जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझ्या बाबांना मिलिटरी रिटायर्ड झालेवर सरकारी जमीन मिळाली आहे
तसेच माझ्या वाडीतील एका व्यक्ती ला सुदधा सरकारी जमीन मिळाली आहे सर्वे नंबर एकच आहे
सातबारा उतारा सुद्धा एकत्र मग ती जमीन वेगवेगळी कशी करता येईल
जिल्हाधिकरी यांचे जमीन प्रदान आदेश बरोबर , क्षेत्राचा नकाशा देणे आवश्यक होते . आपण जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून दोघांचे क्षेत्र विभागून ( ७/१२ स्वतंत्र करून ) देणे बाबत अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर , आमच्या शेतातून मुख्यमंत्री ग्राम सडक मार्ग जात आहे, आमच्या उताऱ्यामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही तसेच गाव नकाश्यामध्ये सदर रस्त्याचा उल्लेख नाही, आता रस्ता ३० फूट रुंदीने वाढत आहे यामध्ये आमचे १ एकर क्षेत्र रस्त्यात जात आहे तरी यासाठी काही मोबदला मिळेल का किंवा नुकसान भरपाई कशी मिळवली जाईल.
घटनेच्या अनुच्छेद ३१ अ नुसार , नुकसान भरपाई दिल्याशिवाय , जमीन संपादन करता येत नाही अथवा त्या व्यक्तीकडून जमीन काढून घेता येत नाही .
संबंधित विभागास नोटीस पाठवून , नुकसान भरपाई मागा , अन्यथा न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मोठा भाऊ वडील असताना संपत्तीचे हिस्सा मागत आहे तर त्याचा पूर्ण हक्क सोड करण्यासाठी किती खर्च येईल आणि काय करावे लागेल
वडिलांना जमीन त्यांचे वडिलांकडून आलेली असेल तर , भावाची मागणी रास्त आहे . मात्र वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित असेल तर , भावाला जमीन मागता येणार नाही .
वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपास अल्प खर्च आहे . २०० रुपयेच मुद्रांक शुल्क लागते . दस्त करून नोंदणीकृत वाटप करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खरीदीखता ने बिगर शेत जमीन नावे करण्यास अर्ज दिला आहे तर त्या नुसार फेरफार नोंद दाखल किती दिवसात करण्याचा नियम आहे व त्यासाठी तलाठ्याकडे किती रूपये भरावे लागतील.आणि जर तलाठ्याने एका महिण्यात नोंद केली नाही तर तक्रार कोणाकडे करावी.
नोंद मंजूर करण्यास १५ दिवसाचा कालावधी आवश्यक आहे
तलाठी टाळाटाळ करत असेल तर , तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१५ गुंठे शेत जमीन सार्वजनिक संस्थेंस दानपत्रा ने हस्तान्तरित करता येईल का


