जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Sandeep
01-09-2019
Sbhadane49@yahoo.com

महोदय, माज्या गावात माझा 50x80 प्लॉट आहे ग्रामपंचायत 7/12 उताऱ्यावर मालक सरकार आहे तर भोगवंटदार माझे नाव आहे .गावात सिटी सुर्वे चालू आहे तर काही अडचण येणार का
नगर सर्वेक्षणाचे नोटीस आपणास प्राप्त झाली असेल . आपण सदर सुनावणीस हजार राहून , जमीन मालकीचे असलेबाबत कथन करावे व आपला पुरावा द्यावा .
आपण सुनावणीस हजार राहिला नाही तर , या जमिनीवर आपला कोणताही हक्क नसल्याचे समजण्यात येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब माझा असा एक प्रश्न आहे की, माझ्या आजोबांनी सिलिग मधे मिळालेली जमीन डवरी समाजातील एका माणसाची खरेदी केली आहे.
ति जमीन भोगवट दार वग २ मधे येते, म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी काढून जि काही बाजारभावाने रक्कम होते तची ५०% रक्कम शासकिय खजाण्यत भरणा करून खरेदी केली आहे. म्हणजे ती जमीन आता भोगवटा वर्ग 1 होवून खरेदी केली.

आता आजोबांचं बक्षीसपत्र करून नातंवाच्या नावावर जमीन करायची आहे. पन अपर जिल्हाधिकारी परवानगी देताना त्यांनी हस्तांतर करताना कलम 29 व नियमावली 1975 मधील नियम 12 (ड-१) व त्याखालील उपकलमाचे उपबंधाचे अधीन असेल अशी अट व शर्त घातली आहे.

पण आता ती जमीन भोगवट वर्ग 1 असताना परत ती भोगवट वर्ग 2 मधे कशी गेली.


त्यामुळे आता काय परत परवानगी काढून ५०%रकम भरावी लागेल का.
सर प्लिज माहिती दिली तर बरं होईल.
जमीन खरेदी केली म्हणजे वर्ग २ ची वर्ग १ झाली नाही .
आपणास ५० % रक्कम भरावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या 7 12 उतार वर पूण क्षेत्र पोटखराबादशवत ते लागवडीस वेग करण्या करकरत कुणा कडे आज कराव
प्रथम ते क्षेत्र आपण लागवड योग्य करा नंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dipak
30-08-2019
dipak.a75@gmail.com

On which weblink I will see back 2 years computerized mutation
Please send me लिंक
Thanks
बनावट कागदपत्रे सादर करून भावकितील एकाने अतिरिक्त क्षेत्र असलेला सातबारा तयार करून घेतला आहे.तहसीलदार, आपले सरकार,प्रांत साहेब,कलेक्टर साहेब यांचे कडे तक्रार करून एक महिन्या हुन अधिक कालावधी लोटला.कोणी काहीच करत नाही.आणि अर्जाला उत्तर देत नाही.आता न्याय कोणाकडे मागायचा?
कारवाई होईल . आपलेसरकार तक्रार निवारण कालावधी केवळ २१ दिवसाचा आहे . २१ दिवसात उत्तर देणे क्रमप्राप्त आहे . उत्तर प्राप्त झालेले नाही , आपण जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Raj Sali
27-08-2019
krish9442@gmail.com

Tribal land is purchased by a trust with proper approval and sanctions from collector...Now the trust intends to sell the land to general public...can the trust sell the land
Permission to sell land belonging to tribal to non tribal is given for non agricultural purpose . Whether land has been utilised for the purpose for which permission has been granted ? If yes , then there is no bar , for a trust to sell land .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by jAGDISH SALUNKHE
26-08-2019
jag_s21@rediffmail.com

