जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर , मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?
सर ,
मी माझी वडिलोपार्जित शेती नोव्हेंबर २०१८ मध्ये विक्री केली. २०१८ पर्यंत माझ्या नावाचा सातबारा उतारा निघत होता आणि दुसरीकडे मार्च २०२० मध्ये शेतजमीन खरेदी केली. आता मंडलाधिकारी भूमिहीन होता तुम्हाला जमीन खरेदी करता येत नाही म्हणून फेर मंजूर करत नाही.. ह्या प्रकरणात काय करावे कृपया योग्य मार्गदर्शन करा
सर मी 48 आर क्षेत्र कोरड वाहू क्षेत्र खरेदी केली आहे. परंतु तलाठी यांनी सदरचा फेर तुकडे बंदी कायद्याचा भंग होत असल्याने फेर नामंजूर केला आहे . तुकडे बंदी कायद्याचा भंग होण्यासाठी किती गुंठे क्षेत्र प्रमाणभूत ठरवण्यात आले आहे ? कृपया याबद्दल मार्गदर्शन व्हावे.
How to distribute compensation of devasthan Inam land. Is there any case law or G. R of Maharashtra gov. Is G. R. Dt. 26june 2006.is cancelled by any court or Maharashtra gov. And whether provisions of Maharashtra project affected persons rehabilitation Act. Applicable to devasthan inam land. Please guide me.Thanks...
इनाम जमीन चे बक्षीस पत्र करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते व किती दिवसात परवानगी मिळते

Question by Luv Shirsat
04-09-2020
shirsatlove@gmail.com

नमस्कार माननीय सर,
माझा प्रश्न असा आहे की , दोन गावांच्या सीमेवर रास्ता ज्याला शिव रास्ता पण म्हणतात त्या शिव रास्ता संदर्भात शासनाचे काही नियम आहे का ? आमच्या गावामध्ये शिव रास्ता मोकळा केलेला होता पण ३ वर्षा पासून सध्या रस्त्याचाच बाजूने शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे ,व मोठी चारचाकी वाहने नेता येत नाही , त्याठिकाणी आता फक्त एक पायवाट उरली आहे, याचा जाण्या येण्यास त्रास होतो. यासाठी काही शासन स्तरावर उपाय करता येईल का ?

लिहिताने काही चूक झाली असल्यास - क्षमस्व:

Question by Gajanan garud
04-09-2020
gajagarud@gmail.com

प्रश्न : प्रकरण- जमीनदाराला 63 एकर जमीन होती.त्यापैकी 21 एकर जमीन A नावाचा कुळधारक कसत होता आणि 13 एकर जमीन Bनावाचा कुळधारक कसत होता .A ह्या कुळस जमीनदाराने कुळ कायद्याप्रमाणे 21 एकर जमीन दिली होती. मग कुळधारक B ने tenancy authority अर्ज केला 13 एकर जमीन मिळविण्यासाठी ,tenancy authority ने कुळ B च्या बाजूने निकाल दिला होता परंतु जमीनदारान tenancy authority च्या निकालाच्या विरोधात अपिलात गेला व जमीनदाराने कुळ A यास 63 एकर मधून 21 एकर जमीन कुळ कायद्याप्रमाणे देली आहे त्यामुळे शिल्क 42 एकर जमीन माझ्या दोन कुटुंबाना पुरेशी नाही त्यामुळे tenancy authority ने दिलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. असे जमीनदार सांगत आहे (जमीनदार आणि त्याच्या (लग्न झालेल्या )2 मुली असे मिळून 3 जण होते कुटुंबात) B या कुळास न सांगताच जमीनदाराने सर्व जमीन त्याच्या एका मुलीच्या मुलांना 1974 ला विकली होती. प्रश्नन्न 1)अशा वेळी B कुळास त्याला ती जमीन कायदेशीर मिळविण्याचा अधिकार आहे का? किंवा B कुळाने काय करावे ? केस अजून कोर्ट चालू आहे हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या अधिनियमन 2)हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कलम 4 नुसार जमीनमालक धरुन 5 इसम म्हणजे एक कुटुंब तर मग कुटुंबात जमीनमालक एक व इतर 4 इसम कोणस मानावे कायद्याप्रमाणे. 3) हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कायदानुसार जमीनमालकाला किती जमीन स्वतःच्या कुटुंबाला किमान ठेवण्याचा अधिकार आहे 4)कायध्यप्रमाणे लग्न झालेल्या मुलीचा व तिच्या मुलांचा समावेश तिच्या वडिलांच्या कुटुंबात कुटुंब सदस्य म्हणून होतो का?
नमस्कार सर
माझी पुरवजा पासून चालत आलेली 36 एकर जमीन आहे. ती जमीन कुळ करून समोरील व्यक्तीने नावची करून घेतली होती नंतर नाबालीग कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्ट खटला चालू आहे कोर्टाचा निर्णय कोणत्याही क्षणी माझ्या बाजूने होण्याची शक्यता आहे तर पुढची पार्टी ही ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकत आहे
सर मी एक जमीन खरेदी केली आहे. ती जमीन वडील व त्यांची दोन मुले यांच्या नावावर होती. वडीलच्या नावावर 2 एकर व मुलाच्या प्रत्यकी 4 एकर त्यानंतर मला पुढील काळात त्यांच्या वारसांची काही अडचण तर येणार नाही ना? सदर जमीन भोगवटादार 1 आहे.

