जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Krishna shinde
30-08-2020
shindekb95@gmail.com
आम्ही शासकीय सोसायटीध्ये 25 वर्षापूर्वी घर विकत घेतले होते. आम्ही त्यांना पैसे दिले होते. परंतु त्याची खरेदी करायची राहून गेलेली आहे. आणि घर आजुन घरमालक यांच्या च नावावर आहे. आणि घरमालक आता जीवित नाहीत. त्यांचे वारस आहेत परंतु आता ते तयार होत नाही आहे. या विषयी योग्य मार्गदर्शन करावे..
आपले प्रश्न वरून, विक्रेत्याला आपण पंचवीस वर्षांपूर्वी मिळते जी खरेदी किंमत आहे अदा केली आहे. या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये, मिळकतीचे खरेदी दस्त करून घेण्याबाबत आपण कोणतीही कारवाई केली दिसून येत नाही. शिवाय आपण जे त्याला पैसे दिलेले आहेत ते रोखीच्या स्वरुपात दिलेल्या आहेत ती धनादेशाद्वारे दिलेली आहेत ?जागा कोणाच्या ताब्यात आहे याचा तपशील दिलेला नाही. त्यामुळे 25 वर्षानंतर कारवाई करणे अथवा त्याच्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल करणे, मुदतीच्या कायद्याच्या बंधना नुसार कितपत योग्य होईल याबाबत संभ्रम आहे. तथापि आपणाकडे दिलेल्या पैशाबाबत काही लिखित स्वरूपात पुरावा असेल व जमिनीचा ताबा जर अद्याप आपल्याकडेच असेल तर त्या आधारे आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकाल असे मला वैयक्तिकरित्या वाटते. आपणाला झालेल्या विलंबाबाबत मात्र न्यायालयाला वाजवी/ सबळ कारण द्यावे लागेल.
अन्यथा आपण , उपरोक्त कोणतीच बाब विचारात न घेता, मिळकतीवर पंचवीस वर्षापासून प्रतिकूल ताबा असल्याचे न्यायालयात जर सिद्ध करू शकला तर विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ ( The Specific Relief Act 1963 ) खाली आपणास, मिळकतीवर प्रतिकूल ताबा या तत्त्वाच्या आधारे, मालक म्हणून घोषित केले जाऊ शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मेघराज बबन दोडके
29-08-2020
yashikadodke1@gmail.com
नमस्कार सर,.
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही तीन वर्षांपूर्वी लोहगाव, गुरूद्वारा कॅलनी, तालुका हवेली येथे कर्ज काढून एक गुठां जागा घेतली , आम्हाला तेथे राहण्यासाठी घर बांधायचे होते, पण ती जागा नावावर करता येत नाही. वकीलाने सांगीतले की तुकडा बंदी कायदा लागु होतो. ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल. कृपया करून योग्य ते मार्गदर्शन करावे. लोहगाव नगरपालिका हद्दीत सुध्दा तुकडा बंदी कायदा लागु होतो का.
Question by शंतनू देशमुख
28-08-2020
Shantanutroodos@gmail.com
नमस्कार सर, माझे आजोबांना 3 मुले आणि 3 मुली आहेत. आजोबांची स्वकष्टार्जित जमीन मोठ्या चुलत्या च्या नावे खरेदी केली. काही जमीन दुसऱ्या चुलत्याच्या नावे खरेदी केली. वडिलांना मिळालेली जमीन वडिलोपार्जित आहे. 7.5 एकर वडिलोपार्जित जमिनीतील 5 एकर जमीन वडिलांच्या नावावर आहे तर 2.5 एकर ही मधल्या चुलत्याच्या नावे आहे. मोठे चुलते हयात असताना त्यांनी त्यांची जमीन (जी आजोबांनी विकत घेऊन दिलेली होती) ती विकली. चुलते वारल्यावार त्यांचा मुलगा आता वडिलांना वडिलोपार्जित जमिनीत वाटा मागतो आहे. वडिलांच्या नावे सर्वच जमीन वडिलोपार्जित आहे. ही जमीन त्याच्या नावे 25 वर्षांपासून तशीच आहे. आजोबांच्या मृत्यू नंतर मोठ्या चुलत्यांचा मुलगा वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीत हक्क मागू शकतो का? वाटप पत्र झालेले नाही. थोडक्यात तीन मुलांना समान जमीन आली आहे परंतु वडिलांना त्यातील सर्व जमीन वडिलार्जित आली आहे. तर यातून काही मार्ग काढता येईल का? वडिलांनी ती जमीन आईच्या नावे केली तरी चुलत्यांचा, आत्यांचा हक्क त्या जमिनीवर राहील का?
