जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नवीन अविभाज्य शर्तीची जमीन खरेदी केलेनंतर ७/१२ नावावरती होऊ शकतो का?
सक्षम अधिकारी यांची परवानगी घेऊन खरेदी केल्यास ७/१२ वर नोंद लावता येईल

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

प्रथम परवानगी घेतले.इ असल्यास

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
18-06-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.

Question by Chetan chand
18-06-2016
cj45522@gmail.com

नमस्कार सर ,माझ्या वडिलांना चार भाऊ आहे .माझे वडील चार नंबरला आहे .आजोबा वयोवृद्ध झाले असुन त्यांनी जमीन वाटून दिलेली नाही. अता जमीन वाटप करायची आहे,तर आधी जमीन निवड़णाचा अधिकार कोणत्या भावाला आहे .तसेच गाव नियम(वाटणीचा )लागू होवू शकतो का? काही कायदा आहे का. Plz...सांगावे.

सर्व भाऊ आपापसात संमतीने ठरवू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन निवड करण्याचा कोन्ना एकाला अधिकार नाही . जमिनीची सरस निरास वाटप कलम ८५ खाली तहसीलदार यांचे कडून करून घ्या . भूमी अभिलेख खाते , वाटप करताना सर्वांना समान प्रतीची जमीन देणे बाबत कारवाही करते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाढीव गावठाणा मध्ये प्लॉट मिळाला आहे .त्यामध्ये इतर अधिकारा मध्ये नवीन अविभाज्य शर्त असे लिहिले आहे.नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय ?सदर प्लॉट वर घराचे बांधकाम करणेसाठी गृह कर्ज घेत येते का ?
अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे , गावठाणातील मिळालेला भू खंड परवानगी शिवाय विकत येणार नाही . घर बांधणीसाठी कर्ज मिळू शकते . कर्ज देणारी वित्त संस्था , या बाबत प्रांत अधिकारी यांची परवानगी आणण्यअ बाबत आपणास सांगू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,

तीन कुटुंबातील vadiloparjit samayik jaminiche khate vatap kinva teen bhag zalele nahit आणि ti jamin tukdya tukadya madhye vibhagali geleli aahe tasech pratyekache saat baara vegvegle aahet. Tasech teen कुटुंबातील kahi chulate kaka mumbait aahet tar kahinche mayat zalele aahe. Pratyekache chulate kakanchya mulanchi vegvegli mate aslyamule khatevatpacha prashna kinva teen bhag karnyacha prashna baryach varshapasun rengalat rahila aahe आणि to prashna sutanyachi shakyata disat nahi.

1. Chulat bhavane swatahachi aarthik stithi changali astanahi kutumbala vishwasat na gheta tyach jaminivar tyane swatahachya aani baykocyha nave society kadun karja kadhale aahe aani saat bara utaryavar karjacha boja dakhavat aahe tasech kutumb pramukh म्हणून khatyavar sarvat mothe chulate kaka je mayat zale aahet tyanchya mulache naav lavayache sodun swatahachya bhavache naav lavalele aahe. Ya prakaranacha jaminiche vatap kartana kinva teen bhag kartana kahi adachan yevu shakte का ??

2. Vadiloparjit samayik jaminichi ritsar teen bhagat khate vatap kinva teen bhag karnyasathi konte prasha marg lavave lagatil jenekarun khate vatap suralit hoil ?

3. Tasech kamit kami kiti gunthyachi mojani करता yeil aani teen kutumbache swatantra saat baara करता येतील का ?

4. Aata amhi ekach gharat vadvidad nakot म्हणून kharedi khatane dusaryachi jamin vikat gheun ghar bandhale aahe. वडिलोपार्जित samayik jaminicha kahi bhag aamhi navin kharedi khatane vikat ghetlelya jaminisl agoon aahe aani var ullekh kelypapramane tya jaminivar mhanjech सात बारा var karjacha boja dakhvat aahe. Aamchi ashi iccha aahe ki tya samayik jaminicha kahi bhag aapnas milava karan ti aamhi kharedi khatane vikat ghetleya jaminis lagoon aahe pan maza eka chulat bhavache jynae karj ghetale aahe tyache ase mhanane aahe ki ti jamin to aani tyache kutumb varshanu varshe kasat aslyamule aani tya jaminisathi kahi kharcha zalyamule ti jamin aamhala denyas tyancha virodh aahe.

