जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर
माझ्या ७/१२ वरती अधिकार अभिलेखात "सरकार" नाव लागलेले आहे. सदरचे सरकार नाव तगाई पोटी लागलेले आहे. तगाई माफ झालेली असताना देखील सरकार नाव कमी करण्यात आले नाही. ७/१२ वरील सरकार नाव कमी होणेसाठी मी सन २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज केला. त्यावरती तहसिलदार यांनी मला सन १९५६ ते २०१८ पर्यंत राज्यपाल यांच्या राजपत्र १जानेवारी २०१८ अन्वये कलम १८२ अंतर्गत चलनाने रक्कम भरावयाची नोटीस दिली. त्यानुसार मी चलनाने रक्कम भरली. परंतु सदरचे प्रकरणाबाबत चुकीची कार्यवाही झालेली आहे. सदरचे प्रकरण कलम १८२ मध्ये बसत नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगत प्रकरण निकाली काढले. सदरच्या प्रकरणावर चुकीची कार्यवाही झाली हे समजण्यासाठी २०१३ पासुन ते आजपर्यंत ७ वर्ष लागली. यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष..? शेतकऱ्यांच्या दंड हा वाढतच राहिली.
आता मी भरलेल्या रक्कमेचे काय.? सदरच्या प्रकरणाबाबत मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
माझे वडिल वडिलोपार्जित सामूहिक जमिनीवर स्वतः घर बांधून राहत होते त्यांच्या निधना नंतर त्यांचे भाऊ घरावर हक्क आणि अधिकार मागत आहेत जमिनीवर हक्क नाकारता येत नाही पण घर त्याच्या स्व खर्चाचे आहे तर त्या घराला वारस म्हणून माझी आई आणि भाऊ यांचे नावे लागतील का ? आणि कसे ?
भारतामध्ये दुहेरी मालकी हक्काबाबत ची तरतूद आहे. म्हणजे जमीन एकाच्या मालकीची असू शकते तर त्यावरील इमारत ही दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या असू शकते. व त्याचा अर्थाने जी सामूहिक जमीन होती त्या जमिनीवर आपल्या वडिलांनी घर बांधले व त्या घराला आपल्या वडिलांचे नाव लागलेले आहे. पर्यायाने त्यांच्या पश्चात आपले व आपल्या आईचे नाव लागू शकते. आपल्या इतर चुलत्यांना त्यावर हरकत घेण्याचा कोणताही अधिकार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचे आजोबा एका संस्थेमध्ये काम करित होते. ती संस्था अचानक बंद पडली व सदर संस्थेमध्ये काम करणारे सर्व व्यक्ती सोडून निधून गेले. काही दिवसानंतर त्या आजोबांनी त्या संस्थेच्या जागेवर आपले मकान बांधले व ग्रामपंचायत ने ही त्यांच्या घरावर त्यांच्या नावाने कर आकारणी केलेली. नंतर ते आजोबा मरण पावले व त्यांच्या त्या मकानावर त्यांचे वारसाची नावे नोंद झाली. सदर वारसानी आपल्या एका भावाला सदर मकान लिहून दिला. आता 1990 पासून ते 2011 पर्यंत सदर मकानावर मालकाचे नांव हे त्या व्यक्तीचे होते व नंतर ग्रामपंचायतने 2012 पासून नमुना 8 ला मालकाचे नावामध्ये सरकार नमूद केलेला आहे. सर हे कुठला नियमानुसार केलेले आहे यांची मला माहिती दयावी. मी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरकार शब्द कमी करण्याबाबत अर्ज सादर केलेला आहे.‍ तरीही माझ्या अर्जावर आतापर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. करिता मला सदर विषंयासबंधी माहिती देण्यात यावी
ज्या वेळेस आजोबांकडून त्याच्या वारसांकडे व त्यापैकी काही वारसांनी एका वारसाच्या नावे संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या इमारतीला नाव लागले तदनंतर ग्रामपंचायतीने एकतर्फी सरकार असे नमूद केले, त्या ग्रामपंचायतीच्या कृती विरुद्ध आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करा.
कदाचित असेही असेल की ती संस्था ती सहकारी संस्था असे. अवसायनात गेल्यामुळे ती शासनाचे नावे झालेली असेल व पर्यायाने संबंधित विभागाने ग्रामपंचायतीला त्याप्रमाणे कळवले अनुसार शासन हे नाव लागलेले आहे.
