जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय,महा ज मह.अधिनियम 1966 चे कलम 85 खाली शेतजमिनीचे वाटप करताना सरस निरस जमीन ठरविण्याचे अधिकार कोणास आहे.कृपया शासनाचे निर्णय /परिपत्रक असल्यास माहिती द्यावी.

Question by amoldhamke
05-11-2016
amoldhamke67@gmail.com

क्ष इसम शासकीय बाकी न भरल्यामुळे सदर जमिनीचा लिलाव केला असता लिलाव कोणी न घेतल्यामुळे नॉमिनल बीड वर शासनाने जमीन खरेदी केली त्यानुसार कब्जेदार सादरी सरकार नाव दाखल केले व जमीन मालकाचे नाव इतर अधिकारात दाखल केले आज रोजी जमीन मालकाचे नाव कब्जेदार सादरी दाखल होण्याची विनंती करीत आहे सरकार नाव कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून कमी केली जात व त्याची काय कार्यपद्धती आहे याबाबत कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती आहे
शासनाने जमीन जप्त केली असल्यास , तीन वर्षात मूळ जमीन मालक शासकीय बाकी व जमीन आकाराचे तिप्पट रक्कम भरून जमीन परत करणे बाबत किल्ह्याधिकारी यांचेकडे अर्ज करू शकतो . ( कलम ७२ म. ज.म. अ. १९६६ )
अन्यथा ३ वर्षे होऊन गेले असल्यास खालील रक्कम भरून थकबाकीदार जमीन नावावर करू शकतो ( कलम २२०)
१. जमीन थकबाकी रक्कम
२.थकबाकीची रक्कमेच्या १/४ दंड
३.जमिनीचा शासनाकडे जमीन असलेल्या कालावधीचा आकार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ने 100 हेक्टर जमीन खाजगी शेतकऱ्याकडून खरेदी केली.सदर शेतजमीन वहिवाट करण्यासाठी पांधणरस्ते होते.ती जमीन शिल्लक आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ला त्या शिल्लक जमिनीचा कायदेशीर ताबा घेता येईल काय ? किंवा शासनाकडे त्या शिल्लक जमिनीचा मोबदला भरून जमिनीची मागणी करता येईल काय ? कृपया मार्गदर्शन करावे.याबाबत जी आर असल्यास सांगावे.
पांधण रस्ते जमीन विल्लेवाट नियम अंतर्गत शासनाकडे मागणी करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,झुडूपी जंगलाचे निर्वनीकरण म्हणजे काय ? कलम 4 ची अधिसूचना बाबत माहिती द्यावी.
निर्वनीकरण याचा dictionary अर्थ -to cut down and clear away the trees or forests from.
निर्वनीकरण म्हणजे जमिनीचा वन हा दर्जा बदलणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
नमस्कार
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांचे नावे 1970 ला वाटपद्वारे 15-15 एकर एवढी शेतजमीन त्यांचे वडिलांकडून आली आहे.

आज आम्ही आमची ताब्यातील जमीन मोजली असता ती फक्त 10 एकर भरत आहे व सात-बारा वरती तर 15 एकराचा उल्लेख आहे.

म्हणून आम्ही चुलत आजोबा यांच्या ताब्यातील जमीन मोजली असता त्यांची 20 एकर भरत आहे व सात-बारा वर तर 15 एकर आहे.

यावरुन मला असे समजले की, आमची 5 एकर एवढी जमीन चुलत आजोबांचं वहिवाटत आहेत.

मी याबाबत माझे आजोबा, वडील तसेच चुलते यांच्याशी बोललो असता त्यांना याबाबत काहीच माहित नाही, ते म्हणतात की, आपल्या ताब्यातील जमीन हि 15 एकर असेल कारण त्यांनी आजपर्यंत कधीच मोजणी केली नाही.

माझे आजोबा, वडील, चुलते हे सर्व अशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी 1970 पासून आपली जमीन 10 एकर आहे की 15 एकर हे सुद्धा समजले नाही.

मी आमच्या 5 एकर जमिनीबाबत चुलत आजोबा व त्यांची मुले यांच्याशी बोललो असता, त्यांनी डायरेक्ट आमच्याशी वाद घालण्यास चालू केला आहे व आमची जमीन आम्हांला देणारच नाहीत असे सांगत आहेत. व माझ्या आजोबांच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत.

