जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by मानसिंग पाटील
14-05-2020
Mansingpatil9669@gmail.com
नमस्कार सर......................... माझे वडील व चुलते हे 1985 साली विभक्त झाले आहेत. त्यावेळी त्यांनी जमिनीच्या तोंडी वाटण्या केल्या पण खाती फोड केलेली नाही. दोघांची हि नावे जमिनीला आहेत. 1985 साली झालेल्या वाटणीत चुलत्यांनी चांगली जमिन घेतली आणि वडीलांना खराब जमिन दिली. गेली 35 वर्षे आम्ही ती जमिन कसतोय. पण आता 35 वर्षानंतर आमच्या जमिनीला चांगलं मार्केट आले आहे. आणि चुलते त्या जमिनीतील अर्धा हिस्सा मागत आहेत. वडीलांची इच्छा आहे की आपण 35 वर्षे जमिन कसतोय त्यांना द्यायची नाही. आता कसत असलेली जमिन आमच्या नावावर करणेसाठी काय करता येईल
Question by Sanjay shinde
14-05-2020
Svsa.shinde@gmil.com
वडलो पराजित इनामी जमिनीला गट नंबर नुसार जमीन रस्ता असतो काय नसलास तर तो कसा मिळेल.
Question by संकेत उत्तमराव अग्राळे
13-05-2020
agralesanket@gmail.com
नमस्कार सर. माझा प्रश्न आसा आहे की माझा आजोबांच्या नावी वडीलोपार्जित ६ ऐकर ३० गुंठे जमीन होती त्यांना ३ मुले २ मुली होत्या, परंतू १९८१ मधेच त्यांच्या मोठ्या मुलानी स्वतः च्या नावी ९० आर जमीन व लहान भाऊ यांच्या नावी ९० आर जमीन अशी वाटनी करून घेतली.एक भाऊ व दोन बहीनींना माहीती व सुचना न देता. भाऊ आणि दोन बहीनी यांच नाव देखिल न येऊ देता वाटनी करून घेतली. राहिलेली ९० आर जमीन आजोबांच्याच नावी होती.आजोबांच २००२ मधे निधन झाल. त्यानंतर आजोबांच्या नावी राहीलेली ९० आर जमीनी मधे २०१९ या वर्षी त्यांचा मोठ्या मुलानीच स्वतः वारस नोंदी केल्या त्यात सर्व वारस दार आले फक्त ९० आर जमीनी मधेच ३ मुले व दोन मुली. तर मुलींना न विचारून किंवा माहीती न देता स्वतः च मोठ्या मुलानी ९० आर जमीनीची वाटनी व आजोबांच्या नावी राहीलेल्या ९० आर जमीनी मधेच ३ मुले व २ मुली यांची वारस नोंद कशी काय केली. असा प्रश्न पडला आहे सर आपन मार्गदर्शन द्यावे.
Question by Sagar
13-05-2020
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - चार जन भाऊ यांनी आपल्या वडिलोपार्जित जमीन चे म.ज.म.अ. कलम 85 प्रमाणे वाटप केले आहे . भाऊ नंबर - १ याचा गट न .343 असून त्या गटामध्ये विहिर असून विहीर मध्ये भाऊ नंबर - १ व भाऊ नंबर - ३ यांचा अर्धा - अर्धा हिस्सा आहे. तसेच वाटप पत्र नुसार या विहीर वर जाण्यासाठी भाऊ नंबर - १ व भाऊ नंबर - ३ याना १० फ़ुट रुंदीचा रस्ता हा भाऊ नंबर - ४ यांच्या गट नंबर 344 मधून राहील असे लिहले आहे तर
१.विहिर वर जाण्यासाठी १० फुट रूंद रस्ता ही बाब कायदेशीर योग्य आहे का ?
२. भाऊ नंबर - ३ याला नुसती पाऊल वाट किंवा बांध वरून विहिर कडे जावे असे भाऊ नंबर -४ कायदेशीर रित्या सिद्ध करू शकतो का? कारण त्यांना जमीन कसण्यासाठी रस्ताची गरज नाही आहे.
३.म.ज.म.अ १९६६ नुसार विहीर वर जाण्यासाठी रस्ता असे कुठे कलम आहे का?
