जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by विकी मढवई
27-07-2021
vickymadhawie@gmail.com
जमीन आमच्या नावे आहे , आम्ही कर्ज पण घेतो . पण आमच्या चुलते यांनी त्या जमिनी वर कब्जा करून ठेवला आहे . आम्ही जमीन कसायला गेल्यास भांडणे, हाणामारी होतात . तर त्यांना त्या जमिनी बाहेर काढून आम्हाला कब्जा कसा घेता येईल? पोलिसी, कोर्ट , तहसीलदार नेमकी कोणाची मदत घेऊन आम्ही कब्जा घेऊ शकतो? एकदा आम्ही पोलिसांची मदत घेऊन कब्जा घेण्याचा प्रयत्न केला पण हाणामारी झाल्यावर पोलिसांनी त्यांच्या बरोबर आम्हाला देखील आत मध्ये टाकले व दोघांवर देखील फौजदारी गुन्हा दाखल केला . आमची जमीन असून आम्हाला कसता येत नाहीय . कृपया मार्गदर्शन करावे . लवकरात लवकर कसा कब्जा घेता येईल कुठल्याही प्रकारची हाणामारी व भांडणे न करता .
Question by प्रविण भिका कोळी
27-07-2021
sirpravinkoli@gmail.com
आम्ही ४ भाऊ व १ बहिण अशा ५ व्यक्तींची नोंद करून घेतली आता सदर जमीन मला माझ्या एकट्याच्या नांवे करून घ्यावयाची आहे परंतु १ भाऊ हक्क सोड करून देण्यास तयार नाही २ भाऊ व १ बहिण हक्क सोड करून देण्यास तयार आहे. तर त्यांनी हक्क सोड केल्यावर त्यांच्या हिस्सा माझे नांवे होईल का ? आणि कशा पद्धतीने होईल ? कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
जे तयार आहेत त्यांचेकडून हक्कसोड पत्रक /बक्षीस पत्र घ्या . जे देणार नाहीत त्या बद्दल काही करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amar Darekar
27-07-2021
amardarekar1122@gmail.com
माझ्या नावे जमीन आहे । त्या जमिनीमध्ये 1 जाणा ने घराचे बांधकाम केले आहे .त्याचे असे म्हणणे आहे की मी गायरान मध्ये घर बांधले आहे पण ती जागा गायरान नसून खासगी जमीन आहे माझी। मोजणी ची सर्व प्रक्रिया होऊन क प्रत सुद्धा आहे। पण तो माणूस घर सोडण्यास तयार नाही। तर काय करावे।
Question by SACHIN
27-07-2021
sachin.bagave2014@gmail.com
sir namaskar , me lohagaon madhe ardha guntha jaga 2010 madhe cash ne ghetli hoti maza 7/12 vagire zala ahe tari agent ghar bandhyala problem create karto ahe mala please margadarshan kara me pudhe ki kela pahije
Agent चा काही संबंध नाही
आपण बांधकाम परवानगी घ्या व बांधकाम करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shivraj dasare
27-07-2021
Shiva10dasare@gmail.com
Sir we have Total area of 1865 square feet plot area on PR card.. We have started the work on whole plot area of 1865 sqfeet but some one has complaint in panchayat samiti for about construction.. They say that in MAP of bhumiabhilekh some area is shown by dashed lines... Approachment of 400sq feet. So can i challenge PR card in court Or have to leave 400sq feet area. Some officer say that it is fault of surveyor of taking the reading of plot area.. So kindly tell me sir can I challenge PR card or bhumilekh documents in court so that I can get justice
Have you obtained Development Permission of the Planning Authority ?
If not, apply for the permission and construct as per the sanctioned plan . Planning Authority will decide what is the FSI permissible for the land in question . The issue of setting apart / leaving area of 400 Sq Feet will be taken by Planning Authority .