मात्र आपण आपल्या हक्कासाठी कायद्याने दिलेल्या पर्यायाचा वापर करून आपण लढा देऊ शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्ते.. आम्ही नोकरी निमित्त परगावी असतो सेवानिवृत्ति नंतर गांवी थोडी शेती हवी म्हणून (वडीलांर्जीत शेती वडिलांनी बाकी भावांच्या नावे केली) मी एजंट द्वारा 2018 ला ६०गुंठे शेत केले कुलमुखत्यारपत्र द्वारा खरेदी झालेले आहे..पण ते पाटील की भोगवटादार-२चे क्षेत्र आहे ( हे आम्हांला एजंट ने अंधारात ठेवून स्टॅम्प ड्यूटी भरुन दस्त केला व ७/१२ वर नोंद पण झाली) पण साहेब....ते शेत मला आता विकावयाचे आहे पण घेणारे भोगवटादार-२चे क्षेत्र भोगवटादार-1 करुन आणा तरचं तुम्हाला विकता येईल.... व एजंट त्यासाठी खर्च अव्वाची सव्वा सांगतायत... माझा प्रश्न असा आहे की ... सदर शेत विकता येईल का? व त्यासाठी काय करावे लागेल? तसेच त्यासाठी किती नजराणा, दंड किंवा इतर सरकारी चार्जेस भरावे लागतील व किती दिवसात काम होईल...फसवणूक करुन अश्या जमिनी एजंट ने नवख्या माणसांच्या गळ्यात मारुन जमिन खरेदी करुन दिल्या असतील तर खरेदीदाराला कोणता धोका नसतो ना? शिवाय महसूस निबंधक "नजराणा न भरलेल्या शेती चे दस्त करतात चं कसे? हे सरकारी नुकसान नव्हे काय? कृपया सविस्तर मार्गदर्शन अपेक्षित. . धन्यवाद सर
आपण जी जमीन खरेदी केली आहे ती नक्की कोणत्या स्वरूपाची आहे याची सातबारा पाहून पडताळणी करा. ही वतन जमीन आहे की शासनाने प्रदान केलेली जमीन आहे याबाबतचे स्वरूप तपासा. जर शासनाने प्रदान केलेली जमीन असेल तर 2019 मध्ये संमत झालेल्या सुधारणा नुसार अशी जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 करता येते मात्र त्यासाठी नजराणा भरावा लागतो.
भोगवटादार वर्ग 2 जमीन बाबतची परवानगी खरेदीदाराने स्वतः घ्यावी घ्यावी अशा अटीवर विकण्यास हरकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सामायिक क्षेत्रा मध्ये(जागा) वारस नोंदवण्याची काय प्रक्रिया आहे???सदरील जागा दोन व्यक्तीच्या नावें असून त्यातील एक व्यक्ती मयत झाली असून त्यांच्या मुलांनी वारसदार म्हणून नोंद लावली आहे . तर वारस दाराची नोंद लावण्या साठी सामायिक क्षेत्रा मधील दुसऱ्या व्यक्तीच्या परवानगी ची गरज असते का??कृपया मार्गदर्शन मिळावे??
इतर व्यक्तीच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र जी व्यक्ती मयत झालेली आहे तिचा त्या मिळकतीत असलेला जो हिस्सा होता त्या हिच्या पुरताच तिच्या वारसांची नावे लागतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इतर व्यक्तीच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र जी व्यक्ती मयत झालेली आहे तिचा त्या मिळकतीत असलेला जो हिस्सा होता त्या हिच्या पुरताच तिच्या वारसांची नावे लागतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
♂️जर ७/१२ वर गट नं - अ, ब व क वर ईतर हक्कात वारस नजरचुकीने सुटले असतील तर काय करावे तसेच नोंद मंजूर झाली आहे सन २०११ नोंद मंजूर झाली आहे
♂️तसेच वरिल उपदोघातील गट नं-अ चे हक्कसोड झाले वर्ष २०१२ मधे आता गट नं -ब व क शिल्लक आहे . तरी आमचा गट नं. अ मधे आमचा अधिकार आहे काय? कारण वारस नोंद करतांना आमची नावे सोडून दिली होती . व हक्कसोड ला सह्या ज्यांची वारस नोंद झाली त्यांनीच हक्कसोड केलं होतं.
ज्या गटाला आपले नाव लागली नाही त्या गटात बाबतीत आपण म्हणता की, की त्याबाबत हक्कसोडपत्र केलेले आहे. हक्कसोडपत्र जर नोंदणीकृत असेल तर आपणाला इतर हक्कांमध्ये नाव लागणार नाही. मात्र जर नोंदणीकृत हक्कसोडपत्र नसेल तर अशा हक्कसोडपत्र खास कुठलीही वैधानिक मूल्य नसते. आपण हक्कसोडपत्र कोणते केले आहे याची पडताळणी करा. जर हा नोंदणीकृत असेल तर त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ज्या फेरफार आणि आपले नाव वगळले गेले असेल त्याच्याविरुद्ध आपण दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही ज्या जमीन राहतो त्या जमिनी वर गेली 60 वर्ष पासून निवासी महणुन राहतो. आम्ही सातबारा पहिला त्यावर परीघ असा कब्जा आहे अस नाव आहे . तर परीघ या शब्दाचा अर्थ काय आहे
सर नमस्ते आजोबानी खरेदी केलेल्या पाच एकर श्रेत्र असलेल्यासात बारा उताऱ्यावरआजोबा हे स्वताच्या ३ मुलानां वारस न लावता तिन्ही मुलांच्या मुलांना म्हणजे तिन्ही नातवांना (आजोबा + नातू) अशी नोंदणी किंवा अशी खरेदी करीत आहेत अजोबा व तीन नातवाचे नाव लावल्यास चालेल किंवा कसे काही अडचणी येऊ शकतात काय
आजोबांनी उपरोक्त मिळकत ही खरेदी केली आहे याचा अर्थ ती मिळकत त्यांची स्वकष्टार्जित आहे. स्वकष्टार्जित मिळकत कशा पद्धतीने तिची विल्हेवाट लावावी याचा अधिकार त्या त्या व्यक्तीला असतो. त्यामुळे मुलांच्या ऐवजी नातवांची नावे लागली तर त्यामुळे कोणताही प्रश्न भविष्यात होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yuvraj
05-02-2021
honmaneyuvraj71@gmail.com

