जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

बिनशेती आदेश पारित केल्‍यानंतर त्‍यापुढे किती वेळा मुदतवाढ देता येते.
सदर मुदत वाढ घेण्यासाठी करवायचा अर्ज व त्यासंबंधीची माहिती असणारी website कोणती?
पूर्वी तात्पुरती ( काही कालावधीसाठी ) परवानगी देण्याची तरतूद होती . तद्नंतर कायमची परवानगी देण्या बाबत शाश्नाचे आदेश होते
आता कलम ४४ मध्ये दुरुस्ती झाली आहे
बिन शेती परवानगी गरज नाही .
विकास परवानगी घेणे आवश्यक
दुर्द्ध्वनीवर , विलास भोसले यांचेशी बोलणे झालेप्रमाणे ( तसेच आपला mail ) आलेनंतर , दुरुस्त कलम ४४ अधिसूचना प्रत पाठवली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सहा वर्षापूर्वी शासनाने माझी जमीन साठवण तलावासाठी ताब्यात घेतली आहे.अजून एकही पैसा मोबदला मिळालेला नाही.शासनाकडे अनेक पत्रे पाठवली,पण एकदाही लेखी उत्तर आलेले नाही.काय करावे?न्यायालयात जावे लागेल काय?
भूसंपादन प्रकरणतील निवडा झालेवर मोबदला मिळेल .यंत्रनेनी भूसंपादन प्रकरण शिवाय ताबा घेतला असलास नायालयात जावे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Question by Ganesh Belge
29-01-2015
belageganesh1612@gmail.com

शासनाचे पती-पत्नी एकत्रीकरणाचे धोरण काय आहे व त्याबद्दल शासन निर्णय आहे का
शाषण परिपत्रक क्रमांक . यास. आर .व्ही -१०९७/प्र. क्रं २०/९७/बारा दिनांक २७/११/१९९७
परिच्छेद क्रमांक १०

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी

महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
सर मी माहाराष्ट्र शासनाच्या ऐका विभागात कंञाटी कम॔चारी मनूनं वाहनचालक या पदावर दोनवर्षा पासूनच काय॔रत आहे सर मला विभागाचा आस्थापनी दोनदा ऐका दिवसचा तांञीक खड दिला व सेवा सरळ केली पंण ज्या दिवशी तांञीक खड दिलात्या दिवशी मी कामावर हजर होतो
तशी नोंद हजरी रजीट॔र व
वाहन लोग बुक मध्य आहे सर मंग मला

मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येते का व
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतील का कुपया माहिती द्यावी ही विनंती .
धन्यवाद सर
संदीपजी
कायद्याची प्रक्रिया पार पडल्याशिवाय कोणालाही सेवेतून काढता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इनामवर्ग ६ब जमीन मधील ३ आर क्षेत्राचे खरेदीखत होऊन नवीन शर्तीमुळे नोंद रद्द झाली.त्यामुळे मूळ मालक सदर जमीन विकीकामी मा.जिल्हाधिकारी साहेबांकडून परवानगी घेऊन dusarya व्यक्तीस जमीन विकणार असेल तर पूर्वीच्या खरेदिखातामुळे शर्तभंग होऊ शकतो का?पूर्वी खरेदीखत करून घेतलेल्या व्यक्तीची कोणतीही हरकत नाही .अशा वेळी चालू बाजारभावाच्या ५०% कि ७५% नजराणा भरावा लागेल?कृपया मार्गदर्शन करावे..
शर्तभंग झालेला आहे. शर्तभंग प्रस्‍ताव पाठवण्‍यासाठी प्रयत्‍न करा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by tushar shewale
27-01-2015
tsshewale@gmail.com

सर,
सरकारी मुफ्त jaminitil निरंतर कायम लिलाव द्वारे मिळालेल्या भूखंडाची फेरविक्री बाबत कृपया मार्गदर्शन
करावे हि विनंती.
शाश्नाचे परवानगी शिवाय विक्री करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन शर्त काढण्यासाठी काय करावे लागते आणि किती खर्च येतो या बद्दल सविस्तर माहिती सांगा.
त्यास कोणती शर्त आहे त्यानुसार कलेक्टर/ विभागीय आयुक्त यांची परवानगी लागते.


Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्‍यानंतर पुन्‍हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्‍या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्‍कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्‍या वर्षी पुन्‍हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
मा किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी

महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
सर मी माहाराष्ट्र शासनाच्या ऐका विभागात कंञाटी कम॔चारी मनूनं वाहनचालक या पदावर दोनवर्षा पासूनच काय॔रत आहे सर मला विभागाचा आस्थापनी दोनदा ऐका दिवसचा तांञीक खड दिला व सेवा सरळ केली पंण ज्या दिवशी तांञीक खड दिलात्या दिवशी मी कामावर हजर होतो
तशी नोंद हजरी रजीट॔र व
वाहन लोग बुक मध्य आहे सर मंग मला

मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येते का व
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतात का कुपया माहिती द्यावी ही विनंती .
धन्यवाद सर
योग्य प्रक्र्येशिवाय आपणास काढता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Bhogvatadhar varg 2 (Harsul Gat No.166) madhe plot vikat gheu ka . Plot ghetana konti document bhagu.

अशा जमिनी ह्या नवीन शर्थीच्या असतात व त्या विक्रीसाठी शासनाची परवानगी लागते व शासनाला नजरानाही भरावा लागतो . त्यामुळे अशी परवानगी घेतली आहे का ? तसेच प्लॉट घ्यायचा असल्याने ( तुकादेबंदी कायद्याचा भंग होऊ नये म्हणून ) तशी अकृषिक /नगररचना परवानगी घेतली आहे का याची खात्री करावी .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर,
मी शासकीय नोकरीत कनिष्‍ठ लिपीक या पदी दि.१२/०६/२००८ रोजी हजर झालो आहे. मी आमच्‍या विभागाची विभागीय परीक्षा विहित मुदतीत म्‍हणजेच ४ वर्षात ३ संधीमध्‍ये उत्‍तीर्ण झालो नाही. तसेच माझ्यानंतर कनिष्‍ठ लिपीक या पदी काही कर्मचारी २०११ या वर्षी हजर झालेले आहेत. त्‍ोही अद्याप विभागीय परीक्षा उत्‍तीर्ण झालेले नाहीत, पण त्‍यांची अजून १ संधी शिल्‍लक आहे.
सध्‍या आमच्‍या सक्षम अधिका-यांनी दि.१/१/२०१५ ची कनिष्‍ठ लिपीक संवर्गातील तात्‍पुरती सेवाज्‍येष्‍ठता यादी प्रसिध्‍द केली आहे तर त्‍यामध्‍ये माझी सेवाज्‍येष्‍ठता ही २०११ मध्‍ये हजर झालेल्‍या कनिष्‍ठ लिपीकां नंतर दर्शविण्‍यात आली आहे. तर असा शासन निर्णय आहे का की, विहित संधीत विभागीय परीक्षा उत्‍तीर्ण नसलेल्‍या पण संधी संपलेल्‍याना अजून संधी शिल्‍लक असलेल्‍या पण अनुत्‍तीर्ण असल्‍ोल्‍याच्‍या नंतर सेवाज्‍येष्‍ठता मिळेल. तर असे आहे का
साहेब कमीत कमी किती शेत जमीन खरेदी विक्री करत येते . अह्मेद्नगर जिल्ह्यामध्ये
कृपया दि २०.१.२०१५ ला अशाच स्वरूपाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर पहा,धन्यवाद .

