जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Kakare R
12-02-2015
r.kakare@gmail.com

Hindu Succession (Amendment) Act, 2005 नुसार ज्या मुली चा जन्म २००४ पूर्वी झाला असेल न त्या मुलीचे वडील २००४ किंवा १९९४ पूर्वी वारले आसतील तर ,
१. त्या मुलीला किती वाट\ मिळतो..?
२. वाटणी कशी होते?
३. त्या मुलीला आजून बहिणी न भाऊ आसतील तर वाटणी कशी होईल ?

Question by Pradip Jagtap
12-02-2015
pradip.p.jagtap@gmail.com

तहसिलदार याचे आदेशावरून झालेल्या फेरफार नोंदी विरूध तक्रार रजिस्टर मधी चौकशी चालु आहे. तरी चौकशी प्रकरणच्या निकालानंतर किती दिवसानी नोंदी प्रमाणीत केल्या जातात?

अपील करण्‍यासाठी किती दिवसाची मुदत दिली जाते?
मा.सराना माझा नमस्‍कार ,
सर मी 18 ऑगस्‍ट 2009 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात रूजू झालेला आहे.व माझे सोबत एकुण निवड झालेले 59 कर्मचारी होते तसेच मी विभागीय दुययम परिक्षा मार्च 2010 मध्‍ये उर्तीण झालो व म‍हसूल अर्हता जानेवारी 2014 मध्‍ये उर्तीण झालेा माझे सोबत लागलेले माझे सहकारी हे माझे नंतर महसूल अर्हता उर्तीण झाले आहे तर त्‍याची विभागीय पदोन्‍न्‍ाती समीती मध्‍ये माझे सोबत लागलेले कर्मचारी ज्‍याची जेष्‍ठता क्रंमाक हा माझे पूर्वीचा आहे तर त्‍यांची निवड अ.का. म्‍हणून माझे नंतर होईल की माझे अगोदर उदा.
1.माझाा जेष्‍ठता क्रमाक 890
महसूल अर्हता उर्तीण जाने 2014
2. माझे सहकारी जेष्‍ठता क्रम 870
महसूल अर्हता उर्तीण डिसेंबर 2014
ज्‍यावेळी पदोन्‍नती समितीची बैठक होईल त्‍यात माझे नावाचा विचार अगा्ेदर होइल की नंतर परिक्षा उर्तीण झालेली दिनांक अगोदर धरतात की जेष्‍ठता क्रमाका नुसार निवड करतात कृपया याबाबत स्‍वंयस्‍पष्‍ट मार्गदर्शन करावे ही नम्र विंनती
मला जात पडताळणी साठी जन्‍म नोंदवही गाव नमुना 14 मध्‍ये आजोबाचे 1901 ते 1930 पर्यंतचे जन्‍म शोधायचा आहे.

Question by ओमेश
12-02-2015
barapatreomesh@gmail.com

शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगीची आवश्यकता आहे काय ? असल्यास शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगी मिळल्यानंतर परावर्तीत कर व अकृषक कराची आकारणी करता येईल काय ?
महा. जमीन. मह. अधि. 117(4) मध्ये शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक करात सुट दिली आहे. तरी अकृषक परवानगी देतांना परावर्तीत कर व अकृषक कराची आकारणी करावी काय ?
असल्यास शैक्षणिक प्रयोजनाकरीता अकृषक परवानगी मिळल्यानंतर किती वर्षानंतर अर्ज सादर करता येईल ? कृपया शासन निर्णय क्र व दिनांक देण्यास विनंती आहे
सर
अनु क्र २२ मध्ये अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रकाचा शोध घेतला असता असे परिपत्रक दिसून आले नाही तरी अकृषक परवानगी मिळल्यानंतर ४ वर्षानंतर अर्जदाराने अर्ज करणे अपेषित आहे याबाबत परिपत्रक किंवा शासन निर्णयाचा दिनांक अवगत करण्यात यावा हि विनंती