नमस्कार मी ज्योत्स्ना मोहन साळुंखे माझी आई शांताबाई शेटये हिने २००४ साली ६६० चौ वार जागा बाळाराम न्होईर व इतर ३,५०,००० यांच्याकडून विकार घेतली होती. त्यावेळेला त्या जमिनीवर सिलिंग (महाराष्ट्र शासन) असल्यामुळे जागा नावावर करता येत नव्हती. त्याप्रमाणे जमीन मालकांनी सांगितले कि जेव्हा सीलिंग उठेल तेव्हा तुम्हाला जागा नावावर करून देण्यात येईल. २००४ साली सगळ्या मालकांनी पॉवर ऑफ अट्टोर्नि व विकास करारनामा नोटरी लिहून दिले. विकास करारनामा मध्ये मोबदला म्हणून ३,५०,०००/- मिळाले असे लिहिण्यात आले. २००४ साली आम्ही ग्रामपंचायत पिसावली यांच्याकडून नकाशा मंजूर करून व्यापारी गेले बनविले व नंतर त्यावर कर लावून घेतला.नंतर २०१४ साली सादर ग्रामपंचायत महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाली व आम्ही महानगरपालिके चा टॅक्स भारत आहोत,शरद जागेवर आमचा २००४ पासून अधिकृत कब्जा असून सादर जागा मालक आम्हाला खरेदी खत नोंदणीकृत करून देण्यास तयार नाहीत.आमच्या कब्ज्यानुसार इतर हक्कात आमचे कब्जेदार म्हणून नाव लावता येईल का? किंवा शासनाकडे विनंती करून आमचे पेपर सादर करून आम्ही जागेचे मालक होऊ शकतो का?
जी जागा अतिरिक्त ठरवण्यात आली , ती जागा नावावर होऊ शकत नाही . ज्या मूळ मालकांची जागा होती , त्यांचे धारण क्षत्र नागरी जमीन धारणा कायद्या अंतर्गत निश्चित मर्यादेपेक्षा जादा झाल्याने , त्या जमिनीस महाराष्ट्र शासन हे नाव दाखल करण्यात आले आहे . आपण सध्या स्थित शासनाचे जागे वर अतिक्रमण केले आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मोगल
26-08-2019
sagar06731@gmail.com

प्रश्न -
महोदय , मला 4 भाऊ व 3 बहाणे असे कुटुंब असून आमची 10 एकर वडिलोपार्जित शेत जमीन (एकूण 7 गट आहेत) आहे.माझे 4 ही भाऊ व बहीण हे शहरी नौकरी करत असून ते शेती वर अवलंबून नाही व शेत जमिनी ची वाटे हिस्से करून देत नाही व वडील वारल्या नंतर सातबारा सादरी सर्व 8 जणांचे सामाईक मालक म्हणून नावे लागली आहेत 19 वर्षा पासून.सदर 7 गटा पैकी 4 गट माझ्या ताब्यात असून त्या मी कसत आहे.तर
1. मी एकटा भूमी लेख कार्यालय इथे अर्ज देऊन जमिनीची मोजणी करू शकतो का? कारण बऱ्याच शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
2.तलाठी हे माझ्या नावे पिकपहानी दाखल करत कारण ते बोलता सामाईक जमीन आहे.
3.आर्थिक अडचणी मुळे मी कोर्टात दावा पण नाही टाकू शकलो तर माझ्या कडे काय पर्याय आहे जमीन वाटे करू घेण्यासाठी.
जमिनीचे वाटप करण्यासाठी सर्व सह धारकांची संमती आवश्यक आहे . संमती नसेल तर आपण न्यायालयात जाण्या वाचून पर्याय नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. किरन सर, नविन अविभाज्य शर्त भोगवटदार वर्ग 2 शेतजमिनीत कूकुट्टपालन करने करिता परवानगी संबंधी माहिती द्यावी हि विनंती
कुक्कुट पालन व्यवसाय हा शेती समजला जातो .
त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही .मात्र कुक्कुट पालन शेड साठी नियोजन अधिकारी यांची विकास परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kishor Rokade
25-08-2019
sagaradipune@gmail.com

