जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Parth Patil
30-05-2020
parthppatil2222@gmail.com
सर,
14 गुंठे जिरायत शेत जमिनीच्या गटापैकी 10.5 गुंठे जिरायत शेत जमिन 2012 ला खरेदी केली आहे. त्याचा आजपर्यंत 7/12 वर फेरफार झालेला नाही. आता फेरफार करण्यासाठी काय करावे लागेल.
Question by Sumeet bhati
29-05-2020
Sumeetbhatia88@gmail.com
जमिनीची भाऊ हिस्से ची जमीन,ती जमीन वाडिलोपार्जित नसून एकत्र अस्ते वेळेस घेतलेली जमीन माझ्या वडिलांच्या नावाने होती,पण ती जमीन चा हिस्सा दूसर्या भावाच्या हिस्सायाला गेली आहे..! माझ्या वडिल आता ह्यायात नाहीत,ती जमीन आता आमच्या भाऊ बहीन च्या नावावर सामाईक झाली आहे ,ती जमीन चूलत्याच्या नावावर करायची आहे,त्यासाठी काय पर्याय उपलब्द आहेत आमच्याकडे. त्याची Registry करुण दया महण्त आहेत,ते योग्य असेल का .? व आजोबांना 5 एकर वेगळी काढली आहे, त्यात आम्हाला पून्हा हिस्सा मिळेल की नाही ? 6 मूल आहेत आजोबांना. Plz help sir.
Question by वैभव पाटील
28-05-2020
vpatil3873@gmail.com
नमस्कार सर
माझे वडील १९९६ व्या वर्षी वारले असता आम्ही आमच्या घरात मी माझी आई आणि आजोबा राहत होतो २०११ व्यां वर्षी माझे आजोबा वारल्यामुळे माझ्या काकांनी नकळत माझ्या 3 आत्या व स्वतचे नाव घरपट्टी वर चढवले.माझे काका आता मे २०२० ला वारले.काका वारल्या मुळे माझ्या 3आत्या व काकी मिळून माझ्यावर केस करून दबाव टाकत आहेत.घराची वाटणी करायला सांगत आहेत.पण माझ्याकडे हे राहत घर एवढं एकच आसरा आहे. घराची वाटणी होऊ न देता घरपट्टी वरील नावे रीतसर कशी कमी करता येईल.किवा ह्यावर अजून काही उपाय असल्यास आपण मला मार्गदर्शन करावे.
Question by प्रकाश चौधरी
28-05-2020
Pchaudhari523@gmail.com
सर आमची शेतजमिनी (वडिलोपार्जित)मोठ्या काकांच्या नावी आहे. या जमिनीला माझे वडील आणि दोन काका व एक आत्या वारस आहे .जर भविष्यात काकांनी व इतर वारसांनी जमीन विक्री काढली. त्यास आमच्या वडिलांची सहमती देखील असेल पण जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे आमची सहमती पण लागू शकते का? आमची विचारणा होईल का?
Question by संकेत सुतार
28-05-2020
mantramugdha73@gmail.com
सर, माझ्या आजोबांनी 40 वर्षा आधी चुलत भावाच्या जमिनीवर घर बांधले होते.... संबंधित घराची घरपट्टी आजोबांच्या नावे होती... त्या नंतर ती माझ्या वडिलांच्या नावे झाली... मला आता त्या घरावर एक मजला बांधायचा आहे पण चुलत्यांच्या मुलांनी त्यावर हरकत घेतली आहे.... की तुम्ही नाही बंधू शकत जागा आमच्या नावावर आहे... तर मी काय करावे....
Question by Haridas prakash lande
28-05-2020
Haridaslande143@gmail.com
सर तुकडे बंदी कायद्यामध्ये सरासरी बागायती व जिरायती किती जमीन पर्यंत तुकडे पाडता येतील आणि याची मर्यादा जालना जिल्हा साठी किती आहे, माझे 38 गुंठे जमीन चुलत्या कडून वडीलच्या नावे करून घेयची आहे तर तुकडे बंदी कायदा नुसार काही अडचण आहे का, माझी कोरडवाहू आहे, पण माझ्या दुसऱ्या गटात विहिरीचे पाणी आहे
Question by Amol vilas yamgar
27-05-2020
ayamgar02@gmail.com
नमस्ते सर
माझा असा प्रश्न आहे कि ग्रामपंचायत गावठाणातील जागा विकू शकते काय विकू शकत असल्यास ग्रामपंचायतिला कोणाची परवानगी घ्यावी लागेल
Question by Rohan Hole
27-05-2020
rohanhole08@gmail.com
आमच्या वडिलांच्या नावे 7/12 सदरी 20 गुंठे जमीन असून ते 3 समान हिस्स्यात वाटप करायच आहे तरी हे वाटप आम्ही कसे करू आणि तुकडे बंदी कायद्याचा आमच्या वाटणीत काही त्रास होऊ शकतो का?
