जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by राजेंद्र शांताराम वर्तक
11-02-2018
rajendra.vartak2012@gmail.com
नमस्कार सर माझ्या मीञाने त्याच्या शेजारच्याला जायला रस्ता नाही म्हणून रस्ता दिला.मीञाचा सातबारा स्वतंञ आहे.पण अता तो माणूस त्या जागेवर हक्क दाखवतोय. माझ्या मीञाला शिवीगाळ करतोय. माझ्या मीञाने काय करावे.सर कृपया सल्ला दया. माझा मीञ साधा सरळ माणूस आहे.
रस्ता दिला म्हणजे नेमके काय केले ?
खरेदी खताने रस्ताखालील जागा दिली असल्यास त्या जागेवर त्याचा हक्क आहे . मात्र केवळ जाणे येणेसाठी रास्ता दिला असल्यास त्याला मालकी हक्क दाखवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन दळवी
10-02-2018
sachindalvi371994@gmail.com
नमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती व १९८८ साली माझ्या आजोंबानी फक्त ५ एकर जमीन विकली आहे परंतु बाकीची जमीन भावकीच्या नावाने गटवारीमध्ये गेली आहे व त्यानी ती विकली आहे .ह्या प्रकरण मध्ये पुढे काय करता येईल .
Question by अमित शिर्के
10-02-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांनी सन १९६५ रोजी एक जमीन खरेदीखताने विकत घेतली होती. त्या जमिनीच्या खरेदीखतामध्ये असा उल्लेख आहे की गणपत शिर्के व शिवराम शिर्के यांनी सदरहु जमीन विकत घेतली आहे. आणि खरेदि खताप्रमाणे फेरफार सुद्धा तसाच तयार झालेला आहे.
एकुण जमीन २० एकर असल्याने माझे आजोबा १० एकर व चुलत आजोबा १० एकर अशी सध्या वहिवाटत आहेत. परंतु कोणाच्या नावावर किती जमीन आहे याचा उल्लेख खरेदीखतात व फेरफारात नसल्यामुळे आम्हांला आज रोजी आणेवारी ठरविता येत नाही. चुलत आजोबा असे म्हणतात की, मला १५ एकर जमीन हवी आहे आणि तुम्हाला फक्त ५ एकर देतो.
१. तरी आम्हांला सध्या हि जमीन माझ्या आजोबांच्या नावे निम्मी दाखल होण्यासाठी काय करावे लागेल.
२. पूर्वी जरी खरेदीखतात क्षेत्राचा उल्लेख नसला तरी आणेवारी ठरविण्यासाठी काही नियम किंवा कायदा होता का ? असल्यास मार्गदर्शन करावे.
हि विनंती
आपण मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ चा आधार घ्यावा .
या कलमानुसार खरेदी किंमत ज्या प्रमाणात , दोन्ही भावांनी दिली आहे त्या प्रमाणात , मिळकतीचे वाटप होईल . मात्र जर खरेदी किंमत कोणी किती दिली या बाबत माहिती ,पुरावा नसल्यास , सॅम प्रमाणात म्हणजे १० एकर प्रत्येकी नावावर राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चिराग चौधरी
09-02-2018
chirag.chaudhari2@gmail.com
नमस्कार माझे चिराग चौधरी आहे पारोळा जिल्हा जळगाव तालुक्यात ७० चौ.मी. घर आणि ४ एकर शेती ७/१२ मध्ये मध्ये माझ्या आजोबा च्या नावावर आहे जी शेती आणि जमनी माझ्या आजोबाला वडिलोपार्जित हिस्सा द्वारा प्राप्त झाली असून जी स्वपार्जीत मिळकत असून माझ्या आजोबांनी खरेदी खत करून ७/१२ वर माझ्या काकांच्या नावावर करून दिले आम्हाला तक्रार टाकू शकता एणार का ?
आजोबांना जी जमीन त्याचे वडिलांकडून मिळाली , ती नंतर ( वाटपणानंतर ) त्या हिस्स्यापूर्ती स्वकष्टार्जित होते . त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुशांत भांडे
09-02-2018
sushantbhande@gmail.com
आम्ही राहत असलेली जमिनीचा खरेदी दस्त आहे पण ७/१२ ला नाव मूळ मालकाचेच आहे . सिटी सर्वे ला कुणाचेच नाव नाही . तरी उपाय काय
CTSO कडे दस्त सादर करा व नाव लावून घ्या .
CTSO city survey officer
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
07-02-2018
sagar.brfl@gmail.com
किरण सर माझा प्रश्न असं आहे कि जर इनाम जमीन असेल व ती ६ ब ची इनाम (गाव सरकारी चाकरी इनाम ) असेल तर त्या जमिनीला कुल कायदा लागू होतो का ?
