जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दशरथ धूळसैदर
08-07-2020
dhulsainder21@gmail.com
मी मौजे लोहारे तालुका संगमनेर मध्ये राहत असून माझ्या पंजोबा पासून आम्ही त्या जागेमध्ये राहतो व त्या जागेची नोंद ग्रामसेवक का कडे आहे व त्याचा नमुना 8 पण आहे तसेच त्या जागेचा स्टॅम्प पेपर पण आहे परंतु समोरील व्यतीच्या 7 12 वर नोंद नाही त्यामुळे ते आम्ह्यला त्रास देतात व तुमचे येथे काही नाही तुम्ही जा असे बोलतात तर कृपया यावर काय उपाय आहे.
Question by Sumit kale
08-07-2020
skale303@gmail.com
प्रश्न : आमच्या पंजोबानी 1964 साली यांच्या 5 एकर 13 गुंठे क्षेत्रापैकी 33गुंठे क्षेत्र भावाच्या नावावर केले होते त्याची फेरफार ने नोंद देखील झालेली आहे. त्यापैकी राहिलेली 4 एकर 20गुंठे क्षेत्र समोरच्या पार्टीला विकली आहे 1970 साली फाळणी नंबर 12 तयार करतेवेळी त्याची नोंद घेतली गेली नाही जमीन मोजणी करते वेळी,1960 च्या फाळणी नंबर 12चा संदर्भ देऊन 1970 चा फाळणी नंबर 12 आणि एकत्रीकरणाचा नकाशा तयार करण्यात आला आज तिला आज 5 एकर 13 गुंठे एवढ्या क्षेत्राची नोंद समोरच्याच्या सातबाराला आहे तेवढेच क्षेत्र त्याच्या ताब्यात आहे ते आपल्याला पुन्हा कशी मिळवता येईल
Question by Rupesh shinde
08-07-2020
rupeshshinde1995@gmail.com
130 गुंठे जमीन असणाऱ्या सर्वे नं ची 20 गुंठे जमीन विक्री होऊन सर्वे नं चे 1 व 2 याप्रमाणे हिस्से झाले,दोघांचे 7/12 उतारा ही तयार झाले, 20 गुंठे जमीन हिस्सा नं 2 झाली परंतु ती तुकडेबंदी कायदा चे उल्लंघन आहे हे लक्षात आले आहे, परंतु हिस्सा नं 1 चा जो मालक आहे ज्याच्या नावावर 110 गुंठे जमीन त्या सर्वे नं मधील आहे त्याला सर्वे त्या नं मधील आपला हिस्सा नं 1 चा नकाशा पाहिजे असल्यास अथवा त्याला त्याचे क्षेत्र निश्चित करावयाचे असल्यास काय करावे लागेल.? कृपया मार्गदर्शन करा.
Question by मोहन पांडुरंग शितोळे
07-07-2020
mohan.shi.ms@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, माझ्या आईला 3 भाऊ व1बहीण आहे.माझ्या आई आजोबाचें 1975 ला निधन झाले आहे.निधनानंतर 3 भावांची नावे सातबाऱ्यावर मालकी हक्कात लागली आहे,व माझी आई व तिची दुसरी बहीण ह्यांची नावे इतर हक्कात लागली आहेत.इतर हक्कात नाव लागण्याचे कारण काय असेल? त्या सर्व सातबाऱ्यावर 10 एकर क्षेत्र आहे.1975 पासून आजपर्यंत त्या सातबऱ्याचे कोणतेही वाटपपत्र किंव्हा हक्कसोड पत्र झाले नाही खातेफोड पण झाली नाहीत,सर्व नावे एकाच सातबऱ्याला आहेत. सर त्या जमिनीत आज 2020 रोजी माझ्या आईचा व मावशीचा हक्क किती राहील, मामा म्हणतात की फक्त चार आणे हिस्सा आहे, कारण आजोबा 2005 पूर्वी मयत झाले आहेत,तर आता आईला आणि तिच्या बहिणीला कितवा हिस्सा वाट्याला येईल, आणि सातबऱ्याचे इतर हक्कातील नावे मालकी हक्कात घेता येईल का?(आणि घेता येत असतील तर, काय प्रोसिस आहे इतर हक्कातील नाव मालकी हक्कात घेण्याची )कारण मामाची मुलं ती जमीन आता विकत आहेत.आम्ही कितवा हिस्सा मागू?
