जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अमोल ठाकरे
18-05-2021
sonuamol1982@gmail.com
सर मी आदिवासी जमातीचा असून मला आदिवासी व्यक्ती कृषी जमीन (1966 36 अ) विकण्यास तयार आहे तर त्यासाठी
1)कोणाचीपरवानगी घ्यावी लागेल?
2) त्यासाठी काही नजराणा रक्कम भरावी लागेल का?
3) ती कृषी जमीन घेतल्यास ती बिनकृषी (NA) करता येईल का?
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
१. आपणास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल .
२. नजराणा नाही मात्र , खरेदी किंमत ( मिळकतीचे बाजार मूल्य ) भरावे लागेल .
३. जमीन बिन शेती करता येईल . मात्र बिन शेती केली म्हणून अन्य बिगर आदिवासी व्यक्तीस विक्री करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
काही करत बसू नका . गायरान जमीन हि गावातील गुरांसाठी चरण्यासाठी शासनाने दिलेली जमीन आहे . ती प्रत्येक गावात , लागवड्डीलायक क्षेत्राच्या कमीत कमी ५ % असण्याचे बंधन आहे .
जरी एखाद्या व्यक्तीचा त्यावर ताबा असेल अथवा कसत असला तरी तो अनधकृत ताबा /अतिक्रमण आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
Question by अजिंक्य नारळीकर
01-05-2021
naralikarajinkya32@gmail.com
सर आमच्या सामाईक 7/12 मध्ये महाराष्ट्र वन आहे त्यात माझ्या चुलत भावाने कोणाचीही परवानगी न घेता बोरवेल व घरभाट नोंद करून घेतली आहे.
1)महाराष्ट्र वन जमिनीत अशी नोंद करता येते का?
2)ती नोंद अथवा फेरफार कसा रद्द करावा?
अश्या जमिनीत वनेतर कामास बंदी आहे . फेरफार रद्द करण्यासाठी प्रांतधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय साठे
01-05-2021
dattasathe10@gmail.com
माझ्या आजीला फसवूण कुलमुख्तारपत्र बनवून तिच्या वाट्यावरील संपूर्ण जमिन एका इसमाने स्वःताहाच्या मुलाच्या नावे २५/१२/२०२० रोजी नोंदणीकृत दस्ताने केली आहे. आम्हास जमिन विकायचीच नव्हती. तर आम्हास काय करावे लागेल? कोणाकडे अर्ज करावा लागेल?
जर कुलमुखत्यारपत्र फसवणूक करून घेतले आहे तर ते व त्या आधारे करण्यात आलेलं खरेदी दस्त न्यायालयाकडून रद्द करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उपेश सोनटक्के
23-04-2021
Upeshlaxman@gmail.com
माझ्या काकाला 1 एकर शेती आहे व ती शेती त्यांना विकायची आहे पण शेती विकले तर ते भूमिहीन होणार मग गावचे तलाठी म्हटले की कोणत्याही शेतकरी ला भूमिहीन करता येणार नाही असा कायदा आहे। पण त्याच्या दोन्ही किडनी खराब झाली असून त्यांना आपल्या उपचार साठी पैसे नाहीत व शेती ते काम करू शकत नाहीत। मग शेती विकायची कसे क्रुपया सांगा
Question by Gopal chim
20-04-2021
gopalchim@gmail.com
नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे . .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर बाबांच्या नावाने वेगळा 7/12 कसा मिळेल
१. २ गुंठे क्षेत्र हे बिगर शेती जमीन वापर विभागात असणे आवश्यक आहे . अथवा नगर पालिका हद्दीत असणे आवश्यक आहे . जर नसेल तर जमीन वाटपामुळे जमीनीचा तुकडा निर्माण होणार असेल तर अश्या जमीनीचे वाटप पत्र होणार नाही .
२. मात्र जर मिळकत बिगर शेती जमीन वापर विभागात असेल तर , आपण न्यालयात आपले हिस्से निश्चित करून त्याचे वाटप करण्याचे आदेश देणे व हिस्स्यानुसार , जमिनीचे वाटप जिल्हाधिकरी यांनी दिवाणी संहिता कलम ५४ प्रमाणे वाटप करून मिल्ने , या बाबतचा हुकूम /आदेश मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा ..
