जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Amit Suryavanshi
02-11-2018
info.amitworld@gmail.com
सर आमची जागा सर्वे नं १११ व ११२ आहेत व त्या जागेच्या दक्षिणेला नं १०९ चा जो गट आहे ती जागा आमची होती परंतु चुकीमुळे (१९७३ साली झालेल्या सिटी सर्वे )ती जागा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर खाजगी वाट म्हणून लागली आहें तर सर मला ती आमची जागा परत मिळू शकेल काय ?
उपसंचालक भूमी अभिलेख यांचेकडे अपील करा . मात्र खूप विलंब झालेला आहे . विलंब माफ होणे महत्वाचे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin sasane
02-11-2018
sasane.pravin@gmail.com
tahshil NA ani collector NA madhye ky fark ahe
सध्या NA परवानगीची आवश्यकता नाही . बांधकाम परवानगी चे वेळी , बिनशेती आकार बदल करावयाचा असतो . नगरपालिका क्षेत्रात मानीव NA ची तरतूद आहे
पूर्वी जेंव्हा परवानगीची गरज होती त्यावेळी , जर बिनशेती परवानगी तहसीलदार यांनी दिली असेल तर त्यास तहसील NA म्हणत असतील व त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असल्यास , त्यास जिल्हाधिकारी NA म्हणत असतील
किंवा
म ज म अ १९६६ च्या कलम ४५ खाली दंड आदेश काढलेले असतील तर त्यास तहसील NA म्हणत असतील
मात्र तहसील NA / जिल्हाधिकारी nA असा प्रकार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sadik
02-11-2018
Sadik11m@rediffmail.com
सर सर्च warrent काढण्याचा अधिकार कोणाला आहे व त्याचे प्रकार
Question by Tushar
01-11-2018
tushahd@gmail.com
Namaskar,
Mazya ajobana 5 mule aahet . 2 kaka, maze vadil and 2 aatya.
Aaji Ajobancha 30-35 varshapurvi mrutyu zala aahe . 30 varshapurvi maze donahi kaka rahate ghar sodun dusarikade rahayala gele hote. Tyapasun maze vadil tethe rahat hote. aamcha janm tithech and aamhi motehpan tithech zalo .Ammhi jithe rahato tithe aamhala magil 50 varshapsun bhade pavati bhetat hoti. Colony madhe ekun 70 ghre aahet. Suravatil bhade pavati aajobanchya navavar hoti, pan kalantarane vadilanchya navavar yayala lagali karan vadlch ajobancha sambhal karat hote. ajobani swatahun pavati vadilanchya navavar dyayala sangitali hoti. pan aamchya kade tyacha kahi likhit purava nahiye.
donahi kaka ajobana pahayala navhte. Ammchya kade vadilanchya navachya khup sarya pavatya aahet, tasech ration card sudha aahe. Ration card madhe kakanchi nave nahi aahet.
mazya vadilancha magil varshi mrutyu zala aahe , tyanantr ata ek kaka, aamchya ghravar adhikar dakahavat aahe ki hissa pahije mhnun.
Tar tyala hissa dene amhala bandhanakarak aahe ka ?
आपले आजोबा मिळकतीचे भाडेकरू होते . त्यामुळे केवळ दोन काकाच नाही तर , दोन अत्याचाही घरामध्ये हक्क आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन स्वामी
01-11-2018
sachinpapa@gmail.com
सर नमस्कार मी एक फ्लॅट जवळपास मी २००५ मध्ये घेतले व बांधून काढले तर मी फ्लॅट सात-बाराला लावले नाही आणि आता लावायचे आहे तर मी ज्या व्यक्ती कडून घेतले होते त्या वक्ती ला मिळ मालकांनी पावर ऑफ अटॉर्नी करून दिली होती आता असे झाले कि मूळ मालकाच्या नातूंनी माझ्यावर केस केली आणि कोर्टात दावा केला कि पावर ऑफ अटॉर्नी करून दिलेली आहे ती खोटी आहे पन पावर ऑफ अटॉर्नी खरी आहे आणि माझ फ्लॅट हे नमुना नं ८ ला आहे तर मी पण वकील मार्फत कोर्टात हजार आहे
योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा धन्यवाद
पॉवर ऑफ अटर्नी च्या आधारे , मिळकत हस्तांतरित होत नाही . आपण मिळकत नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी करणे आवश्यक होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चिराग
31-10-2018
chirag.chaudhari2@gmail.com
आदरणीय सर .....माझा प्रश्न असा आहे कि
(1 ) A आणि B ला दोन मुले ( अ आणि ब ) आणि दोन मुली ( क आणि ड ) आहेत B हि A ( मयत ) ची विधवा आहे .
