दाखवलं आहे तरी बहुतेक मध्ये लहान मुलगा दाखवलं आहे मी कश्या पदतीने माझ्या वडिलांचं नाव व आत्या च नाव पुन्हा सातबाऱ्यावर आणू शकतो .माझ्या वडिलांनी ९वर्ष कोर्ट केस लढवली आहे परंतु काहीच उप्या झाला नाही मला मार्गदर्शन करावे
राहुल देसाई
महोदय
न्यायालयात हि आपल्या बाजूने निकाल झाला नसेल तर , अपील वरिष्ठ न्यायालयात करा . या पेक्षा वेगळे काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अनुसूचित क्षेत्रातील नदिपात्रातून सरकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य संगनमताने अवैध वाळू उपसा करत आहेत,तर त्या गौण खनिजावर आदिवासींचा हक्क किती आणि शासनाचा हक्क किती?जर आदिवासींचा हक्क असेल तर अशा लोकांविरुद्ध अॅट्रोसीटीचा गुन्हा नोंदविता येतो का?

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3