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदेश
19-04-2021
aadiraut93@gmail.com
आजोबांनी गावातील बखळ जागा वडिलांच्या नावे केली आहे. त्या जागेच्या कागदपत्रांवर सिटी सर्व्हे नंबर आहे, पण त्या कागदपत्रांवर कुठेही ग्रामपंचायत मिळकत क्रमांक नमूद केलेला नाही, यावर काय करावे लागेल?
एखाद्या गावाचा कलम १२२ खाली सर्वेक्षण झाले कि त्यास सिटी सर्वे नम्बर मिळतो व त्याचे मिळकत पत्रिका तयार होते . त्यावर ग्राम पंचायत क्रमांक नमूद नसतो .
आपण ग्राम पंचायतीकडे आपल्या मिळकतीचे आकारणी ( घरपट्टी ) केली आहे का ? केली असल्यास , मालमत्ता आकारणी नोंदवही मध्ये मिळकत क्रमांक नमूद असतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prakash munde
16-04-2021
mundep6@gmail.com
आमचे नाव पीक पाहणी लागले आहे तर आम्हाला मालकी हक्क साठी काय करता येईल
पीक पाहणीला नाव लागले म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक होऊ शकत नाही
पीक पाहणी म्हणजे त्या पीक हंगामात आपण दुसऱ्याची जमीन कसली
सध्या ७/१२ सदरी नाव लावले जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh Bhandari
14-04-2021
ganeshbhandari1122@gmail.com
Sir mi 26 Varshancha aahe. Majhe vadil Mi 2 Varshancha Astana Gharatun Nighun gele aahet. Tya veles FIR dakhal kele navhte. Tyanchya navavar gavakade ek plot aahe. To Varsa hakkane Milavnyasathi kay karave lagel. Ani tya sathi kiti kalavadi lagel?
भारतीय पुरावा कायदा १०८ नुसार एखादी व्यक्ती बद्दल ७ वर्ष काहीच माहित नसेल तर , ती व्यक्ती मयत आहे असे मानण्यात यावे ,
मात्र एखादी व्यक्ती मयत ( अश्या कारणांमुळे ) आहे , हे न्यायालयाने जाहीर करणे आवश्यक आहे .
पुरावा म्हणून missing complaint दाखल के;लेली असणे आवश्यक आहे .
आता दाखल करा . ७ वर्षांनी आपणास न्यायालयाकडून declaration घेता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gopal chom
11-04-2021
gopalchim@gmail.com
नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट (NA36)आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे .बाबाना आपल्या हिश्याची जमीन विकायची आहे .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर ती जमीन विकू शकतो का ?
किंवा वेगवेगळे 7/12 बतील का ?
Question by Ashfaque Patel
10-04-2021
patelashfaque@gmail.com
वर्ग 2 ची ज़मीन जी 6 ब मध्ये मोडते मात्र महार वतन नाही व त्याला आकारणीच्या 3 पट कब्जेहक्काची रक्कम घेऊन पुनरप्रदान केलेले आहे.अता ती ज़मीन उर्वरीत रक्कम आकारणीच्या 10 पट घेऊन शेतीपरियोजना साठीच वर्ग एक किंवा जुनी शर्तीने केली जाऊ शकते का?
Question by शुभम प्रकाश पाटील
10-04-2021
sp9168810173@gmail.com
नमस्कार , सर माझा प्रश्न असा आहे की , दुय्यम निबंधकांकडे धाव न घेता सख्या भावाची जमीन त्याच्या संमतीने व राजीखुने आपल्या नावावर करता येते का? कारण दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावून बयनामा / जमीन नावावर करून घेण्याची आमची ऐपत नाही.
महाराष्ट्र मुंद्रणक अधिनियम १९५८ च्या कलम ३ अन्वये दस्त हा योग्य त्या शुल्काणे मुन्द्रांकित असणे आवश्यक आहे . तसेच नोंदणी कायदा कलम १७ अन्वये नोंदणीकृत करणे आवश्यक आहे . या प्रक्रयेतून जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोशन विशे
09-04-2021
roshanvishe991@gmail.com
मा. महोदय साहेब
माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने मयत झाले आहे . एक जमीन आहे २६ गुंठे ची भातशेती आहे. गेली २५-२६ वर्षे माझे वडील भातशेती करून राबत आहेत. ती भातशेती जमीन भावहिस्सा म्हणून माझे वडिलांना देण्यात येणार होती, परंतु ती जमीन वडिलांच्या काकाचे नावे आहे. ते वडिलांचे काका मयत असून ती जमीन सध्या त्या वडिलांचे काकाच्या वारसाचे नावे आहे. तर ती जमीन मला भावहिस्सा म्हणून माझ्या नावे कशी कशी मिळवता / करता येईल ?
