जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by उमेश जावलीकर
14-11-2020
ujawalikar@gmail.com
नमस्कार,
आमच्या वडिलोपार्जित घरात ,खोल्यांचं असमान वाटप झालं आहे.तहसीलदार यांना सांगून समान वाटपाचे आदेश घेता येतील काय ? किंवा इतर कायदेशीर मार्ग काय आहेत?
मेहरबान तसीलदार महोदय यांचेकडून जमिनीचे वाटप कलम 85 अन्वये करण्यात येते. घराचे वाटप असमान पद्धतीने झाले असेल तर आपणाला दिवाणी न्यायालयात जाणे खूपच संयुक्तिक.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश जावलीकर
14-11-2020
ujawalikar@gmail.com
नमस्कार,
कुलमुखत्यार पत्राने एका व्यक्तीने जमीन विकली ,त्या काळात मूळ मालकाचा मृत्यू झाला .त्यानंतर
१)जमिनीचा मोबदला कुठल्या पद्धतीने वारसांना मिळेल?
२)कुलामुख्यत्यार घेतलेली व्यक्ती पैसे देत नसेल तर काय करावे?
३)हे बेकायदेशीर असेल तर त्याच्यावर काय कारवाई होईल?
३)मूळ मालक मेल्यानंतर उरलेल्या जमिनी ची विक्री निरंतर कुलामुख्ट्यार द्वारे कुलामुख त्यार करू शकतो का ?
आपणाला फौजदारी कारवाई कुल्मुख्त्यारी विरुद्ध करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक पाटील
14-11-2020
vspatil.amit@gmail.com
माझ्या आजोबांनी २० गुंठा जमीन विकत घेतली. त्यांना एकूण पाच वारसदार आहेत. एका मुलाने त्यांच्याकडून १ गुंठा जमीन २००० मध्ये खरेदीखत करून घेतली आहे. २००३ मध्ये आजोबा मयत झाले. सध्या वाटणी करून घेताना आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे. आता आम्ही तो एक गुंठा सोडून वाटणी करावी लागेल का? याबाबत मार्गदर्शन करावे?
Question by मनोहर नारायण दोरुगडे
12-11-2020
manohardorugade@gmail.com
सर माझ्या वडिलांकडे 1 देवस्थान इनाम जमीन आहे त्यामध्ये आम्ही घर बांधू शकतो का?
देवस्थान जमीन ही देवस्थानाला दिलेली असते . वहिवाटदार हा केवळ अशी जमीन देवस्थान विश्वस्तांच्या परवानगीने कशात असतो. त्याला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. वाहिवातदार हा काही भाडेपट्टा धारक किंवा कुल नाही . त्यामुळे अश्या वाहिवात्दाराला कोणतेही अधिकार नाहीत .
जर देवस्थान विश्वस्तांनी आपणाला त्या मिळकतीवर घर बांधण्याची परवानगी दिली तर अन्य परवानगी( बांधकाम, इत्यादी ) घेऊ घेऊन आपण घर बांधू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पांडुरंग पंडितराव पाटिल
12-11-2020
Pandurangp804@gmail.com
Res. sir, 1 )आमची जमीन भोगवतदार 2 इनाम 6 ब या सदरातील आहे . म्हणजे महार वतने व देवस्थान वगळून आहे .अशा जमिनींना कृषिक प्रयोजनासाठी खरेदी विक्री परवानगी घेणे आवश्यक असते का ? 2) आमच्या वडिलांनी 1973 मध्ये वरील सदरातील जमीन खरेदी केलेली आहे . ती जमीन मला कृषिक प्रयोजन म्हणून आहे त्याच शर्ती वर विक्री /मोबदला करावयाची आहे . ह्या जमिनीस नजराणा भरावा लागतो का ? असेल तर कोणत्या शासन निर्णयामुळे ..कृपया एवढी माहिती द्या
1[(3)
2[(a)] On or after the commencement of the Bombay Paragana and Kulkarni Watans
(Abolition), the Bombay Service Inams (Useful to Community) Abolition, the Bombay
Merged Territories Miscellaneous Alienations Abolition, the Bombay Inferior Village
Watans Abolition and Maharashtra Revenue Patels (Abolition of Office) (Amendment)
Act, 2000 (hereinafter, in this section, referred to as “the commencement date”),