माझा प्रश्न: माझे आजोबा कुलकर्णी इनाम जमिनी ला कुळ होते. नंतर तेहसिल दार यांनी ३२ ग या इनाम जमिनीला लागू नसलेले कलम अंतर्गत चौकशी करून कुळ बेदखल केले. परंतु त्या पूर्वीही आणि त्या नंतरही शासकीय खंड भरून ती जमीन आजोबा वहिवाट करत होते ७/१२ सादरी तशी नोंद आहे. १९७२ ला मा. प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून आजोबांना व बाकी इतर जणांना कब्जे हक्काची रक्कम भरण्यास सांगितली ऑर्डर तेहसील दार साहेब यांच्या नावे होते मूळ ऑर्डर ची प्रत आमच्याकडे आहे. ऑर्डर मध्ये आजोबांचे नाव कुळ म्हणून दाखल करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तशी काही कार्यवाही त्यांनी पुढे केली नाही.
१९७९ ला आजोबांनी तहसील दारंच्य परवानगी ने कब्ज हक्काची रक्कम भरली परंतु अजनाते पणी पुढील कार्यवाही करायची राहून गेली तरी आजोबा तिथून पुढे त्याचा प्रत्येक वर्षी त्याचा खंड भरत होते तशा पावत्या आहेत.
पुढे जाऊन वडिलांनी त्या जमिनीची मागणी केली ती मागणी प्रांत साहेबांनी मान्य करून त्या कारणी बुडीत खंडाचे २० rs चालना द्वारे भरून घेतले व तहसील दारांना पुढील कार्यवाही करून अहवाल त्वरित सादर करायला सांगितला.
तहसील दारांनी ती फाईल खूप वर्ष कोणतीच कारवाई न करता स्वतः कडे ठेवली खूप पाठपुरावा करून देखील उत्तर मिळाले नाही लेखी अर्ज करता फाईल गहाळ झाली वाळविणे खाल्ली असा शेरा देण्यात आला.
पुन्हा परत जमीन नावे करण्या कामी अर्ज केला असता कोणतीच कारवाई न करता चुकीच्या पद्धतीने बेदखल केलेल्या कुळाचा हवाला देण्यात आला परंतु नंतर च्यां प्रांत साहेबांच्या कुळ दाखल करण्याच्या ऑर्डर कडे लक्ष दिले नाही पुरेस म्हणणं ऐकून घेतले नाही.
पुढे जाऊन वडिलांनी परत प्रांत साहेबांकडे मागणी केली असता त्यांनी खूप वेळ झाला असा निकाल दिला.
वास्तविक आजोबा त्या जमिनीचे कुळ आहेत याकडे लक्ष दिले नाही.
प्रांत साहेबांच्या निकालाच्या २० दिवसात मूळ वतनदार की ज्याने १९४८ पासून कधीच जमिनीचा भोगवटा केला नाही किंवा कसलेच भोगवटा मूल्य कधी शासन दरबारी जमा केले नाही अश्या इसमाने तहसील दारांकडून स्वतः नावे ऑर्डर करून घेतली. व त्या आधी १ वर्षा पूर्वी एका इसमाला सरकारी अकरि पड शेरा जमिनीवर असताना साठे खत करून दिले.
आम्ही काय करावे आमचं सर्व कुटुंब त्या जमिनीवर अवलंबून आहे.

आपले उत्तर: As per Bombay Pargana and Kulkarni Watan (Abolition) Act १९५१ च्या कलम ८ नुसार , कुलकर्णी वाटण जमीन निर्धारित दिनांकास , त्रयस्थ व्यक्तीस कायदेशीर रित्या कसण्यासाठी दिली असल्यास , अशी मिळकत /जमिनीस , मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदी , कुल व जमिनीच्या धारकास त्यांचे हक्क व जबाबदारी संदर्भात लागू असतील .
आपले जमिनीचे कुल असल्याचे प्रांत साहेबांनी जाहीर केले होते . केवळ त्यांचे नाव ७/१२ सादरी दाखल केले नाही म्हणून , आपला कुल मी हणून असलेला हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही . तहसीलदात यांचे आदेश आवाहणीत करा . ( अपील करा )
मात्र आपले प्रश्नात आपण नमूद केले आहे कि , जमीन सरकारी नोकरी पड असताना , , साठे खत करून , त्रयस्थ पक्ष हिट संबंध निर्माण केले .
जर आपले आजोबा या जमिनीचे कुल होते व जामीन कस्त होते तर जमीन पड म्हणून कशी नोंद झाली? आजोबांनी जमीन कसली नाही का ?
तहसीलदार यांनी पूर्वाश्रमीचे वतनदारास ५ वर्षे होऊन गेल्यानंतर ( हा कायदा अमलात आल्या नंतर ) पुनर्प्रदान कशी केली ? हा तहसीलदार यांचा आदेश अहवानीत करा

