जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर नमस्ते,
मी विनायक स गावडे रा. नांदोस तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
प्रश्न क्रं. १) सर माझ्या आजोबानी माझ्या चुलत काका आजोबाना १९६० साली १५ गुंठे जमीन २०० रु बदल्याड २ वर्ष गहाण दिली होती अशी तलाठी कार्यालयात फेरफार मध्ये नोंद आहे.आज पर्यंत ती जमीन त्यांच्याच नवे आहे व त्यांनी ती स्वतःच्या नवे केली आहे.
आम्ही ती जुना सातबारा व फेरफाराची आधारे आमचा वारस तपस करून आमच्या नावे करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

प्रश्न क्र २) सर माझ्या चुतल काकाने आमची सामायिक जमीन हि स्वतःचा परस्पर स्वच्छच्या नावे केली आहे, ज्या जमिनी चे सातबारे आजच्या दिवशी त्याने स्वतःच्या नाव केली आहेत ती १९६० साली माझ्या आजोबांच्या व चुलत आजोबांच्या नावे सामायिक क्षेत्र म्हणून होती, मी आज २०२० मध्ये त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर आमचे नाव वारस तपस करून दाखल करून घेऊ शकतो का.? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

आभारी आहे.
१) ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे का? २) ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण करण्यासाठी ग्रामपंचायतीला कोणाची परवानगी घ्यावी लागते?
Hello sir ,
मी रोहन कांबळे राहणार गाव चिचोंडी पाटील, ता.जि. अहमदनगर, ई मेल लिहिण्यास कारण की तुमचा पोट खराब बद्दला चा लेख वाचला. खुप सुदर आहे. पण मला आमच्या जमिनी विषयी थोडे प्रश्न होत ते विचारयाचे होते
१) आमची जमीन चिचोंडी पाटील या गावी आहे. पण जवळपास २ हेक्टर क्षेत्र आहे.पण त्या मध्ये ०.१० आर वर्ग अ पोट खराबा आहे. पण अजून पर्यंत मला तो नेमका कुठे आहे ते कळत नाही? शेत जमीन माहित आहे कारण ज्या वेळी मोजणी केली त्यावेळी मला कळले. पण पोट खराब दिसला नाही.
२) पोट खराबा जमिनी वर गटातील सर्व खाते दरांचा हक्क असतो की मूळ जमीन मालकाचा ?
३) मी मूळ जमीन मालक आहे.
सोबत ७/१२ उतारा व जमिनीचा नकाशा जोडत आहे.
४) प्रत्यक्षात पोट खराब मला कोण दाखवेल या बद्दल मला सांगावे किवा काही कोणाला अर्ज करावा लागेल .

तरी सर , कृपया करून मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपले नम्र
रोहन मोहन कांबळे
(मोबाईल क्र. ८०९७४८०५०१/९८६९२३७२८१)

Question by Sainath
18-06-2020
sainathrathod5@gmail.com

सर माझा प्रश्न आहे की मे. तहसिलदार साहेब यांचे परवानगीने शेत जमिनीची वाटणी/विभागणी झाली मात्र 7/12वर तसे झाले नाही

Question by Sainath
17-06-2020
sainathrathod5@gmail.com

पूर्वी मा.तहसीलदार सर यांचे परवानगीने शेत जमिनीचा फेरफार झाला असून त्याप्रमाणे 7/12वर दोन्ही भावाचे सातबारा वेगळा झाला नाही मार्गदर्शन करावे
नमस्कार सर,
(1) सर माझा कडे प्रकल्पाचे प्रमाणातआहे आता सध्या ते प्रमाणात माझा नावाने आहे त्यामध्ये माझे पूर्ण नाव आहे ते आगोदर आजोबाचा नावी होता पण त्यामध्ये आजोबाचे आडनाव दिलेले नाही (ते सण 1975 आहे )जर सरकारी नेकर भारतीची निवड झाल्यावर नियुक्ती वेळेस (पडताळनी वेळेस )त्या प्रमाणात बद्दल काही अडचण येईल का? जर ती दुरुस्त करायची असलास त्याची पध्दत काय आहे ? (2) आणि त्या प्रमाणातमध्ये सण (जुना तालुका होता)1975 चा वेळेसचा सर्वे नंबर वेगळा आहे आणि (नवीन तालुका)आताचा 7/12 मध्ये सध्या सण 2020 चा वेगळा आहे त्या बद्दल काही अडचण येईल का ? आणि त्या 7/12मध्ये आजोबाचे पूर्ण नाव आहे. या दोन प्रशना बदल माहिती मिळवी आशी नम्र विनांती.