1. Sub-section (3) was substituted by Mah. 21 of 2002, s. 7.
2. Sub-section (3) was re-numbered as clause (a) thereof by Mah. 19 of 2008, s. 7.
Regrant of
watan land
to watandar.
Mah.
XXI
of
2002.
Regrant of
watan land
to authorised
holder.
the occupancy of the land regranted under sub-section (1) may be transferred by the
occupant for agricultural purpose, and no previous sanction or no objection certificate
from the Collector or any other authority shall be necessary for such transfer. After
such transfer, the land shall be continued to be held by such transferee occupant on
new and impartiable tenure (Occupant Class II), in accordance with the provisions of
the Code : 1[(b) Before the commencement date, if any such occupancy has already, without
previous sanction or no objection certificate from the Collector or any other authority,
been transferred by the occupant, for agricultural purpose, such transfer may be regularised
on the production of registered instruments such as sale deed, gift deed, etc., as a proof
thereof, for such transfer. After such regularisation, the occupancy of such land shall be
held by such transferee occupant on new and impartiable tenure (Occupant Class II), in
accordance with the provisions of the Code :]
Provided that, any such occupancy held on new and impartiable tenure (Occupant
Class II) may, after the commencement date, be converted into old tenure (Occupant
Class I) by the occupant by making payment of fifty per cent. of the amount of the
current market value of such land to the Government and after such conversion, such
land shall be held by the occupant as Occupant Class I, in accordance with the provisions
of the Code :
Provided further that, if on the commencement date, any such occupancy has already,
with the prior permission of the Collector or any other competent authority on payment
of the appropriate amount as Nazarana, been transferred for non-agricultural use, such
transfer of occupancy shall be deemed to have been made under the first proviso and the
land shall be deemed to be held by the occupant as an Occupant Class I, in accordance
with the provisions of the Code with effect from the date of such transfer :
Provided also that, if on the commencement date, any such occupancy has already,
without prior permission of the Collector or any other competent authority and without
payment of the amount equal to fifty per cent of the current market value of such land
as Nazarana, been transferred for non-agricultural use, such transfer may be regularised
on payment of an amount equal to fifty per cent. of the current market value of such
land for non-agricultural use as Nazarana, and an amount equal to fifty per cent. of such
Nazarana as a fine, and on such payment, the occupant shall hold the land as an
Occupant Class I, in accordance with the provisions of the Code.]
6. When any watan land resumed under section 3 is held by an authority .
उपरोक्त इनाम पैकी आपली आपली जमीन इनल असल्यास त्यास परवानगीची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul khamgal
11-11-2020
khamgalrahul86@gmail.com
पूर्वी आणेवारी नूसार वडीलोपार्जित जमीनीचे वाटप झाले परंतू क्षेत्र लिहताना हस्तदोष झाला. हस्तदोष दुरुस्ती चा अधिकार कोणाचा ? आणेवारी कायम राहिल की क्षेत्र? काही कलमे माहित असलेस सांगा?
हस्त दोष म्हणजे लेखन प्रमाद चूक दुरुस्त करण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वते मेहरबान तहसीलदार महोदयांना आहेत. आपण मेहरबान तहसीलदार महोदय यांच्याकडे कलम 155 खाली जी काही दुरुस्ती आपण करू इच्छितात यासाठीचा अर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिपक तांबडे
11-11-2020
dipaktambade88@gmail.com
सर आजोबांच्या मृत्यूनंतर वारस लावताना फेरफार चुकीचा केला आहे व सदर जमीन फक्त एकाच्या नावावर लावली आहे, सदर फेरफार करताना तलाठी कार्यालयातून कोणतीही संबंधित व्यक्तींना नोटीस दिली नाही व सदर फेरफार 155 अंतर्गत दुरुस्त करताना सुद्धा टाळाटाळ करत आहे व हे आधीच्या तलाठ्याने केले आहे असे उत्तर दिले जाते यासाठी काय करता येईल ?