( 2 ) १९५१ रोजी " अ " चे निधन झाले अ ला एक मुलगा आहे. " ब " ला मुले बाळ नाही.
( 3 ) १९६१ साली त्यांची वडिलोपार्जित जमीन जी ( वाटणी मध्ये पूर्णतः अ च्या नावावर होती ) किसान कोलेज ला गेली .
( 3 ) त्या नंतर १९६३ साली त्याच मिळालेली रकम ने B ( आई विधवा ) च्या नावर ४ एकर शेती घेतली
( 3 ) १९७२ मध्ये B चे निधन झाले असता वारसाने ( ब चे नाव लागले क आणि ड चे नाव इतर हक्कात लागले ) आणि अ चे निधन पूर्वीच झाले असता त्यांचा मुलाचे नाव काही कारणाने लागले नाही किवा नाव डावले गेले.
( 4 ) १९८५ मध्ये "ब " चे निधन झाल्यास त्यांचा पत्नी चे नाव लावण्यात आले. आणि क आणि ड चे सुधा निधन झालास इतर हक्क असी नोंध आहे.
( 5 ) ब आणि त्याची विधवा संयुक्त घरात " अ " च्या मुला जवळ राहत होत्या
( 6 ) २००७ रोजी " अ " च्या मुलाचे निधन झाले अ च्या मुलाला सुधा एक मुलगा आणि दोन मुली आहेत
( 7 ) २०१६ मध्ये अ च्या मुलाचा मुलगा कमी वयात २०१५ साली मृत्यू झाले त्याला दोन लहान मुले आहेत
( 8 ) २०१७ मध्ये "ब " च्या विधवा चे ( वयाच्या ८७ वर्षे अशिक्षित आणि स्वस्थ बरोबर नव्हते ) निधन झाले तिने मरण्य पूर्वी २०१६ मध्ये च रजिस्टर मृत्यूपत्रक द्वारे संपूर्ण शेती तिचा भाव च्या मुलाला करून दिली भावाच्या मुलाने २०१७ रोजी त्याची नोंध ७/१२ वर लावले.
( 9 ) ज्याची जाण अ च्या वारस विधवा आजी आणि विधवा सून ला लागली असता त्याच महिन्यात यांनी तहसीलदाराकडे हरकत घेतल्यास तहसीलदराने स्टे दिला
( 10 ) अ च्या भावाच्या मुलाने तहसील दराने स्टे वर इतका विलंब का माफ केला म्हणून अप्पर जिल्हाकडे फाईल घेतली.
माझा प्रश असा आहे कि अ च्या वारसांनी विधवा सून ने ब च्या विधवा ( आजल सासू ) च्या निधन नंतर वारस अर्जासाठी अर्ज केला असता तलाठी कडून पुष्कळ विलंब करण्या आला आणि सक्सेशन घेवून या नंतर नाव लावणार असे करता दोन महिने लावून दिले त्या दरम्यान ब च्या ( मयत विध्वाचा भावाच्या मुलाने संपूर्ण शेती वर ) त्याचे नाव मृत्यू पत्रा द्वारे लावून घेतले
हल्ली झिल्ला धुळे मुकामी तलाठी हा मृत्यूपत्रक करून घेणारा भासा चा नातेवाईक आहे.ज्याचा फायदा त्याने घेतला
सध्या तहसीलदराने स्टे दिला असता त्या भासा ने फाईल अपर जिल्हा मध्ये घेवून गेला
हि जमीन संयुक्त कुटुंबाची वारसागत असल्या मुळे विलंब चा प्रश्न कसा उद्भवतो ?
