जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by निलेश भेलके
26-11-2020
bhelke1987@rediffmail.com
आदरणीय सर,
माझ्या आईच्या भावांनी बहिणी नाहीत असे जमिनीचा पंचनामा करताना सांगितलं होता, आणि माझ्या आईने अपील करून जमिनी मध्ये नाव टाकून घेतली, मला जाणून घ्यायचा होता ५ भाव आणि ३ बहिणीची जमिनी मध्ये नाव असताना भाव आपला स्वतःचा वाट्याची जमिनी विकू शकतो का? आणि जर विकला असेल तर पुढे बहिणींना काय करायला पाहिजे?
वडिलोपार्जित मिळकत तीमधील आपला हिस्सा विकत घेण्यापूर्वी, इतर वारसांना तो खरेदी करण्याचा प्राधान्यक्रम हिंदू वारसा कायद्यामध्ये आहे. त्यामुळे जमीन विक्री यापूर्वी आपणाशी जमीन खरेदी करणे बाबत मामाने संवाद साधणे आवश्यक .मात्र जर जमिनीच्या विक्री किमतीबाबत आपणाकडून कमी किंमत देऊन केल्यास ती इतरांना विकण्याचा आपले मामा साहेबांना पूर्ण अधिकार आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हर्षल पोळ
25-11-2020
harshalpol1998@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की आमची काही वर्ष पूर्वी 3.70 एकर जमीन पुनर्वसणात गेली आहे आता ती आम्ही विकत घेऊ शकतो का त्याच्यासाती के पर्यय आहे सांगावे
Question by Ramesh Deokar
25-11-2020
deokar09ramesh@gmail.com
Hi Sir/Madam,
1977 sali manjur zalela road ha aamchya malki hakk aslelya jaminitun jatoy. Ata tya road ch rundikaran hotay. Tyachya mobadalyachi vicharpus keli asata amhala asa sangitl gelay ki 1977 sali jaminiche danpatr kele asalyakaranane tumhala mobadala milanar nahi. Sambhandhit vishayi amhi kuthalehi danpatr kelele nahi. Tari road rundikaranat janarya jaminicha mobadala milnyasathi kay karave lagel.
Question by Vicky
24-11-2020
Nadkarvicky@gmail.com
सर आमचा सर्वे न. 60 आहे पन त्याचा 7/12 नाही आहे तर आमच्या गावच्या हदीत दोन 60 सर्वे न आहेत तर 1 हा उडापा न आहे पन जो आमच सर्वे न 60 आहे तो सर्वे न 59 च्या पोटात आहे तर आम्हाला आमचा 7/12 कसा भेटेल
Question by Vikram Dupade
23-11-2020
vikramdupade8421@gmail.com
नमस्कार सर, आमची ३ एकर शेती वडिलांच्या नावावर आहे. वडील दारू पित असल्यामुळं आम्हाला न माहीत होताच परस्पर जमीन विकतात तर मी त्यांचा मुलगा म्हणून कायद्यानुसार त्यांना जमीन विकण्यासाठी थांबवू शकतो का??? ज्यावेळी वडील जमीन विकण्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करतील तेंव्हा त्या जमीन विक्री साठी माझी संमती भेटल्याशिवाय जमीन विकली जाणार नाही, असे काही मला करता येईल का????
Question by Rakesh P
23-11-2020
suvi.shivshankargs@gmail.com
वडिलोपार्जित घराची वडील स्वर्गवासी झ्हाल्यावर त्यांच्या मुलांच्या नावावर घरपट्टी सामान "अ" आणि "ब" विभागणी केली. परंतु मोठ्याभावाने घरातील जागा अर्धी देण्यास नकार दिला. या प्रकरणी काय कारवाही करावी? ग्रामसेवक/ ग्रामपंचायत यांचेकडे अर्ज देऊन घरातील अर्धा हिस्सा मागू शकतो का?