या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे तुकडे बंदी कायद्याची बाधा , खालील किमान क्षेत्राचे हस्तान्तरं करण्यास आहे
5 आर - बागायत
१५ आर - एक पैकी
२० आर - वरकस
मात्र हे प्रमाण जिल्हानिहाय वेगळे आहे . तपासून घ्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,वसुली व विक्री अधिकारी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील जप्ती आदेशाने का.तलाठी यांनी जमीनदाराच्या ७/१२ तील इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद घेतली आहे.सदर आदेशाच्या नोंदीवर संबंधितास का.तलाठी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करता येईल का?किंवा कसे ? कारण संबंधित तलाठी तक्रार दाखल करून घेत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
तलाठी यांनी वसुली अधिकारी यांचे आदेशाने , जप्त केले बाबत नोंद घेण्यात आलेली आहे . त्या विरुद्ध तलाठी यांचे कडे तक्रार करता येणार नाही. प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दि.११/१०/१९८० रोजी फेरफार क्र.१०४६ अन्वये खातेदार श्री.पांडू रामजी सुर्वे मयत झाले असुन त्यांचे वारस पत्नी-भागीबाई पांडू सुर्वे व मुलगी एकच – शेवंतीबाई पांडू सुर्वे त्यानंतर दि. १९/११/२०१९ रोजी फेरफार क्र. १४८८ प्रमाणे खातेदार श्रीम. भागीबाई अनंदी पांडु सुर्वे मयत झाले असून त्यांना वारस मुलगी एकच – वैजंयती रामजी कानसे असे आहे. वैजंयती रामजी कानसे यांचे लग्नापुर्वी चे नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे असे आहे. शेवंतीबाई पांडू सुर्वे व वैजंयती रामजी कानसे या दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहे. ७/१२ सदरी चुकीने दाखल झालेला लग्नापूर्वीचा नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे कमी करण्यास काय करावा ?
शपथ पत्र दाखल करून तहसीलदार यांच्छेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर सर माझी जमीन धरणाच्या बँक वॉटर मध्ये संपा दित होत आहे तर माझ्या जमिनीत अजून 2 हिस्सेदार आहे तर आमची आणे वारी झालेली नाही व माझ्या हिस्सावर जी जमीन आहे तीचा पूर्ण हिस्सा जात आहे व जे 2 हिस्सेदार आहे त्यांची कमी जमीन जात आहे तर आम्ही जो मोबदला मिळेल तो कसा वाटायचा
आपले हिस्सेदार नटे संबंधातील आहेत कि त्रयस्थ आहेत ? जर त्रयस्थ असतील तर , खरेदी खतात क्षेत्राचा तपशील समाविष्ट असेल . क्षेत्राचा तपशील समाविष्ट नसेल तर मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ प्रमाणे , ज्या प्रमाणात आपण खरेदी मंडळ विक्रेत्यास दिला त्या प्रमाणात , क्षेत्र विभागणी होईल .
संबंधित भू संपादन अधिकारी या बाबत निर्णय घेतील . जर चुकीचे apportionment केले तर , नोटीस आल्यावर हरकत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गावातील गावठाण मध्ये माझ्या वडिलांच्या नावावर मोकळी जागा आहे. माझ्याकडे 1965 पासून ते आता पर्यंतचे त्या मिळकत क्रमांकाचे 8 अ उतारे आहेत. परंतु ग्रामपंचायत त्याजागेवर आपला हक्क सांगत आहे. आणि त्यांना आमच्या नावावरील उताऱ्याबद्दल विचारले असता ते तुमची जागा ती नसून दुसरीकडे असेल असे उत्तर देत आहे तर त्याला पर्याय काय आमची गावठाण मधील जागा आम्ही कशी शोधायची.
गावाचे भू सर्वेक्षण ( सिटी सर्वे ) झाला आहे का ? म्हणजे गावठाणातील जागांचा मिळकत पत्रिका उतारा आहे का ? असल्यास आपणास भूमी अभिलेख खात्यात त्या जागेचा सर्वेक्षण नकाशा मिळेल .
नसल्यास , मोकळ्या जागेवर आपला ताबा आहे हे दाखवणारा काही पुरावा आले का ? जशे कुंपण करणे , काही सामान ठेवणे . जागेची घरपट्टी भरलेली असल्यास , त्याच्या पावत्या .
ह्या पुराव्याच्या आधारे आपण , जागेवर पुढील विकास करा . ग्राम पंचायतीची त्यासाठी परवानगी मागा. परवानगी नाकारल्यास , विकास तरीही सुरु ठेवा . त्यास ग्राम पंचायतीने प्रतिबंध केल्यास , त्यांचे विरुद्ध , न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
05-11-2019
navale.sagar123@gmail.com

१)सर नोटरी आणि रजिस्टर अफिडेट यातील फरक काय?
2)हे दोन्ही चा कालावधी (validity ) किती दिवस चालते?
दस्त/अभिलेख notorize हा नोटरी कडे होते . affadavit हि नोटरी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडे होते . कायदेशरी पुरावा म्हणून दोनीही मध्ये फरक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1)ग्रामपंचायत हद्दीतील -वस्ती मधील 50 वर्षे पूर्वीपासून अस्तित्वात असणारा रस्ता ग्रामपंचायतकडे हस्तांतरित झालेला नसेल,
तो रस्ता ग्रामपंचायतने 10 फूट रुंद डांबरीकरण आणि नंतर काँक्रिटीकरण केलं असेल आणि
गावकऱ्यांना वापरासाठी तो एकमेव रस्ता असेल तर अशा रस्त्याची नोंद सरकार दफ्तरी होण्यासाठी कोणता नियम/कायदा आहे का ?
रस्ता ग्राम पंचायतीकडे हस्तांतरित करणे म्हणजे सरकारी दप्तरी नोंद करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,माझ्या पत्नीची माय आजी तिची जमीन माझ्या पत्नीच्या नावे करू इच्छिते.आजीला एकच अपत्य आहे.ती म्हणजे पत्नीची आई.दोघीही ह्या बाबतीत स्वेच्छेने तयार आहेत.तर हक्कासोड किंवा बक्षिसपत्र करता येईल का.आणि सर्व जण आदिवासी समाजाचे ,रक्ताच्या नात्यातले आहेत.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजी ला जमीन तिचे वडिलांकडून /आई कडून प्राप्त झाली असल्यास २०० रु मुद्रांक शुल्क भरून नाव वर करता येईल
मात्र आजीची स्व कष्टर्जित असेल तर , जमीन बाजार भावाच्या ३ % मुद्रांक शुल्क भरून , बक्षीस पत्र आपले नावा वर करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे पणजोबा १९६८ मध्ये वारले. वारस रजिस्टर १९७१ साली होऊन जमिनीसाठी ६३ या नंबराच फेरफार तयार झाला पण हा फेरफार no 63 तहसील ऑफिस आणि तलाठीऑफिसमध्ये मध्ये आढळ होत नाही ते कर्मचारी पानं फाटल्याचे सांगतात. पण मला दिवाणी कामासाठी तो फेरफार नक्कल हवी आहे. कशी मिळवू ?

