जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by ravindra paradhi
12-12-2014
ravindrap526@gmail.com
June. Mahanaje sadaran 2004 che 32m pramanpatra kontya niyamane nond karta yel kiwa tyababat gr asles sangawa hi winanti
३२व्ग किंमत निस्च्छित केल्याने जमीन हस्तांतरित होते
GR मिळणे अश्यक आहे
आपण ३२ म दुय्यम कार्यालयात सादर करा
नोंदणी करू देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
12-12-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
मला सायबर कॅफे हा व्यवसाय सुरु करायचा असून त्याबाद्दलची माहिती द्यावी.
१. सायबर कॅफेचा परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे तरी त्यासंबंधातील शासनाच्या परिपत्रकाची प्रत असल्यास माझ्या इमेल वरती पाठवून द्यावी.
२. सायबर कॅफेचा परवाना मिळविण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी देण्यात यावी.
तरी वरील माहिती द्यावी हि विनंती.
१.मुंबई पोलिस कायदा चे कलम ३३ प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी यांनी नियमावली तयार लेकी असल्यास त्या खाली परवानगी घेणे आवश्यक .
२.सध्या परती वर्ष ४०० रुपये कर भाराने आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शरद काशिनाथ जाधव
11-12-2014
sk.jadhav@pcmcindi.gov.in
नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब नविन शासन निर्णय क्रमांक आर ए-३४१२/प्रं.क्रं.१०१/र-४ महसुल व वन विभाग मत्रालय,मुंबई-३२ दिनांक ०१/०९/२०१४ नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे ,कृपया सविस्तर माहीती मिळणेस विनंती.
सदर शाषण निर्णय संकेत स्थळावर ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोबर महिन्यात निर्गमित झालेला नाही .
संकेत स्थळावर हि उपलब्ध नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by viraj
10-12-2014
vvm.prod@coep.ac.in
सर
१) नोंदणीकृत हक्क सोड पत्रान्वये केलेले वारस नोंद कायदेशीर असते का?
२) वडिलोपार्जित मालमत्ता सर्व वारसांचे नावावर आलेवर इतर हक्कामध्ये असलेले बहिणी व आईचे नावे वगळून मुलाचे नावावर करणेचे कायदेशीर पर्याय काय आहेत?
३) शेतजमिनीवरील घराचे नोंद महसुल विभागाकडे नसेल तर ती करण्यासाठी काय करावे? घराचे बांधकाम १९९९ मध्ये झालेले आहे? रीतसर ग्रामपंचायत कडे कर भरत आहे
४) वडिलोपार्जित मालमत्ता मुलाचे व पत्नीचे नावे करणेसाठीचे कायदेशीर मार्ग काय आहेत ?
५) आजोबांची जमीन वाटप करताना क्षेत्र वहिवाटी पेक्षा कमी लागलेले आहे .सुधारित नोंद कशी लावावी व हद्द कशी निर्धारित करावी? त्यासाठी संबधित गटातील जमिनधाराकाच्या परवानगी आवश्यक आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे
१.वारसांना मिल्कततिल हक्क सोडावयाचा असल्यास , हक्क पत्राद्वारे सोडला जातो. ज्यांचे लाभत हक्क सोडलेला आहे , ते वारस संबंदित मिळकती पुरते कायदेशीर आहेत
२.हक्क सोड पत्र करणे ( नोंदणीकृत )
३. घराची नोंद ग्रामपंचायत कडे असलेल्या कर आकारणी पत्रकात केली जाते . मात्र हे केवळ घरपट्टी आकारणी पुरते मर्यादित आहे. कर आकारणी नोंदवही , अधिकार अभिलेख नाही .
