जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by sadik
25-06-2016
sadik11m@redoliffmail.com
Sir dual ownership mhanje kay?detail dya
2) court fee stamp v revenue stamp mhanje kay v tyache wapar
COURT-FEES is used under THE COURT-FEES ACT,1870
As per Sec. 3- it is levy of fees in Courts.
Revenue stamp : One need to use revenue stamp on receipt if he is receiving money for More Then Rs 5000.00 ( Five Thousand Only) from any one. If one is giving Receipt for more Than 5000 (Five Thousand Only) without revenue stamp then that receipt is not valid.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by vahid
25-06-2016
daryavardi.vahid21@gmail.com
सर जी.आर. वटहुकूम आणि परिपत्रकामधे काय फरक आहे व हे काढायचे अधिकार कोणाला आहे तरी सर याचे आपण सविस्तर उत्तर द्यावे.
G.R.- Government Resolution : A Resolution is intended to be timely and to have a temporary effect. Typically, resolutions are used when passage of a law is unnecessary or unfeasible. In many cases relevant laws already exist. There resolution merely asserts an opinion that lawmakers want to emphasize.
वटहुकूम: याला 'अध्यादेश'(ऑर्डिनन्स) असेही म्हtणतात. भारतीय घटनेनुसार कायदा बनविण्याचे अधिकार संसदीय अंगांना (संसद आणि विधानभवने) दिले आहेत. मात्र जेव्हा संसदेचे सत्र चालू नसते आणि काही नियम 'तात्काळ' लागू करणे अत्यावश्यक असते तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश लागू करू शकतात. अध्यादेश (किंवा वटहुकूम) हा कायदा असतो आणि तो सद्य कायद्यात बदल करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याप्रमाणे असे अध्यादेश लागू करणे हा केवळ 'अत्यावश्यक प्रसंगी' वापरण्याचा अधिकार असून तो केवळ 'एक्सिक्युटिव्ह्ज' ना दिलेला आहे. अध्यादेश लागू केल्यानंतर भरणार्याव पहिल्या सत्रात, ६ आठवड्याच्या आत (सत्राच्या पहिल्या दिवसापासून ६ आठवडे) हा अध्यादेश संसदेपुढे ठेवणे बंधनकारक असते. संसदेला हा अध्यादेश मंजूर करण्याचा किंवा नामंजूर करण्याचा अधिकार आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रपती हा अध्यादेश मागे घेऊ शकतात. मात्र जर हा अध्यादेश संसद-सत्राच्या पहिल्या दिवसापासून ६ आठवड्यात मंजूर / नामंजूर होऊ शकला नाही किंवा मांडलाच गेला नाही तर तो 'अवैध' ठरतो व्यपगत (लॅप्स) होतो.
अध्यादेश सादर झाल्यानंतर, त्या अध्यादेशाला पूरक असा, ज्या कायद्यांमध्ये बदल करणे प्राप्त आहे किंवा जो कायदा बनविणे आवश्यक आहे, ते कायदे किंवा ते बदल संसदेपुढे विधेयकाच्या रूपात मांडले जातात व ती विधेयके संसदेपुढे चर्चा आणि मतदानार्थ ठेवली जातात. त्यानंतर नेहमीच्या विधेयकानुसार त्यावर चर्चा व मतदान होते आणि ते बदल मंजूर किंवा नामंजूर होतात.
परिपत्रक: सर्वसाधारण सूचना किंवा विशिष्ठह विषयावरील माहिती देण्यांसाठी परिपत्रक काढले जाते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
25-06-2016
sadikmullaa@gmail.com
केंद्राचा व राज्य शासनाचा मुस्लिम अल्पसंख्यानक हा दाखला मिळतो का व कोठे मिळतो
Question by प्रदीप नामदेव बोरले
24-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,महसूल अभिलेखात असलेल्या नोंदी खऱ्या आहेत हे कधीपर्यंत कोणत्या कलमाचे आधारे समजण्यात येते.कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.
