जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Surekha Tupe
07-08-2021
surekhatupe03@gmail.com
सुरेखा तुपे - surekhatupe03@gmail.com
Feedback : शिक्षण संस्था 1960साली संस्थापक यांनी आजाेबांना ताेंडी 20 गुंठे जागा वहिवाटीस दिली 1992साली संस्थेने अनेक लाेकांना वाणिज्य कारणासाठी 99 वर्ष भाडेकरारांने जागा दिली आहे. आजाेबांना ही दिली त्यामध्ये 20 गुंठेचा उल्लेख नाही. ग्रामपंचायत 1966 सालापासून नाेंद आहे. आज ही जागा आम्ही वहिवाट आहे. ग्रामपंचायत आम्हाला अतिक्रमण नाेटिस देत आहे.वहिवाटीस मज्जाव करत आहे.काही गांवगुंड दमदाटी करत टपरी वडापाव भाजीपाला फळे विक्रते यांना आमच्या दारात बसवित आहे.कुंटुबाल मानसिक टाँवर्च करत आहेत. न्याय कसा मिळेल.7/12 नाेंद कशी हाेईल .प्लीज मार्गदर्शन करा.
२० वर्षाहून अधिक काळ आपल्याकडे जमिनीचा ताबा आहे . वहिवाटीस अडथळा करू नये म्हणून दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajinkya Chitnis
07-08-2021
ajinkyachitnis9999@gmail.com
सर
आमच्या गावात एका व्यक्तीने 40 एकर स्वतःच्या मालकीची जागा देवस्थान ला बक्षीस पत्राने बक्षीस दिली परंतु देवस्थान मंडळ यांनी बक्षीस पत्र आणि संबंदीत कागद स्वतः कडे ठेवले ते कोणत्याही कार्यालायत पुढील प्रक्रिये साठी सादर केले नाहीत परिणामी काही वर्षांनी त्या जमिनीवर कुळांची नावे लागली आणि कुळ खरेदी विक्री करायला लागली या वर काय करता येईल ती जागा पुन्हा देवस्थान ला मिळेल का ?
Question by आकाश मस्के
07-08-2021
maskeakash4@gmail.com
सर आमच्या गावातील मातंग समाज मंदिरासाठी असलेली जागा हि ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी परस्पर हि जागा त्यांनी त्यांच्या हितधारकां च्या नावाची नोंद केली आहे आणि त्या ठिकाणी मातंग समाज मंदिर असा उल्लेख अहतानाही त्याला गोल करुन त्याच्या खाली त्या खाली या हितचिंतक का ची नावे लिहिली आहेत. या वरती आपण काय योग्य ती कारवाई करु शकतो
ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना जमीन वाटप करण्याचा अधिकार नाही . आपण प्रांतअधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mayuresh Patil
06-08-2021
mayureshpatil906@gmail.com
१) दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकत दस्त नोंदणी विरुद्ध हरकत अर्ज स्विकारला जातो का ?
२) उप अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय यांना हरकत अर्ज मिळाल्यास चौकशी नोंद वही किंवा मिळकत पत्रिकेवर पेन्सिलने हरकत आहे म्हणून नोंद करुन शकतात का ?
३) फेरफार विरुद्ध अपिल करण्यासाठी किती कालावधीची कायद्यात तरतूद आहे ? कालावधीनंतर पुढील मार्ग काय ?
१. कायद्या मध्ये हरकत घेण्याची /मागवण्याची तरतूद नाही . मात्र एखादी नोंदणी कायद्याविरुद्ध होत असेल तर हरकत तपासली जाते
२. उपाधीक्षक यांचे कामकाज जमीन महसूल कायद्याप्रमाणे चालते त्यामुळे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काही अंशी होय असे आहे
३. ६० दिवस
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh masavekar
06-08-2021
santoshmasavekar@gmail.com
नमस्कार सर, आमचे राहते घर हे आजोबाच्या नावे आहे.आजोबा मयत झाले आहेत. मला ते राहते घर वडिलांच्या नावे करायचे आहे. पण वडिलांना 3 भाऊ आणि 6 बहिणी आहेत त्याची संमती घ्यावी लागेल का? चुल्याचा नावे करून देंण्यास विरोध आहे. आणि ग्रामपंचायत त्याचे संमती पत्र मागते आहे. तर ह्या साठी मला मार्गदर्शन करावे की घर नावे कसे होईल.