४.बक्षीस पत्र करणे . अथवा तिघांचे नावावर एकत्रित असल्यास , पत्नी व मुलांचे नावे हक्क सोड पत्र करणे
५.क्षेत्र बदल करण्यासाठी अधिषक भूमी अभिलेख यांचे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास म्हेत्रे
10-12-2014
vilasmhetre1977@gmail.com
पोलीस स्टेशन तपासणीचे अधिकार तहसिलदार / तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना असेले बाबतच्या कायदेशीर तरतूदींची माहिती अथवा अन्य दस्तऐवज
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय तपासणी करण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत. ते आपल्या तालुकास्तरीय अधिकार तहसीलदारांना बहाल करु शकतात. तसे केले असल्यास तहसीलदार पोलीस स्टेशन तपासु शकतात.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by mahesh sable
09-12-2014
maheshdsable@gmail.com
लिपिकांनी परिपूर्णतेसाठी कोणते पुस्तक रेफर करावे
Question by ravindra paradhi
09-12-2014
ravindrap526@gmail.com
यापूर्वी ३२ म प्रमाणपत्र देनेत आलेले आहे परंतु त्याची नोंद रजिस्टर ऑफिस मध्ये करणेत आलेले नाही तरी आता ३२ म प्रमाणपत्र नोंद करणेसाठी रजिस्टर ऑफिस ला पत्र देता येईल का व ७/१२ ला नोंद करता येईल का
Question by प्रवीण प्रकाश जगताप
09-12-2014
sagarhc_08@rediffmail.com
मा.अधिकारी नमस्कार मी प्रवीण प्रकाश जगताप माझा प्रश्न वारस नोंदी संबंधात आहे.माझ्या वडिलांचे निधन ०६-०७-१९९२ साली झाले त्यानंतर माझ्या आजोबांचे निधन २२-११-२००० साली झाले आजोबांच्या निधनानंतर वारस नोंदीमध्ये माझ्या काका व आत्या यांचे नाव लावले परंतु हेतुपुरस्पर माझ्या वडिलांचे नंतर माझ्या आईचे नाव लावणे तसेच आम्हा भावंडांचे नाव लावणे गरजेचे असताना टाळले गेले या संदर्भात मा.मंडळ अधिकारी,तलाठी तसेच मा.तहसीलदार यांचेकडे अर्ज केला होता ,मा.तह्सिलदार यांनी सदर प्रकरणी प्रकरण पुन्हा सादर करण्यासंबंधी नोटीस बजावली होती परंतु माझे काका व आत्या यांनी मा.मदल अधिकारी यांचे आदेशास केराची टोपली दाखवत अर्ज पुन्हा सादर करण्यास नकार दिला .त्यामुळे आमचे वारस नोंद होऊ शकली नाही ,मा. तहसीलदार यांनी सदर प्रकरण मा.प्रताधिकारी यांचे कडे अपील करा असा सल्ला दिला आहे कृपया अपील /अर्ज नमुना मला एमैल करता आल्यास मला ते सोयीचे होईल आपल्या उत्तराची अपेक्षा
अपील करण्यासाठी नमुना निर्धारित केलेला नाही .
आपण साध्या कोर्या कागदावर अपील लिहून दाखल कातरू शकता
मात्र मुद्रांक , अर्जावर चिकटवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद गुलाबराव पाटील
08-12-2014
pg.patil@pcmcindia.gov.in
१) आमची नारायणगाव ता.जुन्नर जिल्हा पुणे येथे शेत जमिन आहे. या पूर्वी आमची ८० आर जमिन सिलिंग मध्ये जाउन ती पुर्नवसासाठी शासनाने ताब्यात घेऊन लाभधारकास दिली आहे व लाभघारकाने ती दुस-यास विकली आहे
२) आता आमची १२ एकर शेत जमिन शिल्लक आहे त्यावर ५ खातेदारांची नावे आहेत. आता आम्हाला त्याचे वाटप करावयाचे आहे तरी नविन शासन निर्णय क्रमांक आर ए-३४१२/प्रं.क्रं.१०१/र-४ महसुल व वन विभाग मत्रालय,मुंबई-३२ दिनांक ०१/०९/२०१४ नुसार परत जमिन सिलिंग मध्ये जाऊ शकेल काय ?
१. महाराष्ट्र शेतजमीन कमल मर्यादा धारण कायदा , च्या अनुसुचिप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी कमाल धारण मर्यादा दिलेल्या आहेत .
अ. बागायती- १८ एकर
ब. खत्रिशीर पानी पुर्वता असलेली वा एक पिकी जमीन - २७ एकर
क. नाला पानी पुर्वता असलेली मातृ खत्रिशीर पानी पुर्वता नसलेली जमीन - ३६ एकर
द. कोंकनातील भात शेत - ३६ एकर
ए. कोरडवाहू - ५४ एकर
हे प्रमाणे कुटुबसाठी आहे .