Question by विश्वनाथ गोरख आढाव
23-11-2020
vgadhav80@gmail.com
माझ्या वडीलांनी 1988 रोजी माझ्या आईच्या नावावर जमीन विकत घेतली होती पण माझ्या पुतण्याने माझ्या अशिक्षित आईशी विश्वासघात करून ती जमीन बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत आहे. ते कर्ज आता वितरित होणारं आहे तर मी ते कर्ज वितरित करण्यापासून कसं रोखू ?
Question by Pravin Ramakant Shinde
22-11-2020
ps9469@gmail.com
नमस्कार ,
मी 1988 साली रीतसर खरेदीखत करून 1500 चौरस फूट रिकामा प्लॉट खरेदी केला रेजिस्ट्री ची प्रत माज्याकडे आहे , परंतु महसूल दप्तरी याची वर्दी द्यावी लागते हे मला माहित नसल्यामुळे त्याच्या 7/12 वर फेर घेण्यात आला नाही आता 33 वर्षनी याचा फेर घेण्यासाठी काय करावे लागेल ,व शासननियमनुसार याला किती विलंब शुल्क लागेल कृपया माला मार्गदर्शन करून उपकृत करावे
Question by संकेत धिंडले
22-11-2020
sanketdhindale52@gmail.com
सर माझ्या जमिनीमध्ये 1952सली जंगल वहिवाट द्वारे काही इसामांच नावे दाखल झाली आहेत 70% क्षेत्रावर पण त्यांनी ते क्षेत्र 5 वर्षाच्या आत विकले आहे.तरीही माझ्या वशाजांची नावे त्यांच्या क्षेत्रापैकी 40% हिष्यावर चालू सात बऱ्यावर 7/12 दाखवत आहेत. जंगल वहिवाट मध्ये त्याची नावे ही चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहेत. कारण क्षेत्र बुकला माझ्या वंशजांची नावे असतानाही त्याची नावे दाखल करण्यात आली आहेत तरी त्याची नावे कमी करण्यासाठी काय करावे
यावर सर आपण मार्गदर्शन करावे,ही आपणास विनंती.
आपला विश्वासू
संकेत धिंडले
Question by मनोज टेकाळे
20-11-2020
bsfmanoj31@gmail.com
नमस्कार सर,
शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, सदर प्रकरणात दोषी व महसुली कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांनी संगणमत केली आहे, मुख्यमंत्री कार्यालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे असा आदेश दिला असुन, तहसीलदार काहीच कारवाई करत नाही,
वरील विषयास अनुसरून माझा प्रश्न हा आहे की, बनावट कागदपत्र लावुन शेती हडप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे यासंबंधी तक्रार दाखल कुठे करावी
Question by Sumit Dhak
20-11-2020
caetdhak@gmail.com
1931 ते 1949 पर्यंत स्वतः कूळ म्हणून आजोबांचे नाव होते. आजोबांना 5 मुल होती, परंतु 1954 ला 2 नंबर च्या मुलाने त्यांच्या वडिलांचे नाव कमी करून व 1962 ला 32 ग केले आहे. जे उरलेले 4 भाऊ व त्यांची मुले आहेत यांना हक्क भेटू शकतो की नाही....
Question by devendra
20-11-2020
aaryatandel82@gmail.com
सर
माझा प्रश्न आहे, जमिनीस मालक व त्याची 5 मुल सामाईक मालक आहेत एक मुलगा लष्करात होतं त्या जमीन माझे आजोबांचे भाऊ हे संरक्षित कुळ होते तोंडी करार 90 रुपये खंड आहे त्याची नोंद 1931-32 च्या सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद आहे. परंतु 1956 रोजी झालेल्या फेरफार त्यांना सामान्य कुळ म्हणून फेरफार झाला आहे कुळकायद्यानुसार कृषकदिनानुसार संरक्षित कुळ हे मालक झाले आहे. परंतु मालकाचा एक मुलगा सैन्यात असल्याने जमिनीची विक्री कुळकायद्याने झालीं नाही. 1961 सली मालक मयत झाले व मालकाच्या मुलांनी तहसीलदारांकडे अर्ज करून कुळ वहिवाट रद्द केली. सदर ALT केस तहसील कार्यालयात सापडत नाही. मालकाने सदर जमीन न कसता 3 महिन्यांनी 1961 सालि दुसऱ्या वक्तीस विकली. तर कुळ या नात्याने आज मी कुळकायदा कलम 37 नुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतो का
Question by Nitin Mulik
19-11-2020
nitinmulik1963@gmail.com
My Grandfather sold a huge piece of Farm Land which was gifted to him by the Government, on British Government's Order. My question is Can a Gifted piece of Farm Land be sold by the same person to whom that Farm land was gifted? No Royalty was paid when my Grandfather sold that Land. Second question is that me as a ancestor Can I file a complaint against the present owner of that Farm Land & Government.
