जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

साहेब नमस्कार ,
मी राहुल सावंत माझ्या मावस भावाला बदलापूर -ठाणे जिल्हा, येथे गावठाण मध्ये चाळ टाईप मध्ये रूम घ्यायचा आहे. तरी बिल्डरने सांगितले आहे कि मी ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन सदर चाळीचे बांधकाम केलेले आहे . करारनामा नोटरी करून देणार आहे, जमीन मालकाशी बांधकाम करण्याचा करार केलेला आहे, सदर रूम विकत घेतल्यावर ग्रामपंचायत मधून घर पावती माझ्या भावाच्या नवे येईल असे बिल्डरने सांगितले आहे . सदर चाळीतील रूम माझ्या भावाने घेणे योग्य आहे काय ? बिल्डर व माझा मावस भाऊ यांच्या मध्ये करारनामा नोटरी असल्या मुळे भविष्यात त्याला काही अडचणी येऊ शकतात काय ? तरी साहेब मला आपण योग्य ते मार्गदर्शन करावे हीच नम्र विंनती
सर नमस्कार
एक वडिलोपार्जित सामायिक मिळकतीचा फेरफार नोंदवितानाच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अफ़रातफ़रीच्या व आक्षेपार्ह्य गोष्ठी घडल्या आहेत.
१. फेरफार नोंदवल्या नंतरच्या नोटीसवर ज्या लाभार्थी व्यक्तीने सही केली आहे ती व्यक्ती फेरफार नोंदवण्याचा दोन दिवस आधीच परदेशी निघून गेली होती. (पासपोर्ट वरील नोंद पुरावा म्हणून दुसऱ्या एका महसूल प्रकरणात दाखल आहे). म्हणजेच प्रत्यक्षात तलाठी यांनी फेरफार आधी नोंदवलाय मात्र तारीख पुढची टाकली आहे.
२. लाभार्थी व्यक्तीने केलेल्या अर्जावरील कोर्ट फी स्टॅम्प वर फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतरची तारीख आहे. म्हणजे फेरफाराचा अर्ज फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतर केला आहे.
३. अर्जावर सादर केल्याची व स्वीकारल्याची तारीख नाही. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नोंद रीकामी आहे.
४. मिळकती बाबत फेरफारात माझ्यावर अन्याय करणाऱ्या चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
या बाबत तेहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यावर त्यांनी तलाठी यांचेकडून स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे. फेरफार अजून मंजूर होणे बाकी आहे. चुकीच्या नोंदी असणारा फेरफार होऊन देणे व त्याबाबत नंतर RTS अपील भांडत बसणे मला टाळायचे आहे. तरी या प्रकरणात
१. फेरफार नोंदणी प्रक्रियेचे योग्य पालन झाले नाही म्हणून फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?
२. किंवा कोणत्या मार्गाने फेरफार मंजूर होण्याआधीच रद्द करता येईल?
(माझ्या मिळकतीचा हक्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. तलाठी यांचेवर कारवाई होणे किंवा न होणे माझ्यासाठी गौण आहे.)
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
सर नमस्कार व आपण आधीच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराबद्दल धन्यवाद

महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?

धन्यवाद


आदरणीय सर,कु.का.क.४३ ची जमीन ,साऱ्याची ...पट रक्कम भरून भोगवटादार वर्ग १ झाली आहे.सदर जमीन आता रहिवासी झोनमध्ये आहे.तसेच म.न.पा.हद्दीमध्ये आहे.तरी सदर जमीन बिनशेती करणेकामी आता चालू बाजारभावाच्या ५० टक्के नजराणा रक्कम भारवी लागते का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती......
पूर्वी पाटीलकी म्हणून एका व्यक्तीला ४० एकर जमीन मिळाली आहे. तो व्यक्ती आदिवासी समाजापैकी आहे. पैकी २० एकर जमीन बिगर आदीवासी व्यक्तीला विकली आहे. सदरचा व्यवहार १९७१, १९७२, १९७३ ला म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट कायदा सुधारणा कायदा १९७४ अगोदर विकली आहे. आता त्या व्यक्तीच्या वारसांनी अर्ज दाखल केला आहे कि सदर च्या विक्री व्यवहारामध्ये शासनाची मान्यता घेतली नाही. तर त्या व्यवहार साठी बिगर आदिवासी व्यक्तीला हस्तांतरण करणेसाठी शासनाच्या पूर्वमान्यतेची अवश्यकतेचा मुद्दा विचारात घ्यावा लागेल काय ?