सर,
आम्ही नेरळ येथे बेटी चाळीत रूम पहिला आहे . सदर प्रोजेक्ट ग्रामपंचायत अप्रोळ आहे.प्रोजेक्ट ७/१२ जमीन वर आहे.१०९ घरांचा आहे.बिल्डर ने अमाला ७/१२,नमुना ८, घरपटी नमुना म्हणून दाखवली तर त्या ठिकाणी आम्ही रूम घेऊ शकतो का. कृपया मला मार्गदर्शन करावे.
आपण विचारलेल्या प्रश्नानुसार ज्या बैठ्या चाळीत आपण घर घेत आहात ती बैठी चाळ सर्वे नंबर वर बांधलेली आहे. सर्वे नंबर वर बांधलेल्या बैठ्या चाळीस परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस नाही. जर जागेचे शेत्र पाचशे मीटर पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकल्पाची नोंदणी रेरा अथोरिटी कडे करणे आवश्यक आहे.
क्षेत्र पाचशे मीटर पेक्षा क्षेत्र कमी असल्यास नेरळ जिल्हा रायगड येथे नेरळ ममदापुर प्राधिकरण अस्तित्वत आहे. व गावठाणाबाहेरील कोणत्याही जमिनीच्या विकासाला आथवा त्यावरील बांधकामाला या प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे.
आपण ज्या चाली मध्ये घर घेत आहात त्याला बांधकाम परवानगी किंवा विकास परवानगी आहे का असल्यास त्याची प्रत संबंधित विकासकाकडून प्राप्त करून घ्या. बांधकाम परवानगी व मालकी हक्काबाबत शहानिशा करूनच अशा चाळीमध्ये घर घेणे उचित.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandip
04-02-2021
sanmitrasandip@gmail.com

