जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सागर शिरीष कर्णिक
23-04-2020
Sagar.karnik023@gmail.com
नमस्कार सर
आमची कराड ला जमीन आहे पण 20 वर्ष्यापूर्वी माझ्या वडील्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते घर सोडून निघून गेले आहेत 3 महिन्या पूर्वी मला ते पुणे येथे दिसले होते पण त्याना आता काहीच समजत नाहिये माझ्या वडिलाना पकडून 5 भाऊ बहिण आहेत. तर मला आता त्यांच्या नावावर च्या सात बारा ला माझे नाव लावायचे आहे पण आत्त्या म्हणत आहे की नाही म्हणून तर नाव लावायला मला काय कारवे लागेल सर
Question by Lakhan Gopichand Baswant
23-04-2020
lakhanbaswant1612@gmail.com
मा महोदय साहेब
आमच्य आजोबा च्या काळाती
ल एक विहिर आहे सर्वाजनीक
त्या वर आमहाला पाळी पत्र बनवायच आहे कारण पाच आजोबा पैकी एका आजोबा च्या मुलानी आम्हाला विचारत ण घेता
मोटर टाकून रोज विहिरी तुण
पाणी उपसत आहे
त्या मुळे चार भावाच्या शेताला
पाणी पुरत नाही
या कारना स्थव आम्हाला विहिरीचे पाळी पत्र बांणवायच आहे तर ते बनू शकते का आणि त्या ला काय करावे लागेल
Question by सागर
22-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
जर भोगवटदार वर्ग -2 व नवीन अविभाज्य शर्त इतर हक्कात असलेली जमीन जर विक्री साठी व विकत घेणारी व्यक्ती जर इतरत्र राहणारी असेल तर महसूल विभागा तर्फे ती विक्रीसाठी असलेली जमीनच्या पाच किमी परिसरात कोणी मागासवर्गीय व्यक्ती ती जमीन खरेदी घेण्यास इच्छुक आहे का अशी नोटीस काढण्यात येते का?
या संदर्भात कुठल्या अधिनियम आहे ?
नोटीस काढण्याची ची काय प्रकिया आहे ?
Question by मनोज टेकाळे
20-04-2020
bsfmanoj31@gmail.com
माझे शेतजमिनीवर गुंड लोकांनी बळजबरीने ताबा केला आहे, सदर व्यक्ती मुळ मालक म्हणजे आमचे परवानगी शिवाय वाहत आहेत, त्या़चेकडे जमीनी मालकी हक्कांसंदर्भात नोंदणीकृत दस्ताने, वारसा हक्काने , दिवाणी न्यायालय व महसुली न्यायालय या तीनही बाबी बाबत मालकी हक्कांबाबत कोणताही सबळ पुरावा नाही आहे, आमचा मनाई दावा न्यायालयाने फेटाळला आहे परंतु मुळ मालकाचा मनाई हुकूम फेटाळला म्हणुन बळजबरीने ताबा घेतलेली व्यक्ती जमीनीचा मालक होत नाही.
मला शेतजमिनीवर ताबा हटवून घ्यायचा आहे त्यासाठी मला पोलीस संरक्षण मागण्यांसाठी काय करावे लागेल, आमच्या नावाने असलेला सातबारा सोडा म्हणुन सदर व्यक्ती ही आम्हाला जिवे मारण्याची धमकी देत आहे. महसुली अधिनियमा नुसार जिल्हाधिकारी काही कारवाई करू शकतात का, याबद्दल मार्गदर्शन करावे.
Question by Rupesh Sawant
20-04-2020
rupsawant_2006@rediffmail.com
Sir, Mazya aajichya bhavane ek gift deed karun 4.5 gunthe jaga mazya aaji ani ajobanchya nave 2011 sali kel. Sadar jaga taluka mhasala, district Raigad Maharashtra ithe ahe. Ya jagevar amhi ghar bandhale ani zad lavli ahet...amba , kaju, chiku etc. Gharachi gharpatti aajichya nave ahe. Aajoba madhyantari varale. 7 /12 var amchyapaiki konachach nav nahi. Tari amch nav satbara var kas add hoil. Sadar gift deed registered nahi kelay fakt notarized kel ahe. Ferfar kiva itar hakkat amcha nav yeu shakto ka. Tukda bandi ajun ahe kay. 7 /12 jaga padik dakhvli ahe.
