जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अभिजित गोर
03-12-2018
gorabhijit@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या आजोबानी माझ्या नावावर खरेदी खत करून त्यांची थोडी जमीन माझ्या नावावर केली आहे.तर त्यावर माझे वडील किंवा काका कोणी दावा करू शकतात का?
आणि आता आजोंबांना त्याची राहिलेली जमीन मला द्यायची आहे त्याला काय करावे लागेल?
आजोबांची स्वकष्टार्जित जमीन असल्यास , वडील किंवा चुलते दावा करू शकणार नाहीत
मात्र आजोबांची वडिलपार्जीत जमीन असल्यास , त्यांनी वडिलांना व चुलत्यानां त्यांचे हिस्स्याची जमिनदिली नसल्यास , चुलते , वडील दावा दाखल करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभय जाधव
03-12-2018
abhayjadhV45@gmail.com
मालमत्ता पत्रिका असताना 7/12 तपासून रूपांतरण कर भारतात का?
gr आहे का
प्लीज guide
माझया कडे प्रॉपर्टीकार्ड आहे रूपांतरण कर भारणेसाठी 4महिने अर्ज केला आहे
clerk बोलतो 7/12, फेरफार चेक करावा लागतो
प्लीज मार्ग सांगाr3dq
Question by सारंग शिंत्रे
02-12-2018
highwaytrack786@gmail.com
नमस्कार सर
माझे वडीलांचे नावे असलेली जमिन सन १९८८ला पाटबंधारे प्रकल्पात गेली आहे.
२ जमिनिंचे नुकसान भरपाई(वडीलांना मिळाली नसल्यामूळे) मुलकी अनामतीस जमा झाली आहे.
त्यावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामूळे वडीलांनी पर्यायी जमिनीसाठी अर्ज केला नाही किंवा पुनर्वसन नको असेही सांगितले नाही अथवा लेखी दिले नाही.
परंतु पुनर्वसन खात्यामधे 'पुनर्वसन नको' अशी परस्पर नोंद केली आहे.
आम्हास १९८६ चा पुनर्वसन कायदा लागु आहे.
माझे वडीलांचे २०१७ मधे निधन झाले आहे.
सन २०१५ कींवा २०१६ मधे पुनर्वसनासाठी राज्य सरकारने नवीन योजना आणली होती.त्यावेळी वडीलांनी पुनर्वसन धोरणात सामील करावे यासाठी अर्ज केला होता परंतु पुनर्वसन खात्याकडुन काही उत्तर आले नाही.
मला कॄपया मार्गदर्शन करावे की----
१) मी आता पर्यायी जमीन मागु शकतो का? कारण काही रक्कम मुलकी अनामतीस आहे.
२) त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
३) गावाकडील दुस-या जमिनीवरील वारस नोंद चालु शकेल का?
४) पर्यायी जमिनीसाठी किती रक्कम भरावी लागेल? प्रती एकर दर काय आहे?
धन्यवाद
Question by Sagar mali
01-12-2018
sagar143mali@gmail.com
सर माझा कडे 3000 स्क्वेअर फुट चा भुखंड आहे तरी तो मला वानिज्य कडे वर्गीकरण करायला प्रक्रिया सांगा
सक्षम महसूल अधिकारी कडे वापरात बदल करीत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by Pravin Lokhande
30-11-2018
nikysweet1@gmail.com
नगर पंचायत क्षेत्रात माझे
घर / प्लॉट आहे . नझुल मध्ये नोंद करणे आवश्यक आहे का... किंवा करता येईल का ?
याबाबत मार्गर्शन करावे.
Question by ravi jadhav
30-11-2018
ravijadhav55@gmail.com
samayik june ghar padun tya jagi navin ghar bandhavayache aslyas grampanchayatichi tasech itar konti parvangi ghyavi lagel kay ?? saat baryavaril pratyekachi parvangi gyavi lagel kay ?? Tasech bhavishyat kahi vaad upasthit hovu naye mhanun kay kalji gyave lagel. krupaya margadarshan karave.