कुटुंब- पति , पत्नी व अद्दण्यान मुले वा मुली
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण नमूद केलेला शाषण निर्णय शाश्नाने निर्गमित केलेला दिसत नाही
शाषण निर्णय mail करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे .....त्यावर अवलंबून राहील ....
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by चांगुणाबाई गोपिनाथ डेरे
08-12-2014
sneha28patil@gmail.com
साहेब मी एक सेवा निवृत्त शिक्षिका असुन मी पहिल्या पासुन वडलांकडे राहात आहे. मला अपत्य नाही. माझे आज वय ८४ वर्षाचे आहे. माझे वडलांचे निधनानंतर शेत जमिनिचे ७/१२ वर माझे व माझे ४ भावांची नावे आहेत. त्यातील मोठ्या कर्त्या भावाचे निधन झाले असुन त्या भावाचा शेतीवर असणारा सर्वात लहान मुलगा माझा सांभाळत आहे.आता आम्हाला वाटप करावयाचे आहे. तथापी माझा एक भाउ वाटप पत्रावर सही करण्यास तयार नाही ७/१२ वर आमची आणेवारी लागलेली आहे मला माझे झिश्यावर येणारी जमिन माझा सांभाळ करणा-या माझ्या भावाच्या सर्वात लहान मुलास द्यावयाची आहे. पण वाटप होत नसलेने ती मला देता येत नाही.
१) जर मी त्याचे नावे रजिस्ट्रर मृतुपत्र केले तर माझ्या नंतर त्याचे नाव ७/१२ वर लावता येईल काय ? कीवा आत्ता लावता येईल का ?
२) किंवा मी हयात असताना त्याचे नाव माझा वारस म्हणून७/१२ लावता येईल काय ?
३) किंवा त्याचे नावे माझी जमिन करणेसाठी काय करावे की जेँणे करून माझ्यानंतर माझे जमिनिवर त्याच्या शिवाय कोणताही हक्क राहणार नाही.
कृपया अापले बहुमुल्य मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
1. व्यक्ती हयात असताना म्तुत्यापत्र द्वारे milkatis नाव लागत नाही.
२. आपणास आपले भावाचे मुलाचे नावआपलेहिस्स्याचे जमिनीस लावायचे असल्यास प्रथम आपण आपला हिस्सा आपलेनावावर करून घ्या
३. आपले हयातीत , आपणास नोंदणीकृत बक्षीस पत्र करून, भाचाचे नावावर जमीन करता येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण दिवाणी न्यायालयाकडून जमीन प्रत्येकाचे होस्स्या प्रमाणे मिळणे बाबत दावा दाखल करू शकता .....तरीही काम होईल पण उशीर लागेल .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
नोंदणीकृत मृत्युपत्र करा ................तुमचा उद्देश्य सफल होईल.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by अनिल कोल्हे
08-12-2014
anilkolhe6712@gmail.com
१) ७/१२ वर आणेवारी झाली असेल तर वाटप करताना फक्त अॅडजेस्टमेंन्ट डीड केले तर प्रत्येकाचा स्वतंत्र नावे ७/१२ वर नोंदवता येतात का ? येत असल्यास कुणाकडे नोंद करता येते व कोणत्या नियमाने. रजिस्ट्रर वाटप पत्र करणे आवश्यक आहे का ?
काहीही करा पण नोंदणीकृत करा . अद्जेस्त्मेंत दीड पेक्षा नोंदणीकृत विभाजनी करा .........तुकादेबंदी कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्या . तलाठी नोंद घेईल .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by रवींद्र पारधी
08-12-2014
ravindrap526@gmail.com
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांचे आदेशाने भाडेतत्वावर सांस्कृतिक मंडळासाठी १० गुंठे जागा देवस्थान जमिनीची दिली आहे. त्याची ७/१२ च्या इतर हक्कात नोंद करता येते का ?