Question by सागर
12-05-2020
sagarkandekar1990@gmail.com
अ व्यक्तीचा गट न.२४२ आहे व ब व्यक्तीचा गट न.२४१ आहे असून दोन्ही गटाचा बांध हा तिरपा असून गाव नकाशा प्रमाणे आहे जर दोन्ही व्यक्ती एकत्र संमतीने शेती चा बांध सरळ करण्यासाठी व नकाशा बदलण्यासाठी अर्ज करू शकता का? हो तर कुठे?
Question by ओथमान अली
12-05-2020
opsalothman@gmail.com
मा.किरण सर यांना नमस्कार
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही सन 1939 पुर्वी पासुन संरक्षित कुळ आहोत.तहसीलदारसो यांच्या आदेशाने त्यांनी ठरवून दिलेली रक्कम ट्रेजेरीत भरलेली आहे.आजून तारका चालू आहेत. सदर जमीनी मध्ये उसाचे पिक घेत असतो.आमच्या विहिरीचे पाणी कमी पडत असल्याने.आमच्या क्षेत्रात एक पाणी पुरवठा संस्था कार्यरत आहे त्या संस्थेचे आम्ही आमच्या क्षेत्राचे संस्थेला सर्व रक्कम रोखीने भरलो आहोत. व सभासद देखील आहोत. त्यांच्या कडूण आम्ही शेतीसाठी 2013 पासूण पाणी घेत आहोत.सदर शेतजमीनीस पाणी देऊ नये म्हणून मालकाने संस्थेस अर्ज केला आहे.आम्ही त्या पाणी पुरवठा संस्थेकडूण पाणी घेऊ शकतो कि नाही.
Question by सौरभ फाटक
11-05-2020
phataksaurabh95@gmail.com
नमस्कार, १९८९ साली जांभुळपाडा, सुधागड,रायगड जिल्हा येथे महापूर झाला होता. तेथील गावाचं पुनर्वसन दुसरीकडे करून पूर्वीची जागा ही शासन जमा केली. परंतु काही जण गैरव्यवहार करून पहिली जागा ही विक्री करून शासनाची फसवणूक करत आहेत तर यासाठी तक्रार कशी करावी व कागदपत्रे कोणती लागतील तसेच जनहित याचिका दाखल करता येईल का?
Question by शंकर रेड्डी
11-05-2020
sreddy5680@gmail.com
मी कांही प्रश्न विचारले आहेत अद्याप मला उत्तर मिळाले नाही. तरी मेहरबान साहेबांनी उत्तर देऊन उपकृत करावे हि नम्र विनंती.
Question by Vilas Patil
11-05-2020
Bmmiskaij@gmail.com
सर, आजोबाच्या नावाने माझी 80 R जमीन होती, ती माझ्या व माझ्या भावात कोर्ट आदेशनुसार सामाईक 1/2 हिस्सा ने झाली परंतु 7/12 मध्ये महसूल विभागाने सामाईक क्षेत्र न दाखवता 40r माझ्या नावाने व 40र भावाच्या नावाने दाखवली, भावाने आता तिरायतास जमीन विकली आहे आणि तशी नोंद करून घेतली परंतु नंतर कळाले की जी जमीन मी वाहत होतो त्या जमिनीच्या चतुरसिम टाकून भावाने विकली होती, आता तो माणूस मला माझी जमीन करायला अडवत आहे , आणि ही माझी जमीन आहे म्हणत आहे. आमच्यात लेखी वाटणी नाही झाली आहे, काय करावे??
Question by Sagar
10-05-2020
sagarkandekar@hotmail.com
अ आणि ब या दोन चुलत भावाची सामाईक 70 गुंठे (भोगवतदार वर्ग 2 , नविन अविभाज्य शर्त ) वडिलोपार्जित जमीन आहे. ब ने त्याचा अर्धा हिस्सा म्हणजे 35 गुंठे हिस्सा तिसऱ्या व्यक्तीला साठेखत करून दिला आहे तर
१.अ हा व्यक्ती ब चा हिस्सा अग्रहक्कानी विकत घेऊ शकतो का? त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल.