जागा गावठाणात असेल तर , ग्राम पंचायतीची घर बांधकाम परवानगी लागेल . जागा गावठाणात नसेल व गावठाणाबाहेर आहे व त्यास सर्वे नंबर असल्यास मात्र नियोजन प्राधिकारी -जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी यांची परवानगी लागेल
बांधकाम परवानगी अर्ज , ७/१२ वर जय व्यक्तींची नावे आहेत , त्या सर्वानी मिळून अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजे सर्वांची संमती आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
28-11-2018
sagarkandekar@hotmail.com
गट न.235 (भोगवटदार वर्ग - 2 ) हा 7 गुंठे + पोटखराबा 3 गुंठे असा एकूण 10 गुंठे चा असून त्याच्या इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्त ,तुकडा व स.सा.कुळ म्हणून 8 व्यक्तीचे नावे हे जी 1988 रोजी वारसांनी लागेली होती.माझा स्वतःचा गट न.236(130 गुंठे) हा गट न.235 च्या शेजारी असून...
1. मी तुकडे बंदी कायद्या अधीन तो खरेदी करू शकतो का..? मूळ मालक मला विकण्यास तयार आहे.
2. कुळाची खरेदीसाठी परवानगी घ्यावी लागेल का..?
3.मागील 50 वर्षी पासून मूळ मालकच जमीन कसत असून पिकपेरे त्याचेच नावानी आहे तर जमीन वर कुळ असलेले व्यक्तीचे नाव तहसीलदार साहेब कमी करतील का ? कुळाच्या वडील चे कूळ म्हणून 1968 साली लागले आहे.
आपले उत्तर -
१. आपण लगतचे खातेदार असाल व सदर तुकडा पूर्वीचा असेल ( कायदा येण्यापूर्वीच ) तर आपण खरेदी करू शकता .
२. अविभाज्य शर्थ जमिनीस कुल कसा लागू शकतो . अविभाज्य शर्थ जमीन म्हणजे , एखाद्यास कसण्यासाठी दिलेली जमीन . कुल आहे म्हणजे त्या व्यक्तीने जमीन स्वतः कसलेली नाही , म्हणजे तो शर्थ भंग हि होऊ शकतो .
३. कदाचित जमीन vatan जमीनही असू शकते . असल्यास संबंधित vatan कायद्याच्या तरतुदीनुसार विक्री /खरेदी शक्य .
४. कुळाचे नाव कमी करणे सध्यस्थित अशक्य . तथापि कलम १४ , १५ अथवा ३१ चा आधार घेऊन काही शक्यता तपासू शकता
वरील प्रमाणे आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
1.आपण सांगितले की कायदा येण्यापूर्वी तुकडा असेल तर पण 1947 च्या तुकडेबंदी कायद्याने च तर जमीन तुकडा आहे की नाही हे ठरविण्यात आले होते.तर कायदा येणे अगोदर तुकडा प्रकार होता काय?
3.एखाद्या जमिनीचा इनाम वर्ग ची कुठून माहिती मिळेल.
4.सदर गट हा 11 गुंठे चा तुकडा आहे व मी लगत चा खातेदार आहे तर मी शासनच अर्ज करुन खरेदी रक्कम देऊन खरेदी करू शकतो का?
१.कायदा अमलात आल्यानंतर , जे जमिनीचे क्षेत्र , प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होते , त्यास तुकडा असे संबोधण्यात आले . अश्या सर्व सर्वे नंबरची यादी करण्यात आली आहे .
२. जुने फेरफार पहा
३.होय . मात्र मालकाची विकण्याची इच्छा असली पाहिजे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम मोरे
26-11-2018
santoshpmore9@gmail.com
खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
१. हे आपण कोणत्या आधारे म्हणत आहात
२. होय. दस्त नोंदणीसाठी प्रलंबित असेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vikas sanap
23-11-2018
vikassanap1993@gmail.com
1. Tashil record room madhil record 7/12 ferfar sodhanychi swata shetkaryana parvangi hai ka? 2. Tysathi konta circular or konachi parvangi ghavi lagel 3. Mi tashildar saheb yana arja kela asta te mahnta ka circular dakhav mahnun.
