जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार, मला आजोबांनी दीड एकर जमिन खुश खरेदी (बक्षीस पत्र नव्हे) दिली आहे, तरी त्याची नोंद होईल का. कारण माझ्या वडिलांनी वारसा हक्क चा अर्ज मंडल अधिकारी यांना केला आहे....!
सर माझा प्रश्न असा आहे कि, वर्ष १९३९ ला एक प्लॉट २४१२ चौरस फूट होता आज रोजी १३६१ चौरस फूट हक्क नोंदणी व आखीव पत्रिके वर आहे, सदर बदल बाबत मी माहिती अधिकाराचा वापर व तक्रार करून सुद्धा मला प्लॉट मध्ये झालेल्या बदलाबाबत माहिती मिळत नाही आहे। सदर माहिती मिळणे बाबत योग्य उपाय/मार्गदर्शन करावे.

Question by Deepak patil
21-02-2021
deepakraje191@gmail.com

खातेफोड करायची असेल आणि 4वारसा पैकी 3तयार नसतील तर काय करावे
खातेफोड म्हणजे जमिनीचे वाटप होते व ते करण्यासाठी , चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती तयार नसेल तर आपणाला दिवाणी न्यायालयात दावा करण्याशिवाय पर्याय नाही. ही जर जमिनीच्या सह धारक आणि पैकी सर्व सह धारकांची संमती असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आपणाला तहसीलदार यांचेकडे अर्ज करून खाते फोड करता येईल. मात्र जर सह धारकांची संमती नसेल, तर दिवाणी न्यायालयात जाण्यास शिवाय कोणताही पर्याय नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

आमचे गाव वेंगुर्ले सिंधुदुर्ग मध्ये आहे आणि १९५८ आधीचे जुने काही फेरफार आम्हाला आमच्या तहसीलदार किंवा तलाठी ऑफिस ला सापडत नाही , १९५८ आधी सिंधुदुर्ग चे divisional बोर्ड रत्नागिरी मध्ये होते असे माहिती उमजते , १९५८ आधी सिधुदुर्ग चे सर्व फेरफार रत्नागिरी मध्ये मान्य होत होते असे काही जणांकडून कळते ,जर मला जर पूर्वी चे काही फेरफार रत्नागिरी कार्यालयामध्ये चेक करायचे असेल तर कोणत्या विभागाला संपर्क करायचे , तसेच त्या विभागाचा संपूर्ण पत्ता कसा कळेल
दिनेश राव
पूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हे एकत्र होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वतंत्र झाला. त्यामुळे जे काही वेंगुर्ल्याची रेकॉर्ड रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलेले असे ते सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ठिकाण ओरोस या ठिकाणी आपणास भेटू शकेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kiran satav
19-02-2021
kiransatav51@gmail.com

सर जर कोणी फेरफार नोदी साठी हरकत दर्शविली आणि तीच हरकत सर्व बहीण भावांना हि असेल पण अर्जात फक्तं एकाचाच नाव असेल आणि त्याने पुढे झाऊन मा. मंडल अधिकारी यांच्या समोर जाऊन ती हरकत प्रतिण्या पत्र देऊन मागे घेतली .. त्यामुळे समोरील वेक्ती च नाव 7/12 उतऱ्या मध्ये लागलं असेल पण दुसऱ्याच तरीही हरकत असेल कारण असलेल्या शेत्रा पेक्षा जास्त शेत्र समोरच्याने कुळमुत्यार पत्राने लिहून घेतले आहे आणि आता 7/12 मध्ये त्याचं नाव ही लागलं आहे तर काय करावे असे लागलेले नाव कमी करता येईल का ... व पुढे काय करावे ...
