जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संदिप विष्णु शेटे
07-03-2021
shete1182@gmail.com
माझे गाव साखराळे (अशोकनगर) ता़-वाळवा जि-सांगली या मी गेली तीस वर्षे गावठाण जागेत रहातो आहे ७/१२ माझ्या वडीलांच्या नावे आहे तसेच दोन गुंठे जागेसाठी घर कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु कोणतीही बॅंक मला कर्ज देत नाही तरी मला कोणती बॅंक कर्ज देईल काय ते सांगा
आपण म्हणतात की आपण गावठाण जागेत राहत आहात व जागेची शेत्र दोन गुंठे आहे मात्र सातबारा सद्री आजोबांचे नाव असल्यामुळे आपणास कोणतीही बँक कर्ज देत नाही. वास्तविक गावठाण जागेला हा सातबारा नसतो. केवळ ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये घरपट्टी संकलित करण्यासाठी जे रजिस्टर असते त्या रजिस्टरमध्ये ज्या जमिनीचा ताबा अथवा भोगवटा आहे अशा व्यक्तीचे नाव लिहिलेले असते. गावठाण जागेचा जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 123 अन्वये जर सर्वेक्षण झालेले असे तर अशा जमिनीचे मिळकत पत्रिका भुमिअभिलेख खात्याकडे तयार झालेली असते. त्यामुळे गावठाण जागेला आजोबांचे नाव कसे हे समजून येत नाही. कदाचित आपणाला असे म्हणावयाचे असे की ज्या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये आपण राहत आहात त्या ठिकाणी सर्वे नंबर मध्ये दोन गुंठे क्षेत्राला आपल्या आजोबांचे नाव आहे. अशी वस्तुस्थिती असेल तर आपणास सदरचे दोन गुंठे क्षेत्र आजोबांच्या नावावरून आपल्या नावावर ती करावे लागेल तसेच सर्वे नंबर चे क्षेत्र असल्यामुळे म्हणजेच शेत जमीन क्षेत्र असल्यामुळे ते क्षेत्र बिनशेती क्षेत्र रूपांतरित करावे लागेल व त्या आधारे आपणास वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिमन्यू गिरधारीलाल बंकुवाले
06-03-2021
ramnandwanshi@gmail.com
सर मी शीट नं 20C प्लॉट नं 135 या सरकारी जमीनी वर जी जमीन यात्रा उत्सव करीता राखीव होती त्यातील एक कोपऱ्यातील हा भाग आहे त्याच आज पर्यंत कोणाला त्रास झाला नाही किंवा यात्रेला पण फायदा किंवा त्रास नव्हता त्यात मी 17 लोकांचे 3 कुटुंबा सोबत टिन, विटा चे कचे घर बांधुन जवळ पास 50 ते 60 वर्षा पासून राहतो. सदर जागेची नगर परिषद नियमित कर भरत असतो, वीज कनेक्शन आहे, नळ कनेक्शन आहे, आधार कार्ड , वोटर कार्ड आहे , रेशन कार्ड आहे, आमचे घर मागे एक ठाकूर कुटुंबाचे मोठा वाड्याची जागा आहे आम्हचे जर घर पडले तर त्याचे वाड्याला मोठी जागा आणखी मिळते या कारणाने त्यांनी उप लोक आयुक्तांना समाजसेवक मनुन तक्रार केली की आम्हाला या राखीव जागे वरून हटवून शासनाला त्यांची जागा मिळवून द्यावी त्या नुसार मा तहसीलदार साहेब व मा SDO साहेब यांनी 13/03/2021 पर्यंत आम्ही स्वतः घर नाही पाडल्यास ते स्वतः पडतील अशी नोटीस दिली, महोदय आमची परिस्थिती खूप हलाकीची आहे दुसरी राहण्याची व्यवस्था व आमची लायकी पण नाही. कृपया काय करावे मार्गदर्शन करून आमचे मदत करावी
आपले सरकारी जागेवर गेले पन्नास ते साठ वर्षापासून ताबा कब्जा आहे. होय आता बा कब्जा ला केव्हाही सरकारी यंत्रणेने हरकत घेतलेली नाही. मात्र कोणा एका व्यक्तीच्या तक्रार अर्जावर तहसीलदार महोदयांनी आपणास अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस दिलेली दिसून येतो. वास्तविक सरकारी जागेवर ती अतिक्रमण करणे हे चुकीचे आहे.