शेतकऱ्यांना स्वतः ७/१२ , फेरफार शोधण्याची परवानगी नाही . मात्र अभिलेख कक्ष लिपिकाने असे दप्तर उपलब्ध करून दिल्यास , त्याचे परीक्षण करता येते .
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत नियम आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayaji Patil
22-11-2018
sayaji.infotech@gmail.com
माझ्या वडिलांनी सन-2000 साली संबंधित जमीन मालकाकडून त्याचे 31 गुंठ्यापैकी 5 गुंठे शेतजमीन (कोल्हापूर जिल्ह्यामध्ये) खरेदीखत केली आहे. खरेदीखताची मूळ प्रत उपलब्ध आहे. परंतु जमीनीचा मालक मयत झाला असून त्याचा मुलगा जमीन नावावर करुन देण्यास तयार नाही. तरी सदर जमीन माझ्या वडीलांच्या 7/12 वर नोंद करणेकरिता काय करावे लागेल?
खरेदी खताच्या आधारे नोंद होण्यास काही अडचण नाही .
मालक मयत असला तरीही नोंद होणे आवश्यक . मुलास हरकत असल्यास त्याने खरेदी खत न्यायालयाकडून रद्द करून घेणे आवश्यक
उपलब्ध खरेदी खताच्या आधारे नोंद मंडळ अधिकारी यांनी नोंद मंजूर करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल प्रकाश धमके लिपिक
20-11-2018
amoldhamke67@gmail.com
कब्जे हक्काची रक्कम मुदतीत न भरल्याने कब्जेदार सादरी असलेले जमीन मालकाचे नाव कमी करून सरकार नाव दाखल झाले त्या अनुषंगाने मिळकतीच्या अधिकार अभिलेखावरून सरकार हे नाव कोणत्या शासन निर्णयानुसार कमी करता येईल
कब्जेहक्काची रक्कम भरली नाही म्हणजे , जमीन वर्ग १ झाल्याचे आदेश रद्द झालेले आहेत . आपणास परत अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shankar kakade
19-11-2018
shankarbkakde@gmail.com
आदरणीय श्री पाणबुडे सर आमच्या घरा शेजारी आमचाच काका गावठाण (सरकारी) जमिनीवर चाळी बांधतो आमची परवानगी ना घेता,,आणि नगरपालिका संदर्भात पूर्ण गावाची केस चालू आहे त्यामुळे सगळे कायदेशीर बांधकाम बंद आहेत,, काका चाळी बांधतात ती जमीन आणि आमचे घर 1च सर्वे नंबर ची आहे,,त्याच्या ७/१२ वर सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नाव आहे,,त्या चाळी बांधून ते विकणार आहेत,,तर ह्या संदर्भात त्यांनी चाळी ना बांधण्यासाठी काय करावं लागेल मार्गदर्शन करावे ,,,,
काका सरकारी जागेवर चाल बांधत आहे . म्हणजे नक्कीच त्याचे बांधकाम अवैध आहे . जमीन ज्या स्थानिक प्राधिकरणाचे अखत्यारीत येते ( महानगर पालिका , नगर पालिका , ग्राम पंच्यात ) त्यांचे कडे तक्रार करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गौरव वाळके
18-11-2018
grvwalke21@gmail.com
नमस्ते सर ,
आमची जमीन धरण कालव्यांसाठी संपादित झाली असून माझ्याकडे प्रकल्पग्रस्थ प्रमाणपत्र आहे, मी माझे शिक्षण पूर्ण केले असून मला आत्ता नोकरीची गरज असून त्यासाठी कोणाकडे आणि कसा अर्ज करावा हे माहित नाही , हे जर मला कळले तर खूप मदत होईल.
मी आपल्या मौल्यवान अभिप्रायाची वाट पाहत आहोत.
धन्यवाद सर ,
गौरव वाळके
अहमदनगर
कोणत्याही पदासाठी जाहिरात आल्यानंतर , प्रकल्प ग्रस्तांसाठीं आरक्षण असते . त्यावेळेस अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल वाघमारे
17-11-2018
rahulwaghmare2086@gmail.com
नमस्कार सर आम्हला सरकारी जमीन पट्टा आधारित २.०० हे जमिन मिळाली आहे . त्या जामिनीची मि मा.तहशीलदार साहेब यांच्या आदेशानुसार भुमीअभिलेख कार्यालया कडून मोजनि करून घेतली आहे माझ्या मोजनि च्या वेळी मा. तलाटी, वनरक्षक, ग्रामसेवक याच्या समक्ष मोजनि करून दिली आहे. त्यावेळी माझ्या विरोधकाचे सात/बारा वर देखील नव्हते.