ज्या वेळेस एखादी हक्क संपादन केली जातात व संपादन केलेल्या हक्काचे अनुषंगाने जर कोणाची हरकत असेल तर अशी हरकत मंडळ अधिकारी यांच्याकडे घेतली जाते. ज्या कुणा एका व्यक्तीने हरकत घेतली होती तसे रशियाची हरकत इतर सर्वांची होती. मात्र हरकत केवळ त्या एकाच व्यक्तीने केली होती व त्यानंतर ती हरकत प्रतिज्ञापत्र सादर करून मागे घेतलेली आहे. त्यामुळे तो जो काही हरकत घेतलेला फेरफार होता तो मंजूर झालेला आहे व त्यामुळे आपले हक्क डावलले आहेत अशी आपली भावना आहे. त्यासाठी आपण जो मंजूर फेरफार झालेला आहे त्याच्या विरुद्ध आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी असतील त्यांच्याकडे आपण आपली दाखल करा. फेरफार मंजूर झाल्यापासून अपील दाखल करण्याचा कालावधी हा सात दिवसांचा असतो. जर सात दिवस होऊन गेले असतील तर आपल्या आपल्या समवेत आपण विलंब माफीचा अर्ज हे दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ravindra
19-02-2021
ravimangire@gmail.com

एकत्रीकरण उतारा गुणाकार बुक आणि आकारफोड पत्रक यामध्ये २०१३ साली मोजणी आधारे भूमी अभिलेख शाखेने दुरुस्ती केली आहे . अशा दुरुस्तीने १९८८ साली झालेल्या एकत्रीकरणाच्या अमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करता येतील काय? कारण १९८८ मध्ये एकत्रीकरनाणे झालेल्या गट नंबर बाबत यापूर्वीच खरेदी व्यवहार झालेले आहेत.
महाराष्ट्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा कलम 31 अन्वय जर काही गणितीय चूक , जी स्कीम तयार करण्यात आलेली आहे त्याच्या मध्ये असेल तर त्याची दुरुस्ती करता येते.
तसेच कलम 32 अन्वये या स्कीम मध्ये काही अन्य चुका झाल्या असतील तर त्याचीही दुरुस्ती करता येते. मात्र याबाबत जमाबंदी आयुक्त यांना अधिकार आहेत. याबाबत आपण माननीय जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे अर्ज करू शकता. अर्जाची चौकशी आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष भूमिअभिलेख यांच्याकडून करून अधीक्षक भूमी अभिलेख उपसंचालक भुमी अभिलेख यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव जमाबंदी आयुक्त कडे जातो व त्यानंतर प्रकरणात गुणवत्ता असेल तर दुरुस्तीची कार्यवाही केली जाऊ शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर्व अधिकारी,
सर, 1990 ची खरेदी (डांगे चौक, थेरगाव ) 500 स्क फूट जमीन घरासाठी, मूळ मालक यांनी "अ" वक्तीला तहसील मुळशी मधे जमीन विकली. परंतु अ वक्तीने आपले नाव ७/१२ वर लावले नाही, पुढे अ ने ब ला, ब ने क ला तहसील मध्ये रीतसर खरेदी विक्री झाली पण (अ, ब, क) कोणीच ७/१२ वर नाव लावले नाही, घर मोडकळीस आहे, मला पिंपरी महानगर पालके मधून परवानगी घरून बांधकाम करावयाचे आहे, पण आमचे नाव ७/१२ वर नाही. "क" वक्तिने म्हणजे आम्ही तलाठी कार्यालय मध्ये अर्ज दिला आहे, परंतु काम होत नाहीं, कृपया मार्गदर्शन करा की आम्ही ७/१२ नाव लावण्यासाठी काय करावे.
सातबाराला नाव लागले नाही म्हणजे आपल्या त्या मिळकतीमध्ये हक्क नाही असे होत नाही. आपण मध्यंतरी जी सर्व खरेदीखते झालेले आहेत म्हणजे मूळ मालकाकडून अ व्यक्तीला, अ व्यक्तीकडून व्यक्तीकडे ब व्यक्तीकडे व ब कडून क व्यक्तीकडे, ती सर्व खरेदीखते तलाठी यांच्याकडे सादर करा. एखाद्या मिळकतीत हक्क संपादन केल्यानंतर व तलाठी यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर, प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने व सादर केलेल्या अधिकार अभिलेख त्याच्या अनुषंगाने तिथेच संबंधित व्यक्तींना गाव कामगार तलाठी यांच्या वतीने कलम 149 अन्वये( महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966) नोटीस काढली जाते. या नोटिशीला वरती नोटीस असे संबोधले जाते. व नोटीस मध्ये दिलेला कालावधी संपुष्टात झाल्यानंतर जर कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसेल तरसा फेरफार मंजूर करणे मंडळ अधिकारी यांच्यावर क्रमप्राप्त आहे. मात्र जर हीच संबंधित व्यक्तींकडून जर तक्रार प्राप्त झाली, तर तक्रार रजिस्टरमध्ये नोंद करून सदरचे प्रकरण निर्णयासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठवले जाते. त्यामध्ये तक्रार सादर करणारा व इतर संबंधितांना नोटीस काढून त्याची सुनावणी घेतली जाते व सुनावणीअंती प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जातो.
