जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय १९९८ रोजी तालुका दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याने आमच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटप झाले. त्यानुसार एकूण ६ एकर जमिनीपैकी ४ एकर जमीन माझ्यासह इतर ३ भावांना ,१कर जमीन बहिणीला व उरलेली १ एकर जमीन आईला दिली. परंतु या हुकूमनाम्याने आईला दिलेल्या जमिनीवर अटी लावल्या होत्या कि तिला सदरची १ एकर जमीन विकत येणार नाही व तिने विकू नये तसेच जमिनीवर कोणताही बोजा करू नये. हे आईसह आम्हा सर्व मुलांना मान्य होते व त्यामुळे हुकूमनाम्यावर आईचा अंगठा व आमच्या सह्या आहेत. असे असतानाही माझ्या ३ नंबरच्या भावाने आईला फसवून २००६ रोजी खरेदीखत करून जमीन त्याच्या बायकोच्या नावावर केली. मी पोलीस स्टेशन ला केलेल्या तक्रारीनंतर खरेदीखताचे साक्षीदार बोगस निघाले. आईला समजल्यानंतर आईने खूप विनंती करून त्याला जमीन परत द्यायला सांगितली. परंतु त्याने ती दिली नाही. म्हणून २०१६ रोजी मी जमीन परत आईच्या नावे होण्यासाठी प्रांताधिकारी साहेबांकडे अपील केले. त्या अपिलात मी आईला प्रतिवादी म्हणूनच ठेवले होते कारण जमीन तिच्याकडून भावाच्या बायकोकडे हस्तांतरित झाली होती म्हणून तसेच तिच्या आजारपणामुळेही. वस्तुतः आई माझ्याच बाजूने होती व आहे. यावर प्रांतसाहेबानी डिसेंबर २०१७ रोजी माझ्या बाजूने निकाल देऊन जमीन परत आईच्या नावे करण्याचा निकाल दिला. परंतु निकाल विरोधात गेल्यामुळे भावाने परत एकदा आईचे फसवून अंगठे घेऊन खोटे प्रतिज्ञापत्र करून मा.अपर जिल्हाधिकारी साहेबांकडे अपील केले आहे.त्याबाबत १ सुनावणी झाली आहे व पुढील सुनावणी १ महिन्यानंतर आहे. आईने फसवून अंगठे घेतल्याबाबत पोलीस स्टेशन ला तक्रार केल्यानंतर भावाच्या विरोधात FIR नोंद झाली आहे. आता माझा प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
--आईकडून जमीन भावाच्या बायकोकडे हस्तांतरित झाल्यामुळे मी प्रांताधिकारी साहेबांकडे केलेल्या अपिलात आईला प्रतिवादींमध्येच ठेवले होते. वस्तुतः आईला प्रांताधिकाऱ्यांचा निकाल मान्य आहे. परंतु भावाने फसवून अंगठे घेऊन आईला त्याच्या बायकोबरोबर वादींमध्ये ठेऊन सदर अपील केले आहे. याविरुद्ध आईने मागच्या सुनावणीत लेखी अर्ज दिला आहे. पुढील सुनावणीत मी स्वतः आईला घेऊन अप्पर जिल्हाधिकारी साहेबांसमोर जाणार आहे. तर माझा प्रश्न आहे कि , आईला प्रांताधिकारी साहेबाचा निकाल मान्य असल्यामुळे व फसवून अंगठे घेऊन वादी केल्यामुळे आता तिला वादींमधून माझ्याबरोबर प्रतिवादी म्हणून समाविष्ट करता येईल का? आईचेही हेच म्हणणे आहे. तर त्यासाठी अपर जिल्हाधिकारी साहेबांसमोर कशी बाजू मांडावी? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद..
आपले आई ने अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून , आई चे नाव अपीलकर म्हणून कमी करून सामनेवाला म्हणून सामाविस्ट करणे बाबत मागणी करावी . अप्पर जिल्हाधिकारी प्रकरणाचा विचार करून , आई ची मागणी मान्य करतील
मात्र आपले आई ची भूमिका पहिली तर , आई एकदा आपले बाजूने तर एकदा आपले भावाचे बाजूने निर्णय घेत असल्याचे दिसून येते . आई ची भूमिका ठाम असणे आवश्यक .