Krupaya varil vishay samajun aamha kutumbala lagatchya jaminicha kahi bhag kasa milavata yeil yache margadarshan karave hi विनंती.
आपले प्रश्नावरून वडिलोपार्जित जमिनीचे त्या त्यावेळी वाटप झाले असल्याचे दिसून येते . वाटप प्रमाणे , प्रत्येक जन जमीन वहिवाट करत आहे . अश्या स्थितीत पुन्हा वाटप करून मिळणे म्हणजे , आपणास खूप दिवस त्याकरता प्रयत्न करावे लागतील
प्रथम , वडिलोपार्जित जमीनम्हणजे ती जमीनकोणाचे होती ?
त्या मुल पुरुषाचे नावावर किती जमीनहोती?
कल्पर्तावे वाटप होत असताना , त्यास आव्हानित का केले नाही ?
या बाबत महसूल कार्य प्रणालीनुसार फारसे काही सध्या होणार नाही.
आपणास , सर्व माहिती एकत्रित करून, दिवाणी न्यायालाय्त , चुक्क्चे वाटपआव्हानित करावेलागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय कुंडेटकर सर उत्तराबद्दल फार धन्यवाद.
1) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का? सर हे प्रश्न मी पाठवले होते त्याचे उत्तर आपल्याकडून आले आहे. धन्यवाद पण असे गैरप्रकार आमच्या भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत या बाबत तक्रार कोणाकडे करावी ? व यास जबाबदार कोणाला धरता येईल. व यासाठी काही दंडाची तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती कळवावी.
पिके भिन्न असल्यास , दोन वित्तीय संस्था एकाच्क्षेत्रासाठी पिक कर्ज देऊ शकतात
जमिनीवर कर्जाचा बोजा असताना , जमीन वाटप होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे कि सात बारा उतारा वाचत असताना जमिनीचे क्षेत्रफळ जे हेक्टर आर चो.मी मध्ये दिलेले असते ते हेक्टर आर म्हणजे किती गुंठे जमीन असते , तशेच ०. २०.०० असे जेव्हा लिहिलेले असते तेव्हा किती गुंठे जमीन असते याची आपण माहिती द्यावी हीच नम्र विनंती .
एक गुंठा = ३३ फूट X ३३ फूट किंवा १०८९ चौरस फूट
एक आर = १०७६ चौरस फूट किंवा १०० चौरस मीटर
एक एकर = ४० आर किंवा ४००० चौरस मीटर किंवा ४३०५६ चौरस फूट किंवा ०.४१ आर
एक हेक्टर = १०० आर किंवा २.४७ एकर किंवा १०,००० चौरस मीटर

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,
एकाच सात बारावर दोन रस्त्याची नोंद असू शकते का?
आमच्या सात बारावर दोन रस्त्याची नोंद आहे. "सार्वजनिक रस्त्याचा हक़्क़" आणि "वहिवाटीच्या रस्त्याचा हक़्क़". सदर नोंद बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदार दारिद्र्यरेषेखाली नसल्यास १०/-रु चे अर्ज शुल्क भरले नाही तर माहिती चा अर्ज या कारणास्तव अपात्र ठरू शकतो काय ?
नाही. परंतु माहिती अधिकार्याने त्याबाबत कळविल्यास ते शुल्क भरावे लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबा नारायण लाहनुजी वाघ यांची कुळ जमीन सातबारा व गटनंबर रा. कोठा

Question by rohit patil
14-06-2016
rhtpatil168@gmail.com

सर माझे आजोबा त्यांना चार भाऊ होते ते असे भास्कर , बाबू, मोहन, भादू हे त्यांच्या नावावर एक घर होते त्या घरात आता एक म्हणजे भास्कर व त्यांचा परिवार राहत आहे व ते बाकी लोकांना तेथे राहू देत नाही त्या घरात सर्वांचे नाव आहे तरी त्यावर काही उपाय सांगावा हि विनंती
दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by rohit patil
14-06-2016
rhtpatil168@gmail.com

सर मला १९२१ सालची एक फेरफार नोंद हवी आहे ४६३ पण ती नोंद रेकॉर्ड रूम ला नाही त्या आधीचे सर्व नोंद आहे पण ते रजिस्टर मिळत नाही आहे तरी ती नोंद पहायची आहे तर ती कशी मिळेल ते सांगू शकता का .....
रजिस्टर मिळत नाही तर रेकॉर्ड रूम कडून तसे पत्र घ्या. इतर संबंधित लोकांकडे विचारणा करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by किरण kale
14-06-2016
kkale40@gmail.com

शर्तभंग नियमित करावा म्हणून अर्ज करा कोठे करावा आणि तसे होईल का ?सात /बारा उतार्यावर राखीव वन अशी नोंद आहे परंतु आता तेथे वन नाहीत मग ते कमी होवून मिळेन का?
शर्तभंग नियमित होउ शकतो. संबंधित तहसील कार्यालयात विचारणा करा. राखीव वन नोंद कमी होणे अवघड आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Dear Sir,


Kindly guide us on below points as we are planning to purchase agricultural land in Kudal, sindhudurg

Land is Class 2 land with " Avibhajya niyantrit satta Prakar " and " Sarkari Akari Pad "

1. Is it possible to purchase such kind of land?
2. If yes then what will be the procedure for the same?
3. Is it possible to convert this land in Class 1?