हा इनाम रद्द ( Abolish ) झालेला आहे .
केवळ देवस्थान , किरकोळ व सरंजाम इनाम अस्तित्वात आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र सोनवणे
07-02-2018
Ravindravitthalrao@gmail.com
सर,
नमस्कार.
माझा प्रश्न असा आहे की, हैद्राबाद अतियात कायदा नुसार ईनाम जमिनीची विरासत कार्यवाहीसाठी विलंब नसल्यास कोणती कागदपञे देणे आवश्यक असते , क्रुपया कागदपञांची माहीती मिऴावी ही नम्र विनंती.
Question by अमित शिर्के
07-02-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
जर शासनाने एखाद्या व्यक्तीस ९९ वर्षाच्या कराराने जमीन कसण्यास दिली असेल आणि ति व्यक्ती ९९ वर्षाचा करार संपण्यापूर्वी मयत झाली व त्याला कोणीही पत्नी किंवा मुलबाळ नसेल तर त्या जमिनीचे पुढे काय होते.
१. जमीन शासन जमा होते का ?
२. ति जमीन त्या व्यक्तीचे इतर कोणत्याही नातेवाईकाला कसता येते का ?
३. जमीन शासन जमा होण्यासाठी काय करावे लागेल ?
४. ति जमीन एखादी व्यक्ती खरेदी करण्यास इच्छुक असेल व त्याप्रमाणे त्याने त्या जमिनीचा मोबदला शासनाकडे जमा केला तर त्याला ति जमीन खरेदी करता येऊ शकते का ?
इतर वारसांचे नाव भाडेपट्टा धारक म्हणून परवानगीने लावू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chintaman Dhamale
06-02-2018
cdhamale77@hotmail.com
1)3/2 cha kharedi khat Dast bigar nond mahnje kay?
2)mazi Aaji ne 1950 Sali 1 hekter shet jamin amchya gavatlya eka manushala vikli. Pan maze vadil tevha sadnan navhte.ajobahi mayat zalele hote tar women rigth of the act 1936 nusar vidhva shtri vadloparjit jage madhe hissa gheu shakte pan ti property cell karu shakt nahi.vidhva shtrila to adhikar 1956 Dhila hota tar maza prashna asa ahe ki mazya ajine kelele kharidikhat yogya ahe ki nahi?
Question by Pratap
04-02-2018
pratap_bhargude@rediffmail.com
सर मी मौजे पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील रहिवाशी असून पळशी येथे एका सामायिक गटात माजी वडिलोपार्जित जमीन आहे तरी या गटातील इतर सहहिस्सेदारानी त्यांच्या हिस्साचे क्षेत्र विकले असून त्यास माजी कुठेही सहमती घेतली नाही तरी असे असताना सदर खरेदी घेणाऱ्या इसमाने भूमीअभीलेख कार्यालयातून चुकीच्या मार्गाने मोजणीची क प्रत मिळवून सदर गटातील त्याच्या हिस्सा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बिनशेती करून घेतला आहे मला हि बाब समजताच मी उपाधीक्षक खंडाळा यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्यावर मला त्यांनी तुमची हरकत मान्य करून सदर गटाची मोजणी विणकार्यवाही निकाली काढली आहे व मला तसे लेखी कळवले आहे तरी मी या संधर्भात मा.जमाबंदी आयुक्त व संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना या संधर्भात लेखी अर्ज केला त्यांनी सदर अर्ज चौकशी साठी खाली पाठवला त्यावर मला उपाधीक्षक यांनी तेच उत्तर पाठवले आहे जर मोजणी झाली नाही तर प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयातून मला माहितीच्या अधिकारातून त्याच मो.र.नंबर ची क प्रत मिळाली आहे जर मोजणी झाली नाही तर मग झालेली बिगरशेती व मंजूर झालेला रेखांकन रहिवाशी आराखडा रद्द करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे मला या मोजणी संधर्भात भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची कोणतीही नोटीस मला आजपर्यंत आली नाही तसेच मी प्रांत अधिकारी यांना या गटाची मोजणी झाली नाही हे मला भूमिअभिलेख कडून आलेले लेखी पत्र हि दिलेले आहे तरीदेखील त्यांनी या संधर्भात मला काहीही कळवले नाही जर मोजणी झाली नाही तर भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रांत अधिकारी यांना तसे लेखी कळवायला हवे ना भूमिअभिलेख कार्यालयाकडून मला फक्त कळवले आहे मोजणी झाली नाही त्यांनी त्यांचं काम केलं मग क प्रत बोगस किव्वा खोटी आहे हे कोण ठरवणार या संधर्भात मी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे
ज्या अधिकाऱ्याने बीबी शेतीं परवानगी दिली आहे त्या अधिकाऱ्याकडे बिन शेती परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल Sawant
04-02-2018
sawantrahul1974@gmail.com
नमस्कार सर मी राहुल सावंत माझा ऐक प्रश्न आहे कि आपची गावी वडिलोपाजित जमीन आहेत त्या सर्व जमिनीच्या सातबारावर आमच्या मोठ्या काकांचे १९७१ मध्ये कुटुंब प्रमुक म्हणून त्यांचे नाव लागलेले होते आणि माझे वडील व लहान काका यांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये त्यांचे वारस म्हणून नाव नोंद आहे
तरी आमचे मोठे काका २०१२ मध्ये निधन झालेले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना फक्त आपल्याच परिवाराची वारस तपासणी करून सातबारावर नावे लावून घेतली पण या दोन्ही चुलत्यांची नावे वारस म्हणून लावली नाही. तर आम्ही आता त्याच्या ( काकांच्या मुलांच्या )परवानगी किंवा सही शिवाय तलाठ्यांकडे अर्ज करून वडिलांची वारस तपासणी करू शकतो काय ? त्यासाठी काय काय पेपर जोडावे लागतील याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
ज्या फेरफरने केवळ मोठ्या काकांच्या मुलांची नवे लागली आहेत , तो फेरफार प्रांताधिकारी यांचे कडे आव्हानात करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh kahare
03-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
वडिलोपार्जित शेताच्या वाटणीकरिता किंवा सदर शेताच्या पोटहिस्सा( अलग-अलग सात बारा ) करीत कलाम ८५/२ चा आदेशाची भूमी अभिलेख कार्यालय कडून मागणी होते परंतु प्रकार निकाली निघत नाही कारण प्रत्यक्षात मोजणी करतेवेळी ताब्यात असलेले क्षेत्र व ७/१२ वरील क्षेत्रात फरक आढळून येतो
हा प्रकार सर्रास सगळीकडे आहे . ७/१२ वरील क्षेत्राप्रमाणे कोणीही वहिवाट करत नाही . जो वरचढ , तो स्वतःचे क्षेत्राहून अधिकचे क्षेत्र वहिवाट करत राहतो .
मात्र सरस निरस वाटप केल्यानंतर , तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन , वाटप अंतिम केले जाते .
क्षेत्र तफावतीवरून , मोजणी अथवा सरस निरस प्रलंबित ठेवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM
03-02-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,तुमि व्हीओवाळी दिलेल्या उत्तर मुले मी योगदिशेने जात आहे . सर माझे कोर्टातच हक्कसोड पात्र झाले आहे व तयबदल्यात ली रकम मी कोर्टातच भरली आहे व त्या नंतर कोर्टहूकूमनाम मध्ये मला सर्व जमिनीचे हक्क दिले गेलेले आहेत . व हक्क सोड पात्र देण्यार्याने ते कोर्टातच मान्य केले आहे. तर तो हुकूम नामा झाला आहे त्याची नोंदणी करावा लागेल का ?
Question by अभिजित कणसे
02-02-2018
abhijeetkns299@gmail.com
गाव नमुना ८ अ हा मालकी हक्काचा पुरावा होऊ शकते का आणि जर नसेल तर तसे शासनाचे परिपत्रक उपलब्ध असल्यास माझ्या मेल आय डी वर पाठविण्यात यावे हि विनंती
Question by सिध्दार्थ सकळे
01-02-2018
siddharthsakale@gmail.com
सर आमच्या वडील १९९८ साली मयत झाले आहेत नंतर काही कौंटुबीक मेतभेदा नंतर २००० साली आमची आई ,काका, आजोबा, ह्याच्या मध्ये रजिस्टर वाटणीपत्र झाले़ आहे पंरतु चावडीत नोंद केले नाही़ आता मी २१ वषाचा झालो आहे मला आता चावडीत वाठणीपत्र नोंदवायचे आहे परंतु काका व आजोबा यानी आज पयत सातबारा वर कज काढले आहे व ते कज नील केले नाहीत व आता मला ते सहकार्य करनात व7 आमच स्वताच काही कज नाही याकारणांमुळे मुळे तलाठी यांच्या कडुन वाटणी पत्र नोंद होइना कृपया मार्गदर्शन करावे
Question by प्रभाकर कोळमकर
30-01-2018
pgk2100@gmail.com
नमस्कार सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात नवीन घर बांधकाम करताना राज्यमार्ग पासून कमीत कमी किती अंतर सोडावे लागेल.. नवीन घर बांधकाम व राज्यमार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, गाव रस्ता, यामधील सोडावे लागणारे अंतर व नियम याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.. धन्यवाद..