Question by Dada kale
26-05-2020
dadakale123@gmail.com
सर शेतात जाण्यासाठी पूर्वापार असणारे शेत रस्ते , फरसबंदी , बैलगाडी रस्ता आणि पाऊलवाट दाखवणारे कोणकोणते जमीन अभिलेख किंवा नकाशे असतात ?
Question by उन्मेश सुधाकर देसाई
24-05-2020
unmeshdesai1979@gmail.com
नमस्कार माझं नाव उन्मेश सुधाकर देसाई आहे. माझा प्रश्न किरण सरांना आहे. माझं गाव फुणगूस , तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी आहे. आमच्या गावातील काही भूमापन क्रमांकाचे गटबुकाचे नकाशे गहाळ झाले आहेत . सदर माहिती तालुका सर्वे ऑफिस आणि जिल्हा सर्वे ऑफिस नी पुरवली आमच्या अर्जावर . पण जागेचा सर्वे करायचा असल्यास गटबुकाचा नकाशा आवश्यक आहे. मी तहसीलदार संगमेश्वर ह्याच्यांकडे विचारणा केली असता हेच उत्तर मिळाले. मला सदर गटबुकाचे नकाशे कुठे मिळतील? अगर नाहीच मिळाले तर सरकारी प्रोसिजर काय आहे
Question by Mahesh Borole
24-05-2020
maheshborole1@gmail.com
नमस्कार सर आमची वालकंपाउंड साठी 3 फूट जागा सोडलेली होती पन काही कारणास्तव भिंत बांधकाम झालेले नाही आणि बाजूचा जागेवला आमच्या जागेत घुसला आहे त्याला प्रेमाने सांगितले एयकायला तयार नाही जे होईल ते करून घे असे म्हणत आहे गावातील सरपंच पोलिस पाटील यांना पण सांगितले तसेच पोलीस कॉम्प्लेट पण केली पण काहीही झाले आता काय करावे
Question by ज्ञानेश्वर खोडे
22-05-2020
dnyaneshwarkhode1234@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या शेतीला जाणारा दुचाकी वाहनाचा रस्ता नांगरटि करून उखरून त्याला सिंगल करण्यात येत आहे यावर मी कोणाला तक्रार कराची व कशी करावी?
Question by भागवत
21-05-2020
bhagwatkarkhele14@gmail.com
सर ,
पूर्वी सर्व भावंडाना समान वाटलेली जमीन तुकडे बंदी कायद्या अंतर्गत बाकी भावांच्या अशिक्षित असण्याचा फायदा घेत एकाने 8 गुंठे जमीन जास्त घेतली 1980 ला समान वाटप दाखवणारा 7/12 1983 ला मात्र एकाला जास्त व इतरांना कमी जमीन दाखवू लागला पण वहिवाट पूर्वीप्रमाणे चालू राहिली कागदात असणारी ही चूक ज्याला जास्त जमीन तुकडे बंदीत मिळाली तो आता इतरांना कायद्याचा धाक देऊन मागत आहे. झालेली तुकडे बिल रद्द करता येते का? होत असेल तर विभाग की जिल्हा स्तरावर? त्यासाठी काय कागदपत्रे लागतील? तलाठी यांच्याकडून झालेली ही चूक दुरुस्त कशी करता येईल
तुकडे बिल यावर फक्त लाभार्थी याचीच सही आहे
Question by मुकुंद चिले
18-05-2020
Mukund.7.4u@gmail.com
सर माझ्या वडिलांनी 1986 ला गावी येथे घर बांधले होते त्यांच्या आईच्या संमतीने. 1999 ला माझ्या काकाने (वडिलांचे लहान बंधू) त्यांची खोटी सही करून दोन भाग केले. 2004 मध्ये वडिलांनी ते पूर्ववत केले कोणतीही तक्रार न करता. 2009 पर्यंतच्या पावत्या माझ्या वडिलांच्या नावावर आहेत. मार्च 2010 ला त्याचा मृत्यू झाला तेव्हा जून 2010 ला काकाच्या पत्नीने 100 रु बॉण्ड पेपर वर माझ्या आईची खोटी सही करून परत त्या घराचे भाग केले. हे जेव्हा मी माहिती अधिकारातून दर्शनास आणले तेव्हा माझ्या काका काकीने खोट्या पावत्या दाखवून आमच्यावर चोरीची खोटी केस टाकली. 1999 आणि 2010 असे दोन खोटे बॉण्ड पेपर बनवले गेले आहेत आणि माझ्या कडे त्याचा पुरावा आहे तो माझ्या जमिनीतही अतिक्रमण करत आहे. मी तिथे गेल्यावर माझ्यावर खोटी पोलीस कारवाई करतो. कृपया मला मार्गदर्शन करा.
