जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Shrikant Thakare
30-03-2021
svthakare74@gmail.com
आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या नावावर असलेले शेअर सर्टिफीकेट माझ्या नावावर झाले असून आता मला घरपट्टी माझ्या नावावर करायची आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल.
आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहता , त्या ठिकाणी अर्ज करा . शेर सर्टिफिकेट छायाप्रत जोडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रामेश्वर जाधव
27-03-2021
rameshwar.jadhav.142@gmail.com
सर माझा एक प्रश्न आहे की सन 1988 मध्ये खरेदी विक्री व्यावहार झाला आहे पण ती जमीन पहिल्या मालकाला वारस हक्का मधुन आलेली आहे व ते 2 भाऊ 4 बहीणी पण आहेत व त्यानी जमीन 1988 मध्ये विकली आहे . पण आज 7 / 12 वर ईतर अधिकारात फेर क्रमाक लिहला आहे व त्या क्रंमाक वरून जर फेरफार काढला असता त्यात वारसाचे नाव दाखात आहे पण आज मला ती जमीन विक्री करायाची आहे व खरेदीदाराला वारसने पुढे काही प्रोब्लम येऊ शकतो क्यकरून ते नावे वारस हक्कातुन कमी कसे करता येतील क्रुपाया माहीती द्या सर
ज्या इसमाकडून आपण जमीन खरेदी केली आहे , त्याला त्याच्या हिस्स्याची जमीन मिळालाय असेल व ती त्याने विकली तर कोणतीही अडचण अन्य वारस यांनी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
मात्र विक्रेता हा ए कु पु होता व त्याने सर्वांची जमीन आपणास विकली असेल तर , त्या अन्य वारसांचा हक्क त्या मिळकतीत आहे .
मालमत्ता हस्तांतरण कायदा अन्वये मिळकत विक्रेत्याला विक्री करण्याचा हक्क आहे , त्याचे title वाद विरहित आहे हे सांगण्याची जबाबदारी , विक्रेत्याची आहे . title defective असून हि आपण घेणाऱ्यास न सांगता विक्री केली तर , वारसांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , घेणाऱ्यास काही प्रॉब्लेम येणार नाही मात्र आपणाकडून जमिनीचे मूल्य ( वारसांच्या हिश्य्याचे ) , व्याजासह वारस यांना परत करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sijauddin r muja
27-03-2021
Sijauddinm786@gmail.com
मुस्लिम कुटुंबामध्ये joint family system येत नाही.
परंतु revenue record ला 7/12 सदरी एकुप अशी नोद आहे . कुळ कायदा 32ग दाखला कुटुंबातील elder person च्या नावे देण्यात आले . सर माझा प्रश्न असा की revenue record व muslim law मध्ये तफावत का दिसुन येते ?
Question by संदीप कुलकर्णी
27-03-2021
sskulkarni1976@gmail.com
सर एक गरीब अपंग व दारीर्द्यरेशे खालील कुटुंब झोपडीवजा घरात 1952 पासून रहात आहे आज मितीस ते घरपट्टी भरत आहे.परंतु ते मोडकळीस आलेले घर त्यांना बाधावयाचे आहे पण सदर जागा दुसर्या च्या मालकीची निघाली आहे त्या कुटुंबात कोणतीही गावात दुसरी जागा नाही. तरी मार्गदर्शन व्हावे. सदरचे जागा मालक आपल्याच महसुल विभागाचे सेवानिवृत्त सर्कल आहे.
ज्या घरास बांधकाम परवानगी दिलेली असेल त्याच घरास दुरुस्तीची परवानगी मिळेल . नियोजन प्राधिकरी , ज्याचे नावे जमीन असेल त्यालाच , नवीन बांधकाम परवानगी अथवा दुरुस्थी परवानगी देऊ शकतात
मिळकतीचे /जमिनीचे मालकी हक्क जो पर्यंत झोपडीधारकाचे नावे नसतील तो पर्यंत परवानगी मिळू शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश चौरेवार
25-03-2021
pkchourewar@gmail.com
साहेब, पुनर्मोजणी योजने अंतर्गत नकाशा चुकीचा आहे .