Question by amol ahire
17-12-2016
amolahire585@gmail.com

sir maze panjoba Mavashi kade dattak ale hote alyavar mavashila mulga zala tyani mazaya panjoba la estate dili nahi tya nanatar panjoba ne vikat jamin gheun tyach gavala sthakai zale.. Tar mazya panjoba agodarchya gavi jamin hoti panjoba natar maze baba varas lagale ti jamin 112 acre hoti ti padit rahili amhala mahit nawate tar ti sarkar jama zali 2003 paryant mazaya babache nav utaryavar hote ti jamin bhogvatdar 1 khalasa jamin hoti at ti jamin milwayala kay karave lagel.... Sir krupaya margdarshan karave sir please reply me.
Sir apache VADILOPARJIT jamin sarkar जमा zali ahe kay karave lagel
सरकार जमा होण्याचे कारण काय हे बघावे लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय,
एका व्यक्तीला एका गावामध्ये १.६२ हे आर सिलिंगची जमीन मिळाली.ती व्यक्ती मयत झाली.तिला वारस दोन मुले असून त्याचे नावे ७/१२ ला लागली आहे.त्या मुलांना आपसी वाटणी करून जमीन स्वतंत्र पणे आपले नावे करून जमिनीची स्वतंत्रपणे वहिवाट करावयाची आहे.जमीन स्वतंत्रपणे वेगळी करता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र शेतजमीन ( कमाल मर्यादा धारणा )कायदा १९६१ च्या कलम २९ ब प्रमाणे अतिरिक्त झालेली जमीन वाटप केली असल्यास ,अश्या जमिनीची विभाजन , जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यात यावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

आमच्या सामाईक जमिनीमध्ये चार खातेक्रमांक आहेत , पण प्रत्यक्षात मात्र आम्हीच जमीन कसून पीक घेतो . पण सातबारा च्या मागे मात्र खुद्ध असे लिहिलेले आहे . तर फक्त आमचेच खातेक्रमांकाला फक्त पीक पाहणीवर नोंद कशी येईल , या साठी कोणाला भेटावे किंवा कोणती कागतपत्रे लागतील किंवा पीक पाहणीचा स्वतंत्र दाखला मिळतो का



आपले प्रश्नावरून सामायिक जमीन , आपण कसत आहेत . मात्र पीक पाहणी सदरी आपले एकट्याचेच नाव दाखल नाही . आपणास केवळ आपले नाव पीक पाहणी/पाणी सादरी लावण्याचे आहे .
पीक पाणी सादरी नाव लावणे बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे ) नियम १९७१ च्या नियम ३० व ३१ मध्ये कार्यपद्धती दिली आहे .
नियम ३१ प्रमाणे , अधिकार अभिलेख या परिमाणे ज्या व्यक्तीने जमीन कसणे आवश्यक आहे , त्या व्यक्ती शिवाय अन्य व्यक्ती जमीन कसत असल्यास त्याचे नाव पीक पाहणी सादरी लावण्याची कार्यपद्धती दिली आहे . मात्र अश्या अन्य व्यक्तीने दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या कसण्यासाठी घेतलेली असावी .
कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , भाडेपट्ट्याने जमीन दिलेली असणे / कसण्याबाबत बाबत लेखी संमती असणे , अथवा आपण जमीन कसत आहेत , हे जमीन मालक यांना माहित आहे व ए आपण कडून कासवणुकीबाबत , जमिनीतील उत्पन्नाचा हिस्सा दरवर्षी मोबदला म्हणून घेत आहेत .
आपण जर अनाधिकारे जमीन कसत असाल तर , केवळ आपले एकट्याचे नाव पीक पाणी सदरी लागू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठी स्तरावर एखाद्या गटाची फोड करून वेगळा ७/१२ केला असेल तर तो योग्य व कायदेशीर ठरतो का?. सदरच्या गटाची फोड फेरफार करणे अगोदर केलेली आहे त्यामुळे सदरचा ७/१२ कायदेशीर कामासाठी वापरता येईल का ?
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९६१ च्या कलम ३१ अन्वये गटाची विभागणी /फोड जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by amol ahire
15-12-2016
amolahire585@gmail.com