हिंदू अविभक्त जमिनीचे वाटप झाल्यावर , ज्याला अशी जमीन मिळते ती जमीन त्याचेकडे स्व-कष्टार्जित म्हणून त्याचेकडे राहते . त्यामुळे आपले चुलते किंवा त्यांची मुले यांना कोणताही अधिकार नाही .
वाटप जर २००५ पूर्वीचे असेल तर आत्यालाही कोणताही अधिकार राहत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kunal
26-08-2020
kkarnawat2803@gmail.com
तलाठी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी या पदांवरील व्यक्तींविरुद्ध CrPC 197 अंतर्गत अभियोजनपूर्व परवानगी साठी सक्षम अधिकारी कोण असतो?
Question by दिपक घुले
25-08-2020
ghuleagrosales@gmail.com
नमस्कार सर..
आम्ही नगरपालिकेच्या हद्दीत नोव्हेंबर २०१९ मध्ये २.५ गुंठे क्षेत्र वाणिज्यक कारण खरेदी केले आहे, सदर जागेचा स्वतंत्र महसूल उतारा (२.५ गुंठ्यांचा) व नगरपरिषद उतारा २०१९ मध्ये जुन्या जमीन मालकाच्या नावे होता. सदर जागेची नोंद लावण्यासाठी गेलो असता मा. तलाठी साहेब यांनी तुकडा बंदी कायद्यातंर्गत चौथाई भरण्यासाठी सांगितले (कारण सदर जागेचा तुकडा २०१७ पुर्वीचा आहे असं सांगितलं ). परंतु तुकडेजोड तुकडेबंदी सुधारित अधिनियम २०१६ कलम ८ (ब) प्रमाणे तुकडेजोड तुकडेबंदी कलम ७, ८, ८-अ यांच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
कृपया मार्गदर्शन करावे..
Question by नितीन काळे
25-08-2020
kalenitin129@gmail.com
सर माझ्या शेजारच्या शेतातुन रस्ता आहे आणि तो तलाठी नकाशा मध्ये सुद्धा आहे 40वर्षे जुना आहे पण भुमी अभिलेख नकाशा मध्ये रस्ता माझ्या शेतात दाखवतो पण तो कधि चालु नव्हता आता शेजारी जाऊ देत नाही काय मार्ग निघेल
आपण आपल्या शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून जाण्यासाठी आपल्याला जर परंपरागत वहिवाटीचा रस्ता असेल होतो आपण वर्षानुवर्षे वापरत असावा आणि जरी तू आता गाव नकाशावर त्यांच्या शेतामध्ये दिसत नसला तरी ते आपणाला त्या रस्त्याचा वापर करण्यापासून प्रतिबंध करू शकत नाही. आपण मामलेदार कोर्ट अधिनियमांतर्गत रस्ता बंद केल्यामुळे तुम्ही शेती वर जाऊ शकत नाही तो खोला करून मिळावा असा दावा मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयात दाखल करा. निश्चित आपल्याला न्याय मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by S.m.pawale
24-08-2020
pawalenath@gmail.com
नमस्कार सर,हिंदू कुंटुबातील(वडील नाहीत) ईतर सर्व (4मुली1मुलगा)हिस्सादाराने आई हिस्सादारास शेतजमिन हाकसोड दिलेले आहे. "त्याच्या नंतर " एका हिस्सादारास सदरील शेतजमिन त्याच्या नावाने करायची आहे .सदरील गोष्टीस आईची संमती आहे .परंतु सदरील शेतजमिनीवर अगोदरच हाकसोड दिलेले आहे आता ती परत नावाने करण्यासाठी काय करावे .
मिळकतीमध्ये मध्ये असलेला आपला हक्क जर नोंदणीकृत दस्ताने सोडून दिला असेल, तर पुन्हा त्यामध्ये जर आपले नाव समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी तेवढेच क्षेत्र आपल्याला नोंदणीकृत दस्ताने खरेदी करावे लागेल. नोंदणीकृत दस्त आधारे नाव सातबारा सदरी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश देमुंडे
24-08-2020
mytoday121@gmail.com
नमस्कार,
आमचे 7/12 वर काही क्षेत्र पोटखराब म्हणून नोंद आहे तथापि सध्या 7/12 वरील सर्व क्षेत्र बागायती आहे, तरी 7/12 वरील सदर पोटखराब क्षेत्र बागायती म्हणून दुरुस्त करता येईल काय?