Question by रवींद्र पारधी
07-12-2014
ravindrap526@gmail.com
देवस्थान जमिनीला वारस नोंद करणेसाठी कोणत्या कलमाने notice काढतात
पण मग जर सध्या असणारा वाहिवातदार जर मृत्त्यू पावला आणि आता जर त्याच्या मुलाने वाहिवातदार म्हणूनच लागण्यासाठी मागणी केली तर काय करायचे नक्की आणि त्याने त्या संधर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून तसा बदल अहवाल करून आणला असेल तर त्या व्यक्तीच्या नावाची नोंद घेत येऊ शकते काय
Reply by अजित नथू शेलार | नायब तहसीलदार
देवस्थान जमीन हि , देवस्थानासाठी दिलेले आस्ते. ती कायदेशीर रित्या देवाचे malkichi जमीन आहे . जमीन कसणारा हा फक्त वाहिवातदार असतो . तो मालक होत नाही . त्यामुळे वारस म्हणून लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शशिकांत रामचंद्र नाचण
07-12-2014
vsn2577@gmail.com
आकारबंद व आकारफोडे पत्रकाचे शेत्राफळचा ताला जुळत असेल परंतु आकार फोड पत्रकाचा अंमल देण्या पूर्वी ७/१२ चे खरेदी खताने विक्री झाली आहे वेग वेगळे ७/१२ तयार होऊन ७/१२ चे शेत्र आकार फोड व आकारबंद प्रमाणे जुळत नाही
आकार फोड पत्रक याचा अंमल न दिल्याने व उर्वरित क्षेत्र विक्री मुले , नंतर मुल सर्वे नंबरचे क्षेत्र आकार्बांडत नमूद क्षेत्रापेक्षा जड होत असेल तर , प्रकरण पुनारीक्षानाखाली घेऊन , ७/१२ क्षेत्रात चुका केलेल्या /झालेल्या असतील तर , दुरुस्ती करावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sneha pramod patil
06-12-2014
sneha28patil@gmail.com
I am living in nigdi. I want to know that where i submit non creamy layer form to get 30% ladies reservation? And i am from open catagary.so what is limitation of income?
Address-
Additional Tahsil Office
Pimpari Chinchwad Navnagar Vikas Pradhikaran .
Akurdi
Near Railway station
020-27642233
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
You will have to submit your application at PIMPARI TAHSIL Office
Limitation -6,00,000/-(6 Lakhs)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय कळमकर
05-12-2014
kalamkarsanjay@gmail.com
नगरपालिका हददीतील खुल्या भुखंडाचे प्रापर्टी कार्डमध्ये ;नमुना ड उता-यात धारणाधिकार प्रकार/सत्ताप्रकार अ,ब,क,ड, ई अशा वर्णमालेत दर्शविल्या जातो. ही वर्णमालेतून शासकीय दफतरी काेणता अर्थ अभिप्रेत असतो.
ग्रामपंचायत हद्दीतील
अ.क्र. सत्ताप्रकार तपशील
1 अ गावठाणातील (पर्डी नंबर व्यतिरीक्त् मिळकती ज्या परंपरेनुसार सारामाफीस पात्र आहेत अशा मिळकती
2 ब शासनाकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या मिळकती
3 क-1 गावठाणातील पर्डीनंबरपैकी अकृषीक कारणासाठी उपयोगात आणलेल्या मिळकती ज्या महाराष्ट्र जमीन महसूल अधीनीयमाच्या कलम 125 अन्वये अकृषीक आकार व दंड आकारणीस पात्र आहेत अशा मिळकती
4 क-2 गावठाण बाहेरील शेतीसाठी आकारणी केलेल्या परंतू अकृषीक कारणासाठी उपयोगात आणलेल्या मिळकती ज्या महाराष्ट्र जमीन महसूल अधीनीयमाच्या कलम 45 प्रमाणे अकृषीक आकार, दंड कृती यांस पात्र आहेत अशा मिळकती
5 क-3 ज्यावर अकृषीक आकार भरला जातो अशा मीळकती
6 ड सार्वजनीक अथवा विशीष्ट कारणासाठी उपयोगात आणलेल्या अथवा राखून ठेवलेल्या मीळकती
7 ई जिल्हा परीषद अथवा ग्रामपंचायत यांच्या मालकीच्या अथवा त्यांचेकडे हस्तांतरीत केलेल्या मीळकती
8 ग शासनाच्या मालकीच्या मीळकती
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