माझ्या आजोबांनी 1992 साली मृत्यूपत्र लिहून जमीन त्यानी एकाच नातूच्या नावे केली आहे त्या मूळे माझे नाव वारस लागत नाही पण ##ती जमीन महारवतन आहे तर महारवतन जमिनी चे म्रृत्यूपत्र होवू शकते का?
महार वतीन जमिनीचे मृत्युपत्र होण्यास कोणतीही अडचण नाही. तथापि ही जमीन आपल्या आजोबांना मिळाली की त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाली याची खात्री करा. आजोबांसाठी ती जमीन वडलोपार्जित असेल तर केवळ एका व्यक्तीचे नावे त्यांना करता येणार नाही. मात्र ती त्यांना स्वतःला मिळाली असेल तर अश्या जमिनीची विल्हेवाट त्यांच्या मर्जीप्रमाणे ते लावू शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Uzer Khan
04-02-2021
uzairahemad00@gmail.com

क व्यक्तीने ग्रामीण एका भागात 2010 मध्ये 1. 60 (4 एकर ) शेत जमीन खरेदी केली. जमीन विक्री करणारे वक्ती ने 2009 मध्य बिनशेती आदेश साठी उपविभागीय अधिकारी कडे अर्ज केला होता. बिन शेती आदेश आणि रेखांकन ला 2012 मद्ये मंजूर मिळाला. क ने 2020 मद्ये revise रेखांकन केले त्यास मंजुरी घेतली नाही. नगर रचना येथे जुने रेखांकन आहे. क प्लॉट जुन्या रेखांकन ने विक्री करत नाही. नवीन aprove न केलेले रेखांकन नुसार प्लॉट खरेदी केल्यास भविष्य मध्ये अडचण होईल का. कूर्पया मार्गदर्शन करावे hi विनंती
सर जुने मातीचे घर विकत घेतले आहे kherdhi खत केलेली आहे पण ct serve made nav नाही आहे नाव लावण्या साठी काय करावे
ज्या खरेदीखताने आपण घर विकत घेतलेली आहे त्या खरेदी खतांमध्ये घरात खालील जमीनही ही आपणाला हस्तांतरित झाल्या बाबतचा आठवा हस्तांतरीत होत असल्याबाबत असा उल्लेख जर खरेदी खतामध्ये असेल तर ते आपण संबंधित सिटी सर्वे अधिकारी यांना सादर करा. सादर केलेल्या खरेदीखताचा अनुषंगाने मिळकत पत्रिकेला आपले नाव लागेल.
मात्र केवळ जमिनीवरील घरच आपण खरेदी केली असल्यास व त्याखालील जमीन खरेदी केलेल्या केलेली नसल्यास आपले नाव मिळकत पत्रिकेमध्ये अशा जमिनीला लागणार नाही. जे घर आहे त्या घराला, स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत म्हणजे ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालिका यांचेमार्फत करवसुलीसाठी लावले नाव लावले जाईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jaydeep pawar
02-02-2021
jpawar018@gmail.com

केंद्र सरकार कडून खाजगी शेत जमीन वर लागलेला वन विभागाचा केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वनेत्तर कामास बंदी हा शिक्का कमी कसा करावा त्या बद्दल माहिती द्यावी सर
वनेतर कामास बंदी हा जो शेरा सातबाराच्या इतर हक्कात आहे तो कमी करण्यासाठी, आपणाला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामध्ये जेवढी क्षेत्र तुम्ही वनेतर कामासाठी वापरणार आहात त्याच्या दुप्पट क्षेत्र आपणाला केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यावे लागते व त्यावर त्यावर वृक्ष लागवड करण्यासाठी शुल्क ही आपणाला केंद्र शासनाकडे जमा करावे लागते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pramod pawar
02-02-2021
pramodpawar23@gmail.com