आजोबांचे घर आहे त्यामुळे त्यावर सर्वांचा अधिकार आहे . इतरांची संमती असली तरी नोंदणीकृत दस्ताद्वारे हक्क सोडणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh Pingale
05-08-2021
pingala.g07.gp@gmail.com
सर दुसरयास अकॉउंट ने उसनवार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी कायदेशीर मार्ग सूचवने
Question by Ravindra Pandu sahare
05-08-2021
Sahareravindra4@gmail.com
सर माझ्या वडिलांना त्यांच्या काकीची जमीन मिलालेलि आहे त्याचा सात बारा 173/१ असा आहे आणि बाजूच्या गावचा शेतकरी त्याला ह्या जमिनी मधून फक्त 3 शेत लागवडीसाठी दिलेली होती ती अन्दाजे 1 एकर असतील परंतु त्या शेतकऱ्याने 32 ग लागू करून 4 ते 5 एकर चा नवीन सात बारा काढून घेतलाय 173/२ असा त्याचा नावे एवढी जमीन कशी झाली त्यांनी काय केलं ह्याच आमच्या वडिलांना काहीच माहिती नाही आता प्रांत कडे केस चालू आहे 32ग हे कस लागू केला यासाठी तहसील ऑफिस ला चौकशी केली असता हे प्रमाणपत्र सुद्धा तिथे मिळत नाही तर आम्ही काय कराव सर कश्या प्रकारे आणि कुठे कुठे चौकशी करावी प्लीज सर मार्गदर्शन करा त्यामध्ये अस आहे कि आजही ते शेतकरी त्यांना दिलेली 3 शेत तेवढी च कसत आहेत बकिच क्षेत्र आमच्या ताब्यात असून आम्ही पूर्वीपासून कसत आहोत
आपलय ज्या मिळकतीस बाजूच्या शेतकऱ्याचे नाव लागले आहे ते सर्व फेरफार काढा . वाचून पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अक्षय Shaha
04-08-2021
akshayshaha007@gmail.com
सर नमस्कार, माझा प्रश्न असा की, एक अपत्यहीन पती आणि पत्नी, वय वर्ष 60+, यांची 7 एकर शेती व राहते घर शहरात आहे, 7/12 व 8 अ या वर फक्त पतीचे नाव आहे, तर आता पतीच्या संमतीने पत्नीचे ही नाव 7/12, 8 अ, राहते घराच्या पेपर्स वर लावायचे आहे , तर हे सर्व करण्यासाठी विविध पध्दती आहेत ( उदा.वारस नोंद पध्दत, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम , इतर ) यापैकी कोणती पध्दत वापरावी जेणे करून कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम या योजनेचा कसा उपयोग करावा व त्याची संपूर्ण procedure काय आहे.
तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, येथे याची माहिती मिळेल हे मला माहित आहे परंतु तेथील कर्मचारी संपुर्ण माहिती देत नाहीत टाळाटाळ करतात,तरी आपण स्टेप बाय स्टेप procedure ची माहिती दिली तर मला खूप मदत होईल
पतीदेव यांनी पत्नीच्या नावे बक्षीस पत्र करून द्यावे . राहते घर असल्याने केवळ २०० रुपये मुंद्रणक शुल्क लागेल . नोंदणी फी वेगळी . अंत्यंत सोपी पद्धत आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hemant Onkar Patil
04-08-2021
hemrajjadhav1985@gmail.com
Namkar sir amchi vadiloparjit sheti aahe ,pan ami shetisati sarkari padit jagevar vihir kodhun pani cha vapar karto parntu maze bhau mala pani dhet nahi ,sabara var maze vadilcha nave ahe pan vadil mayat ahe krupa karun mala pani gench adhikari sati margadhardhan karve
आपली पाण्याची विहीर सरकारी जागेवर आहे . त्यामुळे तस पाहिलं तर आपल्या कुणाचाच पाण्यावर हक्क नाही
असोत जर विहिरीवर आपले वडिलांपासून पाणि घेत असाल तर वडिलांचे वारस म्हणून आपलाही पाणी घेण्यावर हक्क आहे .