Question by श्रद्धा wade
24-06-2016
shraddha.wade@gmail.com
dear sir,
माझ्या आजोबाची पालघर जिल्ह्यात 2-3 अक्रे जमीन आहे ( त्यांना एकूण 3 भाऊ होते). गट क्रमांक 3 आहेत. त्यातील 1 गट क्रमाकांत भोगवटादार 1 आणि बाकीचे 2 भोगवटादार 2 नवीन शर्ट नुसार आहे. ह्या जमिनी संयुक्त कुटुंबाच्या होत्या. हे तिनी गट क्रमांक आजोबा
च्या भावाच्या हिस्श्यात होत्या. हे भाऊ लग्न झ्हालेले होते पण निपुत्रिक होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोच्या नावे झ्हाली. बायकोच्या मृत्यूनंतर ही जमीन आजोबाच्या बाकीच्या 2 भावाच्या मुलांनी 7/12 वर फक्त जवळची पुतणे म्हणून त्याची नावे लावली. आम्हाला ह्याबाबत अंधारात ठेवले. आता कॉम्पुटेरिज्ड 7/12 बघितल्या वर कळले की आमची आजोबांचे वारसाची नावे नाहीत. एकमेकांत सामंजस्याने बोलल्यावर इतर चुलत भाऊ नि आमची नावे लावायला तयारी केली आणि प्रांताला अप्पेल केले. त्याप्रमाणी त्यांनी आपले सही सुद्धा केली प्रांतांसमोर . पण आता प्रांत ऑफिसर सगळे फिनिश झ्हाल्यावर म्हणतात की ही भोगवटादार 2 ची जमीन नवीन शर्थ नुसार सरकार जमा करायला लागेल .जमिनीवर मालकी हक्क 50 वर्षांपासून आहे & त्यानुसार महसूल ही भरण्यात आला आहे. तर प्रांत कोणत्या अधिनियम खाली असे करू शकतात का? 1966 महाराष्ट्र महसूल अधिनियम असा खाहीहि उल्लेख नाही
माग्रदर्शन करावे प्लीझ
9870352471
वर्ग 2 जमीन प्रांत सरकार जमा का करत आहेत याचे कारण विचारा.
वर्ग2 जमीन म्हणजे शासनाने प्रदान केलेली जमीन. ज्या प्राधिकरणाने जमीन प्रदानकेली असेल , तेच केवळ जमीनसरकार जमाकरू शकतात. शासन / विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल मोरे
24-06-2016
prafuldm@rediffmail.com
आपला प्रश्न/सूचना...
माननिय महोदय,
मी गाव शिरसवणे,तालुका महाड, जिल्हा रायगड येथे शेत जमीन विकत घेत आहे.
भोगवटा क्र.1 असून काही वाद नाहीत असे सांगितले आहे.
तर मी ती जागा खरेदी करताना काय काय डोकमेंट्स मागू?
तसेच सर्च रिपोर्ट काढताना त्यांच्या वकिलाने काढला तर चालेल का कि पुन्हा माझ्या वकीला कडून काढू?
आपले वकिलाकडून सर्च रिपोर्ट काढने योग्य
बर्तमान पत्रात नोटीस प्रसिद्ध करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
सर प्रश्नाचे उत्तर please द्या Sir mazya ajobacha vadilani viklel ghar mazya ajobani 50 te60 varshapurvi vikat ghetal.. pan kalantarane ajobancha donhi bavhanchi nave sudha tya gharacha malki hakkamadhe nondavili geli..ani sadya te amcha gharamadhech rahat ahe.tari aata tyanchi zaleli pokal nond kami kashi karu? Ani mala sambandhit gharache june purave kothun v kashi miltil?
घर/ जमीन खरेदी बाबत , दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेख भेट तीळ .