महोदय, मी वरील अर्जदार या मुंबई वडोदरा महामार्गाच्या संपादनात उद्धवस्त झालेला शेतकरी आहे. माझ्या कौटुंबिक जमिनीतून माझ्या हीश्याला आलेल्या जमिनिपैकी तब्बल 120 गुंठे जमीन संपादित झाली आहे. वाटणी पत्र नोंदी तब्बल 3 वेळा असल्याने चुकीचे वाटणीपत्र नोंदीत झाल्याने माझ्या कब्जा वाहिवाटिला असलेली जमीन माझ्या चुलत भावांच्या नावावर राहिली आणि मी हरकत घेऊनही आर्थिक व्यवहारमुळे त्याचा मोबदला माझ्या भाऊ बंधानी हडपला. त्यात सर्वे नंबर 24 ही जमीन एकत्रित (गोळा) सर्वे नंबर आहे. त्यात आमचा एक सामायिक सात बारा (40 गुंठे) तसेच इतर क्षेत्र हे भाऊ बंध आणि काही इतरांचे नाव आहे. पैकी आदिवासी खातेदार वणगा, डावरे आणि थापड यांचे क्षेत्र त्यांच्या नावे आणि वहिवाट असे बरोबर आहे, मात्र माझे भाऊ बंध सदाशिव कानू पाटील यांच्या नावे असलेला सात बारा चुकीचा आहे. 1986-87 मध्ये एकत्रिकरणात झालेल्या भूसर्वेक्षणात माझ्या हीश्याला या सर्वे नंबर चे 52.2 गुंठे क्षेत्र आहे. तशी अधिकृत नोंद आणि सह्या भूमी अभिलेख दप्तरी असलेल्या गुणाकार बुकात आहेत. त्याच 24 सर्वे नंबर पैकी 52.2 गुंठे जमीनी पैकी 49 गुंठे जमीन ही माझी जात असताना भूकरमापक श्री सुरेश लंगोटे यांनी माझ्याकडे मोबदला मिळावा असा रिपोर्ट पाठविण्याचे 5 लाख रुपये लाच मागितली. मी ती देण्यास नकार दिल्याने सदाशिव कानू पाटील यांनी त्यांना पाच लाख रुपये दिल्याने लंगोटे यांनी खोटा रिपोर्ट पाठवून या 24 सर्वे नंबर मधील 37 गुंठे जमिनीचे पैसे सदाशिव कानू पाटील यांना मिळवून दिले. मला जेव्हा हे कळले तेव्हा उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. आपण त्याची दखल घेऊन तातडीने फेर मोजणी लावण्याचे आदेश दिले. त्या नुसार 2 डिसेंबर 2020 रोजी या 24 सर्वे नंबर ची फेरमोजणी झाली. त्यात आलेला नकाशा आणि वहिवाट बरोबर नोंदवली गेली. या मोजणी मध्ये स्पष्ट झाले आहे की भूमिअभिलेख विभागाने आधी दि.12 ऑक्टोबर 2020 रोजीच्या मोजणीचा पाठवलेला रिपोर्ट हा आर्थिक व्यवहार करून पाठवला आणि त्याच आधारे प्रांत कार्यालयातून सदाशिव कानू पाटील यांना मोबदला देण्यात आला. एकत्रित (गोळा) सर्वे नंबर मध्ये वहिवाट असेल तसे हिस्से पाडले जातात असे असताना आणि सदाशिव कानू यांनी मोजणी समयी एक ही गुंठा वहिवाट न दाखवता त्यांना 37 गुंठे पैसे आणि आमचा 40 गुंठे सातबारा असताना मी 49 गुंठे वहिवाट दाखवली असताना आमची सामायिक केवळ 12 गुंठे संपादित असा चुकीचा अहवाल या रिपोर्ट मध्ये माझी 49 गुंठे वहिवाट स्पष्ट दिसते आहे, मी सामूहिक सात बारा सदरी देखील आहे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयातील महत्वाचा दस्त म्हणजे गुणाकार बुक ( फॉर्म 4) मध्ये माझी हीश्याची अंतिम नोंद स्पष्ट पणे नमूद आहे, म्हणजेच माझ्या हीष्याच्या 52.2 गुंठे पैकी 49 गुंठे जमीन संपदनाखाली आहे. म्हणजेच 49 गुंठे जमिनीचा मी हकदार आहे. अगदी तसेच सर्वे नंबर 79/34 ब हा एकत्रित सर्वे नंबर चा एक भाग आहे, 40 -40 गुंठेचे 4 सातबारा असून 79/34 ब हा माझा सातबारा क्लीअर आहे, यात पुन्हा मोजणी वाल्यानी मोजणी करताना 6 गुंठ्यांत माझ्या भाऊ बंधाचे कबजेधारक दाखवले व लगत असलेल्या त्यांच्या 40 गुंठे सात बारा मधील 6 गुंठे क्षेत्र माझ्या जागेच्या एक बाजूला येते असे दाखवले, म्हणजे त्यांना पुन्हा 6 गुंठे चे पैसे जावेत असे भूमिअभिलेख यांचा डाव आहे, मुळात 40 गुंठे सातबारा पैकी 6 गुंठे एका बाजूला आणि उरलेली 34 गुंठे दूर कुठेतरी असे तुकडे होत नाही हे स्पष्ट आहे, तरीही असा चुकीचा रिपोर्ट बनवला गेला आहे. तरी ते ही 17 गुंठे माझ्या हक्काचे आहेत, 79 /34 पैकी माझा 79 /34 ब हाच सातबारा मधील 17 गुंठे जागा बाधित होत आहे. यापूर्वीही सर्वे नंबर 81 मधील 24.65 या संपादित जमिनीचा सातबारा क्लीअर असताना मला मोबदला दिला जात नव्हता ,कोणाचीही हरकत नसताना हरकत आहे असे खोटे सांगितले जायचे, मला उद्या या पर्वा या असे संगीतले जात होते. मी भिवंडी प्रांत कार्यालयात असलेले अधिकारी श्री विठ्ठल गोसावी (तिथे त्यांच्या नावाचा बोर्ड लावलेला आहे, म्हणून पूर्ण नाव माहिती आहे) यांच्याकडे गेलो, व म्हणालो साहेब का माझे पैसे देत नाही, तर ते म्हणाले पैसे फुकट मिळत नाही, त्याला खर्च आहे. प्रांत साहेबांना कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, मग त्यांनी प्रांत कार्यालयात भूसंपादन विभागात असलेले प्रकाश गजानन पाटील यांना त्यांनी बोलावले व म्हणाले यांच्याकडे तुमच्या एकूण मोबदला रक्कमेच्या 5 टक्के कमिशन चा चेक द्या मग पैसे निघतील. मी हतबल होऊन माझ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेच्या खाते क्रमांक- 001400300004565. चे दोन कोरे धनादेश प्रकाश पाटील यांनी घेतले व नंतर त्यावर प्रकाश पाटील यांनी चेक क्रमांक - 078324 वरून 1 लाख 40 हजार आणि दुसरा चेक क्रमांक-078325 यावरून 2 लाख असे 3 लाख 40 हजार एवढी लाच माझ्याकडून घेतली, हे पैसे विठ्ठल गोसावी आणि प्रकाश पाटील यांनी घेतले असून प्रकाश गजानन पाटील यांच्या खात्यात गेल. मी हरकती घेतल्या ,माझ्या वकिलांनी लेखी हरकती घेतल्या मात्र त्यांची सुनावणी न करता कमिशन दिले की पेमेंट मिळेल या तत्वावर माझ्या हरकती केराच्या टोपलीत टाकून मला उद्धवस्त केले आहे. माझ्यावर आधीच खूप अन्याय झालेला आहे. यात लाच घेणे, लाचेची मागणी करणे असे प्रकारही माझ्याबाबतीत घडले आहेत, मात्र मला त्या तपशिलात न जाता मला किमान या माझ्या हक्काच्या स.न.24 मधील 49 गुंठे जमिनीचा तसेच स.न. 79/34ब मधील 17 गुंठे जमिनीचा मोबदला मला मिळावा यासाठी मी अनेकदा अर्ज,हरकती, विनवण्या केल्या, प्रांत अधिकारी यांना अनेकदा भेटलो मात्र माझी दखल घेतली नाही. म्हणून माझ्याकडे आता जमीन राहिली नाही, जी आहे नावावर ती आता भाऊ बंधांच्या कब्जात आहे. मी पूर्णपणे भूमिहीन झालो आहे. मला मार्गदर्शन करावे ही विनंती।