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

१. होय
२.परावर्तीत कर भरावा लागेल .
३.११७(४) प्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडून सुट मान्य करून घ्यावी लागेल
4

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखद्या स.नं. च्या ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात निसप्र व ३६ व ३६अ ला पात्र अशी नोंद आहे. सदर जमिनीचा जुना नोंदविलेला फेरफार मंजुर आहे पंरतु ७/१२ ला अमंल दिलेला नाही. तर सदरच्या फेरफारानुसार ७/१२ ला आज अमंल देता येतो का?
फेरफार काय आहे

फेरफार अंमल देण्यास हर्क्स्त nahi

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ram phadatare
11-02-2015
ram.p.phadatare@gmail.com

१९९७ साली तोंडी वाटप झाले आहे.त्याच वाटपाप्रमाणे १९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी मुळ कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा फेरफारला उल्हेखहि आहे. व त्या वाटपाप्रमाणे १९९७ सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमिनीवर माझा व भावाचा त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकि आहे. त्याच मालकि हक्काने भावाने त्याचे हिस्स्याची जमीन 2000 साली रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाहि व सदर फेरफार नोंदी या अर्ज व stamp पेपरवरन झाल्‍या असल्याने रद्द करून त्याचे नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत करणेकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला व उपविभागीय अधिकारी यानी माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे. त्याच वाटपाप्रमाणे भावाचा हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द केलेल्या नाहीत.

१९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी याना stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी कागदपत्रे असलेली आरटीएस Faayil कागदपत्रे जतन करण्याचा कालावधी संपल्‍याने नष्‍ट केली आहेत त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीत.
मुल मिळकत हि आपले वडिलांचे मालकीची आहे . त्यामुळे आपण जुने फेरफार , ७/१२ क्षेत्र या वरून , सध्या कसत असलेली जमीन आपले वाहिवातीची व मालकीची असले बाबत , द्वितीय अपिलीय अधिकारी यांचे निदर्शनास अपील द्वारे आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एक्‍स गांवामध्‍ये निरंतर भाडेपटटयाने (99 वर्षे ) 150 चौ.मी. जागा मला मिळालेली आहे. सदर जागा ही ब या सत्‍ता प्रकारची असून सदरची जागा र‍हिवास या कारणासाठी मला कायमस्‍वरुपी सत्‍ता प्रकार अ करणेची आहे. तरी सदरची मिळकत सत्‍ता प्रकार अ करता येईल का ? व त्‍यासाठी कोणाची परवानगी आवश्‍यक आहे ?
आपण नमूद केले प्रमाणे , आपणास शासनाने भाडेपट्ट्याने जमीन दिलेली आहे .

भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी , भोगवटा मुल्य वसूल करून शासन देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सदिप
11-02-2015
patilsandeep737@gmail.com

माननीय श्री. किरण पानबुडे , उपजिल्हाधिकारी
---------------
एकादा कर्मचारी शासकीय सेवेत पदोन्नतीच्या पदावर कोणताही खंड न देता 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी कालावधी पदोन्नतीच्या पदावर कार्यरत असतांना त्यांना पदानवत करता येते का
-----------
एका पदावर 365 दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
---------------------
तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० ते 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी काय करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
--------------
त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
--------------------------------------------------
अधिक माहिती:-
त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेली होती.
पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. तसेच सर्व पदे हि स्थायी आहेत.
---------------
आपले मार्गदर्शन लवकर मिळण्यास विनंती आहे.
पदाचा तपशील द्यावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
एखाद्या कोतवालाने कामात किंवा तलाठी दप्तरात गैरव्यवहार केला असल्यास त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करता येते का ? तसेच कोतवालांना सेवेतून बडतर्फ करणेबद्दलची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
कोतवाल अवर्गीकृत शासकीय कर्मचारी आहे

त्यामुळे त्यांना महाराष्ट्र ( शिस्त व अपील ) नियम लागू आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pradip Jagtap
11-02-2015
pradip.p.jagtap@gmail.com

तहसिलदार याचे आदेशावरून झालेल्या फेरफार नोंदी विरूध तक्रार रजिस्टर मधी चौकशी चालु आहे. तरी चौकशी प्रकरणच्या निकालानंतर किती दिवसानी नोंदी प्रमाणीत केल्या जातात?