सध्याच्या प्रचलीत पध्दतीनुसार मुंबई शहरात वापरात असलेले सत्ता प्रकार
अ.रुढीगत सारा माफी
अ-1-गावठाणातील खाजगी मालकीचे जमीनीचे तुकडे
अ-2-गावठाणातील परडी जमीन
ब-शासनाचे भाडेपट्ट्यान्वये भाडे भरत असलेली जमीन
ब-1-शासन प्रदान जमीन
क-जमीन धारा भरत असलेली जमीन
क-1-अकृषक महसूलास पात्र जमीन
ड-नगरपालीकेने विकलेली जमीन
ई-नगरपालीकेने भाडे पट्ट्याने दिलेली जमीन
फ-नगरपालीकेने सार्वजनीक कामासाठी धारण केलेली जमीन (धार्मीक / धर्मादाय / शैक्षणीक ) – बीगर फायदेशीर कामासाठी धारण केलेली जमीन
फ-1-नगरपालीकेने फायदेशीर कामासाठी धारण केलेली जमीन
ग- शासकीय जमीन
ग-1- मध्यवर्ती शासनाची जमीन
ह-धार्मीक / धर्मादाय किंवा सार्वजनीक प्रयोजनासाठी धारण केलेली जमीन
ह-1- म्हाडा /सिडको यासारख्या शासकीय उपक्रमांनी धारण केलेली जमीन
ह-2- शासकीय उपक्रमांनी भाडेपट्ट्यांने दिलेल्या जमीनी
ह-4- LIC / BEST यासारख्या उपक्रमांनी धारण केलेली जमीन
इ- गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची जमीन
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
As per City Survey Manual Classification of land tenures is as follows.
A. -Lands within Gaothan held free of assessment by long usage
B. -Lands paying altered assessment (NA Land)
C. -Land liable to pay altered land revenue (The land used unauthorizedly for NA purpose.
D. -Land held or lease (Govt lease properties)
E. -Government properties
F. -Property belonging to local bodies (Municipal Council / Grampanchyat)
G. -Revenue free land - Religious / Charitable / Public Purpose
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक
05-12-2014
vinayak.agawane@gmail.com
माझी कामशेत कुसगाव बु येथे १८ गुंठा शेती जागा आहे .गावठाण पासून १०० मीतर आहे.बांधकाम करणे साठी
मला N.A. करायची गरज आहे का ?
नवीन अध्यादेशानुसार विकास परवानगी घेणे आवश्यक
NA आवश्यकता nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश पावले
05-12-2014
g.bhuibavada@gmail.com
एखादी जमीन जर कुळाच्या नावे ७/१२ला लागल्यानंतर, मूळ मालकाचे सहहिस्सेदार (बहिण असल्यास ती ) त्या जमिनीत वाटा मागू शकतात का ? कारण तिला याबाबत कोणतीही नोटीस अथवा तिची परवानगी न घेता कुळाच्या नवे जमीन होते का ?
नैसर्गिक न्याय तत्वा नुसार म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही म्हणून अपील प्रांताधिकारी यांचे कडे करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ajay ade
05-12-2014
ajayade3@gmail.com
Please tell me complete senerity list of Amravati divisions niab tahasildar
Question by प्रमोद गुलाबराव पाटील
05-12-2014
pg.patil@pcmcindia.gov.in
१) ७/१२ वर आणेवारी झाली असेल तर वाटप करताना फक्त अॅडजेस्टमेंन्ट डीड केले तर प्रत्येकाचा स्वतंत्र नावे ७/१२ वर नोंदवता येतात का ? येत असल्यास कुणाकडे नोंद करता येते व कोणत्या नियमाने. रजिस्ट्रर वाटप पत्र करणे आवश्यक आहे का ?
२) चार भावांचे अंतरगत सर्वाच्या संम्मतीने वाटप झाले आहे. तथापी त्यातील एक भाऊ वाटप पत्रावर सही करत नसेल तर काय करावे त्याची हरकत आहे( दोन भावांना अपत्य नसलेने त्यांच्या नंतर त्यांची जमिन उर्वरीत भांवांना देणेत येईल असे लेखी द्यावे अशी मागणी) अशा वेळी काय करावे.
३) ७/१२ वर नावे असणा-या सर्वाना समान वाटप करुनही जर एकाने वाटप पत्रावर सहीस नकार दिल्यास काय करावे.