वडिलोपार्जित लगतचे 2 सर्वे न सामुहिक असताना शेतातील पाण्याचा ओढा निघण्याकरिता सोयीनुसार बांध बांधला पण पुनर्मोजणी मध्ये त्याच बांधा ला शेतीची हद्द दाखवून नकाशा बनविला व बांधाच्या दुसऱ्या बाजूची जमीन दुसऱ्या सर्वे न मध्ये दाखवली . आता तो सर्वे न जमीन वाटणी मध्ये आजोबांच्या भावाला मिळाला व कमी आकराच्या सर्वे न अजोबला मिळाला. अधिकार अभिलेक मध्ये आराजी 4.20 हे आ आहे पण मोजणी मध्ये 3.53 हे आ भरते. सध्या शेतमोजनी पुनर्मोजणी योजने चा नकाशा ग्राह्य धरून करण्यात येते तर पुनर्मोजणी नकाशा दुरुस्ती साठी काय करावे लागेल.
Question by प्रवीण चाळके
25-03-2021
pravinchalke047@gmail.com
सर,माझ्या शेता ला लागुन असनारे आठ एकर शेती पैकी एक एकर विकत घेता येईल का . त्या करिता उपल्बद शासन निर्नय कोनता तो शक्यतो कळवा किंवा द्या ही विनंती
जमीन विकणे हा त्या संबंधित व्यक्तीचा अधिकारी आहे त्यामुळे त्याने जमीन विकावी किंवा नाही ही याबाबत शासन कोणताही आदेश देऊ शकत नाही . अशा प्रकारचा शासन निर्णय नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील कालगावकर
24-03-2021
nilkalgaonkar207@gmail.com
माझ्या आजोबांनी १९९७ मध्ये १२गुठे पैकी दोन गुंठे चतुर्थी सिमा टाकुन खरेदी दस्त केली आता त्या ठिकाणी ६ गुंठ्यात घरे झालेली आहेत व जमीन विक्री करणाऱ्या व्यक्ती च्या मुलाने तुकडे बंदी कायद्या विरोधात व्यावहार हा आक्षेप घेतला आहे ,त्याबद्दल काय करु
Question by निलेश देशमुख
24-03-2021
nil241986@gmail.com
दोन मुलांपैकी एक मुलगा मानसिक असल्यास वडील मृत्यपत्र करू शकतात काय
Question by MUJAWAR ALTAB TAIYYAB
21-03-2021
altabmujawar976@gmail.com
सातबारा सदरी इतर हक्कात ३००० इ. क. प. घे असे येत आहे त्याचा अर्थ काय
Question by MUJAWAR ALTAB TAIYYAB
21-03-2021
altabmujawar976@gmail.com
Sir, आमची इनामी वडिलोपार्जित जमीन आहे पण त्यात मोठ्या काकांचे नाव आहे व त्यांच्या मुला -मुलींची नावे आहेत. (मोठे काका-माझे वडिल व धाकटे काका वारले आहेत) (माझ्या वडिलांचे व धाकट्या काकांचे नाव नव्हते तर आमचे नाव सातबारे उतारेवर लागू शकते का? योग्य मार्गदर्शन करा सर.
इनाम जमीन आपल्या आजोबांना पुनर्प्रद्दन झाली होती का? अथवा इनाम जमीन आपल्या चुलत यांना पुनरप्रदान झाली होती याबाबतची माहिती जुने फेरफार पाहून माहीत करून घ्या. जर इनाम जमीन आपल्या आजोबांना मिळालेली असेल तर निश्चितच त्यामध्ये आपल्याचुल्त्यांसह आपल्या वडिलांचा त्यामध्ये हक्क आहे. आजोबांच्या मृत्यूपश्चात जमीन पुनर प्रदान होता ना, जमिनीच्या नजराना आपल्या चुलत्यांनी शासन जमा केला असेल अथवा आजोबांच्या मृत्यूपश्चात वारस म्हणून नोंद होताना चुलत्यांनी केवळ त्यांचे वारस म्हणून नाव लावून घेतलेले असावे. सदरचा फेरफार आपण माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिलाद्वारे अह्वणीत करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील काळगावकर
20-03-2021
nilkalgaonkar207@ gmail. Com
महोदय,
जर (९८) गट सरकारी रस्ता लगत आहे. त्याच्या आतल्या (९९)गटाकडे खाजगी वाट आहे.ती वाट ९८ गट क्रमांकातील शेतकरी वहिवाट दाखवुन सरकारी करु शकतात काय?