Question by Ajit patil
30-01-2021
ajitkhose51@gmail.com

(शेती वाटणी बद्दल) कोर्ट मध्ये केस चालू आहे, परंतु मागची पाच वर्ष पूर्ण शेत हे विरुद्ध पार्टी वापरत आहेत तरी आम्हाला त्यातून एक रुपयाचे उत्पन्न दिले जात नाही . आमचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि विरुद्ध पार्टी केस जेवढं लांबेल तेवढं लांबवत आहे . पूर्ण शेती, निकाल लागे पर्यंत कोणी ही वापरायचे नाही असं काही होवू शकते का ??
अशा प्रकारचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही. न्यायालयाने प्रथमदर्शनी आपली जी विरुद्ध पार्टी आहे त्यांच्या ताब्यात वादातील मिळकत असल्याचा निष्कर्ष काढल्याने त्यांच्या ताब्यात ती मिळकत आहे. भविष्यामध्ये न्यायालयाचे निकालांमध्ये त्या मिळकतीचा कायदेशीर हक्क आपल्याकडे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला तर मुक्त कालावधीमध्ये जे उत्पन्न समोरच्या पार्टीने घेतलेले आहे हे त्याची भरपाई आपणाला करणेबाबत न्यायालय आदेश करू शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Eknath Bankar.
30-01-2021
er.bankar@gmail.com