७/१२ सगनिकीकरण या मध्ये झालेल्या अश्या प्रकारच्या चुका तहसीलदार यांनी स्वताहून म ज म अ १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्ती आदेश काढण्याचे आहेत . आपण तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप पतांगे
11-11-2020
sandeep.patange111@gmail.com
सर नमस्कार सर आम्हाला सन 1972 साळी एकसाली प्लॉट वाटप केले आहे . या प्लॉट ची विक्री करता माहिती घेतली तर फॉरेस्ट ऑफिसर बोलतात की याचे निर्वणीकरण झाले नाही निर्वाणी कारण करण्या साठी काय करावे लागेल ,व कुठे अर्ज करू शकतो माहिती मिळेल का
निर्वणीकरण करणे ही प्रक्रिया फार क्लिष्ट स्वरूपाची आहे. भारतीय वन संवर्धन कायदा 19८० भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत निर्वणीकरण करण्याचे आदेश भोपाळ येथून प्ररित केले जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep patange
11-11-2020
sandeep. patange 111@gmail.com
Hii नमस्कार प्रांतिक सरकार हा ७/१२ उताऱ्यावर शेरा आहे हा शेरा रद्द करण्या करिता काय करावे व कोणा कडे अर्ज दाखल करू शकतो माहिती मिळेल का
Question by Prafulla vijay jangale
09-11-2020
prafullajangale80@gmail.com
सर सामाइकातील २८ आर पैकी १४ आर जमीन विकत घेता येईल का परवानगी लागेल का
आपली जमीन ज्या भागात /जिल्ह्यात स्थित आहे त्या जिल्ह्याचे / भागाचे , तुकडे बंदी व तुक्देजोड कायदा अन्वये, जमीन स्वरूप नुसार , म्हणजे ( जिरायत /बागायत या नुसार ) प्रमाण भूत क्षेत्र प्रमाण किती आहे याची पडताळणी करा /माहिती घ्या . जर हे प्रमाण १४ R पेक्षा कमी असेल तर , विक्रीस बाधा नाही . मात्र जर जास्त असेल तर , विक्री दस्त नोंदला जाणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravindra v. yadav
06-11-2020
ravindravyadav1969@gmail.com
sir, my name in property card on lessy now i want . to convert in holder what is its process in city servey please tell me.
From your question, it appears that the government has leased you land, and you are the lessee of the Government's land. The land is situated within the Municipal Council limits or municipal corporation limits.
The government of Maharashtra has issued GRs in respect of a few Municipal Councils, wherein , such lessees have been given an option to convert the land on leasehold rights to freehold rights on payment of conversion charges as prescribed. You may look for whether such type of GR has been issued by GoM in respect of the area where you are holding land on leasehold rights.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रामेश्वर चाथे
06-11-2020
rchathe62@gmail.com
मा सर माझा मोठा भाऊला वारलेला आहे आणि. जमिन सामाईक आहे मला जमिन भावाच्या मुलांना वाटणी करुन द्याची आहे पण माझ्या 7 12 मध्ये इतर हक्कात माझ्या आत्याच नाव आहे व आत्या देवाघरी (वारल्या ) आहे पण आत्याचा मुलगा हक्क मागतोय आत्या च्या मुलाला हक्क घेण्याचा अधिकार आहे
ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल अशोक शिंदे
06-11-2020
vishalashokshinde1@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, आमचे 7/12 वर असे लिहिले आहे की मे.कलेक्टर सो.बहादूर यांचेकडील हु.नं आर डब्ल्यू एस/1606/65दि.18/11/55अन्यवे यांचे परवानगी शिवाय वाटणी,गहाण, अगर तब्बदली न रकमेच्या शर्यतीवर(1591) तर हे कमी करण्यासाठी उपाय सांगा.
