जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रमेश भावे
27-03-2019
rameshbhave@hotmail.com
१. वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपात कमीत कमी किती गुंठे जमिनीचा ७/१२ उतारा बानू शकतो? माझ्या नावे ८ गुंठे जागा येत आहे
२. जमिनी मोजणी अर्जा सोबत कोणती कागद पत्रे जोडावी लागतात ?
वरकस जमीन -२० गुंठे
भात शेती / एकपिकी - १५ गुंठे
बागायती - ५ गुंठे
उपरोक्त जमीन प्रकारानुसार , या पेक्षा जमीन कमी उरणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक .
८ गुंठे जागेवंगे स्वरूप काय आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rupesh vishwekar
26-03-2019
rupeshvishwekar@gmail.com
वर्ग2शेत जमिनीचे रजिस्टर willdeed करणेस permission लागते काय
Question by सागर
23-03-2019
sagarkandekar@hotmail.com
माझा प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
आपले उत्तर -
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते .
प्रश्न सर -
१.हे सर्व वारस एक मेक्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत, जर मी त्यांना नोटिस न बजावत 1/2 क्षेत्र खरेदि केले तर ते (इतर वारस) न्यायालयात माझे 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम , कलम 22 ' प्रमाणे खरेदी खत रद्द करण्याचा व तो 1/2 आम्ही घेण्यास तयार होतो असा दावा टाकू शकता का?
Question by poorva
22-03-2019
poorva.wadke@yahoo.com
नमस्कार सर ,तलाठी व मंडळ अधिकारी ला पत्र लिहायचे आहे .न्यायालयात चालू असलेला दावा वादी ने न चालविल्याने रद्द करण्यात आला आहे तर सात बारा वरती असलेली दाव्याची नोंद रद्द करण्याकरिता.
Question by अजय पाटोळे
04-02-2019
ajaypatole.ap@gmail.com
सर 1980 साली शासनाने प्लॉट करून जागा वाटप केल्या होत्या लोकांना राहण्यासाठी परंतु खुली जागा होती म्हणून एक प्लॉट वर 1987 साली ग्रामपंचायतीने राहण्यासाठी ती जागा आम्हाला दिली होती राहण्यासाठी.पण ती जागा सिटी सर्व्हे ला (7/12) दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे.आम्हाला माहिती पण नाही ती व्यक्ती कोण आहे उताऱ्यावर च नाव फक्त माहिती आहे तरी आम्हाला दुसरीकडे कुठेच जागा नाहीये व या जागेचा 7/12 वर आमचं नावं नोंद करायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल योग्य ते मार्गदर्शन करावे???
शासनाकडून हि जागा आपणास मिळणार नाही
परंतु या जागेवर आपले अतिक्रमण नियमानुकूल करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पाबळे रोहिदास सखाराम
04-02-2019
rohidaspable@yahoo.in
महार वतन जमिनीची शर्तभंग झाली असल्यास नियमित करण्यासाठी काय करावे लागेल
Question by श्रेयस रामचंद्र जोशी.
03-02-2019
shreyasrjoshi26@gmail.com
नमस्कार,
देऊळ, ट्रस्ट, देवस्थान, मंदिराच्या जागांना कुळ लागतात का ? कुळ लागली असतील पण त्यांना काढायची असतील तर काय करावे लागेल ?
देवस्थान जमीन ला कुल लागू शकतो
मात्र त्याचे नावे विक्री होऊ शकत नाही
देवस्थान जमीन स्वतः कसण्यासाठी अशी जमीन काढून घेऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sharmila
01-02-2019
shardha12@yahoo.com
mi X kadun jamin vikat ghetli, sale deed register kele. X ya navane 7/12 hota. pan mazya navavar 7/12 zala nahi, jamin ni.sa.pra. aslyache karan denyat aale. aata X sahkary karat nahi, tar aata mazya kade kay paryay aahet ?
आपण शेतकरी आहेत का ? आपण जर शेतकरी असाल तर नवीन सुधारणा कायदयानुसार आपला व्यवहार दंड भरून नियमानुकूल करता येईल .
जमीन कोणत्या गावी/ तालुक्यात/ जिल्ह्यात आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Awalekar
29-01-2019
sandeepawalekar@gmail.com
तलाठ्यांनी वसुली रकम जवळ ठेवण्याची मर्यादा बाबत शासनादेश असल्यास कृपया माहीती द्यावी
Question by रामदास झिम्ब्रे
24-01-2019
ramdaszimbare@ yahoo.com
सातबारा वरती जर नाव वर्णाक्षरे ने चुकीची असतील तर कुठे तक्रार करावी?