Question by Vipul kawade
07-07-2020
Vipulkawade74@gmail.com
सर मी लोणी काळभोर या ठिकाणी राहत आहे,आमचं एक दुकान आहे आणि 33 वर्ष झाले ते दुकान आम्ही चालवतो,तर 99 वर्षाचा करार सुद्धा झाला होता पण ते पेपर हरवले,तर ग्रामपंचायत म्हंटतीये कि जागा खाली करा स्वताहून नाही तर आम्ही करू,सर यासाठी कोणता कायदा आहे का
Question by राजू मुलानी
07-07-2020
rajumulani3172@outlook.com
कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका प्रांत अधिकार्याकडे ऑनलाईन बांधकाम करण्यासाठी अर्ज करता येतो का असेल तर कोणत्या साइटवरून अर्ज करावा लागेल याची माहिती द्यावी आपला आभारी राहीन
Question by Vipul kawade
07-07-2020
Vipulkawade74@gmail.com
सर मी लोणी काळभोर या ठिकाणी राहत आहे,आमचं एक दुकान आहे आणि 33 वर्ष झाले ते दुकान आम्ही चालवतो,तर 99 वर्षाचा करार सुद्धा झाला होता पण ते पेपर हरवले,तर ग्रामपंचायत म्हंटतीये कि जागा खाली करा स्वताहून नाही तर आम्ही करू,सर यासाठी कोणता कायदा आहे का
Question by राजू मुलानी
07-07-2020
rajumulani3172@outlook.com
सर ग्रामपंचायत हद्दीतील तहसीलदार बिगर शेती गुंठेवारी मधील प्लॉट मी घेतलेला असून त्यावर मला बांधकाम करावयाचे आहे त्यामुळे मला कोणत्या ऑफिसमधून बांधकाम परवाना घ्यावे लागेल याची माहिती मिळावी तसेच लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी ही विनंती आपला आभारी राहीन
Question by Amarsingh murlidhar tagade
07-07-2020
amar5981@gmail.com
नमस्कार सर माझे आजोबांचे 1951च्या जनगणनेत धनगड हि जात आहे. तर मला व माझ्या वडिलांना केव्हाच 1951च्या जनगणनेची गरज पडली नाही. मला जातपडताळसाठी 2018 ला मी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला की 1951च्या जनगणनेत नक्कल मिळण्यासाठी तेव्हा मला माहित झाले की माझ्या आजोबाची जात धनगड आहे माझे जातीचे प्रमाणपत्र धनगर आहे मग नविन अर्ज केला मला धनगड जातेच प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केला मला प्रमाणपत्र मिळेल का? सर माझा जिल्हा उस्मानाबाद आहे पण मी 1981 ते 2011 जनगणनेची नक्कल दिली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात धनगड जातीचा ऊल्लेख आहे सर व आदिवासी विभाग 2018 प्रकाशन केल्या पुस्तकात उस्मानाबाद जिल्ह्यात धनगड जातीचा पुरावा आहे मग मला जातीचे प्रमाणपत्र मिळाले का?
Question by महेश चौधरी
05-07-2020
chaudharimahesh101@gmail.com
1959 मध्ये कुलकर्णी वतन निर्मूलन कायद्यानुसार आजोबांना वर्ग दोन नवीन अविभाज्य शर्ती वर जमीन मिळाली होती नंतर 1981 मध्ये ती जमीन कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी न घेता , खोट्या बनावट सात बारा उतारा आधारे खरेदी करून घेतली प्रश्न असा आहे की ती खरेदी खत रद्द होऊ शकते का आणि जमीन मुळ मालकाला परत भेटू शकत आहे का ?
