जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय, माझ्या वडिलांनी त्रेचाळीस गुंठे शेतजमीन एका शेतकऱ्याने शेतकऱ्याकडून भोगवटा वर्ग वनची विकत घेतली आहे. सदर शेतकऱ्याकडे वारस हक्काने शेतजमीन प्राप्त झाली होती. माझ्या वडिलांना सदर शेत जमिनीचे सर्व क्षेत्र सर्वांच्या सहमतीने विकले असताना एका व्यक्तीच्या नावे काही गुंठे दाखवण्यात आले होते. त्याचा फायदा घेत त्या वारस व्यक्तीने तेवढे क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे सदर व्यक्तीचे नाव सातबारा वरून कसे कमी करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी
७/१२ वर जेवढे क्षेत्र नमूद आहे , तेवढ्याच क्षेत्र खरेदी दसतात नमूद करण्यात आले असेल तर , महाराष्ट्र जमीन मह्सील अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्तीचा अर्ज मेहेबन माम्लेतदार यांचेकडे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजीची आई हि मौजे राई,जिल्हा ठाणे येथील, तेथील वडीलोपजित जमिनीवर ५ भाऊ व २बहिणी वारस होते. पण ५ भावाने वडील वारल्यानंतर ७/१२ ला भावाची नोंद करून २ बहिणीची नोंद केली नाही., आजतागत भावाची नावे ७/१२ सदरी आहेत तरी २ बहिणीचा अधिकार लागतो का?? व त्या साठी कुठे अपील करावा ते सांगावे.
हो बहिनान अधिकार आहे . त्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . ज्या फेर्फाराने केवळ भावांची नावे लागली आहेत त्या विरुद्ध अपील दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार, माझे आजोबांचे नावे 1970 सालापर्यंत 16 एकर क्षेत्र सर्वे नं 22 मध्ये होते. त्यामध्ये 20 गुंठे वस्तीपड होती व 12 खोलींचे घर होते. सन 1971 साली आजोबांनी 4 मुलांच्या नावे प्रत्येकी 4 acer क्षेत्र केले फक्त खातेफोड केली. व वस्तीपड जागेची प्रत्येकी 5 गुंठे सर्वे नं 22 सातबारा वरती नोंद केली, परंतू 1973 साली सर्वे नं 22 चे चार गट चार मुलांचा हिस्सा नुसार अनुक्रमे 75,76,77,78 पडले. सदर वस्तीपड 20 गुंठे हि गट नं, 75 मध्ये आहे. सदर गट नं पडल्यानंतर वस्तीपड जागेची नोंद गट नं 75 च्या मुलाने परस्पर रद्द केली. सदर जागेत उर्वरित 3 मुलांचे घर आहेत व त्याची ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे. व ती घर गट नं 75 चा मुलगा पाडत आहे. तर उर्वरित 3 मुलांनी काय करावें . कृपया मार्गदर्शन करावे.
अधिकार अभिलेख पत्रकी ( ७/१२ चा न न १२ ) ला केवळ पिकांच्या नोंदी घेतल्या जातात . त्यामुळे त्याठिकाणी वस्तीपड नोंद घेणे अभिप्रेत नाही . आपल्या घराची नोंद ग्रामपंचायत अभिलेख सदरी आहे हे पुरेसे आहे . आपला हक्क त्यामुळे जतन होत आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नगर परिषद हद्दितिल विकास आराखड़ा मंजूर झालेल्या ७/१२ ला बागायती शेती म्हनून नोंद असलेली शेतजमिन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय शेतकरी नसलेल्या शिक्षण संस्थेला बक्षीसपत्र करुन देणे विधिअग्राह्य असेल काय ? याबाबत मार्गदर्शन करावे.
हो निच्छित . महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ - ( 1C) नुसार , नगरपालिका हद्दीत स्थित जमिनीला कलम ६३ च्या तरतुदी लागू होत नाही . त्यामुळे शिक्षण संस्थेला बागायती शेत जमीन हस्तांतरण करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुकडेजोड व तुकडी बंदी कायद्यानुसार शेत जमिनीचा व्यवहार झाल्यास कीती दिवसांत तो व्यवहार रददबातल होतो


सध्या परिस्थितीत जमिनीचा तुकडा पडत असेल तर अश्या जमिनीचे दस्त नोंदणीकृत होत नाही .