Question by Amol
15-06-2020
amol.mote0@gmail.com

सर माझे नावे 10:25 गुंठे जमीन आहे .पण माझे घर शेजारील दुसऱ्या मालकीच्या गटात जात आहे त्या मालकाची 12 गुंठे जमीन आहे तरी मी त्या मालकाच्या संमतीने पाच गुंठे त्याला जमीन देऊन पाच गुंठे मी त्याच्याकडून जमीन खरेदी (दस्त) करू शकतो का?

Question by सागर
15-06-2020

उमाकांत , मनोज व महेश हे तीन सख्खे भाऊ आहेत.ह्या तीन भावांमध्ये शेखर उमाकांत हा सर्वात मोठा भाऊ असून प्रमोद सर्वात लहान आहे.ह्या तीन भावांचा एक चुलत भाऊ ज्याचे नाव अनिल आहे.उमाकांत , मनोज , प्रमोद व अनिल यांची सामाईक 80 गुंठे वडिलोपार्जित नविन अविभाज्य शर्त, भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे.ह्या सर्वांचे वाटप पत्र झाले नाहीत.अत्ता ह्या मध्ये अनिल ही आपल्या हिस्साची अर्धी म्हणजे 40 गुंठे जमीन विकू इच्छितो व तसेच त्यांनी एक तिसऱ्या इतर व्यक्ती बरोबर साठे खत केले आहे , हे जेव्हा मनोज ला समजले तेव्हा त्यांनी अनील ला नोटिस पाठवली व त्याचा हिस्सा मी खरेदी करू इच्छितो असे सांगितले पण 3 महिने होऊनही त्याला अनिल कुठला प्रतिसाद नाही आला..
१.तर समाईक जमीन घेण्याचा मनोज यांचा अग्र हक्क आहे का?
२.उमाकांत , मनोज व महेश यांपैकी कोणाला सर्वांत आधी अनिल यांचा हिस्सा विकत घेण्याचा अग्र हक्क आहे?
३.अग्रा हक्काने जमीन विकत घेताना जमिनी ची कुठली किंमत ग्राह्य धरली जाते? शासकीय किंमतचा मोबदला देऊन खरेदी होईल का?
प्रश्न : सर मला मामलेदार कोर्ट अधिनियम १९०५(५) अंतर्गत मामलेदार यांनी दिलेल्या निकालाविरोधात अपील करावयाचे आहे तर ते कोनकाकडे व कोणत्या पद्धतीत करावे.(सद्या अर्जावर की वकीलांतर्फे)
माझ्या आईने नातवांच्या नावाने मृत्यु पत्राने जमीन दिली आहे ते मृत्यु पत्र नोंदणी कृत नाही त्याचा फेरफार तलाठी यांनी तयार केला होता. सदरची नोंद मंडळ अधिकारी यांनी फेटाळली आहे. सदरचे मृत्यू पत्र नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नामंजूर केली आहे. मंडल अधिकारी मृत्य पत्र प्रोबेट करून आणण्यास सांगतात. तलाठी यांचेकडे कोणतीही हरकत नसलेबाबत बहीनीचे जबाब घेतले आहेत. तरी याबाबत काय करावे.
नमस्ते,