वकिलांच्या सल्ल्याने दिवाणी दावा दाखल करून पाणी घेण्याचा हक्क जाहीर करून मिळावा अशी मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर रमेश मिसाळ
03-08-2021
sagarmisal515@gmail.com
सरकारी गोठण जमीन एकूण कुळापैकी एकाच्या नावावर मा. तहसीलदार यांनी आदेश पारित केले असल्यास याविषयी कोणती कारवाई होऊ शकते? व तहसीलदार यांना सरकारी गोठण जमीन देण्याचे अधिकार आहेत का?
सरकारी जागेला एखादी व्यक्ती कुल आहे हे जाहीर करण्याचा अधिकार तहसीलदार यांना नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शबी
03-08-2021
shabimoulvi@gmail.com
महोदय,
जुना ७/१२ व गाव नकाशा (अंदाजे १९४३ साली) मध्ये सर्वे नंबर वर रस्ता दाखवला नव्हता. आत्ताच्या सर्वे नंबरचा नकाशामध्ये गावाचा रास्ता दाखवण्यात आलेला आहे. परंतु गावाचा रस्त्यासाठी सर्वे नंबर मधून काही क्षेत्र कमी करण्यात आले असून, ता.न.भु यांच्याकडून प्राप्त नकाशा मध्ये एकूण सर्वे चा क्षेत्र कमी दाखवण्यात आलेला आहे. रस्त्यासाठी लागणाऱ्या क्षेत्राचा कुठलाही प्रकारचा मोबदला अगर फेरफरची नोटीस प्राप्त झालेली नाही. तसेच ७/१२ वर सुद्धा क्षेत्र कमी झाले याची नोंद नाही. जर रस्ता गेला असेल तर त्याचा मोबदला (मिळत असल्यास) तसेच किती क्षेत्र गेले यासाठी काय करायचे? कृपा करून मार्गदर्शन करावे व म. ज. म. अधिनियम मध्ये यासाठी कोणती तरतुद आहे किंवा कसे, यावर प्रकाश टाकावे.
धन्यवाद
आपला नम्र
शबी
संपादनाबाबत फेरफार व सातबारावर उल्लेख असेल . ते पाहून आपल्यास कोणत्या विभागास जमीन संपादित झाली आहे हे कळेल . त्यानुसार पुढील दिशा ठरवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bharat Gaikwad
02-08-2021
pravingaikwad60@gmail.com
Namskar Sir,
Maji vadloparjit shet jamin ahe parantu sakkya-chulat bhavane ti shet jamin majya vadlianche nav n lavta (vaglun) tyanche varas nond karun paraspar vikli ahe ata mala kute dad magave lagel ani kay documents lagtil
Question by विनायक तुकाराम लांडगे
02-08-2021
vinayakalandage04@gmail.com
मी शिक्षक आहे.पूर्वी वडिलोपार्जित शेतजमीन नव्हती आणि आज सुद्धा नाही.मात्र मला पेन्शन नसल्याने निवृत्तीनंतर मला उदरनिर्वाह करणेसाठी शेती खरेदी करायची आहे.करू शकतो का? कोणत्या अडचणी आहेत.? शेतकरी दाखला माझ्यासारख्या भूमिहीन लोकांना कोणत्या प्रकारे मिळू शकतो?
दानपत्र का काय प्रकार आहे? मी करू शकतो का? या मार्गाने शेती खरेदी करू शकतो का? किंवा इतर कोणता मार्ग आहे ज्याने मी शेती खरेदी करू शकतो?