आपण विचारलेले प्रश्न: जमीन अकरी पड कशी झाली?
उत्तर: kulkarni vatan abolition act नुसारच झाली 1958 सालाला तसा फेरफार आहे. 1966 सली adiitional मामलेदारानी 32ग अंतर्गत चौकशी करून इनाम वतन जमिनीला 1957 ला सदर जमिनीस कुळकायदा लागू नाही सबब कुलांचे इतर हक्कातून नाव कमी केले. त्यानंतर 1972 ला प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून त्या जमिनी वहिवाट दाराच्या नावे करण्यास सांगितले होते व
७/१२ ला इतर हक्कात नोंद घ्यायला सांगितले होते. तशी काही नोंद घेतलीच नाही.
आपला प्रश्न: आजोबांनी जमीन कसली नव्हती का?
उत्तर: सदर जमीन आजही मी माझ्या कुटुंबासह कसत आहे.

मूळ वतन दाराची regrant order मी पाहिली आहे त्यात त्याने खोटे प्रतिज्ञा पत्रक करून तो जमीन कसत आहे असे सांगितले. व आमचे कुळ बेदखल केले आहे हे त्यात नमूद केले.
आम्ही जमीन कसत असून देखील 2012 ते 2016 पर्यंत तलाठी यांनी पीक पाहणी ला आकरि पड अशी नोंद केली आम्ही हरकत घेतली असता जमीन सरकारची आहे असं सांगितले.
खोट्या प्रतिज्ञा पत्रविषयी काय काय कारवाई करता येईल.
आणि जमीन आकारि पड असताना register साठे खत कसे काय केले असेल.?
तहसीलदार यांचे आदेश हवनीत करा
३२ ग (६) अन्वये , जमीन मूळ वतनदारास पुनर्प्रदान करण्यापासून एखादा कुल जमीन कसत असेल तर , अश्या कुळांना सौरक्षण आहे . अश्या कुळाचे नावे जमीन ३२ ग किंमत निश्चित होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुरेश
25-08-2019
sushilk22@gmail.com