सातबारावरील पोटखराबा दाखवलेले क्षेत्र कमी करण्यासाठी आपणाला आपल्या तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल. नुकताच महाराष्ट्र शासनाने पोट खराबा जमिनीचे क्षेत्र वहिवाट योग्य जमिनीमध्ये करण्याची कार्यपद्धती शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेली आहे. त्याआधारे मेहरबान तहसीलदार साहेब प्रकरणाची चौकशी करून याबाबत निर्णय घेतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul Tupe
23-08-2020
tuperahul87@gmail.com
आम्ही गाव मौजे चांदिवली येथे दिनांक 12/12/20005 रोजी सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकती खरेदी केल्या त्यापैकी 1) सर्व्हे नं. 42/11 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात कोणताही शेरा नव्हता. 2) सर्व्हे नं. 42/13 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) कायदा 1975 चे कलम 22 अन्वये सेक्शन 35 मधून वगळन्यात आला असा शेरा होता. सदर खरेदीखताची नोंद करण्यापूर्वी सदर सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकारात नंतर वन संवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदीस पात्र असा शेरा आला. तरी माझा प्रश्न असा आहे कि सदर खरेदीखताची नोंद होऊन आमचे नाव मालक कब्जेदार सदरी दाखल होईल का?
Question by अशोक वाघमारे
22-08-2020
ashokwaghmare9999@gmail.com
आमच्या गावाचे सरपंच यांनी शासनाची गायरान जमीन ही ग्रामपंचायत च्या नमुना 8 रजिस्टर ला लावलेली आहे.माझ्या निदर्शनास आल्यावर मी तक्रार अर्ज परभणी जिल्हाधिकारी यांना दिला आहे हे सरपंच यांना समजताच त्यांनी मासिक मीटिंग घेवून ती जागा रद्द केली आहे. त्यांना शासकीय जमीन लावण्याचा अधिकार आहे का.आणि त्यांनी पदाचा दुरुपयोग केला तर त्यांचे पद रद्द होते जा
Question by अनिल बाळकृष्ण जोशी
21-08-2020
abjoshi.1976@rediffmail.com
सर नमस्कार '
मूळ मालकाने जमीन एन ए केल्यावर रहिवास प्रयोजनासाठी परवानगी मिळाल्यानंतर प्लॉट पडल्यानंतर मुळ मालकाचा मोकळ्या खुल्या भूखंडावर त्याचा अधिकार असतो काय ?एखादया सेवाभावी शैक्षणिक संस्थेस ग्रामपंचायतीला खुल्या भूखंडा बाबत ताबा पावती करून देण्याचा अधिकार असतो का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे .
Question by Himanshu Dixit
20-08-2020
himanshudixit188@gmail.com
सर नमस्कार,
माझा प्रश्न असा आहे की, जमीन क्षेत्र 10 गुंठे असे सामाईक क्षेत्र आहे त्या पैकी एक जणाचा हिस्सा खरेदीखत झाले आहे तरी त्याची तलाठी व सर्कल 7/12 व फेरफार नोंदणीसाठी काय उपाययोजना करावी??
Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन ही खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ते परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल
Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com
नमस्कार सर माझा असा प्रश्न आहे की की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ती परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल
Question by Amol
19-08-2020
amolsalunkhe@rediffmail.com
आमची कोरेगांव तालुक्यात शेती आहे. शेतीचा online 7/12 पहात असताना त्यावर " या 7/12 वर शेवटचा फेरफार 3715 हा प्रमाणित झाला असून मंडळ अधिकारी यांनी 7/12 वर योग्यरित्या अंमल झाला आहे याचे confirmation करणे बाकी आहे याची नोंद घ्यावी” असा मजकूर येत आहे, परंतू सदर 3715 या फेरफारची नोटीस 'आपली चावडी' या संकेत स्थळावर आजतागायत प्रसिद्ध झालेली नाही (त्याच्या मागच्या पुढच्या फेरफार नंबरच्या नोटीशी प्रसिद्ध झालेल्या आहेत) त्याबाबत तलाठी यांना विचारले असता तो रेकॉर्ड दुरुस्तीचा फेरफार आहे.असे मोगम उत्तर दिले आहे. परंतू याबाबत आम्हाला शंका वाटते.
याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by रविंद्र सुरेश परीट
19-08-2020
raviparitkogil@gmail.com
नमस्कर सर ,
अमच्या जमिनिचे वाटनीपत्र २०११मध्ये झाले आहे. पण उतय्रावर त्याची नोंद नाहि . ती नोंद करन्यासाठी कय करावे ? .