माझ्या पंजोबांच्या नावे असलेली जमीन पंजोबा वारल्यानंतर माझ्या चुलत आजोबांनी माझ्या आजोबांची खोटी सही करुन चुलत आत्याच्या नावे बक्षीसपत्र करुन घेतली त्यास आता 40 वर्ष झाली आहेत ती जमीन आपल्याला हवी असल्यास काय करता येईल?
सर मला मामलेदार कोर्ट अधिनियम १९०५(५) अंतर्गत मामलेदार यांनी दिलेल्या निकालाविरोधात अपील करावयाचे आहे तर ते कोनकाकडे व कोणत्या पद्धतीत करावे.(सद्या अर्जावर की वकीलांतर्फे)
आदरणीय सर, माझा प्रश्न असा आहे की,माझ्या जमिनीमध्ये पूर्वी जंगल वहिवाट द्वारे काही इसमांची नावे दाखल झाली होती त्यांनी ती जमीन लगेच दुसऱ्या व्यक्तीला विकली त्यांची व त्या जागेवर सद्या स्थितीला आमची व त्यांची वहिवाट आहे तरी त्यांची नावे कमी कार्यासाठी काय करावे.
घराचे नविन बांधकाम करताना एक समाईक भिंत पडली तर ती कोणी बांधून द्यायचे
गावातील गावठाण मध्ये आमचे घर होते सद्यस्थितीला हे घर पूर्वी काढलेले असून आज रोजी ती जागा मोकळी आहे .परंतु ग्रामपंचायत स्थापन १९५८ झाल्यापासून ते १९९३ पर्यंत ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (८/अ)मध्ये घराची नोंद आढळते आणि ग्रामपंचायत कर भरलेल्या पावत्या देखील आहेत ग्रामपंचायत सदर आज रोजी चौकशी केली असता या मिळकतीची व मोकळ्या जागेची नोंद नाही व ग्रामसेवक साहेबांना विचारले असता ग्रामसेवक म्हणतात की सदर जागा ग्रामपंचायतीने वर्ग करून १९९३ मध्ये घेतली असावी सद्यस्थितीला गावाचा भु सव्हेक्षण (सिटी सर्व्हे)झाला नाही जागा गावठाणातील आहे व आमच्याकडे या जागेचे ग्रामपंचायत स्थापन होण्यापूर्वीचे १९४२ सालाचे खरेदीखत आहे तरी वरील विषयास अनुसरून आमचे प्रश्न असे बागेत कि,
प्रश्न १ ग्रामपंचायत मधील नमुना नं. ८(८/अ) बाद अथवा मयत करता येतो का ?व करता येत असल्यास कोणत्या कलमानुसार येतो?
पश्न २ ग्रामपंचायत कर भरला नसेन अथवा थकीत असेल तर ग्रामपंचायत आणि ग्रामसभा(ग्रामसभेचा ठराव) नमुना नं ८(८/अ) रद्द अथवा मयत करू शकतो का?
प्रश्न ३ ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्डला नमुना नं ८(८/अ) ला आज रोजी या जागेची परत नोंद करता येईल का? व ती कशी करता येईल याचे योग्य मार्गदर्शन व्हावे हीच आपणांस विनंती.