The land which has been granted by the government either before independence or post-independence, cannot be parted away ओर alienated or transferred without the permission of the government of the day. check whether such permission was granted for such a transfer.
You can make a representation once you verify that permission for the transfer of such land was not obtained. the government may in/collector initiate enquiry.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sangram
19-11-2020
sangramskbhai1@gmail.com
नमस्कार सर जर सन _१९९९ ला दिवाणी न्यायालयात एकत्र कुटुंबातील वाटप पत्र झाले आसेल .व तो दावा तडजोड निकाली दिला आसेल .पण त्या वाटप पत्रा त वडिलांनी फक्त मुलांना हिस्सा दिला आसेल तर त्या मुलांबरोबर मुलींना हिस्सा मिळू शकतो का. हुकुम नाम्यात मुलीची नावे आहेत पण त्याची लग्न होऊन ते सासरी नांदत आहे असा उल्लेख आहे. पण तडजोड हुकुम न्याम्यात फक्त मुलांना जमीन वाटून दिली आहे. व वडील व मुलांना तो दावा मान्य व कबुल आहे. आता त्या कोर्ट हुकुम नाम्यास आव्हान देता येईल का १९९९ साली हक्क सोड कायदा होता का .. व मुलींना हिस्सा मिळू शकेल का वडील हयात नाहीत
तडजोड हुकूमनामा होऊन तब्बल 22 ते 23 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. त्यामुळे त्याला मुदतीच्या कायद्याची बाधा येऊ शकते. जी तडजोड झालेली आहे त्याच्यामध्ये मुलींनी स्वाक्षरी केलेले आहेत का याची खात्री करा. जर या तडजोड पत्रास मुलींची संमती नसेल, तर तडजोड नामा व त्याआधारे काढण्यात आलेली डिक्री, आपण अवहाणीत करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीरंग किसन तुरारे
19-11-2020
turareshrirang@gmail.com
जागा खरेदी दस्तऐवज सादर न करता ग्रामपंचायत रेकॉर्ड ला केलेली मालमत्ता नोंद बेकायदेशीर आहे काय? बेकायदेशीर असल्यास नोंद रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज कोणाकडे सादर करावा.
Question by श्रीरंग किसन तुरारे
19-11-2020
st9823454709@gmail.com
आदरणीय सरजी, नमस्कार ग्रामपंचायत क्षेत्रातील एका व्यक्तीने दुसर्या कडून घराची जागा खरेदी करून सोबत लागून असलेल्या आमच्या जागेवर अतिक्रमण केले आणि त्यासंदर्भात विचारले असता अरेरावी व धमकी देतात. मी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे ग्रामपंचायत कडून माहिती काढली असता सदर व्यकतीने जागा खरेदी संदर्भात कोणतीही दस्तऐवज ग्रामपंचायतीकडे दिलेली नाही. असी लेखी माहिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कडे खरेदीचे दस्तऐवज नसताना ग्रा. पं. रेकॉर्ड ला जागेची नोंद घेतली आहे. आता आम्हाला आमच्या अतिक्रमण केलेल्या जागेत व्हालकंपाउंड करायचे आहे. त्यासाठी पुढे काय व कोणती कार्यवाही करावी. यासंबंधी मार्गदर्शन करावे, ही विनंती.