आज मी व माझे चुलते आम्ही सर्व एकत्रच राहतो व त्यामुळे आमच्या जमिनीचे आम्ही वाटप केले नाही, व ती अजून आजोबांच्याच नावे आहे, सर्व जमीन एकाच गट नम्बरमधील असल्याने आम्हांस ती 10 एकर आहे कि 15 हे सुद्धा समजले नाही, तरी,...

1. 1970 ला वाटप झाले, तेव्हापासून आजपर्यंत 45 वर्ष झाले, चुलत आजोबा आमची जमीन वहिवाटत आहेत, तरी तिचा ताबा आम्हांस मिळू शकतो का ?

2. न्यायालयात आमची केस टिकेल का ?

3. आम्ही दावा काय म्हणून दाखल करावा.

4. चुलत आजोबा व त्यांची मुले आमच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत, व त्रास देत आहेत तरी आम्ही कोणती कायदेशीर मदत घ्यावी.

5. आज 45 वर्षांनंतर आम्हांस माहित झाले आमची जमीन किती आहे ते, व जरी न्यायालयात गेलो तरी आमची बाजु कमकुवत आहे, म्हणून विलंब माफी बाबत न्यायालयात आम्ही काय म्हणणे मांडावे.

6. माझे आजोबा, वडील व चुलते हे सर्व अशिक्षित असल्याने न्यायालयात मी माझे नावे केस दाखल केली तर चालेल का ?

7. हा दावा वकील न देता मी स्वतः चालवू शकतो का, कारण असे झाले तर न्यायालयात आमचे म्हणणे आम्हांला व्यवस्थित सांगता येईल.

8. म.ज.म. अधिनियमाच्या कोणकोणत्या कलमानुसार मला दावा दाखल करता येईल.
१. आपली बाजू कमकुवत आहे . मात्र म्हणून ५ एकर जमीन सोडून देणे योग्य नाही . आपण आपले जागेत अतिक्रमण केले आहे व ती जागा वहिवाट करण्यास चुलत आजोबा यांना मनाई हुकूम करणे बाबत दावा दाखल करा .
२.प्रयत्न करण्यास हरकत नाही
३.१ मध्ये नमूद केल्या प्रमाणे The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
४.या बाबत आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करा . हे आपणास दिवाणी दाव्यास हि उपयुक्त ठरेल.
५.न्यायालयास convince करणे आवश्यक . Limitation bars remedy but not right हे लक्षात ठेवा .
६.जमीन सध्या ज्यांचे नावावर दाखल आहे त्यांनी दावा दाखल करणे आवश्यक
७. होय . मात्र आपण विधी पदवीधर असाल तर बिलकुल हरकत नाही . मात्र अश्या दाव्यात वकील असणे हितावह ( आपले आर्थिक कुवती प्रमाणे निर्णय घ्यावा )
. २ मध्ये नमूद केले आहे . म.ज .म.अ १९६६ चे कलाम १३५ हद्दी वाद बाबत आहे . मात्र त्याचा किती उपयोग होईल ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
नमस्कारआम्ही चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहतो.

आम्ही वस्तीवरती राहतो आणि आमची वस्ती हि जवळ-जवळ 200 लोकसंख्येची वस्ती आहे.

आमची वस्ती हि चांदे खुर्द या
गावच्या हद्दीत आहे परंतु आमच्या घराच्या नोंदी ह्या चांदे बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत. चांदे खुर्दच्या ग्रामपंचायत मध्ये नाहीत.

आमच्या जमिनी सुद्धा चांदे खुर्द च्याच हद्दीत आहे.

आमचे मतदान, रेशनकार्ड हे सर्व चांदे बुद्रुक या गावचे आहे.

दोन्ही गावामधील अंतर अवघे 2 km आहे.

आमच्या वस्तीवरील 10 लोकांनी व मी आपापल्या जमिनीमध्ये शासकीय योजनेमधून शेततळे बनविण्यासाठी अर्ज केला आहे.

शेततळ्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आवश्यक असतो म्हणून आम्ही आमच्या रहिवाशी म्हणजे चांदे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता त्यांनी आम्हांस असे सांगितले कि आपली जमीन हि चांदे खुर्द या गावच्या हद्दीत आहे तरी आपण चांदे खुर्द या ग्रामपंचायत मधून ठराव घ्यावा.

आम्ही चांदे खुर्द मध्ये गेलो असता तेथे आम्हांस असे सांगितले की, आपणांस ठराव मिळणार नाही कारण आपण आमच्या गावचे रहिवाशी नाहीत तसेच आपले मतदान व रेशनकार्ड हे सुद्धा आमच्या गावचे नाही.