गट नंबर 99 मध्ये जाण्यासाठी जर परंपरागत गट नंबर 98 मधुन जर रस्ता असेल, तर मामलेदार कोर्ट ॲक्ट खाली आपल्याला तो रस्ता आढवता येणार नाही. मात्र जर पूर्वांपार रस्ता नसेल तर आपल्या गटामधून वहिवाट दाखवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर दिलीप टिंगरे
18-03-2021
dnyaneshtingre@gmail.com
खरेदी निरर्थक असा फेरफार इतर हक्कात आहे तो काढण्यासाठी काय करावे लागेल , कुळाने जमीन खरेदी करण्यास असहमती दर्शवली होती
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये एखाद्या कुळाने शेत जमीन खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली यास अशा जमिनीची विक्री निरर्थक ठरते. मात्र विक्री किंमत निरर्थक ठरल्यावर अशी जमीन ही शासन जमा होणे आवश्यक आहे. व प्राधान्य यादी प्रमाणे तिचे वाटप तहसीलदार यांच्या कडून होणे आवश्यक आहे.
आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने असे दिसून येत आहे की आपण त्या मिळकतीचे जमीन मालक आहात मात्र कुळाने खरेदी किंमत भरण्यास असमर्थता दर्शवली यावर जमीन शासन जमा न करता व तिचे प्राधान्य यादी प्रमाणे वाटप न करता आपले नाव सातबारा सदरी राहिलेले आहे व कुळाचे नाव कमी झालेले आहे. आपण सदरचा शेरा काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास, जमीन शासन जमा होऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुनिल
18-03-2021
sunilpuri0808@gmail.com
मुलगा आणि एक मुलगी आहे.त्यांनी तलाठी यांच्याकडून वारसाहक्क फेर नोंद करून त्यांचे वारसा हक्काप्रमाणे सामाईक क्षेत्र म्हणुन नोंद केली आहे तशी आता सातबारा उताऱ्यावर पत्नी, मुलगा, मुलगी या तिघांची नोंद झाली आहे.असे की आता पत्नी व मुलगी यांना सामाईक क्षेत्रातुन स्वत:चा हक्क सोडून वारस उर्वरित मुलगा यांच्या हक्कात सोडवयाची आहे तर असे हक्कसोड पत्र रु.100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून तलाठी यांना फेर साठी दिल्यास चालतो का? व तसे कोणत्या नियमानुसार करता येईल याची सविस्तर माहिती द्यावी. विनंती.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम च्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 52 अन्वय, भाऊ मुलगा बहिण यांच्या लाभा मध्ये हक्क सोडून दिल्यास त्याबाबत दस्त करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दोनशे रुपये मुद्रांक शुल्क आवश्यक आहे. व अशा दस्ताची नोंदणी होणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran vidhate
17-03-2021
kiranvidhate34@gmail.com
सर 1950 साली माझ्या आजोबाच्या नावावर जमीन होती उतारया वर आकारी पडीत असा उल्लेख होता...पण 1972 साली ती आजोबाची जमीन फक्त माझ्या मोठ्या चूलत्याच्या नावावर झाली..आम्ही इतर चार जण आहोत ज्यांना जमीनीत वाटा भेटला नाहि आम्ही आता काय करावे...
आजोबांच्या मृत्यूपश्चात आपल्या चुलत्याने वारस नोंद होताना अन्य वारसांची नावे न लावता केवळ स्वतःचे नाव वारस म्हणून लावलेले आहे. व पर्यायाने सातबारावर ती आता केवळ चुलत्याची अथवा त्याच्या वारसांची नावे असल्याची दिसून येत असेल. जर जमीन जर आपल्या आजोबांची असेल तर आजोबांच्या मृत्यूपश्चात त्यांना जेवढे वारस होते त्या सर्व वारसांची नावे सातबारा सरी लागणे आवश्यक होते.
