जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील म्हणजे काय याची कृपया माहिती देणे
आपणास JMFC यांचेकडे अर्ज करावा लागेल . त्यांचेकडून मृत्यू दिनांक प्रमाण पत्र मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलोपार्जित शेत वहिवाट रास्ता अडवणूक करत आहे,खरेदीखतामध्ये खाडाखोड केली,संपादित क्षेत्र अतिक्रमण केले,त्यासाठी तक्रार कोठे करावी
वही वाट रस्ता अडवणूक केली असेल तर , मामलतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin deshmukh
19-09-2019
sdeshmukh343@gmail.com

Tukda bandi kayda kay ahe ani to ata lagu ahe ka
हो लागू आहे
मात्र तो शहरी भागासाठी लागू नाही
नुकतीच या कायद्यात सुधारणा केली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Hakka sod watani Patra SDO Aadesh sub register office avashyak aahe ka 1. 5 1 hectare one fourth distribution Hote
नमस्कार सर
आमच्या जमीणीचे 1976 पर्यंत सर्वे 1अ आणि 1ब असा होता.आणि त्याचे 1976 नंतर मध्ये गट नं 1 च झाला .आणि ती जमिण सर्वे 1अ च्या नावे झाली आहे.आणि आता ति जमीन सर्वे 1अ च्या पुतणे चे नावावर मृत्युपत्राने झाली आहे. तसा फेरफार निघत आहे.आणि 1ब सर्वे 1962 te 1976 च्या सातबारा वर इतर हक्कात तुकडा, तुकडे बंदी विरुद्ध व्यवहार अशी नोंद आहे.
तर ति जमिण 1976 पुर्वी च्या सर्वे नं 1ब च्या नावावर होईल का?

Question by Ram date
18-09-2019
Ramdate@gmail.com

सर ७/१२ वर २ भावाचे वारसा हक्कने सामा ई क क्षेत्र ची नोंद झाली आहे . ते क्षेत्र विभाजन करण्यासाठी व प्रत्येकाचे नावासमोर क्षेत्र येण्यासाठी मार्ग दर्शन करावे. धन्यवाद...
वाटप करून घ्या . वाटप आदेशाचे अनुषंगाने मोजणी करून घ्या . आकारफोड पत्रकांचे आधारे , टेहाळतही मंडळ अधोजिकारी स्वतंत्र ७/१२ तयार करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
दस्त नोंदणी केल्यानंतर मसुद्यातिल कलम दुरुस्त करता येतो का?
दुरुस्त खत करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार...
आमच्या जमिनी ला ४१ गुंठे क्षेत्र डिंभे प्रकल्पग्रस्ता साठी संपादित झाले१९९७ ला ७/१२ सदरी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नाव दाखल झाले नंतर लगेच सदर जमीन प्रकल्प ग्रस्तांना वाटपाचा आदेश झाला परंतू त्या प्रकल्प ग्रस्ताने जमिनी चा ताबा २०१८ ला तब्बल २१ वर्षे नंतर घेतला व ८ दिवसांनंतर लगेचच शासनाची कोणतीही परवानगी न घेता विक्री केली तलाठी व मंडलाधिकारी यांनी जाणीवपूर्वक शासनाने धारण केलेल्या जमिनी चा भोगवटा वर्ग विक्री होईपर्यंत वर्ग १ ठेवला .जमिनी ची शासनाचे परवानगी शिवाय विक्री झाल्यावर आम्ही मुळ मालक यांनी तलाठी, प्रांताधिकारी,उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन.यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला मग मंडलाधिकारी यांनी तहसीलदार यांचे कडे पुनरावलोकन करण्यासाठी अर्ज दाखल केला...त्याच वेळी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांच्या कडे तक्रार दाखल असताना व सदर जमिनीशी विक्री झाल्यावर नवीन शर्त कमी करण्यासाठी व भोगवटा १ करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांनी आदेश दिला व आमचा तक्रार अर्ज फेटाळला. हे बरोबर आहे का मार्गदर्शन करावे.
वास्तविक पुनर्वसनाखाली दिलेल्या जमिनीच्या हस्तानंतरवर असणारे निर्बंध हे , जमीन कोणत्या कायद्याखाली दिली आहे त्या वर अवलंबून आहे
जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दिली असेल , तर हस्तानंतरण विना परवानगी करता येत नाही
मात्र पुनर्वसन कायद्याखाली दिली असेल तर , अश्या जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध नाहीत / ते दूर करण्यात आले आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
आमच्या जमीणीचे 1976 पर्यंत सर्वे 1अ आणि 1ब असा होता.आणि त्याचे 1976 नंतर मध्ये गट नं 1 च झाला .आणि ती जमिण सर्वे 1अ च्या नावे झाली आहे.आणि आता ति जमीन सर्वे 1अ च्या पुतणे चे नावावर मृत्युपत्राने झाली आहे. तसा फेरफार निघत आहे.
तर ति जमिण 1976 पुर्वी च्या सर्वे नं 1ब च्या नावावर होईल का?