तथापि आपल्या जागेवर 50 ते 60 वर्षांपासून अतिक्रमण व ताबे कब्जा असल्याने सदरची जागा नियमानुकूल करून मिळण्याबाबत आपण जिल्हाधिकारी महोदय यांना अर्ज द्यावा. तसेच तहसीलदार यांनी अतिक्रमण काढून टाकण्याची नोटिस आपणास दिलेली आहे त्या अनुषंगाने आपणास दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल. मला कल्पना आहे की न्यायालयात जाणे ते निश्चितच खर्चिक बाब आहे.
मात्र तहसीलदार महोदयांनी जर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तर आपणास राहण्यास जागा उरणार नाही त्यासाठी आपण सर्व कुटुंबे तहसीलदार महोदय अथवा जिल्हाधिकारी महोदय यांना भेटून आपली व्यथा सांगा. त्यांचेकडून आपणास न्याय नाही मिळाल्यास आपण उपरोक्त नमूद केले प्रमाणे दिवाणी न्यायालयात स्पेसिफिक रिलीफ एक खाली दावा दाखल करावा व सरकारी यंत्रणांनी आपल्या जागेवर असलेले अतिक्रमण काढू नये तसेच Adverse Possession या तत्वाला खाली मालक म्हणून घोषित करावे अशी मागणी करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर गायकवाड
06-03-2021
dnyaneshwargaikwad093@gmail.com
20 बाय 20 पत्रा शेड 7 बाय 20 खुली बखळ जागा हि जागा सामुहिक मालकीची असुन ती जागा चुलत भावाने त्यांच्या नावावर लावली आहे ती सामुहिक मालकीची असुन ती जागा तो विकत आहे तर ती आमच्या नावावर करायला काय करावे लागेल तोतिरहीत व्यक्तीला विकत आहे
Question by श्रीहरी सुरवसे
06-03-2021
surwaseshrihari@gmail.com
आदिवासी जमीन बिगर आदिवासी कडे खरेदी करायला कोणाकडे परवानगी मागायची ?
Question by श्रीहरी सुरवसे
06-03-2021
surwaseshrihari@gmail.com
सर माझा प्रश्न मुळात महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहेत का तसेच पारधी हे आदिवासी मोडत असल्याने पारध्याने एक जमीन खरेदी मराठी माणसाकडून घेतली असेल तर खरेदी खत इंडेक्स सातबारा उतारा किलर भोगवटा 1 टायटल असेल तर आदिवासी कलम यास लागू होते का झाल्यास त्यास विक्री परवाना ती जमीन त्या पाल्यास विकायची असेल तर बिगर आदिवासी असलेल्या व्यक्तीस खरेदी द्यायची असेल तर कोणाकडे परवानगी मागावी जमीन आहे तसेच दोन भावांपैकी एका भावाची जमीन बिगर आदिवासी ला खरेदी झालेली आहे व त्याच गटातील ुसर्या भावाचे जमिनीला हा प्रतिबंध लावण्यात आला आहे महाराष्ट्र महसूल अधिनियम 36 व 36 अ प्रतिबंधित असं इतर अधिकार मध्ये शेरा लावण्यात आला आहे तो कमी करण्यासाठी मार्गदर्शन सर आपण करावे किंवा गव्हर्मेंट चा जीआर केव्हाचा आणि त्याचे संकेत स्थळ मी कॉपी काढून घेऊन ते प्रतीवर तीत करतो तरी कृपया सहकार्य करावे
श्री हरी पंत.
बिगर आदिवासी व्यक्तीकडून आदिवासी व्यक्तीने जमीन खरेदी केल्यास अशा जमिनीला 36, 36 खाली हस्तांतरणास बंदी असा शेरा इतर हक्कांमध्ये ठेवण्यात येतो. घेणारी व्यक्ती आदिवासी आहे किंवा नाही याबाबत काही संभ्रम अथवा कोणाची तक्रार आली असल्यास अशा व्यक्तीचे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र पडताळणी ती व्यक्ती आदिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यावर इतर अधिकारांमध्ये हस्तांतरणास बंदी अशाप्रकारचा शहरात ठेवलं जातो.
अशी जमीन एकदा आदिवासी व्यक्तीच्या नावावर झाल्यावर तिची विक्री बिगर आदिवासी व्यक्तीस करावयाची असल्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी ची आवश्यकता असते. मात्र परवानगी साठी चा अर्ज हा जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे करावा लागतो व जिल्हाधिकारी महोदय अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून तसा अहवाल शासनास सादर करतात व शासनाकडून आदिवासी व्यक्तिकडून बिगर आदिवासी व्यक्तीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी परवानगी दिली जाते.