तसेच चांदे खुर्द या गावच्या सरपंच यांनी आम्हा वस्तीवरील सर्व लोकांची बैठक घेऊन असे सांगितले आहे की, आपण सर्वांनी लवकरात लवकर आपले मतदान व रेशनकार्ड हे चांदे खुर्द या ग्रामपंचायतीत स्थानांतरण करावे तसेच आपल्या घराच्या नोंदी आमच्या हद्दीत राहता म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये लावून घ्याव्यात. अन्यथा आम्ही आपल्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार आहोत.

त्यांनी असे संगीतल्यानंतर आम्ही आमच्या सध्या रहिवाशी असणाऱ्या चांदे बुद्रुक या गावच्या सरपंचांची भेट घेतली व त्यांना सदर सर्व घटना कथित केली, परंतु त्यांनीही आमची मदत करण्यास नकार दिला व असे सांगितले की, आपण ज्या गावच्या हद्दीत राहता त्याच गावचे रहिवास स्वीकारा, आणि आपले मतदान, रेशनकार्ड व घरांच्या नोंदी आमच्या येथून चांदे खुर्द येथे स्थानांतर करा. कारण आपण चांदे खुर्द या गावच्या हद्दीत राहता.

1. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असल्याने घराच्या नोंदी सुद्धा चांदे खुर्द मधेच घ्याव्यात का

2. आम्ही चांदे बुद्रुक मधील मतदार यादीतील नाव व रेशनकार्ड हे चांदे खुर्द मध्ये स्थानांतरित करावे का

3. आम्ही चांदे खुर्दच्या हद्दीत राहत असून चांदे बुद्रुकच्या ग्रामपंचायत मध्ये आमच्या घराच्या नोंदी आहेत तरी हे बेकायदेशिर आहे का व तसे असल्यास आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते का

4. आमच्या घरांच्या नोंदी चांदे खुर्द मध्ये नसल्याने त्यांना आम्हांस ठराव न देण्याचा अधिकार बनतो का

प्लिज सर आपण लवकरात लवकर माझ्या समस्येचे निराकरण करावे हि विनंती

आपला आभारी
अमित शिर्के

Question by राजू
04-11-2016
raju_juo@yahoo.co.in

महोदय

मला माझ्या जमिनीवर घर बांधायचे आहे , परंतु ती जमीन हि ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे ठाणे महानगर पालिकेकडून पाहिजे तितका fsi नाही मिळत .तर ग्रीन झोन चे R झोन कसे करायचे .

सदर जमीन ठाणे महानगर पालिकेच्या सेक्टर ११ मध्ये आहे .

Question by KP
02-11-2016
krrishnakant@gmail.com

माननीय साहेब,

हक्कसोड पत्र करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रिंटाऊट विथ डिजिटल साइन सातबारा उतारा ची मागणी करत आहेत. पण तलाठी कार्यालयात कॉम्पुटर नसल्यामुळे तसेच तहसील दार ऑफिस मधेय डेटा फिडींग साठी मुले नसल्यामुळे इलेक्ट्रिक प्रिंटाऊट विथ डिजिटल साइन सात बारा मिळू शकत नाही. तर दुसरा काही पर्याय आहे का ?

डिजिटल सात बारा नसेल तर दुसरा कोणती कागदपरे सादर करावी लागतील कृपया माहिती द्यावी