आपले वाटप पत्र जर नोंदणीकृत असेल, तर ते आपल्या गावच्या तलाटी महोदयांच्या कडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा. जर वाटप पत्र हे दिवाणी न्यायालय मार्फत झालेले असेल, तर त्याच अंतिम हुकूमनामा मुद्रांकित करून घ्या व मुद्रांकित झालेला हुकूमनामा तलाठी यांच्याकडे सादर करा. जर वाटत हे मेहरबान तसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये झालेले असेल, तर तो आदेश मेहेरबान तलाठी साहेब यांच्याकडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित बबन सुपेकर
19-08-2020
sujitbsupekar@gmail.com
सर, नमस्कार,
मी सुजित बबन सुपेकर, राहणार केडगाव ता. दौंड, जि.पुणे. मी 2016 साली 4 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. सदर जमिन हि पानशेत धरण ग्रस्त साठी संपादन झाली होती. मूळ मालक यानी सदर भोगवटा शासकीय नियमा नुसार सर्व कागद पत्रांची पूर्तता करुन वर्ग 1 करुन आम्हाला खरेदी खत करुन दिले आहे. 1982 साली सदर व्यक्तीचा आई ने या जमिनीचे 20 रु चा स्टंप पेपर वर कुलमुखत्यार व गहाण खत करुन शेजारील शेतकर्याला दिले होते त्यावर 50 वर्ष मुदत आहे..फक्त नोटरी आहे.सदर व्यक्तीची आई व तो शेतकरी 1998 व 2000 साली मयत आहेत. सदर जमिनीचा कागदोपत्री मला ताबा आहे, परंतू प्रत्यक्षात मात्र ताबा नाही, मी बरेच प्रयत्न केले गाव पातळी ला तसेच मी शासकीय मोजणी पोलिस बन्दोबस्त घेउन केली आहे..क प्रत मिळालेली आहे, पुनर्वसन चे 1972 साल चे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नकाशे उपलब्ध असुन हि मला जमिनीचा ताबा मिळत नाही...मी ज्यांचा कडून खरेदी केली आहे ती व्यक्ती सुद्धा मयत झालेली आहे... 7/12 ला माझा नावाची नोंद आहे, मी पिक कर्ज सुध्हा वापरत आहे..शेजारील शेतकर्यचा घरातील मुले, नातवन्ड़े या जमिनीशी काहीही संबंध नसताना, त्यांचाकडे काहीही कागदपत्रे नसताना तिथे येण्यापासून मज्जाव करत आहेत... पोलिस स्टेशन ला बर्याच तक्रारी नोंद दिल्या आहेत तरी सुद्धा काहीही होत नाही.. तरी सदर जमिनिवर ताबा घेण्यासाठी मी कोणत्या पद्धतीने जावे या बद्दल मार्ग दर्शन करावे हि नम्र विनंती..
माझा मो. नं 9970239087/ 9834845589 हा आहे, तसेच email I'd: sujitbsupekar@gmail.com हा आहे..
मी गेली 5 वर्ष प्रयत्न करुन थकलो आहे..तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे राहिल सर..
सुपेकर साहेब, या माध्यमातून आम्ही फोनद्वारे आपल्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाही. जी माहिती आमच्याकडे आहे की आपणाला आम्ही देण्याचा प्रयत्न याच माध्यमाद्वारे करत असतो.
महाराष्ट्र मुन्द्रांक अधिनियम १९५८ च्या कलम ३४ अन्वये , कोणत्याही दस्तावर यौग्य व यथोचित मुन्द्रांक शुल्क जमा केले नसेल तर , असा दस्त पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही . गहाण खत व कुल मुखत्यार पत्र नोटरी समोर केलेले आहे . अश्या दस्तास पुरावा म्हणून वापर करता येऊ शकत नाही . त्यामुळे तो शेतकरी या जमिनीचा मालक होत नाही .
आपण हि जमीन नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी केली असेल तर , विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ च्या कलम ५ अन्वये व दिवाणी संहिता अधिनियम अंतर्गत आपणास मालक म्हणून घोषित करणे व त्याद्वारे मिळकतीचा ताबा देण्या बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा .
मात्र ज्या पुनर्वसन कायदा खालील हि जमीन आहे त्यासाठी आवश्यक त्या परवानगी घेतलेल्या असणे आवश्यक आहे . मात्र त्यामुळे दावा दाखल करणे व त्या द्वारे मालकी घोषित करून , ताबा मिळवण्यासाठी अडचण येणार नाही मात्र , पुनर्वसन कायद्याच्या विरुद्ध व्यवहार असल्यास , तो नियामानुकुल करून घेणे हि नन्तर आवश्यक ठरेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महमंद-हानिफ अब्दुल इनामदार
16-08-2020
inamdarhsan786@gmail.com
सर माझ्या जमिनी पैकी दोन गुंठे क्षेत्र 7/12 वर समाईक दाखवते पण मी सरकारी मोजणी केली आहे त्यात पण एक गुंठे क्षेत्र दाखवले व फाळणी नकाशात पण एक गुंठे दाखवते समोरच्या व्यक्ती ते क्षेत्र मला देत नाही मी काय करू
आपण आपल्या जागेची मोजणी केली आहे . त्याप्रमाणे भूमी अभिलेख खाते यांना , हद्दी निच्छित करून देण्याबाबत विंनती करा . त्यांनी हद्दी दाखवून देल्यावर , नक्की आपली जागा त्यांचे ताब्यात आहे हे कळून येईल . त्या नन्तर त्यांना ताबा देण्यास सांगा . नाही दिला तर न्यायालयात ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल सुरेश पाटील
16-08-2020
Amolpatil3219@gmail.com
सर,,,माझ्या पूर्वेकडील ग न 1113ची विक्री झाली असूनते 94 अधिक 2 गुंठे पोट खराबा सह विक्री केला आहे परंतु ती जमीन मोजणीमध्ये जास्त भरली (6 गुंठे) सदर जमीन हि खरेदीदारने अकृषक करून त्यात प्लॉट पाडले व अतिरिक्त 6 गुंठे मध्ये विक्री करणाऱ्या मालकाने अतिक्रमण केले आहे व जाण्या येण्यास रस्ता नाही आहे, तरी काय करावे
अतिरिक्त जागा हि मंजूर अभिन्यासाचा भाग आहे का ? असल्यास त्या अभिन्यासामध्ये जे रस्ते दाखवलेले असतात ते , स्थानिक स्वराज्य संस्थेकडे निहित होतात व ते सर्वांसाठी खुले असतात . त्या रस्त्यांचा वापर करा .
जी जागा अतिरिक्त आहे ती कोणाच्या माल्कीचीमाल्कीची आहे ते सिद्ध करणे आवश्यक . त्या नन्तर त्याचा ताबा मागणे न्यायालयामार्फत आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बालासाहेब वनवे
16-08-2020
balawanave@gmail.com
सर, जमीन खरेदी दस्त झाल्यावर त्या खरेदी दस्ताचा रद्द लेख करता येतो का.सर
होय करता येतो . मात्र पुन्हा तेवढेच मुन्द्रांक शुल्क किंवा त्यापेक्षा जादाचे भरावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dr.Pratik Kadam
15-08-2020
pratikkadam2105@gmail.com
आम्हाला आमच्या घरापुढची जागा(21×33) अंगण आहे तर ते आम्हाला आमच्या नावे नोंद होण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ला रितशीर अर्ज केला पण त्यांनी नामंजूर केला त्यासाठी आम्ही पुढे काय केले पाहिजे म्हणजे ग्रामपंचायत ला त्याची नोंद घ्यावी लागेल काहीतरी उपाय सांगा ..पुढे आम्ही कुठे जाऊन अर्ज करू की त्यामुळे ग्रामपंचायत त्याची नोंद घेईल...काहितरी पर्याय किंवा उपाय सांगा
महाराष्ट्र पंचायत कायदा 1958 च्या कलम 55 अन्वये, ग्रामपंचायतीकडे निहीत झालेल्या मिळकतींची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ त्या ग्रामपंचायतीस आहे. ग्रामपंचायतीने एखादी मालमत्ता खाजगी व्यक्तीस हस्तांतरीत किंवा भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतल्यास, त्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीची आवश्यकता असते. \
आपल्या प्रकरणांमध्ये सुरुवातीलाच ग्रामपंचायतीने आपल्या घरापुढील अंगण हस्तांतरित करण्यासाठी / आपले नावावर करण्यासाठी संमती दिलेली नाही .जागा देणे अथवा न देणे , पंच्यातीचा पूर्ण अधिकार आहे . आपण काहीही करू शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by RUPESH MANDEKAR
15-08-2020
rupsmandekar2100@gmail.com
माझ्या वडिलांकडून २००७ साली ४०आर क्षेत्राची विसार पावती करुन घेतली होती.विसार पावती रजिस्टर नाही.विसार म्हणुन काही रक्कम चेक ने दिली होती.त्यावेळी वडिलांनी विसार पावतीची मागणी केली असता उद्या देतो म्हणून सांगितले व नंतर वेळोवेळी मागणी करूनही विसार पावती दाखवली अथवा दिली नाही व व्यवहार ही पूर्ण केला नाही.अाम्ही २००८ मधे जाहीर पेपर नोटीस काढून व त्यालाही वैयक्तिक नोटीस पाठवून व्यवहार रद्द करत अाहोत असे म्हटले.त्याला त्याचे काहीही उत्तर आले नाही.त्याने AUG २०२० मध्ये अाम्हाला नोटीस पाठवून तुम्ही मोजणी व कंपाऊण्ड घालून नाही दिले,सातबारावरचा बोजा कमी करुन दिला नाही म्हणून व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही तरी या गोष्टींची पूर्तता करुन द्या व व्यवहार पूर्ण करायला तयार आहे असे म्हणतोय.अाम्हाला आता जमीन विकायची नाही व त्याचा विसार म्हणून घेतलेली रक्कम ही द्यायची तयारी नाही, तरी यात काय होऊ शकते..