आपल्या प्रकरणांमध्ये तलाठी यांच्याकडून आपल्याला कोणती उत्तर दिले जात नाही ही बाब आपण संबंधित तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून द्यावी किंवा संबंधित तलाठी यांना आपण केलेल्या हक्क संपादन अर्जाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली याबाबत लेखी उत्तर देण्याबाबत त्यांच्याकडे आग्रह धरण्यात यावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आजोबांच्या नावाची जमिन आईला न विचारता मावशीने परसपर खरेदीखत करुन घेतलीआहेत
मार्रगदर्रशन करा
मावशीने जी जमीन आजोबांकडून परस्पर खरेदी खताने विकत घेतलेली असेल ती जमीन आजोबांची स्वकष्टार्जित असेल. स्वकष्टार्जित जमीन कोणत्याही व्यक्तीला विकण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो. मात्र ती जमीन जर आजोबांना वडलोपार्जित प्राप्त झालेली असेल तर आपल्या आईच्या वाट्याला जो हिस्सा येणार आहे तो विकता येणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
मी उज्वल चव्हाण, माझे मोठे बाबा नावं भोपीदास रामजी चव्हाण रा, महाळुंगी ता,आर्णी जिल्हा यवतमाळ, यांचे शेत हे शेजारी असलेल्या शेजारील लोकांनी त्या संपूर्ण शेती वर अतिक्रमन करून तिथे मुलीचे वसतिगृह बांधले आहे,तर ती जमीन मला कशी मिळवता येईल
आपल्या जमिनीवर ती शेजारच्या लोकांनी अतिक्रमण करुन बांधकाम केलेले आहे परंतु आपण इतके दिवस काय गेले त्यांना बांधकाम का करून दिली. आपण आपल्या जमिनीची मोजणी करून घ्या अरे जर मोजणी यांचे अतिक्रमण झालेले असेल तर आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून त्यांना केलेले बांधकाम काढून टाकण्याबाबत निर्देश देण्याबाबत विनंती करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sj
17-02-2021
Shitaljadhav227@gmail.com

माझ्या आजोबांनी आमची घराची मोकळी जमीन लांबच्या नातेवाईकाला फ़क्त राहण्यासाठी दिली पण आता 15 वर्षे झालं त्या जमिनी घरपट्टी त्या नातेवाईकाच्या नावावर येतीये अन तो बोलतोय आता ती जमीन माझी आहे तर ती जमीन पुन्हां आमच्या नावावर होइल का त्यासाठी काय करावे लागले
अजूनही वेळ गेलेली नाही आपण त्यांनी जे आपल्या मिळकतीवर असलेल्या बांधकामाला घरपट्टी लावून घेतलेली आहे त्याबाबत ग्रामपंचायतीकडे हरकत दाखल करा तसेच त्यांना अतिक्रमण काढून ट**** बाबत नोटीस द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी सचीन लेडंवे सांगोला तालुक्यातील आहे.माझे वडील बबन लेडंवे यांच्या नावे फक्त 3 एेकर शेती आहे़.१९७२ ला आजोबांच्या नाली 20 एेकर शेती होती.त्याकाळी 6.30 एेकर वरजबरस्तीने भूसंपादन झाले. व पुर्ण मोबदला देखील नाही मिळाला.आता परत भूसंपादन होणारच असे आधिकारि व क्वॉट्ॉक्टर बोलतात .वाढीव 2 एेकर जबरदस्ती भूसंपादन होनार .प्रकल्प पु्र्ण नाही फक्त बांध आहे.नियमाने आम्हांला जमिन परत मिळू शकते का.व वाढीव भूसंपादन होईल का जबर्दस्तीने.