Question by shubham
03-09-2020
erjohnw@gmail.com

नमस्कार सर , सर माझा प्रश्न असा आहे कि ,माझ्या आजोबांची १४ एकर जमीन होती ( अधिकार अभिलेख आणि फेरफार पंजी मध्ये नमूद आहे ) त्या पैकी आजोबानी साडे तीन एकर जमीन विकली त्यांचे आमच्या कडे विक्रीपत्र पण आहे . आणि आता आमच्या कडे अर्धा एकर जमीन मालकीचा ७/१२ आहे . असे एकूण ४ एकर जमीन चा रेकॉर्ड आमचे कडे आहे पण उर्वरित १० एकर जमीन चा ७/१२ उपलब्ध नाही व ती जमीन कुणाला विकलेली पण नाही व असा उल्लेख पण आम्हला फेरफार पंजी मध्ये नाही मिळाला(ती जमीन कागत पत्रात गडप झाली आहे असे मला वाटते ). आम्ही १९५४ ते २०२० पर्यंत चे सगळे document काढले आहेत (अधिकार अभिलेख आणि फेरफार पंजी, गाव नकाशा , ७/१२ ,८अ etc). सर मला पुढे काय करावं लागेल त्या १० एकर जमिनीला नावे करण्यासाठी आपले मार्गदर्शन हवे . धन्यवाद सर
सर / मॅडम
माझे आईचे नावे १६०० स्केअर फूट जमिन १९९६ साली खरेदी केली आहे. फेरफार करिता रजिस्टर्ड विक्री पत्र दिले असता आता तलाठी विक्री स्केअर फूट मध्ये असून एन ए नाही म्हणून फेरफार होणार नाही असे सांगत आहेत. परंतु त्याच जमिनीतील १५०० स्केअर फूटचा दुसरा भूखंड ज्याची विक्री २००० साली झाली. त्या इसमाने ७ वर्ष आधी स्वतः च्या भूखंड चा फेरफार तत्कालीन तलाठी कडून करून ७/१२ नाव चढविले. काय करावे
कृपया मार्गदर्शन करावे

Question by Sagar more
02-09-2020
sagar.more578@gmail.com

सर, माझ्या आईने १९९६ साली मृत्यू पत्र बनवुन जमीन माझ्या नवावर केली, तिथे आम्ही घर बांधले व घरची नोंद माझ्या नवावर केली पण २००५ मध्ये ग्रामसेवकाकडून हयात नसलेल्या वयक्तिचे नाव माज्या नावाखाली लागले ही गोष्ट मला २०२० साली कळाली, तेंव्हा आम्ही ही गोष्ट ग्रामसेवकास सांगितली पण ग्रामसेवक आम्हाला काही मदत करत नही तसेच अदण्यात व्यक्तचे नाव देखिल कमी करत नही यासाठी काय करावे. तसेच त्या व्यक्तीचे नाव कसे कमी करावे? ज्याचे नव ग्रामसेवकाकडून अमच्या उताऱ्यावर चढले आहे ती क्यक्ति मुळात अस्तित्वात देखिल नही.
तुकडे जोड पूर्वी३,२०. नतर २,५७झाले आहे एकत्रीकण ९,३.९,४ रेकॉर्ड मागणी केली तर नोद वाही ते पान उपलब्ध नाही असे सागतात तर कोणा कडेतक्रार करावी
नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांच्या व भावकी तील व्यक्ती यांच्या नावे एका जमीनीला अनुक्रमे १आणे २पै.,१४आणे १०पै अशी आणेवारी सामाईकात १९६१ ला दाखल केली. वर्दी दिलेवरून व नोटीस पाहून फेरफार मंजूर करण्यात आला होता. तो फेरफार अभिलेख कक्षातून मिळत आहे. परंतू त्याची वर्दी व नोटीस अभिलेख कक्षात उपलब्ध नाही कारण तो दसतऎवज ठराविक कालावधीनंतर शासकीय नियमानुसार नष्ट करण्यात आला आहे असे सांगितले जाते. माझा प्रश्न असा आहे की, अशा परिस्थितीत आमचा जमिनीतील हिस्सा किंवा अधिकार कायदया प्रमाणे आहे का? १९६१ च्या अगोदर ही जमीन भावकी तील माणसाच्या वडीलांचे नाव कबजेदार असे होते.