ज्या फेरफार आने केवळ आजोबांच्या मृत्यूपश्चात आपल्या चुलत याचे नाव लागलेले आहे त्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण आपली दाखल करा. प्रश्न यामध्ये एवढाच आहे की 1972 स*** आपल्या चुलत यांचेच नाव लागलेले आहे आज या गोष्टीला तब्बल पन्नास वर्षे झाले आहेत. त्यामुळे एवढ्या उशिरा अपील दाखल करून घेण्याबाबत विलंब तत्वाची बाधा येऊ शकते. मात्र आपण आपल्या समवेत विलंब माफीचा अर्ज दाखल करा. व विभागीय अधिकारी यांना विनंती करून प्रथम विलंब माफीचा अर्ज वरती निर्णय करून आपले अपील दाखल करून घेण्याबाबत विनंती करा. मिळकतीमध्ये निश्चितच आजोबांची वारस म्हणून आणून आपला हक्क आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Tanaji Navghare
17-03-2021
tanajinavghare123@gmail.com
आदरणीय साहेब, माझा प्रश्न हा आहे की आमचा चुलता, आणि आमच्या चुलतभाऊ यांच्या नावे परभणी येथील गट क्रमांक 63 मध्ये एकूण 6 एकर सामायिक कोरडवाहू जमीन आहे. तर ती शेतजमीन 1966 च्या 85 क्रमांक आर्जा द्वारे माझ्या नावे करता येईल का?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1995 अन्वये सामायिक जमिनीचे वाटप करण्याची तरतूद आहे. मात्र अशा जमिनीमध्ये जे सहज धारकांचा हक्क आहेत त्यांच्यामध्ये कोणताही वाद नसणे अपेक्षित आहे. हा वाद म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काबाबत अथवा जमिनीतील हिस्सा बाबत कोणताही वाद असू नये. जर वाद नसेल तरच अशा जमिनीचे वाटप तहसीलदार यांच्याकडे कलम 85 अन्वये होऊ शकते. यासाठी सह धारकांनी संयुक्त अर्ज तहसीलदार यांच्याकडे करणे आवश्यक आहे.
जमिनीच्या मालकी हक्काबाबत अथवा त्यामध्ये याबाबत वाद असल्यास आपणाला दिवाणी संहिता प्रक्रिया कलम 54 अन्वये दिवाणी दावा दिवाणी न्यायालयात दाखल करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितेश दिपक मेश्राम
15-03-2021
niteshmeshram91com@gmail.com.
नमष्कार सर,
आदिवासींची जमीन गैर आदिवासी कब्जा केली आहे सर, ती जमीन मला मिळवायची आहे तो 26,2,2020 ला गोंडगवारी म्हणून मा.उपविभागीय अधिकारी केळापूर येथून जात प्रमाणपत्र काढला आहे,व तो अगोदर आदिवासी नव्हता आजपण तो आदिवासी नाही आहे तर त्याचा जात प्रमाणपत्र रद्द करायचा आहे तर मी कुणाला दाद मागू शकतो ? मी अनुसूचित जमाती पडताळणी आफिस अमरावती येथे ही दाद मागितली पण मला न्याय मिळालं नाही मला समोर के करावे लागेल, व मला कोणाला न्याय मागावे लागेल तो कृपया मला सांगा, ही विनंती.
जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत जात पडताळणी समितीचा निर्णय हा अंतिम समजला जातो. आपल्या प्रश्नावरून ज्या बिगरआदिवासी व्यक्तीने आदिवासी समाजाचा जातीचा दाखला काढलेला आहे त्या दाखल्याच्या वैधतेबाबत जात पडताळणी समिती अमरावती येथे प्रकरण प्रलंबित आहे. जोपर्यंत जात पडताळणी समिती त्यावर कोणताही निर्णय देत नाही तोपर्यंत आपणाला काही करता येणार नाही. जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर जर ती व्यक्ती आदिवासी नाही असे सिद्ध झाले तरच आपणाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36व ३६ अ अन्वय त्यावर कारवाई करणे बाबत तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गजेन्द्र माळी
13-03-2021
sachinmali6641@gmail.com
माझ्या आईला भाऊ नाही माझी आई आणखी दोन मावश्य्या आहेत 40ते45वर्षा पुर्वी माझे आजोबा वारले त्या वेळेस चुलत मामाने पाणी पाजन्यासाठी माझ्या आजी कडुन दम दाटी करून 5एकर जमीन नावे करून घेतली व ती जमीन आम्ही त्यांना वहीवाटु देत नाहीत तर ती जमीन चुलत मामाने त्याच्या मुलाच्या नावाने केली आहे यात आपण काय करू शकतो का
आपल्या आईने चाळीस पन्नास वर्षांपूर्वी जर जमीन तिच्या चुलत भावाच्या नावे अथवा आपल्या चुलत मामाच्या नावे केली असल्यास त्याच वेळी त्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकी बाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. या गोष्टीला सद्यस्थितीत पन्नास वर्षांहून अधिक काळ गेलेला आहे त्यामुळे आपल्या आईची फसवणूक झाली ही बाब सद्यस्थितीत सिद्ध करणे खूप कठीण होईल.