आपले प्रश्नावरून आपल्या वडिलांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र काही रक्कम स्वीकारून दुसऱ्या व्यक्तीला विकलेले आहे. जे क्षेत्र वि केलेले आहे त्या क्षेत्राचा ताबा हा त्या व्यक्तीकडेच असल्याची दिसून येते. ईसार पावती ने आपण क्षेत्र विकले आहे असे नमूद करत आहात व काही रक्कम ही धनादेशाद्वारे ही दिली असल्याचे आपण नमूद केलेले आहे. प्रश्न असा आहे की या विसार पावती वर अथवा ईसार पावती वर, वडिलांच्या मालकीचे क्षेत्र त्यांना विकण्या बाबत चा मजकूर नमूद केलेला आहे का ?
असा मजकूर असल्यास , ती व्यक्ती विनिदिर्ष्ट अनुतोष कायदा १९६३ च्या कलम १० अन्वये , इसार पावती आधारे , जमीन विक्री करून मिळणे बाबत , न्यायालयात दावा दाखला करू शकते . न्यायालय आपणास या जमिनीचे विक्री खात करून देण्यास फर्माऊ शकते .
तसेच ताबा दिला असल्यास , मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ , कलम ५३ अ अन्वये आपणाला या मिळकतीत फारसा हक्क राहत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by omprakash
15-08-2020
computerom94@gmail.com
1) पुंडलीक सिताराम सराफ (मयत) 2) ज्ञानेश्वर सिताराम सराफ 3) हरिहर सिताराम सराफ 4) रामकृष्ण सिताराम सराफ 5)गणेश सिताराम सराफ
ग.भा. व्दारकाबाई पुंडलीक सराफ वरील अर्जदार लक्ष्मण बापुजी सराफ यांचे वारस असुन हे सर्व 32 वर्षापासुन ते आजपर्यंत वाहीतदार आहेत तसेच खरे मालक आहेत गिरजाबाई ही गंधर्वाची पत्नी असुन हीचा आणि लक्ष्मण बापुजी सराफ 1) सदाशिव लक्ष्मण सराफ 2) सिताराम लक्ष्मण सराफ 3) नामदेव लक्ष्मण सराफ लक्ष्मण बापुजी सराफ यांनी सिताराम आणि नामदेव यांचा सांभाळ करण्यासाठी गिरजाबाई हिच्याशी गंधर्व विवाह केला आणि तिच्या अन्न, वस्त्रा करीता शेत सर्व्हे नं. 140 यामधील पुर्वेकडील 6 एकर शेताचे 30/03/1932 रोजी व्यवस्थापत्र केले. जुलै 1932 मध्ये त्यांच्या इस्टेटची तोडी वाटणी केली त्यामध्ये सर्वे नं. 140 मधील पुर्वेकडील 12 एकर शेती सिताराम यांच्या हिश्यावर दिले. सिताराम यांच्या हिशातील 6 एकर शेतीचे 30/03/1932 रोजी व्यवस्थापत्र केले. त्यानुसार गिरजाबाई जिवंत असे पर्यंत त्या शेताचा उपभोग घेऊ शकत होती. त्यानंतर ही शेती सिताराम याला मिळणार होती. परंतु गिरजाबाई हि सिताराम व नामदेव यांना चांगल्या प्रकारे वागवीत नव्हती त्यामुळे गिरजाबाई करीता केलेले व्यवस्थापत्र दि. / /1933 मध्ये रद्द केले. आणि 1935 मध्ये लेखी वाटणी पत्र करुन रजिस्टर केले. पण ही गोष्ट सिताराम ह्याला माहिती नव्हती. त्यानंतर 20/10/1973 मध्ये सिताराम ह्यांचा मृत्यु झाला. पण शेती गिराजाबाई ल. सराफ (गधर्वाची पत्नी) हिच्या ताब्यात होते व त्या शेताचा ति उपभोग घेत होती. पुढे गिरजाबाई हिने हे 90 रुपयात बँकेकडे (सोसायटी) सदर शेत गहान ठेवले. त्या कर्जाच्या परतफेडी करीता शेताची हर्रासी करण्याचा घाट सोसायटीने रचला. तेव्हा सिताराम यांचा मोठा मुलगा पुडंलीक सिताराम सराफ व इतर चार भावंडे