तसेच अश्या जमिनीचे नोंदणीकृत दस्त झाल्यास , व्यवहार रद्द होत नाही तर , खरेदी खत निष्फळ होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, सर्व्हे नंबर २७ मध्ये १२एकर १२ गुंठे मुळ शेतकऱ्याच्या नावे होती.त्यातील आजोबांनी (१९६५)लावला ६ एकर जमीन विकत (खरेदी) घेतली आहे.त्याची सातबारा नोंद लावला करण्यात विलंब झाला.नंतर त्या शेतकऱ्यानी शिल्लक राहिलेली जमीन xy व्यक्तीला (१९६७)ला ६एकर १२ गुंठे विकली .गट एकत्रीकरणामध्ये गट नंबर ११५ मध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली वxy व्यक्तीच्या नावे ६एकरची १२ गुंठे नोंद झाली. आज फक्त गट ९एकर १२गुंठे आहे. तर ३ एकर जमीन ही तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने झाली आहे . तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने त्याची मुळं जमीन कमी आहे . तसेच भुमी अभिलेख विभागात जाऊन पाहणी केली व प्रत घेतील आहे तर ३ एकरची कशाप्रकारे नोंद करण्यात येईल.कारण गट एकत्रीकरण मधील चुक दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे अपील करावे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत कायद्या अंतर्गत दुरुस्तीची तरतूद नाही . केवळ पूर्ण योजना ( Scheme) हि सदोष , अयोग्य असेल किंवा लेखन प्रमाद चूक अथवा गणितीय चूक असेल ज्यामुळे , पूर्ण योजनेवर कोणताही परिणाम होणार नसेल तरच दुरुस्ती होते . आपली चूक दुरुस्त होणे अशक्य वाटते . शिवाय मुदतीच्या कायद्याची बाधा हि आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्या गावात आम्ही राहतो तीथे 7 पिढ्या गेल्या असून 1गुंठा जमिन आमच्या मालकीची असून त्या जागेचा कर आम्ही भरतो.त्या जागेत मूळ घर आहे पण अंगणासमोरील 1 गुंठा जागा जमिन मालकाने पुवॆंजाना तोंडी दिली होती त्या जागेत आमचा 30 वषाॆंपासून वावर आहे आणि आमचा वडीलोपाजिॆत गोठा त्याठीकाणी 30 वषाॆंपासून आहे .पण आमच्याकडे कागदोपञी काही पूरावा नाही.आणि आता आमच घराच बांधकाम चालू आहे आम्ही घर 10 फूट पूढे घेत आहोत पण जमिन मालकाने घर बांधकाम अडवले आहे घर मागे घेन्यास सागत आहे तर अंगणासमोरिल जागा कूळ कायद्याने ताब्यात कशी घेता येईल? 100 रू. च्या bondpaper त्याने लिहून दिले होते पण नोटरी नाही आमच्याजवल..मागॆदशॆन करावे.
आपली जागा अथवा घर हे गावठाण जागेत असेल व आपण त्या जागेवर गेले ७ पिढ्या राहत असाल तर अन्य दुसरा मालक कसा असू शकतो ? ग्रामपंचायत अभिलेख तपासून घ्या . त्यामध्ये आपल्या घराच्या पुढील जागेला , आपल्या पूर्वजांची नावे असतील तर , दुसर्या कोणाशी आपणाला अडवण्याचा अथवा आपल्या प्रस्तावित बांधकामास अडथला करण्याचा अधिकार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
सर्वे नंबर ३७ मधील एकुण जमीन १२एकर १२ गुंठे तर त्यातील ६ एकर जमीन आजोबांनी १९६५ लावला विकत घेतली आहे.उरलेली जमीन दुसऱ्या शेतकरी यांनी १९७२ लावला ६एकर१२ गुंठे घेतली आहे.तर गट एकत्रीकरणामध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली आहे.आज गटामध्ये ९ एकर१२ गुंठे नोंद आहे. तर ३एकरची नोंद होऊ शकते का? त्यासाठी अपील कोणाकडे करावी.