Question by Vinay nikam
15-09-2019
Vinaynikam1983@gmail.com

Sir maza prashna ahi ki mazya vadilani 1989 madhe saamaikat madhe 1 aar cha dast kela hota tashi satbarwala nonde ahi ani nantar punha tyacha sr no madhe 2005 madhe kharidi dasta dvare 1 aar kharidi keli pan ata.Sat Baramadhe nonde 1aar chi ahi.2008 sali. Talathi na nav lavanya sathi aarj kela hota.parntu thyane 2005 sali kharidi Kelelya Malkachi nav kami na karta. Aamce nav kami kele ahi.hi bab amhala. Online satbara 2016 madhe 2 nave asalyane kalale nahi. Parntu ata hasta likhit satbara madhe 1 aar nav kami zale ahi .aani tyala ferafar no 2005 chya dastatha padala ahi tari ata satbara madhe 2 aar chi nonde sathi kay karave.
आपण दोनीही खरेदी खतांसह प्रांताधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमचे गावचे घरावर अ आणि ब अशी घरपट्टी आहे , अ मध्ये आम्ही चार कुटुंब आहेत ,आजीच्या निधनानंतर अ मध्ये आम्ही चार कुटूंबाची घरपट्टी वेगळी करून घेतली आहे पण आम्ही सर्व घराच्या अ मध्ये आहोत
त्यापैकी २ कुटुंब आम्हा दोन कुटुंबाना घरावर हक्क सोड देणार आहेत , तर हे हक्क सोड करण्यासाठी कोठल्या कागपत्राची गरज आहे आणि हे कोठे रजिस्टर करावे लागते ।

तसेच उरलेले आम्ही दोन कुटुंब पैकी एक कुटुंब आम्हाला अ विभागातले घर बांधण्याविषयी रिप्लाय करत नाही तर आम्ही अ मध्ये घराची फोड करता येईल का आणि आम्ही आमचे घर बंधू शकतो का , तसेच घर बांधताना कोणत्या सरकारी विभागाची परवानगी घ्यावी लागते ।
अ घरामध्ये आपण चार कुटुंब राहत आहात. आपणास या घराचे हि दोन भाग करायचे आहेत
ग्राम पंचायतीकडे अर्ज करा





Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।

आमच्या ३४२ हा फेरफार वर्ष १९२२ चा आहे ,हा फेरफार खूप पुसट आहे आणि या विषयी तलाठी ऑफिस मध्ये कुठलीहि माहिती उपलब्ध नाही ,आम्हाला जर या फेरफार विषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर कुठे निवेदन द्यावं
१९२२ चा फेरफार मिळणे कठीण