दिवाणी प्रक्रिया संहितेच्या तरतुदी या जरी अर्ध न्यायीक कामास लागू नसतील तरीही , त्यातील तरतुदींचा आधार घेतला जातो . दिवाणी प्रक्रय संहिता
Order I - वाचावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पाणबुडे सर
१) जमीन २ बिल्डरांना विकलेली आहे पण त्यांनी अजून तरी जमिनी चा ताबा घेतला नाही त्यांना आमचा ताबा माहित आहे म्हणून त्यांनी स्वस्तात जमीन विकत घेतली त्या जागेवर आम्ही शेती करतो हि जागा ठाणे भागात आहे .
२) सामनेवाले ह्यांनी पहिले जमीन विकण्याअगोदर आमच्या विरुद्ध केस दाखल केली आम्ही केस ला गेलो पण काही दिवसांनी त्यांनी जमीन विकली आम्हाला वाटलं जमीन विकली कि सगळे संपले , त्यावेळेला तो सामनेवाला बोलला कि तुम्हाला अर्धे पैसे देईन जमिनीचे पण ते अर्धे पैसे पण दिले नाही आम्हाला वाटलं कि केस बंद झाली असेल त्यांनी उर्वरित जमीन नावी करून देण्याचे आश्वासन दिले मग केस ला जाण्याचे बंद झाले आमचे, पण काही वर्षांनी त्याने बाकी राहिलेली जमीन पण विकली आणि आम्हाला कोर्टाचा निकाल दाखवला कि त्याच्याबाजूने निकाल लागला आहे ,
३) आमच्या नकळत सामनेवाले ह्यांनी १ केस कोर्टात चालू ठेवली तो निकाल २०१६ ला लागला त्या निकाल विरुद्ध अपील करावे का ? कि adverse possession act खाली अपील करावे ?
४) adverse possession act साठी कोणते पुरावे सादर करावे लागतील कोर्टात फेरफार आहेत आमच्या नावावर जमीन झाल्याचे खरेदीखत पण आहे ब्रिटिश कालीन आपण मार्गदशन करावे
५) २०१६ ला लागला आहे निकाल त्याविरुद्ध आत्ता काही करता येईल का? आपण मार्गदर्शन करावे ...
आपण जमीन विकली आहे . केवळ जमिनीवर आपला ताबा आहे , व ज्यास विकली त्याचे नावावर नाही म्हणून , आपण , हरकत घेत आहेत .
निकाल त्याचे बाजूने लागला आहे . निकाल लागून जवळ जवळ २ वर्षे कालावधी पूर्ण होत आला आहे . त्यामुळे आता प्रथम झालेला विलंब न्यायालयाने अपील दाखल करते वेळी मान्य करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब
मी राहुल सावंत माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे . माझा प्रश्न असा आहे कि आमची वडिलोपार्जीत जमिनीतील सातबारांवर माझ्या वडिलांनी गाव नमुना 6 क च्या अनुषंगाने त्याची व माझे लहान चुलते यांच्या नावानी तालाट्यांकडे वारस तपासणीसाठी अर्ज केलेला होता . तरी तळाटी यांनी सातबारावरील सर्व सहवारसदारच्या सही घ्याला सांगितले आहे पण आमचे सर्व वारसदार या नोटिशीवर सही करण्यास तयार नाहीत तरी आता आम्ही काय करावे त्याच्या सही शिवाय माझ्या वडिलांचे व काकांचे नाव सातबारावर लागेल काय याचे मार्गदर्शन करावे
आपला नम्र
राहुल सावंत
७/१२ वरील जो सह धारक मयत होतो , त्याचेच वारस , नोंद होण्या करता अर्ज करू शकता . आपले कथनावरून ७/१२ वर , आपले आजोबांचे नाव असावे . ते मयत असतील तर . त्यांचे नंतर, त्यांचे वारसांची नावे ७/१२ सदरी , लावता येतील . त्यासाठी अन्य सह धारकांची संमती आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

चार भावांची समान एकत्रित जमीन असून त्यातील दोन भावामध्ये वाद असल्या कारणांनी खाते वाटपासाठी दोन भावाचा