1.मा.तहशीलदार साहेब यांना सरकारी (गायरान )जमिन मोजनि चा आदेश देता येथील का?
2. एक वेळा केलेली मोजनि रद्द करता येते का? रद्द करण्याचे आदेश कोणाला आहेत.
3.मोजनि करून घेतलेल्या जमिन ताब्यात घेण्यासाठी पोलीस संरक्षण मिळेल का?
4 . विरोधक ति जमिन माझीच आहे म्हणून भाडने करत आहेत.जमिन पडीत आहे.
5 पोलीस संरक्षण साठी आर्ज कोठे करावा लागेल
आपणास शासकीय जमीन मिळाली आहे . ती आपणास केंव्हा मिळालाय आहे ? ७/१२ सदरी आपले नाव दाखल झाले आहे का ?
जर ७/१२ सदरी आपले नाव दाखल झाले असेल तर , मोजणी साठी आपणास अर्ज करावा लागेलं . मोजणी मान्य नसल्यास , अपील करा .
जर ७/१२ सदरी नाव दाखल नसेल तर , जमिनीचा ताबा तहसील कार्यालयाकडून मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बाबाजी कुमकर
17-11-2018
avinash.kumkar@gmail.com
महोदय,
मी पुणे जिल्ह्यातील कोळवाडी गावचा आहे. नोकरी साठी मुंबईत वास्तव्यास आहे. १९९९ साली आमच्या वडिलउपार्जित शेत जमिनीचे वाटप झाले. गावातील जेष्ठ आणि नातेवाईक यांच्या समक्ष शेतजमीन तसेच इतर स्थावर मालमत्ताचे वाटप पत्र रजिस्टर करण्यात आले. त्या प्रमाणे आम्ही तिघे भाऊ आपल्या वहिवाटीची शेतजमीन वाटपाच्या बोलीप्रमाणे कसू लागलो. मी मुंबईत असल्याने शेती कडे दुर्लक्ष झाले . २०१० साली माझ्या वाटेचे काही क्षेत्र लागवडीखाली आणले या दरम्यान माझे मोठे भाऊ यांनी जमिनीच्या ताब्यास हरकत घेतली व माझ्या हिश्याच्या जमिनीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. या साठी वाटप पात्राची त्या कडे मागितली असता ती देण्यास नकार दिला. कचेरीतुन प्रत कडून तपासली असता माझ्या वाटेस बोली प्रमाणे आणि नोंदी प्रमाणे असलेली शेत जमीन यात फरक आढळला. तसेच माझ्या हिश्यास ३ एकर क्षेत्र कमी असल्याचे आढळले. या साठी गाव तंटा मुक्ती समिती समोर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या मध्ये त्यांनी सहकार्य केले नाही. या वर दिवाणी न्यायालयात सामान वाटणी हक्क साठी अर्ज करू शकतो का ?
वाटप होत असताना आपण लक्ष दिलेले दिसत नाही .
१. आपणास ३ एकर क्षेत्र कमी आहे . आपणास त्या बाबत तंटा मुक्ती मध्ये विषय घेऊन बघा . तंटा मुक्ती समितीने तुमच्या भावास सांगून तो ऐकत असेल तर , , कमी ३ एकर क्षेत्र प्राप्त करून ह्या . जर ऐकलं नाही तर मात्र आपणास न्यायालयात जावे लागेल
२. प्रत्यक्ष ताबा व ७/१२ प्रमाणे क्षेत्रात तफावत असल्यास त्या बाबत , आपापसात बसून प्रश्न मिटतो का पहा . अन्यथा आपणास या याबाबत हि न्यायायलायात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी पाटील
17-11-2018
vbpatil96@gmail.com
माझी 32 ग ची केस चालू आहे . मी वादी असून प्रतिवादीला नोटीस देण्यात आली आहे पण नोटीसी मध्ये जमिनीचा सर्वे नं व क्षेत्र तसेच गावाचे नाव चुकीचे टाईप झाले आहे प्रतिवादीचा प्रतिनिधीने तारखेला हजर राहून आमच्या अर्जाची झेराॅकस घेतली आहे अर्जामधील वर्णन बरोबर आहे.