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kailas patil
15-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
मी गेल्या वर्षी एक एकर शेत जमीन गोपालन, वनस्पतीच्या लागवडीसाठी खरेदी खताने घेतली होती त्या नंतर सात बारावर नाव चढल्यावर शासकीय मोजणी करून घेतली आहे माझ्या अगोदर मूळ मालकांनीही शासकीय मोजणी केली होती मग काही दिवसांनी तिथे मी कुंपणाचे आणि शेत घराचे काम सुरु करत असताना तेथील गावातील लोकांनी माझे काम थांबविण्यास सांगितले ते म्हणतात कि जमीन गावठाणाची आहे मग मी सर्वत्र पत्रव्यवहार केले मग मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली आणि त्याचा रिपोर्ट तहसील अधिकारी याना पाठवला, काही दिवसांनी त्या गावातील लोक तहसील कार्यालयात गेले आणि माझ्या विरोधात तहसील मॅडम याना माहिती दिली त्या तहसील मॅडम यांनी माझे कागद पत्र न बघता त्यांनी माझे खाजगी शेत जमिनीवर चालू काम थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले कि जो पर्यंत गावठाणाची मोजणी होत नाही तो पर्यंत तुम्ही काम करायचे नाही त्यांनी सांगितलेल्या दिवसानुसार मी तहसील कार्यालयात गेलो होतो त्यांनी तेव्हा माझे कागद पत्रे पहिले आणि सांगत होते कि त्या गावठाणचे लोक मोठ्या राजकीय नेत्या कडे गेले होते तुम्ही त्यांची मोजणी होई पर्यंत काम बंद ठेवा.
मला सांगा कि मी करून घेतलेली शासकीय मोजणी अधिकृत नाही आहे का? दोनदा झालेली मोजणीत गावठाण येऊ शकते का? त्यांच्या कडे महाराष्ट्र शासनांनी अधिकृत केलेले नकाशे नाही, पुनर्वसन विभागाचे कोणते आदेश नाही, त्या पुनर्वसन गावठणच्या लोकांनी इतर मालकांना न कळवता अनाधिकृत नकाशे बनवत आले आहे तरी माझ्या सात बारा म्हणजे माझ्या शेत जमिनीचा आणि गावठाण चा काहीही संबंध नसताना तहसील मॅडम माझे खाजगी बांधकाम थांबविण्याचे अधिकार आहे का, माझे कोणते हि पेपर न पाहता, मी त्यांना भेटायच्या अगोदर ते माझे काम थांबवू शकतात का
तरी आपण मला मदद करावी, मी काय करावे त्यासाठी मार्गदर्शन करावे, माझा संकल्प गोपालन, गोसेवा आहे
तरी मला योग्य सहकार्य करावे
धन्यवाद
आपण दिलेल्या सुविधा बद्दल मी आपला आभारी आहे
मी कृष्णकुमार शिंदे 9619045696
आपण करत असलेल्या बांधकामास आपण परवानगी घेतलेली आहे का ?
बांधकाम गावठाण जागेत करत असल्यास त्यास , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी म्हणजे , गावठाणाबाहेर , जिल्हाधिकरी यांची परवानगी आवश्यक आहे
जर परवानगी घेतली नसेल तर आपणास बांधकाम थांबवावे लागेल व परवानगी घेतली असले तर बांधकाम थांबवण्याची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by शंकर
14-09-2019
ShankaBrkakde@Gmail.com

माननीय महोदय,
वनविभागातील / सरकारी जमीन देशी गोसंर्वधनासाठी मिळणे साठी काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे,
माझ्या वडलांनी १९४१ साली जमीन खंडाने दिलेली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात कुल मानून लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास मी वर्तमान पात्रातून ३ महिने कालावधीची नोटीस देऊ शकतो का . जर त्याने रक्कम दिली नाही तर, कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का . खंड रक्कम दिली नाही मानून कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का .जर नोटीस पेपर मांडून दिली असेल तर .
सागर राव
नोटीस त्यास वयक्तिक रित्या बजावणे आवश्यक आहे . तो अढळ होत नसेल तर , जमिनीवर नोटीस प्रसिद्ध करा . अन्यथा पेपर मध्ये नोटीस प्रसिद्ध करू शकता
मात्र खंड कुळाने दिल्यास , वहिवाट संपत करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?

Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?

Question by सागर
13-09-2019
sagarkandekar1990@gmail.com

एक व्यक्ती त्याची सर्व 30 गुंठे वडिलोपार्जित शेत जमीन त्याच्या पत्नी व मुलं यांच्या संमतीने मला विकण्यास तयार आहे.त्याला जमीन विक्री तुन आलेल्या पैसा तुन शहरा मध्ये घर खरेदी करायचे आहे व शहरात राहून व्यावसाय करायचा आहे.जर त्याची शेत जमीन मी विकत घेतली तर तो भूमिहीन होईल व मला त्याचा काही त्रास होईल का? माझी खरेदी रद्द होईल का ?सदर व्यक्ती अनुसूचित जाती मधील आहे.
आपण जे खरेदी कराल त्यावर , अन्य त्याच्या वारसांची सही घ्या .
आपणास काही अडचण येण्याचे काही कारण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul K
12-09-2019
rahulkalwel@gmail.com