Question by अमोल चव्हाण
24-01-2019
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माझा प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी माझ्या आत्याला २००४ साली निबंधकाकडे जाऊन रजिस्टर मृतुपत्र केले आहे,ते मृतुपत्र माझ्या नावावर आहे हे मला माहित नव्हते,आत्या २०१७ साली मयत झाली तेव्हा मला कळले ,मृत्यूपत्र तलाठी यांच्याकडे नोंदीला दिले तलाठी यांनी नोंद घाली आहे ,पण ७/१२ वर नोंद घालत असताना वारसांना कळले त्यांनी कोर्टात दावा दाखल केले आहे आणि मी मृतुपत्र पहिले असता मृत्यूपत्र करताना मृतुपत्रा मध्ये काही चुका झाल्या आहेत त्या म्हणजे १) दोन साक्षीदार आमच्या गावाचे आहेत पण त्यांचे पत्ते चुकीच्या गावाचे टाकले आहेत
२) साक्षीदार व मृतुपत्र करणारी माझी आत्या यांची दस्ताला ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत
3) मृतुपत्र करतेवेळी आत्याचे ७५ वय झाले होते,मृतूपत्राला डॉक्टरांचा मेडिकल आणि फिजिकल फिटनेस दाखला जोडला नाही,
3) आत्याने माझे नावे मृतुपत्र करण्याचे कारण आत्याला मुल बाल नाही,व आत्याची मृतुपत्रातील इच्छा मरेपर्यंत सांभाळ सेवा चाकारी करणार म्हणून केले होते ,परंतु आत्या तिच्या सासरी असल्याने मी तिचा सांभाळ, सेवा दवाखाना केली नाही ,मृतुपत्र रजिस्टर आहे, परंतु आत्याच्या वारसदाराना मृतु पत्राबद्द्दल माहित झाले असल्याने त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे,हे मृतुपत्र कोर्टात चालेल का ,मी पुढील कायदेशीर कार्यवाही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
Question by प्रशांत बालाजी केंद्रे
23-01-2019
pkendre232@gmail.com
मी लहान असताना आजोबांनी काही जमीन माझ्या नवे केली आहे परंतु त्या वेळी ती जमीन टोपण नावाने सातबाऱ्यावर नोंदवली गेली... सध्या सर्व शासकीय कागदपत्रे माझ्या चालू नावावर आहेत फक्त सातबारा टोपण नावे आहे तर ते नाव दुरुस्ती कशी करावी
Question by Sushil Karnade
21-01-2019
Sushi.karnade@gmail.com
Bhogwatdar warg 2 jamin vidharbha prane sampurna rajyat warg 1honyachi kiti shakyata आहे
Question by रवींद्र रामभाऊ गोळेसर
20-01-2019
ravindra.golesar@rediffmail.com
मा. श्री. पाणबुडे सर , तक्रार रजिस्टर भरल्यानंतर किती दिवसा मद्ये निकाल दिला पाहिजे , निकाल देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असेल तर कायकरावे संबधीत अधिकारी पुढची तारीख देत नाही व निकालही देत नाही कृपया आपले मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
कायदाची मर्यादा १ वर्षाची आहे .
मात्र शास्नानाने परिपत्रकाद्वारे ती मुदत कमी केली आहे
३ मानण्यात निकाल देणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम मोरे
18-01-2019
santoshpmore9@gmail.com
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
Question by अमित दवाणगावे
18-01-2019
d_amit29@yahoo.com
सर मला ज़िला अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कलाम ३१ अ निर्यणाया निकाल विरुद्ध अपील करावयाचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
Question by Sarang
07-01-2019
Sarangalone@rediffmail.com
अम्हला देवास्तन ची 30 अकर जमिन खरेदी ची 2008 मधे धर्मदय आयुक्त ची परवानगी मिढली होती पण ट्रस्टी ने पुर्ण रकम घेऊण फक्त 25 अकर च जमिन खृरेदी करुण दिली 5अकर जमिन खरीदी चे आश्वासन दिले होता पण खरीदी करुण दिली नाही तया मुडे 5 अकर साथी अम्ही कोर्ट मधे केस केली आहे आम्हला 5 अकर जमिनिची खरीदी ची ऑर्डर मिढल काय?आज 07/1/2019 कोर्ट-कचहरी चालू आहे
आपण ३० एकर जमिनीचा साठे करार केला होता का ? आपण कोणत्या आधारे उर्वरित ५ एकर जागा देव्स्ताहन विश्व्स्तांनी आपणास द्यावी याचा दावा करत आहेत ? कोणता दस्त आपणाकडे आहे ? त्यावर अवलंबून आहे . आपले २५ एकराचे दस्त मध्ये ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत देवस्थान विश्वस्तांनी नमूद केले आहे का ?