गट 252 मध्ये एकूण जमीन 10 एकर वाटप नाही सर्वानी जमीन विकली आहे फक्त 1 मूळ मालक राहिला आहे त्याच्या जमिनीपेक्षा त्यांनी जास्त जमीन विकली आहे काय करावे लागेल
नवीन गावठाण विस्तार अंतर्गत 20 वर्षांपूर्वी मिळालेले प्लॉट विकता येतात का विकण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल त्यासाठी किती नजराणा भरावा लागेल
नमस्कार सर,
मी १ ऑक्टोबर २०१४ रोजी सोनाबाई व चांगाबाई यांच्या कडून प्रत्येकी १हेक्तर या प्रमाणे २हेक्तर क्षेत्र कायम खुष खरेदी केले.७/१२ पाहीला असता मिळकत विना जोखीम दिसत होती.
मंडल अधिकारी यांच्याकडे नोदिसाठी गेले असता त्यांनी जमीन वर्ग २ची असल्याचे सांगितले . अधिक चौकशी करता सदर जमीन मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन नियम १९५६ चे नियम २१(२)अन्वये कुळकायदा कलम ३२ (पी)पोटकलम (२)अन्वये विक्रीच्या आदेशाने संबंधीताना मिळाल्या आहेत.त्यामुळे फेरफार रद्द करण्यात आला .माझे प्रश्न
१.वर्ग २ जमीन असताना खुष खरेदी दस्त होऊ शकतो का?
२.देणार इसमावर आपण फसवणुकीचा दावा दाखल करू शकतो का?
३.या प्रकरणामध्ये शर्थ भंग झाल्याने सरकारी दंड भरण्याचा मार्ग असतो का?
४.मिळकत मी अजूनही कसत आहे मी काय करावे जमीन कसावी कि कसु नये
५.या प्रकरणाचा कोणाकडे पाठपुरावा करावा.
६.सदर घटनेने जीवनात नैराश्य आलेले .
तरी मला कृपया मार्गदशन करावे
सर,
पदोन्नती साठी कोणकोणते निकर्ष लागतात.
कोतवालाना 25 टक्के शिपाई होण्याकरता जागा राखीव आहेत.या जागा जाती नुसार भरण्यात येतील कि आपली सेवा किती वर्ष झाली, आपले शैक्षणिक पात्रता किती उच्च, किंवा शिपाई संवागातील एख्यादया जातिच्याची पदोन्नती झाली,तर ती जागा कोतवालामधून त्याच जातीच्या उमेदवाराणे भरली जाईल का?
नमस्कार सर
एकत्रीकरना पूर्वीच्या 9(3) हक्क नोंदीच्या पत्रकात सर्व्हे नंबर 85/3 चे क्षेत्र 5 एकर 35 गुंठे व सर्व्हे नंबर 85/2 चे क्षेत्र 5 एकर 10 गुंठे अशी आहे. पत्रकात इतर हक्क, अदलाबदल दर्शविणारा उल्लेख नाही आहे. एकत्रीकरण पूर्वीच्या 7/12 उताऱ्यात सर्वे नंबर 85/3 चे क्षेत्र 5 एकर 12 गुंठे व सर्वे नंबर 85/2 चे क्षेत्र 5 एकर 33 गुंठे अशी आहे.एकत्रीकरण योजना पत्रक 9(3)(4) मध्ये क्षेत्र कमी जास्त झाल्याने गटाचे क्षेत्र हि चुकीचे झाले. पत्रकात कबुली जबाब किंवा इतर कोणत्याही सर्वे नंबर चे क्षेत्र समाविष्ट झाले असे नमूद नाही. सर्वे नंबर चे आकार फोड पत्रकात क्षेत्र एकत्रीकरण पूर्वीच्या 7/12 उतारा नुसार आहे.कमी जास्त झालेले क्षेत्र दोन्ही गटाच्या खातेदार यांना मान्य असून जमीन हि सर्व्हे नंबर चे क्षेत्र प्रमाणे ताब्यात आहे. गट नंबर चे क्षेत्र यात बदल कसा करता येईल.कृपया मार्गदर्शन व्हावे.
माझ्या जमिनीची मोजणी होऊन 4 वर्षे झाली तरी लगतदार कब्जा सोडत नाहीत. मोजणीची 'क' प्रत नकाशा हि मिळाला आहे. काय करावे? माहिती मिळावी हि विनंती.
नैसर्गिक आपत्ती मध्ये एक व्यक्ती पुरात वाहून मयत होतो. परंतु त्या भागात किंवा गावात पाऊस पडलाच नाही तर त्या मयत व्यक्तीच्या वारसांना आर्थिक सहाय्य्य नैसर्गिक आपत्ती मधून देता येईल का
एकत्रीकरना नंतर सर्व्हे नंबर गटात रूपांतर करताना क्षेत्रात चूक झाली आहे
Sir, maze aajobanchi inam jamin hedrabad inam wa rokh anudane nirmulan kayda 1954 chya kalam 6(1) a pramane kabja hakka kimmat Rs. 439 war upkalam 4 che sharti nusar prati bandit kabja hakka 1961 madhe milala hota. Sadaril jamin tyani collector permission ne hastantar parwangi kadhun , natewaikas 1981 madhe wikli. Tichi jamin mi 2011 madhe vikat ghetli tyaweles talathi 7/12 war inam wa sarkar la aale padun bhogwatdar 1 asa bhuprakar hota wa aajtagayat tasach aahe. Atta 2016 madhe hi jamin mala n.a. kartana bhusudhar departmentchya mhanyyanusar sadaril jamin aajunhi pratibandhit malak mhanun aslyane najrana rakkam valuation chya 50% yewdhi bharavi lagel. Sir yawar margadarshan karave pls.