वारस नोंदीसाठी किती दिवसांचा कालावधी आहे?
वारस नोंदीसाठी जास्तीत जास्त ३ महिने कालावधी आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,गावा जवळ आमची 62 गुंठे जमीन आहे ,परंतु आम्ही ज्या जागेवर राहतो ,तिथे आमचे एक घर असून बाकी जागा मोकळी आहे ,त्या जागेचा 62 गुंठे चा 7/12 आमच्या कडे आहे ,पण आम्ही राहतो त्या जागेचा 7/12 नकाशा हद्द दुसरीकडे आहे ,अन आमची जागा नकाशावर जिथे आहे ,तिथे दुसऱ्यांनी घर बांधली आहेत ,म्हणजे आम्ही त्यांच्या जागेवर अन ते आमच्या जागेवर राहतात,पण त्यांनी घर बांधली आहेत ,अन ते आता आमची जागा मागतात ,कारण आम्ही जिथे राहतो तिथला 7/12 नकाशा त्यांचा आहे ,तर आम्ही जिथे राहतो ती जागा अधिकृत करण्यासाठी ,अन तिथलाच नकाशा येण्यासाठी काय करावे ,कृपया मार्गदर्शन करावे
असा प्रश्न परस्पर सामंजस्याने सुटू शकतो. नाहीतर आपण ज्या जागेवर राहता त्याला वीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला असेल तर आपण न्यायालयामध्ये आपल्याला भागामध्ये मालकीहक्क जाहीर करण्यासाठी दावा दाखल करू शकता.
अथवा एकमेकाच्या जमिनीची अदलाबदल करणे आहे त्यावर एक उपाय असू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी यांनी आदेशित केले आहे परंतु जमिनीचा क्षेत्र लिहिताना चूक झाली आहे व जास्त क्षेत्राचा ताबा घेण्यात आला आहे. असे उपलब्ध रेकार्ड वरून दिसून येत आहे. तरी हि चूक कशी व कोणी दुरुस्त करावी या बाबत माहिती मिळावी हि विनंती.
उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यास सांगा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर अजोबांच्या नावावर देवस्तान इनाम जमीन आहे तय जमीनीच्या उतारावर कुळ म्हणून अजोबांचे नाव आहे।आजोबा जीवंत आहे वारसंचि नावे लावत यतील का
जरी मिळकत देवस्थान असली तरी इतर हक्कात आपल्या वडिलांचे नाव कूळ म्हणून आहे. कुळाच्या नावे देवस्थान जमिनीची विक्री किंमत निश्चित होत नाही म्हणजे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 असा कुळ या मिळकतीचा मालक होऊ शकत नाही. मात्र कुळवहिवाट ही वारसाने हस्तांतरित होत असल्याने( कलम 40) इतर हक्कांमध्ये त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या वारसांची नावे लागतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्‍कार
माझे वडीलाने एक प्‍लॉट खरेदी केलेला आहे.गट नं.२२ व २८ या दोन्‍ही चा लेआउट व अकृषिक परवानगी एकच आहे. दोन्‍ही गटात ि‍मिळून प्‍लॉटींग नं. ०१ ते ५० असे केले आहेत. ०१ ते २६ क्रमांकाचे प्‍लॉट गट नं.२२ मध्‍ये आहेत व प्‍लॉट क्रं.२७ ते ५०दुस-या गटात आहेत. प्‍लॉट क्रं.२९ हा गट नं.२८ मध्‍ये आहे परंतू रजिस्‍ट्री करताना सदर प्‍लॉट गट नं.२२ असा नोंदणी झाला आहे. खरेदी करुन सोळा वर्षोपेक्षा जास्‍त कालावधी झाला आहे त्‍यामुळे लिहून देणार आज रोजी रजिस्‍ट्री दुरुस्‍ती साठी येत नाहीत त्‍यामुळे ि‍लिहून देणा-या शिवाय दुरुस्‍ती करण्‍यासाठी दुसरा कांही पर्याय आहे का
मिळकतीचे वर्णन पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे ही चूक झाली सोळा वर्षापुर्वी दस्त नोंदणी झाल्याझाल्या जरी लक्षात आली असती तरी त्याची दुरुस्ती खत करणे थोडे कठीण होते. जर त्या दस्ता मध्ये आपण चतुर्सिमा लिहिले असत्या व त्या चतुर्सिमा या प्लॉट नंबर 29 च्या अनुषंगाने नमूद केलेले असतील व प्लॉट नंबर 22 प्लॉट नंबर 29 याची एकूण क्षेत्र सारखेच असेल तर दुरुस्ती दस्त होण्यास हरकत नसावी. तथापि ही चूक लक्षात येण्यास तब्बल सोळा वर्ष का लागले याचे कारण काय सांगणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच दुरुस्ती खत करण्यास जर मूळ विकणारा व्यक्ती येत नसेल तर त्याला दुरुस्ती असे संबोधता येणार नाही.यामध्ये काही करता येईल असे मला वाटत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की , वडील वडीलोपार्जित जमीन आपल्या आपत्यांपैकी कोणत्याही एका आपत्याला विक्री करू शकतात काय ?
वडिलोपार्जित जमीन मध्ये मुलांचा नातू चा तसेच मुलींचा हक्क असतो. त्यामुळे केवळ एका मुलाच्या नावे वडिलोपार्जित जमीन वडिलांना करता येत नाही. समजा एका व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून पाच एकर जमीन प्राप्त झालेली आहे. आणि या पाच एकर जमिनीचे तो विल्हेवाट लावू इच्छित आहे. तर तो सर्व पाच एकर जमीन केवळ एकाच मुलाचे नावे करू शकत नाही. समजा या व्यक्तीला दोन मुले आणि दोन मुलगी आहेत. तर या जमिनीचे वाटप प्रत्येक मुलाला व मुलीला एक एकर कोणत्या व्यक्तीला स्वतःला एक एकर असा त्या मिळकतीवर हक्क असतो. या चारा प त्यापैकी केवळ एकाच मुलाचे नावे वडील मिळकत करू इच्छित असतील, तर त्या मुलाच्या वाट्याला येणारे केवळ एक एकर क्षेत्र हे त्याच्या नावे करू शकतील. संपूर्ण पाच एकर क्षेत्र एकाच मुलाच्या नावे होणार नाही. याउपरही त्याने सर्व पाच एकर क्षेत्र एकाच मुलाचे नावे केले, आणि इतर तीन व्यक्तींनी त्यास हरकत घेतली, तर अशाप्रकारे या दस्त द्वारे एकाच व्यक्तीच्या नावे मिळकत केली आहे तो दस्त रद्दबादल होऊ शकतो. व पर्यायाने हा व्यवहार ही रद्द होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझे आजोबा 50-55 वर्षा पूर्वी वारले
त्यांच्या नावे 7-8 एकर जमीन होती त्यांनी ती ते हयात असतानेच विकली आहे त्यांना 4 मुले व 3 मुली होत्या त्यापैकी अत्ता फक्त 2 मुले हयातीत आहे माझे वडील व चुलते
यांच्या पैकी कोणाच्याही नावे जमीन नाही