मात्र आपल्या म्हणण्यानुसार जमिनीचा ताबा आजही आपल्याकडे आहे. याबाबत आपण Adverse- possession या तत्वाचा आधार घेऊन दिवाणी न्यायालयामध्ये वीस वर्षांहून अधिक काळ जमीन कशात असल्यामुळे अथवा जमिनीचा ताबा असल्यामुळे आपल्या आईला या मिळकतीचे मालक म्हणून घोषित करावे यासाठी चा दावा आपण दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतु सांबय्या नलगुंठा
12-03-2021
santunalgunta@gmail.com
साहेब माझा समस्या अशी आहे माझे आई वडील आजोबा शेतकरी आहे त्यांच्या नावाने शेती आहे मी शिक्षक आहे मला 0.14आर शेत जमीन (वर्ग -1)खरेदी करता येते का सर
आपण शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्यामुळे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदीनुसार आपणही शेतकरी आहात. त्यामुळे आपणास शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकते त्याआधारे आपण शेत जमीन खरेदी करू शकता. आपली शेतजमीन या तालुक्यामध्ये आहे या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे आपण शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करा. व प्राप्त शेतकरी दाखल्याच्या अनुषंगाने आपण शेत जमीन खरेदी करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आस्तिक वनवे
12-03-2021
astikw@gmail.com
सर,
जर आपण एखाद्या शेतजमीनीच्या गट क्र. मधिल काही हिस्सा खरेदी केला असल्यास, उर्वरित हिस्सा जर ती व्यक्ती विकत असेल तर त्याने आधी आपल्याला प्राधान्य देने गरजेचे आहे का?
शेजारच्या व्यक्तीने जमीन विक्री करताना आपणाला प्राधान्य द्यावे अशी कायद्यामध्ये तरतूद नाही. तथापि विक्री करण्यात येणारी जमीन ही महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याच्या अनुषंगाने निश्चित केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची असे तर असा Fragment (तुकडा) शेजारच्या मिळकत धारकाला विकणे अपेक्षित आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
12-03-2021
kdgedam721@gmail.com
Question by कवडू दौलत गेडाम
11-03-2021
kdgedam721@gmail.com
आदिवासींची जमीन आदिवासीला रजिस्टर खरेदीने विनापरवानगी विकल्यावर परत मिळेल काय?
आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन ही बिगर आदिवासी व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय विकता येत नाही . विनापरवाना जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासी व्यक्तीकडे झाल्यास, अशी जमीन पुन्हा आदिवासी व्यक्तीस मिळू शकते. त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे जमीन चा ताबा मिळण्यासाठी अर्ज करावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिलीप नामदेव लोंढे
11-03-2021
srinathbuildcon@gmail.com
बिगर शेती झालेली जमीन असेल अणि त्या मध्ये सोडलेली ओपन जागे मध्ये जर कोणी घरचे बांधकाम करीत असेल तर सदर तक्रार कोणा कडे करण्याची आहे. कृपया माहिती मिळावी ही विनंती.
नियोजन प्राधिकरणाने अथवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या अभिन्यासामध्ये( लेआउट मध्ये) ज्या जागा मोकळी जागा अथवा ओपन स्पेस तसेच रस्ते यासाठी ठेवलेली असते ती जागा स्थानी प्राधिकरणाकडे नाम मात्र एक रुपयाच्या मोबदला यामध्ये हस्तांतरित करावयाची असते. या अशा जागा स्थानिक प्राधिकरणाच्या नावे सातबारा सदरी दाखल होतात. पर्यायाने अशा जागा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीच्या असल्याने त्याबाबतची तक्रार आपणाला संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडे करावी लागेल.