आपल्या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे दोनआदिवासी व्यक्तींच्या जमिनीं पैकी केवळ एका जमिनीस हस्तांतरणास निर्बंध असा शेरा इतर हक्कात आहे मात्र दुसऱ्या जमीनीच्या इतर हक्कामध्ये हस्तांतरणास निर्बंध असा शेरा नाही. या दोन्ही व्यक्ती जर भाऊ भाऊ असतील तर दोन्ही भावांच्या जमिनीच्या सातबाराच्या इतर हक्कांमध्ये हस्तांतरणास निर्बंध असा शेरा ठेवणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shaila chandrashekhar Nangare
05-03-2021
Shailanangare2847@gmail.com
Namste Sir, mazya sasryanni ek jamin kharedi keli hoti 1969 la , kharedi khat krnya adhich te aksmit mayat zale , meze pati 1 varsh ani maze mothe deer 4 varshache hote tr tynchya mama ni 1971 la kharedi khat adhnyan palak lavun deera che ektyache ch nav lavle ,ani ti jamin dhrnakhathya mdhe geli, ata ti jamin parat sankaln la milte pn mothi jaobai mazya pati che varsala lavnyas sankalan la denyas nakar krte ky karave lagel krupa krun marg dakhva.
शैलाताई
खरेदीखत होण्याअगोदरच आपल्या सासऱ्यांचे निधन झाले होते त्यामुळे ही जमीन आपल्या सासऱ्यांचे नावे होऊ शकली नाही व पर्यायाने त्यांच्या मृत्यूपश्चात आपले पती यांचे नाव लागले नाही. मात्र पल्या सासर्यांच्या मृत्यूपश्चात आपल्या पतीच्या मामांनी अज्ञान पालक करता म्हणून केवळ आपल्या diranchya नावे ही जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी केलेली असल्याने केवळ आपल्या वडिलांचे नाव लागणे त्याठिकाणी क्रमप्राप्त आहे. जर ही जमीन आपल्या सासऱ्यांच्या नावे झाली असती तर निश्चितच आपल्या पतीचे नाव या मिळते तिला लागली असते. खरेदी खत हे आपल्या diranchya नावे झाले असल्याने आपणास या बाबतीत काहीही करता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jitesh matre
04-03-2021
jiteshmatre@gmail.com
Sir. Mouja nimboli shet.s 359 basil yachts navani hote.pan mazya motya bhavani sadar shet aaplya navani.kele register office saledeed kele. Land re.act 1966sub se.150 harkat getli asta.ma.talsildar oder saledeed nisar nod ghelya geli. Register challenge dile court dhanangan.2014 oder samandan karak naslymule dist court amravat madye spoil kele. Fanal hearing saru astana motya bhavani third party's sadar shet vikalya gele. Jewki. Prakbit prakarn saru astana register hone bekaydeshi register zali aahe. Margdashan kara
जितेश मात्रे जि
वास्तविक दावा न्यायालयात प्रलंबित आहे अशा स्थितीत जमिनीची हस्तांतरण करू नये. तथापि असे हस्तांतरण प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बेकायदेशीर होत नाही. न्यायालयाचा जो निकाल लागेल तो निकाल हा खरेदी दारावर ही बंधनकारक असतो. त्यामुळे जरी आपल्या भावाने जमीन ही त्रयस्थ व्यक्ती जरी विकलीअसली व भविष्यात न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनेझाला तर सदर चा निकाल तिसऱ्या व्यक्तीस बंधनकारक आहे व जमीन आपल्या नावावर होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pramod
03-03-2021
Pramod82dabade@gmail.com
नमस्कार,