Question by यशवंत भिकनराव मोरे
19-11-2020
yashawantmore@gmail.com
मी, यशवंत भिकनराव मोरे भोरस बु., ता.चाळीसगाव जि.जळगांव येथे अकृषिक भूखंड भूमापन क्र. व उपविभाग 76/83 असून त्याचा मागिल महिन्यात 7/12 उतारा घेतला असता त्यावर रस्त्यासाठी भूसंपादन करुन फ्रिज करण्यात आला आहे. परंतू याबाबत मला नोटीस किंवा त्याचा मोबदला देखिल मिळालेला नाही. कृपया मार्गदर्शन व्हावे. माझा मोबाईल क्र. 9029683711 आहे.
Question by Rupesh yashwant wadave
19-11-2020
Rupeshwadave123@gmail.com
Sir, mazya nave v kutumbatil konachyahi nave 7/12 nahi. Mi fisharman aahe Mala mazyach gavat 14 gunthe jamin kharedi karaychi aahe tar tyasathi ky karav lagel
महाराष्ट्रामध्ये कोणतीही व्यक्ती शेतकरी असल्याशिवाय त्याला शेत जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. नाही मात्र जर आपणाला शेत जमीन निवासी औद्योगिक किंवा वाणिज्य वापरासाठी आवश्यक असेल व जी जमीन खरेदी करावयाची आहे ती जमीन जर उपरोक्त जमीन वापर विभागांमध्ये प्रादेशिक योजनेनुसार समाविष्ट असेल तर परवानगीची आवश्यकता भासत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by saurabh kulkarni
17-11-2020
kul.saurabh15@gmail.com
मस्कार सर , 7/12 वरती इतर हक्कात सक्षमप्राधिकरणाच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरणस बंधी -इनाम व वतन जमिनी
*नविन अविभाज्य शर्थ*
नविन अविभाज्य व तब्दील न करनेचे शर्तिवर (1) असा शेरा आहे. तरी आम्हाला घरातच खते वाटप करायच आहे काय करव लागेल.
[(3)
2[(a)] On or after the commencement of the Bombay Paragana and Kulkarni Watans
(Abolition), the Bombay Service Inams (Useful to Community) Abolition, the Bombay
Merged Territories Miscellaneous Alienations Abolition, the Bombay Inferior Village
Watans Abolition and Maharashtra Revenue Patels (Abolition of Office) (Amendment)
Act, 2000 (hereinafter, in this section, referred to as “the commencement date”),
1. Sub-section (3) was substituted by Mah. 21 of 2002, s. 7.
2. Sub-section (3) was re-numbered as clause (a) thereof by Mah. 19 of 2008, s. 7.
Regrant of
watan land
to watandar.
Mah.
XXI
of
2002.
