जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिनेश दाभोलकर
27-08-2016
dabholkar.dinesh@gmail.com
एखाद्याचे नाव भोगवटा आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी येऊ शकते का
सर्वसाधारणपणे एखाद्याचे नाव कब्जेहक्कात आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी नसते. तथापि कागदपत्रे न बघता याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही. आपण तहसिलदार कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
सर्वसाधारणपणे एखाद्याचे नाव कब्जेहक्कात आणि इतर हक्कामध्ये एकाच वेळी नसते. तथापि कागदपत्रे न बघता याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही. आपण तहसिलदार कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
26-08-2016
sadik11m@rediffmail.com
मुस्लिमाना दिलेल्या इनामी भोगवटादार वर्ग 2cha जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार असतो का
वक्फ अधिनियम,१९९५ च्या कलम ३(आर) अन्वये “वक्फ” या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वसामान्यपणे इस्लाम धर्माच्या धार्मिक कामाकरिता वापरण्यात येणार्या सर्व मिळकती (मशिद, इदगाह, दर्गा, मकबरा, कब्रस्तान, धार्मिक उपासना संस्था, अनाथालय) मशरूतुल- खिदमत इनाम या बाबी वक्फ कायद्याखाली येतात. धार्मिक किंवा धर्मदाय संस्थेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असलेली कोणत्याही व्यक्तीचा समावेश वक्फमध्ये स्वारस्य असणारी व्यक्ती म्हणून होतो. सर्वसामान्यपणे अशा वक्फ मालमत्तेच्या देखरेखीसाठी मुतवल्ली किंवा व्यवस्थापन समितीची नियुक्ती करण्यास वक्फ अधिनियमातील तरतुदींनुसार वक्फ मंडळाकडून मान्यता दिली जाते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
26-08-2016
nrsonvane@gmail.com
सर दिनांक १७/०७/२०१४ रोजी च्या शासन परीपत्रक नुसार तलाठ्याने हीतसंबधीतास नमूना-९ ची नोटीस द्यावी की नाही..सर सदर परीपत्रका बाबत आमच्या परभणी जिल्ह्यामधे सर्व तलाठी/मं.अधिकारी भ्रमात आहे..
सर सदर परीपत्रक न्यायालयात चालतो का कृपया
मार्गदर्शन करने ही नम्र विनंती..!!
दिनांक १७/०७/२०१४ रोजी च्या शासन परीपत्रक नुसार कलम १५०/२ मध्ये अशी सुधारणा करण्यात आली आहे की,
"जेथे साठवणुकीच्या यंत्राचा (संगणक इत्यादी) वापर करुन, (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६-कलम २/(३३-अ) 'साठवणुकीचे यंत्र (Storage Device)' याची व्याख्या आहे)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४८ क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील, तेथे तालुक्यातील तहसिलदार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५४ अन्वये सुचना मिळाल्यानंतर, लगेचच, ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरुन किंवा फेरफार नोंदवहीवरुन त्यास दिसून येईल, अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याबरोबर गावाच्या संबंधित तलाठयास लघुसंदेश सेवा (एस.एम.एस.) किंवा इलेक्ट्रॉनिक मेल (इ-मेल) किंवा विहीत करण्यात येईल अशा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे पाठवील. अशी माहिती मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने त्याची नोंद फेरफार नोंदवहीत करील.
परंतु, असे की, भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणार्या अधिकार्याासमोर ज्या व्यक्तींनी स्वत: दस्तऐवज निष्पादीत केले असतील, अशा व्यक्तींना, तहसिलदार कार्यालयातील तलाठ्याद्वारे, पहिल्या परंतुकान्वये तरतुद केलेली अशी कोणतीही सुचना पाठविणे आवश्यक असणार नाही."