माझे वडील व 3 भावंडामध्ये सर्व सम्मतीने (दिलेल्या समजुतीच्या नकाशा प्रमाणे दिशासह ग्रा पं ठराव घरठाण पत्रकामध्ये नोंद झाली परंतु आम्हास असे निदर्शनास आले की मिळकतीमध्ये बदल केला गेलेला आहे व त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीस निदर्शनास आणून दिल्यावर दुरूस्ती झाली.परंतु आता ऐका भावाने अनधिकृत पणे वहिवाट सांगून परस्पररित्या सबधित वारसांची कोणतीही तोंडी वा लेखी परवानगी न घेता, सदर मिळकत क्रंमध्ये अतिक्रमण करूनआम्हास ये-जाकरनेस रोखले \ अडवले आहे. सदर जागा सद्या माझ्या वडिलांच्या नावावर आहे. पण तो अतिक्रमण काढत नाही कोर्टात जा पोलीसात जा असे सांगतो. कृपया मार्गदर्शन करा
आपल्या जमिनीचे वाटप झालेले आहे ते केवळ आपण आपापसात असलेल्या समजुतीप्रमाणे जमिनींचा ताबा घेतली का या जमिनीचे वाटप हे प्रत्यक्षात झालेले नाही. झालेल्या वाटपा प्रमाणे आपणाला वाटप पत्र तयार करावे लागेल व ते नोंदणीकृत करून त्याप्रमाणे जमिनींच्या क्षेत्राला त्या त्या भावंडाची त्या त्या व्यक्तीची नावे लागणे आवश्यक आहे. सद्य स्थितीतही या मिळते तिला आपल्या वडिलांचे नाव आहे, व आपल्यातील एक बहु हा अन्य भावंडांना विचारात न घेता अन्य भावंडाच्या जमिनीचा ताबा घेऊन इतरांच्या वही वाटेला मज्जा करत आहे. यासाठी आपणाला रीतसर वाटप पत्र तयार करून वाटणी प्रमाणे ज्याचे त्याचे ज्याच्या-त्याच्या जमिनीला अधिकार अभिलेख सद्रि नाव लावणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अविनाश खैरे
02-03-2021
khaireavinash5@gmail.com
मी फॉरेस्ट डिपार्टमेंट ची जमीन 2006 साली शासकीय नजराना भरुन खरेदी केली आहे आणि त्या उताऱ्या वरती भोगवटदार 2 अविभाज्य शर्त आहे. तर आता मला ती जमीन भोगवटदार एक करायची आहे
वनखात्याच्या मालकीची जमीन नजराना भरुन विकत घेता येत नाही. आपण ही जमीन इन कशी खरेदी केली ?कदाचित आपणाला नक्की जमीन कोणत्या विभागाच्या मालकीची होती ते आपणास सांगता येत नाही ही किंवा सदरची जमीन ही ओळख कायद्याखालील प्राप्त झालेली असेल व त्या व्यक्तीने आपणास नी केलेली अशी कृपया मिळकतीचे सातबारा व सहा नंबर पाहून नक्की मिळतं कोणाच्या मालकीची होती व आपण कशी खरेदी केली याचा तपशील जर आपण विस्तृतपणे मांडला तर त्यावर आपणास जमीन भोगवटादार वर्ग एक करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत सांगता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pravin bhad
01-03-2021
pravinkumar0707@rediffmail.com
सर नोंदणीकृत खरेदी करून दिलेली आहे परंतु खरेदी करून देणारा व्यक्तीचा ताब्यात ती शेती आहे आणि आता तो 7ब चा अहवाल मागत आहे
Question by Y Kothekar
01-03-2021
ykothekar84@gmail.com
सर आम्ही 4 भाऊ आहोत , वारस हक्काने जमीन आली असून 7 12 उताऱ्यावर आमचे 4 भावांचे नाव समाइकत आहे, इतर हक्कत पुनर्वसन संपादित होणेवर असा शेरा असून आम्ही सदर जमिनीचे वाटप केले परंतु तलाठी व मंडल अधिकारी साहेबांनी तसा वाटपाचा दस्त नोंद करताना " पुनर्वसन साठी राखीव" असा शेरा असल्याकारणाने नोंद रद्द केली आहे.
माझा प्रश्न असा आहे की
1. प्रांत अधिकारी साहेब यांचे कडे अपील केल्यास ते तश्या शेतीकामी केलेल्या वटपास परवानगी देतील का ? की जिल्हाधिकारी पुनर्वसन यांचे कडे जावे ? अथवा कोणता gr आहे का की अश्या केस मध्ये शेती कामी वाटपास परवानगी गरजेची नाही .
अथवा मी काय करावे आत्ता ?
इतर हक्कांमध्ये पुनर्वसनासाठी संपादित होणार असा जरी शेरा जरी असला तरी वाटप करण्यास कोणतीही हरकत नसावी. मंडळ अधिकारी यांनी ती नोंद रद्द केली असल्याने आपण प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील केले आहे प्रांताधिकारी अशा वाटपाची नोंद घेण्यास हरकत नाही असा निकाल देऊ शकते .