अपील करण्‍यासाठी किती दिवसाची मुदत दिली आहे?
पुनर्वसन क्षेत्र धारणा वर्ग' १ प्रकारची जमीन असेल तर किती कालावधीनंतर विकता येते आणि त्यासाठी कुठल्या परवानगीची आवश्यकता आहे, याची माहिती मिळावी
आपली बुडीत क्षेत्रातील जमीन वर्ग एकची असल्यास आपल्याला लाभ क्षेत्रात वर्ग एकची जमीन मिळेल. अन्यथा वर्ग दोनची जमीन मिळावी. नवीन शासननिर्णयानुसार जर संपादनाला १० वर्षेपेक्षा जास्तन काळ झाला असेल तर बुडीत क्षेत्रातील आणि लाभ क्षेत्रातील जमीनीचे सर्व ७/१२ व फेरफार तसेच कब्जेहक्काची रक्कम भरल्याचे पुरावे घेऊन संबंधीत प्रांत कार्यालयात संपर्क साधावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर लावले व माज्या वाडिलांच्या व लहान काकानच्या नावाची नोंध गाव नमुना ६क मध्ये झालेली आहे पण सातबारावर नावे नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावन्यास ते चाल धक्काल करीत आहेत तर मी स्‍वतंत्रपने माझ्या वडिलांच्या नावाची गाव नमुना ६क प्रमाणे वारस तपासणीसाठी तहसीलदार साहेबांकड़े अर्ज करू शकतो काय ? तहसीलदरांकडे अर्ज़ केला असता तहसीलदार मुख्य वारसदाराना नोटिस काड तिल काय की नोटिस न लावताच सात बारावर नाव लावण्यासाटी तलाटीसाहेबाना आदेश देतिल काय, त्याला साधारण पने किती कालावधी लागेल ? याची मला माहिती दयावी.
आपल्या मोठ्या काकांचे नाव अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क.) म्हणुन दाखल झाल्याचे दिसते. अज्ञान पालनकर्ता मयत झाल्यानंतर अज्ञान पालनकर्ताचा फेरफार व सध्या असलेले सर्व वारस यांच्या नावे तहसिलदार/तलाठी यांचेकडे प्रतिज्ञापत्रासह अर्ज करावा. त्या‍ अनुषंगाने फेरफार नोंदवल्यानंतर सर्वांना नोटीस काढुन, स्थानिक चैाकशी करून, कोणाचीही हरकत/तक्रार नसल्यास साधारणत: १५-२० दिवसात वारस नोंद होणे अपेक्षीत आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननीय महोदय,