Your help is highly appreciated.

Thanks,
Sandeep S Patkar
1. It is possible to purchase such kind of land with prior permission of Collector
2.For the procedure, enquire in concern Collector office.
3. It possible to convert this land in Class 1, after paying the appropriate amount in Government Treasury.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Pankaj patil
14-06-2016
drpankajrpatil3@gmail.com

Which posts comes under state civil services and which1 unders non-state civil services in maharashtra?
it is better to enquire on site of Maharashtra Public Service Commission.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का? सर हे प्रश्न मी पाठवले होते त्याचे उत्तर आपल्याकडून आले आहे. धन्यवाद पण असे गैरप्रकार आमच्या भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत या बाबत तक्रार कोणाकडे करावी ? व यास जबाबदार कोणाला धरता येईल. व यासाठी काही दंडाची तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती कळवावी.
१) एकाच शेती शेत्रावर, बँकेचा ना हरकत दाखला असल्याशिवाय , दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येत नाही. २) एकाच शेत्रावर बँकेचा ना हरकत दाखला असल्याशिवाय , जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येत नाही. ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना, बँकेचा ना हरकत दाखला घेऊन वाटणीपत्र करून फोड करता येते . या बाबत तक्रार बँकेकडे, तहसीलदारकडे करावी यासाठी बँकेचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय , दुबार कर्ज घेणार्यास जबाबदार धरता येईल. व यासाठी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर शेतीसाठी रस्ता नसल्यास काय करावे ?
१ रस्ता आपल्या गटातूनच मिळतो कि जेथून सोय असेल तेथून
जर शेजारील माणूस रस्ता देत नसेल तर काय करावे मी शेत नागरु शकत नाही
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यास , जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलाम 143 अन्वये बांधावरून रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेतीसाठी रस्ता नसल्यास तहसीलदारकडे रस्ता मागणी अर्ज करावा, जेथून सोय असेल तेथून तहसीलदार रस्ता देऊ शकतात.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या व्यक्तीचे वडील ५० वर्षापूर्वी मयत आहेत .आज रोजी मुलांकडे ते मयत असलेबाबत कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नाहीत व सरकार दप्तरी आढळ होत नाहीत.त्यामुळे वारस नोंद होत नाही.तसेच मुलांचे चुलतेहि त्यांना विरोध करत आहेत.तरी वारस नोंद करणेकामी कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
इतर पुरावे सदर करून, दिवाणी न्यायालयातून वारस दाखला मिळवावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by jathar
12-06-2016
www.roraj8@gmail.com

१९३५ साली आम्हाला आमच्या स्वताच्या विहिरीच्या कायम स्वरूपी पाण्याच्या बदल्यात घर बांधण्यास तोंडी जागा दिली. त्यावर आम्ही घर बांधले. त्यानंतर आमच्या ५ पिढ्या आम्ही ती जागा आम्ही वापर करतोय जागेचा कोणताही कागद आमच्या कडे नाही घर बांधताना आम्ही आमच्या घराभोवती तीन बाजूने आंगण काढले व आता आम्हा विहिरीचे पाणी नको आम्हला आमची जागा द्या म्हणतात
घर नोंद करताना जुन्या काळात फक्त घरातील मोजमाप होत होते अंगणाचे नाही तर आमची १९३५ साला पासून वहिवाट आहे आज पर्यंत आम्हाला कोणीही आडविले नाही
मार्गदर्शन करावे
80 वर्षे आपण जागेचा वापर करत आहेत. आपली वहिवाट /ताबा त्यांना माहित आहे . आपल्याला जागेतून निष्कासित करणेसाठी त्यांनी कोणतेही प्रायांतही केलेले नाही. त्यामुळे आपण Adverse Possession च्या तत्वाने मालक झालेला आहेत .आपली मालकी The Specificc Relief Act खाली या पूर्वीच्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे दिवाणी न्यायालयाकडून जाहीर करून घ्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

हा वाद दिवाणी न्यायालात सोडवला जाऊ शकतो

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by rohit
12-06-2016
www.roraj8@gmail.com