खाते वाटपासाठी नकार आहे ती सामान वाटप करावयाची आहे त्यासाठी काय करावे लागेल
दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या कलम ५४ प्रमाणे जमिनीतील प्रत्येकाचा हिस्सा निश्चित करून , हिस्स्याप्रमाणे ताबा मिळण्यासाठी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार, शेतजमिनीचे रजिस्टर वाटणी पत्र झाले आहे. फेरफार सुद्धा झाला आहे. फेरफार नुसार सातबारावर क्षेत्रफळ सुद्धा प्रत्येक नावासमोर दर्शवले आहे . आता आम्हाला आमच्या नावे वेगवेगळे सात बारा पाहिजे असल्यास काय करावे लागेल ? एकूण 2 सातबारा आहेत. त्यातील एक सातबारावरील जमीन गावाशेजारी आहे तर दुसरी गावाबाहेर लांब आहे. मला गावाशेजारील जमीन मिळाल्यामुळे इतर भाऊ नाराज आहेत. तरी आता जमिनीचे अदलाबदल करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
अदला बदल करण्यासाठी , सर्वांचे संमतीने Exchange Deed करा .
७/१२ वेगळा करण्यासाठी जमिनीची मोजणी करून , आकारफोड पत्रकाद्वारे , स्वतंत्र ७/१२ करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय सर/मॅडम,
आमची वडिलोपार्जित भोगवटा वर्ग 2 च्या अंतर्गत 33 गुंठे (लागवड) + 5 गुंठे (पोटखराबा) अशी एकूण 38 गुंठे जमीन आहे.
त्यावर मयत आजीचे नाव कमी करून 6 आत्या आणि वडील यांची वारसनोंद करून घेतली.
वडिलांच्या निधनानंतर आई, 3 विवाहित बहिणी, 1 अविवाहित बहीण व मी स्वतः अशी वारसनोंद करून घेतली आहे.
सध्या सातबारा वर एकूण 12 नावे आहेत, त्यातून 6 आत्या आणि 3 विवाहित बहिणी अशी 9 नावे हक्कसोड करून कमी करायची आहेत.
मला आत्ता जमीन विकायची नाहीये पण भविष्यात काय होईल ते माहीत नाही.
भविष्यात जमिनीचा काही विक्री झाल्यास त्यांना त्यांचा हक्क देण्यात येईल अशा प्रकारचा समजोता करार 6 आत्या आणि 3 विवाहित बहिणींच्या सम्मत्तीने नोटरी करून करायचा आहे, तर हे शक्य आहे का?
समजोता कराराद्वारे हक्कसोड करून घेता येतो का, त्यासाठी काय करावे लागेल, अशा हक्कसोड साठी स्टॅम्प ड्युटी किंवा इतर काही फी भरावी लागते का?
आणि समजोता कराराद्वारे हक्कसोड करण्यापूर्वी भोगवटा वर्ग 2 जमिनीला वर्ग 1 मध्ये रूपांतरित करावी लागेल का?
जमीनवर्ग २ ची आहे . त्यामुळे आत्या व आपल्या बहिणींनी आपले लाभत हक्क सोड पत्रक केले तर , आपणास अनार्जित उत्पनाच्या ५० % रक्कम शासनास जमा करावी लागेल .
तसेच हक्क सोडण्यासाठी जिल्हाधिकारी / आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पदोन्नती बाबत सर माझी नियुक्ती दिनांक १०/०७/१९८६ रोजी डी एड स शी या पदावर व मी २००७ ते २०१२ पर्यंत माझी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पूर्ण केली असून दिनांक ३१/०७/२०१८ रोजी मु अ सेवानिवृत्त झालेत श्री डी आर
काळे यांची नियुक्ती दिनांक ०६/०७/१९८७ रोजी बी ए बी एड
या पदावर झाली आहे तर मी श्री मते मु अ होऊ शकतो का
ध्यानवाद
या मंचावर महसूल विषयी व महसूल आस्थापनेविषयी उत्तरे दिली जातात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मनोज
05-08-2018
mehatamanoj@gamil.com

नमस्कार साहेब!