क्रुपया मार्गदर्शन करावे नम्र विनंती
आपली जी पूर्वी जमीन संपादन झालेली असेल ती भूसंपादन कायदा 894 संपादन झालेली आहे. या जमिनीचा वापर जर संपादन उद्दिष्टासाठी झाला नसेल, तर अशी जमीन इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. जर इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता नसेल तर अशा जमिनीचा लिलाव करणेच आहे व जो लिलावामध्ये ज्यादा रकमेची बोली बोलेल त्याला अशा जमिनीचे वाटप करण्यात येते. त्यामुळे जी जमीन संपादन झालेले आहे ती आपणाला परत मिळू शकत नाही. ही आपणाला ती जमीन परत पाहिजे असेल तर शासनाकडून अशा जमिनीचा लिलाव झाला तर आपण बोली बोलून ही जमीन परत घेऊ शकता. मात्र हक्क म्हणून ती आपल्यालाच मिळावी असा जर आपला आग्रह असेल तर आपणाला ती मिळू शकत नाही.
मात्र भूसंपादन कायदा 2013 साली संमत झाला त्याच्यानुसार संपादन प्रयोजनासाठी संपादित जमिनीचा वापर झाला नाही तर ती ती मूळ मालकांना परत मिळण्याचा हक्क या कायद्यामध्ये आहे. तसा हक्क 894 च्या कायद्यात नाही..

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by praveen dalvi
15-02-2021
jaywant2010nov@gmail.com

sir
i have registered deed of declaration for my building in NA plot at sub registrar office and the 7/12 is being updated as per the deed.
now i had sold some units to the buyer and need to update their names in 7/12.
Talathi in our place is not ready to update the buyers name. What should i di
आपला प्रश्‍न थोडासा संदिग्ध आहे. आपल्या प्रश्‍नावरून आपण खरेदी केलेल्या जागेवर ती बांधकाम परवानगी घेऊन इमारत बांधलेली आहे. या इमारतीमध्ये व्यापारी तत्त्वावरील गाळे किंवा सदनिका असाव्यात. व या सदनिका अथवा गाळे आपण अन्य व्यक्तींना विकली असतील तर या व्यक्तींची नावे सातबारा सदरी लागत नाही. त्यासाठी आपणाला सर्व युनिट धारक यांची सहकारी संस्था स्थापन करावी लागेल व सहकारी संस्थेमार्फत या युनिट धारकांना भाग प्रमाणपत्र मिळते.
दुसरी गोष्ट अशी असू शकते की आपण आपल्या मालकी मालकीच्या जागेवरती अभिनयास मंजूर केलेला आहे. व या अभिनयाचा मधील प्लॉट आपण विकलेले आहेत. जर अभिन्यासाला नियोजन अधिकारी यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत परवानगी असेल, तर खरेदी केलेल्या युनिटला खरी दाराचे नाव लागणे आवश्यक आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nagaraj
14-02-2021
rajendrabaliphadi@gmail.com

Sir माझा प्रश्न असा की, माझा आणि माझा भाऊच नावावर जागा आहे तर दोगाच वाटणी झाली आहे आणि नोटरी पण केलें आहे, तर भाऊ नोटरी ला मान्य करत नहीं तर तेल्या काय करता येईल
आपण ज्या वेळेस वाटप पत्र केले व ते नोटराईज केले त्याप्रमाणे आपण ते तलाठी यांच्याकडे सादर करणे आवश्यक होते व सातबारा सदरी ज्याच्यात्याच्या त्याप्रमाणे त्याला नावे लागणे आवश्यक होते. आपण तसे न करता केवळ जमिनीचा ताबा घेतला मात्र अधिकार अभिलेख सद्रि वाट प्रमाणे नोंद केली नाही. हि आता आपले बंधू नोटराईज वाटप पत्र मानण्यास तयार नाहीत. वाटप पत्राच्या वैधतेबाबत अस त्यांची हरकत व शंका आहे. तर ते स्वतः वाटप पत्राच्या अनुषंगाने त्याला न्यायालयात आव्हान देतील. व त्याबाबत न्यायालय वाटप पत्र वैध आहे किंवा नाही याबाबत निर्णय घेतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ujer