२.अग्रहक्कनाने जमीन विकत घेण्यास त्या जमीन चे शासकीय मूल्यकंन मोबदला देऊन खरेदी केले जाते का?
३.ब ही व्यक्ती शासकीय मूल्यकंन पेक्षा जास्त रक्कम म्हणून मागू शकते का?
Question by गणेश बहूरे
07-05-2020
ganeshbahure007@gmail.com
नमस्कार सर
माझा वडीलाच्या नावे गावठाण जागा वर त्यांच्या भावाने कब्जा केला आहे वडील आमी बाहेर गावी राहत असल्याने त्यांच्या भावाने तेथे घर बांधले आहे ग्रामसेवक गेले असता अमाला आमच्या जागेच्या रेकॉर्ड भेटत नाही असे सांगण्यात येत अही मानून ग्रामपंचातीमार्फत कारवाही करण्यास नकार देत आहे सदरील जागा त्यांच्या नावे येत आहे आमच्या काकजाज पूर्वचे घरपटी आहे पण खूप जुने आहे 2003 चे व लाईट बिल पण 1990 मधले आहे जुने रेकॉर्ड कुटे ग्रामपंचयत उपलब्ध होतील जाणे करून ती जागा आमच्या नावे होती शिध होईल. मार्गद्शन करावे
Question by Hariprasad Madhukar Patil
05-05-2020
haripasadpatil@rediffmail.com
नमस्कार सर माझ्या, वडलांच्या व काकाच्या नावावर एकून ५ एकर शेती होती, ती सन १९८९-१९९० मध्ये व्यघ्रा प्रकल्प झाल्या मुले त्यातील काही समीन हि भूसंपादन मध्ये गेली.आता आमचे शेत हे ० पोइंट मध्ये येते. आता सर्वांच्या नावे ०.६२ आर जमीन शिलक आहे,तिचा सात बारा मिळतो .ती जमीन हि उर्हा व लिहा या गावाच्या सीमेवर आहे. आमचा ५९ गट नंबर हा उर्हा शिवारात आहे व मध्ये जुनी शिव आहे व शिव च्या दुसर्या बाजूला लिहा शिवार चालू होते. आता सर त्या भागाकडे आमचे एकमात्र शेत शिल्लक आहे बाकी सर्व हे बुडीत क्षेत्र आहे.जे शिव शिल्लक आहे त्या शिव मध्ये बाकीच्या सर्व शेतकर्यांनी अतिक्रमण करून सर्व शिव व रस्ता बंद करण्याचे प्रयत्न चालू केले आहे व काही प्रमाणात त्यांनी ती शिव बंदच केली आहे.मात्र आता आम्हाला शेतात ज्याण्यासाठी मार्गच उरला नाही,आता सर मला या प्रकरणात माझ्या शेताला रस्ता कसा मिळेल, व ती बंद झ्यालेली शिव कशी चालू करता येयील याचे पूर्ण मार्गदर्शन करावे सर ,कारण त्या लोकांनी पैशाच्या व दादागिरीच्या जोरावर शिव बंद केली आहे.मला वाद नं करता,अर्ज प्रकरण करून हि शिव कशी कायद्या च्या जोरावर कशी चालू करता येयील सर तेवढे मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद माझे नाव हरिप्रसाद पाटील मो.नं ९८६०७९०५९०,८०८०१२६१६४
Question by विकास Bhude
05-05-2020
bhudevikas@Gmail.com
सर माझ्या वडिलांच्या नावावर शेती असून दोन लाख रुपये कर्ज आहे माझा भाऊ हिस्सा मागत आहे. जमीन नावावर करून मागत आहे सद्या तरी आम्ही कर्ज परतफेड करण्यास असमर्थ आहोत तर आपसी फेरफार करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद
Question by समाधान
04-05-2020
anandamasal@gmail. com
आपण करत असलेल्या सेवेला माझा प्रणाम,
विषय -कुळ संदर्भात
माझे पंजोबाचे संरक्षित कुळ म्हणून नाव आहे व इतर दोन साधे कुळ आहेत. त्या दोन्ही साध्या कुळांनी जमिनीतील माती उचलून आपल्या इतर जमिनीत भरली आहे. पण कुळकायद्यानुसार बेदखल कुळ होते का जर त्या जमिनीतील माती इतर जमिनीत घेऊन गेल्यावर. आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जबरदस्तीने माती उचलली, आम्ही काय करावे? कृपया मदत मिळावी ही विनंती
Question by शितल
04-05-2020
shtlchavan3@gmail.com
माझ्या घराशेजारी माझा आजोबा पासुन वापरात असलेला परडा आहे. गावचा सिटी सर्वे नसल्याने मोकल्या जागेच्या नोंद नाही. तर त्या परड्यात अर्ध्यापर्यंत शेजार्याने मी परगावी गेलो असताना पत्र्याचे कम्पाउंड घातले. ग्राम पंचायत ला अतिक्रमण काढून मिलावे म्हणून अर्ज केला तरी त्याने पंचायतीला जुमानले नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टाकढून काढून घ्या.. भांडण करुन उपसून काढा असे सांगितले... काय करु
Question by Sagar
02-05-2020
sagarkandekar1990@gmail.com
नवीन अविभाज्य शर्त , भोगवटदार वर्ग 2 (इनाम वर्ग ६ ब ) जमीनी मध्ये फार्म हाऊस बांधू शकतो का? जर ,बाधू शकतो तर त्या साठी शासकीय परवानगी लागेल का?