Question by Rabhaji baburao khose
04-07-2020
rabhajibaburao1968@gmail.com
सन १९७७-७८ मध्ये माझे जमिनीतून पाण्याचा निचरा होणेपंथलपणा क्षारपड पणा कमी होणे करिता चर योजना अस्तित्वात आली आहे चर योजना अस्तित्वात येण्यापूर्वी माझे जमिनीतून कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही.परंतु २००० फुटावर पूर्वपार रहाणारे लोक त्यांचा गावात जाण्याचा पूर्वपार जवळचा रस्ता असताना माझ्या जमिनीतील सर्व्हिस रोड चा वापर ते करतात.त्या सर्व्हिस रोडवर पुणतांबा ग्रामपंचायीमार्फत आणि सदर लोक यांनी . दि.२६/०६/२०२ ला दगड मुरुमाचा २-३ फुटाचा थर देऊन पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण केला आहे.चर योजनेच्या मुख्य उद्देशाला बाधा निर्माण केली आहे.संपादित शेत्र आजही माझ्याच नावे आहे.१९७७ पासून आजपर्यंत नियमानुसार महसूल भरत आहे.सर्व्हिस रोड का वापर करण्याबाबत आमची हरकत नाही.परंतु त्या सर्व्हिस रोडवर दगड मुरूम टाकण्यात आमची हरकत आहे त्यामुळे आमच्या जमिनीचे त्यामुळे नुकसान होऊ शकते.वरील माहिती बाबद योग्य मार्गदर्शन करावे.
Question by Sujeet indrakumar sarawade
03-07-2020
Sujeetsaravade@gmail.com
Namskar sir amchi kul jamin ahe 2 acre 1995 la mazhya vadilani 4 acre jamin ghetli ani tyani ajobanchya navavar keli theva chulthyache vay hote 14 varsh pn tya jaminiche paise vadilani dile yache proof ahet jyanchakadun shet ghetl ani 02 bhahini tar kayadyanusar vatap kashi karavi ani vadilani swakashtnane ghetlel jaminchi vatap kashi karavi
Question by Adv सुरज जाधव
03-07-2020
Suraj1046@gmail.com
एक गुणठयाची (गुंठे ) खरेदी खत का बंद केला आहे.... सामान्य माणसाने जागा घेऊन घर बांधकाम कारायचा का नाही... सदैव बिल्डर धारझिनने निर्णय कस घेतात सरकार... कधी बदलणार हा नियम...महानगरपालिका सोडल्या तर तुमचा वीज, रोड, drainage, पाणी किती दुर्दशा आहे है सर्वश्रुत आहेच... कोणता सरकार असो सामान्य माणसाला नजरेत ठेवून निर्णय घ्या... तुमचा गुंठेवारीचे खरेदी खत बंद केल्यामुळे लोकांचे खुप नुकसान होत आहे
Question by महेंद्र सर
02-07-2020
mahendrahendve123@gmail.com
NA झालेल्या प्लाटवर घराचे बांधकाम करून राहायला ७ वर्ष झाले.परंतू प्लाट मालकाने काही शिल्लक राहिलेल्या प्लाटवर म्हशीचे शेड उभारले त्यात १५ म्हशी आहेत.व त्यांचं शेणखत व इतर आमच्या घरासमोर टाकत आहेत.त्या दुर्गंधी मुळे,घरात राहने, कठीण झाले आहे.NA झालेल्या प्लाटवर असे म्हशीचे शेड उभारता येते का? यापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगा?
Question by वैजनाथ राठोड
02-07-2020
Omyashfilm@gmail.com
गावातील गावठाण जमीन खरेदी खत करून घेता येते का?
Question by स्वामी विजय
02-07-2020
vijayswami876@gmail.com
सर मी 1984सली प्लॉट खरेदी केला आहे परंतु फेर नोंदणी केली नाही 7 पाणी एन ए आहे तरी नोंदणी साठी मला किती खर्च येईल
Question by Ravindra .J .Ranit.