तथापि, मंत्रीमंडळ निर्णय (बैठक क्रमांक १६२) दि. २१ मे २०१४ मध्ये नमूद आहे की,
नोंदणीकृत दस्तऐवजाने होणार्या फेरफार नोंदी घेतल्यानंतर, दुय्यम निबंधकासमोर समक्ष उपस्थित राहून दस्तावर सही करणार्या पक्षकारास परत एकदा संबंधित तलाठ्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता भासणार नाही. (म्हणजेच दुय्यम निबंधकासमोर समक्ष उपस्थित राहून सही केलेला दस्त घेऊन, फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागणार नाही.)
दस्त नोंदणी होताच त्याची माहिती आज्ञावलीद्वारे (दुय्यम निबंधकामार्फत) तहसिल कार्यालयातील म्यूटेशन सेलला तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल. त्या आधारे फेरफार नोंद घेऊन नमुना ९ ची नोटीस तयार करुन (तहसिल कार्यालयामार्फत) तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल केला जाईल. त्यानुसार तलाठी किंवा परिरक्षक भूमापक फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करतील.
कायद्यान्वये फेरफार नोंदवहीत नोंद घेऊन पुढील कार्यवाही करणे म्हणजेच नोटीस बजावणे.
तथापि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम १५० (५) (ब) अन्वये हितसंबंधीतांना नोटीस बजावल्याशिवाय कोणतीही नोंद प्रमाणित करता येणार नाही. नोटीस बजावण्याची रीत म.ज.म.अ. कलम २३० मध्ये नमूद आहे.
उपरोक्त परिपत्रकात नमूद आहे की,
परंतु, असे की, भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणार्या अधिकार्यासमोर ज्या व्यक्तींनी स्वत: दस्तऐवज निष्पादीत केले असतील, अशा व्यक्तींना, तहसिलदार कार्यालयातील तलाठ्याद्वारे, पहिल्या परंतुकान्वये तरतुद केलेली अशी कोणतीही सुचना पाठविणे आवश्यक असणार नाही."
याचा अर्थ जर तहसिल कार्यालयामार्फत, तलाठ्यास तशी नोंद घेण्याचा एसएमएस किंवा ई-मेल केला गेला नाही तर अशी नोटीस बजावण्यावची आवश्यकता नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sandip makhamal patil
25-08-2016
sandippatil92@rediffmail.com
सर, सरकारी जमीनीवर अवैधरित्या अतिक्रमण करुन घर बांधकाम करना्रया व्यक्तिविरोधात कश्याप्रकारे तक्रार केलि जाऊ शकते? याविषयि कुठला कायदा अस्तित्वात आहे? कृपया मागृदशन करावे!
आपणास तक्रार करावयाची आहे त्यासाठी आपण केवळ हि बाब लेखी स्वरूपात तहसीलदार यांचे निदर्शनात आणून दया
कलम 50 म.ज .म .अ 1966
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
सरकारी जमीनीवर अवैधरित्या अतिक्रमण करणार्याच्या विराोधात कारवाई करण्याबाबत शासनाची अनेक परिपत्रके आहेत. आपण संबंधीत तलाठी किंवा तहसिलदार यांचे मार्गदर्शन घ्यावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by बाजीराव jadhav
24-08-2016
bajirao.jadhav@yahoo.in
Namsakr सर
माझे नाव नंदू जाधव असून माझे वडील 1973 साली दत्तक गेले होते .. त्यानुसार मला काही शेतजमीन मिळाली आहे.. त्यानंतर पुढील एक दोन वर्षात ज्यांना वडील दत्तक गेले ते आजोबा आणि माझे वडील दोघे मयत झाले. पण आत्यानी त्यावेळी दत्तक पत्र रद्द करण्या साठी अपील केले आपण पण दिवाणी सत्र न्यायालय तसेच जिल्हा सत्र न्यायालयाने दत्तक कायम ठेवले आहे ... अपनी मालमत्ता आमच्या कडे ठेवली .. हलाखीच्या आर्थिक परिस्थीती मुले तसेच एका बनावट मृत्यूपत्र मुळे आत्यांची नावे 7/12 उताऱ्यावर तसेच राहून गेली आहेत.नंतर आम्ही अलीकडे ती नावे कमी करण्यासाठी प्रांत कार्यालयात अर्ज केला तेव्हा त्यांनी तो फेटाळायला आणि नावे कायम ठेवलीय. तसेच दिवाणी कोर्टाने सुद्धा ते बनावट मृत्यूपत्र आणि आमच्या कडील मृत्यूपत्र दोन्ही रद्द करून व दत्तक कायम ठेऊन संबधीत मालमत्ते मध्ये 3 हिशे केले ... असे झाल्यास आम्हाला फार थोडी जमीन शिल्लक राहते आणि त्यातली निम्म्म्या हुन अधिक जमीन आत्यांना जाते .. ज्यांना आधीपासून खूप मालमत्ता आहे ..