sir maze panjoba Mavashi kade dattak ale hote alyavar mavashila mulga zala tyani mazaya panjoba la estate dili nahi tya nanatar panjoba ne vikat jamin gheun tyach gavala sthakai zale.. Tar mazya panjoba agodarchya gavi jamin hoti panjoba natar maze baba varas lagale ti jamin 112 acre hoti ti padit rahili amhala mahit nawate tar ti sarkar jama zali 2003 paryant mazaya babache nav utaryavar hote ti jamin bhogvatdar 1 khalasa jamin hoti at ti jamin milwayala kay karave lagel.... Sir krupaya margdarshan karave
शासन जमा झालेबाबत चा फेरफार कृपया मेल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SANTOSH MORE
14-12-2016
santoshpmore9@gmail.com

खरेदी दस्त निबंधक कार्यालयात दाखल केल्यापासून किती दिवसाचे आत खरेदी देणार व साक्षीदार यांचे निबंधक यांचे समोर सही होऊन खरेदी दस्त नोंद होणे बंधनकारक आहे .
सहकारी संस्थेस जमीन खरेदी करताना शासकीय नोंदणी फी माफ असते काय ?
श्री. किरण पानबुडेसो नमस्कार,
सर आमचे सिटी सर्वे चे गावठाणातील प्लॉट नंबर १८ व २२ चे अपील औंषतः मंजूर झाले आहेत. आता प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजून देणार आहेत. तशी त्यांनी आम्हाला नोटीस दिली आहे कि कागदपत्रे घेऊन तारीख 16 डिसेम्बर ला हजर रहावा. स्थळ ग्रामपंचायत कार्यालय / वाद मिळकत स्थळी वेळ दुपारी ३ वाजता दिली आहे. म्हणजे आम्ही आता ग्रामपंचायतीत गेलो नाही तरी चालेले का ? आमच्या निकाल दिलेल्या जागेवर त्यांची वाट बघत थांबलोतर चालेल का ? कारण ग्रामपंचायत आमच्या विरोधातील आहे. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
मोजणीसाठी जागेवरच थम्बने आवश्यक आहे . तथपि त्यांनी नोटीस द्वारे आपणास ग्राम पंच्यात कार्यालयात बोलावले असल्यास , जाणणे योग्य

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार दोगा भावामधे घेतलीली जमीन दुसर्या भावाची सहमती घेनयाआधी विकू शेकतो का?
जमीन सामायिक खरेदी करताना जर , खरेदी खतात , एक सह धारक दुसऱ्याचे संमतीशिवाय विकू शकणार नाही असा उल्लेख असेल तर , विकत येणारनाही .
तासेसिद्घ हिंदू वारसा कायदा कलम २२ अन्वये , जर दोन भावांची नावे , वारस म्हणून लागली असतील , ट्रॅकला दुसऱ्याचे संमतीशिवाय विकत येणार नाही
आपले म्हणण्यानुसार जमीन सामायिक खरेदी केली आहे , , dast तपासून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by किशोर
13-12-2016
brsawalkar@gmail.com

नमस्कार सर,माझा प्रश्न असा आहे की मी ज्या घरात राहतो त्या घराचा पी.टी.आर. माझ्या आजोबांच्या नावाने आहे.माझ्या आजोबाना चार मुले आणि दोन मुली आहेत.सादर घरात मी मागच्या २० वर्षांपासून राहतोय.माझे आजोबा मयत आहेत .तर आता सादर जागेचे हक्कसोडपत्र माझ्या चुलत्यांकडून आणि आजी कडून सरळ माझ्यानावे करता येईल काय ????या कामी कोणकोणती कागदपत्रे लागतात ???आणि हक्कसोडपत्र कोणाकडे करावे लागते ?? १०० रुपयांच्या बॉन्डवर नोटराज्ड हक्कसोडपत्र केले तर चालते का ????तसेच हक्कसोडपत्र करण्यासाठी वारस प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे काय ??? कृपया मार्गदर्शन करावे.
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्याबाबतचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्‍या लाभात, स्वेच्छे्ने आणि कायमस्वरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.

हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेसदार हक्कसोडपत्र करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या‍ हिस्याच्या मिळकतीपुरते हक्क्सोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्से‍दार यांच्या लाभात करु शकतो.

हक्कंसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या‍ किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या‍ हिस्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.