13-02-2021
hmauhs@gmail.com

प्रश्न : क व्यक्तीने ग्रामीण एका भागात 2010 मध्ये 1. 60 (4 एकर ) शेत जमीन खरेदी केली. जमीन विक्री करणारे वक्ती ने 2009 मध्य बिनशेती आदेश साठी उपविभागीय अधिकारी कडे अर्ज केला होता. बिन शेती आदेश आणि रेखांकन ला 2012 मद्ये मंजूर मिळाला. क ने 2020 मद्ये revise रेखांकन केले त्यास मंजुरी घेतली नाही. नगर रचना येथे जुने रेखांकन आहे. क प्लॉट जुन्या रेखांकन ने विक्री करत नाही. नवीन aprove न केलेले रेखांकन नुसार प्लॉट खरेदी केल्यास भविष्य मध्ये अडचण होईल का. कूर्पया मार्गदर्शन करावे hi विनंती
ज्या रेखांकनस नगर रचना विभागाची, पर्यायाने नियोजन प्राधिकार याची मान्यता नसते असा भूखंड/ प्लॉट खरेदी करू नये कारण अशा भूखंडाचे/ प्लॉटचे नोंद अधिकार अभिलेख सदरी म्हणजे सातबारावर नसते त्यामुळे आपले नाव सातबारा सदरी लागणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे कि मला १९५७ साली ३२ ग ने जमीन प्राप्त आहे परंतु सदर गटातील विहीर नावावर नाही त्या ठिकाणी आज अखेर जमीन मालकाचे नाव आहे ते कि त्यांचे वारस सद्या माहित नाहीत. टी विहीर नावावर करता येईल काय ? करता येत असेल तर कोणाकडे अर्ज करावा.
विहिरी खाली जे क्षेत्र होते त्या क्षेत्रास आपण अथवा आपले पूर्वज पूर्ण नसल्याने त्याची विक्री आपल्याला भात झालेली नाही. सद्यस्थितीत जरी ती जमीन आपल्या ताब्यात असली व ज्या व्यक्तीचे नाव सातबारा सदरील दाखला आहे तिचा अथवा त्याच्या वारसान बाबत जरी कोणतीही माहिती नसली तरीही त्या क्षेत्राला आपले नाव लागू शकणार नाही पर्यायाने ती वीर आपल्या नावावर होणार नाही. एखाद्या व्यक्तीचे कोणतेही वारस नसते उत्तर त्या क्षेत्राला शासनाचे नाव लागते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या ७/१२ वरती अधिकार अभिलेखात "सरकार" नाव लागलेले आहे. सदरचे सरकार नाव तगाई पोटी लागलेले आहे. तगाई माफ झालेली असताना देखील सरकार नाव कमी करण्यात आले नाही. ७/१२ वरील सरकार नाव कमी होणेसाठी मी सन २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज केला. त्यावरती तहसिलदार यांनी मला सन १९५६ ते २०१८ पर्यंत राज्यपाल यांच्या राजपत्र १जानेवारी २०१८ अन्वये कलम १८२ अंतर्गत चलनाने रक्कम भरावयाची नोटीस दिली. त्यानुसार मी चलनाने रक्कम भरली. परंतु सदरचे प्रकरणाबाबत चुकीची कार्यवाही झालेली आहे. सदरचे प्रकरण कलम १८२ मध्ये बसत नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगत प्रकरण निकाली काढले. सदरच्या प्रकरणावर चुकीची कार्यवाही झाली हे समजण्यासाठी २०१३ पासुन ते आजपर्यंत ७ वर्ष लागली. यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष..? शेतकऱ्यांच्या दंड हा वाढतच राहिली.