यांनी मा. दिवाणी न्यायालयात वाटणी पत्र व व्यवस्थापत्राच्या आधारे मुकदमा दाखल केला. परंतु व्यवस्थापत्र रद्द झाले असल्याचे पुंडलीक सिताराम सराफ ह्यांना माहीत नसल्या कारणामुळे व्यवस्थापत्रानुसार न्यायालयाने ह्या शेताचे कर्जाचे पैसे पुंंडलीक याने भरावे व गिरजाबाई हीने यांनतर सदर शेत गहान ठेवणे, विकणे, बक्षिस देणे याचा अधिकार गिरजाबाई कडून काढून घेतला व पुंडलीक सि. सराफ ह्याच्या बाजुने प्रकरण खारीज करण्यात आले. (कारण गिरजा ल. सराफ (गधर्वाची पत्नी) जिवंत होती.) तिच्या मृत्युनंतर तिन दिवसांनी सदर शेतावर सिताराम ल. सराफ यांची मुले पुंडलीक सि. सराफ व इतर चार भावंडे यांनी 1980 मध्ये ताबा घेतला. (तेव्हापासुन आज पर्यंत सिताराम ल. सराफ यांची मुले 1)पुंडलीक सि. सराफ 2) ज्ञानेश्वर सि. सराफ 3) हरीहर सि. सराफ 4) रामकृष्ण सि. सराफ 5) गणेश सिताराम सराफ) वाहीती करीत आहेत.) त्यानंतर पुंडलीक सि. सराफ यांनी गिरजाबाई ल. सराफ हिच्या मृत्यु दाखला संबंधीत कार्यालयात जमा करुन फेरफारीचा अर्ज दाखल केला. त्यानुसार फेरफार केली. व सिताराम ल. सराफ यांचे वारसांची नावे 7/12 वर चढवण्यात आली. परंतु शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सिताराम सराफ यांच्या वारसांच्या नावावर काट मारुन कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तसेच गिताबाई हिचा कोणत्याही प्रकाराचा फेरफारी संदर्भात अर्ज नसतांना तसेच ह्या शेतीसी काहीही संबध नसणाऱ्या गिताबाई नामदेव अंबाळे हिचे नाव 7/12 वर चढवण्यात आले. हे नाव पाहुन पुंडलीक सिताराम सराफ ह्यांनी लगेच संबंधीतांना फेरफार मध्ये झालेल्या चुकी दुरुस्त करण्यासाठी विनंती अर्ज केले. परंतु संबंधीत तहसीलदारांनी हेतुपुरस्कर पणे त्यांचे अर्ज फेटाळून लावले. पुंडलीक सि. सराफ यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सुध्दा विनंती अर्ज केला. परंतु नायब तहसीलदार यांच्या कडून पत्राचे उलट असे उत्तर आले की, आपला संबंध दुरचा आहे. गिरजा लक्ष्मण सराफ (गंधर्वाची पत्नी) हिची मुलगी गिता नामदेव अंबाळे हिच वारस आहे. आणि 7/12 वर गिताबाई नामदेव अंबाळे हिचे नाव पडले. परंतु सदरहु शेती पुंडलीक सि. सराफ, ज्ञानेश्वर सि.सराफ, हरीहर सि.सराफ,रामकृष्ण सि. सराफ, गणेश सिताराम सराफ हेच वाहीती करीत होते. गीताबाई नामदेव अंबाळे हिचे 7/12 वरील नाव काढण्याचे बरेचदा पुंडलीक सि. सराफ यांनी विनंती अर्ज सादर केले. परंतु कोणीही त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला नाही. नंतर सन 2005 मध्ये गिताबाई नामदेव अंबाळे हिचा मृत्यु झाला. तेव्हा सुध्दा पुंडलीक सराफ यांनी विनंती अर्ज केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आणि 2006 मध्ये पुंडलीक सिताराम सराफ यांचा मृत्यु झाला. त्यांनंतर त्यांची पत्नी व्दारकाबाई पुं. सराफ यांनीही प्रयत्न सुरुच ठेवले. 