तरी भविष्यात काही अडचण येईल का? यावर मार्गदर्शन करावे
नोटीस देण्याचा उद्देश हा आहे कि , प्रतिवादीचे आपल्या दाव्याच्या अनुषंगाने म्हणणे ऐकून घेणे . आपले दाव्याची प्रत त्यांना आपण त्यांना दिलेली आहे . त्यामुळे त्यांना , नक्की कोणत्या मिळकती बाबत वाद आहे ते समजू आले आहे . या ऊपरोक्ष रोजनाम्यात तसा उल्लेख करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain shaikh
16-11-2018
Kaunainshaikh1@gmail.com
नवीन अविभाज्य शरतीची जमीन भुसम्पदान प्रस्ताव कार्यान्वित असतांना विक्री करता येते का? National highway act section 3D अंतर्गत भारत सरकार राजपत्रत अधिसूचना प्रसिद्ध झाले नन्तार संपादन क्षेत्रचि विक्री करता येते का?
राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ अन्वये , ३ अ अ अथवा ३ ड प्रसिद्ध झाल्यावर विक्रीस प्रतिबंध नाही . तथापि सक्षम प्राधिकारी , ३ अअ अथवा ३ ड प्रसिद्ध झाल्यावर विक्री बंदी बाबत , प्रशासकीय आदेश काढू शकतात . असा आदेश असल्यास , विक्रीस प्रतिबंध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yogesh Phadke
14-11-2018
yogeshphadke11@gmail.com
सर आमच एकूण 18 एकर क्षेत्राचा गट आहे त्यातील आमचे 9 एकर व चुलत्याचे 9 एकर क्षेत्र असे आहे
आमचे 9 एकर क्षेत्र भरत नाही
मोजणी करायला गेलो तर भूमिअभिलेखकडे फाळणी 12 केला नसल्याकारणाने ते 18 एकर गटाची मोजणी करावी लागेल म्हणत आहेत
पण वास्तविक मोजणी आमच्या हिस्श्याच्या 9 एकराची करावयाची आहे...
ती कशी करता येईल कृपया मार्गदर्शन करावे...
आणि
फाळणी 12 करायचा असेल तर तो कसा करावा
कारण चुलत्याच्या आणि आमच्या सहमतीने फाळणी 12 करणे शक्य नाही कारण चुलते त्यांचे क्षेत्र जास्त असल्या कारणाने त्यास सहमती देणार नाहीत
आपणास फाळणी १२ करण्यासाठी पूर्ण क्षेत्राची मोजणी करणे आवश्यक आहे . क्षेत्र बाबत वाद असल्याने आपण , दिवाणी न्यायालयात अर्ज करून , मोजणी /हिस्से /हद्दी निश्चिती बाबत दावा दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजितकुमार सर्जेराव पाटील
13-11-2018
ajitkumar5677@gmail.com
सर्वात प्रथम सर्व महसूल अधिकाऱ्यांचं या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल आभार..
आदरणीय साहेब,
जून २०१६ मध्ये मी कोर्ट तडजोड हुकूमनामा नुसार नोंदी घालणेसाठी तलाठी यांचेकडे अर्ज दिला होता. तदनंतर ऑनलाइन ७/१२ च्या कामकाजामुळे व सर्वरच्या
अडथळ्यांमुळे तलाठी यांनी जुलै २०१७ मध्ये नोंद घातली. त्यानंतर ४ महिने अशीच काही कारणे मंडळ अधिकारी देत राहिले व त्यानंतर त्यांनी कोणतीही तक्रार नसताना व त्यांना काही शंका होत्या तर आम्हाला बाजू मांडण्याची संधी नदेता नोव्हेंबर २०१७ मध्ये नोंद रद्द केली.