प्रश्न- जर एखादे कुटुंब तीन पिढ्यान पासून सामायिक क्षेत्र जमिनीवर घर बांधून राहात असेल आणि त्या घराच्या जागेची खणपट्टी भरत असेल.तसेच त्या घर जागेचा मिळकत उतारा मिळत असेल तर सदर जागेवर त्या व्यक्तीचा हक्क राहू शकतो का? किंवा पुढे तो व्यक्ती त्या ठिकाणी कायद्याने राहू शकतो का? त्याविषयीची अधिक माहिती कुठून मिळवता येईल.
सामायिक क्षेत्र कोणाचे मालकीचे आहे ?
जर अश्या क्षेत्रावर आपले वास्तव्य १२/२० वर्षाहून अधिक काळ असेल तर आपण , adverse possession चा दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
12-09-2019
sagarkandekar1990@gmail.com

नमस्कार सर ,
मला सख्या 4 बहीण व 4 सख्खे भाऊ आहेत.तसेच मला 3 चुलत बहिणी व 4 चुलत भाऊ आहेत.माझे वडिल व चुलते यांनी 10 एकर जमिनीचे कधी वाटप च केले नाही त्यामुळे आमच्या सर्वांचे (सख्खे + चुलत भाऊ बहीण) एकमेकांत वाईट संबंध असल्याने सातबारा सदरी सामाईक मालक म्हणून नाावे वारस नोंदीने लागली आहेत.ही 10 एकर शेती असून एकूण 8 गट आहेत.ह्या पैकी 4 गट हे राज्य महामार्ग ला लागून आहे व उर्वरित गाव शिवराकडे आहे.मी दिवाणी न्यायालयत दावा टाकला आहे तर..
१.तर न्यायलय कुठल्या अनुषंगाने वाटप करेल.
२.मी न्यायलयला मला सोयीस्कर असलेला गट देण्याची विनंती करू शकतो का ? व न्यायालय ते मान्य करेल का ?
३.तसेच प्रतिवादी कडून भरपाई मागू शकतो का?.
न्यायालय केवळ आपले हिस्से निश्चित करेल . प्रत्यक्ष वाटप , जिल्हाधिकरी यांचे आदेशाने उप अधीक्षक भूमी अभिलेख / तहसीलदार करतील . या वाटपसा सर्रास निरास वाटप असेच संबोधले जाते
प्रत्येकाला समान किंमत /उत्पादकता असलेली जमीन दिली जाते . जर असं करणे शक्य नसेल तर , ज्यांना जामी नेता येत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न :- मुंबई वरील लोकसंख्येचा वाढता भार कमी करण्यासाठी ,शासनाने सिडको या प्राधिकरनाची निर्मिती करुन 1970 साली ठाणे,पनवेल,ऊरण या तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी आमच्या मुळ गावांचा गावठाण विस्तार न करताच संपादीत करन्यात आल्या..आमच्या ग्रामस्थांच्या नैसर्गिक कुटुंब विस्तारा मुळे आम्ही आमच्या गावालगत गरजेपोटी बांधकामे बांधली आहेत.ज्या बांधकामांना शासन अनाधिक्रुत ठरवुन तोडक कारवाई करत आहेत ,,,,माझे प्रश्न आहे की 1) आमच्या नवी मुंबईतील गावांचे ईग्रज काळा पासुन गावठाण विस्तार झालेले नाही ,आमच्या ताबे कब्जातील जमिनीवर आम्ही पर्यायी बांधलेली ज्यांना महानगर पालिकेचा कर लागु होतो,पाणि बील,विज बील लागु आहे ती अनाधिक्रुत कशी काय ठरविली जातात ? 2) आमच्या गावांचे, घरांचे नगर भमापन होऊन ,सनद मिळविन्यासाठी काय तरतुद आहे ?3)आमच्या ताबे/कब्जातील जमिनीच्या 7/12 ऊतार्या वरील सिडकोचे नाव कमी करण्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे ?

Question by Nandu Shelake
11-09-2019
nsshelake9@gmail.com

शेत जमीन खरेदी माहिती बाबतनमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नंदू शेळके साहेब ,
आपणास या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे ,कुल कायद्याच्या कलम १८ प्रमाणे , शेत जमीन साधी करणाकडे दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नन्दु साहेब
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नन्दु साहेब
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nandu Shelake
11-09-2019
nsshelake99@gmail.com

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3