01-07-2020
ravindrajranit2343@gmail.com
"नमस्कार" सर.माझा प्रश्न असा आहे कि.माझ्या . आजोबांची.दोन जागा.आहे.व माझ्या आजोबांना.दोन मुलं.आहे तर.आम्ही.सर्व.ते गाव सोडून.३०वर्ष झाले.तर.आमच्या मोठ्या बाबानी.जागा. त्यांच्या.नावावर.केले.आहे.व.ते.गाव.धरण.प्रकल्पात.गेले.तर.त्या जागेचे.पैसे.त्या.मोठ्या.बाबाला.मिळाले.तर.आम्हाला. काय.करावे लागेल.आमच्याकडे. आंजोबा.आजी.वडील.आणि.काका.यांचे.मुत्युचे.दाखले.आहे.त्या.शिवाय.आमच्याकडे.काहीही.पुरावा.नाही.आम्ही.खुप.गरीब.आहे.तर.सर.मेहरबानी.व.हात.जोडून.विनंती.करतो.आम्हाला.काही तरी माहीती सुचवा.धन्यवाद.
Question by Bandu waghade
01-07-2020
banduwaghade40420@gmail.com
नमस्कार साहेब
१) आमच्या ग्रामपंचायत सरकारी रेकॉर्ड मध्ये नमुना 8 व नमुना 9 मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व्हाइटनर चा उपयोग करून नावा मध्ये बदल केलेला आहे तरी कर्मचाऱ्या वर कशाप्रकारे कारवाई करण्यात येईल याच्याबद्दल मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो
Question by सत्यजित
01-07-2020
satyajeetshah9@gmail.com
आजोबांनी मृत्युपत्र केले होते ,मृत्युपत्र रजिस्टर नाही, आत्या (वडिलांच्या बहिणी) ना मान्य नाही , मृत्युपत्र बाबत महसूल कार्यालयात केस चालू आहे. दिवाणी मध्ये पण त्यांनी टाकली आहे. , पण आता आत्या हक्क सोड देण्यास तयार आहे . मोबदला देऊन हक्क सोड पत्र रजिस्टर करता येईल. का?? स्टॅम्प ड्युटी लागेल का...?लागल्यास किती लागेल.. ?? वडिलांचे निधन झाले असल्याने आमच्या नावे हक्क सोड करता येईल का..? आत्या हक्क सर्वांच्या नावे हक्क सोडणार आहे...मृत्युपत्र प्रमाणे हक्क सोड करणार नाही. कसे करता येईल.?
Question by केतन महादेव भोईर
01-07-2020
ketanganesha@gmail.com
सर नमस्कार आमच्या जमिनीचा व्यवहार मार्च 2019 मध्ये झाला आहे .परंतु सुरुवातीपासूनच चेक बाउन्स झाले .फक्त 40 ते 45 टक्केच रक्कम मिळाली. नंतर सर्व चेक बाउन्स झाले आहेत .7/12 अजून बदलला नाही. आम्ही फोन करतो तर आज देतो उद्या देतो असे सांगतो .आता 1 वर्ष पूर्ण झाला काय करू साहेव
Question by शेंगाळ सुरेश चंदर
30-06-2020
namaste.pranjal@gmail.com
माझ्या आजोबांच्या मृत्यू नंतर चुलते व वडील या दोघा भावांपैकी चुलते मोठे असल्याने जमिनीस कबजेदार सदरी चुलत्याचे नाव लागले व वडिलांचे नाव इतर हक्कात लागले आहे आता चुलते जमीन द्यायला नकार देत आहेत दोघांचे सतत वाद होत आहेत वडील त्यामुळे तणावात आहेत त्यांचे नाव कबजेदार सदरी लावण्यासाठी मार्गदर्शन करावे
Question by Pratik Bapu Dhamane
29-06-2020
vighnahartams@gmail.com