जर आपला इनाम उपरोक्त इनाम वा पैकी असेल तर आपणास हस्तांतरणाच्या परवानगीची गरज नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिल लक्ष्मणराव लाभे
17-11-2020
labheal@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या पणजोबाची 15 एकर शेती आहे त्यावर काम करायला गडी माणस ठेवली होती 1997 साली सदर शेतीच्या 7/12 वर गडी माणसांना वहिवाट दार दाखवून पटवारी साहेबाने तहसीलदार साहेबांच्या पत्र क्र दाखवून गडी माणसांना भोगवटा दार चा फेरफार केला आहे परंतु 7/12 वर मृदुसनधारण योजने अंतर्गत केलेल्या कामाची दुरुस्ती असे दाखविले आहे सदर शेती ही wcl ला हस्तांतरीत झाली असून त्याचा मोबदला व नोकरी चा फायदा गडी माणसं ना देण्यात आला आहे सादर शेती ही भोगवटा वर्ग 1 ची आहे आम्ही काय करावे म्हणजे आम्हाला आमच्या पणजोबांच्या शेती चा मोबदला मिळेल
Question by दुर्गाप्रसाद रामकिसन यादव
16-11-2020
durgaprasadyadao@gmail.com
वारस नोंद साठी सर्व कागदपत्रे दिली तलाठी यांनी 15 दिवसांची नोटीस कादून फेरफार घेतली कोणीही हरकत घेतली नाही तरीही मंडळ अधिकारी यांनी वारसा पंजी सह ठेवा तूर्त फेरफार नामंजूर असा शेरा दिला व फेरफार नामंजूर केली आज जवळपास 40 दिवसांचा कालावधी झाला कोणतीही कार्यवाही नाही काय करावे
पटवारी साहेब यांना जी लोक काम करतात त्यांना वहिवाटदार दाखवण्याचा अधिकार नाही. सातबारा वरती या लोकांची नावे ज्या फेरफारनि लागलेले आहेत तो फेरफार कृपया तपासून पहा व त्यावर चा तपशील /मसुदा वाचून आपणाला याबाबतची कल्पना येईल की या व्यक्तींची नावे सातबारा सदरी कशी लागलेली आहे.
या व्यक्तींची नावे प्रथम कुल म्हणून मेहरबान तहसीलदार साहेब यांनी लावलेली असावी नंतर त्यांच्या लाभात कुल कायद्याअंतर्गत विक्री किंमत निश्चित होऊ ते या जमिनीचे भोगवटादार झालेले असतील. आपण संबंधित फेरफार पहा आपल्या लक्षात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramesh Rokade
16-11-2020
amitrokade03@gmail.com
नमस्कार सर, माझी वडिलोपार्जित जमीन नवीन अविभाज्य शर्तीची जमीन होती 30गुंठे माझ्या वडील आणि चुलता यांच्या नावाने आणि 30 गुंठे 7/12 वर नोंद आजोबांच्या प्रयत्नातून झाली नाही परंतु ही संलग्न 60 गुंठे जमीन आमच्या ताब्यात वाहिवाटात होती.त्यातील 29 गुंठे जमीन वडील यांनी विकली परंतु 10 वर्ष होऊन ही 7/12 वर नवीन मालकाचे नाव आले नाही. जमीन विकल्यानंतर शेजारील जमीन मालकाने सदर आमचा झालेला व्यवहार अमान्य करण्यास केस दाखल केली. निकालाअंतर्गत असे झाले की 30 गुंठे जमीन सरकार जमा झाली आणि 30 गुंठे मधी माझ्या वडील व चुलता यांच्या नावावर आळे केले आहे तर सरकार जमा झालेली जमीन परत मिळवता येईल का ? त्यासाठी काय करावं लागेल?
जमीन कोणत्या कारणासाठी सरकारी जमीन झालेली आहे? आहे तसेच अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे ही जमीन शासनाने प्रदान केलेली आहे व शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अथवा सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सदरची जमीन विकल्याने ती कदाचित शासन जमा झालेली आहे. आपण ज्या केसचा संदर्भ यामध्ये दिलेला आहे त्या केसचा निकाल पत्रामध्ये जमीन सरकार जमा होण्याबाबत ची कारणमीमांसा दिलेली असेल. ही कारणमीमांसा वाचून घ्या. तसेच हा निकाल लागून किती दिवस झाले? जर जादा दिवस झालेले असतील तर विलंब माफीचा ही प्रश्न उद्भवेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by S K Patil
16-11-2020
skpatil130985@gmail.com
सह हिस्सेदार आपल्या हिश्श्याची जमीन विक्री करू शकतो का? ७/१२ मध्ये सामाईक क्षेत्र आहे. एकूण ५ सख्खे भावंडे आहेत (३ भाऊ आणि २ बहिणी). यातील २ भाऊ त्यांच्या हिश्श्याची (१/५ प्रत्येकी) जमीन विकु इच्छितात, तर अशी विक्री शक्य आहे का? कृपया माहिती द्यावी.