कृपया मार्गदर्शन करावे.
आपण शेतजमीन खरेदी करू शकत नाही
अन्य कोणताही मार्ग नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Akshay Popat Bade
01-08-2021
akshaybade42@gamil.com
मा. सर, माझ्या आजोबांनी 7-8 महिन्यापुर्वी 60 गुंठे जमिनीचे साठेखत करून दिले होते. परंतु त्यात मुदत किती दिवसांची होती हे त्यांना समजले नाही. ज्या व्यक्तीला साठेखत करून दिले होते तो म्हणाला होता की आपण जमिनीचि खरेदी 3 महिन्यात करून टाकू. परंतु आम्ही त्याला 8 महिन्यापासून कायम फोन करुन म्हणायचो की खरेदी कधी करायची. तेव्हा तो सतत म्हणायचा पुढच्या महिन्यात करू. परंतु त्याने खरेदी केली नाही आजपर्यंत. आम्हाला तेव्हा पैशांची गरज होती म्हणुन लवकर जमीन विकायची होती. परंतु आता पैशांची गरज पूर्ण झाली म्हणुन आम्हाला ते साठेखत रद्द करायचे आहे. त्याने आम्हाला साठेखत किवा त्याची एकही प्रत अद्यापही दिलेली नाही. आता त्यानेच आम्हाला नोटिस दिलेले आहे की खरेदी देऊन टाका नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेल. * * त्या नोटिस मध्ये त्याने साठेखताचि मुदत 4 महिने असल्याचे लिहीले आहे. * *
आम्ही त्याच्याकडून घेतलेली रक्कम पुन्हा त्याला द्यायलाही तयार आहोत. परंतु तो आता नाही म्हणत आहे. तर आम्ही काय करावे. आम्हाला साठेखत रद्द करायचे आहे. #
साठेखतामध्ये अजून कोणत्या अति व शर्ती होत्या त्या मुद्द्यानिहाय वाचा . त्यामध्ये एखाद्या गोष्टीचा भंग होत असेल तर त्याचे नोटीस ला उत्तर द्या . त्याने दावा दाखल केला तर त्यास शर्ट भंग झाला असल्यास त्याप्रमाणे उत्तर द्या . न्यायालय त्यावर निकाल देईल,
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी पाटील
01-08-2021
shivray2010@gmail.com
आमच्याकडे संरक्षित कुळ वाहिवाठी नुसार शेत जमिन आहे आता त्यामधून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे तरी कुळवाहिठीनुसर मोबदला कसा आहे त्या संधर्भात कायदा काय आहे.
आपण सौरक्षित कुल आहेत . त्यामुळे जमीचे आपण मानीव मालक आहेत . ३२ग किंमत निश्चित झाली नसल्यास , ३२ ग किंमत निश्चित झाली तर , जेवढे पैसे मालकास मिळायला पाहिजे होते तेवढेच पैसे जमीन मालकास मिळतील व उर्वरित आपणास मिळतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समाधान भारत गुरव
31-07-2021
sam.gurav.katikar@gmail.com
नमस्कार साहेब, आम्हाला तुळजापूर तालुक्यातील मौजे काटी गावातील सि.स.नं.३९१ ची खरेदी द्यायची असताना दुसऱ्या व्यक्तींकडून अनवधानाने आमच्याच सि.स.नं.३४ ची जागेची खरेदी झाली आहे, तरी खरेदी देणार व घेणार दोन्ही व्यक्ती ही खरेदी रद्द करण्यास तयार आहेत, तरी तो व्यवहार रद्द होण्यास किती दिवस लागतील, कृपया मार्गदर्शन करावे..!