2008 मध्ये गिताबाई नामदेव अंबाळे हिची मुलगी कुसुमबाई बाळकृष्ण मेहेर हीचे नाव 7/12 वर शासनाच्या कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन चढवीण्यात आले. त्यांनतर व्दारकाबाई पुंडलीक सराफ व इतर चार जणांनी मा. तहसिलदार मुर्तिजापूर यांना फेरफार रद्द करण्याचा अर्ज केला. त्यांनी सुध्दा केलेल्या अर्जाचा पुर्णपणे विचार न करता सदर फेरफार मध्ये बदल करण्याचे प्रकरण आमच्या आखत्यारीत येत नाही. तसा आम्हाला अधिकार नाही असे पत्रच मा. नायब तहसिलदार यांनी दिले. आता कुसुमबाई बाळकृष्ण मेहर हिने सदर शेत विकण्याचा घाट रचला आहे.
त्यानंतर प्रविण सराफ याने पुंडलीक सिताराम सराफ व इतर चार जणांनी दाखल केलेला 1974 चा मुकदमा वाचला आणि जिल्हा सत्र न्यायालय अकोला येथुन पुर्ण मुकदम्याचे निशानी असलेले दस्ताऐवज आणले. विशेष म्हणजे आजही मौजे हिरपूर येथील शेत.स. न. 140 गट क्र. 365 हे शेत सिताराम लक्ष्मण सराफ यांची पाचही मुले 1) पुंडलीक सिताराम सराफ (मयत 2006) नंतर व्दारकाबाई पु. सराफ(मयत 2017) नंतर मंदा दिलीप आमले (पुंडलीक सराफ यांची मुलगी) 2) ज्ञानेश्वर सिताराम सराफ 3) हरीहर सिताराम सराफ 4) रामकृष्ण सिताराम सराफ 5) गणेश सिताराम सराफ हेच सदर शेती वाहती करीत आहेत. तसा पुरावा त्यांच्या कडे उपलब्ध आहे.
Question by Rahul Tupe
15-08-2020
tuperahul87@gmail.com
आम्ही सन 1940 पासुन देवस्थानाची जागा खंडाने करत होतो. तदनंतर सदर जागा आम्ही देवस्थानाकडून सन 1965 साली खरेदी घेतली सदर खरेदीखतास आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या त्यावेळी घेतल्या होत्या. सदर खरेदीखताची नोंदीचा फेरफार मंजूर झाला परंतु 7/12 उताऱ्यावर आमचे नाव आले नाही. तहसीरदारांकडे अर्ज रिजेक्ट झाला सदर केस मध्ये काय करावे लागेल इतर अधिकारात नावाची नोंद आहे संरक्षित कुळ म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नोंद आहे. सदर व्यक्ती(संरक्षित कुळ) व आमचे आजोबा वर नमूद केलेल्या खरेदीखत मध्ये खरेदी घेणार आहे.
The Exemptions from Land-Revenue (No. 1) Act, 1863, Bombay Act No. 2 of 1863 च्या नियम ८(३) नुसार , देवस्थान जमीन हस्तांतरित करता येऊ शकत नाही . त्यामुळे आपले नावे ३२ग़किंमत निच्छित होणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विठ्ठल चव्हाण
14-08-2020
vitthalchavhan3568@gmail.com
नमस्कार सर, माझ्या वडील आणि आजीच्या नावे शेती (एकाच 7 बारा वर नावे आहे )आहे. आजीची मयत झालेली आहे. आजीला तीन मुली आहे. आजीचे नाव असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यास अडचण येतं आहे. तरी सात बारा वरील नाव कमी करण्यास काय करावं.
आजी मयत असल्याबाबत मृत्यू दाखला प्राप्त करून , तलाठी यांचेकडे सादर करा . आपल्या वडिलांचे व तीन आत्यांची नावे दाखल करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आजी मयत असल्याबाबत मृत्यू दाखला प्राप्त करून , तलाठी यांचेकडे सादर करा . आपल्या वडिलांचे व तीन आत्यांची नावे दाखल करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