जर आपल्या प्रश्नात नमूद मिळकत ही आपल्याला वडलोपार्जित मिळालेली असेल तर हिंदू वारसा कायदा 1956 च्या तरतुदीनुसार इतर सह धारकांना जमीन खरेदी करण्याचा प्राधान्यक्रम असतो. आपण इतर सहज धारकांना ते जमीन खरेदी करू इच्छितात का याबाबत लेखी विचारना करा व त्यांची लेखी उत्तर प्राप्त झाल्यावर त्यानुसार जर त्यांनी जमीन खरेदी करण्याची इच्छा जर नसेल तर आपण अन्य त्रयस्थ व्यक्ती नाही जमीन विकू शकता. जर आपल्या सहज धारकांची जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आपणाला अपेक्षित असलेली किंमत देण्यास तयार असतील तर आपण त्यांना जमीन विक्री करू शकता. जर आपणाला अपेक्षित असलेली विक्री किंमत मिळत नसेल तर त्याबाबत आपण त्यांना अशा प्रकारची नोटीस देऊन त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nitin Desai
16-11-2020
nitin.cdesai7673@gmail.com
1.सर कोर्ट वाटप दरखास्त मधून वाटपा साठी प्रकरण जिल्हा अधीकारी कार्यलया कडे पाठविणेत आले आहे सदर प्रकरण भूमी अभिलेख कडे आले असून त्यानुसार मोजणी फी भरले आहे . परंतु आद्यप मोजणी झाली नाही, तरी न्यायालयातून जिल्हाधिकारी याना समरणपत्र काढू शकतो का..? 2.मोजणी करते वेळी 2 गटा मध्ये तुकडेबंदी कायद्याचा भंग होत आहे 18 गुंठे मध्ये 3 हिस्से करता येतील का ..?
जर तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असेल तर अशा जमिनीचे सर असणारच वाटप केले जात नाही. सातबारा वरती जेवढे सह धारक आहेत त्यापैकी काही लोकांना तुकडा न पाडता जमिनीचे वाटप केले जाते तर काही सह धारकांना त्याबदल्यात, ज्यांना जमीन मिळत आहे त्यांचेकडून जमिनीचे मूल्य दिले जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिलीप परसने
15-11-2020
dilipparsane@gmail.com
सर, आमच्या परिसरातील एफ-क्लासचा न.प. हद्दीतील 40 आर भूखंड ठरावाने न.प.द्वारा आमच्या संस्थेस देण्यात आला आहे. सदर भूखंडात अर्ध्या भूखंडावर (20आर) खाजगी शाळेचे तार-कुंपणाचे अतिक्रमण आहे, तर उरलेल्या भूखंडापैकी जवळपास 10आर जमिनीवर एका समाजाने अनधिक्रुतपणे मंदीर रुपाने अतिक्रमण केले आहे. सदर पूर्ण 40आर भूखंड ठराव झालेल्या आमच्या संस्थेस पूर्णपणे मिळेल का? शाळेचे व अनधिक्रुत मंदीराचे अतिक्रमण कशा पद्धतीने हटवावे? सर्व 40आर भूखंड विविध विकास कामांसाठी व परिसरातील लोकांच्या उपयोगासाठी आमच्या संस्थेला पूर्णपणे मिळवता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? क्रुपया मार्गदर्शन करावे...
वास्तविक जमीन नगरपालिकेने आपल्याला ठरावाने दिल्यानंतर जमीनीचा ताबा घेण्यापूर्वी आपण त्यावर जे काही अतिक्रमण होते ते अतिक्रमण नगरपालिकेकडून काढून घेणे आवश्यक होते. मात्र नगरपालिकेत जमिनीचा ताबा आपल्याला दिल्यानंतर, त्यावर अतिक्रमण झालेले असेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची जबाबदारी आपली आहे.
त्यासाठी कायदेशीर मदत घेऊन, ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना नोटीस देण्यात यावी. व जर नोटीस देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करणे संयुक्तिक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