आता मी भरलेल्या रक्कमेचे काय.? सदरच्या प्रकरणाबाबत मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
माझे वडिल वडिलोपार्जित सामूहिक जमिनीवर स्वतः घर बांधून राहत होते त्यांच्या निधना नंतर त्यांचे भाऊ घरावर हक्क आणि अधिकार मागत आहेत जमिनीवर हक्क नाकारता येत नाही पण घर त्याच्या स्व खर्चाचे आहे तर त्या घराला वारस म्हणून माझी आई आणि भाऊ यांचे नावे लागतील का ? आणि कसे ?
भारतामध्ये दुहेरी मालकी हक्काबाबत ची तरतूद आहे. म्हणजे जमीन एकाच्या मालकीची असू शकते तर त्यावरील इमारत ही दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या असू शकते. व त्याचा अर्थाने जी सामूहिक जमीन होती त्या जमिनीवर आपल्या वडिलांनी घर बांधले व त्या घराला आपल्या वडिलांचे नाव लागलेले आहे. पर्यायाने त्यांच्या पश्चात आपले व आपल्या आईचे नाव लागू शकते. आपल्या इतर चुलत्यांना त्यावर हरकत घेण्याचा कोणताही अधिकार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचे आजोबा एका संस्थेमध्ये काम करित होते. ती संस्था अचानक बंद पडली व सदर संस्थेमध्ये काम करणारे सर्व व्यक्ती सोडून निधून गेले. काही दिवसानंतर त्या आजोबांनी त्या संस्थेच्या जागेवर आपले मकान बांधले व ग्रामपंचायत ने ही त्यांच्या घरावर त्यांच्या नावाने कर आकारणी केलेली. नंतर ते आजोबा मरण पावले व त्यांच्या त्या मकानावर त्यांचे वारसाची नावे नोंद झाली. सदर वारसानी आपल्या एका भावाला सदर मकान लिहून दिला. आता 1990 पासून ते 2011 पर्यंत सदर मकानावर मालकाचे नांव हे त्या व्यक्तीचे होते व नंतर ग्रामपंचायतने 2012 पासून नमुना 8 ला मालकाचे नावामध्ये सरकार नमूद केलेला आहे. सर हे कुठला नियमानुसार केलेले आहे यांची मला माहिती दयावी. मी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरकार शब्द कमी करण्याबाबत अर्ज सादर केलेला आहे.‍ तरीही माझ्या अर्जावर आतापर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. करिता मला सदर विषंयासबंधी माहिती देण्यात यावी
ज्या वेळेस आजोबांकडून त्याच्या वारसांकडे व त्यापैकी काही वारसांनी एका वारसाच्या नावे संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या इमारतीला नाव लागले तदनंतर ग्रामपंचायतीने एकतर्फी सरकार असे नमूद केले, त्या ग्रामपंचायतीच्या कृती विरुद्ध आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करा.
कदाचित असेही असेल की ती संस्था ती सहकारी संस्था असे. अवसायनात गेल्यामुळे ती शासनाचे नावे झालेली असेल व पर्यायाने संबंधित विभागाने ग्रामपंचायतीला त्याप्रमाणे कळवले अनुसार शासन हे नाव लागलेले आहे.