Chulat आजोबांचे नाव कमी करण्यासाठी , गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा
जर चुलत आजोबा घरातून जात नसतील तर , कोर्टात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
सर1) gharache june purave kothun v कसे miltil?
2)अभिलेखाधिकारी,पुरालेखागार पुणे येथून जमिनीचे कोणकोणते पुरावे मिळतात सविस्तर सांगा
3)दिवाणी कोर्टाची अपिलाची मुदत संपलेली आहे तरी मी आता काय करू
1. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात चौकशी करावी
2. अभिलेखाधिकारी,पुरालेखागार पुणे यांचेकडे चौकशी करावी
3. अपिलाची मुदत संपलेली असेल तर उशीर माफीचा अर्ज सादर करा. तो स्वीकारणे किंवा फेटाळणे हे कोर्टाच्या मर्जीवर अवलंबून असेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by vahid
23-06-2016
daryavardi.vahid21@gmail.cim
सर माझं नाव वाहिद दर्यावर्दी माझी जात मुस्लिम सर मला नोकरीसाठी ओ.बी.सी चा दाखला हवा होता. मी मित्रांकडे चवकशी केली असता मला सांगण्यात आले की ओ.बी.सी.चा आमचा दाखला निघत नाही सर माझं आडनाव दर्यावर्दी आहे
तरी आपण मी ओबीसी चा दाखला काढू शकतो का आणि कसा मला कृपया मार्गदर्शन करावे ही माझी विनंती.सर मला याच्यावर कोणतातरी मार्ग (उपाय )सुचवा
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
1)सर aadverse possesion म्हणजे काय व त्याचे नियम कोणाला लागू होतात?
2) सर आम्ही चुलत आजोबांच्या 50 वर्षे झाले घरामध्ये राहतो व शेती ही 50 वर्षे झाली करतोय चुलत आजोबा पहिल्यापासूनच परगावी असतात तर आम्ही दिवाणी कोर्टात aadverse possession चा दावा करू शकतो का?किंवा मी मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम कायद्यात याबद्दल काही तरतूद आहे का
3)सर जी.आर. वटहुकूम आणि परिपत्रकामधे काय फरक आहे व हे काढायचे अधिकार कोणाला आहे तरी सर याचे आपण सविस्तर उत्तर द्यावे.
4) केंद्राचा व राज्य शासनाचा मुस्लिम अल्पसंख्यानक हा दाखला मिळतो का व कोठे मिळतो
सर कृपया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या please
म्हणजे दुसऱ्याचे मालकीचे जमिनीवर 12 वर्षाहून अधिक काळ vahivat असणे
आपण दावा दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
1)सर नोटरी म्हणजे काय? नोटरी केव्हा केली जाते व ती कितपत खरी मानली जाते
2) रजिस्टर्ड साठेखत व अन रजिस्टर्ड साठेखत म्हणजे काय व ते केव्हा करतात
3) koni कोऱ्या स्टॅम्प var jar aapli sahi ghetali tar तो आपली प्रॉपर्टी त्याच्या स्वतःच्या नावावर karu शकतो ka
काही कागदपत्र , notorized करून मागितली जातात
Notorized document म्हणजे , अश्या कागदपत्रावर ज्या व्यक्ती ने सही केली आहे ती नोटरी समोर केली आहे. नोटरी मार्फत अश्याअभिलेख मध्ये जे काही नमूद आहे हे सहीकरणारास माहीत आहे याची खात्री केली जाते .
2. साठेखत म्हणजे जमीन विकणे बाबत करार करणे . भारतीय नोंदणी कायद्याप्रमाणे , जमीन हस्तांतरण करताना जमिनीची नोंदणी दुय्यम निबंधक यांचे कडे करणे आबश्यक आहे. नो दणी करणे म्हणजे कायद्याच्या भाषेत जगाला नोटीस dene की जमिनीची विक्री अथवा हस्तांतरणझाले आहे. He कळवणे . Nondni करतानामुंद्रणक शुल्क भरावे लागते .
3. Nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
Sar आम्ही दिवाणी कोर्टामधून 7/12 वरील पोकळ नोंद कमी व्हावी ही केस जिंकलेली आहे . तरी आता पोकळ नोंद कमी करण्यासाठी काय प्रोसेस आहे मार्गदर्शन करावे व खर्च किती येईल ते सांगा.
Question by विनोद बचवानी
23-06-2016
v.m.bachwani@gmail.com
आदरणीय सर
मेरे पिताजी और उनके २ भाइयों ने सन १९८४ में जमीन खरीदी और कुछ सालों बाद उसपर बांधकाम किया . बाद में एक भाई की मृत्यु हो गयी और उनका नाम हटा कर उनके लड़कों का नाम दर्ज हो गया .अब सभी भाईओं द्वारा हिस्से बटवारे हो गए हैं और वोह जमीन मेरे पिताजी के हिस्से में आई हैं. बाकि नाम हटाने के लिए क्या करना पड़ेगा कृपया करके बताएं ?? क्या स्टॅम्प ड्यूटी भरनी पड़ेगी ?? अगर हाँ तोह कितनी ??
सभी भाईओं द्वारा किया गया बाटवारा अगर registred हो, तो उसकी copy तलाठी या उचित अधिकारीके समक्ष पेश करे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
22-06-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामपंचायत हद्दीतील जमीन औद्योगिक झोनमधील असल्यास 0-03 आर क्षेत्रास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार लागू होतो का?का.तलाठी नोंद घेण्यास तयार नाही.कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती.
नवीन महाराष्ट्र तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा दुरुस्तीनुसार , हा व्यवहार वैध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by babaji naykodi
22-06-2016
naykodibabaji@gmail.com
amchi 1985 madhe 1 akar jamin canal madhe geli ahe tayveli amhala 12 akar jamin hoti ti doghacha nava var 6 6 akar hoti 3 ray bhavache nav navtay ata jamini chi vatani houn 3 ghana 3.5 akar vatayla ali ahe amcha kutumbat akal prakalp grasth praman patra milel ka krupaya sangave
ज्या प्रारुपासाठी जागा गेली आहे त्यास , तत्कालीन पुनर्वसन कायदा 1976 लागू केला असल्यास , प्रकल्प ग्रस्त दाखल मिळू शकेल .
तीन भावांपैकी , ज्या भावास दाखल हवा आहे त्यास , अन्य दोन भावांनी संमती देणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप नामदेव बोरले
22-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,भुमी संपादन अधिनियम 2013 अंतर्गत सामाजिक आघात निर्धारण अहवाल व मूल्यमापन करण्यासाठी प्रस्ताव संपादन यंत्रणेने सादर करावयाचे की भूसंपादन अधिकाऱ्याने सादर करावयाचे आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
Question by औदुंबर Dhere
21-06-2016
dhereak@gmail.com
Sir mi 1999 la navin shartchi parvangi n gheta jamin khardi keli ahe. paruntu 2007 pune commossner yani shart bhang zali mahnun sadar jaminivar sarkar nav lavale ahe. Sir sarkar nav kami karun maze nav lagel ka ? thyakarita kothe appil karave pls sir mahiti dayavi.
एखाद्या शेतक-यांस 1956 ला " घ " पटटयाने, जमीन भुमीधारी हक्कावर देण्यात आली असेल तर ते शेतकरी, वर्ग-1 करण्यांस पात्र ठरतील काय?
Question by अमितकुमार शिर्के
20-06-2016
amitkumar.shirke@gmail.com
नमस्कार सर,
मी सध्या 12 वी सायन्स उत्तीर्ण झालो आहे, मला पुढे F.Y.BSc ला प्रवेश घ्यायचा आहे.