Question by Nikhil Sunil sutar
31-08-2020
sutarns999@gmail.com

सर,
माझा प्रश्न आहे, मला एक जणाची जमीन घ्यायची आहे पण तीला नवीन शर्त आहे . तर ती उतारा कोरा करून मला खरेदी करता येईल का. कृपया याची प्रक्रिया सांगाल का.
आम्ही शासकीय सोसायटीध्ये 25 वर्षापूर्वी घर विकत घेतले होते. आम्ही त्यांना पैसे दिले होते. परंतु त्याची खरेदी करायची राहून गेलेली आहे. आणि घर आजुन घरमालक यांच्या च नावावर आहे. आणि घरमालक आता जीवित नाहीत. त्यांचे वारस आहेत परंतु आता ते तयार होत नाही आहे. या विषयी योग्य मार्गदर्शन करावे.

Question by Vaibhav Makeshwar
31-08-2020
yeradbazaar@gmail.com

नमस्कार सर
मी बेंबळा जलसिंचन प्रकल्पबाधित व्यक्ती आहे माझे मौजे येरड (गावठाण) जि अमरावती येथिल घर फेब्रुवारी २००४ ला भुसंपादीत करण्यात आलेले आहे व मला नवीन पुनर्वसित गावठाणात १८७ स्क्वे मी भूखंड मिळालेला आहे परंतु हा भूखंड १० वर्षे पर्यंत भोगवाटदार वर्ग ०२ (अहस्ततांतरणीय) असतो व माझा हा कालावधी १८ जानेवारी २०१७ ला पुर्ण झालेला आहे व मला हा भूखंड भोगवाटदार वर्ग ०१ करून घ्यायचा आहे (महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ , कलम १६ १(अ) व १(ब) नुसार ) परंतु माझ्या कडे भूसंपादन नोटीस जी मला फेब्रुवारी २००४ ला मिळाली होती ती नाही त्यामुळे मला याबद्दल मार्गदर्शन करावे व ही प्रक्रिया कुठून होईल या बद्दल पण माहिती द्यावी

Question by Milind Shinde
31-08-2020
milindshinde553@gmail.com

Sir amche samaik shetra hote vadil, chulte, 2 atya 136 r tyatil chultyane 68 r vikle(avibhakt hissayache vikat ahet asa dastat ullekh kela ahe) tyala vadlani v 2 atyane samthi dili pan chultyache nav satbaryatun kami nahi jale varti chulte boltayet maje nimme shetra mala dya kay karave
चुकीने ईतर हक्कात आलेली नावे कमी करता येतात का
शेतजमीन गट नं,50 मध्ये 1979 रोजी विहीर पड नोंद केली असून ती 1994 पर्यंत आहे तर ती नोंद तलाठी यांच्या चुकीने पुढे राहिली
आहे तर ती नोंद आज रोजी पर्यंत 7/12 वरती करण्यासाठी काय करावे
कळवा,,,,
ध्यावाद,,
विहीर पड नोंद ७/१२ व नसेल तर काय फरक पडणार आहे ? खरतर अशी पड वहीती खाली आणून , हि नोंद कमी झालेली योग्य आहे . अश्या नोंदीमुळे तुम्हाला कोणता अधिकार मिळत आहे अथवा आपल्या कोणत्या हितसंबंधाची हानी होत होत आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Salim Maneri
30-08-2020
salimmaneriias@gmail.com

Does gift deed under Mohammedan Law(Hibanama) legally sanctioned and can bank loan be availed on such deed of immovable property ?
माझ्या वडिलांना माझ्या नावाने घरातील थोडी जागा करायची आहे त्याकरिता बक्षीस पत्र बनविण्यासाठी कोणत्या कार्यालाऊत जावे? बक्षीस पत्र संबंधित GR सांगावा.