आपण दिवाणी न्यायालयाकडून जमीन प्रत्येकाचे होस्स्या प्रमाणे मिळणे बाबत दावा दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर साळुंके
05-12-2014
kishorsalunke2828@gmail.com
नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन !!!! महोदय, मा.तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य शासकीय-निमशासकीय कार्यालयातील गैरहजर अधिकारी व कर्मचा-याच्या गैरहजेरीचा पंचनामा करण्याचा अधिकार आहे का ? असल्यास कोणत्या नियमाने ? गैरहजर अधिकारी वा कर्मचा-याविरुद्ध ते कोणती कारवाई प्रस्तावित करू शकतात, कृपया याची माहिती द्यावी हि विनंती.... पुन्हा एकदा आपले अभिनंदन धन्यवाद .
अन्य शासकीय कार्यलयातील कर्मचारी gairhajar असतील तर , तहसीलदार त्या बाबत , साम्भांडीत विभाग प्रमुखास कळवू शकतात
नागरिक हि सदर बाब त्याविभागाचे प्रमुखांचे निदर्शनास आणून देऊ शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र पाटील
04-12-2014
np36456@gmail.com
After plot/land registered development agreement between owner and developer,
(1) whose responsibility for name enter/entry on 7/12 extract of developer.
(2) Is it require name of developer on 7/12 extract.
(3) after registered of deemed conveyance deed of co-operative housing society's, is it require name of developer on 7/12 extract for while change of name of co-operative housing society's on 7/12 extract.
Development agreement is for the development of land . It does not transfer title in the property to devloper. Hence mutation entry on the basis of such development agreement cannot be certified.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vaibhav
03-12-2014
vmazodkar@gmail.com
सर, माझे मोठे भाऊ १८ वर्षापूर्वी शासकीय सेवेत वर्ग ४ शिपाई पदावर नोकरीस लागले नंतर एकाच महिन्यात त्यांचे चालक पदावर प्रोमोशन झाले. १३ वर्ष सेवेत असताना त्यांना प्यारालीसीस झाला. त्यामध्ये त्याच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. उपचारानंतर ते ऑफिसला गेले असता कार्यालयाने त्यांना मेडिकल बोर्डाकडे पाठविले. मेडिकल बोर्डाने त्यांना ५० टक्के अपंगाचे प्रमाणपत्र दिले. त्यावरून कार्यालयाने त्यांचे डिमोशन करून मूळ शिपाई पदावर टाकले. ३, ४ वर्षापासून ते शिपाई पदावर असून ते काहीच काम करू शकत नाही. फक्त बसून राहतात. त्यांना फक्त बोलता येते. मदतीशिवाय ते चालू शकत नाही.
प्रश्न - अशा परीस्तीतीत त्यांना पेन्शन युक्त सेवानिवृत्ती मिळेल काय व त्याबदल्यात त्यांचा वारस नोकरी मिळण्यास पात्र राहील काय ?
तसेच त्यांना डिमोशन देता येते काय ? मार्गदर्शन मिळावे व त्याबाबत शासन परिपत्रक असल्यास मला ई मेल वर कळवावे हि विनंती.
१. नोकरीत असताना , व्यंग आले असता , अश्या कार्माचार्याचार्यास पदावन्नात करता येत नाही.
आपण या निर्णय विरुद्ध दाद माग
२. The Pesn With Disabilties ( Equal Oppirtunities , Protection of Right , and Full Participation ) Act 1995
च्या कलम ४७ प्रमाणे हे सौराक्सःन आहे
३ आपले बंधूस सेवा निउरुति मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील जैन
03-12-2014
swapnil-jain2010@hotmail.com
सर आमचा औरंगाबाद येथे 47B (गायरान जमीन) चा प्लॉट आहे तरी मला प्लॉट वर बांधकाम करावयाचे आहे तरी मला कोण कोणत्या Permission घ्याव्या लागतील
Question by म्हस्कू शिंगाडे
02-12-2014
mbshingade@gmail.com
५ वर्षे मुदतीचे म्हणजे , १९६२ मद्ये असलेल्या फेरफार वर , सदर जमीन ही रक्कम रु .४०० (५ वर्षे मुदतीने ) खरेदी देत आहोत .
सदर फेरफार व ७/१२ आपल्या माहिती साठी पाठ वतो आपला इमेल द्यावा वि विनती.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