2) sadaril jamin maghil 4 te 5 warshanpasun cityserve madhe aslyane tiche valuation square meter rate pramane 1cr/accer paryant jat aslyane aamhi najrana rakkam bharu shakat nahi tari te kami kase karta yeil te sangave hi vinantti.
आदरणीय सर,शेतजमीन निवासी झोनमध्ये करण्यासाठी मा.विभागीय आयुक्त साहेब,यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत का?किंवा कसे? त्याबाबत शासन निर्णय आहे का?शेतजमिनीची मर्यादा किती असावी लागते?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
नमस्कार साहेब , आमच्या तसेच आजूबाजूच्या शेतात येण्याजाण्यासाठी रस्ता नाही . दोन मार्गातून रास्ता मिळू शकतो पण एका मार्गातून शेतात येण्यापूर्वी मसअनवट ग्रामपंचायत, बिनाकारणी पड, गुरुचरण ग्रामपंचायत किंवा खासगी शेती हे गट येतात तर यातून रास्ता मिळू शकतो का? तसेच दुसऱ्या मार्गातून शेतात येण्यापूर्वी पाश्चर फॉरेस्ट ,प्रोटेक्ट फॉरेस्ट चे क्षेत्र लागते तर या दोन्ही मधून कोणत्या मार्गातून रस्ता मिळू शकतो का? असेल तर कोणत्या मार्गातून आणि किती मीटर चा त्यासाठी कोणाकडे मागणी करावयाची त्याचे मार्गदर्शन करावे हि विनंती .
महाराष्ट्रातील सर्व विभागातील ७/१२ उतार्यावरील शेरे आणि त्यांचे अर्थ तसेच त्या शेर्यांचे परिणाम या विषयी विस्तृत माहिती मला मिळू शकेल का?
नमस्कार सर . माझ्या वडिलांनी 2009 साली आमचे घर खरेदी खताने विकले व खरेदी घेणारा व्यक्ती तेव्हांपासून गायब आहे व वडिलांचे राहिले ले पैसे सुद्धा दिले नाही आजही घराचा कर वडिलांच्या नावे येत आहे व 7/12 सदरी वडिलांचे नाव आहे व ताबा एका दादा एजंट कडे आहे तरी वडिलाचे राहीलेले पैसे कसे मिळवावे कृपया मार्गदर्शन करावे
ऐपत प्रमाणपञाबाबत शासन निर्णय आहे का ? असेल तर द्याल please .
श्री. किरण पानबुडेसो, मोहसीनजी, नमस्कार,
1. दहन भूमी किंवा दफन भूमी हि गावठाणात असते का?
2. वाढीव गावठाण सोडून जुन्या गावठाणात असते का?
आपला प्रश्न/सूचना... महोदय ७/१२ च्या इतर हक्कात गेली १९३७ वर्षापासुन आजपर्यत संरक्षित कुळाची नोंद आहे तर ते नाव कमी कींवा काढुन टाकता येते का तसे अधिकार कोणाला आहेत कार्यपध्दती सांगा़
सौरक्षित कुल कृषक दिनी मानीव खरेदीदार असतो . त्या मुले त्याचे नाव कमी करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय माझ्या शेतातुन
१९९० साली रस्ता तयार करण्यात आला
त्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आजपर्यंत
भुसंपादन झाले नाही तो नकाशातही नाही
कींवा ७/१२ वरही नाही सदर रस्त्याचे अंदाजे २एकर
क्षेत्र आजही माझ्याच नावावर आहे तसेच PWD
विभाग सदर रस्ता आमचा नाही असे लेखी दिले
आह तसेच तहसिलदारांकडे रस्त्यासाठी कोणीही अर्ज केलेला नाही तेव्हा या रस्त्यावर माझा मालकी हक्क आहे त्याबाबत मला कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही तेव्हा आता सदर रस्त्याचे भुसंपादन होऊ शकते का कींवा मी न्यायालयाकडुन मी नुकसान भरपाइसाठी दावा लाउ शकतो
का? कींवा मी न्यायालयाकडुन रस्ता बंद करू शकतो का मार्गदर्शन करा
न्यायालयात जाणे हाच एकमेव पर्याय आपलेकडे आहे .
आपणास नुकसान भरपाई दिल्याशिवाय आपली जागा अशी संपादित करता येणार नाही.
घटनेच्या अनुच्छेद 31 अन्वये
No person shall be deprived of his property without following due procedure of law.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.44 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3