खरेदी खत रद्द करण्यास वेळ लागणार नाही परंतु आपणास नवीन जागेचे खरेदी करण्यासाठी पुन्हा मुंद्रणक शुल्क भरावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खोलेश्वर कृष्णानंद नंद
31-07-2021
nandkk91@gmail.com
सर मला देवस्तान च्या विरासत कारवाही बद्दल माहिती हवी आह. ट्रस्टची नोंदणी १९६८ ला झाली आहे विरासत कारवाही झाली आवश्यक कागदपत्रे काय लागतील
Question by SACHIN
31-07-2021
sachin.bagave2014@gmail.com
sir namaskar , me lohagaon madhe ardha guntha jaga 2010 madhe cash ne ghetli hoti maza 7/12 vagire zala ahe tari agent ghar bandhyala problem create karto ahe mala please margadarshan kara me pudhe ki kela pahije
Question by Sanket nichal
31-07-2021
sanketnichal9@gmail.com
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे न्याय निर्णयावर नाराज होऊन मेअतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांची न्यायालयात विलंब माफीचा अर्ज सह अपील दाखल केली असून जिल्हा न्यायाधीशांनी मूळ निकालाला ताबा देण्यास स्थगिती दिलेली आहे सदर प्रकरण तहसीलदार यांच्याकडे देखील गेलेले आहे तरी सातबारा बनू शकतो का
Question by Amol s Patil
30-07-2021
patilamol1089@gmail.com
नमस्कार सर, केवळ पड/ वरकस जमिन असलेल्या धारकास शेतकरी दाखला निर्गमित करता येईल का कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे .
Question by अक्षय शहा
30-07-2021
akshayshaha007@gmail.com
सर नमस्कार, माझा प्रश्न असा की, एक अपत्यहीन जोडपे(पती आणि पत्नी) वय वर्ष 60+, यांची 7 एकर शेती व राहते घर शहरात आहे, 7/12 व 8 अ या वर फक्त पतीचे नाव आहे, तर आता पतीच्या संमतीने पत्नीचे ही नाव 7/12, 8 अ, राहते घराच्या पेपर्स वर लावायचे आहे , तर हे सर्व करण्यासाठी विविध पध्दती आहेत ( उदा.वारस नोंद पध्दत, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम , इतर ) यापैकी कोणती पध्दत वापरावी जेणे करून कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल, शेत दोघांचे घर दोघांचे महिला सक्षमीकरण उपक्रम या योजनेचा कसा उपयोग करावा व त्याची संपूर्ण procedure काय आहे.
तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, येथे याची माहिती मिळेल हे मला माहित आहे परंतु तेथील कर्मचारी संपुर्ण माहिती देत नाहीत टाळाटाळ करतात, जास्त मेवा मिळावा अशी अपेक्षा असते , तरी आपण स्टेप बाय स्टेप procedure ची माहिती दिली तर मला खूप मदत होईल, कृपया याबाबतीत मार्गदर्शन करावे.
Question by Shyamsunder dube
29-07-2021
shamdube@gmail.com
विनायक भनगे हे आमच्या गावातील एक ब्रम्हचारी व्यक्तिमत्व, त्यांनी आपले सारे आयुष भजन कीर्तन विट्टल भक्तित व्यतीत केले होते. वारस म्हणून त्यच्या पाठीमागे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्या हयातीतच मृतूपत्र बनवले व सर्व स्थावर व जंगम मालमत्ता गावातील विट्टल रुखुमई मंदिरास दान केली.
त्यांच्या मृतूपत्रा नुसार जी त्यांना सरकारी फॉरेस्ट जमीन( भोगवटदार 2) इनामी स्वरुपात मिळाली होती, ती जमीन त्यांनी मृतूपत्रा नुसार विट्टल रुखुमई मंदिरास दान दिली व त्याजमिनीचे विश्वस्त म्हणून गावातील एकूण नऊ जनाची नियुक्ति केली आणि त्याजमिनीच्या वार्षिक उत्पन्नचा खर्च गावातील देवकार्यासाठी वापर करण्यात यावा व गहन विक्री करू नये, असे त्यांनी त्या मृतुपत्रात नमूद केले होते.