ज्या वेळेस अशा प्रकारचा शेरा सातबाराच्या इतर हक्क सदस्य असतो, याचा अर्थ ही जमीन आपणाला शासनाने कब्जे हक्काने दिलेली आहे. त्याच बरोबर ही जमीन आपणाला अविभाज्य सत्ता प्रकाराने दिलेली आहे. या मिळकतीवर आपणाला अमर्याद मालकी हक्क प्राप्त नाही. त्यामुळे हस्तांतरण अथवा गहाण ठेवणे यासाठी आपणाला शासनाची वेळोवेळी परवानगी घ्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by एजाज महमद
05-11-2020
youtour@rediffmail.com
माझ्या आजोबानी त्यांच्या मिळकती मध्ये सर्व मुलांचा उल्लेख केला आणि ७/१२ मध्ये नाव दाखल झाले. त्याच प्रमाणे आजोबा आणि आमचे मामा मार्फत त्यातील काही मिळकती खरेदी देण्यात आले आहेत व काही अजून शिल्लक आहेत. त्यांची वारस नोंद तपासली असता असे आढळले की '' मुली नाही '' असा खोटा तोंडी वारस नोंद झाला आहे. सत्य असे की त्यांना माझ्ने मूळ मालकाला (अजोबा) मुलगी होती, जि माझी आणि माझ्या २ बहिणींची सखी आई होती. ती मयत असून आम्ही तिघे वारस आहोत परंतु आमचे मामा आम्हाला वारस हक्क देण्यास म्हणजे आमचा नाव दाखल करण्यास तयार नाहीत. माझी आई अशीस्क्षित होती म्हणून तिचा शाळेचा दाखला नाही. त्यावेळेस ग्राम पंचायत नव्हती म्हणून जन्म दाखला आणि मृत्यू दाखला नाही. आज आम्ही आमच्या आई वारस असल्याचा सत्य दवा करू इच्छितो. त्या साठी कृपा करून या संदर्भात पूर्ण सहकार्य करावे हीच विनंती.
The Specific Relief Act 1934 च्या कलम 34 अन्वये आपल्या मातोश्री या आजोबांनंतर त्यांच्या वारस आहेत हे जाहीर करून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्याच दाव्यामध्ये आपल्या आईचा/ मातोश्रींचा हिस्सा निश्चित करून मिळावा याप्रमाणे मिळकतीचा ताबा मिळावा असाही दावा करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Bhimrao Latake
02-11-2020
latakesandip01@gmail.com
सन 1976 मधे दगड खाण रॉयल्टीची रक्कम 630677/- रूपये थकीत राहील्याने, 7/12 वर बोजा नोंदविण्यात आला. त्यानंतर 1980 मध्ये सदरची जमीन शासन जमा करून, त्यावर सरकार व आकारीपड अशी नोंद घेण्यात आलेली आहे. परंतु सदर जमिनीचा लिलाव करून विक्री करून, रॉयल्टीची रक्कम अदयाप वसुल केलेली नाही. 2020 मध्ये सदर थकीत रक्कम भरण्यास संबधित कसूरदार तयार आहे. तेंव्हा सदर रक्क्म रूपये 630677/- वर कोणत्या दराने व्याज आकारता येईल. पी.एल.आर प्रमाणे व्याजाची आकारणी करता येईल का? तसेच कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार व्याजाची आकारणी करता येईल? व्याजाच्या रक्कमेला कांही मर्यादा आहेत काय ?