Question by अमोल
30-10-2019
amolsalunkhe@rediffmail.com

माझ्या आईच्या चुलत भावाने माझ्या आजीची जमीन त्याच्या १३ वर्षाच्या मुलाच्या नावाने केली आहे. त्याच्या म्हणण्या नुसार १९९९ साली खरेदी केली आहे. तो मुलगा आता ३२ वर्षाचा आहे. माझ्या आजोबांचे १९९६ ला निधन झाले. ही वडिलोपार्जित शेती आहे. हा व्यवहार बेकायदा ठरू शकतो का कुठे दाद मागावी ? कृपया मार्गदर्शन करावे
आजोबांची जमीन होती . आजोबांचे निधनानंतर , आजीचे नावावर झाली . त्या नांतर , त्याचे म्हणण्यानुसार , आजीने खरेदी ने दिली . खरेदी खात झाले आहे का ? हे पहा . झाले असल्यास आजीस केवळ तिचा हिस्सा विकत येऊ शकतो . आजीशिवाय आपली आई व अन्य सरळ उतरते वारस , यांचा हिस्सा आजी विकू शकत नाही . दावा दाखल करून जमीन आपल्यायाला मिळू शकते . स्तहनिक वकिलांचे सल्ल्याने पुढील कारवाही करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर फाळणी ने नाव कमी झाले असेल तर ते पुन्हा ७/१२ वर कसे घ्यावे ?
माझे वडील १९९८ ला वारले ,मला आई व ३ बहिणी आहेत ,त्यात १ व २ बहिणी चे लग्न नाही झाले , ३ नंबर बहिणीचे लग्न झाले आहे ती चे नाव ७/१२ मधून काडून टाकाय चे आहे ती ची मुले हक्क सोड पत्र करून देण्या साठी नकार देत आहे . तर काय करावे लागेल ?
१] हिंदू उत्तराधिकारी अधिनियम २००५ वापर होईल का ?
२] शेत जमीन न देता मोबदला किती द्यावा व ते कुठून माहिती करावे ,ते दलाला मार्फत मोबदला खूप मागत आहेत ?
३] कोर्टात न जात काय करावे लागेल ?
२००५ चा कायदा , वाटपासाठी लागू आहे . नाव कमी करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या मालकी हक्काच्या मिळकतीत एका गावगुंड्या ने अतिक्रम करून माझा रहदारीचा रस्ता बंद करून माझी ६ गुंठे जमीन बळकावली , या संबंधी मी तहसील कार्यालयात सर्व जमिनीचे व अतिक्रमण झाल्याचे व हद्द मोजणीचे पुरावे दाखल करून तक्रार केली , तहसील कार्यालया मार्फत चौकशी करून सदर कुंपण काढून टाकण्या बाबत त्याला आदेश देण्यात आला , आदेश देऊन २ वर्ष झाली पण त्याने कुंपण काढले नाही , या कालावधीत मी दोन वेळा पोलिसात तक्रार केली, पण पोलिसात येऊन " मला तहसीलदार कार्यालयाचा आदेश मिळालाच नाही ,आदेश मिळाला की मी कुंपण काढून टाकेन " अशी कबुली जबाब त्याने दिला , आत्ता मी या गावगुंड्या ला तहसीलदारां मार्फत मिळालेलं पत्र त्याच्या सही सहित माहिती अधिकारात काढले आहे , पोलिसात दिलेला कबुली जबाब सुद्धा काढला आहे , पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करा .
आपला अडवलेले रास्ता , पुन्हा पोलीस बंदोबस्तात , तलाठी यांचेकडून कडून मोकळा करून घ्या
पोलीस यांना खोटी /चुकीची माहिती दिली अशे आपले म्हणणे असल्यास , आपले इच्छे नुसार पुढील कायदेशीर कारवाई त्या व्यक्ती विरुद्ध करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishal pawar
20-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com