जानेवारी २०१८ मध्ये आम्ही प्रांतांकडे अपील केले तारखांना हजर राहिलो जुलै २०१८ मध्ये शेवटची तारीख झाली त्यानंतर अजून निकाल नाही. आम्ही ७ ते ८ वेळा प्रांतांना विनंती केली तरी निकाल भेटत नाही.
महसूल अर्धन्यायिक न्यायालयामध्ये मंडळ अधिकारी व प्रांत यांनी लावलेला विलंब हा उचित नाही असं मला वाटत. महसूल न्यायालयाचे कामकाज याविषयी काही आचार संहिता आहेत का ? अंतिम हेअरिंग नंतर किती दिवसात प्रांतांनी निकाल द्यायला हवा आहे ?. साहेब कृपया याची माहिती द्या.
आपला विनीत,
अजितकुमार पाटील,
९६६५१५५६७७
नवीन सुधारणेनुसार , अपील निर्गतीचा कालावधी हा १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे . अपवादात्मक परीस्थित तो कालावधी १.५ वर्षे एवढा आहे . आपण हि बाब आपले जिल्हाधिकारी यांची निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल वाघ
13-11-2018
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
गावाचे चालू आकारबंद पुस्तकातील सर्व्हे नंबर चे एकूण क्षेत्र व चालू सातबारा वरील सर्व्हे नंबर चे एकूण क्षेत्र यात फरक आहे. हा फरक एका सातबारा उतारावरील क्षेत्राचा नसून गावातील बरेच सर्व्हे नंबरचे सातबारा उतारावरील आहे. बहुतेक सर्व्हे नंबरचे क्षेत्र आकारबंद मधील असलेले क्षेत्राशी जुळत नाही. बरेच सातबारा उतारावरील क्षेत्र हे जास्त झालेले आहेत. त्यामुळे उतारावरील जास्त असलेले क्षेत्र कमी करण्यासाठी कोणी अर्ज करीत नाही वा क्षेत्र वाढव आहे हेही माहित नाही.
सदर बाबतीत तलाठी यांचेकडे विचारणा केली असता गावाचे सातबाराचे उताराचे २००० पान झालेले आहेत फरक असलेले क्षेत्र शोधण्याचे एवढेच काम करत बसलो तर बाकीचे कामाचे काय असे उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
कृपया विनंती की, कुणाकडे अर्ज करावा किंवा भेट घ्यावी म्हणजे कार्यवाही होईल. सदर प्रकरणात माझेही दोन वेगवेगळे सर्व्हे नंबर असून जुने अभिलेख व आकारबंद काढल्यामुळे क्षेत्राचा फरक लक्ष्यात आला. तलाठी याना क्षेत्राचे फरकाची चूक माहित नाही असे नाही असे निष्काळजी तलाठी यांचे बाबतीत काय केल्याने योग्य ती कारवाई होऊन सातबारा उतारे दुरुस्ती होतील.
७/१२ संगणीकीकरण या मध्ये , आकारबंद वरील व ७/१२ वरील , क्षेत्राचा मेळ/रुजवात घेण्यात आली आहे . हा टप्पा सर्वत्र पार पडला आहे .
कोणते गाव आहे ? तालुका /जिल्हा
आपल्या जिल्ह्याचे DDE म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आना
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain shaikh
12-11-2018
Kaunainshaikh2780@gmail.com
राष्ट्रिय महामार्ग करिता, संपादन होणार्या जमिनीची, भुसंपादन प्रक्रिया अथवा भुसंपादन प्रस्ताव सुरू आहे, असे 3a अधिसुचना प्रसिध्द झाले पासुन मानण्यात येते का?
Question by राजेश कहारे
10-11-2018
rajesh.kahare@gmail.com
सर नमस्कार
शासनाने अकृषिक परवानगी नविन ४२ड कलम सुधारणा केली आहे.या नविन कलमानुसार अर्जदारास वाणीज्यक अकृषिक परवानगी द्यावयाची असल्यास त्यास शासनाच्या विविध विभागांचे परवानगीची आवश्यकता आहे काय?