ब ची विधवा ने इतर हक्क आणि वारस असून संपूर्ण शेती चा म्र्युत्यूपत्र कसा केला ?
तलाठी ने कोणताही पंचनामा न करता कसी काय नोंधी केली ( इतर हक्काचे नाव होते तरी ) ?
त्या भासा च्या मृत्यूपत्रक नोदी अर्ज वर कोणत्याही प्रकारचा एफिडेवीट नाही.
अ च्या वारस ह्यांचे नाव १९७२ पासून नाही त्यामुळे ते त्यांचा हक्क नाही का ?
( क आणि ड चे इतर वारस ह्यात आहे ते २००१ पासून नाव लावण्यास प्रयत्न करीत आहे तरी त्यांचे नाव का लागत नाही ) ?
न्यायलयाने एका चुकाद्यात सांगितले आहे कि ७/१२ हा फक्त व्यवहार साठी पुरावा आहे त्याने मालकी हक्क साबित होत नाही.
एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर सर्व वारसांचा अधिकार असतो त्यामुळे एकत्र कुटुंबाची मिळकत म्र्युत्यूपत्राने देण्याचा अधिकार नसतो. जरी असे मृत्युपात्र्क केले तरी मृत्यूपत्र तील असा भाग अवैध ठरेल
( वारस कायदा १९२५ कलम १५२ )
एकत्र कुटुंबातील स्वःतःच्य हिस्स्याची मिळकती मृत्यूपत्रा ने देता येईल ( ए.आई.आर.२००७ .)
मृत्यूपत्रात मिळकती ची खोटी आकारणी केल्यास संपूर्ण मृत्यूपत्र रद्द ठरेल. असा उलेक्ख मिळतो
त्या विधवा आजी आणि सून ला कमाई चे काही पण स्त्रोत नाहीत.
-
Question by Vinayak Kokane
31-10-2018
vskokane1985@gmail.com
मला ग्रामपंचायत एरीयात 2 गुंठे जागा खरेदी करावयाची आहे. ती खरेदी कशी करावी . 7/12 स्वतःच्या नावाने मिळतो का त्यासाठी किती जागा खरेदी करावी लागते.
गावठाणातील जागा असेल तर आपण २ गुंठे जागा खरेदी करू शकता
जर जागा , सर्वे नम्बरपैकी असेल व जमिनीचा वापर विभाग ( झोन )रहिवासी / वाणिज्य / औद्योगिक असेल तर आपण २ गुंठे जागा खरेदी करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अतुल टीलपले
31-10-2018
rawas.tilpale@gmail.com
सर, आम्हाला आपसी वाटणीपत्र करायचे आहे तर आम्हाला कोणता अर्ज भरवा लागेल आणि कोणाकडे? आणि त्यासाठी येणारा खर्च किती येणार?
तहसीलदात यांचेकडे
वाटप अर्जास , केवळ कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागेल . अत्यल्प कोर्ट फी आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas sanap
31-10-2018
vikassanap1993@gmail.com
Namaskar sir 1.maza question asa hota ki mazya panjobani year 1961 la 7 acre ani 1966 la 9 acre 21 gunthe kharedi keli(mhanje 16 acre 21 gunthe or 6.68 hectre ) tychi ferfar ani 7|12 la 1977 paryant nond ahe survey number la parantu mul malkane amhala tya velese fakt 5.34 hectore cha cha taba dila hota tymule pot hissa zala tya veles amcha 7|12 kami karun amchya navavarchi jamin jya vektichya tabyat hai tyla denyat ali tymule amche 1.34 hectre jamin 7|12 varun kami zali va pot hissa tayar zalycha konta ferfar 7|12 nahi mag amhi atta kay karu shakto?