Carrying Development without permission is illegal and is an offence under section 53 of Maharashtra Regional and Town Planning Act 1965 .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran hande
26-07-2021
handekiran84@gmail.com
नमस्कार . सन.1969 साली गावातील पंचांनी ३ भावांमध्ये वाटपपञ केले. वाटपावेळी एकञित कुटुंबात 2100 रुपयाचे कर्ज होते ते कर्ज तिघांपैकी एकाने भरले व सदर कर्ज भरले म्हणून त्याला 30 गुंठे जास्त जमीन देण्यात आली. परंतु वाटप पञात राहिलेल्या दोन भावांनी प्रत्येकी 700 रुपये त्याला जेव्हा देतील तेव्हा त्याचेकङून आपला हिस्सा घ्यावयाचा आहे असा वाटपपञात उल्लेख आहे. परंतु तो 1969 चे 700 रूपयांची आता किती किंमत झाली आहे असे बोलत आहे . तर त्याला किती 1969 सालच्या 700 रुपयांसाठी आता किती रक्कम द्यावी लागेल. का फक्त 700 च द्यावे लागतील
वाटप पत्रात ७०० रुपये कधी पर्यंत देण्याचे होते याचा काही उलेख आहे का ? उल्लेख असल्यास व ती मुदत संपली असल्यास आता पैसे देऊन उपयोग होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप शिंदे
26-07-2021
vihaann20594@gmail.com
सर,
माझे नाव संदीप शिंदे माझी खेड पुणे इथे माझी वडिलपार्जित जमीन आहे व सदर जमीन ही महार वतनाची जमीन आहे, माझे आजोबा ,यांचे जमीन शेत्र 3.15 एकर आहे, त्यांना 4 मुले होती,4 मुले म्हणजे माझे वडील आणि उ्वरित 3 भाऊ, असे 4 जन मयत आहेत, त्यानंतर माझ्या चुलत भाव ने त्याच्या वडील नाचे नाव त्या जमीन वर लाऊन स्वतः चे नाव 7/12 वर लावले आहेत, तर सदर जमीन मधे आम्ही आमच्या वडील ना चे व आमचे नाव कसे व कोणत्या पद्धतीने लावावे , यांचे आपण मार्गदर्शन करावे
एकत्र कुटुंबाची जागा आहे . ज्या फेरफाराची आपल्या चुलत्यांचे नाव दाखल झाले होते तो फेरफार अहवानीत करा व सर्व वर्षांची नावे दाखल करणेच हुकूम देणेबाबत अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कृष्णा
26-07-2021
toras.kris@gmail.com
नमस्कार साहेब!
माझा प्रश्न असा आहे की, ए.कु.मॅनेजरने कुळ कायद्यानुसार खरेदी करण्यासाठी भावाने निम्मी खरेदी किंमत दिली नसल्याने सर्व खरेदी किंमत स्वकष्टार्जित उत्पन्नातून भरली असल्यास, भावाला जमीनीत समान वाटणी मागण्याचा अधिकार आहे का? असल्यास तो कोणत्या कायद्याने असतो?
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४० अन्वये कुळवहिवाट वंशपरंपरागत आहे . भावाला / भावाचा कुळवहिवाट कायद्याअंतर्गत मिळाल्या जमिनीत हक्क आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shrikant vijay Deshmukh
26-07-2021
shrikantdeshmukh099@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... सर सातबारा मधील दोन नावे आहेत खाते वाटप झाले आहे माझे व भावाचे नाव आहे तर मी जमिन खरेदी देत आहे तर मला भावाची संमती लागणार का ?
आपल्या व भावाचे नावावर जी जमीन आहे ती वडिलोपार्जित असेल तर अन्य भावाची परवानगीची /संमतीची आवश्यकता आहे अन्यथा नाही
कलम २२ -हिंदू वारसा कायदा १९५६
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by RAJU SONAVANE
25-07-2021
raju23662366@gmail.com
गावाला सिटी सर्वे आहे व नगरपंचायत आहे परंतु सिटीसर्वे वर माझे नाव नाही आणि नगरपंचायत मिळकतीस माझे नाव आहे तर मी नगरपंचायती च्या रेकॉर्ड चा आधार घेऊन घर व संपूर्ण खुली जागा याचे मृत्युपत्र लिहून ठेवू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.