अपील करून काही उपयोग नाही . जमीन एकत्रीकरण यामुळे गटाची बांधणी / रचना , जमिनीच्या उत्पादकतेच्या अनुषगाने व पूर्वजांनी दिलेल्या संमती मुले झाली आहे . महाराष्ट्र धारण जमिनीचा एकत्रीकरण करण्याचा व तुकडे पडण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम , या मध्ये एकत्रीकरण योजना या विरुद्ध अपील करण्याची तरतूद नाही . एकत्रीकरण योजना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर लगेच हरकत घेणे आवश्यक होते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh chavan
14-07-2020
ganeshrajemech@gmail.com

ग्रामपंचायत मिळकत नंबर 220 जागा माझ्या आईच्या नावे होती तरी ती 2012मध्ये गावातील एका इसमाच्या नावे नोंद ग्रामपंचायत द्वारा करण्यात आली ही नोंद करताना त्याने बनावट नोटरी त्यावरील बनावट साक्षीदारांच्या सही व बँकेच्या कर्जमुक्तीचा बनावट स्कॅन केलेला दाखला जोडून ग्रामपंचायत मार्फत नोंद स्वतःच्या नावे केली त्यावेळेस मी शाळेत शिकत होतो ही बाब मला मार्च 2020 मध्ये उघडकीस आली तरी या जागेवर या जागेवर माझ्या आईची ची नोंद पुरवत कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे
कर्जमुक्ती दाखल्याच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीने ग्रामपंचायत अभिलेखांमध्ये/ ग्रामपंचायत कर आकारणी दोन्ही मध्ये त्याचे नाव दाखल केल्याचे आपले म्हणणे आहे. याचा अर्थ आपले घर कर्ज उभारणीसाठी त्या व्यक्तीकडे अथवा त्याच्या पूर्वजांकडे गहाण म्हणून ठेवले होते किंवा कसे? अथवा त्या व्यक्तीने अथवा त्याच्या पूर्वजांनी आपण ज्या घरात राहता ते घर आपल्या पूर्वजां कडे गहाण ठेवले होते काय? जर आपले घर हे त्या व्यक्तीकडे अथवा त्याच्या पूर्वजांकडे जर गहाण ठेवलेले असेल व त्याबाबतची घेतलेली कर्जाच्या रकमेची परतफेड त्या व्यक्तीने केलेली असेल तर सहाजिकच त्याने गहाण म्हणून ठेवलेले घर, त्याला मिळण्याचा हक्क आहे. आपल्या म्हणण्यानुसार जर त्याने बनावट कागदपत्र तयार करून म्हणजे कर्जाची परतफेड न करताच, खोटे कागदपत्र तयार करून कर्जाची परतफेड केलेली आहे असे दाखवलेले असेल व त्या आधारे ग्रामपंचायत अभिलेखा मध्ये त्याच्या नावाची नोंद केलेली असेल तर आपणाला सर्वप्रथम त्याने तयार केलेले कागदपत्र हे बनावट अथवा खोटे आहेत हे फौजदारी दावा दाखल करून सिद्ध करावे लागेल. तदनंतरच त्या व्यक्तीचे नाव कमी होऊन आपले नाव ग्रामपंचायत अभिलेख सदरी दाखवू शकते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
एका गटा मधे ४ लोकांची नावे आहेत. आणि ४ समान प्लॉट करण्यात आले आहेत. आमच्या प्लॉट वर गणेश चा कब्जा आहे आणि गणेश च्या प्लॉट वर आमचा. तर आम्हाला घर बनवायचे आहे. घर बनवून झाल्यास गणेश घरावर हक्क सांगू शकतो का ? की एकाच गटात असल्यामुळे काहीही फरक पडत नाही ?