विश्वस्तांना ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत आपण सिद्ध करू शकला तर , आपणास उर्वरित जमीन विश्वस्तांनी विक्री करून द्यावी या बाबत न्यायालय आदेश देऊ शकेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम मोरे
07-01-2019
santoshpmore9@gmail.com
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
खरेदी देणाऱ्याची सही नसेल मात्र , अंगठा आहे का ? असल्यास खरेदी खत वैध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
07-01-2019
ShankarBkakade@Gmail.com
श्री पाणबुडे सर
आमच्या गावात सरकारी जमिनीवर चाळी बांधकाम करून विक्री करतात तर ह्यासाठी कुठे तक्रार करावी, तसेच मोठ्या प्रमाणात डोंगर खोदून माती विकतात,,
अवैध उत्खननाबत बाबत आपण तहसीलदार यांचे कडे तक्रार करा .
चाली बांधकामास नियोजन अधिकाऱ्यांची विकास परवानगी नसेल तर , त्या नियोजन अधिकारी यांचेकडे तक्रार करा
नियोजन अधिकारी - बांधकाम नगर पालिका क्षेत्रात असेल तर - मुख्याधिकारी
महानगर पालिका - पालिका आयुक्त
गावठाण - ग्रामपंचायत
अन्य ग्रामीण भाग -जिल्हा प्रादेशिक योजना - जिल्हाधिकारी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश कदम
05-01-2019
ygsh.kdm@rediffmail.com
सर
माझे वडील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये रोजंदारी वर कामाला होते त्यांना पगार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट देत होते १९८७ ला त्यांना कामावरून काढले त्यानंतर वडिलांनी कामगार कोर्ट मध्ये केस केली त्या चा निर्णय वडिलांच्या बाजूने लागला परंतु स्टेट ट्रान्सपोर्ट ने अपील केले तेथे सुद्धा खालील कोर्ट चा निर्णय कायम केला ह्या सगळ्या मध्ये वडिलांचे वय ६० वर्षे झाले त्या मुळे स्टेट ट्रान्सपोर्ट ने तुम्हाला तुम्ही वया मुळे कामावर हजार होऊ शकत नाही असे सांगून अत्यल्प मोबदला दिला बाकी कोणत्या हि सुविधा दिल्या नाहीत तरी त्यांना इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पेन्शन मिळणे साठी काय करावे हे मार्ग दर्शन करावे हि विनंती कोर्ट ने असे सांगितले कि स्टेट ट्रान्सपोर्ट पगार देत असलेने सदर कर्मचारी हा तुमचा कामगार आहे कॉन्ट्रॅक्टर चा नाही
कामगार न्यायालय व त्यावरील अपील न्यायालय यांनी , वडिलांचे बाजूने निकाल दिला आहे . मात्र न्यायालयाचा निकाल काय होता ? जर निकाल , वडिलांना सेवेत कायम स्वरूपाचे कर्मचारी म्हणून घ्यावे असा असेल तर , निवृत्ती नंतर चे सर्व लाभ आपणास , महाराजस्त्र राज्य परिवहन मंडळाने पूर्व लक्ष्यी प्रभावाने देणे आवश्यक . आपण ज्या कामगार न्यायालयाने निकाल दिला त्याच न्यायालयात दाद मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Somnath lokhande
04-01-2019
somnathlokhanderx@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांनी व मोठ्या भावाने 2008 साली 2आर जागा व त्यातील घर नोदणीकृत करारनामा करून दिले घेणारा माणूस बाहेर राज्यातील असून तो मयत आहे त्याचे कोणी वारसदार नाही 7/12 व घर वडिलांच्या नावे अजुन आहेत गावातील ज्या व्यकतीने हा व्यवहार केला आहे तोच आजपर्यंत घराचे भाडे घेत आहे तर ते घर आम्ही परत घेऊ शकतो का कायदेशीर माग॔दश॔न करावे.