Question by एकनाथ
19-04-2020
eknatheknath7@gmail.com
नमस्कार, किरण पाणबुडे सर माझ्या वडिलांच्या नावावर ८० गुंठे जमीन होती त्यापैकी ४० गुंठे जमीन च्या सातबारा वर इतर हक्कात २२ अ अनवन्य वने असा शेरा होता व ४० गुंठे जागा ही बिगर शेती होती २००८ साली वडिलांनी बिगरशेती असलेली ४० गुंठे जागा एका व्यक्तीस कुलमुख्यातर पत्रकाने विक्री केली वडील अशिक्षित असल्याने त्या व्यक्तीने इतर हक्कात वने असलेली जागा ही कुलमुख्यातर पत्रकाने विक्री केल्याचे दाखवून जागा त्याच्या नावावर केली आणि आता वने असलेल्या जागेच्या सातबाऱ्यावर त्या व्यक्तीचे नाव आहे
तर सर ती इतर हक्कात वने असलेली जागेवरून त्या व्यक्तीचे नाव कसे हटवावे
सर इतर हक्कात वने असलेली जमिनीची विक्री करता येते का ?जर वने जमिनीची विक्री होत नसेल तर त्या व्यक्तीचे नाव वने जमीन असलेल्या सातबारा वर कसे? सर याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे ही विनंती
Question by मुजावर सुमय्या
18-04-2020
smy.mujawar@gmail.com
माझा बिनशेती प्लॉट सांगली मिरज येथे आहे. माझ्या प्लॉट शेजारी आणखी येका इसमाने शेवटचा प्लॉट खरेदी केला. खरेदी खत मध्ये त्याचा प्लॉट १ आर चा आहे पण तो शेती मध्ये आहे. आता त्याने तो प्लॉट बिगरशेती कारण्यासाटी दिला आहे परंतु खोटा नकाशा बनवून जागा रस्त्याची जागा हि स्वतःची भासवून खोटी कागदपत्रे तयार करून बिनशेती परवाना शेती जमा केली आहे. १ आर जागा जर बिनशेती करायची असल्यास नियमानुसार सेट बॅक सोडावा लागतो परंतु त्याने १००० स्के फूट बिगरशेती चा प्रस्ताव मांडला आहे. याच्याविरुद्ध कसे व कोठे तक्रार करावे ??
Question by शांताराम सदाशिव साकोरे
18-04-2020
Shantaram9999@gmail.com
पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जमिनीचे बेकायदेशीर
खरेदीखत करून 7/12 वर खरेदी करणाराची नोंद झाली होती. नंतर मा.प्रांत अधिकारी यांचे आदेशाने नोंद रद्द झाली .आता त्यांचे खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करावे लागेल.यासाठी काही कायदा आहे का,क्रुपया मार्गदर्शन करावे.
Question by मनोज सोपान धोंडे
17-04-2020
dhondemanoj@gmail.com
नमस्कार सर ,सर माझा प्रश्न असा आहे की मौजे ता. आष्टी जिल्हा बीड येथील येथील 39 आर या एकत्रित क्षेत्राच्या वाटपासाठी फिर्याद मी दिनांक: 29/2/2000 रोजी दाखल केली होती ,प्रतिवादी माझे 3 सावत्र भाऊ होते त्यांच्या नावावर प्रत्येकी 13 गुंठे जमीन होती दावा दाखल केल्यानंतर तिन्ही सावत्र भावांनी प्रत्येकास साडे नऊ गुंठे जमीन देण्याचे मान्य केले. त्यानुसार दावा दिनांक 5/8/2004 ला डिक्रि झाला. परंतु कोर्टामध्ये दावा चालू असताना दोन सावत्र भावांनी त्यांच्या नावावर असलेली 13+13=26 गुंठे जमीन विकली. एका सावत्र भावाने दिनांक 4/9/2000 रोजी 13 गुंठ्याची खरेदी दिली. तर दुसऱ्या सावत्र भावाने दिनांक.2/9/2000 ला 13 गुंठ्याची खरेदी दिली. आणि 3 नंबर च्या सावत्र भावाच्या नावे पूर्वीप्रमाणे 13 गुंठे जमीन तशीच राहिली. या सर्व प्रतिवादींनी माझी व कोर्टाची फसवणूक केली आहे. तर मला माझ्या हिस्याची जमीन परत मिळेल का? त्यासाठी काय करावे लागेल.
Question by राहुल कुंभार
17-04-2020
rk175763@gmail.com
Feedback : नमस्कार सर मी 2013 Nov, मधे ऐक खरेदी दसत करून5% व्याजाने 10 लाख रूपये काढले होते जमिन आजोबांच्या नावावर होती वडिल मयत आहेत तर खरेदी दसत केला तेव्हा फक्त माझी आई समती दिली अजुन 2 वडिलं ची बहिणी आहेत माझी आजी आणि 1 भाऊ आहे तयाची सही नाही उतारावर आजोबांच्या भाऊ आहेत ऐकच खाते उतारा आहे पन 8 जायच्या तयाचया नावावर निघतो पन त्याची ही समती नाही सावरकर ने उतार वर 2015 नाव लावले आनी 2018 ला कब्जा घेतला आहे आता जास्त रक्कम मागतोय काय करावे please सांगा
Question by Narendra meshram
17-04-2020
narendrameshram096@gmail.com
सर मृत्यूपत्र 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर आहे त्यानुसार तलाठी यांनी फेरफार घेऊन नोटीस चावडीवर प्रसिद्ध केले 15 दिवसानंतर आक्षेप नाही परंतु मंडळ अधिकारी यांनी नोटीस वर सही नाही म्हणून फेरफार नामंजूर केलेला आहे कृपया मार्गदर्शन करण्यात यावे
Question by कदम के डी.