आपला परस्परांच्या भूखंडावर/ गटावर कब्जा असल्याचे आपले कथन आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे आपण प्रत्येकाच्या कब्जा खालील असलेल्या भूखंडाचे एक्सचेंज डिड/ देवाणघेवाण दस्त करून घ्यावा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sainath
13-07-2020
sainathrathod5@gmail.com

एकदा फेरफार मंजूर झाल्या वर त्यप्रमाने 7/12 वर नोंद होणे अपेक्षित आहे मात्र तसे झाले नसल्यास उपाय योजना काय कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
नमस्कार साहेब,
मी आशिष सुनिल श्रीवास, अकोला जिल्ह्यातील रहवासी आहे माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
1) माझ्या आजोबांना आपल्या नावावर असलेल्या शेत जमीनीचा हीस्सेवाटप करुन ती शेत जमीन सरळ आपल्या नातवंडांच्या नावावर करायची आहे.
2) मी आणि चुलते मिळुन 4 भाऊ आहोत. माझे वडील जिवंत नाही आणि माझ्या काकाला असे करण्यास काहीच हरकत नाही.
3) आम्ही सगळे कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे अपुरी माहिती असल्यामुळे पुढील पद्धतीत काय करायचे कळत नाही.
4) माहिती काढल्यास खुपच गुंता गुंतीची पद्धत व भरपूर मोठा खर्च लागते जवळपास एक लाख रुपये असे गावातील लोक, शेजारीपाजारी कडुन सांगितले गेले.
5) आपणासनम्र निवेदन आहे की, वरील बाबतीत मला आपण विस्तृत माहिती देऊन पुर्ण पद्धत सांगावी, मी आपला खुप आभारी राहीन. धन्यवाद !
आपल्या आजोबांना जर ती मिळकत वडीलोपार्जित मिळालेली असेल तर अशा मिळकतीमध्ये आपणाला जन्मताच मालकी हक्क प्राप्त होतो. त्यामुळे अशा जमिनीचे वाटप करून आपल्या हिश्याला त्याचे नाव लावण्याचा अधिकार आपणास आहे. तसेच या वाटपाला आपल्या चुलत्यांचीही कुठलीही हरकत नसेल तर नोंदणीकृत वाटप पत्राशिवायही, तहसीलदार यांच्याकडे जमीन महसूल संहितेच्या कलम 85 खाली अर्ज करून वाटप करून घेता येईल व मिळकतीला तशी नावे दाखल करता येतील. मात्र आजोबा हे हयात असल्याच्या कारणास्तव, ंनी त्यांना त्यांच्या हिश्याच्या मिळकतीला त्यांचे नाव दाखल राहील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shankar kakde
13-07-2020
Shankarkakde@gmail.com

माननीय श्री पाणबुडे सर
आम्हाला आदिवासी जमीन शेतीसाठी घ्यावयाची आहे 15 वर्षासाठी, भाड्याने त्यासाठी काही कायदेशीर बाबी असतील का, किंवा विकत घेण्यासाठी काही मार्ग असेल तर सांगावे.,
आपण आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन शासनाच्या पूर्व -संमतीने व जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने खरेदी करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर, 1956 साली माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित शेतजमिनीत घर बांधले. घरात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नसल्याने शेजारच्या जमीन मालकाच्या शेतजमिनीतून 1956पासून वहिवाट आहे. पण आता शेजारचा जमीन मालक घरासमोर शेत नांगरून व पीक पेरून घरात जाण्यास अडथळा निर्माण करत आहे. ती फक्त दोन गुंठे असलेली जमीन बाजारभावापेक्षाही अधिक किंमत देऊन विकत घ्यायला तयार आहोत. पण तो देत नाही. काय करावे?
भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम ३३ अन्वये सुविधाधिकार यामध्ये व्यतय्य आणल्याबद्दल, आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भारतीय सुविधाधिकार अधिनियम १८८२ च्या कलम ३३ अन्वये सुविधाधिकार यामध्ये व्यतय्य आणल्याबद्दल, आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
जमीन वडलांच्या नावे असलेली मुलांच्या नावे कशी करावी वडील ह्यात आहेत जमीन वाडलोपर्जित आहे.