हक्कसोडपत्र कोणाच्या् लाभात करता येते ?
फक्त त्या्च एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या‍ एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीच्या् लाभात झालेला दस्त‍ हक्कसोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा दस्त म्ह्णून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्व्ये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.

हक्कसोडपत्राचा मोबदला
सर्वसाधारणपणे हक्क्सोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्से्दार यांच्या् लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्या‍मुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.

हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे काय?
होय, हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्ययक आहे अन्यथा त्या‍ची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र म्हणजे दान/बक्षीस पत्र. हक्कसोडपत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ कलम १२३ अन्वये असे दान/बक्षीस द्वारे झालेले हस्तांतरण नोंदणी झालल्या लेखाने करणे आवश्यक असते.
नोंदणी अधिनियम १९०८, कलम १७ अन्वये स्था‍वर मालमत्तेचे दान लेख यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

हक्क सोडपत्र कसे करावे ?
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त‍ सदस्यांच्या लाभात हक्क सोडपत्राचा दस्त‍ करता येतो.
असा दस्त‍ रक्क्म रु. २००/- च्या (अद्यदयावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्याा दस्तात खालील गोष्टी. नमूद असाव्यात.
 हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
 हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
 एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
 एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सानिहाय विवरण.
 दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
 दस्ताचे निष्पादन व नोंदणी.
 हक्कसोडपत्र, स्वत:च्या हिस्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्कसोडपत्र स्वत:च्य हिस्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वत:च्या हिस्याच्यां कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.

हक्क्सोडपत्राची मुदत
हक्क्सोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्या इतपत पुरावा असावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर आपला उपक्रम खरोखरच चांगला आहे.ग्रामीण मध्ये लोकांमध्ये जागृती अभावी बऱ्याचदा कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष होते वत्याचा पुढील पिढीला त्रास सहन करावा लागतो. साहेब माझा प्रश्न हक्कसोडपत्रासम्बंधित आहे.हक्क सोड पत्र कौनकौन नातेवाईक करू शकतो.सख्खे भाऊ बहीण व्यतिरिक्त आई पण करू शकते का ?फार पुर्वीची मालमत्रता असेल तर पुढील पिढीत जसे की मयत आत्याचे वारस मुले वा नातू यांचे हक्कसोड पत्र होऊ शकते का ?कृपया सविस्तर माहिती दिली तर बरे होईल.आपला आभारी आहे.
सर नमस्कार
एक वडिलोपार्जित सामायिक मिळकतीचा फेरफार नोंदवितानाच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे अफ़रातफ़रीच्या व आक्षेपार्ह्य गोष्ठी घडल्या आहेत.
१. फेरफार नोंदवल्या नंतरच्या नोटीसवर ज्या लाभार्थी व्यक्तीने सही केली आहे ती व्यक्ती फेरफार नोंदवण्याचा दोन दिवस आधीच परदेशी निघून गेली होती. (पासपोर्ट वरील नोंद पुरावा म्हणून दुसऱ्या एका महसूल प्रकरणात दाखल आहे). म्हणजेच प्रत्यक्षात तलाठी यांनी फेरफार आधी नोंदवलाय मात्र तारीख पुढची टाकली आहे.
२. लाभार्थी व्यक्तीने केलेल्या अर्जावरील कोर्ट फी स्टॅम्प वर फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतरची तारीख आहे. म्हणजे फेरफाराचा अर्ज फेरफार नोंदवल्याच्या तीन दिवस नंतर केला आहे.
३. अर्जावर सादर केल्याची व स्वीकारल्याची तारीख नाही. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नोंद रीकामी आहे.
४. मिळकती बाबत फेरफारात माझ्यावर अन्याय करणाऱ्या चुकीच्या नोंदी केल्या आहेत.
या बाबत तेहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यावर त्यांनी तलाठी यांचेकडून स्पष्टीकरण अहवाल मागितला आहे. फेरफार अजून मंजूर होणे बाकी आहे. चुकीच्या नोंदी असणारा फेरफार होऊन देणे व त्याबाबत नंतर RTS अपील भांडत बसणे मला टाळायचे आहे. तरी या प्रकरणात
१. फेरफार नोंदणी प्रक्रियेचे योग्य पालन झाले नाही म्हणून फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल?
२. किंवा कोणत्या मार्गाने फेरफार मंजूर होण्याआधीच रद्द करता येईल?
(माझ्या मिळकतीचा हक्क माझ्यासाठी महत्वाचा आहे. तलाठी यांचेवर कारवाई होणे किंवा न होणे माझ्यासाठी गौण आहे.)
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
तहसिलदार किंवा मंडलअधिकारी यांचेकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल करुन, फेरफार रद्द करण्याची विनंती करावी. मंडलअधिकारी त्यांवर सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेतील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. किरण पाणबुडे साहेब
नमस्कार

आपण माझ्या सर्व समस्यांचे निराकरण केलेले आहे त्यामुळे मी आपला आभारी आहे.