प्रश्न - मी एका गरीब घरातील मुलगा असून जातीने आदिवासी आहे.मी उदारनिर्वाहा साठी चहा विकतो एका खेडे गावात.मी भूमिहीन असून मी शासनाकडे कसण्यासाठी जमीन मागू शकतो का..? हो तर काय काय कागदपत्रे पुरवावी लागतील.
हो
आपण जिल्हाधिकारी यांचेकडे जमीन मागणीचा अर्ज द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
05-08-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न -
एका खंडू नावाच्या व्यक्तीची 2 एकर शेती होती.तो 1970 रोजी मयत झाला व वारसाने त्याच्या नातू माधव चे (मुलगा मयत असल्याने ) नाव मूळ खातेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात लागले. माझ्या वडिलांनी 1991 साली ही 2 एकर शेती माधव कडून खरेदी केली त्या दोन बहिणीचे नाव इतर हक्कात कायम ठेवून .आज 2016 साली त्या दोन्ही बहिणी मयत असून त्याच्या वारसांनी वारस नोंद केल्या नाही.तरी ही आज त्या वारसांना आमच्या जमिनीत हक्क उरला आहे का ? आम्ही त्याची नावे कमी करण्याचा अर्ज देऊ शकतो का? मागील 27 वर्षा पासून संपूर्ण पिकपहानी व कब्जा आमचाच आहे.
हिंदू वारसा कायद्याने मुलींचा मिळकतीत हक्क आहे . उलट पक्षी त्यांचे नाव , कब्जेदार सदरी असणे आवश्यक आहे .
त्यांचे नाव कमी करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाटणी पत्रात कर्जाची वाटणी झाली नाही तर काय करावे ?
वाटणी पत्र झाल्यावर वाटणीपत्रा आधारे वाटून आलेली वडिलोपार्जित जमीन आई व वडील वडिलोपार्जित जमीन विकू शकतात का ?
वडिलोपार्जित जमीन चे वाटप झाल्यावर , ज्याचे वाटपास जमीन आली त्याची ती जमीन स्वकष्टार्जित होते . त्यामुळे त्यांना अशी जमीन विकत येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण सर नमस्कार :
दि. ०६-१०-२०१० मध्ये रजिस्टर्ड वाटणी पत्र झाले. रजिस्टर्ड वाटणी पत्रा आधारे माझ्या आईला ६ एकर जमीन वाटून आली. रजिस्टर्ड वाटणी पत्र झाल्यानंतर माझ्या वडिलांनी काहीं घरगुती कारणावरून माझ्या आईला घराबाहेर काढले. नंतर आई माझ्याकडे लगभग ९ वर्ष राहिली.
नंतर काहीं वर्षांनी म्हणजे दि. १४-०७-२०१६ मध्ये जमिनीची फोड करण्यासाठी मी स्वतः, माझा मुलगा, माझी पत्नी (बायको) व आई सुद्धा असे सर्वजण मिळून माझे स्वतंत्र वाटणी पत्र केले (रजिस्टर्ड नसून नोटरीराइज्ड आहे). याच नोटरीराइज्ड वाटणी पत्रात मी माझ्या आईच्या नावावरील रजिस्टर्ड वाटणी पत्रा आधारे वाटून आलेल्या ६ एकर जमिनीपैकी २ एकर जमीन माझ्या पत्नीच्या (बायकोच्या) नावाने केली. फेर करण्यासाठी हे नोटरीराइज्ड वाटणी पत्र मी तलाठयाकडे दिले. फेरीची नोटीस आल्यानंतर काहीं कारणावरून आईने नकार दिला. त्यामुळे नोटरीराइज्ड वाटणीपत्राचा फेर रद्द झाला.

प्रश्ण ? :

१) तरी माझी बायको नोटरीराइज्ड वाटणीपत्रा आधारे आईच्या नावावरून आलेल्या २ एकर जमिनीचा फेर व्हावा म्हणून कोर्टात अपील करू शकते का ?