सर मिळकत पत्रिकेला सामाईक वारस नोंद आहे पण ग्रामपंचायत नमूना न 43 ला एकाचे नाव आहे त्यावेलेस वडिलांनी भूमिअभिलेख ला वाटणीपत्र न करता ग्रामपंचायत ला केले आहे 100 रु चे बोंड वर
आता माझ्या भावांनी हिस्सा मागीतल्यावर मि त्यांचे नाव ग्रामपंचायत ला लावायला अडवू शकतो का pr card सामाईक लागले आहे पण ग्रामपाच्नायात रेकॉड ला माझे नाव 30 वर्ष पूर्वी लागले व त्या सगळ्या वारसांच्या संमतीने लागले आहे पण त्यांनी आता pr कार्ड ला वारसा केला आता मि काय उपाय करू शकतो कि जेणे करून माझे भाऊ हिस्सा मागणार नाहीत
अशे करणे योग्य नाही
आपला भावाचा हिस्सा मिळकत पत्रिकेत नोंदवला आहे .
आपण ग्राम यांच्यात अभिलेख या मध्ये नोंदवण्यास विरोध केला म्हणून काही फरक पडणार नाही .ग्राम पंचायतीकडे अभिलेख हा केवळ कर संकलनापुरता मर्यादित आहे . त्यावरून मालकी हक्क सिद्धह होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही होते? जर दंड भरला तर पुढे बांधकाम नियमित होईल का?
केवळ गावठाण मध्ये बांधकाम करावयाचे असल्यास , ग्राम पंचायत परवानगी देऊ शकते . अनधिकृत बांधकाम जर बांधकाम नियंत्रण नियमावली नुसार नियमानुकूल होत असेल तरच , ते नियमानुकूल होऊ शकते . अन्यथा बांधकाम दूर करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी राधिका मोरे बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की
1) माझे काका शेतकरी नाहीत.त्यांनी 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत
भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन खरेदी केली होती त्यांचा व्यवहार सन २०१६
चा अधिनियम क्रमांक 20 प्रमाणे दंड आकारून नियमित होऊ शकतो का ? सध्या जमीन नगरपंचायत हद्दीत आहे.परंतु नगरपंचायतीचा विकास आराखडा अजून तयार झाला नाही.
2) सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीला शेतकरी दाखला मिळू शकतो का ? सरकारी नोकरी करणार्‍या व्यक्तीचे वडील यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून ते शेती करतात.
3) संभाव्य बिनशेती म्हणून एका शेतकरयाकडून रस्त्याच्या हक्कासहीत शेतजमीन खरेदी केली असल्यास ती जमीन आता अधिकृत निवासी बिनशेती होऊ शकते काय ?
4) संभाव्य बिनशेती खरेदी म्हणजे काय ?
कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.
१. व्यक्ती शेतकरी नसेलतर जमीन खरेदी करू शकत नाही . २०१६ अधिनियम नुसार जमीन व्यवहार नियमित होऊ शकत नाही
२. होय
३. जर जमीन गावठाण हद्दी पासून ५०० मीटर हद्दीत असेल तर , जमीन मानीव बिन शेती आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मुलाचा जन्म 2018 मध्ये झाला आहे तरी त्याचा दाखला काढलेला नाही काढायचा आहे त्याच्यासाठी प्रोसिजर काय
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला २०१६ मधील ८४ क संधर्बातील शासन निर्णय कोठे मिळतील .
महाराष्ट्र्र शासनकजे संकेत स्थळावर नवीन कायदा सुधारणा आहेत
Google वर , महाराष्ट्र्र शासन निर्णय तुपे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब माझा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे माझी आजी गावच्या ठिकाणी 1985 / 86 निधन पावली. तेव्हा तिच्या मृत्यु ची नोंद केल्याची ग्रामपंचायत मध्ये कल्पना नाही. तरी तिचे सातबारावरील नाव अजून प्रयन्त तसेच आहे ते आम्हाला कमी करायचे आहे तलाठी साहेब मृत्यु दाखला मागत आहे आणि तो आमच्याकडे नाही तर आता आम्ही आमच्या आजीचे नाव सातबारावरून मृत्यु दाखल्या शिवाय कसे कमी करू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Imran Tamboli
22-08-2019
itamboli209@gmail.com

मालकी हक्काचा पुरावा खालीलपैकी कोणता आहे
सिटी सर्व्हे उतारा की ग्रामपंचायत 8 अ उतारा
हे दोन्ही हि मालकी हक्काचे पुरावे नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुशील
20-08-2019
sushilk22@gmail.com

नमस्कार सर
मी परळी येथील रहिवाशी असून माझ्या आजोबाच्या नावावर pr कार्ड ला मोकळी जागा होती त्यांना 8 मुले होते त्यांनी 1993 ला माझ्या वडिलांच्या नावावर ग्रामपंचायत कार्यालय नमुना 8 ला काही जागा नावे करून दिली नंतर त्या जागेवर वडिलांनी घर बांधले पण काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला नंतर ते घर ग्रामपंचायत ला वारसा आधारे माझ्या नावावर झाले पण pr कार्ड वर आजोबाचीच नोंद आहे तर माझ्या वडिलांनी बांधलेल्या घरावर कोणी दुसरा हिस्सा मागू शकतो का pr कार्ड आधारे व जर pr कार्ड ला नोंद करायची असल्यास ती कशि होईल?
आजोबानी कि त्यांचे इतर वारसांनी आपले वडिलांचे नावावर जमीन करून दिली ?
जमीन नावावर नोंदणीकृत दस्त द्वारे करून दिली कि केवळ अनोंदणीकृत दस्त द्वारे ग्राम पंचायत रेकॉर्ड ला नाव दाखल झाले ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
मी नितीन दत्तात्रय साळुंके राहणार कविटखेडा तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद
आमची जमीन पंचवीस वर्षांपूर्वी चुलत आजोबांनी ३ हिस्सा मध्ये वाटली होती .माझ्या आजीच्या नावे चार एकर अजून आजीच्याच नावे आहे पण जी पंचवीस वर्षांपूर्वीची चुलत आजोबांनी वाटणी केली होती त्यामध्ये मला एक एकर जमीन कमी दिल्या गेली ,ती जमीन आता ते त्यांच्या नावे आहे (आजीची सोडून)आणि मला जमीन हलकी पण दिली गेली त्यासाठी मी आता मागणी करत आहे पण आता मला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. त्यासाठी मी काय करू.
आजीच्या नावे जमीन आहे तिच्यावर स्टे ऑर्डर आणू असा विचार चालू आहे
तर यासाठी मार्गदर्शन करावं अशी विनंती.
आपण न्यायालयात जाऊन आपला हिस्सा व जमिनीचा ताबा मिल्ने बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dada moin
18-08-2019
Dadapmoin123@gmail.com