Question by सुदाम बाळासो जाधव
02-05-2020
sudamjadhav161994@gmail.com
सर माझा असे प्रश्न की , गोपाळ NT-B भटक्या समाजाचा असून मावशी( खंडाळा)सातारा या गावात गेल्या 15 वर्षे राहत होता .त्या समाजाकडे सर्व रहिवाशी रेशनिंग कार्ड,व मतदान कार्ड इतर पुरावे पण या समजाणा गावातील पुढाऱ्यानी या समाजाला गावाच्या बाहेर हाकलून दिले.पण हा समाज अगदी गरीब आहे .हा समाज एका गावाहून दुसऱ्या गावात पोट भरण्यासाठी जीवाची कसरत करत असतात पण या समाजाला राहण्यासाठी थोडी सुद्धा राहण्यासाठी जागा दिलेले नाही.आणि या समाजाना गावाच्या बाहेर हाकलून दिले .सर जो व्यक्ती भारतिय नागरिक असतील तर अशा गोर गरीब समाजाना स्थायीक का केले जात नाही.
Pls कळवा सर याच उत्तर...... आपल्याला नेमके काय करावे लागेल याच आमाला उत्तर कळवा सर !
संपर्क :-
मो -8805705274...
Question by Gokul Narayan Adhav
01-05-2020
adhav.gokul1@gmail.com
Sir,
माझ्या वडिलांनी सन 1990 मध्ये 750 sq ft. Cha plot खरेदी केला आहे, प्लॉट खरेदी केल्या नंतर त्याची नोंद लाऊन तो प्लॉट N.A. करून घेणं गरजेचं होतं, परंतु त्या दरम्यान वडिलांचा अपघाती मृत्यु झाला आणि आई अशिक्षित असल्या कारणाने त्यांच्या कडून अनवधानाने तलाठी कार्यालयं येथे प्लॉट ची नोंद करणे व प्लॉट N.A करणे राहुन गेले, आता मला त्याचं प्लॉट वरती होम लोण करायच आहे पण बँक व फायनान्स कंपनी प्लॉट N.A नाही, तसेच गावठाण मध्ये प्लॉट येत नाही म्हणुन लोन करत नाहीये, तर मला आता तो प्लॉट N A करायला काही कायदेशीर रीत्या करता येईल का?
Question by Harish Suresh Dapse
30-04-2020
dapseharish@gmail.cim
नमस्कार सर,
आजोबांनी 1984 साली प्लाट खरेदी केला परंतु अज्ञानामुळे सिटी सर्व्हे ला नोंद झाली नाही . आज रोजी प्लाट विकायचा आहे पण सिटी सर्व्हे नंबर नसल्याने विकायला समस्या निर्माण झाली आहे. कृपया सदर जागेला सिटी सर्व्हे नंबर कसा लावायचा त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी जेणेकरून खरेदी विक्री चा व्यवहार पूर्ण होऊ शकेल.