ज्या भागामध्ये जमिनींचे भूसंपादन होणार असेल तर हस्तांतरणाचा वरती बंदी असणे बाबत संबंधित कायद्यामध्ये तरतूद असेल तर हस्तांतरण करता येत नाही किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदय भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्यामुळे हस्तांतर ना वरती निर्बंध घालता व पर्यायाने तलाठी मंडळ अधिकारी यांचेकडून अशा नोंदी रद्द करण्याची कार्यवाही केली जाते. केवळ ज्या कायद्याने भूसंपादन होत असते त्या कायद्यामध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हस्तांतर ना वरती बंदी असण्याची तरतूद असते अशाच प्रकरणांमध्ये जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही व पर्यायाने नोंद मंजूर होत नाही. मात्र कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर केवळ प्रशासकीय आदेशाच्या अनुषंगाने नोंद नाकारणे चुकीचे आहे. आपण इतर हक्कात उशिरा ठेवलेला आहे तो कोणत्या कायद्यान्वये त्या जमिनीचे संपादन प्रस्तावित आहे व त्या कायद्यामध्ये हस्तांतरणाचा वरती बंदी आहे अशी तरतूद आहे का याची पाहणी करा व त्याप्रमाणे माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे अपिलाची काही कार्यवाही चालू आहे त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष पवार
28-02-2021
santoshpawar.sp869@gmail.com
8अ उतारावरील नाव कमी करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे का
Question by कवडू दौलत गेडाम
28-02-2021
kdgedam721@gmail.com
सन 1979 साली विनापरवानगी आदिवासी कडून शेती रजिस्टर खरेदी केली, शेती घेणारा सुध्दा आदिवासी आहे.तहसिल कोर्टात दावा दाखल केला असता कोणाकडून निकाल लागेल.
Question by धोंडीराम विठ्ठल वाघमोडे
28-02-2021
dhondiramwaghmode28@gmail.com
सर नमस्कार
माझ्या वडिलांनी 1984 साली 21.15 एकर जमीन विकत घेतली होती. ती जमीन वडीलांनी 4 जणांना वाटप केले आहे. मोठ्या भावाला 4 ,मधल्या भावाला 4, मला 7 व वडीलांच्या नावे 6.15 एकर असे फक्त कागदोपत्री वाटणी झाली आहे . 7/12 मध्ये 315/1, 315/2, 315/3 ,315/4, सगळ्यांचा वेगळा उतारा सुद्धा मिळत आहे पण कोणाची जमिन कुठे आहे, कोण कुणाच्या शेजारी आहे, जमिनीच्या वाटण्या कोणत्या दिशेने झाले आहे हे कोणासही माहीत नाही किंवा आमच्याकडे तसा कागदोपत्री खुलासा नाही. मधला भाऊ, मी, आणि वडील आमच्या तिघांच्या नावे असलेली जमीन आम्हाला विकायची आहे, मोठा भाऊ मयत झाला आहे ती जमीन त्याच्या मुलाच्या, मुलीच्या आणि आईच्या नावे झाली आहे. आम्हाला जमिन विकण्यास अडथळा येत आहे तर वरील संदर्भातील माहिती कुठे व कशी सापडेल किंवा यावर कोणता उपाय आहे यावर सखोल मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
वडिलांनी 1984 सली ची जमीन खरेदी केली आहे त्या जमिनीचे वाटप चौघांमध्ये झालेले आहे व त्याप्रमाणे सातबारा सद्री प्रत्येकाची नावे लागलेली आहेत सातबारा स्वतंत्र आहे त्यामुळे खरंतर विक्री करण्यासाठी कोणतीही बाधा येण्याचे कारण नाही. तथापि आपण या जमिनींच्या मोजणीसाठी अर्ज अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे करावा मोजणी अंती सीमांकन ही करून घ्यावेत व त्यानुसार आपणास आपल्या जमिनीच्या हद्दी कडून येती. वाट प्रमाणे कमी जास्त पत्रक मोजणी खात्याकडून/ भुमिअभिलेख खात्याकडून केले नसल्याने आपणास त्याबाबतच्या हद्दी माहित नाही. आपण जमिनीची मोजणी करून घ्या त्याप्रमाणे हत्ती निश्चिती करून घ्या विक्रीस कोणत्याही प्रॉब्लेम येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष मारुती पाटील