दोन भावाच्या नावे वडिलोपार्जित जमीन असताना, यात कोणतेही वाटप अथवा खातेफोड नसताना एका भावाने स्वतचे मुत्युपत्र तयार केले आहे या मुत्युपात्रास आम्हा वारसांचा विरोध आहे तसेच दुसर्या भावाचाही विरोध आहे. तर हे मुत्युपत्र तलाठी साहेबांनी नोंद न करण्यास काय करावे.
आम्हा सर्व वारसांची वारस नोंद लागावी व सर्वाना समान हिस्सा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे
कृपया मदत करावी
कोणत्याही सीमा किव्हा चातुर्सिमा ठरलेल्या नाहीत किवा कोणतीही मोजणी झालेली नाही
वडिलोपार्जित जमिनीतील स्वतःचा हिस्सा मृत्यू पत्राने दिला जाऊ शकतो. नोंदीबाबत तक्रार असेल तर तक्रार अर्ज तालाठीकडे दाखल करा. मंडलाधिकारी त्यावर तक्रार केस चालवून निकाल देतील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... sir...saprem namskar ...mi khed Ratnagiri madhe rahat asun..mi 3 gunta jamin vikat ghetali aahe ..tachi notary sudha keleli aahe jagechya nakasha nusar malkane aamhala Jo jageparyant janyasathi rasta dila aahe...tyach rastya var dusryane ghar bandhale aahe mag ya sandarbhat mi grampanchayat javal takrar hi keli .matra 3 mahine zale tari ajun tya takrarikade konihi laksha det nahi...mag ashavile mala jage paryant jayala rasta kasa milavata yeyel....jamin malak sadhya hayat nahit....krupaya marg darshan karave
आपण जमीनखरेदी करताना , त्याची नोंदणी कायद्या अंतर्गत नोंदी दाटस केलेला नाही . त्या मुले आपल्याला मलिकी हक्क प्राप्त होत नाही .
तथापि आपण The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात आपली मालकी सिद्ध करून मिळण्यासाठी दावा करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुम्ही जर तुमचा व्यवहार दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केला नसेल तर त्या व्यवहाराची नोंद शासकीय दप्तरात होणार नाही. तुमचा व्यवहार जर कायदेशीर असेल तर तुम्ही तहसीलदारकडे दाद किंवा रस्ता मागू शकाल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
आम्ही तीन भाऊ व एक बहिण आहोत यात वडील हयात असताना सर्वाना घरे करून दिली आज त्यात मी राहत असलेले घर माझ्या वाट्याला आले होते पण ते घर मी त्या वेळी माझ्या नावावर केले नाही ते घर अजूनही वडिलाच्या नावावर आहे आता ते घर मला माझ्या नावावर करायचे आहे या प्रक्रियेत माझी आई , मोठा भाऊ व बहिण माझ्या बाजूने आहेत मी राहत असलेल्या घरावर सर्वानु मते माझा अधिकार आहे यात माझा एक भाऊ सही देत नाही तरी मला घर नावावर करण्या विषयी मार्गदर्शन करावे हि विनंती
घर कोणाच्या हद्दीत आहे ? वाट्याला आले होते म्हणजे नेमके कसे? या बाबत खुलासा आवश्यक. अन्यथा हा वाद दिवाणी न्यायालात सोडवला जाऊ शकतो

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com

आदरनिय सर , आमच्या शेजारील शेताच्या उतारा क्रमांक हा आमच्या उतार्याच्या अनुक्रमानिकेने आहे सदर चे शेत एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावे आहे आणि त्या उताऱ्या मध्ये इतर अधिकारी सदरा मध्ये आमच्या आजोबाचे नाव ता.ग.दे सदरी आहे आणि त्या पुडे कंस मध्ये १ नंबर आहे सर सदर च्या नोंदी चा अर्थ आणि उद्देश काय होता जर स्पष्ट करावे हि विनंती सर जो उतारा आमचा आहे ती शेती आमच्या आजोबांनी विकत घेतलेली होती.


संबंधित फेरफारचा उतारा काढून बघावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by रवि
11-06-2016
ravindra171282@gmail.com

आदरणीय सर कायदेशीर रित्या हक्क सोड पत्र तयार केले आहे आणि तलाठी कार्यालयात नोंदी साठी दिले असता आम्हाला ओंन लाईन फेरफार निघेल असे सांगितले आणि tehsil कार्यालातून नोंद ओंन लाईन होईल असे सांगितले सर सदर च्या बाबतीत प्रश्न असा आहे कि तहसील कार्यालात आम्हाला कोणाकडे भेटावे लागेल किवा ओंन लाईन फेर्फार्र त्यांचा channel कसे असेल त्या बद्दल सांगावे कि जेणे Karun भविष्य मध्ये दस्त नोंदवले बरोबर तहसील कार्यालात भेट देवून सदर च्या नोंदी चा पाठ पुरावा करता येईल किवा ओंन लाईन फेरफार इंटर नेठ वर बघता येईल का किवा त्याचा पाठ पुरावा कसा करावा e फेरफार कश्या प्रकारे कार्य करेल त्या संबंधी अधिक ची माहि द्यावी
संबंधी तलाठी यांचेकडे विचारणा करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.49 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3