सर आमचा गावाला वनीकरण विभागाची जागा आहे
ती जागा आम्हला करारावर किवा भाडे तत्त्वावर पाहिजे
त्या साठी काय करावे लागेल.
सर मदत करा प्लीज.
आदरणीय सर , आमच्या आईच्या नावे अमरावती जिलह्यात जमीन आहे.आईच्या मृत्यून॓तर आम्ही वारस नोंदी साठी तलाठ्याकडे अर्ज व कागदपत्रे दिली.तलाठ्याने सर्व वारसांची नोंद गाव नमुना ६क मध्ये केली व आम्हां सर्व वारसांना नोटिस पाठवली ज्यात कोणाला काही हरकत असल्यास १५ दिवसात कळवावे अन्यता फेरफार मंजूर करण्यात येईल.मला आपल्याला विचारायचे आहे की सदर नोटिस सर्व वारसदारांनी सही करून परत तलाठूयांकडे पाठवणे बंधनकारक आहे का? आम्ही सर्व वारसदार एकाच कुटुंबातील असून मयताशी रक्ताचे नाते आहे व आमचा फेरफार नोंदीस कोणताही विरोध नाही.असे असताना सुद्धा २महिने झाले तरी आमचे नाव ७/१२ ला अजून आले नाही.कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
तलाठी यांनी , सर्व वारस गावात राहत नसतील तर , जागेवर महाराष्ट्र जमीन अधिनियम कलम २३० प्रमाणे जागेवर नोटीस प्रसिद्ध करावी . पंचनाम्याचे ( नोटीस प्रसिद्धी बाबत ) वारस नोंद मंजूर करावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vishal pawar
19-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com

sir amcha Gavala vanikarn jamin ahe tar ti amala kararaver kiva bhadi ver pahiji tey sati kay karave lagel
नमस्कार सर आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?
परवानगी असेल तर , ग्राम सेवक आपणास घर पट्टी भरून घेण्यास नाकारू शकत नाही .
गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर,,
नगरपंचायत क्षेत्रात पेसा कायदा लागू होतो का???
''संपूर्ण अनुसिचित क्षेत्र'' याचा अर्थ काय होतो??



नगरपंचायत निवडणुकीत नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना एकूण सदस्‍य संख्‍याच्‍या 27% जागा राखून ठेवण्‍यात येतात.


मात्र, संपूर्ण अनुसूचित क्षेत्रा बाबतीत अनुसूचित जाती / जमातीचे सदस्य वगळून,, उर्वरित सदस्य संख्येच्या 27% सदस्य नागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात का?? या संबंधी शासन आदेश/माहिती द्यावि.
Panchayat ( Extension to Scheduled Areas) Act हा अद्याप पर्यंत शहरी भागास लागू केला नाही '
अनुसूचित क्षेत्रात ५० % जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तपासून देतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकञीकरण योजनेअंतर्गत गाव फाळणी बारा तयार करताना खरेदीने घेतलेल्या शेतजमिनीचे क्षेत्र कमी झाले असल्यास कोणत्याही कायदेशीर फेरफार जाब जबाब शिवाय केवळ एकञीकरण अधिकारी यांनी फाळणी बारा तयार केला या पञाद्वारे 7 एकर क्षेत्र कमी झाले आहे... तर ते कमी झालेले क्षेत्र मला परत मिळेल का? ?? जर होय तर त्यासाठी मला कोठे कायदेशीर प्रक्रिया करता येईल? ??
इतर अधिकारामध्ये विहिर हक्काची नोंद फेरफार ने कमी केली तसा फेरफार तयार झाला व नावाला कंस झाला परंतु सदर फेरफार समोर रद्द चा शेरा दिला 7/12 पञकी फेरफार नंबर लिहला होता त्यावर रद्द लिहिले माञ नावाला कंस तसाच राहिला व नंतर नाव उता-यावरून कमी झाले आहे अशा स्थितीत इतर अधिकारात नाव कायम यावे यासाठी काय करावे.
आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3