26-02-2021
Santoshpatil.sp9.sp@gmail.com
नमस्कार सर, मी साई अनिरुद्ध क्रेडिट सोसायटी या संस्थेत संचालक नसतानाही मला त्या संस्थेत संचालक आहे असे दाखवून त्या संस्थेने केलेल्या अफरातफरीत मी आहे असे दाखवले आहे व हे प्रकरण कोर्टात चालू आहे त्याअगोदरच सदर बँकेने कोर्टाचा निकाल यायच्या अगोदरच माझ्या वडिलोपार्जित जमिनीवर माझे नाव लागले नसतानाही आम्हाला कोणतीही कल्पना अथवा नोटीस न पाठवता बोजा चढवला आहे असे करता येते का? अगर नाही तर संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर काय कारवाई करता येईल याचे मार्गदर्शन करावे
अफरातफरी चा जो काही वाद न्यायालय मध्ये चालू आहे तो भारतीय दंड संहिता अन्वय चालू आहे. विविध कार्यकारी सोसायटी च्या अफरातफर प्रकरणांमध्ये, जी काही रक्कम वसूल करावयाची असे त्याबाबत लेखापरीक्षकांनी लेखा मुद्दा उपस्थित केला असेल व त्याप्रमाणे संबंधित विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ने अथवा त्या सोसायटी वरती जर प्रशासक नेमला असेल तर त्या प्रशासकाने तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या मिळकतीवर बोजा ठेवण्याबाबत चे पत्र दिले असे. वास्तविक तलाठी व ग्रामसेवक यांनी असा बोजा ठेवण्यापूर्वी आपणाला नोटीस देणे कायद्याने अभिप्रेत आहे मात्र ती नोटीस दिली नाही म्हणून आपला मार्ग बंद झालेला नाही आपण जो बोजा ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगाने ग्रामसेवकाकडून प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तर जमिनीच्या बाबतीत संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकता. अशा प्रकरणात केवळ अनियमितता आहे म्हणून त्यांच्यावर ती कार्यवाही करण्याचा तसा प्रश्न येत नाही कारण अनियमितता झाली असे तर त्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व जमीन महसूल अधिनियम 1966 या दोन्ही कायद्यामध्ये अपील करण्याची तरतूद आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas shamkant patil
26-02-2021
vikaspatil20488@gmail.com
सर,माझा वाटणी चा वाद न्याय प्रविष्ट आहे व त्यात मला समोरील व्यक्ति कडून कोणताही प्रकारचे हस्तांतर होऊ नये असा तूर्तातूर्त मनाई हुकूम मिळालेला आहे,तरी समोरील व्यक्तिने ती मिळकत बँक कडे आदेश नंतर गहाण ठेवली,त्या वर मी काय करू शकतो ते गहाण रद्द करायला व परत असा होऊ नये म्हणुन 7/12 वर आदेशाची नोंद करू शकतो का?
Question by उमेश पवार
25-02-2021
umeshp4021@gmail.com
नमस्कार, मला आजोबांनी दीड एकर जमिन खुश खरेदी (बक्षीस पत्र नव्हे) दिली आहे, तरी त्याची नोंद होईल का. कारण माझ्या वडिलांनी वारसा हक्क चा अर्ज मंडल अधिकारी यांना केला आहे....!
Question by प्रमोद सिरसाट
25-02-2021
pramodsirsat15854@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे कि, वर्ष १९३९ ला एक प्लॉट २४१२ चौरस फूट होता आज रोजी १३६१ चौरस फूट हक्क नोंदणी व आखीव पत्रिके वर आहे, सदर बदल बाबत मी माहिती अधिकाराचा वापर व तक्रार करून सुद्धा मला प्लॉट मध्ये झालेल्या बदलाबाबत माहिती मिळत नाही आहे। सदर माहिती मिळणे बाबत योग्य उपाय/मार्गदर्शन करावे.