Question by कैलास माळोदे
18-05-2020
kailasmalode@gmail.com
सर माझ्या शेजारी यांनी सर्व्हे केला असता माझ्याकडे अतिक्रमण आहे असे हद्द खुणा दाखवल्या पण मला कुठल्याच प्रकारची नोटीस अथवा समन्स दिला नाही शेजारील हा एक गावच्या शिवारात तर मी दुसऱ्या गावाच्या शिवारात मध्ये शीव रस्ता आहे तरी त्यांच्या म्हनण्यानुसार माझ्याकडे जमीन निघते तर यावर पर्याय काय
Question by महेश शेलवले
16-05-2020
mahesh.shelawale143@gmail.com
सर /साहेब माझा प्रश्न असा आहे कि मला माझ्या घराच्या पायाशी 2 फुटांवर बोअरवेल मारायची आहे आणि माझ्या घराच्या शेजारी विहिर आहे पण ते पाणी कोणी पित नाही फक्त कपडे धुण्यासाठी वापरतात. ते पण क्वचितच तरि मी बोअरवेल मारू शकतो का..
Question by कैलाशचंद्र डोसे
14-05-2020
kailashchandrad29@gmail.com
माझे वडिल लहान असतांना माझे आजोबा अपघातात वारले. तेव्हा एका सावकाराने आजोबांनी कर्ज घेतलेले अाहे असे म्हणून जमिन ताब्यात घेतली. व. दुस-याला विकली. त्यानंतर अाजी कायमची तिच्या माहेरी रहायला अाली. जमिनीचा ७/१२ अजूनही आजी व वडलांच्या, काकाच्या नावाचा अाहे. गेली ५५ वर्षा पासून जमिन त्यांचे ताब्यात अाहे. केवळ एका वर्षीच त्यांचे नमुना १२ वर नावाची नोंद अाहे. जमीन ताब्यात कशी घ्यावी?
Question by sharad Handgar
14-05-2020
sharadhandgar@gmail.com
सर, माझे आजोबांनी 1964 ला जमीन नोंदणीकृत दस्त करून खरेदी केली होती परंतु त्यांनी त्यावेळी सदर दस्त तलाठी साहेब यांच्याकडे नोंदणी करीता दिला नाही. सदरचा दस्तआजोबांकडून गहाळ झाला होता. तो दस्त आम्हास आता घरची दुरुस्ती करते वेळी मिळाला आहे.खरेदीखातामध्ये नमूद गट/सर्वे नंबर चे 7/12 व फेरफार ची पाहणी 1964 पासून केली असता त्यामध्ये माझ्या आजोबांचे नाव नमूद नाही. आजोबांनी नोंद न केल्याचे पाहून मूळ मालकाने विक्री केलेले क्षेत्र पण दुसऱ्या व्यक्तीस विक्री केले.दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीस विक्री केले असे 15 खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. फेरफार मध्ये 1966 पासून माझ्या आजोबांना विक्री केलेले क्षेत्रासह खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. सदर सर्व्हे नंबर मध्ये क्षेत्र शिल्लक दिसत नाही.यावर मार्गदर्शन व्हावे
Question by मानसिंग पाटील
14-05-2020
Mansingpatil9669@gmail.com
नमस्कार सर......................... माझे वडील व चुलते हे 1985 साली विभक्त झाले आहेत. त्यावेळी त्यांनी जमिनीच्या तोंडी वाटण्या केल्या पण खाती फोड केलेली नाही. दोघांची हि नावे जमिनीला आहेत. 1985 साली झालेल्या वाटणीत चुलत्यांनी चांगली जमिन घेतली आणि वडीलांना खराब जमिन दिली. गेली 35 वर्षे आम्ही ती जमिन कसतोय. पण आता 35 वर्षानंतर आमच्या जमिनीला चांगलं मार्केट आले आहे. आणि चुलते त्या जमिनीतील अर्धा हिस्सा मागत आहेत. वडीलांची इच्छा आहे की आपण 35 वर्षे जमिन कसतोय त्यांना द्यायची नाही. आता कसत असलेली जमिन आमच्या नावावर करणेसाठी काय करता येईल
Question by Sanjay shinde
14-05-2020
Svsa.shinde@gmil.com
वडलो पराजित इनामी जमिनीला गट नंबर नुसार जमीन रस्ता असतो काय नसलास तर तो कसा मिळेल.