वास्तविक ना आपला व त्या त्रयस्थ इसमाचा आता त्या घर व त्या खालील जमिनीवर कोणताही हक्क उरलेला नाही . विना वारस जमीन शासनाकडे निहित होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
वास्तविक ना आपला व त्या त्रयस्थ इसमाचा आता त्या घर व त्या खालील जमिनीवर कोणताही हक्क उरलेला नाही . विना वारस जमीन शासनाकडे निहित होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
वास्तविक ना आपला व त्या त्रयस्थ इसमाचा आता त्या घर व त्या खालील जमिनीवर कोणताही हक्क उरलेला नाही . विना वारस जमीन शासनाकडे निहित होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
वास्तविक ना आपला व त्या त्रयस्थ इसमाचा आता त्या घर व त्या खालील जमिनीवर कोणताही हक्क उरलेला नाही . विना वारस जमीन शासनाकडे निहित होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयंत वाघले
04-01-2019
jayantwaghale.jw@gmail.com
माझे वडील महसूल मंडळ अधिकारी या पदाने माहे ऑगस्ट २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सदर त्यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन माहे जुलै २०१८ दिले होते आणि माहे नोवेंबर २०१८ निकाल निर्दोष म्हणून दिला आहे. पण विभागीय चौकशी आरोपपत्रातील काही आरोप हे खोटी माहितीच्या आधारे टाकण्यात आले होते. खोटी माहिती देणाऱ्या शासकीय कर्मचारी विरुध्द तक्रार देऊ शकतो? शक्य असल्यास कोणाकडे करावी? कृपया मार्गदर्शन करावे.
होय
आपण जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करू शकता . मात्र संबंधित कर्मचाऱ्याने खोटी माहिती दिली होती हे आपणास सिद्ध करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर कांडेकर
03-01-2019
sagarkandekar@hotmail.com
प्रश्न - महोदय , माझ्या मालकीच्या जमीन च्या इतर हक्कात स.सा. कुळ असलेल्या व्यक्ती ची नावे चौकशी करून (केस चालवून) व माझ्या बाजून निकाल देत कुळ असलेल्या व्यक्तीची नवे इतर हक्कतून कमी करण्याचा आदेश मा.तहसीलदार यांनी केला आहे व त्याची प्रत गाव तलाठी याच्या कडे पोहचली आहे तरीही ;
१.नियमाप्रमाणे तलाठी याना किती दिवसात नोंद घालणे बंधनकारक आहे.
२.तसेच ज्या इतर हक्कातील व्यक्तीची नावे आदेशानुसार कमी होणार आहे त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यां कडे अपील करण्याची किती दिवसाची मुदत असते?
१. तलाठी यांनी तहसीलदार यांचा आदेश असल्याने लगेच नोंद मंजूर करणे आवश्यक
२. अपील करण्याची मुदत ६० दिवस आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विरेश विलास अंधारी
02-01-2019
vandhari25@gmail.com
तहसीलदार यांनी दिलेल्या निकालानुसार २४ .११ ७० चा ३२ म निरर्थक ठरवून ३१ .७ .१९८९ रोजी ३२ म प्रमाणपत्र माझे आजोबांचे नावे करण्यात आले ७/१२ वर आमचे नावाची नोंद होन्याचे दरम्यान नोव्हेंबर १९८९ मध्ये एकत्रीकरण झाले त्यामुळे सदर जमीन आमचे नावे न होता यापूर्वीचे मालकाचे नावेच राहिली त्यामध्ये यापूर्वीचे मालकाचे लगतची जमीन एकत्र होऊन जमिनीचे क्षेत्र बदलून जास्त झाले व जमीन त्याचेच नावे राहिली . सदर प्रकरणात एकूण दोन गट नंबर (६८७ , ८०४ ) होते. गट ८०४ मध्ये ३२ म नुसार आमचे क्षेत्र ३० आर व विरोधकाचे २१ आर एकूण ५१ आर व गट न ६८७ मध्ये ४ आर आमचे व विरोधकांचे २ आर एकूण ६ आर . त्यापैकी एक गट ६८७ मधील ६ आर पैकी ३ आर जमीन वारसाने विक्री केली व विक्री चे परवानगीसाठी जुना २४ .११ .७० चा ३२ म जोडला . मला असे विचारायचे आहे कि गट न ८०४ मधील ३० आर आमचे क्षेत्र असल्याने त्याची नोंद आमचे नावे ७/१२ वर घेण्यासाठी ३२ म व एकत्रीकरण (९)(३ )(९ )(४ ) देऊन अर्ज तलाठी यांचेकडे देणे योग्य आहे का व गट ६८७ बाबत विक्री चा फेरफार रद्द करणेस मा उपजिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज देणे योग्य आहे का
या दोंघाकडे अर्ज देऊन अथवा अपील करून उपयोग नाही . त्यांना अधिकार क्षेत्र नाही
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा , कलम ३२ अथवा ३३ अन्वये जमाबंदी आयुक्त किंवा शास्नानाने गटवार योजना बदल करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas sanap
02-01-2019
Vikassanap1993@gmail.com
1. maharashtra land revenue code 1966 chya kalam 247 kon kontya adhikariyan kade appeal karta yete ? 2. Saksham pradhikari chi name list milawi?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