ग्रामपंचायत अभिलेख मध्ये आपली आगोदर कोणाचे नाव दाखल होते ? आपण जर जमीन खरेदी केली असेल तर तो दस्त नगर भूमापन कार्यालयास दाखवा /सादर करा
आपण ग्राम पंचायत रेकॉर्ड चा आधार घेउन मृत्य पत्र करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अक्षय साधू पडवळकर
25-07-2021
padwalkaras2020@gmail.com
मी अक्षय साधू पडवळकर.रा.औंढी.ता.मोहोळ,जि.सोलापूर.आमचे चुलत आजोबा श्री.नामदेव तात्या पडवळकर यांच्या नावे २५ ते ३० एकर जमीन होती, कारण ही जमीन इतर भावंडांना वाटून दिलेली नव्हती. अर्थात माझ्या आजोबांसहीत सात भावंडे होती.मात्र या जमिनीची भावंडांमध्ये वाटणी न झाल्याने हे क्षेत्र जास्त दिसत असल्याने,यातील पाच एकर जमीन उजनी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाकडून संपादित करण्यात आली होती.मात्र कालांतराने म्हणजेच साधारण दहा वर्षापूर्वी आमच्या सर्व चुलते, चुलत चुलते यांनी मिळून या पाच एकर जमिनीतील चार एकर जमीन पुन्हा खरेदी केली.व यातील राहिलेली एक एकर जमीन आजही जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे आहे.अर्थात ही राहिलेली एक एकर जमीन पुन्हा खरेदी केल्यानंतर यामध्ये सहा हिस्सेदार असणार आहेत.मात्र आम्हाला ही जमीन पुन्हा खरेदी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे माहीत नाही.आणि याचाच फायदा घेऊन काही एजंट लोक आम्ही जास्त किमतीने जमीन खरेदी करावी यासाठी तगादा लावत आहेत व वारंवार अशाप्रकारची धमकी देत आहेत की ही जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली जाईल.अशाप्रकारे या एजंट मंडळीचा आमच्याकडून वारेमाप पैसा उकळण्याचा इरादा आहे.असे अतिरिक्त पैसे खर्च झाले तर आम्ही कर्जबाजारी होऊ शकतो.त्यामुळे ही जमीन पुन्हा खरेदी करण्यासाठी आम्ही नेमके काय करायला हवे याबद्दल मार्गदर्शन करावे.
जर जमीन खरेदी करण्यासाठी , जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत तर त्याबाबत योग्य विचार आपणच करणे आपल्यासाठी हितावह राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप शिंदे
24-07-2021
vihaann20594@gmail.com
सर,
माझे नाव संदीप शिंदे माझी खेड पुणे इथे माझी वडिलपार्जित जमीन आहे व सदर जमीन ही महार वतनाची जमीन आहे, माझे आजोबा ,यांचे जमीन शेत्र 3.15 एकर आहे, त्यांना 4 मुले होती,4 मुले म्हणजे माझे वडील आणि उ्वरित 3 भाऊ, असे 4 जन मयत आहेत, त्यानंतर माझ्या चुलत भाव ने त्याच्या वडील नाचे नाव त्या जमीन वर लाऊन स्वतः चे नाव 7/12 वर लावले आहेत, तर सदर जमीन मधे आम्ही आमच्या वडील ना चे व आमचे नाव कसे व कोणत्या पद्धतीने लावावे , यांचे आपण मार्गदर्शन करावे
ज्या फेरफाराची केवळ आपल्या चुलत भावाचे तसेच आपल्या चुलत्याची नाव दाखल झाले आहे त्या विरुद्धचा प्रांताधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . त्या ठिकाणी दाखवून द्या कि आपला हि मिळकतीत वारसा हक्क आहे
जुने फेरफार सादर करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ravi
22-07-2021
ravindra25390@gmail.com
नमस्कार सर,
मी आणि माझे चुलते असे दोगामध्ये आम्ही डिड गुंठा जागा २०१३ मध्ये खरेदीखत करून घेतली होती. प्लॉट पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुका मध्ये आहे आणि आता तिथे आम्ही घर बांधून राहत आहोत. सदरची जागा ही वर्ग २ मध्ये आहे. आंम्ही अजून पर्यंत ७/१२ वर नाव लावून घेतले नाही. ७/१२ वर नाव लावण्यासाठी काय करावे लागेल
वर्ग २ जागा हस्तांतरणास निर्बंध असतील तर , सक्षम अंधुकऱ्याची परवानगी घ्या . या पूर्वीच आपले खरेदी खात झाले आहे . तुकडेबंदी कायद्यानुसार आता हा व्यवहारही नियमित करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anil
20-07-2021
akshaymedge82@gmail.com
माझा असा प्रश्न आहे की,वडीलांचे चुलत भाऊ यांनी आमचे कुटुंब गावी नसताना १९९९ साली आमच्या जमिनीच्या बाजूचे शेत विकत घेतले ते त्यांनी डेवलप करताना आमचे सव्वा एकर शेत (खासार) त्या मध्ये विलीन करुन घेत ती जमीन नावे करुन घेतली. तर त्या दस्ताऐवजांची नक्कल मला कुठे आणि कसे मिळतील?. याविषयी माहिती द्यावी. हि नम्र विनंती.