2.pundhe 1978 madhe tycha pot hissa chya ekatrikaran houn gat number tayar zale 3. amhi kay karave ki amhala ti kami zaleli 1.34 hector jamin parat milnysathi?
विना फेरफार १.३४ हे जागा , दुसऱ्या व्यक्तीचे ताब्यात आहे . आपणास कोर्टाकडून ताबा घ्यावा लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश आर बारी
29-10-2018
yogeshbari2009@gmail.com
देवस्थान इनाम वर्ग 3 असलेली जमीन ज्यासाठी
जिल्हाधिका-यांनी 1963 मध्ये "जमीन देवस्थान इनाम आहे, त्यांच्या कार्यालयाची परवानगीची जरुरी नाही, जमीनीचा बिनशेती साठी उपयोग करु शकता " असे पत्र दिलेले आहे, व या जमीनीत नंतर प्लॉट पडलेले आहेत व त्याचा ले-आऊट संक्षम प्राधिकारी म्हणजेच नगरपरिषदेने मंजूर केलेला आहे प नागरिकांना बांधकाम परवानग्या सुध्दा दिलेल्या आहेत, अशा जमीनीच्या 7 X12 उता-यांमध्ये अनधिकृत बिनशेती वापर असा तलाठी रिमार्क लिहितात. तसेच याचे सर्व्हे मधील 01 प्लॉट ला जिल्हाधिका-यांनी एनए परवानगी दिलेली आहे, तर उर्वरित जमीनीला म्हणजेच प्लॉटस.ला आता एनए परवानगी कोण देईल व त्यासाठी काही शासकिय शुल्क लागेल काय. ही जमीन एनए अकृषिक कशी करावाी याविषयी कृपया संविस्तर माहिती द्ययावी ही नम्र विनंती. अशी परवानगी देणे कोणाच्या अधिकारक्षेत्रात येईल जसे कि जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार किंवा विभागीय आयुक्त इ. याविषयी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
As the Exemption to Land Revenue Act 1863 ,
देवस्थान इनाम जमीन हि मुख्तवे , शेती कारणासाठीच दिलेल्या आहेत . या कायद्याचे Preamble पहिले तर , हा कायदा जमीन महसूल पूर्ण माफी अथवा अंशतः माफी देण्याचे , जे दावे आहेत ते निश्चित करण्यासंदर्भातील आहे . जमीन महसूलम्हणजे शेत जमिनीचा आकार . महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या मध्ये , जमीन महसूल व बिन शेती आकार या दोन्ही संकल्पनांची व्याख्या दिलेल्या आहेत . या दोन्ही याख्या यांचा विचार करता , देवस्थान जमीन या शेती कारणासाठीच दिलेल्या आहेत . या कायद्यात बिन शेती कारणासाठी जमीन देण्याबाबत उल्लेख नाही . त्यामुळे आपले प्रकरणात ज्या बिनशेती परवानगी दिलेल्या आहेत त्या कश्या दिल्या आहेत ?
मला वाटत नाही अश्या जमिनीला बिन शेती परवानगी देता येईल का ? मला वाटत नाही बिन शेती परवानगी देता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज
28-10-2018
sagar06731@gmail.com
महोदय ,
जर जमीन मालकाने 2016 साली एक व्यक्तीला आपले जमीन विक्री चे रजिस्टर कुलमुखतीयर पत्र करून दिले असेल व नंतर 2018 साली जमीन मालक आपली जमीन कुलमुखतीयर व्यक्तीची ची परवानगी न घेता तिसऱ्या व्यक्तीला विकू शकतो का ?