दत्तक तसेच मृत्यूपत्र नुसार सर्व मालमत्ता आम्हाला दिलेली आहे आणि आमचा ताबा आहे सध्या. मालमत्ता अधिकार 22 जुन 1994 नुसार सुद्धा ती जमीन आम्हाला मिळते .. ( ह्यात फक्त 22 जुने1994 नंतर जन्मलेली आणि 22 जुने 1994 नंतर लग्न झालेली मुलींना अधिकार आहे आणि आणि ज्यांनी दावा केला आहे त्या पैकी एक तर 1994 पूर्वी मयत आहेत. पण त्यांचे मुलांची नावे सध्या 7/12 वरती आहे आणि दुसरी जी आहे तिने दावा नई केला आणि नाही कोर्ट समोर आलीय.
पण आता कोर्टाने संपूर्ण मालमता मध्ये 3 हिस्से सांगितले आहे ..
ह्यात 2 आत्यानं पैकी एक मयत असून दुसरीने संबंधीत मालमत्तेची मागणी नाही केली.. जी मयत आहे त्यापैकी एकीच्या नातवाने मागणी केली आहे .. ह्यामध्ये काय होईन ह्यावर आपले मार्गदर्शन आहे आहे .. कृपया आपले मत आणि पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन करा ..
नंदू जाधव
आपले वडील दत्तक गेल्याची बाबा न्यायालयाने मान्य केली आहे . मात्र मृत्य पत्रे रद्द केली आहेत . त्या मुले आजोबांना जे वारस आहेत , त्या प्रमाणे न्यायालयाने हिस्से केलेले आहेत .
या पेक्षा आपणास जाडा जमीन मिळू शकणार नाही . अन्यथा मृत्य पत्र खरे/बरोबर आहे या साठी अगोदर उत्तर दिले प्रमाणे अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कोर्टाच्या निकालावर भाष्य करता येणार नाही. आपणास सदर निकाल मान्यस नसेल तर आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागू शकाल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
24-08-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
कुळाची नोंद घेणे ची पद्धत आजही सुरु आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम चे कलम 2(18) व 4 - मानीव कुल या मधील निकष पूर्ण होत असतील , तर आज हि कुळांची नोंद होऊ शकते /होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात.
कुळ कायदा कलम '३२ ओ' चा अशावेळी संबंध येऊ शकतो का असा प्रश्न निर्माण होतो. कारण कुळकायदा कलम '३२ ओ' नुसार , जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो. कुळकायद्याने कुळास दिलेला हा हक्क बजावण्याची ज्या ची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे. परंतु अशा वेळी वर उल्लेखल्याप्रमाणे कुळ व मालक असे नाते सिध्द होणे आवश्यक असते हे लक्षात घ्यावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
24-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,5 वर्षांपूर्वी मोबदला देऊन जमिनीचे रजि.कु.मु.पत्र घेतले होते .त्यातील एक व्यक्ती मयत झाली असताना आज रोजी संपूर्ण जमिनीची कु.मु.पत्राआधारे रजि. विक्री झाली असल्यास 7/12 सदरी संपूर्ण क्षेत्रांची नोंद करता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
व्यक्ती मयत होण्या पूर्वी जर , विक्री दस्त झाला असेल तर , नोंद 7/12 सादरी घेणे आवश्यक .