Question by प्रसाद चाकणकर
28-04-2020
prasadchakankar4@gmail.com
नमस्कार सर,
मी प्रसाद चाकणकर..
माझ्या आजोबांचे नाव १९४९ साली संरक्षित कुळ मधे लागले गेले.. प्रत्यक्ष मालकाने ती जमिन बारा वर्षानी १९६१ साली जलसंपदा विभाग कालव्या साठी दिली... प्रत्यक्ष जमिन १ एकर ३८ गुंठे होती... कालव्यासाठी फक्त ३५ गुंठे जमिन वापरण्यात आली व १ एकर ३ गुंठे जमिन तशीच आहे.. परंतु सातबारा जलसंपदा विभागा कडे गेल्याने रद्द असा शेरा आहे... पण सातबारा वार माझ्या आजोबांचे नाव अजुन आहे.. तर उरलेल्या जमिनीसाठी काय प्रयत्न करता येईल ?
Question by Prakash Hanmantra patil
28-04-2020
Shubhampatil40427@gmail.com
नमस्कार साहेब मी प्रकाश हनमंतराव पाटील रा. बिलोली ता. बिलोली जि. नांदेड येथील रहिवासी आहे आणि माझ्या नावावर मोठे घर आहे आणि मला दोन मुले आहेत पण हे घर मला एकाच मुलाच्या नावावर करायचे आहे तसे करता येईल का?
Question by मनोज टेकाळे
26-04-2020
bsfmanoj31@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न आहे कि, महसुली अधिनियम कलम ५९ आणि कलम २४२ अंतर्गत जिल्हाधिकारी शेती जर बळजबरीने ताब्यात घेतली असेल तर काय कायदेशीर कारवाई करू शकतात, या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे कडे दाद मागायची असल्यास काय करावे लागेल, आणि साध्या खरेदी खतानुसार शेतजमिन खरेदी केली तर ती कायद्याच्या कक्षेत वैध ठरते का.
Question by दिपक महादेव मोहीते
26-04-2020
deepkrishana1950@gmail.com
नमस्कार सर /मँडम
माझे गावी घर आहे पण ते रस्त्यापासुन थोडे आत मधे आहे घरात जाण्यासाठी मला स्वतंत्र असा रस्ता नाही त्यामुळे नाईलाजास्तव ईतर मिळकतदाराच्या जागेतून जाणे येणे आहे काही कारणास्तव सदरचा मिळकत धारक आमच्या जागेतून ये जा करायची नाही अशी धमकी दिली असून तो जागेला कुंपण करून आम्हाला अडचणीत टाकत आहे माझ्या घरात ८० वर्ष वयाची आई आहे जाण्यायेण्याचा दुसरा मार्ग नाही असे एखाद्याला अडवणूक करणे योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे
Question by Dipak Mali
26-04-2020
mdipak37@gmail.com
सर, आमची वडिलोपार्जित जमीन आमच्या आजीच्या नावे होती तिच्या मृत्यूनंतर ती माझे वडील आणि काका यांच्याकडे आली. वडील अज्ञान असताना त्यातील बराचसा भाग व्यसनामुळे काकांनी NA न करता विकला. आज त्या सर्वांची नावे आमच्या सातबाऱ्यावर आहेत. जमिनीच्या नव्या कायद्या मुळे. त्या सर्व जमिनीवर धरणग्रस्त लोकांसाठी राखीव असा स्टे आला आहे. जी उपलब्ध जमीन आहे ती खूप थोडी आहे. आणि आम्हाला उर्वरित जमिनीचे खातेवाटप करायचे आहे. सदर वारस नोंदी मध्ये फक्त माझे वडील आणि काका यांची नवे आहेत. तर तो स्टे हटवण्यासाठी आणि खातेफोड करण्यासाठी काय करावे लागेल
Question by Vilas Patil
25-04-2020
sourabhpatil76837@gmail.com
आजोबांना 4 भाऊ आहेत मोठा भाऊ एकत्र कुटुंब मॅनेजर होता तेव्हा 6 acre जमिनीची खरेदी केली होती खरेदी केली तेव्हा फेरफार वर एकुमँ असा उल्लेख आहे आताही त्यांचाच नावावर आहे मग आम्हाला या जमिनिवर दावा करता येईल का
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