मिळकतीच्या हद्दी निश्चित करणे आवश्यक आहे . त्यासाठी जमिनीची मोजणी करून , हद्दी निश्चित करून घ्या . एकदा मोजणी झाली कि , आपल्याला हद्दी माहित , झाल्यावर आपल्या नातेवाईकांना अतिक्रमण केल्याबद्दल ते काढून टाकणे बाबत नोटीस द्या
नाही ऐकले तर मामलेतडत कोर्ट ऍक्ट खळॆ तहसीलदार यांचेकडे जमिनीचा ताबा मळणे बाबत कलम ५ खाली अर्ज करा . या अर्जावर तहसीलदार त्यांचे विवेकाचा वापर करून निर्णय घेतील अथवा आपला अर्ज नाकाररतील .
तहसीलदार यांनी अर्जावर निर्णय घेणे नाकारल्यास दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Lalsab khasagi
19-07-2021
lalsabkhasagi@gmail.com
सर माझ्या आईच्या नावाने ग्रामपंचायत मध्ये जागा आहे, मालकी हक्क ग्रामपंचायत आहे,भोगटदार आई आहे तरी त्याग जागेचे उतारे पणी पट्टी आहे 20 वर्ष जुने मला ग्रामपंचायत बाधकाम करू देत नाही,
जागा मालकी ग्राम पंचायतीची आहे असे आपण म्हणता . मात्र प्रत्यक्ष ती जागा शासनाचीच असते
फार कमी ग्राम पंचायतींनी जागा खरेदी केली आहे अथवा ग्राम पंचायतीस खाजगी व्यक्तींनी जागा दिली आहे . अशीच जागा खरेदी केलेली जागा ग्राम पंचायत खाजगी व्यवक्ती यांना देऊ शकते . अश्या जमिनीवरही बांधकाम परवानगी देणे ग्राम पंचायतीची अधिकारातील बाब आहे . बांधकाम परवानगी हा काही तुमचं हक्क होत नाही
कलम २२ ( म.ज.म .अ १९६६ ) खाली दिलेली जागा शासनाचे मालकी असते , त्यामुळे त्यावर बांधकाम करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Harshwardhan chougule
19-07-2021
chouguleharshad@gmail.com
अर्जदार यांनी सिनियर डिव्हिजन सांगली येथे प्रोबेट वरती स्टे अर्ज केलेला होता तो नामंजूर झाला .त्या नंतर अर्जदार यांनी प्रांताधिकारी मिरज यांचे कडे स्टे मागणी केली व त्यांनी स्टे दिला. जबादार यांनी तक्रार रजिस्टर फेरफार मंजूर झालेनंतर प्रांताधिकारी मिरज यांचे कडे कॅव्हेट दाखल केले आहे तरी ही ही प्रांताधिकारी यांनी जाबदार याना कोणतीही पूर्वसूचना ना देतात एक तर्फा स्टे दिलेला आहे. यावर उपाय काय आहे काय?
252. No appeal shall lie from an order––
(a) admitting an appeal or an application for review under section 251 ;
(b) rejecting an application for revision or review ; or
(c) granting or rejecting an application for stay.