कुल मुखतायर कोणत्या कारणासाठी दिले होते . जर कुल मुखत्यार पत्रानुसार , ज्यास कुलमुखत्यार दिले आहे त्याचा मिळकतीत हितसंबंध असेल , तर मूळ मालकास अशी जमीन विकत येणार नाही
दुसऱ्या व्यक्तीच्या लाभत दिलेले खरेदी दस्त रद्द करणेसाठी आपणास , ते दिवाणी न्यायालयाकडून रद्द करून घ्यावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोशन घुटे
27-10-2018
rghute122@gmail.com
नमस्कार सर , एका अर्ध शासकीय संस्था (सिडको ) या संस्थेने आमचे तात्पुरते पुनर्वसन त्यांचे खाली असलेल्या प्लॉट मध्ये केले आहे .आणि तेथे २०१६ मध्ये महानगर पालिका अली आहे . त्याच प्रमाणे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी म्हणाले कि तुम्हाला आम्ही नोटीस ठेऊन उठवू .तर माझा असा प्रश्न आहे कि एका संस्थेच्या जमिनीला महानगर पालिका अधिनियम १९४९ चे कलम 81(ब) एक ची नोटीस देऊ शकतात का .?
सर आपले उत्तर -८१ बी ची नोटीस म्हणजे , महानगर पालिकेच्या मिळकतीवर , अनधिकृतपणे , एखादा इसमाचा कब्जा असेल तर , अश्या इसमास त्या मिळकतीतून काढून टाकण्याचा , महानगरपालिकेस अधिकार आहे .
आपले पुनर्वसन CIDCO ने , महानगरपालिकेच्या जागेवर केले आहे का ?
आलेली नोटीस सिडको अधिकारी यांना दाखवा . त्यांना आपले कायमचे पुनर्वसन करणे बाबत मागणी करा .
परंतु ती जमीन अजून सिडकोने महानगरपालिकेला हात्तान्तरण केलेली नाही . त्यामुळे ती जमीन सिडकोच्या मालकीची आहे . तरी देखील ते ८१ ब ची नोटीस देण्याचा अधिकार आहे का ...?
Question by रोशन घुटे
27-10-2018
rghute122@gmail.com
सर,आदिवासीच्या जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४ च्या काह्यदया नुसार दावा केला आहे.परंतु ती जमीन कुल कायद्या नुसार १९६४ ला आम्हाला भेटली आहे त्या नंतर ती जमीन शससकीय चुकीमुळे किंवा कसे ती जमीन पुन्हा १९६७ ला एका गैरआदिवासी ला कलम ३२ (ग) नुसार विण्यात अली आहे. त्याच त्यामुळे आम्हाला असं वाटतंय कि हि जमीन आम्हाला भेटणार नाही .याचे उत्तर लकावरत लवकर दयावे हीच नम्र विनंती .
आपले उत्तर -आपण आदिवासी खातेदार आहेत कि बिगर आदिवासी खातेदार ?
हो आदिवासीखातेदार आहे ...
जर जमीन बिनशेती ६ जुलै १९७४ पूर्वी रौपांतरित केली नसेल तर आपणास जमीन परत मिळेल . अन्यथा आपणास मिळणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोमनाथ लोखंडे
26-10-2018
somnathlokhanderx@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आम्ही राहत असलेल्या जागेवर आमचे नाव कुळ म्हणुन 1940पासून 1972पर्यंत होते त्यानंतर आमचे नाव कमी झाले आहे मुळ मालकांनी ती जमिन विकली आहे व घेणारा आम्हांला जागा खाली करण्यास सांगत आहे तरी आम्हांला आमचे नाव कुळ म्हणुन घेण्यास काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
१.४.५७ साली आपण मिळकतीचे कुल होता त्यामुळे आपण , जमिनीचे कुल कायदा कलम ३२ नुसार मानीव खरेदीदार आहेत . आपले नाव कमी झाल्यावर , आपण अपील करणे आवश्यक होते .नाव कमी केल्याचा फेरफार /आदेश प्रांताधिकारी यांचेकडे आव्हानात करा
आता त्या नंतर मूळ मालकाने जमीन विकली आहे .