मात्र जर विक्री दस्त होण्यापूर्वी , व्यक्ती मयत असेल , त्याचे हिस्स्यांचे क्षेत्र वगळून ( जर सह धारकांचे हिस्से 7/12 वर नमूद असतील तर ) इतर क्षेत्रास खरेदीदारांची नावे लावता येतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपला प्रश्न फारच त्राोटक आहे. माोबदला देतांना नाोंदणीकृत दस्त केला हाोता काय? त्यातील एक व्यक्ती मयत झाली म्हणजे काोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे नेमका सल्ला देता येत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
23-08-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमच्या फेरफारामध्ये वर्षे 1934 या मध्ये खरेदीखत केल्याची नोंद आहे . हे खरेदीखत मिळण्यासाठी कुठे अर्ज केला पाहिजे
Question by sajid
23-08-2016
sajid11@rediffmail.com
इनामी जमीन आहे कोणत्या उताऱ्यावरून कळते इनामी जमिनीची माहिती कोणत्या नमुन्यामध्ये मिळते
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
22-08-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, वारस फेरफार नोंद अपील करण्यासाठी विहित नमुना आहे काय ? साध्या अर्जावर अपील चालत नाही काय ? अपील साठी वकील द्यावा लागतो का ? त्यासाठी कोणत्या कागद पत्राची आवश्यकता लागते कृपया मार्गदर्शन करावे.
अपीलाचा फाॉरमॅट ठरलेला असताो. अपीलासाठी वकील देणे याोग्य ठरेल. अपिलासाठी आवश्यक कागदपत्रे प्रकरण निहाय वेगवेगळी असतात. आपण वकीलाचे मार्गदर्शन घेणे याोग्य ठरेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
22-08-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
कुळाची नोंद 7/12 वरून कमी करण्याचे अधिकार कोणाला आहे ? कोणत्या कलमान्वये ? कृपया मार्गदर्शन करावे .
शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) . कुळाचे नाव कमी करण्यासाठी विविध कलमे आहेत जी प्रकरण निहाय वापरली जातात. कुळाचे नाव कमी करतांना सखाोल चाौकशी हाोणे आवश्यक असते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by वैभव काळे
22-08-2016
kale.vaibhav07@gmail.com
me june 2015 madhe jaga kharedi keli tyaweli jagewar pakke compound sarkari mojanicha nakasha v iter awashyak babinchi pahani keli
nantar mahapalikekadun plan pass karun ghetala v jagewar bandhkam chalu kele ahe
jaga NA keli ahe
pan kam chalu kelyawar mala kalale ki tya jagewaril vahiwatisandarbhat court madhe case chalu ahe
takrardarane maze kam thambawinyasathi stay denyachi vinanti court la keli
parantu sbal kagadpatraabhavi tyachi stay baddal chi magani fetal li pan jagesandarbhat case chalu ahe
ya period madhe takrardarane bhumi abhilekhat apil karun tyachi v amachi sarkari mojani sadar karun amachi radda karanesathi apil kele
bhumi abhilekh karyalayane ektarfi sadar arjanusar mojani antim nikalaparyant sthagit keli ahe
takrardarane oct 2011 madhe mojani keli asun amchya jagechi mojani march 2014 madhe zali ahe