फेरफार मंजूर आहे . स्टे दिला आहे . उपरोक्त तरतुदीनुसार अथगती आदेशाविरुद्ध अपील तरतूद नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैभव भोसले
17-07-2021
Vaibhavbhosale.86@gmail.com
सर, माझी सवॆ नं. मोजणी झालेली आहे. त्यातील गट पण मोजले. सव॓ गट proper आहेत. त्यात माझा ही गट आहे तो मोजला आसता तो 54-60 गुंठे एवढा आहे.पण सातबारावर त्यातील क्षेत्र 14 गुंठे एवढे आहे. सवॆ नकाशा आणि गट नकाशा सारखाच आहेत, फाळणी नकाशा सापडत नाही. शेती पुस्तक यामधे सुद्धा 4-5 गुंठे तफावत
आहे. बाकी सर्व रेकॉर्ड म्हणजे आकारबंद,गुणाकार बुक,एकत्रीकरण हे 14 गुंठे असा आहे. माझी कोट॔ कमीशन मोजणी झाली आहे त्यानी टिपण नकाशा प्रमाणे मोजून माझ्या गटाचा नकाशा तयार केला तोही 54-60 गुंठे म्हणजे गट नकाशा सारखाच आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या गटात कोणत्या दिशेस क्षेत्र देणार यावरून गोंधळ आहे कारण त्या गटामधे दुसरे हिस्सेदार नाहित. फक्त माझ नाव आहे. त्या गटामधे दुसर्याच लोकानी अतिक्रमण केले आहे त्याचं त्या गटाशी काही संबंध नाही आपली वहिवाट फक्त 7-8 गुंठे एवढीच आहे. तर हा संपुर्ण गट सरकारी फी भरून किंवा नियमानुसार संपूर्ण गट क्षेत्र सातबारावर लावता येईल का . धन्यवाद
क्षेत्र दुरुस्तीचा अर्ज मा जिल्हाधिकारी यांचेकडे करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal
17-07-2021
tarev1565@gmail.com
सर नमस्कार
माझ्या आजोबास
A व B नावाचे दोन मुले होते
C व D नावाच्या दोन मुली होत्या
1998 ते 2004 माझ्या आजोबांनी ,वडीलांनी काकानी बरंच जमिनी लोकांना विक्री केल्या मी अज्ञान होतो
मी त्यांचा A चा मुलगा माझे वय 26 वर्षे आहे आज वीस वर्षे पुर्वी सन 2001 ला मी 6 वर्षेाचा असताना माझ्या वडीलांचे भावाने म्हणजेच काकाने B ने वडिलोपार्जित जमीन 100 रू स्टम पेपर वर च्या वाटणीपञ सादर करुन माझ्या नावाने केली होती आहे असा फेरफार मध्ये उल्लेख आहे
सदरील बॉन्ड पेपर चा कुठे ही रेकॉर्ड नाही ,
जमीन वडिलोपार्जित आहे माझे 7/12 ला नाव आहे , मी शेती वाहतो ,तरी आज पर्यंत मला काही ञास नाही
तरी मला भविष्यात काही ञास होईल का ?
माझी मालमत्ता विवादीत आहे का ?
Question by RAJU GANESH SONAVANE
15-07-2021
raju23662366@gmail.com
एखादी वृध्द स्त्री, 90 वर्षे वय असलेली, जर मृत्यूपत्र करताना दोन्ही डोळ्यांनी अंध असेल, आणि वैद्यकीय अधिकारी यांनी psygically fit certificate दिले असेल तर मृत्यूपत्र प्रोबेट मध्ये रद्द होवू शकते का?
वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र चुकीचे दिले आहे हे सिद्ध करावे लागेल . मगच प्रोबेट रद्दबादल होईल
त्याच बरोबर , मिळकत केवळ मुंबई मध्ये असेल तरच probate ची आवश्यकता असते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin Patil
13-07-2021
sachu491985@gmail.com
सर,
तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयातील विविध कामांसाठी अर्ज केल्यानंतर ते काम पूर्ण हिण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा तपशील कुठे मिळेल?
प्रत्येक कार्यालयाचे दर्शनी भागावर , माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ अन्वये , नागरिकांची सनद लावली आहे . त्यामध्ये प्रत्येक कामास किती कालावधी आवश्यक आहे याचा तपशील नमूद केला असतो
तसेच सेवा हमी कायदा खाली हि प्रत्येक सेवेचा कालावधी ठरवून दिला आहे . त्या कालावधीत सेवा दिली नाही तर आपणास अपील दाखल करता येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol u surwade
12-07-2021
amolsurwade90@gmail.com