२) किंवा ती २ एकर जमीन आईला इतर कोणालाही विक्री करता येऊ नये यासाठी या नोटरीराइज्ड वाटणी पत्राचा आधार मिळू शकेल का ?
१. नाही
२. आईला जमीन वाटपाने मिळाली आहे . जमिनीची विल्हेवाट लावण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे .
३. आईचे मृत्य नांतर , वारसाने जमीन आपणास मिळणार च आहे . मग आईचे इच्छे विरुद्ध , असा व्यवहार करू नये

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
एखाद्या भूसंपादन प्रकरणामध्ये पारित अंतिम निवडया नुसार मूळ ७/१२ चे मालकी हक्क कमी करता येतील की कमी जास्त पत्रक प्राप्त झाल्यानंतरच हक्क कमी करता येतील याबाबत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
भू संपादित जमिनीचा ताबा दिल्यांनतर , मालकी हक्क बदलले जातात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पाणबुडे सर त्या २ बिल्डरांनी अजून जमिनीचा ताबा घेतला नाही आम्हीच तेथे भात लागवड करतो आत्ताही केले आहे
२) सामनेवाले ह्यांनी २००७ ला आमच्याविरुद्ध केस दाखल केली होती अर्धी जमीन तुम्हाला नवी करून देतो केस बंद करू, असा बोलून त्यांनी ती केस आम्हाला ना समजता चालू ठेवली २०१६ ला त्या केस चा निकाल त्याच्या बाजून लागला आम्ही केस ला गेलोच नाही ह्या कारणाने आत्ता ती केस परत चालू करता येईल का? 2 वर्ष झाले त्या केस ला अपील दाखल करता येईल का? केस चालू आहे हे हि माहित नव्हते आत्ता कोणते कारण सांगावे काय करावे ? आपण मार्गदर्शन करावे...
पी .डब्ल्यू .डी . खाण असा एखाद्या सात बारा उतारा वर नोंद असेल , तिथे अतिक्रमण सुरू असेल आणि पी डब्ल्यू डी विभाग जर जबाबदारी घेत नसेल तर अशा रायगड जिल्ह्यातील जमीनीच्या संदर्भात कोणाकडे तक्रार करावी
खाण सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब.यांचेकडे फेरफार नोंदीबाबत सुनावणी चालू असताना त्यांनी नोंदीवर दिलेली स्थगिती अंतरिम आदेशाद्वारे उठविली आहे.परंतु केसची सुनावणी चालू आहे.,त्याबाबत स्थगिती मिळविणे कामी मा.अप्पर आयुक्त साहेब यांचेकडे अपील दाखल करता येऊ शकते का?किंवा कसे? मार्गदर्शन होणेस विनंती...
रहिवासी भोगवटदार वर्ग २ ची जमीन भोगवटदार वर्ग १ मध्ये बदलता येईल काय?
श्री. किरण पानबुडेसाहेब, नमस्कार
मिळकत पत्रिकेला क्षीरसागर यांचे नाव लागले आहे. कर आकारणी पत्रकास नोंद व्हावी असा अर्ज क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतीकडे केला त्या अर्जाबरोबर मिळकत पत्रिकेचा उतारा , फेरफार उतारा व खरेदी पत्राची नक्कल जोडली आहे. पण ग्रामसेवक याआधी तोंडी आम्हाला सांगतात कि बॉडीचा अधिकार आहे. त्यांनी सांगितल्याशिवाय मी नोंद करू शकत नाही. सिटी सेर्वेला तारीख चालू असताना ग्रामपंचायती तर्फे ग्रामसेवक हजर राहून सांगतात कि उताऱ्या शिवाय दुसरा पुरावा आमच्या कडे नाही. त्यानुसार निकाल झाला v आमची नोंद सिटी सेर्वेला झाल्यानंतर मोजणी मागवली त्या दिवशी सरपंच , उप सरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला पुन्हा नोटीस दिली जागेत अतिक्रमण करू नये. नोव्हेंबर मध्ये बॉडीने ठराव केला कि कोर्टात जायचे आहे. परत क्षीरसागर यांनी फेब्रुवारी मध्ये अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव केला कि कोर्टात जायचं आहे. आज पर्यंत ते कोर्टात गेले नाहीत. आम्ही मा. बीडीओ साहेब व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सातारा यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार सातारा ऑफिस ने त्यांना १. पत्र व ४ स्मरण पत्र पाठवली बीडीओ साहेबाना. बीओडीओ साहेबानी ग्रामपंचायतीत चौकशी साठी विस्तार अधिकारी याना पाठवले परंतु त्यांनाही ग्रामपंचायत चौकशीस सहकार्य करत नाही. म्हणून शेवटी बीडीओ साहेब यांनी वरिष्ठ कार्यालय व या कार्यालयाने वारंवार सूचना व पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करून या कार्यालयाची दिशाभूल करत आहात म्हणून ग्रामविकास अधिकारी याना १९६४ खाली नोटीस दिली आहे.