ज्याने जमीन घेतली जमीन खरेदी करणार्याने , मिळकतीचा title search रिपोर्ट व वर्तमानपत्रात नोटीस दिली होती का ? नसेल तर आपण , दिवाणी न्यायायलायात त्याचे खरेदी रद्द करण्यासाठी दावा दाखल करा .आपणास जमीन परत मिळेल
मात्र
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चंदु बोंडे
26-10-2018
chandrakantbonde.in@gmail.com
नमस्कार सर,
किरण साहेब प्रथमतः आपल्या अमूल्य सल्ल्यांबद्दल आणि वेळेबद्दल धन्यवाद. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. सर आपण मला माझ्या मागील प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाने दिले ते असे.
अ या व्यक्तीच्या नावे, सर्वात पहिले खरेदी खत आहे . कायद्या मध्ये
Who is prior in time , is prior in law .........
त्यामुळे जरी फेरफार नसला तरी त्याचा हक्क आहे . त्याचे नाव लागणे आवश्यक आहे.
हे म्हणने बरोबर पंरतु
१) सदरील 'अ' या व्यक्तिच्या तथाकथित खरेदिखताला सुमारे २९- ३० वर्षापुर्वी 'खातेधारकाने' व 'अ' व्यक्तिने अन्य ञयस्थ म्हणजे 'ब' किंवा 'क' वक्तिची फसवणुक किंवा अन्य काहि कारणास्तव तथाकथित खरेदिखत केल्याचे मलिन हेतुने दिसत आहे. 'खातेधारक' मयत आहे खातेधारक मयत झाल्यानंतर 'अ' या व्यक्तिने वाद उपस्थित केलेला आहे व खातेधारक व 'अ' या व्यक्ति नातेवाईक असल्याचे बाहेरील तपासावरून कळते. कृपया सर योग्य उपाय सुचवा.
२)सदरील 'अ' व्यक्तिचा ७/१२,महसुल रेकार्डला, वहिवाटिचा,मालकीहक्क,ताबाहि व उपभोगाची/वहिवाटिची सुमारे ३०/३५ वर्ष कोठेही नोंद नाही.........फक्त पोकळस्त खरेदिखत आहे.अन्य काहि कारणास्तव केलेले आहे. कोठेहि नोंद नाहि.
३)सदरील शेतजमिन 'खातेधाकाकडुन' 'ब' व्यक्तिने नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि त्यानंतर 'ब' व्यक्तिकडुन 'क' व्यक्तिने नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि सर्व फेर व्यवस्थित बघुन घेतली ( म्हणजेच 'क' व्यक्ति वडिल व काकाने)घेतलि तेव्हा पासुन ७/१२,महसुल रेकार्डला व प्रत्यक्ष वहिवाटीसह, मालकिहक्का व ताबासहित उपभोगत आहे व अशा नोंदि सुध्दा आहेत.
४)'क' व्यक्ति म्हणजे वडिलांनी व काकाने सदर शेतजमिन 'ब' व्यक्तिजवळुन नोंदनिकृत खरेदिखताने विकत घेतलि तेव्हापासुन आजपावेतो (सुमारे २५ वर्ष ) झाले मालकीहक्कासह कब्जात आहे.व वहिवाटत आहे.व महसुल विभागाचा कर भरणा आजपावेतो भरत आहे.
५)सर ३० वर्षापुर्वी इतर कोणत्याहि कारणास्तव वा फसवणुकिसाठी केलेले पोकळस्त खरेदिखत रद्द बातल करण्यासाठी काय करावे.
सर योग्य मार्गदर्शन मिळणेस विनंती.......
दस्त नोंदणीकृत असेल तर त्यास पोकळीस्थ कसे म्हणता येईल .