नमस्कार,
माझा प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित जमीन वडील मुलांच्या विना परवानगी विकू शकतात का ७/१२ मध्ये वडिलांचे नाव आहे. समजा, जमीन आजोबांना त्यांच्या वडलाकडून मिळाली होती आणि तीच जमीन पुन्हा माझ्या वडिलांना मिळाली आहे पण वडील ती जमीन माझ्या परस्पर विकू शकतात का ?
प्रश्न दुसरा,
माझ्या वडील आणि त्यांचा दोन भवानी मिळून एकत्र जमीन विकत घेतली होती आणि ती जमीन काही वर्ष तीन हिस्से करून कसवली पीक घेतले पण तिघांमध्ये मोठयाने बाकी दोघांना न कळवत ती जमीन चा व्यवहार केला आणि जमीन दुसऱ्याच्या(जावई च्या नावे) नावावर केली मात्र जमीन घेतंना दोन्हीं भावकडू पैसे घेतले. मोठयाने काही तरी वादच कारण उत्पन्न करून दोघांना बाजूला केले आहे आणि स्वःतच्या बायकोच्या नावे जमीन केली पैसे मात्र त्या दोघे चे पण वापरले आणि त्या च जमिनी मदली काही जमीन जावई च्या केली जमीन ७/१२ जावई व मोठ्या भावाच्या बायको च्या नावे आहे....आणि जमीन जो पर्यंत बायको च्या नावे नवती तो पर्यंत तिघे एकत्र पीक घेत होते. तर ही जमीन तिघांनी घेतली पण नाव मोठयाने बायको च लावलं... या वर काय करता येईल

Question by Sonali
12-07-2020
sonisonali58@gmail.com

माझ्या वडिलांनी २००६ मध्ये एक कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्रद्वारेJoint POA मध्ये एका डायरेक्टरला wind power pvt ltd ,ला दिली होती त्यानंतर कुलमुखत्यार पत्र करुन देणार दुसर्या व्यक्तीने २०१२ मध्ये कुलमुखत्यारपत्र रद्द होणे साठी नोटीस कंपनीला पाठवली सदर कंपनीने जमीनीचा कब्जा किंवा सातबारा वर त्यांची नोंद करण्यात आली नव्हती सातबारा हा वडीलांच्या व त्या व्यक्तीच्या नावाने होता ३०/०९/२०१९ रोजी कुलमुखत्यार द्वारे कंपनीने सदरची जमीन ही डायरेक्टर बदलुन एका व्यक्तीला सेल डीड करुन दिली त्या दरम्यान च्या कालावधीमध्ये वडील हे खुप सिरीयस आजारी असल्याने ICU हॉस्पिटल मध्ये होते व ०५ दिवसांत ०६/१०/२०१९ रोजी वारले त्या दरम्यान कोणतीही नोटीस किंवा माहीती कंपनी द्वारे किंवा इतर व्यक्ती द्वारे देण्यात आली नव्हती. दस्त नोंदीस दिल्या नंतर त्याबाबत आम्ही फेरफार वर हरकत वेळेत मंडळ अधिकारी यांच्याकडे नोंदवली. आमचे वारस नोंद नमुद जमीन व इतर मिळकतीवर झाली.हरकती बाबतसुनावणी अजुन झाली नाही तरी सदरच्या प्रकरणी दस्त ऐवज ची ७/१२ वर नोंद न होणेसाठी काय करणे उपयुक्त आहे ?