doghanchya jaganche june dast v tyawaril chatusima pahata amachya jagechya sarva chatusima eksarakhya ahet
parantu takrardarachya chatusima patyek dastamadhe wegwegalya dilya ahet
vmul malakakadun alelya v tyachya mojanit dakhawalelya chatusima vegvegalya ahet
sadar prakarnat bhumi abhilekh karyalay virodhat nikal deu shakate ka
mojani radda kelyas konate kaydeshir paryay upalabdha ahet
माोजणी अभिलेख कार्यालय त्यांच्या समाोर आलेल्या व त्यांच्या अभिलेखात असलेल्या कागदपत्रावरून .निकाल देईल. .निकाल आपल्या विराोधात गेल्यास आपण अपील करू शकाल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by पुंडलिक patil
21-08-2016
pundlik.patil1985@gmail.com
साहेब
शेत जमिनीची मोजणी करणयासाठी पद्धत सागा आणि लागणारे कागदपतरे व शुल्क सांगावे
F ई मोजणी:
ई मोजणी पुर्वीची कार्यपध्दती - शेतकरी किंवा खातेदार यांना आपल्या हद्दीबाबत शंका किंवा वाद निर्माण झाल्यास शंका दुर करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमि अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज करून हद्द कायम मोजणी करून घेऊन आपली शंका निरसन करुन घेता येते. अर्ज करून जागेवर मोजणी होवून त्याचा नकाशा प्राप्त होईपर्यंत दिनांक ३१ डिसेंबर २०११ पर्यंत खालील प्रमाणे कार्यपध्दती होती.
अर्जदार शेतकरी, तालुका कार्यालयात आल्यानंतर ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्याचा अधिकार अभिलेख कार्यालयातील मुख्यातलयातील सहाय्यक यांना दाखवुन मोजणी फी किती होईल, प्रकरणासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती घेत असे.
मोजणी फी भरणेस अर्जदाराने संमती दिल्यावर मुख्यालय सहाय्यक त्या रकमेचे चलन तीन प्रतीत तयार करून ते अर्जदारास देत असे.
अर्जदार स्टेट बॅक ऑफ इंडीया (ट्रेझरी शाखा) किंवा कोषागारामध्ये प्रत्यक्ष पैश्याचा भरणा करून त्यातील एक चलन कार्यालयात आणून देत असे.
कार्यालयात मोजणीचा अर्ज, पैसे भरलेले चलन व अभिलेखाच्या प्रती दाखल करत असे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी लिपीक सदरचा अर्ज मोजणी नोंदवहीत नोंदवून तो अर्ज कार्यालयातील भूकरमापकाकडे मोजणीसाठी देत असे.
भूकरमापक त्या अर्जावर त्याच्या सोईनुसार मोजणीच्या तारखा देवून नोटीस पाठवित असे.
मोजणीसाठी ठरलेल्या दिवशी भूकरमापक प्रत्यक्ष गावी जावून मोजणी करून मुळ अभिलेखाधारे हद्दीच्या खुणा दाखवून त्या प्रमाणे नकाशाच्या प्रती तयार करून प्रकरण कार्यालयात जमा करत असे.
कार्यालयात जमा केलेल्या अशा प्रकरणांत आवश्यक छाननी करुन उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या स्वाक्षरीने नकाशाची 'क' प्रत अर्जदारास पुरविली जात असे.
वरील सर्व प्रक्रियेमध्ये मोजणी फी किती होईल, मोजणी केंव्हा होईल, मोजणीस कोण येईल वगैरे प्रश्न सामान्य नागरीकांस पडत होते. यामध्ये खातेदाराचा पैसा, मानसिक त्रास व कालापव्यय होत असे. या सर्व बाबीवर उपाय म्हणून शासनाने संगणकीकृत आज्ञावली म्हणजे "ई-मोजणी" तयार करून शेतक-यांचे समाधान व शासकिय कामात सुटसुटीतपणा व पारदर्शकता उपलब्ध करून दिलेली आहे.