मी हेमंत धनाजी ताकवले रा.धनकवडी, ता.पुरंदर,जि.पुणे येथील रहिवासी असून आमच्या गावातील शेतजमिनीतून गटांमधून आमचा खाजगी रहदारीचा रस्ता आहे.सदरील गट नंबर १७५ व १७६ आहे.परंतु हा कोणत्याही सर्व्हे नंबरचा रस्ता नाही.या रात्स्यावरून आमच्या शेजारील लोक येत जात होते.परंतू आता आम्ही तेथे नवीन वावरे काढण्यास सुरुवात केली आहे, तसेच या गटांच्या सातबारा उतार्यांवर कसल्याही रस्त्याची नोंद नाही.हि पूर्णतः आमची खाजगी वहिवाट असून शेजारील कोणाचाही संबंध नाही.तेव्हा त्या लोकांनी तक्रारी अर्ज तहसीलदार साहेबांस केला तेव्हा तहसीलदार साहेबांनी आम्हास माल्मातदार कलम ५/२ अनन्वाये आदेश काढला कि सदरचा रस्ता वाहतुकीस खुला करावा.परंतु आमच्या या खाजगी गटातून जाणारया रस्त्यामुळे आमचे जवळजवळ १ एकर एवढे क्षेत्र जात आहे.तसेच या आदेशाबाबत आम्ही तहसीलदार साहेबांस विचारणा केली तेव्हा ते बोलले कि या रस्त्यावर PWD खात्याने खर्च केल्याचे पत्र आहे. तसेच त्यांनी आदेशात ह्या रस्त्यास सार्वजनिक रस्ता असे म्हटले आहे.आमच्या गावाच्या ग्राम नकाशामध्येही हा रस्ता नमूद नाही.आणी त्यांनी ज्या रस्त्याबाबत आदेश काढला आहे तो रस्ता दुसऱ्या ठिकाणी आहे जो आता ते लोक लांब असल्यामुळे वापरात नाही.परंतु ते तहसीलदार साहेबांस आमच्या गटातून जाणार्या रस्त्यास तो सार्वजनिक रस्ता आहे असे सांगतात.परंतु आमच्या गटातून जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटी ते लोक राहतात.त्यांचे ह्या रस्त्यात काहीच नुकसान होत नाही.त्यांना दुसरीकडून येण्या जाण्यास पर्यायी रस्ता लांब व वेधायावारती ( फिरून ) असल्याने ते आमची जमीन बळकावू पाहत आहेत.तसेच संबंधित आदेशाबाबत आम्ही तहसीलदार साहेबांस तो रस्ता न अडविल्याचा विनंती अर्ज केला होता तरी तहसीलदार साहेब ह्यांनी पुन्हा तीच आदेशाची नोतीचे काढून स्थ्ल्पाहणी करून पंचनामा केला आहे.या रात्याला आम्ही कोणीही लेखी मंजुरी दिलेली नाही.तसेच आम्ही त्या लोंकाना सर्वे नंबर वरून रस्ता देण्यास तयार आहोत.परंतु ते लोक न नुकसान भरपाई देत आहेत.

तेव्हा कृपया खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
१) जर वरील रस्त्यास तहसीलदार साहेब सार्वजनिक संबोधत आहे तर त्याची मंजुरीची कागदपत्रे ते आम्हास सादर करू शकतील का ? तसेच ज्या रस्ताबाबत त्यांनी आदेश काढला आहे त्या रस्त्याचा नकाशा,रस्ता ज्या गटातून व सर्वे नंबर वरून जातो ते नंबर ह्याची माहिती ते देवू शकतात का?आणी ती माहिती कशी मिळवावी.

२) जर त्या लोकांना पर्यायी रस्ता लांब,फिरून,वेध्यावरती रस्ता असून ते नवीन रस्ता मागू शकतात का?

३) एकाद्याच्या खाजगी जमिनीत रस्त्याची कसलीही नोंद नसताना तेथून सार्वजनिक रस्ता जाऊ शकतो का?त्यास त्या मालकाची मंजुरी आवश्यक असते का?

४) आणी वरील घटनेत तहसीलदार साहेब किंव्हा तक्रार अर्जदार हे आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या कलम ३०० अ मालमत्ता अधिकार या आमच्या कायदेशीर हक्कावारती निर्बंध लढू पाहत आहेत का?

५) काय आम्ही आता मानवी हक्क केंदीय आयोग किंव्हा राज्य आयोग यांच्याकडे तक्रार करू शकतो का?