16-04-2020
Kdkadam11@.com
शेत जमीनी बाबत आपण अपील करा असे सांगितले आहे परंतू अपील कोणाकडे करावे. मी पांतसाहेब, जिल्हा अधिकारी एम आइ डि सी आणि महसूल साहेब यांना निवेदन देवून माहिती दिली .आपले मनापासून आभार मानतो. साहेब. मार्ग दर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by सागर
16-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
सर जर शेजारील शेतकर्यांनी त्याच्या शेतात तन पेटवले व त्या मुळे जर शेजारील शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर आपण शेजारील शेतकऱ्यावर काही कारवाई किंवा नुकसानभरपाई ची मागणी करू शकतो का?
Question by Sagar
16-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
मी माझ्या शेताच्या पाच वर्षां पुर्वी माझ्या हद्दी मध्ये 20 ते 25 आंब्याची झाडे लावले आहेत व ती आत्ता मोठी झाली आहेत.तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेऊ शकतो का?तसेच बोरवेल ची नोंद पण सातबारा वर घेऊ शकतो का?
Question by चंद्रकांत मारुती मांढरे.
16-04-2020
chandrakant.mandhare3@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांच्या नावे 7/12 वर 1 हे 30 आर जमीन आहे, परंतु माझ्या वडिलांचे 4 चुलते यानी एकत्र कुटुंब असतानी 6 हे 52 आर जमिन 1961 साली खरेदी घेतली नंतर त्यानी आपसात एकत्र कुटुंबात घरगुती, पारंपरिक पधतिने वाट्प केली नंतर त्याना व्यवारिक आड्चनी येउ नये म्हनुन त्यानी सर्वानी एकत्र 1992 साली तसीलदार यांच्या कड़े वाट्प करुण मिळावे यासाठि अर्ज़ केला व त्या प्रमाने तसीलदार यानी कलम ८५ प्रमाणे कग्दोपत्रि प्रत्येकास समान ( 1 हे 30 आर ) वाट्प केलें व तसा फेरफार पण झाला आहे व सरकारी मोजनी करुन घ्यावी असा आदेश केला होता व त्या प्रमाने सर्वानी सरकारी मोजनिसाठि अर्ज़ केला होता, सरकारी मोजनी 1994 साली आली पन मोजनी करतेवेळि काही वाद निर्मान ज़ाले त्या मुळे सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं. नंतर तेव्हपासुन आज पर्यंत सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं व आता सर्वजण सरकारी मोजनी साठी तयार होत नाहीत, व त्या 4 पैकि एकने 1 हे 36 आर जमीन विकलि आहे, म्हन्जे 6 आर जमिन जास्त वीकली आहे
तर आता मि आमच्या हिस्यास आसनारी 1 हे 30 आर जमीन मिळवीण्यासाठी कुठे दाद मागावी.
Question by शीतल जाधव
15-04-2020
jadhavdineesh@gmail.com
मी सौ.शीतल जाधव. माझ्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मोशी, पिंपरी चिंचवडमध्ये, निवासी क्षेत्रात जमीन आहे. सदर जमीन माझ्या पणजोबा (आईचे आजोबा) यांनी आजोबांच्या नावे केली होती. आता माझी आई ह्यात नाही परंतु आजोबा ह्यात आहेत.सदर जमीन सात-बाऱ्या वर माझे नाव लावू शकते का ? असेल तर त्यासाठी खर्च जास्त आहे का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by सागर
14-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
गाव नकाशा प्रमाणे माझ्या मालकीचा गट न.२४४ असून त्यालाच लागून शेजारील व्यक्ती चा गट न.236 आहे.ह्या दोन्ही गटाच्या मध्ये पाणी जाण्यासाठी बरेच वर्षा पासूनचा 10 ते 12 फूट रुंद नाला आहे पण त्याचा उल्लेख रेकॉर्ड मध्ये नाही.आत्ता ह्या जागेतून इतर शेजारील व्यक्ती पावसाळा सोडून इतर हंगामा मध्ये ये जा करत असतात ..
१.तर भविष्यात जा ये करणारे लोक ह्या जागेचा रस्ता म्हणून मागणी तहसीलदार यांच्या कडे करू शकतील का?