ब , क यांनी title search रिपोर्ट घेणे आवश्यक होते . तसेच वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक होते . या गोष्टी केल्या असतील तर , आपण Bonafide Purchaser आहेत . अन्यथा , आपणास काहीही हक्क नाही
आपण फसवणूक केली म्हणून ज्याने आपणास जमीन विकली त्याचे विरुद्ध दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pravin kamble
20-10-2018
Kamblepravin221@ gmail.com
7 /12 उतारा त्यात हा Sr. No 2 .2क/1अ हा असुन पण हक्क सोडपत्रकात चुकीचा Sr.No 2.1अ/2क आसा पत्रकात ऊल्लेख आहे . आम्ही हारकत घेतली होती तरी सुद्धा आमचे नाव कमी करन्यात आले आहे. जमीनीवर बांधकाम आता चालू आहे सर आम्हाला मदत करा ही विनंती
आपण हक्क सोडला आहे का ?
हक्क सोडला असेल तर , उगाच सर्वे नम्बर चुकला म्हणून हक्क दाखवणे योग्य नाही
मात्र जर दोन स्वतंत्र मिळकती असतील , तर फेरफार आव्हानात करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Umesh sable
19-10-2018
sable.umesh77@gmail.com
माननीय सर माझा प्रश्न असा आहे .माझे वडील व चुलते यांनी 1987साली जमिनी विकून टाकली .माझे आजोबा मयत झाले त्या नंतर माझी आज्जी 3आत्या वडील व चुलते यांची नावे 7/12पाहीजे होती .पण असे झाले नाही. झालेले व्यवहार रद्द करता येऊ शकते का .आज्जी आज रोजी ह्यात आहे.कुल मुखतयार आज्जी आणि आत्या यांचे करून मला दावा करता येतो का?मी नातू आहे.
Question by दत्त्ता कवडे
18-10-2018
dattakwd@gmail.com
आदरणीय सर
मला माझ्या गावाच्या ग्रामपंचायतीला २००८ -२०१८ या कालावधी मध्ये निधी किती आला तो कसा कुठे केंव्हा खर्च केला ? ग्रामसभा किती झाल्या ? या सर्वबद्दल माहिती हवी आहे मी हा अर्ज माहिती अधिकारांतर्गत कोणाकडे मागू ?
Question by Vikas sanap
18-10-2018
vikassanap1993@gmail.com
Kul kayda 84 k ne kharedi asa ferfar ahe manje kay?
म्हणजे जमीन महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन कायदा , च्या तरतुदी विरुद्ध जमिनीचे हस्तांतरण झाले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जकवाड
17-10-2018
75jakwad@gmail.com
मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार अकृषक झालेली जनीम ग्रामपंचायत ला ले आऊट प्रमाणे नोंद करण्यात आली होती , परंतु सदर जमी 2014 पासून 2018 पर्यंत कोणालाही प्लॉट विकण्यात आले नाही 2018 मध्ये सदर जमीन सरसकट सात बारा आधारे विकण्यात आली तर अकृषक परवाना आपोआप रद्द होईल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे
नाही
जमिनीमध्ये प्लॉट पाडून त्याची विकास परवानगी /बिनशेती पतवंगी घेतलेली आहे . ज्या आदेशाद्वारे परवानगी दिली आहे , त्या आदेशातील अति व शर्थी पहा . त्या अति शर्थी चा भंग झाल्यास , परवानगी रद्द होऊ शकते . आपण नमूद केलेल्या कारणासाठी परवानगी रद्द होवू शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh patil
14-10-2018
Ctpatil71@rediffmail.com
माझ्या वडिलांनी 1986 साली एक गुंठा सामायिक क्षेत्र जागा मालक यांच्याकडून घेतले , पुढे जाऊन जागा मालकने टाउनशिप प्लॅंनिंग करून माझ्या भावाला त्यामध्ये घेतला ,त्यानंतर (जागा मालक) आम्हाला फक्त 1.50 फुटी रोड ठेवला आहे मी कुठे व कशी तक्रार करू कृपया मला मार्गदर्शन द्या
जो लेआऊट आहे त्यामध्ये रस्ता किती रुंदीचा असावा या बाबत , नकाशा मंजूर केलेला असतो . त्या आकारमानाचा रस्ता ठेवलेला नसेल तर , तहसीलदार यांचेकडे तक्रार करा . अथवा ग्राहक मंचाकडे , deficient सेवा दिली म्हणून , दाद मागा.