सर परवानगी करिता देण्याची कार्यपध्दती विषद करावी हि विनंती.(सहाय्यक संचालक नगर रचना किंवा इतर विभागांच्या)
४२ ड , नुसार गावठाणाच्या हद्दीपासून २०० मी परिघातील क्षेत्रातील जमीन निवासी कारणासाठी अथवा , जमीन प्रादेशिक योजनेच्या वापर विभागानुसार , अन्य बिनशेती कारणाकरिता रूपांतरित होते .
आपली जागेचा वापर विभाग काय आहे ( झोन ) याचे फक्त प्रमाणपत्र सहायक संचालक नगर रचना यांचे आवश्यक . अन्य परवानगी आवश्यक नाही . हि मानीव तरतूद आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संभाजी शिंदे
10-11-2018
shinde.jun@gmail.com
सर माझ्या आई नि माझ्या चुलतायकडून एक जुने घर विकत घेतले होते घेताना त्यांनी आमाला सांगितले की ते 55 चौरस मीटर आहे ग्रामसेवकाच्या उताऱ्यावर ते 55 चोरस मीटर आहे पण सिटी सर्वे ला त्याच्या नावावर फकत 43 चोरस मीटर आहे त्यामुळे आमची नोंद सिटी सर्वे ला होत नाही त्यांना अमी विनंती केली की ते सरळ करून द्या पण ते काय ध्यान देत नाहीत व ग्रामसेवाककडे सुद्धा त्याचे काय 43 चे 55 चोरस मीटर कसे झाले याची नोंद नाही तरी अमी पुढे काय करावे pl मार्गदर्शन करा
Question by Prasad Lonkar
08-11-2018
prasdklonkar1969@gmail.com
आदरणीय सर नमस्कार,
आम्हाला "महाराष्ट्र शेती महामंडळ मुंबई" यांचेकडून शेत जमीन मिळाली आहे. शेत जमीन ही भोगवटादार वर्ग-2 आहे. ही सर्व जमीन ही सामाईक क्षेत्र मध्ये आहे व इतर अधिकार मध्ये
(1) नवीन शतवर असे आहे.
आम्हाला त्यांचे वाटप पत्र/ गट फोड (स्वतंत्र ८अ) करायचे आहे (कारण शेती सुधारना करने करीता.आम्ही यांची विक्री किवा हस्तांतरण करणार नाही ) तर यांचे वाटप पत्र किवा गट फोड होवू शकते का. होत असेल तर कोणाकडे अर्ज करू शकतो. तसेच या मध्ये 6 पैकी एक व्यक्ति वाटप करण्यास किंवा बँकेचे कर्ज घेण्यास तयार नाही कृपया मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती
वर्ग २ ची जमीन जर , वारसांमध्ये वाटप करायची असल्यास त्यास निर्बंध नाहीत . एक व्यक्ती तयार नसल्यास , दिवाणी न्यायायलायात दावा दाखल करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
02-11-2018
sagarkandekar@hotmail.com
महोदय ,
माझ्या मालकीचा गट न.237 असून माझ्या लगत चा गट नंबर 238 (न.अ.शर्त + भोगवटदार वर्ग 2) असून तो 58 गुंठे चा आहे.गट न.238 च्या इतर हक्कात 'तुकडा' लिहलेले असून ते जुने फेरफार बघितले असता 1947 च्या तुकडे बंदी कायद्या नुसार 1949 रोजी लागले आहे व आज ही तुकडा सातबारा इतर नमूद आहे.तर..
1.सदर गट न.238 च्या मालकांना जमीन विकण्यास ठरली तर माझी समंती घ्यावी लागेल का..?
2.मर बऱ्याच द ऐकले आहे की जमीन विक्री स निघाली तर सर्व प्रथम लगत चे खातेदार यांना घेण्याचा अधिकार असतो.कृपया हे स्पष्ट करावे.
५८ गुंठे क्षेत्र असेल तर ते तुकडा क्षेत्र नाही . प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा ते क्षेत्र जादा आहे .
शेजारील जमीन जर , दुसऱ्या वारसाची असेल तरच , हिंदू वारसा कायदा २२ अन्वये असा अधिकार आहे .
आपल्या संमतीची आवश्यकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