मज़े आजोबा A आणि त्याचे भाऊ B दोघां मधे 1970 मधे वाटप झाले आहे त्यामध्ये वाटपाच्या गटाच्या व्यतिरिक्त एक सामाईक गट B यांच्या वाटपाचा आहे असा अर्जा द्वारे वाटप पत्रावर उल्लेख आहे तरी उताऱ्यावर वाटपप्रमाणे सर्व गट वाटून ज्याच्या त्याच्या नावे झाले आहे तरी त्या एका सामाईक गटाची त्यांची 51 वर्षा पासून कसली फेरफार नाही त्या मुळे आता त्यांनी त्यावर तहसील साहेबा कडे अर्ज करून नोटीस बजावली आहे तर 51 वर्षा पूर्वीच्या वाटपाचे मूळ दस्ताज कुठेच नाहीये तर फक्त त्या नोंदीच्या आधारावर त्यांना तो गट दिला जाऊ शकतो का
A आणि ब् यांचे पूर्वजांची हि जमीन असेल तर , वाटप होणारच . मात्र जर त्यास आपली हरकत असेल तर , तहसीलदार वाटप करू शकणार नाहीत . त्या व्यक्तीस न्यायालयात दाद मागावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanket Ananta Dhindale
12-07-2021
sanketdhindale52@gmail.com
सर माझ्या जमिनीमध्ये 1952सली जंगल वहिवाट द्वारे काही इसामांच नावे दाखल झाली आहेत 70% क्षेत्रावर पण त्यांनी ते क्षेत्र 5 वर्षाच्या आत विकले आहे.तरीही माझ्या वशाजांची नावे त्यांच्या क्षेत्रापैकी 40% हिष्यावर चालू सात बऱ्यावर 7/12 दाखवत आहेत. जंगल वहिवाट मध्ये त्याची नावे ही चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहेत. कारण क्षेत्र बुकला माझ्या वंशजांची नावे असतानाही त्याची नावे दाखल करण्यात आली आहेत तरी त्याची नावे कमी करण्यासाठी काय करावे यावर सर आपण मार्गदर्शन करावे,ही आपणास विनंती.आपणास दिलेल्या तसदिबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासू
संकेत धिंडले
Question by Mahesh shinde
11-07-2021
mahesh243669@gmail.co
सर मला रमाई आवास आवास घरकुल बाधन्यासाठी सी ओ नी गावठान मध्ये 500 स्वे देण्यासाठी गामपंचायत व बि डी ओ यांना आदेश दिले त्या नुसार गामपंचायत यांनी मला पुरव व पश्चिम 12.5 व दशिन उतर 40 फुट जागा दिली ज्या ठिकाणी जागा दिली आहे त्या खालुन गामपंचायत पाणी पुरवठा पाईप लाईन व शेतकरी याची गे ली आहे व त्या जागेच्या वरून 11000 हजार होल्ट ची लाईची वायर गेली आहे त्या मुळे मी पुरव पश्चिम 26 व दशिन उतर 13 असे घरकुलाचे फाऊंडेशन केले आहे तर गामपंचायत म्हनते की तुम्ही जसे दिले तसे फाऊंडेशन का केले नाहीत ते काढुन टाका म्हनते ज्या शेतकरी याचे गावठान वाढीसाठी 18 गुठे गेले आहेत तो म्हणतो माझ्या हादीत घरकुल आहे तु बाधु नकोस त्याचे क्षेत्र घरकुला पासुन लाब आहे तो म्हणतो की गावठान सोडून मला 4.गुठे रान कमी पडते पंचायत म्हणते की तुमाला नोटिस काढावी लागेल माझे फाऊंडेशन झाले आहे काय करावे मार्ग दर्शन करावे
Question by विलास नवगिरे
11-07-2021
vilasnavgire@yahoo.com
नमस्कार सर,
मी फेब्रुवारी 2012 मध्ये केसनंद पुणे येथे एक गुंठा प्लाट खरेदी खत करून घेतला होता. परंतु 7/12 करणे बाकी आहे. 7/12 करण्यासाठी मला काय करावे लागेल?
जवळच्या व्यक्तीच्या नावे बक्षीस पत्र केल्यास 7/12 होतो का?
केसनंद येथे जमीचा ७/१२ आहे कि मिळकत पत्रिका आहे ?
७/१२ असेल खरेदी दस्त संबंधित तलाठी यांचेकडे सादर करा . ७/१२ अन्य कायदेशीर निर्बंध नसतील तर आपल्या नावावर मिळकत होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश इंगळे
10-07-2021
Ingale.rajesh.rajesh@gmail.com
नमस्कार,
माझे आजोबा २००७ मदे वरले आज पर्यंत आमच्या वाटणी झालेली नाही मला एक प्रश्न असा आहे की माझे आजोबा चे बँक खाते आज पर्यंत चालू आहे आणि माझे काही चुलते त्या खात्याचं आजुन वापर करत आहे आणि माझा आजोबा चा नावा वर पीक विमा बरून पैसे उचलत आहे हे शासन सोबत धोका आहे का ? आणि या गुन्हाची नोंद कुठे करायची?
बँक ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे त्याठिकाणी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