६) जे लोक तक्रार करीत आहेत ते लोक नुकसान भरपाई देत नाहीत तसेच पंच्नाम्याच्या वेळी त्यांनी सदरील रस्ता १९८१-८२ सालापासून अस्तिवात असल्याचे सांगितले आहे.तर आम्ही त्यांच्यावर एकरी २०००० रुपये प्रती वर्ष प्रमाणे ३५ वर्षे वहिवाट केल्याची नुकसानभरपाई मागू शकतो का ? दावा करू शकतो का?आणी कोठे व कसा करावा याची माहिती ध्या.

तसदीबद्दल क्षम्ह्स्वः

आपला कृपाभिलाषी,
हेमंत ताकवले.





१.माम्लेतदार कोर्ट कायद्या प्रमाणे वहिवाटीचा रस्ता ज्याचा वापर शेता कडे जाण्यासाठी / शेती कामासाठी होतो तो जर अडवण्यात आला असेल तर , तो दूर करून देण्याचे अधिकार मालेतदार यांना आहेत .
अश्या रस्त्याची गाव नकाशावर अथवा अन्य शाशकीय अभिलेखात नोंद असावीच अशी आवश्यकता नसते , माम्लेतदार , स्थळ पाहणी / लगत शेतकरी यांचे म्हणणे , अन्य पुरावा याचा विचार करून निर्णय घेतात .
२. जर रस्ता पारंपारिक असेल तर , दुसरा रस्ता उपलब्ध असला तरी , खुला करून देणे आवश्यक .

३. पारंपारिक रस्ता म्हणजे , खूप दिवस वापरातील रस्ता . आपण अथवा आपले पूर्वजांनी , सुर्वातीसाचा रस्ता वापरास हरकत घेणे आवश्यक होते . रस्ताच वापर खूप दिवस केल्याने तो पारंपारिक वहिवाटीचा रस्ता झालेला आहे

४. Article 300 A- या कलमानुसार कायद्याच्या प्रक्रियेशिवाय आपली मिळकत काढूल / संपादित करता येत नाही
माम्लेतदार कायद्या प्रमाणे मिळकत काढून घेतली जात नाही . केवळ आपण , रस्ता वापर करून देत आहात.
शिवाय रस्ता देण्याचा अधिकार , कायद्याने माम्लेतदार यांन आअहे. त्यामुळे हि घटना बाह्य कृती नाही .
५. मानवी हक्काची पायमल्ली होत असेल तरच , आपण मानवी हक्क आयोगाकडे दाद मागू शकता .
मानवी हक्क म्हणजे - जगण्याचा / स्वातंत्र्य / समानता व आत्म सन्मान हक्क

६. माम्लेतदार कोर्ट कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्‍न १ चे उत्तर: आपण संबंधीत केसच्‍या सुनावणीची कागदपत्रे मा.हितीच्‍या अ.धिकाराखाली मागु शकता. ती ३० .दिवसात तुम्‍हाला .मिळणे बंधनकारक आहे.

प्रश्‍न २ चे उत्तर: इतर पयार्यायी रस्‍ता उपलब्ध‍ नसेल तरच खाजगी मालकीतुन परस्‍पर संमतीने रस्‍ता देणे अपेक्षीत आहे.

प्रश्‍न ३ चे उत्तर: देण्‍यात येणारा रस्‍ता गाव नकाश्‍यात असणे अपेक्षीत आहे.

प्रश्‍न ४, ५, ६ चे उत्तर: आपण तहसिलदारच्‍या आदेशा.विरूध्‍द प्रांताकडे अपील करू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

प्रश्‍न १ चे उत्तर: आपण संबंधीत केसच्‍या सुनावणीची कागदपत्रे मा.हितीच्‍या अ.धिकाराखाली मागु शकता. ती ३० .दिवसात तुम्‍हाला .मिळणे बंधनकारक आहे.

प्रश्‍न २ चे उत्तर: इतर पयार्यायी रस्‍ता उपलब्ध‍ नसेल तरच खाजगी मालकीतुन परस्‍पर संमतीने रस्‍ता देणे अपेक्षीत आहे.