Question by मयूर शेळके
09-04-2021
mayurshelake1313@gmail.com
आदरणीय सर.
माझ्या वडिलांचे नावे एक जमीन आहे तर त्या जमिनीच्या 7/12 खातेउताऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीचे नाव लागले आहे त्या नावाची व्यक्ती कोणीही नाही तर त्यांचे नाव कमी करण्यासाठी काय करावे
अज्ञात व्यक्ती मयत असल्याकजे सिद्ध झाले तर जमीन शासनाकडे जाणार .
आपण काही करून उपयोग नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊसाहेब राजवाडे
05-04-2021
rajwadebhausaheb@gmail.com
सर नमस्कार,
एकतर्फी विभागीय चौकशी दरम्यान कर्मचा-यास सुनावणी तारखा कळविणे व बडतर्फ केल्याबाबतचे आदेश तामील करणेबाबतची कार्यपध्दति बद्दल मार्गदर्शन करणेस विनंती आहे.
धन्यवाद
Question by रोहिदास सखाराम पाबळे
05-04-2021
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर ७/१२ वरील इतर अधिकारात कुल कायद्याने प्राप्त जमीन कु.का.क्र ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ताप्रकार जमीन मालक यांना रु.१०८२ हे १२ हप्त्यात मिळणेचे आहे असा शेरा आहे तरी सदर शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल
हि जमीन कुल कायद्या अंतर्गतची आहे
कुळाचे नावे ३२ग किंमत झाली आहे . मात्र अजून कुळाने पैसे भरले नसल्याने तो शेरा अजून राहिला आहे
पैसे जमा केली कि आपणास ३२म प्रमाणपत्र मिळेल . त्या आधारे इतर हक्कातील शेरा कमी होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद चौधरी
02-04-2021
vpchaudhary1@rediffmail.com
सर नमस्कार माझे आजोबांना कुळ कायद्यात 5 एकर जमीन मिळालेली आहे..माझे वडिल एक काका आणी एक आत्या अशी तिघे भावंडे खुप लहान असतांनाच आजी मयत झाली. त्यामुळे आजोबांनी दुसरे लग्न केले त्यानंतर त्यांना सावत्र आजीपासुन 3 मुले व 3 मुली अशी सहा अपत्य झाली. नंतर आजोबा वारल्यामुळे वारसाने 1पत्नी 5मुले व 4मुली अशी एकुण वारसनावे लागलेली आहेत... आता सावत्र आजी मयत झाली...त्यानंतर माझी सख्खी आत्या ही मयत झाली ..सख्खे काका तर जवळपास 25 वर्षापासून बेपत्ता आहेत त्यामुळे वडील एकटे पडलेत आणी सावत्र 3 काकाचा जमीनीवर कब्जा आहेत सावत्र असल्याने त्याच्यांशी नेहमी वाद होत असतो वडीलांचे म्हणण्यानुसार वडिल पहिल्या आईचे असल्याने त्यांना जमिनीचा 50% हिस्सा मिळाला पाहिजे..तसे असेल तर तो कायदेशीर कसा मिळु शकतो याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ..
हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १६ नुसार , अनौरस मुलानांही मिळकत मध्ये पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांइतकाच हक्क आहे . सर्व मुलाना सामान हक्क आहे . आपले म्हणणे चुकीचे आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनिल विठ्ठल गेडाम
01-04-2021
sunilgedam78@gmail.com
सर
मृत्युपत्र असताना मृत्युपत्र करणाऱ्या अगोदर जर ज्याच्या नावाने मृत्युपत्र आहे तो मरण पावला व मृत्युपत्र मध्ये काहीच बदल केला नाही.आणि तो नातलग पण नाही तर काय करावे
मृत्यपत्राला काही उपयोग नाही . मृत्युपत्राप्रमाणे जमिनीची विल्हेवाट होणार नाही . वारस कायद्यप्रणे वाटप होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Avinash kasar
01-04-2021
Avinashkasar1978@gmail.com
सर 1941 साली माझे आई चे आजोबा वारलेत त्या नंतर वारस म्हणून आई चे 2 मामा व अपाक आई चे म्हणजे आजी चीम उताऱ्यावर नोंद झाली. तसेच 1 मामा वारला म्हणून त्याचे 2 मुली व1 मुलगा अशी नोंद मामी ने केली 2 मामा हा परगणदा आहे आणि मामी ने 1 मामा चा मृत्यू नंतर दुसरे लग्न केले परतू त्या मुलाची जन्म तारीख व बापाची मृत्यू तारीख शंका आहे तो13 महिने12 दिवस इतका फरक आहे व त्या मुलांना आमची आजी अजून पर्यंत अपाक म्हणून आहे परंतु आजी अनपड असल्या मुळे आमच्या आई ची नोंद केलीच नाही ही बाब आम्हला आता लक्षात आली आमची आई वारली असून तिच्या मृत्यू दाखल्यावर व पॅन कार्ड वर आजी आजोबांचे नाव आहे।आम्ही वारस नोंद साठी तहसिल कडे व आजू बाजूकडीलआजी चे भाऊबंद यांचे जवाब घेवून अर्ज100 च्या बॉण्ड करून सादर केलं आहे तर आमच्या आई ची व आमची वारस नोंद होईल का आमच्या आई चे वारस म्हणून मामी ने लपवले आहे तसेच त्या मुलाचे नाव कमी होईल का आम्ही लेट झालो तरी लेट फी भरण्यास तयार आहोत कृपया मार्गदर्शन करावे
केवळ आपले आई ची नोंद होऊ शकते . उशीर झाला म्हणून आई चा हक्क कोणी हिरावून घेउ शकत नाही , आपण प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dattatray Ghadge
31-03-2021
dattatryaghadge1995@gmail.com
माझ्या आईचे वडील 2017 ला मयत झाले आहेत आणि माझी आई पण 2007 ला मयत झाली आहे माझ्या आईला दोन भाऊ आणि एक बहीण आहे सातबाऱ्यावर इतर अधिकार मध्ये माझ्या आईचे व तिच्या बहिणीचे पण नाव नमूद नाही तर नवीन कायद्यानुसार आईच्या वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मागता येतो का
२००५ च्या सुधारणा कायद्याने मुलींना मुलांइतकाच मिळकतीत समान हक्क दिला .. आपली मिळकत २००५ पूर्वी तिचे वाटप झालेले नाही . वारसा कायद्याने आपली आई व मावशी हिचे नाव लागलेले नाही .
त्या दोघींचे म्हणजे त्याचे वारसांचे नाव लागू शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pruthvi Takale
30-03-2021
Pruthvi Takale2@gmail.in
सर आमच्या आजोबांनी 1998 साली चार एकर दोन गुंठे जमीन घेतली होती तर ती वर्ग दोनची जमीन आहे ती महार वतन जमीन आहे सदरची जमीन 1998 साली खरेदी केली होती त्याचा सातबारा उतारा सर्व माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणिआजोबंनि जमीन विकत घेतली होती त्या माणसाने आमच्यावर केस दर्ज केली आहे की यांनी आमची जमीन फसवून घेतलेली आहे तर आता मी काय करावे सांगा
जर अशी वस्तुस्थिती नसेल तर घाबरण्याचे कारण नाही . खरेदी खत न्यायालयाने रद्द करावे लागते .
केस केली म्हणजे त्याने फौजदारी दावा न्ययालयात केला आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप यशवंत पवार
30-03-2021
sandeeppawar211979@gmail.com
पत्नी च्या नावाने सात बारा असेल तर पतीचे नाव सहहिससेदार म्हणून दाखल करता येईल का
Question by Abhinandan bhosekar
30-03-2021
abhinandan.bhosekar11@gmail.com
सर आमचे अत्याचे 2016 साली हक्कसोड पत्र झाले आहे पण अजून नोंद झाली नाही तर आपण अजून किती वर्षापर्यंत नोंद करून घेऊ शकतो, किंवा त्याला काही मुदत असते का
नोंद केव्हाही होऊ शकते . नोंदणीकृत हक्कसोड पत्रकास मुदत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप यशवंत पवार
30-03-2021
sandeeppawar211979@gmail.com
पत्नी च्या नावाने सात बारा असेल तर पतीचे नाव सहहिससेदार म्हणून दाखल करता येईल का
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