होय आपण याप्रमाणे करू शकता. PLR प्रमाणे रकमेवर व्याज आकारणी करून ती रक्कम भरून त्या वरील बोजा काढू शकता .
जमीन जर सरकारी आकारी पड केली असेल तर , पैसे जमा केल्यावर , त्याच्जे नावावर जमीन करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश मेचकर
02-11-2020
rajeshmechakar69556@gmail.com
आमची २१ जणांची सामुदायिक जमिन आहे,परंतु बँकेने फक्त दोघांचे गहाणखत बनवुन कर्ज दिले व याची नोंद ७/१२ ला केली.इतरांची सहमती नसताना कर्ज मिळते का?
दोघांनी गहाणखत केलेले आहे म्हणजे केवळ दोघांच्याही त्याचे क्षेत्र गहाण ठेवले आहे असा अर्थ कायद्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे आपली जमीन जर आपली कडून गहाणखत केलेले नसेल तर ती घाण ठेवलेली नाही.
आपण चिंतामुक्त राहावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रणित ठाकरे
02-11-2020
pranitthakarep@gmail.com
आम्ही ज्या जागेवर राहतो ती जागा बी अँड सी ची आहे... आम्हाला 50 वर्ष होत आहे तिथे राहून ....रोड च्या साईड ची जमीन म्हणजेच बी अँड सी ची जमीन नावावर होऊ शकते का?
प्रनित राव ठाकरे,
अहो ती रस्त्याच्या बाजूची जागा आहे व ती जर बांधकाम विभागाच्या मालकीची असेल, आपण न्यायालयात गेला तरीही फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit pawar
01-11-2020
amitpawar21@Gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की जमिनीची नोंद करताना चुकीने नावात बदल झाला आहे त्या मुळे जमिन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे लागली आहे तर ती जमिन मुख्य वारसदाराचे नावे करण्यासाठी काय करावे लागेल जर ती व्यक्ती जमिनीवर हक्क सांगत असेल तर पिढी जात वारसाने जमिनीची मालकी कशी मिळवावी
जोपर्यंत आपण जो दस्त केलेला आहे आणि त्यामध्ये चुकीने इतर इसमाचे नाव लागलेला आहे असा जास्त दिवाणी न्यायालयाकडून रद्दबादल केल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही. आपणाला महसूल न्यायालय मध्ये दावा दाखल करून काही फायदा होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर गोरे
01-11-2020
sagargore34@gmail.com
सर ,
वडिलांचे 7 12 सदरी नाव लग्न पूर्वी वाटण्या करून झाल्या आहेत. त्यांचे नाव शिवाजी संभु माळी असे आहे.परंतु त्याचे स्वतः शैक्षणिक कागदपत्रे व इतर शिवाजी संभाजी गोरे या नावाने असून मुलांचे नावे गोरे या आडनाव चे आहेत .7/12 ला शिवाजी संभाजी गोरे असे करायचे आहे जेणेकरून मुलांना सुध्दा पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत . त्या वेळी शाळेत सवलत मिळते मानून अडणावप्रमाणे लावले पण 7 12 सदरी जाती प्रमाणे उल्लेख आहे . काय करावे उपाय सुचवा
कागदोपत्री आपल्या वडिलांचे आडनाव जर गोरे असेल तरीही कागदपत्राच्या आधारे आपण मेहरबान तहसीलदारांना अर्ज केला, तर ते अर्जावर निर्णय घेयू शकतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhushan wadhi mo.8275343431
31-10-2020
bhushanwadhi4@gmail.com
काका अविवाहीत होते त्यांनी मुत्य पत्र पुत्न्याचा नावाने केले आहे व सध्या त्यांना वरून 1 वर्ष झाली मी नोंद करण्यासाठी गेलो असता माझा अत्याचे नाव नोटीस मध्ये टाकले पण सातबारा व फेरफार मध्ये याचे नाव नाही त्याचे मग हे नाव कसे आले मी पटवारी यांना विचारले असता ते कोणी अनहोलकवक्ती चे नाव घेऊन नाव टाकले असे बोलत आहे व माझा काका नी जे मत्यू पत्र बनू न ठेवले ते काय?