जय हिंद
भारतीय नोंदणी अधिनियम 1998, बक्षीस पत्र हे नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणाला आपल्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागेल. जे आपणास बक्षीस पत्र करून देत आहेत त्यांनीही या कार्यालयात जाणे अभिप्रेत आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की ,३२ग चा ऑर्डर मधे जमिनी सोबत पोट खराबा चां उल्लेख नसेल तर तो जमिनी मधील पोट खराब उर्वरित जमिनी सोबत कुळाला जातो का जमीन मालका कडे राहतो
उपरोक्त उत्तरात “बाळा” च्या ऐवजी “कुळाच्या” असे वाचावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कूळ कायद्याचा मुख्य उद्देश समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ो दुसर्‍याची जमीन कसतो व त्या बदल्यात त्याच्या जमीन मालकाला खंड देतो त्याला कुळ असे म्हणतात. कृषक दिनी जर जमीन कशात असेल तर तो त्या जमिनीचा मालक झालेला आहे असे मानले जाते. व त्यानंतर मुलाच्या नावे विक्री किंमत निश्चित केली जाते.
पोटखराबा हा वहितीखाली आणता येत नाही. त्यामुळे तो कुरान एक असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. व पर्यायाने बाळाच्या नावे अशा पोटखराबा ची किंमत ठरवण्याचा ही प्रश्न उद्भवत नाही त्यामुळे पोटखराबा हा नेहमी जमीन मालका कडेच राहतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महानगरपालिका क्षेत्रातील शेतजमिनी साठी अकृषक परवानगी साठी काय प्रक्रिया आहे?
महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगळ्याने अकृषिक परवानगी घेण्याची ची आवश्यकता नाही. सन 2016 व सन 2017 मध्ये, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये कलम 42 ब, 42 क हे अंतर्भूत करण्यात आले. या सुधारणा तरतुदीनुसार, महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थित असलेल्या जमिनीसाठी, अकृषिक परवानगी न घेता, जमिनीचा विकास करण्यापूर्वी, संबंधित महानगरपालिकेची विकास परवानगी घेणे आवश्यक असते. विकास परवानगी देताना महानगरपालिका मिळकत, अकृषिक झाली असल्याचे, आदेश पत्रातच नमूद करते. तत्पूर्वी महानगरपालिकेकडून, अशा जमिनीच्या भोगवटा बाबत ( मालकीबाबत) अधिभाराबाबत व धारणा अधिकाराबाबत संबंधित जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांचेकडून खात्री करून घेते. कोणत्या आधारे विकास परवानगी दिली जाते.
वर्ग 2 जमिनी बाबत, ज्या कायद्याखाली जमीन संबंधित व्यक्तीस प्रदान करण्यात आलेली आहे, त्या कायद्यान्वये वर्ग 2 जमिनीचे वर्ग एक प्रवर्गात रूपांतर करण्यासाठी, आवश्यक असलेला नजराणा जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांचेकडून वसूल केला जातो. व त्या आधारे प्रमाणपत्र विकास परवानगी देण्यासाठी सक्षम असलेल्या नियोजन प्राधिकार याकडे पाठवले जाते. नियोजन प्राधिकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग 2 जमिनीबाबत असलेला नजराणा जमा केले असल्याची पडताळणी करून अशा जमिनीला विकास परवानगी दिली जाते.
नवीन सुधारणा नुसार आपणाला वेगळ्याने अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर....!!
माझा प्रश्न मोजणी विषयक आहे.
गावठाण लगत माझी ४५ गुंठे शेतजमीन आहे. गावठाण मालकाने त्याचे घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी मूळच्या बांधाची नासधूस केली त्यामुळे हद्दीचा वाद उद्भवला.म्हणून मी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्या बद्दल मला फारशी माहिती नसल्यामुळे मी कार्यालयातील एका व्यक्तीचा सल्ला घेतला.त्यावेळी त्यांनी मला गावठाण मालकास नोटीस देता येत नाही असे सांगितले.उत्तरेस गावठाण व पूर्वेस गाडी रस्ता ( वेगळ्या सर्व्हे नंबर मधून) आहे. त्यामुळे फक्त दक्षिण व पश्चिमेकडील सर्व्हे नंबर मालकास नोटीस देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
१) गावठाण मालकास नोटीस देणे अनिवार्य आहे का ?
२) जर असेल तर,मोजणी अर्ज दाखल केल्यानंतर नोटीस देण्यासाठी गावठाण मालकाचे नाव समाविष्ट करायचे असेल तर काय करावे लागेल ( मोजणी येण्यासाठी अजून सहा महिने कालावधी आहे ).
महोदय,
कोणत्याही मिळकतीची मोजणी करण्यासाठी/ सर्वेक्षण करण्यासाठी, भोगवटा धारकाला स्वतःहून लगतच्या खातेदारांना नोटीस देण्याची आवश्यकता नाही. आपण केवळ उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयांमध्ये आपल्या मिळकतीची मोजणी करावयाची आहे या संदर्भातला अर्ज करावा. अर्जामध्ये आपल्या चतुर्सिमा लगतच्या खातेदारांची नावे अर्जात नमूद करा . भूमी अभिलेख खात्याकडून नोटीस देण्याची कार्यवाही केली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.38 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3