मात्र आपण आपल्या हक्कासाठी कायद्याने दिलेल्या पर्यायाचा वापर करून आपण लढा देऊ शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्ते.. आम्ही नोकरी निमित्त परगावी असतो सेवानिवृत्ति नंतर गांवी थोडी शेती हवी म्हणून (वडीलांर्जीत शेती वडिलांनी बाकी भावांच्या नावे केली) मी एजंट द्वारा 2018 ला ६०गुंठे शेत केले कुलमुखत्यारपत्र द्वारा खरेदी झालेले आहे..पण ते पाटील की भोगवटादार-२चे क्षेत्र आहे ( हे आम्हांला एजंट ने अंधारात ठेवून स्टॅम्प ड्यूटी भरुन दस्त केला व ७/१२ वर नोंद पण झाली) पण साहेब....ते शेत मला आता विकावयाचे आहे पण घेणारे भोगवटादार-२चे क्षेत्र भोगवटादार-1 करुन आणा तरचं तुम्हाला विकता येईल.... व एजंट त्यासाठी खर्च अव्वाची सव्वा सांगतायत... माझा प्रश्न असा आहे की ... सदर शेत विकता येईल का? व त्यासाठी काय करावे लागेल? तसेच त्यासाठी किती नजराणा, दंड किंवा इतर सरकारी चार्जेस भरावे लागतील व किती दिवसात काम होईल...फसवणूक करुन अश्या जमिनी एजंट ने नवख्या माणसांच्या गळ्यात मारुन जमिन खरेदी करुन दिल्या असतील तर खरेदीदाराला कोणता धोका नसतो ना? शिवाय महसूस निबंधक "नजराणा न भरलेल्या शेती चे दस्त करतात चं कसे? हे सरकारी नुकसान नव्हे काय? कृपया सविस्तर मार्गदर्शन अपेक्षित. . धन्यवाद सर
आपण जी जमीन खरेदी केली आहे ती नक्की कोणत्या स्वरूपाची आहे याची सातबारा पाहून पडताळणी करा. ही वतन जमीन आहे की शासनाने प्रदान केलेली जमीन आहे याबाबतचे स्वरूप तपासा. जर शासनाने प्रदान केलेली जमीन असेल तर 2019 मध्ये संमत झालेल्या सुधारणा नुसार अशी जमीन वर्ग 2 वरून वर्ग 1 करता येते मात्र त्यासाठी नजराणा भरावा लागतो.
भोगवटादार वर्ग 2 जमीन बाबतची परवानगी खरेदीदाराने स्वतः घ्यावी घ्यावी अशा अटीवर विकण्यास हरकत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सामायिक क्षेत्रा मध्ये(जागा) वारस नोंदवण्याची काय प्रक्रिया आहे???सदरील जागा दोन व्यक्तीच्या नावें असून त्यातील एक व्यक्ती मयत झाली असून त्यांच्या मुलांनी वारसदार म्हणून नोंद लावली आहे . तर वारस दाराची नोंद लावण्या साठी सामायिक क्षेत्रा मधील दुसऱ्या व्यक्तीच्या परवानगी ची गरज असते का??कृपया मार्गदर्शन मिळावे??
इतर व्यक्तीच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र जी व्यक्ती मयत झालेली आहे तिचा त्या मिळकतीत असलेला जो हिस्सा होता त्या हिच्या पुरताच तिच्या वारसांची नावे लागतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इतर व्यक्तीच्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र जी व्यक्ती मयत झालेली आहे तिचा त्या मिळकतीत असलेला जो हिस्सा होता त्या हिच्या पुरताच तिच्या वारसांची नावे लागतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
♂️जर ७/१२ वर गट नं - अ, ब व क वर ईतर हक्कात वारस नजरचुकीने सुटले असतील तर काय करावे तसेच नोंद मंजूर झाली आहे सन २०११ नोंद मंजूर झाली आहे
♂️तसेच वरिल उपदोघातील गट नं-अ चे हक्कसोड झाले वर्ष २०१२ मधे आता गट नं -ब व क शिल्लक आहे . तरी आमचा गट नं. अ मधे आमचा अधिकार आहे काय? कारण वारस नोंद करतांना आमची नावे सोडून दिली होती . व हक्कसोड ला सह्या ज्यांची वारस नोंद झाली त्यांनीच हक्कसोड केलं होतं.