सर आमचे आजोबा यांचे बाजूने एकतर्फी कोर्टाचा निकाल लागला आहे त्यात आमच्या गट नं चे पोट हिस्स्यांचे नकाशे नसतांना मोजणी केली आहे त्यात १ एकर वाल्याला संपूर्ण रस्त्याचा पुढचा भाग देण्यात आला आहे त्याला आम्ही वारंवार अर्ज देऊन देखील तहसीलदार प्रांत यांनी काहीही कारवाई केलेली नाही तरी अशा वेळेस आम्हाला हा निर्णय मान्य नसल्यास कोर्ट निकाल २००७ मध्ये लगेल्ला असताना आत्ता आम्हाला कोर्टात निकालाविरुद्ध अपील दाखल करता येईल का
Question by Nana Patil
28-06-2020
ngamepatil@gmail.com
माझ्या आईकडील आजोबांच्या (आईला भाऊ नाही ) ) वाटणीमध्ये त्याना समान जमीन मिळाली नाही.बाकीच्या दोन आजोबांनी 40 एकर पैकी फक्त 8 ऐकरच जमीन त्याना मुलगा नाही हे कारन देऊन दिली व राहिलेली त्या दोघांनी वाटून घेतली प्रत्येकी 16 एकर . वाटनी पत्र तसच झाल आहे. तर माजे आजोबा अजून जीवंत आहेत तर बाकीचे हयात नाहीत.अश्या स्तीतीत आजोबांना आता जमीन समान वाटप करुन मिळेल काय ?क्रुपया मार्गदर्शन करावे .
Question by नंदकुमार कोळी
28-06-2020
kolinand040514@gmail.com
सर नमस्कार
मी आज शेतकरी नाही,माझ्या नावावर किंवा कुटूंबातील कुणाच्याही नावावर शेतजमीन नाही आणि पुर्वीही नव्हती,तरी मला आता शेती घ्यायची असल्यास मी घेऊ शकतो का? आणि त्यासाठी काय करावे लागेल. याबाबत मार्गदर्शन करावे.
Question by विशाल शिर्के
27-06-2020
vps29493@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या आजोबांना वारसाहक्काने मिळालेली एकूण 275 गुंठे जमीन ए.कू.म म्हणून आजोबांच्या नावे होती, 1980 च्या अगोदर तोंडी वाटणी (आजोबांना एकूण 3 भाऊ म्हणजे 4 वाटण्या) सरस निरस पद्धतीने, उपयोगिते प्रमाणे पुढील 4 वाटण्या झाल्या मोठा भाऊ 73 गुंठे, दोन नंबर 65 गुंठे, तीन नंबर 72 गुंठे, चार नंबर 65 अशी एकूण 275 गुंठ्या ची वाटणी झाली, सदर वाटणी मध्ये एक नंबर भाऊ आणि तीन नंबर भाऊ याना एकूण 7.50 गुंठे जास्तीच क्षेत्र आलेल. सर्व सर्व्हे नंबर ला या वाटणी प्रमाणे आजोबांनी नोंदी करून दिल्या . परंतु वरील पैकी एका गटा मध्ये सर्वाना सारखे क्षेत्र (64 गुंठे +2.75 पोट खराब) कागदोपत्री वाटप झाले. सदर गट नंबर मध्ये दोन नंबर व चार नंबर भाऊ याना वाटणी मध्ये कमी गेलेल क्षेत्र देणं गरजेचं होतं. परंतु ते झालं नाही. पण प्रत्यक्षात त्या पैकी चार नंबर भाऊ याचा जवळपास 53 गुंठे क्षेत्रांवर ताबा आहे . म्हणजेच त्यांना एक व तीन नंबर भाऊ यांच्या कडून बाकीच्यांना 7.50 क्षेत्र देने असताना जास्तीच्या जागेत सदरील चार नंबर भाऊ यानी ताबा मारलेला आहे . एक व तीन नंबर भाऊ यांची नियमानुसार जेवढी जमीन द्यावी लागणार आहे त्याची तयारी आहे . परंतु चार नंबर भाऊ या साठी तयार नाहीत होत. तोंडी वाटप होऊन किमान 40 वर्ष झाली आहेत. काय करता येईल
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