प्रश्‍न ३ चे उत्तर: देण्‍यात येणारा रस्‍ता गाव नकाश्‍यात असणे अपेक्षीत आहे.

प्रश्‍न ४, ५, ६ चे उत्तर: आपण तहसिलदारच्‍या आदेशा.विरूध्‍द प्रांताकडे अपील करू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Pradip Jagtap
09-02-2015
pradip.p.jagtap@gmail.com

sir,
Tasildar yanchye aadeshawarun zalelya Ferfar nondi virodhat
takrar register madhe takrar chawkashi purn zalyananter nond direct pramanit keli zate ka?
ki punha tasidar yanche aadesha virudh appeal karnyakarita 30-60 divsanchi mudat dili jate?
जाो अधिकारी तक्रार नाोंदीची सुनावणी घेऊन त्‍यावर .निकाल देताो ताो फेरफार प्रमाणीत करण्‍यास सक्षम असताो. मंडलअ.धिकार्‍याने तक्रार नाोंदीची सुनावणी घेऊन त्‍यावर .निकाल .दिला असेल तर ताो सदर नाोंद प्रमाणीत करताो. मंडल अ.धिकार्‍यापेक्षा वरीष्‍ठ अ.धिकार्‍याने तक्रार नाोंदीची सुनावणी घेतली असल्‍यास ताो .निकाल पत्रात मंडल अ.धिकार्‍यास तसा आदेश देताो. काही .जिल्‍ह्‍यात .निकालानंतर नाोंद प्रमाणीत करण्‍यासाठी अपील मुदतीपर्यंत थांबण्‍याच्‍या सुचना आहेत.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by samadhan
08-02-2015
iamsamg19@gmail.com

माझे आजोबा चे मृतुनंतर त्यांचे वारसा मधे (३ मुले + ३ मुली ) कोर्ट वाटप झाले.त्यानंतर ७/१२ ला ३ गट पडले १/६ क्षेत्र १ ला मुलगा ,१/६ २ रा मुलगा. उरलेल्या क्षेत्रला मालकी हक्कात ३ रा मुलगा व इतर हक्कात ३ मुली पैकी हयात असलेल्या व नसलेल्यांचे वारस यांची नावे होती.३ रा मुलगा मयत झाल्यानंतर त्याचे वारसा मध्ये कलम ८५ प्रमाणे वाटप झाले (त्यावेळी वारसा पैकी ३ मुले व १ मुलगी अज्ञान होती. त्यांच्या अ पा क यांनी वाटपावर सह्या / अंगठे केले ) आणि पैकी १/२ क्षेत्र तिसऱ्या मुलाचे सर्व वारस ,१/४ क्षेत्र तिसऱ्या मुलाचे १ सज्ञान मुलगी ,१/४ क्षेत्र इतर हक्कातील एकाच्या वारसांचे नाव मालकी हक्कात लागले. आता सर्व अज्ञान सज्ञान झाले आहेत त्यांना कलम ८५ प्रमाणे झालेले वाटप नको आहे, इतर हक्कातील नावांना १/४ हिस्सा रद्द करून त्यांना वाटा न देता त्यांची नावे इतर हक्कात होती तसीच ठेऊन पुन्हा वाटप शक्य आहे काय?. इतर हक्कातील नावे होती तसीच ठेवल्यास पुढे काही अडचणी येतील काय? इतर हक्कातील नावांना वाटा देणे बंधनकारक आहे काय? सज्ञान वारस तसेच अज्ञानाच्या अ पा क व इतर हक्कातील लोकांनी केलेल्या कलम ८५ वाटप विरुद्ध सज्ञान झालेवर किती कालावधीच्या आत दावा करावा लागतो?. इतर हक्कातील नावांच्या परवानगी सह्या शिवाय फेर वाटप करता येऊ शकते काय?
वाटप फेरफार फार जुना असल्‍यास अआता त्‍या .विरूध्‍द मुदतीच्‍या कायद्‍याची बाधा येत असल्‍याने अपील करता येणार नाही. चांगल्‍या वकीलाचा सल्‍ला घेउन .दिवाणी न्‍यायालयात दावा दाखल करणे उत्तम.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sainath
08-02-2015
gawalisainath7@gmail.com