Reply by MCS Maharashtra | इतर

सर
मी पुणे जिल्यात खेड तालुका हद्दीत धानोरे गावा लागत १००० चौरस फुट जागा घेत आहे. मी आणि माझे मित्र एकून ११ गुंठे गेट आहोत तर सर्वांचे वेगवेगळे खरेदी खत होईल का. आम्ही एक एजंट कडून जागा घेत आहोत तरी काय अडचण येईल मार्ग दर्शन करावे.
पंजोबा यांची कुणबी नोंद १८८५ सालची पुणे जिल्ह्यातील आहे. म्हणजेच जातदर्शक पुरावे पुणे येथील आहेत.१९५० पासून आम्ही नगर जिल्ह्यात राहतो. वडिलांचा जन्म १९६७ पूर्वी (1960) नगर जिल्ह्यात झाला. तेव्हापासून ते सुद्धा नगर जिल्ह्यातील कायम रहिवासी आहेत. आम्हाला कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील प्रांताधिकार्यांकडे अर्ज करावा लागेल.? कृपया मार्गदर्शन व्हावे.
कृपया या पूर्वी आपणालाच दिलेले उत्तर पाहावे, धन्यवाद.

नगरमध्ये अर्ज करावा लागेल. आणि नगर जिल्ह्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेबाबतचे पुरावे व जातदर्शक पुरावे सादर करावी लागतील.
शशिकांत सुबराव जाधव

Reply by MCS Maharashtra | इतर

कुणबी समाज उन्नती संघ यांनी शाळेसाठी शेत जमीन खरेदी केली आहे .सातबारावर नोंद करतना बिगर शेतकरी म्हनून कलम ६३ ची परवानगी घावी लागेल का
मिळकत खरेदी करण्यासाठी , कायदेशीर व्यक्तीचा दर्जा असणे आवश्यक आहे .
त्या नुसार Company , Society , Club हे त्या त्या कायद्याखाली नोंदणीकृत केले तर त्यांना , काय्देषित व्यक्तीचा दर्जा प्राप्त होतो .
भागीदारी संस्था , कायद्याच्या भाषेत , कायदेशीर व्यक्ती नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

होय
मात्र The Society registration Act खाली संघ नोंदणीकृत असावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला फक्त 2.०० हेक्टर जमिन आहे अल्प भुधारक प्रमाण पञ कायचे आहे त्यासाठी मी माझे शपथ पञ तलाटी यांचे अल्प भुधारक आहवाल 7/१२ आणि होलडींग जोडून सुद्धा मला अल्प भुधारक प्रमाण पञ मिळत नाही तहसीलदार साहेबांनी तसे प्रमाण पञ देता येत नाही असे सांगितले तर त्यावर कांही कायदा व नियम आहे तहसीलदार कोणकोणते प्रमाण पञ देवू शकतात का असे आसेल तर त्याचे परिपञ newdisha2009@gmail.काम वर पाठवले तर मि तुमचा ऋणि राहिला
तहसीलदार साहेब यांनि दिलेले उत्तर बरोबर आहे
धारण केलेल्या क्षेत्रानुसार ते निच्छित केले जाते
नवीन भू संपादन कायद्यानुसार

Marginal Farmer - unirrigated land 1.00 Ha
Irrigated Land -0.5 Ha

Small Farmer- unirrigated land 2.00 Ha
Irrigated Land -1.00 Ha

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार. आज रोजी मी ४८ वषार्चा असून मला वैयक्तीक कामा करीता नॉन क्रिमी लेअर काढायचे झाल्यास कसे काढावे व मझ्या पाल्यांकरीता त्याचा उपयोग होवू शकेल काय
१. आपणास उन्नत व प्रगत मोडत नसले बाबत प्रमाणपत्र हवे असल्यास , आपले पालकांचे उत्पन्न विचारात घेऊन , काढावे लागेल . त्यामध्ये आपले उत्पनाचा समावेश होत नाही .