Question by Deepak patil
21-02-2021
deepakraje191@gmail.com
खातेफोड करायची असेल आणि 4वारसा पैकी 3तयार नसतील तर काय करावे
खातेफोड म्हणजे जमिनीचे वाटप होते व ते करण्यासाठी , चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती तयार नसेल तर आपणाला दिवाणी न्यायालयात दावा करण्याशिवाय पर्याय नाही. ही जर जमिनीच्या सह धारक आणि पैकी सर्व सह धारकांची संमती असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आपणाला तहसीलदार यांचेकडे अर्ज करून खाते फोड करता येईल. मात्र जर सह धारकांची संमती नसेल, तर दिवाणी न्यायालयात जाण्यास शिवाय कोणताही पर्याय नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
20-02-2021
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आमचे गाव वेंगुर्ले सिंधुदुर्ग मध्ये आहे आणि १९५८ आधीचे जुने काही फेरफार आम्हाला आमच्या तहसीलदार किंवा तलाठी ऑफिस ला सापडत नाही , १९५८ आधी सिंधुदुर्ग चे divisional बोर्ड रत्नागिरी मध्ये होते असे माहिती उमजते , १९५८ आधी सिधुदुर्ग चे सर्व फेरफार रत्नागिरी मध्ये मान्य होत होते असे काही जणांकडून कळते ,जर मला जर पूर्वी चे काही फेरफार रत्नागिरी कार्यालयामध्ये चेक करायचे असेल तर कोणत्या विभागाला संपर्क करायचे , तसेच त्या विभागाचा संपूर्ण पत्ता कसा कळेल
दिनेश राव
पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हे एकत्र होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वतंत्र झाला. त्यामुळे जे काही वेंगुर्ल्याची रेकॉर्ड रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलेले असे ते सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ठिकाण ओरोस या ठिकाणी आपणास भेटू शकेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran satav
19-02-2021
kiransatav51@gmail.com
सर जर कोणी फेरफार नोदी साठी हरकत दर्शविली आणि तीच हरकत सर्व बहीण भावांना हि असेल पण अर्जात फक्तं एकाचाच नाव असेल आणि त्याने पुढे झाऊन मा. मंडल अधिकारी यांच्या समोर जाऊन ती हरकत प्रतिण्या पत्र देऊन मागे घेतली .. त्यामुळे समोरील वेक्ती च नाव 7/12 उतऱ्या मध्ये लागलं असेल पण दुसऱ्याच तरीही हरकत असेल कारण असलेल्या शेत्रा पेक्षा जास्त शेत्र समोरच्याने कुळमुत्यार पत्राने लिहून घेतले आहे आणि आता 7/12 मध्ये त्याचं नाव ही लागलं आहे तर काय करावे असे लागलेले नाव कमी करता येईल का ... व पुढे काय करावे ...
ज्या वेळेस एखादी हक्क संपादन केली जातात व संपादन केलेल्या हक्काचे अनुषंगाने जर कोणाची हरकत असेल तर अशी हरकत मंडळ अधिकारी यांच्याकडे घेतली जाते. ज्या कुणा एका व्यक्तीने हरकत घेतली होती तसे रशियाची हरकत इतर सर्वांची होती. मात्र हरकत केवळ त्या एकाच व्यक्तीने केली होती व त्यानंतर ती हरकत प्रतिज्ञापत्र सादर करून मागे घेतलेली आहे. त्यामुळे तो जो काही हरकत घेतलेला फेरफार होता तो मंजूर झालेला आहे व त्यामुळे आपले हक्क डावलले आहेत अशी आपली भावना आहे. त्यासाठी आपण जो मंजूर फेरफार झालेला आहे त्याच्या विरुद्ध आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी असतील त्यांच्याकडे आपण आपली दाखल करा. फेरफार मंजूर झाल्यापासून अपील दाखल करण्याचा कालावधी हा सात दिवसांचा असतो. जर सात दिवस होऊन गेले असतील तर आपल्या आपल्या समवेत आपण विलंब माफीचा अर्ज हे दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravindra
19-02-2021
ravimangire@gmail.com
एकत्रीकरण उतारा गुणाकार बुक आणि आकारफोड पत्रक यामध्ये २०१३ साली मोजणी आधारे भूमी अभिलेख शाखेने दुरुस्ती केली आहे . अशा दुरुस्तीने १९८८ साली झालेल्या एकत्रीकरणाच्या अमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करता येतील काय? कारण १९८८ मध्ये एकत्रीकरनाणे झालेल्या गट नंबर बाबत यापूर्वीच खरेदी व्यवहार झालेले आहेत.
महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा कलम 31 अन्वय जर काही गणितीय चूक , जी स्कीम तयार करण्यात आलेली आहे त्याच्या मध्ये असेल तर त्याची दुरुस्ती करता येते.
तसेच कलम 32 अन्वये या स्कीम मध्ये काही अन्य चुका झाल्या असतील तर त्याचीही दुरुस्ती करता येते. मात्र याबाबत जमाबंदी आयुक्त यांना अधिकार आहेत. याबाबत आपण माननीय जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे अर्ज करू शकता. अर्जाची चौकशी आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष भूमिअभिलेख यांच्याकडून करून अधीक्षक भूमी अभिलेख उपसंचालक भुमी अभिलेख यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव जमाबंदी आयुक्त कडे जातो व त्यानंतर प्रकरणात गुणवत्ता असेल तर दुरुस्तीची कार्यवाही केली जाऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील जगताप
18-02-2021
swapnil.040@gmail.com
सर्व अधिकारी,
सर, 1990 ची खरेदी (डांगे चौक, थेरगाव ) 500 स्क फूट जमीन घरासाठी, मूळ मालक यांनी "अ" वक्तीला तहसील मुळशी मधे जमीन विकली. परंतु अ वक्तीने आपले नाव ७/१२ वर लावले नाही, पुढे अ ने ब ला, ब ने क ला तहसील मध्ये रीतसर खरेदी विक्री झाली पण (अ, ब, क) कोणीच ७/१२ वर नाव लावले नाही, घर मोडकळीस आहे, मला पिंपरी महानगर पालके मधून परवानगी घरून बांधकाम करावयाचे आहे, पण आमचे नाव ७/१२ वर नाही. "क" वक्तिने म्हणजे आम्ही तलाठी कार्यालय मध्ये अर्ज दिला आहे, परंतु काम होत नाहीं, कृपया मार्गदर्शन करा की आम्ही ७/१२ नाव लावण्यासाठी काय करावे.