नमसकार सर आपली माहीती माझ्यासाठी फार महत्त्व पुर्ण आहे,
गट रस्ता संदर्भात माझ्या शेतात जाण्यासाठी तहसीलदार यांनी 143 नुसार रस्ता मंजूर केला आहे त्यानंतर अपील झाले उपविभागीय अधिकारी त्यांनी देखील तहसीलदार याचा आदेश कायम केला आहे त्यानंतर पुन्हा अपील अप्पर जिल्हाअधिकारी यांचेकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी देखील तहसिलदार याचा आदेश कायम ठेवला आहे त्यानंतर प्रकरण दिवाणी न्यायालयात गेले त्यांनी देखील निकाल माझ्या बाजूने दिला आहे . तरी देखील माझा रस्ता मोकळा झाला नाही माझी शेत जमीन गेल्या 10 वर्ष पडीत आहे .tahsildar कोणतीही कारवाई केली जात नाही तर सर रस्ता मोकळा करण्यासाठी काय करावे लागेल. आता तर समोरील माणसाने जीतून रस्ता मंजूर केला आहे तेथें त्या बांदाच्या एकाकडेला कडेला रस्त्यावर घर बांदले आहे तरी सर मला योग्य सल्लाह द्यावे ही नम्र विनंती.
दिवाणी न्यायालयात निकालाचे अनुषंगाने Execution proceedings दाखल करा . न्यायालयामार्फत रस्ता देणे बाबत आदेशित करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shankar
18-08-2019
Shankarbkakade@Gmail com