भूषण भाऊ आपण घाबरण्याचे काही कारण नाहीये.आपल्या काकांची जर ही स्वकष्टार्जित मिळकत असेल, तर ती मिळकत वृत्तपत्राच्या द्वारे ती कोणाच्याही नावे करू शकतात. आपलेच नाव मिकातीच्या सातबारा सदरी लागणे क्रमप्राप्त आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kale Rajesh Ramdas
31-10-2020
Kalerajesh962@gmail.com
सर माझा असा प्रश्न आहे मी बारा वर्षे पूर्वी प्लॉट घेतला होता चुकीने तलाठी यांच्या कडून फेरफार केला गेला नाही पाहिली रजेष्ट्री माझी आहे. समोरच्या व्यक्तीने आमच्या मांगे तो प्लॉट ए ला विकला ए तो बी ला विकला बी ने तो सी ला विकला. त्यांचे फेरफार झालेले आहे.ते फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल सर प्लीज सर माहिती सांगा.
Who is prior in time , is prior in Law . आपल्या नावे प्रथम जर खरेदीखत असेल तर आपण त्या मिळकतीचे मालक आहात. आपल्या नंतरच्या दस्तनोंदणी द्वारे, त्या इसमाचे नाव सातबारा सदरी दाखल झाले असेल तर आपणाला त्या नोंदी विरुद्ध अपील करावे लागेल.
व दस्त आधारे त्या इसमाचे नाव सातबारा लागलेले नसेल तर केवळ आपणाला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे आणि आपल्या नावाची नोंद करण्याची विनंती करायची आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip
31-10-2020
sandeep.kadam545@gmail.com
Hello sir, My question is if one gat no divided by small river (odha) and on one side there is one farmer and for other side there is another farmer but other side there is already a route(rasta) for all the farmers around 70 years .so still that another farmer can ask for the new route to first farmer? Kindly help on this
The route you are referring to is called Easement Right. An easement right, unless it is necessary, cannot be demanded. The other farmer cannot claim or demand an alternate right of way.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramdas kundlik landge
31-10-2020
ramdaslandge07@gmail.com
सर माझ्या वडिलांच्या आजोबांना दोन पत्नी होत्या त्यातील एका पत्नीला 3 मुले व एकीला एक मुलगा होता संतू नावाचा त्याच्या नावावर त्यांच्या आईकडून वारस हक्काने आलेली जमीन होती त्याला सक्की बहीण नव्हती, तो एकटाच होता तसेच संतू याच्या पत्नी फसाबाई ह्या वारस होत्या व फसाबाई यांना सुद्धा त्यांच्या आईकडून वारस हक्काने जमीन मिळालेली जमीन त्यांच्या नावे आहे , त्यांना वारस हक्काने येणाऱ्या जमिनीच्या फेरफार वर संतू व फासाबाई यांच्या नावावर करावी असा स्पष्ट उल्लेख आहे , तरी आम्ही त्यावर वारस नोंद करू शकतो काय. कृपया माहिती द्यावी.
रामदास भाई,
आपल्या प्रश्नावरून आपण संतु चे वारस आहात का की संतु चे सावत्र भाऊ याचा बोध होत नाही. असोत .
सध्या संतु व फसा बाई हयात नसतील v संतुलाही कोणते अन्य वारस नसतील तर आपले नाते संतुशी भावाचे आहे . त्यामुळे आपण वर्ग २ मधील IV वारस आहात . आपले नाव लाडू शकते .