Question by संकेत उत्तमराव अग्राळे
13-05-2020
agralesanket@gmail.com
नमस्कार सर. माझा प्रश्न आसा आहे की माझा आजोबांच्या नावी वडीलोपार्जित ६ ऐकर ३० गुंठे जमीन होती त्यांना ३ मुले २ मुली होत्या, परंतू १९८१ मधेच त्यांच्या मोठ्या मुलानी स्वतः च्या नावी ९० आर जमीन व लहान भाऊ यांच्या नावी ९० आर जमीन अशी वाटनी करून घेतली.एक भाऊ व दोन बहीनींना माहीती व सुचना न देता. भाऊ आणि दोन बहीनी यांच नाव देखिल न येऊ देता वाटनी करून घेतली. राहिलेली ९० आर जमीन आजोबांच्याच नावी होती.आजोबांच २००२ मधे निधन झाल. त्यानंतर आजोबांच्या नावी राहीलेली ९० आर जमीनी मधे २०१९ या वर्षी त्यांचा मोठ्या मुलानीच स्वतः वारस नोंदी केल्या त्यात सर्व वारस दार आले फक्त ९० आर जमीनी मधेच ३ मुले व दोन मुली. तर मुलींना न विचारून किंवा माहीती न देता स्वतः च मोठ्या मुलानी ९० आर जमीनीची वाटनी व आजोबांच्या नावी राहीलेल्या ९० आर जमीनी मधेच ३ मुले व २ मुली यांची वारस नोंद कशी काय केली. असा प्रश्न पडला आहे सर आपन मार्गदर्शन द्यावे.
Question by Sagar
13-05-2020
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - चार जन भाऊ यांनी आपल्या वडिलोपार्जित जमीन चे म.ज.म.अ. कलम 85 प्रमाणे वाटप केले आहे . भाऊ नंबर - १ याचा गट न .343 असून त्या गटामध्ये विहिर असून विहीर मध्ये भाऊ नंबर - १ व भाऊ नंबर - ३ यांचा अर्धा - अर्धा हिस्सा आहे. तसेच वाटप पत्र नुसार या विहीर वर जाण्यासाठी भाऊ नंबर - १ व भाऊ नंबर - ३ याना १० फ़ुट रुंदीचा रस्ता हा भाऊ नंबर - ४ यांच्या गट नंबर 344 मधून राहील असे लिहले आहे तर
१.विहिर वर जाण्यासाठी १० फुट रूंद रस्ता ही बाब कायदेशीर योग्य आहे का ?
२. भाऊ नंबर - ३ याला नुसती पाऊल वाट किंवा बांध वरून विहिर कडे जावे असे भाऊ नंबर -४ कायदेशीर रित्या सिद्ध करू शकतो का? कारण त्यांना जमीन कसण्यासाठी रस्ताची गरज नाही आहे.
३.म.ज.म.अ १९६६ नुसार विहीर वर जाण्यासाठी रस्ता असे कुठे कलम आहे का?
Question by सागर
12-05-2020
sagarkandekar1990@gmail.com
अ व्यक्तीचा गट न.२४२ आहे व ब व्यक्तीचा गट न.२४१ आहे असून दोन्ही गटाचा बांध हा तिरपा असून गाव नकाशा प्रमाणे आहे जर दोन्ही व्यक्ती एकत्र संमतीने शेती चा बांध सरळ करण्यासाठी व नकाशा बदलण्यासाठी अर्ज करू शकता का? हो तर कुठे?
Question by ओथमान अली
12-05-2020
opsalothman@gmail.com
मा.किरण सर यांना नमस्कार
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही सन 1939 पुर्वी पासुन संरक्षित कुळ आहोत.तहसीलदारसो यांच्या आदेशाने त्यांनी ठरवून दिलेली रक्कम ट्रेजेरीत भरलेली आहे.आजून तारका चालू आहेत. सदर जमीनी मध्ये उसाचे पिक घेत असतो.आमच्या विहिरीचे पाणी कमी पडत असल्याने.आमच्या क्षेत्रात एक पाणी पुरवठा संस्था कार्यरत आहे त्या संस्थेचे आम्ही आमच्या क्षेत्राचे संस्थेला सर्व रक्कम रोखीने भरलो आहोत. व सभासद देखील आहोत. त्यांच्या कडूण आम्ही शेतीसाठी 2013 पासूण पाणी घेत आहोत.सदर शेतजमीनीस पाणी देऊ नये म्हणून मालकाने संस्थेस अर्ज केला आहे.आम्ही त्या पाणी पुरवठा संस्थेकडूण पाणी घेऊ शकतो कि नाही.
Question by सौरभ फाटक
11-05-2020
phataksaurabh95@gmail.com
नमस्कार, १९८९ साली जांभुळपाडा, सुधागड,रायगड जिल्हा येथे महापूर झाला होता. तेथील गावाचं पुनर्वसन दुसरीकडे करून पूर्वीची जागा ही शासन जमा केली. परंतु काही जण गैरव्यवहार करून पहिली जागा ही विक्री करून शासनाची फसवणूक करत आहेत तर यासाठी तक्रार कशी करावी व कागदपत्रे कोणती लागतील तसेच जनहित याचिका दाखल करता येईल का?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