माझे जुने नाव प्रमोद शिर्के असे होते, सध्या मी ते बदलून अमितकुमार शिर्के असे केले आहे. व तसे महाराष्ट्र शासनाचे Gazzety पण मिळविले आहे.
सध्या fybsc ला प्रवेश घेताना मी नवीन नवानुसार प्रवेश घ्यायचे ठरविले परंतु कॉलेज मला जुन्याच नवानुसार प्रवेश देण्यास तयार आहे.
त्यांचे असे म्हणणे आहे की, 12 वीच्या शाळा सोडल्याचा दाखला यावर जे नाव आहे त्यानुसारच प्रवेश मिळेल.
नवीन नवानुसार नाही.
तरी मी आता काय करू.
कॉलेज शासनाचे Gazzet मानण्यास तयार नाहीत.
आपले कॉलेज ने , राजपत्रात नमूद नावाप्रमाणे , आपणास प्रवेश देणे आवश्यक आहे .
आपले विंनती प्रमाणे कॉलेज नावातील बदल करत नसेल तर त्यांना , तसे लेखी उत्तर देण्यास सांगा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
20-06-2016
sadik11m@rediffmail.com
Sir mazya ajobacha vadilani viklel ghar mazya ajobani 50 te60 varshapurvi vikat ghetal.. pan kalantarane ajobancha donhi bavhanchi nave sudha tya gharacha malki hakkamadhe nondavili geli..ani sadya te amcha gharamadhech rahat ahe.tari aata tyanchi zaleli pokal nond kami kashi karu? Ani mala sambandhit gharache june purave kothun v kashi miltil?
आपले आजोबानी घर विकत घेतले , ते नोंदणीकृत दाताने विकत घेतले का ? केवळ स्टँम्प पेपर वर विकार घेतले आहे .जात घर नोंदणीकृत दास्ताने घेतले असेल तर , आपण त्या दस्त आधारे , गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज/अपील करा व इतर चुलत आजोबांची नावे कमी करण्या बाबत कारवाई करा
मात्र आपले चुलत आजोबा , घरातून जाणेसाठी , आपणास ( जात ते आपली विंनती ऐकत नसतील तर ) दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohini shilavat
19-06-2016
shilavat.rohini@gmail.com
माझ्या आईचे नाव वारस म्हणून इतर अधिकारात असताना तिच्या भावांनी नोंदणीकृत वाटप केले वाटपात बहिणीची संमती घेतली नाही कि क्षेत्र शिल्लक ठेवले नाही . काय करता येयील
वाटप पत्र नोंदी वेळी हरकत घ्या .
वाटप पत्र न्यायालयात आव्हानित करा
THE SPECIFIC RELIEF ACT, १९६३ खाली बहिणीचा मालकी हक्क सिद्ध करून मग
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
19-06-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, वडिलांनी स्वकष्टित जमिनीमध्ये घर बांधले आहे. सदर घर मृतुपत्र द्वारे मला दिले आहे. मृतुपत्र वेळेवर सादर न केल्याने व तहसीलदार यांनी कोणतीही चोकशी न करता सर्व वारसांची नोंद ७/१२ वर केली. त्यानंतर तलाठी यांनी काही वर्षांनी सदर घराची नोंद ७/१२ वर आई व इतर ९ अशी सामाईक हिस्यात तलाठी यांनी नोंद परस्पर घेतली. तलाठी यांना परस्पर नोंदी घेता येतात का? सदर प्रकरणा बाबत तलाठी यांची तक्रार करता येईल का? तक्रार कोणाकडे करावी, कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
ज्या नोंदीद्वारे आई व ९ खातेदारांची नवे दाखल केली आहेत ती नोंद प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करून आव्हानित करा
घराचे बाबतीत , गात विकास अधिकारी यांचे कडेअपीलकरा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohit
19-06-2016
www.roraj8@gmail.com
१९९७ साली माझ्या वडिलांकडून कोणतेही समतीपत्र न घेता आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या भावाने घर बांधले.