२.वाहणाऱ्या पाण्याच्या जागेला तहसीलदार रस्ता म्हणून देऊ शकतील का?
२.तसेच आम्ही शासकीय मोजणी करून आमची हद्द कायम करून सदर सोलडलेली जागा ताब्यात घेऊन नंतर ती बीजवून शेती करू शकतो का?
Question by Vishal sabale
13-04-2020
Vsable@dyahoo.com
नमस्कार साहेब,1) माझा प्रश्न असा आहे की पहिल्यांदा म्हणजे सन 2007 पूर्वी जिरायत शेतजमिनीचा तुकडा विकण्यासाठी जसे की 4 किंवा 5 गुंठे वर्ग 1 जिरायत शेतजमिन विक्री करण्यासाठी जमिन विक्रेत्याने तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते काय ?
2) जिल्हाच्या प्रादेशिक आराखडा बघितला असता त्यात नगरपंचायत हद्दीचा कोणताही भाग शेती विभागात दाखवला नाही आणि नगरपंचायत विकास आराखडा प्रसिद्ध झाला नाही मग नगरपंचायत हद्दीतील माझी जमिन नक्की कोणत्या झोन मध्ये येते याचा शोध कसा घ्यावा ?
Question by रामनाथ सोनवणे
12-04-2020
sssgunjal@gmail.com
नमस्कार सर,
मी व माझा मोठा भाऊ आमची दोघांची ५ बिघे जमीन असून ती समहिक आहे. सातबाऱ्यावर दोघांचे नाव असून त्यापुढे समाहिक क्षेत्र असे नमूद आहे. पण तो मला माझ्या हिष्याची जमीन वाटून देत नाही, तसेच तो मोठा असल्यामुळे शेतीसाठी येणारे सर्व अनुदान व सुखसुविधा तोच घेतो, अगदी मला माझी जमीन सुधा वाटून देत नाही, वाटप पत्र करून देत नाही...वाटप पत्र करून मागितले की शिवीगाळ करतो...मला असे वाटते की शेतीसाठी येणाऱ्या अनुदानाचा मला पण लाभ मिळवा, अन्यथा ते अनुदान शासनाकडे परत जावे. कमीत कमी मला माझ्या हिष्यची जमीन तरी वाटून मिळावी, यासाठी मला काय करता येईल यासाठी कृपया तुम्ही मला सल्ला द्यावा ही नम्र विनंती....
Question by Ajinkya Durgule
10-04-2020
ajinkyadurgule5067@gmail.com
Sir , aamhi jamin 2000 year la kharedi keli aahe , aamachya satbara utaryavar upvibhagiya adhikari ghuntewari bigarsheti aadesh nond & no. lihila aahe tar ti jaminichi NA order zali asel ki nahi & asel tar kay tyachi prat konatya office madhun ghyayachi bank loan la problem yet aahe tar kay karave
Question by सागर
10-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
आदरणीय सर ,
गुरेंचरण जमिनीच्या सातबारा उताराच्या इतर हक्कात काही शेरा , किंवा काही जूनी + नवी शर्त असते का? तसेच भोगवटदार वर्ग काय असतो?
जमीन ही गुरेंचारण्या ची आहे किंवा होती हे कसे समजते ?
शासनाचे गुरेंचारण जमिनी बद्द्ल काही अध्यादेक आहे का?
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
शासकीय सेवकास प्लॉट खरेदी करावयाचा असल्यास त्याआधी याबाबतची माहिती कार्यालय प्रमुखास लेखी कळविणे आवश्यक आहे का सर या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, एखादा लिपीक मागील 5 वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आरोपाखाली निलंबीत आहे त्यांचेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यावरील सर्व दोषारोप सिद्ध झाले आहे सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असल्याने शिक्षेचा आदेश पारीत करण्यात आलेला नाही. आता सदर कर्मचारी यांना लिपीक पदावर शासन सेवेत पुनरस्थापित करण्यात आले आहे तर सदर कर्मचारी यांना पदोन्नती देता येते का सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by विजय रा पोवळे
08-04-2020
powalevijay@gmail.com
सर,माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला भाऊ नाही पण वडिलोपार्जित जमिनीत आईच्या चुलत चुळत्याची नावं 7/12 वर माझ्या आजीच्याअज्ञानपणामुळे ती नावं चढली आहेत .ती नावे काढावयाची आहेत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .धन्यवाद.
Question by संजय हंडे
05-04-2020
sanjhande@gmail.com
सर ,मंडळ अधिकारी यांनी विनाकारण फेरफार रद्द करीत असल्यास किवा onlain आलेला फेरफार रद्द केल्यास दाद कोणाकडे मागावी .
महसूल अधि. मध्ये शिक्षेची काही तरतूद आहे का.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