२. आपले पाल्यासाठी , उन्नत व प्रगत मोडत नसले बाबत प्रमाणपत्र, आपले व आपले पत्नीचे उत्पन्न विचारात घेऊन काढावे लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया आपल्या प्रांत अधिकारी कार्यालात संपर्क करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्‍यानंतर पुन्‍हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्‍या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्‍कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्‍या वर्षी पुन्‍हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
मला अल्प भुधारक प्रमाण पञ तहसीलदार याचे काढण्यासाठी काय करावे जर तसे शासनाचे परिपञ आसेल ते मेल वर पाठवले तर मी तुमचा अभारी राहील
तहसीलदार यांनी असे प्रमाणपत्र द्यावे असा शाषण निर्णय नाही . आपण धारण करत असलेलेया क्षेत्रावरून , आपण अल्प भू धारक / सीमांत शेतकरी आहात आहे ठरवले जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anil
22-01-2015
manishajadhav9475@gmail.com

महाराष्ट्र शासन निर्णय क्र.. एसटीपी/2189/प्रक्र.673/भाग-2/म-1 मंत्रालय,मुंबई-32 दिनांक 2 डिसेंबर 1989 व महाराष्ट्र शासन व वनविभाग परिपत्रक क्र. नोंदणी/1093/२४८४/प्र.क्र.-८२१/म-१, मंत्रालय, मुंबई-३२ दि. २७ मार्च १९९५ चा Gr मिळावा, Web site वर उपलब्ध नाही.

Question by narshing
22-01-2015
narshingtugave@gmail.com

Sir Nmskar. Lis pendancy cha nondi ghene complasar aahe ka ? v nondi gheta yt nsel tr tyabdl shasn nirny asel tr sanga v jr lispendancy cha nondi gheta ytil t letest konta shasn nirny aahe ka ?
Lis -pendant याचा अर्थ मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे . Lis -pendant , हे नोंदणी केली जाते .
भारतीय नोंदणी कायदा १९०८ , अन्वये , दस्ताची नोंदणी करणे म्हणजे , दस्तात नमूद मिळकती संदर्भात जगाला अश्या प्रकारे नोंदणी झालेली आहे अशी notice असल्याचे मानले जाते . त्यामुळे त्याची नोंद ७/१२ सादरी घेण्याची गरज नाही

म.ज.म.अ. १९६६ चे कलम १४८ मध्ये अधिकार अभिलेख याची व्याख्या दिलेली आहे . त्या मध्ये नमूद बाबीचीच नोंद ७/१२ , सदरी घेणे आवश्यक . त्या मध्ये , शाश्नाने अधिसूचने द्वारे , काही बाबी हि अधिकार अभिलेख सदरी घ्याव्या असे जाहीर केल्याशिवाय , अन्य बाबींची नोंद घेत येत नाही .
Lis -पेंदांत बाबत शाश्नाने अधिसूचना काढलेली नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh Lavhe
22-01-2015
lavhe.ganesh@yahoo.com

From where i can download MLRC volume 5
You cannot.
MLRC volume V - softcopy is not available on any web .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rahul kshatriya
21-01-2015
rahulpahilwan@gmail.com

maze ajoba कडे 4 hecter शेती नझर गहन होती.ajoba वरल्या नंतर हुफ pramane 3 आहे ते varas lavu shakto ka
मिळकत गहन ठेवल्याने , मालकी हस्तांतरित होत नाही
तथापि म.ज.म अ १९६६ चे कलम १४८ प्रमाणे गहन नोंद ७/१२ सदरी ठेवण्याची तरतूद आहे . त्यामुळे वारसांची नावे लावता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nasir
20-01-2015
nasirpinjari@gmail.com

saheb kamitkami kiti shet janim kharedi ani vikri karta yete. in Jalgaon dist

Question by nasir
20-01-2015
nasirpinjari@gmail.com

साहेब कमीत कमी किती शेत जमीन खरेदी विक्री करत येते . जळगाव जिल्ह्यामध्ये
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाण वेगळे आहे .
सर्वसाध्राणपणे , बागायत क्षेत्र कमीत कमी ५ गुंठे,
भातशेती/एकपिकी -१५ गुंठे
कोरडवाहू-२० गुंठे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3