वडिलांच्या निधनानंतर वारस नोंद झाली .त्यानंतर एका मोठ्या भावाने घरात आई व भावंड सांभाळण्यासाठी पैसे घातले म्हणून वडिलोपार्जित ११एकर जमीन खरेदीखत करून २००९ सालि बळकावली आहे .परंतु त्याची ७/१२ सदरि अद्याप नोंद झालेली नाही .आता तो कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन नोंद करण्याच्या तयारीत आहे .खरेदीखत करताना एक बहीण अज्ञान पालक होती .त्याला ती नोंद न करण्यासाठी व खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे

Question by Mangesh Dangat
11-07-2020
mdangat07@gmail.com

Ek guntha cha 7 12 banto ka
वडिलांच्या निधनानंतर वारस नोंद झाली .त्यानंतर एका मोठ्या भावाने घरात आई व भावंड सांभाळण्यासाठी पैसे घातले म्हणून वडिलोपार्जित ११एकर जमीन खरेदीखत करून २००९ सालि बळकावली आहे .परंतु त्याची ७/१२ सदरि अद्याप नोंद झालेली नाही .आता तो कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज देऊन नोंद करण्याच्या तयारीत आहे .खरेदीखत करताना एक बहीण अज्ञान पालक होती .त्याला ती नोंद न करण्यासाठी व खरेदीखत रद्द करण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करावे

Question by alam shaikh
10-07-2020
salam8321@gmail.com

नमस्ते सर, दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा दाखल केला तीन भावाने व विरुद्ध तीन बहिणी होती जमिनीची तीन गट होते तीन गटांमध्ये अनुक्रमे 140 99 व 57 गुंठे क्षेत्र होते, कोर्टामध्ये सुनावणीचे वेळी तीन बहिणी पैकी दोन बहिणींनी आम्हाला जमिनीचा हिस्सा नको म्हणून त्या तीन भावांना दिले व त्यापैकी राहिलेली एक बहिणीने हिस्सा मागितली तर भावांना प्रत्येकी 8/27 व एक बहिणीला 3/27 कोर्टाच्या निकालांमध्ये अशाप्रकारे इस्सा देण्यात आला मुस्लीम कायद्याच्या अनुषंगाने असा निकाल देण्यात आला निकाल लागल्यानंतर न कब्जा साठी जिल्हा अधिकारी कडे दरखास्त दाखल केले व तहसीलदार साहेबाकडे यांची चौकशी सुरू असताना लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले लेखी म्हणणे घेऊन चौकशी पूर्ण करण्यात आली व निकाल असा देण्यात आला की भुमिअभिलेख व तहसीलदार साहेबांच्या आधारे हा निकाल 1947 च्या अधिनियम तुकडे बंदी व तुकडे जोड एकत्रीकरण कायद्याने वादी व प्रतिवादी यांना सामायिक ठेवण्यात आला, पण आम्हाला असे म्हणायचे आहे की, कोर्टामध्ये हा निकाल वादी भावाला जास्त हिस्सा व प्रतिवादी बहिणीला कमी हिस्सा देण्यात आला आहे तर मग हा निकाल वाटप तक्त्यामध्ये सामायिक व उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सामायिक कसे काय ठेवण्यात आले, उताऱ्यावर प्रत्येकांचे क्षेत्राची नोंद नमूद होऊ शकत नाही का ? व सामायिक कसे काय ठेवण्यात आले व येथे प्रतिवादी चा क्षेत्र कमी असून, सामायिक मध्ये ठेवून समान हक्क कसे काय ? सविस्तर सुचवणे
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांचा एक दुकान गाळा आहे , ते आता हयात नाहीत , त्यांच्या दुकान च्या विक्री मधून ७ मुलांच्यात वाटण्या करायच्या आहेत पण त्यातील एक काका वाटणी करायला तयार नसतील आणि ६ जण तयार असतील तर आम्ही ते दुकान विकू शकतो का?
प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?
मी मौजे लोहारे तालुका संगमनेर मध्ये राहत असून माझ्या पंजोबा पासून आम्ही त्या जागेमध्ये राहतो व त्या जागेची नोंद ग्रामसेवक का कडे आहे व त्याचा नमुना 8 पण आहे तसेच त्या जागेचा स्टॅम्प पेपर पण आहे परंतु समोरील व्यतीच्या 7 12 वर नोंद नाही त्यामुळे ते आम्ह्यला त्रास देतात व तुमचे येथे काही नाही तुम्ही जा असे बोलतात तर कृपया यावर काय उपाय आहे.
प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3