मात्र तसा बाई किंवा संतु जर हातात असेल तर आपले नाव लागणार नाही आपण प्रयत्नही करण्याच्या फंदात पडू नये.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बालाजी देशमुख
30-10-2020
balajitech50@gmail.com
माझे पणजोबा यांची१८८५ पुर्वी कॅनालसाठी जमीन सरकारने घेतली व मोबदला म्हनुन पुनर्वसनात दुसऱ्या गावात जमीन दिली. आमचे त्या गावी जास्त येणे जाणे नव्हते याचा फायदा घेऊन मिळालेल्या जमीनीचे मालक सदर जमीनीला कुळ म्हनुन लागले. आजरोजी आमची नावे ७-१२ वर आहेत व कुळांची नावे सुद्धा मालक सदरी आहेत.
१) पुनर्वसन मध्ये मिळालेल्या जमीनीला कुळ लागु शकते का?
२) कुळ म्हणुन लागलेली नावे कमी होऊ शकतात का? त्यासाठी काय करावे लागेल?
असा आहे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा कायदा पुनर्वसन कायदा अंतर्गत मिळालेल्या जमिनीलाही लागू शकतो.
आता प्रश्न असा आहे की 1985 झाली तुमची जमीन पुनर्वसन ना मध्ये तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे जो काही पूर्वीचा मालक आहे त्याची कुळवहिवाट हे कृषक दिनानंतर म्हणजे एक ०१. 04:57 नं तर निर्माण झालेले आहे त्यामुळे त्याच्या नावे जी काही किंमत निश्चितीकरण करणे व त्याचे नाव मिळते ती लागणे ही सगळी प्रक्रिया कुल म्हणून जाहीर झाल्यानंतर एक वर्षाच्या आत होणे अभिप्रेत होते. पुर्वीचा जो जमीन मालक होता तो ज्या वेळेस कूळ म्हणून त्याला जाहीर केले त्याच्या नावे जमिनीची विक्री किंमत निश्चित करण्याची कार्यवाही एक वर्षाच्या झालेले आहे का याची सगळी पडताळणी आपण जुने फेरफार पाहून करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश Shinde
29-10-2020
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या अध्यात्मिक संस्थेने पूर्वी ६३ ची परवानगी घेऊन शेतजमीन क्षेत्र ०हे.५० आर इमारत बांधणेकामी बक्षिसपत्राने घेतली.व बिनशेती व रेखांकन मंजूर करून घेतले.परंतु शेजारी असलेला ०-१० आर चा गट नंबर रस्त्यात जात असल्याने तीही जमीन संस्थेस बक्षीसपत्राने मिळाली .परंत ०-१० आर बाबत ६३ ची परवानगी न घेतल्याने मंडळ अधिकारी यांनी सदर बक्षीसपत्राची गावी घेण्यात आलेली नोंद रद्द केली.तर त्याबाबत कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे अपील करून शर्तभंग नियमित करता येईल? सदर जमिनीचा वापर शैक्षणिक कारणासाठी होणार असल्याने नजराणा भरावा लागेल का?किंवा कसे? भरावा लागल्यास किती टक्के भरावा लागेल.?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 परवानगी न घेतल्याने मंडळाधिकारी यांनी ज्या दस्ता द्वारे तुम्ही ती जमीन खरेदी केली होती त्या दस्ताच्या आधार याची नोंद टाकण्यात आली होती तो दस्त मंजूर करण्यास नकार दिलेला आहे व त्याप्रमाणे फेरफार रद्द करण्यात आलेला आहे.
या बाबतीमध्ये मंडळाधिकारी यांनी केवळ फेरफार मंजूर करण्यास नकार देण्याइतपत ही बाब थांबत नाही तर त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अहवाल गे ला असेल व जिल्हाधिकारी महोदयांनी यांनी , सुनावणी घेयून घेऊन जमीन सरकारजमा केली तरच त्या ठिकाणी शासनाचे नाव लागू शकते.
सध्या स्थित तुमच्या माल्कीला कोण हात लाऊ शकणार नाही अथवा कोणी बाधा अनु शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