आपला आभारी
अमितकुमार शिर्के
सर, नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि, एखाद्याने सिटी सेर्वेला अपील १३/४/२०१६ ला केले असेल, व ११/४/२०१६ ला अपील मुदती बाबत जे. आर. निघाला असेल, तर तो जे. आर. त्या अपिलाला लागू होतो का? तो जे. आर. लागू होईल का?
त्यात अपिलाची मुदत ५ वर्षे आहे. आणि आमच्यावर अपील आमच्या नोंदी १९९३ पासून आहेत व आता अपील केले आहे तर आम्हाला लागू होईल का तो जे. आर. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
सर मी मे २०१६ मध्ये जमीन विकत घेतली. अजून मला ७/१२ मिळत नाही. तलाठी अजून वेळ लागेल म्हणतात काय करावे?
आता वेळ लागण्याचे कारण नाहीय .
तलाठी यांना लेखी उत्तर मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करावयाचे असून वाटप हे कलम ८५ प्रमाणे करावे कि नोंदणीकृत वाटप करावे.
.
नोंदणीकृत करा . मुद्रांक शुल्क लागेल मात्र ते कमी आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भिल व्यक्ती च्या नावे असलेली जमीन बिगर भिल व्यक्तीस संस्थेच्या नावे घेता येईल का?
परवानगी घ्या शासनाची

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय
सर/मॅडम
आदिवासी ने आदिवासीला ला जमीन विकायची असल्यास कुठला कायदा आहे आणि ती जमीन कश्या प्रकारे मिळवावी.

मी आदिवासी आहे माझी जमीन आदिवासी कडे गहाण होती. आता ती सोडून घ्यायची आहे तर मला कुठल्या प्रकारचे मार्ग अवलंबाव लागेल. पुढचा व्यक्ती सरकारी नोकरदार आहे तरी सुद्धा सावकारी धंदा करतो त्याच्या कडे मान्यता आहे कि नाही हे माहित नाही जर त्याने माझी जमीन मला देण्यास नकार दिल्यास मी कश्या प्रकारे ती जमीन मिळवू शकतो.
प्रस्ताव सादर करत असताना
१) तहसीलदार २) एस डी ओ ३) कलेक्टर यांच्या मार्फत जाणार ना?
आणि कलेक्टर सर ची मान्यता घायवीच लागते का?
प्रस्ताव कश्या प्रकारे सादर करावा कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार किरण सर,

वेगवेगळे असे ९ सात बाऱ्यांचे (अंदाजे २५ एकर) ४ हिस्से पाडायचे आहेत आणि त्या सर्व सात-बारयत चारही कुटुंबातल्या सर्व सदस्यांची नावे आहेत.

चौथ्या कुटुंबातील हिस्यामध्ये २ बहिणींचे नावे ७/१२ मध्ये आहेत पण आता या जमिनींचे ४ समान वाटप करताना किंवा ७/१२ स्वतंत्र करताना दोघींपैकी एक बहीण तयार होत नाही आहे, ती बहीण हक्क सोडायला हि तयार नाही आणि चौथा हिस्सा करण्यासही तयार नाही परंतु दुसऱ्या बहिणीला लवकरात लवकर वाटप करावयाचे आहे.

कृपया खालील प्रश्नाचे निरसन करावे,
१) चौथ्या कुटुंबातील एक बहीण सही करण्यास नकार देत असेल तरीही दुसऱ्या बहिणीच्या संमतीने हे वाटप होऊ शकते का?
२) सध्या हे वाटप ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मजकूर लिहून आणि चारही कुटुंबाच्या संमतीने होणार आहे. तर हि प्रक्रिया बरोबर आहे कि वाटप सरकारी कार्यालयात व्हायला हवे.

कृपया मार्गदर्शन करावे.

This page was generated in 0.71 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3