ई मोजणीचा खातेदारांना झालेला फायदा- खातेदार, अधिकार अभिलेख व लगत खातेदारांच्या माहितीसह कार्यालयात उपस्थित राहिल्यास त्याचा मोजणीचा अर्ज संगणकामध्ये नोंदवुन घेतला जातो व त्याला रु. ३०००/- च्या वरील रक्कमेचे मोजणी फी चे चलन किंवा रु. ३०००/- च्या आतील रक्कमेची पावती, पैसे भरल्यास तात्काळ दिली जाते.
अधिकार अभिलेख, मोजणी फी चे चलन अथवा पावती व मोजणीचा अर्ज या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणीची कार्यवाही पारदर्शकपणे केली जाते.
कोषागारात मोजणी फी चे पैसे भरुन मोजणीचा अर्ज कार्यालयांत जमा केल्यास तात्काळ मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते, ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती असते.
वरील संपुर्ण प्रक्रीयेसाठी खातेदारास हेलपाटे मारावे लागत नाहीत. योग्य व अचुक मोजणी फी खातेदाराकडुन घेतली जाते.
प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आज्ञावलीतुन नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे न कळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे. घर बसल्याही खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजुन घेता येत आहे. योग्य माहिती नमुद केल्यास खातेदारास आपल्या प्रकरणांत होणारी संभाव्य मोजणी फी सुध्दा आज्ञावलीतुन घरबसल्या समजते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by पुंडलिक पाटील
21-08-2016
pundlik.patil1985@gmail.com
साहेब
त्यांना पूर्वी शेतात जणांसाठी दुसरा रस्ता होता पण तो लोकांनी बंद केला परंतु गट नंबर समान असलयामुढे तयांनी आमचा शेतात रस्ता मागितले पण बैलगाडी जणांसाठी माझ्या शेतीत तेव्हडी जागा रिकामी पडत आहे तरी मला मार्ग सुचवा
आपले शेतातून जर , पारंपरिक वहिवाटीचा मार्ग त्यांचेसाठी नसेल तर , त्यांना देण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
आपणास रस्तासाठी त्यांना हक्क देण्याबात आपण त्यांना अगोदर उत्तर दिल्याप्रमाणे , आपण त्याना विकत देऊ शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री डी. डी. लोखंडे
21-08-2016
nikysweet1@gmail.com
माननीय सर नमस्कार ,
शासकीय कर्मचारी सेवेत असताना सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे . तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे. मला सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाले असताना सुद्धा एकच आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. यावर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by संपत
20-08-2016
sampatraskar4049@gmail.com
१९६६ मधे आमच्या आजोबांनी एका व्यक्तिकडुन २ गुंटे जागा खरेदी खत केली होती त्याचे खरेदि खत आहे.परंतु त्यामधे ग्रामपंचायत मिळ्कत नं आहे आणि चतुसिमा याचा उल्लेख केला आहे, त्या जागेच्या सातबार्यावर त्या विकणार्या व्यक्तिचे नाव नाही परंतु खरेदी खत आमच्याकडे आहे, त्या जागेवरति आम्ही आमचे राह्ते घर पाडुन नवीन बांधकाम सुरु केले आहे, परंतु ज्या व्यक्तिचे नाव ७/१२ वर आहे त्याने आमचे काम बंद केले आहे.तर आम्हाला काय करता येइल का ? कपया संपुर्न मार्गदर्शन करा....
ग्रामपंचायत मिळ्कत नं आहे आणि चतुसिमा याचा उल्लेख असेल तर त्या जागेची नाोंद ग्रामपंचायत कार्यालयात असण्याची शक्यता आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश बामणे
20-08-2016
rajeshbbamane@rediffmail.com
कृपया सल्ला द्या. देवस्थान इनाम जमीन वर्ग 3 सात बारा मधून काढण्यासाठी काय karave
देवस्थान इनाम जमीन वर्ग 3 ची नाोंद सात बारावरून कमी करणे कायद्याने शक्य नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राहूल
20-08-2016
ry96908@gmail.com
तलाठी पदासाठी निवड झाल्यानंतर त्या व्यक्तिला महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षणासाठी किती दिवसांनतर पाठवले जाते? म्हणजे अगोदर महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण दिले जाते की अगोदर अनुभवी तलाठी कडे प्रशिक्षण दिले जाते?