me 2010 pasun pune district made talathi mhanun karayrat asun ssd pass naslyas aurangabad div made badli karata yeil ka badlisathi procedurechi mahiti milnes vinanti
ssd पास हाोण्‍याची अट पदाोन्‍नतीला लागु आहे. बदलीला नाही. आपल्‍या प्रांताकडुन.जिल्‍हाधिकार्‍यांकडे विनंती अर्ज सादर करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबांचे मृतुनंतर जमिनीचे कोर्ट वाटप माझे वडील व दोन भावात झाले. माझे वडिलांच्या मृतुनंतर कलम ८५ प्रमाणे अंतर्गत वाटप झाले तेंव्हा मी अज्ञान होतो.मला वाटप मान्य नाही तर मी काय करावे.वाटप होऊन १५ वर्षे झाली आहेत व मी सज्ञान होऊन १३ वर्षे झाली.जर वाटप विरुद्ध कोर्टात गेलो तर वयाचा काही मर्यादा येतील का.
परंतु आपण सज्ञान होऊन बराच कालावधी झालेला आहे . त्यामुळे चांगल्या वकिलाचा सल्ला घेवून पुढील निर्णय घ्यावा .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

अज्ञानात केलेले कोणतेही दस्त हे कायद्याला मान्य नाही.........

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

नमस्‍कार सरजी,
मी २०१० मध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे माझी निवड लिपीक म्‍हणून झालेली आहे महसूल विभागाच्‍या दुय्यम व अर्हता या दोन्‍ही परिक्षा मी मार्च २०१४ ला उत्‍तीर्ण झालेलो आहे व सद्यस्थितीत अ.का. च्‍या प्रमोशन साठी पात्र आहे. आस्‍थापना शाखा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडून मला असे समजले की बिंदू नामावली लागू झाल्‍यामुळे तुमचे प्रमोशन होण्‍यांस बराच कालावधी लागू शकतो करिता माझा प्रश्‍न असा आहे की नेमके बिंदू नामावली म्‍हणजे काय व माझ्या नंतर उपरोक्‍त दोन्‍ही परिक्षा उतीर्ण होणा-या कर्मचा-यांना ते माझ्या पूर्वी लागले व मागास प्रवर्गातील असल्‍यामुळे त्‍यांचे प्रमोशन पूर्वी होऊ शकतात काय व मी ओपन कॅटॅगिरीतून असल्‍याने मला अजून वाट पाहावी लागणार काय
पदोन्नती करिता अनु.जाती.,अनु जमाती. विमुक्त जाती / जमाती,वि.मा. प्र. या करिता १०० पदामागे आरक्षित करण्यात आलेल्या बिंदुला बिंदू नामावली असे म्हंतात.३२ पेक्षा कमी पदे असल्यास ते पदे कर्मानुसार फिरवून पदोन्नती दिली जाते. बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षा कडून प्रमाणित करून घ्यावी लागते.
२.परिक्षा उतीर्ण होणा-या क्रमाने पदोन्नती मिळते. (जागेची उपलब्धता पाहून )
३..पदोन्नती देंण्याबाबत दिनांक १५ /१०/१९९७ ला आर.के.सबरवाल या प्रकरणात मा. सर्वाच्च न्यायालयाने बिंदू नामावली बाबत काही मार्गदर्शन दिलेले आहे .त्याचे वाचन करावे .