1- ग्रामपंचायत आता काय करू शकते ?
2- ग्रामसेवक काय करू शकतात ?
३- आम्ही काय करावे ?
आपण मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समक्ष भेटून आपली व्यथा मांडा
अन्यथा , लोकशाही दिन / आपले सरकार या माध्यमातून आपली तक्रार देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रथम माझी ओळख करून देतो . माझे नाव अनंत जयराम झेपले . माझ्या व*डलांनी असुर्डे - k$Tr\ , चिपळूण या गावी सन २००७ मध्ये श्रीमती भारती बळीराम महाडिक यांच्याकडून 18 गुंते जमीन विकत घेतली , पण वडिलांनी त्यावेळी 7/12 वर "तुकड्या विरुद्ध व्यवहार " हे पेन्सिलीन लिहिलेले बघितले नाही आणि श्रीमती. बळीराम महाडिक ह्यांनीही कडी सांगितले नाही . वडिलांनी त्यांच्याबरोबर व्यवहार पूर्ण केला . वडील जेव्ह्या जेव्ह्या जमीन नावावर करायला चिपळूण ला गेले ठेव्हा तेतील अधिकार्याने त्यांना हा मुधा सांगितला कि जो पर्यंत हे तुमच्या 7/12 वरून काडला जात नाही तो पर्यंत तुमच्या नावावर जमीन होऊ शकणार नाही . त्यानंतर भरपूर खेपा घातल्या परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. वदिळांना ५ वर्ष्यापुर्वी लकवा मारल्यामुळे ते गावी जाऊ शकले नाही आणि आम्हाला गावच्या या गोष्टी बदल जास्त माहिती नसल्यामुळे aamhi chokashi karunahi aamhala pan tech uttar milal je vadlana milal.

Tyamadhe jamin malak mahnto ti jamin tumhi tumchya navavar kara mi tumachya kharedi khatavar sahi karto. Pan khardi khat karnyasathi aadhi 7/12 navavar karayala lagato. Tyamadhe to kahihi madat karnar nahi ase mahnato.

Tyamule mazi aapnas vinatee aahe ka aapan mala yavar kahitari todga sangava jene karun yevadya varshya pasun pending aslel kam purn hoiel aani ti jamin aamchya navavar hoiel.
Sadhya eka guntyacha bhav kay aahe.
Kharedi khat kontya amount var hoyeal ? jaga ghetalelya ka sadhyachya ready raknor pramane.

Applyala aankhi mahiti havi aslyas tase sangave.
खरेदी केलीली जमीन जर निवासी , औद्योगिक , वाणिज्य जमीन वापर विभागात येत असेल तर , आपला व्यवहार नियमानुकूल होऊ शकतो
जमिनीचा वापर विभाग( झोन ) पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
१. वास्तविक जमीन गावात म्हणजे गावठाणात असेल अथवा , गावचे जवळ असेल अथवा जमीन बिनशेती जमीन वापर विभागात येत असेल तर , या व्यवहारास , तुकडेबंदी कायद्याची बाधा येण्याचा प्रश्न नव्हता .