विश्वस्तचे नाव :
( 1.शिवाजी एकनाथ गमे 2. गुंलाबचंद शिगवी 3.आसाराम गमे 4.शामराव बाबूराव गमे 5.शीतलप्रसाद दूबे 6.लक्षिमान दूबे 7. दत्तूप्रसाद दूबे 8. मेहमुद बादशा पाठन 9.किसन काकडे)
जे नऊ विश्वस्त नेमले होते त्यापैकि सर्वाचे प्रमुख महणून शिवाजी एकनाथ गमे यांचे नाव कबजेदर सदरी दाखल व्हावे असेही त्यात लिहण्यात आले होते. त्यानुसार त्यांची मृतुनंतर 1985 रोजी 7/12 वर शिवाजी एकनाथ गमे व इतर 7 अशी 7/12 नोद झालेली आहे.
परंतु सद्य स्थिति मध्ये शिवाजी एकनाथ गमे व इतर विश्वासता पैकी फक्त एकमेव विश्वस्त 4.शामराव गमे हेच जीवंत आहे.
आता जर या जमीनिस नवीन विश्वस्त नेमायचे असतील तर ते कोणत्या प्रकारे नेमाता येतील नोदवाता येतील व त्याची 7/12 सदरी नोंद कशी होईल यासाठी कायद्यात काही तरतुदी आहेत काय ?
जी जमीन विठ्ठल देवास त्यांनी दान केली आहे , त्या देवस्थानचे सार्वजनिक न्यास, महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा खाली नोंदवले आहे का ? नोंदवले असल्यास , न्यासाच्या घटनेनुसार नवीन विश्वस्त नाव लावण्याची कार्यवाही होईल
व्यास नोंदवला नसल्यास , नोंदवून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Nagare
29-07-2021
1collector.ias@gmail.com
सर आमच्या ७/१२ मधील काही जमीन काही वर्षापूर्वी आलेल्या तुकडेबंदी योजनेमुळे आपोआप आमच्या शेताच्या बाजूला असणाऱ्या शेताच्या मालकाच्या ७/१२ वर गेली जो आमचाच नातेवाईक आहे. आणि आम्ही त्यांना ती जमीन मागितली तर ते काही आम्हाला द्यायला तयार नाही कारण ते म्हणतात सरकार मुळे झालं तर तिकडून घ्या त्यामुळे आम्ही कोर्टात केस केली आहे पण निर्णय काही अजून लागला नाही पण एक उपाय म्हणून तुम्ही सांगू शकता का की ती जमीन आम्ही कशी मिळवावी ?
कायद्याने जॅकीं तुमच्या नातेवाईकाचे नावे झाली आहे
तुम्हास परत मिळू शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण प्रभाकर भंडे
29-07-2021
Bhandekiran94@gmail.com
Question by Sudhakar Bagal
27-07-2021
bagalsudhakar@gmail.com
My father & late uncle had jointly purchased 4 acer of land in year 1975, partition of this land was done verbally between my father and uncle immediately post purchase, as per 7/12 enter land is common, all these years their was no problem, but now my cousin brothers are in denial of the verbal partition, and have registered civil matter 'Sar Niras Vatap' in court, my father has invested lot of money to devlope his peace of land and is cultivating all these years. I wold like to know
1. Is verbal partition acknowledged by honorable court.
2. If not, what is the way by which my fathers existing partition remains with him 3. What evidence will be required to confirm the peace of land cultivated by my father belongs to him.
And he owns it.
One point i missed recently my cousin brothers have damage sugarcane crop in my father peace of land for which NC was logged with police and notified to court, to which opp party has replied and denied any such offence and also rejected that it's my father sugarcane crop.
Oral partition is valid in law . There are several judgements to support oral partition . In your case , your cousins have moved the court to divide the property as the shares . As the property is jointly purchased , shares are already fixed . Only question is that of possession . Who cultivates which part of the property ? If you have reduced the oral partition in writing , then only one can prove that certain part of the property which you are claiming to be cultivated is being cultivated or is being in your possession . In absence of the any proof to this , court will resort to full trial of the suit . Witnesses will be heard to ascertain the possession issue .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