तसेच तलाठींसाठीची महसूल प्रबोधिनी कोठे आहे?
(संदर्भ: शासन निर्णय क्रमांकः तप्रशि-2012/प्र.क्र.242-अ/ई-10
शासन निर्णय दिनांक- 24/03/2014
शासन निर्णय संकेतांक- 201403251244395119)
अगोदर महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण दिले जाते नंतर अनुभवी तलाठी कडे काम करण्याची संधी .दिली जाते हे प्रशिक्षण सहा महिन्याचे असते. महसूल प्रबोधिनी बाबत आपण संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा करावी. त्या अआ.धि संबंधित परिपत्रके वाचण्याची तसदी घ्यावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सोमनाथ Lokhande
18-08-2016
somnathLokhanderx@gmail.com
मागील प्रश्नाचे उत्तर दिल्याबददल मोहसीन सरांचे आभार. मी एका पलाॅटमधील दोन भाऊ व पाच बहिणी यांच्या सामायिक क्षेत्रातील पाच बहीणींचा अविभक्त हिस्सा खरेदी खताने विकत घेतला असून माझी नोंद होईल का दोन भावांपैकी एकाने त्याचा हिस्सा आधिच विकला आहे. कृपया मार्गदर्शन करावे
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन कठापूरकर
17-08-2016
sachinkthapurkr@gmail.com
आदरणीय महोदय, भाडेकरूने फ्लॅट वर हक्क दाखवू नये या करीता काय काळजी घ्यायला हवी?
जाणकार वकीलाच्या सल्ल्याने नाोंदणीकृत भाडेकरार करावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश कदम
17-08-2016
ganukadam@gmail.com
आदरणीय सर ...वारस फेरफार करताना नोंद तलाठी यानी घातली त्यावर हरकत दाखल केली आहे ,, परंतु ती तक्रार केस मंडलाधिकारी यांकडे चालवली जाणार आहे परंतु मंडलाधिकारी यांच्या कडे काही कारनास्तव आपल्याला चलवायाची नसेल तर काय करावे ....
Question by गणेश शिंदे
17-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मनपा.हद्दीत रहिवासी झोनमध्ये पूर्वी विहीर होती. संदर जागा बिनशेती करावयाची आहे.7/12 सादरी विहिरींची नोंद आहे.आज रोजी सदर विहिरीत पाणी नाही.तसेच तिचा काहीही उपयोग नाही.तरी सदर विहीर बुजविणेकामी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
विहीर मनपाची नाही याची खात्री करा . विहीर आपले मालकीची असेल तर परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मुकेश हिवाळे
17-08-2016
mukesh.hiwale@gmail.com
कुळकायदा मध्ये अलीकडे झालेली सुधारणा अधिनियम 20/2016 ची प्रत अपलोड करावी हि विनंती
Question by ramnath kadam
16-08-2016
rdkadam@gmail.com
आदरणीय सर वारस नोंद करताना सर्व वारसांची नावे कब्जेदार सादरी येणे आवश्यक आहे तरी आजच्या digital युगात इफेरफर सारखे उपक्रम आले असताना तलाठी जर संगनमत करून वारस महिलांची नावे इतर अधिकार ठिकाणी ठेवत असेल तर हा अन्याय आहे ,ह्या विरुद्ध काय करावे लागेल ,
असे झाले असेल तर त्या फेरफार नाोंदी.विरूध्द अपील करावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
16-08-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,दुसऱ्या राज्यातील शेतकरी पुरावा महाराष्ट्र राज्यात शेतजमीन घेताना चालेल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