भोगवटा प्रमाणपत्र त्याने घेतले नसेल , त्या बाबत , planning authority कडे तक्रार करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कोमल कुलकर्णी
14-10-2018
komalkulkarni11@gmail.com
नमस्कार सर,
माझी वडिलोपर्जित शेत जमीन आहे. या शेत जमिनीस जाण्यास ०१ कि.मी इतक्या लांबीचा समाईक कच्चा रस्ता आहे. याची नोंद सातबार वरती आहे त्या रस्त्यावरती लागतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यावरील अतिक्रमण काढायाचे आहे त्या करीता मला का्य करावे लागेल
लगतच्या शेतकऱ्याने अतिक्रम केल्याने आपला शेताकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असेल , तर मामलतदार कोर्ट कायद्याखाली , तहसीलदार यांचेकडे अर्ज दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kishor Nana patil
14-10-2018
patilkishor0735@gmail.com
Kharedi khat banavat v vishvasat n gheta kel asel tr Kay karav
KHAREDI KHAT NONDNIKRUT ASEL TR DIVANI NYAYALAYAT DAVA DAKHAL KARUN RADD KARUN GHYAVE LAGEL
Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार
Question by राजेश जोशी
13-10-2018
aakashvb99@gmail.com
नमस्कार सर मी राजेश जोशी सर मला असे विचारायचे आहे कि माझी जमीन राष्ट्रीय महामार्गालगत आहे तसेच माझ्या बांधाला जो शेजारी(मोहन परतुरे ) आहे त्याची जमीन सुद्धा या महामार्गालगत आहे. तसेच आमच्या दोघांच्या गटाला जमिनीलगत जुना शिव रास्ता देखील आहे. परंतु त्या शेजारी परंतुरेंनी तो रास्ता अतिक्रमण करून बंद केला आहे.
व तसेच जुन्या नकाशावर एक गाडी रास्ता दर्शविलेला आहे तो आज रोजी पूर्णतः बंद आहे . वरील शेजारी याचे दोन भाऊ आहेत त्यातील एका भावाला रोड लागत वाटणी आली आणि एका भावाला आतमध्ये वाटणी आली. त्यामुळे ज्याला आतली वाटणी आली तो भाऊ आम्हाला नकाशावरील रस्त्या प्रमाणे रास्ता मागत आहे. परंतु कायद्याने बघितले असता ज्या गटाला राष्ट्रीय महामार्ग आहे तसेच शिव रास्ता देखील लगत आहे त्या गटाला त्या लगत मालकाने रास्ता देणे कायदेशीर आहे . परंतु तो दुसरा भाऊ तलाठी व मंडळ अधिकारी यांना पैसे खाऊ घालून नकाशा नुसार रास्ता मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे . या बद्दल मला मार्गदर्शन करावे हि विनंती. मी यामध्ये कुठले कायदे विषयक निर्णय / पुरावा म्हणून देउ शकतो ते देखील सांगावे .
Question by प्रल्हाद KUMBHAR
13-10-2018
pralhad_kumbhar@yahoo.com
आपले सरकार पोर्टलवर लॉगिन झालेनंतर महसूल सेवेमधील नॉन क्रीमिलेयर सर्टिफिकेट करिता अनिवार्य कागदपत्रांमधील ऍफिडेव्हिट फॉर कास्ट चा फॉरमॅट ( कोणता फॉर्म) काय आहे? तो सध्या कागदावर द्यावयाचा कि बॉण्ड पेपरवर द्यावयाचा?
तो मा.कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर साक्षांकित करणे आवश्यक आहे काय?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