मा. महोदय वनविभागातील अधिकाऱ्यांनी वनक्षेत्रात गुरे चरण्यासाठी मनाई केली आहे,, गावात दुसरे कुठे राखीव गुरचारण जमीन नाही तर, कायमस्वरूपी गुरेचारण्यासाठी जमीन मिळणेसाठी काय करावे लागेल,, 2) राखीव वनजमिन शेती साठी व बांबू लागवड, फळबाग, देशी वृक्ष लागवड करून पर्यावरण शुद्ध राहावे, इत्यादी गोष्टींसाठी हवी असल्यास , पाणबुडे साहेब मार्गदर्शन करावे , ही आपणास विनंती,,
सर, मी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३२ अन्वये माझ्या क्षेत्रालगत तयार झालेली मळई जमीन मिळणेकामी महसुल उपजिल्हाधिकारी यांचे कडे सन २०१५ मधे अर्ज केला आहे.
नदी पात्राच्या पलीकडील लोकांचे माझ्या ताब्यातील मळई जमीन त्यांना मिळण्याचे अर्ज कलम ३२ अन्वये फेटाळले आहेत. त्यामुळे
अर्जाच्या अनुषंगाने आज पर्यंत सुमारे ४ वेळा स्थळपाहणी झाली आहे. सर्व रिपोर्ट नुसार मळई जमीन माझ्या गटालगत आहे.
मी कलम 32,33 तसेच महसुल परिपत्रक क्रमांक 5 दिलेले आहे. माझा पुर्ण अर्ज कायदेशीर आहे. परंतु दुर्दैव असे आहेत की वाळूमाफिया आणि त्यांचा वाली असणारा स्थानिक आमदार हे सर्व महसुल कलेक्टर बरोबर हातमिळवणी करून बसले आहेत त्यामुळे माझा अर्ज मुद्दाम प्रलम्बीत ठेवला आहे.
काय करू मी आता इथे कुंंपणच शेत खात आहे.
प्रकरणावर केवळ विहित मुदतीत निर्णय घेणे बाबत आपण उच्च न्यायालय कडून रीत याचेकेद्वारे आदेश घेऊ शकता . मात्र सदर मलाई जमीन आपणासच द्यावी अशे आदेश उच्च न्यायालय देऊ शकत नाही .
जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत . या बाबत आपण जिल्हाधिकारी यांना भेटा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, मी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३२ अन्वये माझ्या क्षेत्रालगत तयार झालेली मळई जमीन मिळणेकामी महसुल उपजिल्हाधिकारी यांचे कडे सन २०१५ मधे अर्ज केला आहे.
नदी पात्राच्या पलीकडील लोकांचे माझ्या ताब्यातील मळई जमीन त्यांना मिळण्याचे अर्ज कलम ३२ अन्वये फेटाळले आहेत. त्यामुळे
अर्जाच्या अनुषंगाने आज पर्यंत सुमारे ४ वेळा स्थळपाहणी झाली आहे. सर्व रिपोर्ट नुसार मळई जमीन माझ्या गटालगत आहे.
मी कलम 32,33 तसेच महसुल परिपत्रक क्रमांक 5 दिलेले आहे. माझा पुर्ण अर्ज कायदेशीर आहे. परंतु दुर्दैव असे आहेत की वाळूमाफिया आणि त्यांचा वाली असणारा स्थानिक आमदार हे सर्व महसुल कलेक्टर बरोबर हातमिळवणी करून बसले आहेत त्यामुळे माझा अर्ज मुद्दाम प्रलम्बीत ठेवला आहे.
काय करू मी आता इथे कुंंपणच शेत खात आहे.
tenancy act...protected tenanants right was not recorded till 1957....the land transfered to salt deptt in the year 1953....limitation of claiming deemed purchasers right is valid afterwords is it possible?...the same land was not utilised for the purpose for which was acquired..in the year1982 same land transfered to CIDCO....till date cidco has not utilized land..the same was transfered to New mumbai corporation...a piece of 5 acres is utilised by nmmc...rest is not utilised for development any kind till date...can we claim the PROTECTED TENANTS right 32g..now?...now LAQ officer says your are liable to have claim of 12.5p.c.benifits..as per nmmc.norms..is it possible to have all land to back to P.T.?would like to meet you for cosultation...reply your availability..comming accordingly...thanks,regards....inamdar.
your right as a protected tenant is not recorded. Then how you can claim that you are deemed purchaser ? Before such claim is made , you need to be recorded as protected tenant in revenue record . However land has been transferred to salt Department which has been transferred to CIDCO . At this stage you cannot claim to be tenant and deemed purchaser

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत हद्दीत संभाव्य बिनशेती म्हणजे काय ?
एक शेतकरी जर त्याची 6 गुंठे जिरायत शेतजमीन संभाव्य बिनशेती म्हणून विकायला तयार आहे मला ती शेत
जमीन निवासी कारणासाठी घ्यायची आहे परंतु मी शेतकरी नाही आणि माझ्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही.सदर शेतजमीन खरेदी करावी काय ?
संभाव्य बिनशेती संकल्पना हि शीघ्र सिद्ध गणक म्हणॆ नोंदणी विभागाने दरवर्षी , जमिनीचे बाजार मला काय याची प्रसिद्ध केलेली सूची .
संभाव्य बिबशेती म्हणजे अशी जमीन बिनशेती झाली आहे असा नाही .
कुल कायद्याच्या कलम ६३ प्रमाणे जमीन खरेदी करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे .

तथपि २०१६ मधील , कुळकायदा सुधारणा कायद्या नुसार , जमीन रहिवासी , वाणिज्य अथवा औद्योगिक वापर विभागात ( झोन ) स्थित असेल व तिचा वापर या उपरोक्त कारणासाठी करण्याचा असेल तर तर शेतकरी असण्याची आवश्यकता नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.85 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3