ज्या गटाला आपले नाव लागली नाही त्या गटात बाबतीत आपण म्हणता की, की त्याबाबत हक्कसोडपत्र केलेले आहे. हक्कसोडपत्र जर नोंदणीकृत असेल तर आपणाला इतर हक्कांमध्ये नाव लागणार नाही. मात्र जर नोंदणीकृत हक्कसोडपत्र नसेल तर अशा हक्कसोडपत्र खास कुठलीही वैधानिक मूल्य नसते. आपण हक्कसोडपत्र कोणते केले आहे याची पडताळणी करा. जर हा नोंदणीकृत असेल तर त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ज्या फेरफार आणि आपले नाव वगळले गेले असेल त्याच्याविरुद्ध आपण दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही ज्या जमीन राहतो त्या जमिनी वर गेली 60 वर्ष पासून निवासी महणुन राहतो. आम्ही सातबारा पहिला त्यावर परीघ असा कब्जा आहे अस नाव आहे . तर परीघ या शब्दाचा अर्थ काय आहे
सर नमस्ते आजोबानी खरेदी केलेल्या पाच एकर श्रेत्र असलेल्यासात बारा उताऱ्यावरआजोबा हे स्वताच्या ३ मुलानां वारस न लावता तिन्ही मुलांच्या मुलांना म्हणजे तिन्ही नातवांना (आजोबा + नातू) अशी नोंदणी किंवा अशी खरेदी करीत आहेत अजोबा व तीन नातवाचे नाव लावल्यास चालेल किंवा कसे काही अडचणी येऊ शकतात काय
आजोबांनी उपरोक्त मिळकत ही खरेदी केली आहे याचा अर्थ ती मिळकत त्यांची स्वकष्टार्जित आहे. स्वकष्टार्जित मिळकत कशा पद्धतीने तिची विल्हेवाट लावावी याचा अधिकार त्या त्या व्यक्तीला असतो. त्यामुळे मुलांच्या ऐवजी नातवांची नावे लागली तर त्यामुळे कोणताही प्रश्न भविष्यात होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Yuvraj
05-02-2021
honmaneyuvraj71@gmail.com

सर,
आम्ही नेरळ येथे बेटी चाळीत रूम पहिला आहे . सदर प्रोजेक्ट ग्रामपंचायत अप्रोळ आहे.प्रोजेक्ट ७/१२ जमीन वर आहे.१०९ घरांचा आहे.बिल्डर ने अमाला ७/१२,नमुना ८, घरपटी नमुना म्हणून दाखवली तर त्या ठिकाणी आम्ही रूम घेऊ शकतो का. कृपया मला मार्गदर्शन करावे.
आपण विचारलेल्या प्रश्नानुसार ज्या बैठ्या चाळीत आपण घर घेत आहात ती बैठी चाळ सर्वे नंबर वर बांधलेली आहे. सर्वे नंबर वर बांधलेल्या बैठ्या चाळीस परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस नाही. जर जागेचे शेत्र पाचशे मीटर पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकल्पाची नोंदणी रेरा अथोरिटी कडे करणे आवश्यक आहे.
क्षेत्र पाचशे मीटर पेक्षा क्षेत्र कमी असल्यास नेरळ जिल्हा रायगड येथे नेरळ ममदापुर प्राधिकरण अस्तित्वत आहे. व गावठाणाबाहेरील कोणत्याही जमिनीच्या विकासाला आथवा त्यावरील बांधकामाला या प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे.
आपण ज्या चाली मध्ये घर घेत आहात त्याला बांधकाम परवानगी किंवा विकास परवानगी आहे का असल्यास त्याची प्रत संबंधित विकासकाकडून प्राप्त करून घ्या. बांधकाम परवानगी व मालकी हक्काबाबत शहानिशा करूनच अशा चाळीमध्ये घर घेणे उचित.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandip
04-02-2021
sanmitrasandip@gmail.com

माझ्या आजोबांनी 1992 साली मृत्यूपत्र लिहून जमीन त्यानी एकाच नातूच्या नावे केली आहे त्या मूळे माझे नाव वारस लागत नाही पण ##ती जमीन महारवतन आहे तर महारवतन जमिनी चे म्रृत्यूपत्र होवू शकते का?
महार वतीन जमिनीचे मृत्युपत्र होण्यास कोणतीही अडचण नाही. तथापि ही जमीन आपल्या आजोबांना मिळाली की त्यांना त्यांच्या वडिलांपासून मिळाली याची खात्री करा. आजोबांसाठी ती जमीन वडलोपार्जित असेल तर केवळ एका व्यक्तीचे नावे त्यांना करता येणार नाही. मात्र ती त्यांना स्वतःला मिळाली असेल तर अश्या जमिनीची विल्हेवाट त्यांच्या मर्जीप्रमाणे ते लावू शकतात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.29 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3