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

Question by Ram Phadatare
07-02-2015
ram.p.phadatare@gmail.com

San 1997 rojichya Ferfar Nondi sambandhi kagdopatre ani RTS fayil tahsildar yaani san 2010 Sali nasht kelya nanter tya ferfar nondi virudh prant sahebankade appel dakhal karta yeil ka?
फेरफार कधीच नष्‍ट करता येत नाही. आरटीएस ची इतर कागदपत्रे नसली तरी फेरफार नाोंद पुरेशी आहे. केस जुनी असल्‍याने जर प्रांताने .विलंब माफ केला तर अपील चालवता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्‍नतीसाठी पात्रता ही महसुल अर्हता पास होण्‍याची दिनांकावर कि लिपीक पदावर रुजु दिनांकावर ग्राहय धरली जाते याची माहीती सांगणे तसेच पदोन्‍नतीच्‍या वेळेस अनु.जमातीत जागा शिल्‍लक नसल्‍यास इतर प्रवर्गात जागा रिक्‍त राहत असल्‍यास त्‍या पदावर अ.ज.च्‍या उमेदवारास जागा रिक्‍त होईपर्यंत पदोन्‍नती देता येते का.
लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्‍नतीसाठी पात्रता लिपीक पदावर रुजु दिनांकावर ग्राहय धरली जाते.

अनु.जमातीत जागा शिल्‍लक नसल्‍यास इतर प्रवर्गात जागा रिक्‍त राहत असल्‍यास त्‍या पदावर अ.ज.च्‍या उमेदवारास जागा रिक्‍त होईपर्यंत पदोन्‍नती देता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

अनु.जमातीकरीता लिपीक संवर्गातुन अ.का.संवर्गात पदोन्‍नतीसंदर्भात काही न्‍यायालयीन निर्णय झालेले असल्‍यास देण्‍यात यावे.
सत्‍ताप्रकार ब ची मिळकत अ करता येते का ? येत असलेस कोणाची परवानगी घ्‍यावी लागेल ? प्रस्‍तुत प्रकरणी शासन निर्णय असलेस सदर शासन निर्णयाची प्रत मिळावी ही विनंती आहे.
ब सत्ता प्रकारची जमीन अ सत्ता प्रकारात रुपांतरीत करता येते .
जमीन कोणत्या कायद्याने व कोणत्या उद्देअशने दिली आहे त्या वर परवानगी कोणाची लागेल हे अवलंबून आहे .

१. शाशानाने जमीन भोगवटा अधिकारात जमीन दिली असेल तर , शाशानाची परवानगी लागेल

२. कुल कायद्या खालील जमीन असल्यास , प्रांत अधिकारी यांची परवानगी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्‍न माोघम आहे. कृपया खुलासेवार .विचारणा करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Ram Phadatare
06-02-2015
ram.p.phadatare@gmail.com

Sir,
1997 roji tondi waatap zale aahe tya waatapapramane jaminichya record la nondi howun vahivati aahet n tyapramane shetsara bharla aahe. Tyach waatapane milaleli jamin mazya bhawane vikali aahe. mag aaj roji tya waatapane nondi nondanikrut dastashivay zalya aslyane registration act khali radd karta yetil ka?
१९९७ साली झालेली वाटप सर्वाना मान्य आहे का?
एवढ्या विलंबाने हरकत का ?
जर भावाने त्याचे तोंडी हिस्स्याने आलेली जमीन विकली( नोंदणीकृत दस्ताने ) असेल तर , आता विक्री व पर्यायाने विक्री खात रद्द करणे दुरापास्त

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ननं.७/१२ तयार होण्यापूर्वी जमिनीची रेकॉर्ड कोणत्या दस्तऐवजा मध्ये ठेवले जात होते व ते पहावयास मिळेल काय? असल्यास कोठे पहावयास मिळेल?
आपण आपले भूमी अभिलेख खात्यास भेट द्या
पूर्वी कायम धार तक्ता , सूड पत्रक अशे अभिलेख ठेवले जात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3