त्या नंतर त्यावेलेसच्या ग्रामसेवकास पैसे चारून घर कोणतेही कागदपत्र न देता ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली. स्वत : जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस (मी व माझ्या बहिणी ) यांची कोणतीही संमती न घेता घर नावावर केले.
तर आत्ता आम्ही घराची नोंदी वेळेसची कागदपत्र अर्ज द्वारे मागितली असता ग्रामपंचायत आम्हाला आमच्याकडे कोणतीच कागद पत्र नाही असे लिहून द्यायला तयार आहे तर त्या ग्रामपंचायत पत्र द्वारे मी सदर घराची नोंद रद्द करू शकतो का?
त्या नंतर माझ्या वडिलांचे नावे व त्याच बरोबर आमचे सर्वांचे नावे घर करू शकतो का ?
वडील हयात आहेत .
घराखालील जमीन वडिलोपार्जित आहे . मात्र घर तुमच्या भावाने बांधले आहे. त्यामुळे घराला ग्राम पंचायत दप्तरी केवळ त्याचे नाव दाखल होणे गैर नाही .
सामायिक / वडिलोपार्जित जागे वर , घर बांधले, त्या जागेतील हिस्स्या बाबत आपण नुकसान भरपाई बाबत दावा दाखलकरू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण kale
18-06-2016
kkale40@gmail.com
नमस्कार सर
सदर जमीन हि सक्षम अधिकार्याच्या परवानगीशिवाय खरेदी केली आहे आणि आता शर्तभंग झाला म्हणून जिलाधिकारी यांनी जमीन सरकार जमा करण्याचे असेश दिले आहेत निकालपत्रात वहिवाटीबद्दल काही उलॆख नाही. त्यानंतर आम्ही अपील करणार आहोत तरी दरम्यानच्या काळात त्या जमिनीवर आह्माला वहिवाट करता येईल का? आमची वहिवाट कायम राहील का ?
आपणाला तहसीलदार यांचे मार्फत या जमिनीमधून काढून टाकले जाईल . सरकारी जमीन बेकायदेशीर रित्या कसल्यास , आपण विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 441 अन्वये Criminal ट्रेसपास चा गुन्हा दाखल होऊ शकतो .
आपण अशी जमीनकसू शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राम शिंदे
18-06-2016
shinderam1983@gmail.com
आदरणीय सर,आमचे घराशेजारी असलेल्या खुल्या जागेतून परंपरेनुसार गेली ६५ वर्षे आमची वहिवाट आहे.ती खुली जागा आम्ही व आमचे दोन शेजारी असे तिघात सामायिक आहे. फक्त आमचे खरेदी खतात सदर जागेतून वहिवाटीचा उल्लेख नाही.खुली जागा तिघात सामायिक असताना ६५ वर्षांनी आता त्यातील एका शेजार्याने त्या जागेतून आमची वहिवाट बंद करणेकरिता ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे.तरी आम्ही आता काय करावे?
शेजार्याने केवळ तक्रार केली आहे . त्याने वहिवाट रस्ता बंद केलेले नाही . आपण रस्ता वापरू नये आस आदेश देण्याचा , पंचायातीस आदिकर नाही. या उप्रोक्ष , पंचायतीने आपणास नोटीस दिल्यास , सदर रस्ता६५ वर्षापेक्षा जादा कालावधी पासून वापरात आहात हे उत्तरात सांगा
तक्रार करणार्याने आपला रस्ता बंदकेल्यास , त्याचे विरुद्ध मनाई हुकुम , दिवाणी न्यायालयाकडून घ्या .
( आपले प्रश्नावरून रस्त्याचा वापर शेती साठी होत नाहीहेदिसून येते . थामुळे माम्लेत्डत कोर्ट कायद्याचा उपयोग होणार नाही)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