२. सध्या प्रादेशिक योजना अथवा विकास आराखडा ( जो लागू असेल त्या प्रमाणे ) , जमिनीचा वापर विभाग काय आहे पहा . जर बिनशेती वापर विभागात जमीन येत असेल तर , आपले नावावर जमीन व्यवहार निहायमित होऊन , होऊ शकते . आपणास २५ % शिग्र सिद्दगणकाचे किंमतीएवढी रक्कम भरावी लागेल .
३. मंडळ अधिकारी यांना नोंद बाबत निर्णय घेण्यास सांगा . विक्रेता मयत आहे म्हणून , वारसांचे नावे लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही . कारण विक्रेत्याने जमीन आपणास विकली आहे . त्यामुळे वारसांचा कोणताही हक्क उरलेला नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न - 1.जमिन एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.2.भुतकाळ जमीन कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील?
3.आज रोजी जमिनीची सोयी नुसार अदलाबदल करू शकतो का खरेदीखत न करता?
जंगल पाहणी म्हणजे , जमाबंदी होण्यापूर्वी जी पाहणे भूमी अभिलेख खात्यामार्फत होते त्यास , जंगल पाहणी असे संभोधतात .
Exchange Deed करावे . मात्र ते नोंदणीकृत करावे लागते . म्हणहे मुन्द्रानक शुल्क भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न - माझ्या मालकीचा गट न.241/ब हा 4 एकर चा असून तो गाव नकाशा वर दिसत नाहीं. भूमिअभिलेख मधून गट स्कीम उतारा मिळाला त्यात हा गट सर्वे नंबर 75/3 पासून बनला आहे .माझा कब्जात ह्या सर्व्ह नंबर मध्ये 4 एकर जमीन आहे.भूमिअभिलेख मधून जुना सर्वे 75 चा नकाशा मिळाला असून त्यात सर्व्ह न.75/3 हा आज माझ्या ताब्यातील जमीन दाखवतो.पण भूमिअभिलेख कर्मचारी त्या वर शासनाचा स्टॅम्प मारून न देता बोलत आहे कि तुम्ही मोजणी टाका. तर
1.तर ही दुरुस्ती करण्यासाठी काय करावे.
2.आजूबाजूच्या सह हिस्सादाराची काही हरकत नसल्यास खाजगी मोजणी करून तो नकाशा सर्वांची संमतीने भूमिअभिलेख मध्ये दिला तर भूमी अधीक्षक त्याची दखल घेऊन दुरुस्ती करतील का?.
नमस्कार सर,
आमची वडिलोपर्जित शेत जमीन आहे. या शेत जमिनीस जाण्यास मुख्य रस्त्यापासून (मुख्य रस्ता जिल्हा परिषद् यांच्या अखत्यारित येतो) 01कि.मी इतक्या लांबीचा समाईक कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यावरती लागतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यावरील अतिक्रमण कडून संबंधित रस्ता मा मुख्यमंत्री यांनी तयार केलेली (बारमाही शेतरस्ता/ पाणंद ) या योजने अंतर्गत सुधारायचा आहे. या करिता काय करू शकतो. कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
मागील समस्येचे मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल आपले आभार.
ग्रामपंचायत मिळकत नंबर चा असेसमेंट उतारा शासन निर्णयानुसार पती पत्नी चया नावे होता पती मयत झालेनंतर उताऱ्यावर पत्नी चे नावणे उतारा ग्रामपंचायत ने पतीचे नाव कमी करून दिला तर पत्नीला सदर मालमता विक्री करायची झाल्यास खरेदी होऊ शकते का ? गावाचा सिटी सर्वे झालेला नाही तसेच इतर पतीला वारस आहेत
मला माझ्या आजोबांनी मृत्यु पत्राने जमीन दिली आहे ते मृत्यु पत्र नोंदणी कृत नाही त्याचा फेरफार तलाठी यांनी तयार केला आहे तो मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांचे प्रलंबित आहे ते मृत्यू पत्र नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नामंजूर करू शकतात के?याची माहाती मिळावी
मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही .
फेरवार मंजूर करणे आवश्यक आहे .
मृत्य पत्राचे वैधतेबाबत वाद असेल तर , आपणास मृत्य पत्र प्रोबेट करून मागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3