आता मला शेत जमीन घ्यायची आहे तर त्यासाठी मी शेतकरी असल्याचा पुरावा कसा द्यावा

अत्ता आमच्या गावात आमचे आजोबा व त्यांचे चुलत भाऊ यांच्या नवे 1 गुंठाचा उतारा दिसत आहे

त्याला अनुसरून काही करता येईल का व कसे

सदर उतारा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आहे

व मी लहानपणा पासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राहत आहे

ज्ञानेश्वर माणिक भांगे
9730101910
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 , कलम 63 व्यक्ती शेतकरी असल्याशिवाय त्याला शेत जमीन खरेदी करता येत नाही. या कायद्याच्या कलम दोन अन्वय शेतकरी म्हणजे जी व्यक्ती जमीन स्वतः कसते . जमीन स्वतः करणे म्हणजे स्वतःच्या देखरेखीखाली कुटुंबातील सदस्यांनी जमीन कसणे किंवा रोग पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात मोबदला देऊन नोकराच्या मदतीने जमीन कसणे.
या दोन व्याख्यांचा विचार केला तर आपण शेतकरी या व्याख्येत बसू शकतात. तसेच मिळकत ही आपले आजोबा व चुलत भावाच्या नावाने आहे. व त्याचे वाटप झाले नसल्याने आपण एकत्र कुटुंबात आहात व त्या व्याख्येत आपण बसत आहात. त्यामुळे कुळवहिवाट कायद्याच्या व्याख्येप्रमाणे आपण शेतकरी आहात. परंतु कुळवहिवाट कायद्यांतर्गत अभिप्रेत असलेली जमीन म्हणजे शेत जमीन. जमीन एकत्रित एक गुंठा आहे, तिचे सध्याचे स्थान कुठे आहे? ती जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत मानीव बिनशेती म्हणून झाल्याचे आदेश तहसीलदार यांनी काढलेले आहेत का? याची पडताळणी करा. अथवा त्या जमिनीचे परवानगी घेऊन त्यावर बांधकाम झालेले आहे का याची खात्री करा? जर अशी वस्तुस्थिती नसेल तर आपणाला शेतकरी दाखला मिळू शकतो. व त्या दाखल्याच्या आधारे आपण शेतजमीन खरेदी करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर डिजिटल सातबारा वर नाव येत नाहीत dsc मधून सातबारा निघते पण डिजिटल सातबारा वारनाव येत नाही. कृपया उपाय सांगणे .

Question by Prashant
27-01-2021
pmadasnal@yahoo.com

Sir, our housing society has received notice from talathi office about pending dues under "maharashtra jamin mahsool". How to pay it online and which challan # to use?
GRAS- हि आज्ञावली आहे . या द्वारे भर

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
खेडे गावातील सुशिक्षित बेरोजगार भूमीहीन व्यक्ती ला जर काही व्यवसाय उद्योग चालू करायचा असल्यास त्याला ग्रामपंचायत गावठाण किंवा शासन ताब्यातली पडीक वन जमीन भाडे करार तत्वावर किंवा इतर काही मार्गाने उद्योग करायला जमीन भेटू शकते का किंवा शासनाची काही योजना आहे का भूमीहीन व्यक्ती ला उद्योग उभा करण्यासाठी
कृपया माहिती कडवावी
धन्यवाद
महाराष्ट्र जमीन महसूल( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 चे नियम 26 अन्वये उद्योग चालू करण्यासाठी शासकीय जमीन देण्याबाबतची तरतूद आहे. याबाबत अंतिम अधिकार हे राज्य शासनाचे आहेत. आपणाला जमीन मागणीसाठी चा अर्ज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा लागेल. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रकरणाची चौकशी करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनाकडे म्हणजे महसूल व वन विभाग कडे सादर केला जातो. अंतिम मंजुरी महसूल व वन विभागाकडून दिली जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3