स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अथवा विशेष नियोजन प्राधिकरण जसे सिडको, म्हाडा किंवा महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल पाटिल
09-03-2021
Amolk5492@gmail.com
सर आमच्या 1996 ला वाटन्या झाल्या वाटनीपत्रात प्रत्येकाला वडिलांनी दिलेल्या हिश्याप्रमाणे जमिनी मिळाल्या. प्रत्येक जन आपापली जमिन कसतोय. पण माझ्या वाटणित घर होते ते आता पुर्ण पडीत आहे. ते घर माझ्या वडीलांच्या नावे होते पण माझ्या वाटणित होते वडिल वारल्यानंतर त्यावर ईतर भावांचे नाव लागले पण मग घर माझ्या वाटणित आहे व घराची जागा सोडली तर माझे क्षेत्र आलेल्या वाटणिनुसार भरत नाही मला ती जागा साफ करून घ्यायची आहे कारन तिथे फार अडचण झालीय वाटणि पत्रात घराचा उल्लेख नाही केलेला
आपले प्रश्नावरून हे दिसून येत आहे की आपले वडिलांचे नाव ए जी काही स्थावर मालमत्ता होती तिचे वाटप आपल्या सर्व भावंडांमध्ये झालेले आहे. या स्थावर मिळकती शिवाय वडिलांच्या नावे हे घर होते. व वडिलांनी त्या घराचे वाटप केलेले दिसत नाही. योगाने आपण त्या घरात राहत असल्याने आप लि अशी धारणा झाली आहे की ते घर आपल्या वाट्याला आलेले आहे. ज्या जमिनींचे वाटप आपल्या भावंडांमध्ये झालेले आहे त्या जमिनींना त्या त्या व्यक्तींची नावे सातबारा सदरी दाखल झालेली असतील. जर हे घर आपल्या वाट्याला आलेले असेल तर त्याप्रमाणे त्याचा उल्लेख वाटणीपत्र झाला असता. ज्या आरती घराचा उल्लेख वाटणी पत्रामध्ये नाही व सद्यस्थितीत या घराला आपल्याप्रमाणेच आपले ईतर भावांची नावे वडिलांच्या पश्चात वारस म्हणून लागलेली आहेत याचा अर्थ अद्यापही हे घर सामाईक मालकी मध्ये आहे. त्यामुळे इतरांची परवानगी असल्याशिवाय आपणाला या जागेमध्ये काहीही करता येणार नाही. आपणाला या जागेच्या ठिकाणी काही दुरुस्ती करावयाची असल्यास अथवा हे घर जुने झालेले असल्यास त्या जागी पाडून नवीन घर बांधावयाचे असल्यास आपणाला इतर भावंडांची परवानगी घ्यावी लागेल व घर आपल्या नावे जर ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला लावायची असेल तर आपणाला इतर भावंडांत कडून हक्क सोड पत्र तयार करून घ्यावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभीजीत रमेश तिवारी
08-03-2021
abhijittiwari09@gmail.com
सर माझा प्रश्न आहे माझ्या आजोबांनी ऐका सर्वे नंबर ४.८२ हे आर मधुन १ .८२ हे आर जमीन विकत घेतली होती सदर सर्वे नंबर मधुन ३३ आर एवढा मार्ग गेलेला आहे सदर जमीन गेल्यानंतर सदर शेतकऱ्यांकडे २.६७ एवढी जमीन शिल्लक असताना सदर शेतकरी हा वारंवार ही जमीन ३ हे म्हनुन विक्री करीत आहेत काय करावे कळत नाही उपाय सांगा
Question by Abhimanyu Indore
07-03-2021
indore.abhimanyu@gmail.com
सर आमची जमीन आहे तिला खूप मोठा बांद होता शेजारील माणूस सारखा बांद फोडत आहे. तो माणूस गावतील पुढारी आहे. कोर्ट ने निकाल आमच्या सारखा धिला आहे. दोन वेळा पण रात्री सर त्याने उसाची सरी फोडून टाकली आहे . काय करावे समजत नाही तो दादागिरी करतो आणि आमच्या बाजूने कोणी येत नाही बोलायला त्याला घाबरतात खूप सर आम्ही खूप गरीब आहोत पण काय करावे समजत नाही . प्लिज काही उपाय सांगा
शेजारील शेतकऱ्याचा बांध फोडणे अथवा बांध पोखरणे ही समस्या सर्व स्तरावर आहे. न्यायालयानेही आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे याबाबतीत आपणाला दोन गोष्टी करता येतील त्यामधील जि आपल्याला वाटते त्याचा वापर करावा.
न्यायालयीन निकालाच्या आधारे पुन्हा न्यायालयामध्ये जाऊन शेजारील शेतकरी वारंवार बांध पोखरत आहे व न्यायालय निकालाचा अवमान करत आहे त्यामुळे या शेतकऱ्या विरुद्ध त्याने बांध पोखरून नये अथवा बांध फोडू नये म्हणून डी स्पेसिफिक रिलीफ एक्ट खाली दावा दाखल करून मनाई हुकुम प्राप्त करून घ्यावा
अन्यथा न्यायालयीन निकालाच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