सातबाराला नाव लागले नाही म्हणजे आपल्या त्या मिळकतीमध्ये हक्क नाही असे होत नाही. आपण मध्यंतरी जी सर्व खरेदीखते झालेले आहेत म्हणजे मूळ मालकाकडून अ व्यक्तीला, अ व्यक्तीकडून व्यक्तीकडे ब व्यक्तीकडे व ब कडून क व्यक्तीकडे, ती सर्व खरेदीखते तलाठी यांच्याकडे सादर करा. एखाद्या मिळकतीत हक्क संपादन केल्यानंतर व तलाठी यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर, प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने व सादर केलेल्या अधिकार अभिलेख त्याच्या अनुषंगाने तिथेच संबंधित व्यक्तींना गाव कामगार तलाठी यांच्या वतीने कलम 149 अन्वये( महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966) नोटीस काढली जाते. या नोटिशीला वरती नोटीस असे संबोधले जाते. व नोटीस मध्ये दिलेला कालावधी संपुष्टात झाल्यानंतर जर कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसेल तरसा फेरफार मंजूर करणे मंडळ अधिकारी यांच्यावर क्रमप्राप्त आहे. मात्र जर हीच संबंधित व्यक्तींकडून जर तक्रार प्राप्त झाली, तर तक्रार रजिस्टरमध्ये नोंद करून सदरचे प्रकरण निर्णयासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठवले जाते. त्यामध्ये तक्रार सादर करणारा व इतर संबंधितांना नोटीस काढून त्याची सुनावणी घेतली जाते व सुनावणीअंती प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जातो.
आपल्या प्रकरणांमध्ये तलाठी यांच्याकडून आपल्याला कोणती उत्तर दिले जात नाही ही बाब आपण संबंधित तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून द्यावी किंवा संबंधित तलाठी यांना आपण केलेल्या हक्क संपादन अर्जाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली याबाबत लेखी उत्तर देण्याबाबत त्यांच्याकडे आग्रह धरण्यात यावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dipali.tukaram.bhorpe
18-02-2021
Rambhorpe121@gmail.com
आजोबांच्या नावाची जमिन आईला न विचारता मावशीने परसपर खरेदीखत करुन घेतलीआहेत
मार्रगदर्रशन करा
मावशीने जी जमीन आजोबांकडून परस्पर खरेदी खताने विकत घेतलेली असेल ती जमीन आजोबांची स्वकष्टार्जित असेल. स्वकष्टार्जित जमीन कोणत्याही व्यक्तीला विकण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो. मात्र ती जमीन जर आजोबांना वडलोपार्जित प्राप्त झालेली असेल तर आपल्या आईच्या वाट्याला जो हिस्सा येणार आहे तो विकता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उज्वलकुमार मारोती चव्हाण
18-02-2021
Ujwalkumar627@gmail.com
नमस्कार साहेब,
मी उज्वल चव्हाण, माझे मोठे बाबा नावं भोपीदास रामजी चव्हाण रा, महाळुंगी ता,आर्णी जिल्हा यवतमाळ, यांचे शेत हे शेजारी असलेल्या शेजारील लोकांनी त्या संपूर्ण शेती वर अतिक्रमन करून तिथे मुलीचे वसतिगृह बांधले आहे,तर ती जमीन मला कशी मिळवता येईल
आपल्या जमिनीवर ती शेजारच्या लोकांनी अतिक्रमण करुन बांधकाम केलेले आहे परंतु आपण इतके दिवस काय गेले त्यांना बांधकाम का करून दिली. आपण आपल्या जमिनीची मोजणी करून घ्या अरे जर मोजणी यांचे अतिक्रमण झालेले असेल तर आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून त्यांना केलेले बांधकाम काढून टाकण्याबाबत निर्देश देण्याबाबत विनंती करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