Question by Vijay bendke
08-06-2020
vijaybendke@gmail.com

Sir, aamchya jaminicha mahaul na bharlyane ti varg 2 madhe geli aahe tar aamhi ti parart Kashi milavu shakti. Konala bhetave lagel .kinva process Kay asel please sanga

Question by Vijay bendke
08-06-2020
vijaybendke@gmail.com

Sir, mazya vadilanchya naavavar 2 acre jaga aahe pan ti duaryanchya tabyat aahe ticha taaba kasa milavu shakto. Mojani aanlyavar te objection gheu ahaktat tar Kay karu shakto.
सर माझ्या आई ने 27-2-2001-रोजी दुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव जि बीड येथे खरेदि खत दस्त करून प्लॉट घेऊन घर बांधले . त्याची नोंद ग्रामपंचायत कडे केली. 7-12 नोंद घेण्यासाठी तलाठी सिरसळा कडे अर्ज केला असता जूने दस्त आहे म्हणून नकार देत आहेत.नोंदी साठी मार्गदर्शन करावे.
माझ्या आईची आई श्रीमती विमल प्रभाकर मिसाळ या विधवा असून त्याच्या एकुलत्या एक मुलाचाही मृत्यु झाला आहे. त्यांच्याकडे अर्धा एकर जमीन असून त्यातील चार गुंठे क्षेत्र घर व गोठा यासाठी गेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेमतेम 16 गुंठे जमीन कसण्यासाठी राहिली आहे. त्यातही 2003 साली ग्रामपंचायत वरकुटे खुर्द यांनी दलितवस्ती पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली व आजीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांनी आजीची परवानगी न घेता व कोणतेही जागेचे बक्षीसपत्र करून न घेता आजीच्या जागेत बोर घेतला व 10 बाय 10 फुटांची खोली बांधली. आजीच्या सातबारा उतार्यावर या खोलीची व बोरची कसलीही नोंद केलेली नाही व ग्रामपंचायत कडे जागेचे कसलेही बक्षीसपत्र उपलब्ध नाही. आजीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने आजीच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही ते अतिक्रमण हटवायला तयार नाहीत. उलट आमच्यावरच दमदाटी करून खोट्या पोलिस केस करत आहेत. यासाठी मला पोलिसांनी पकडून नेले होते. आमच्यावर अन्याय होत आहे कृपया यावर उपाय सुचवा.
सर 1250स्के.फु चा प्लाट बिगर एन ए नगर परीषद एरीयात आहे मला बांधकाम करायचे आहे.तरी होम लोन करणे साठी प्लाट एन ए लागतो मला तहसील एन ए करण्यासाठी किती फी व वेळ लागेल.हे सांगा हि विनंती आहे कारण की एजंट लोक खुप पैसे सांगतात. याची प्रोसेजर कशी आहे ते सांगा प्लिज
मी शेखर पवार बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की माझे वडिल धरून 3 चुलते आहेत.आमची 2 गावामध्ये जमिनी आहेत.आम्ही रजिस्टर ऑफिस मधून वाटपपञानुसार खातेवाटप करून ज्याची त्याला जमिन दिलेली आहे.त्यामधील 2 चुलत्यांची जमिन वाघाळे गावात असून त्यांना दिलेल्या जमिनीची नोंद सुद्धा झालेली आहे.पण आता आमच्या नोंदीस अडचण आणत आहेत.तलाठी साहेबांनी दिलेली हक्कसोड नोटीस वर सह्या करत नाही. आम्हाला अडथळा आणत आहेत.हक्कसोड सुद्धा झालेल आहे रजिस्टर ऑफिस मधून... तर आता आमच्या नोंदीचा प्रश्न कसा सुटेल..कळावे..

नमस्कार सर ,grampanchat हद्दी फ्लॅट घेतला आहे.. शेती ना विकास झोने मधे.... मुळशी तालुका मधे..दस्त नोंदणी होऊ शकते का? विसार पावती केली तर चालेल का? कृपया मार्गद्शन करावे...
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या पणजोबांनी 1935 स*** वीस रुपये घेऊन मुदत दहा वर्षे खरेदी खत आठ आणे स्टॅम्प पेपरवर करून दिले होते सदर जमीन खरेदी घेणाऱ्यांच्या ताब्यात असून सातबारा आमच्या नावे आहे व ती जमीन आम्ही 2020 आली विकली ते मुदत खरेदी खत आज आमच्या निदर्शनास आले त्या खरेदी खता विषयी आम्हास काही माहिती नव्हती आम्ही ज्याला खरेदीखत करून दिले त्यांना काही अडचण येईल का कृपया मार्गदर्शन करावे

Question by dada bhau
31-05-2020
dadabhau123@gmail.com

सर शेतात जाण्यासाठी पूर्वापार असणारे शेत रस्ते , फरसबंदी , बैलगाडी रस्ता , पाऊलवाट यांचा उल्लेख असणारे सरकारी भूमी अभिलेख नकाशे कोणकोणते आहेत?
नमस्कार सर मि ५ गुंठे जमिन खरेदी केली आहे आणि सर्व जमिन ९ गुंठे आहे त्यात ३ भाऊ चि आनेवारी आहे ते जमिनीवर ताबा देत नाहीत ७/१२, फेरफार नोंद केली आहे दिलेल्या मालकाने चतुरसिमा दस्ता मध्ये दाखल केली आहे काय करावे

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3