Question by VIKRAM
29-01-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , कोर्टात जर हक्कसोड पत्र लहून दिले असेल व तास हुकूमनामा सुद्धा झाला असेल तर ते हक्कसोड पत्र नोंदणीकृत करावे लागते का ? व लागत असेल तर ते नोंदणी कृत कर्णयसाठी काही कालावधी उशीर झाला असेल १२ वर्ष नंतर तो नोंदणीकृत करता येईल का ?कृपया मार्गदर्शन करा .धन्यवाद
Question by सचिन पवार
29-01-2018
mayurcomputers2705@gmail.com
आदिवासी ते आदिवासी जमीन विक्रीचा व्यवहार विना परवानगीने झाल्यास तो नियमित करता येईल का?
कोणत्या नियमानुसार
परवानगी घेणे आवश्यक होते . नियमाकूळ करता येणार नाही
मूळ मालकास जमीन पुनर्स्थापित करावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
29-01-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय महोदय,
प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:
१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).
२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)
३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)
४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.
५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).
७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.
६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.
८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.
जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
Question by Sandeep Dhamale
29-01-2018
dhamale.sandeep@gmail.com
सर
मी १९९९ सारी ४ एकर १२ आर जमीनचे खरेदीखत केले.
पण शेतकरी असल्याचे दाखला नसल्याने,२००५ पर्यत फेरनोंद झाली नाही.
२००५ मध्ये शेतकरी असल्याचे दाखला दाखल केला, तरी सुद्धा आजगायत नोंद झाली नाही.
दरम्यान सदर जमीन तील १ एकर जमीन मुळ मालकाने खरेदीखताने अन्य व्यक्तीस विकली आहे.
आता माझ्या जमीनचे खरेदीखत नोंद कशी करावी.
आपण अगोदर खरेदी केली आहे . त्यामुळे खरेदी केलेल्या पुर्न क्षेत्रास आपले नाव लागणे आवश्यक आहे .खरेदी खात रद्द करून घ्या ( दिवाणी न्यायायालयाकडून)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vasant
28-01-2018
kodag.vasant@rediffmail.com
नमस्ते सर,
१) तलावासाठी आमची जमीन ९ वर्षया पूर्वी संपादित झाली आहे. त्यानुसार तलावाचे काम अंतिम टप्पात आहे. त्याचा निवाडा झाला नसून, भरपाई आमचे वडिलांना मिळाली नाही. आता नवीन भू सांपादन-2013 कायदयाने वाटा घाटेने भरपाई मिल्नेसाठी वडिलांची संमती पत्र घेतली आहे.त्या दरम्यान
२) एवढे सर्व झाले असताना संपादित वडिलांचे ७/१२ वरती भू संपादन मंडळाचे नाव, व वारसाची नावे नसलायमुळे त्याचे कडून गावातील मंडळींनी जमीन दोन वर्षपूर्वी पक्क्या खरेदीने घेतली व फेरफार मंजूर केला आहे.
३) तरी वारसांना लढा देता येईल, काय करावे.
३) वडिलांचे हयातीत वारसा पत्रसाठी काय करावे.
कृपया लवकर मार्गदर्शन मीलावे हि विनंती.
Question by VIKRAM
27-01-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर, तुम्ही माझा प्रश्नयाचे योग उत्तर दिले त्या मुले मला योग दिशा मिळत आहे. माझे व बहिणीचे हक्क सोड पात्र हे कोर्टात झाले आहे .ते नोंदणी कृत आहहे कि नाही हे कसे ठरवायचे ,कारण मी मुद्रांक आधी नियम ३३ अन्व्ये मुद्रांकित करण्यासाठी जिलाअधिकारी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी दंडात्मक रक्कम मला भरावयास सांगितली होती व तिमी भरली होती त्यांनी त्या तडजोड हुकूमनायमेवर आपला स्ट्याम्प देखील मारून दिला आहे .म्हणजे तो हुकूमनामा मुद्रांकित झाला का ?कि अजून काही प्रोसिजर असते .तडजोड नामा १७/०६/२००६ साली झाला आहे .त्यावर लेटफी भरली आहे.त्यानंतरच मी तलाठी यांच्याकडे ७/१२ नोंदी साठी तो दिला होता .त्यानंतर ७/१२ सादरी नोंद हि झाली .पूण त्या आधी ती जमीन बहिणीने विकली व तिचा दस्तही झाला . आपले नवा व फार्फार प्रांत अधिकारी यांनी रद्ध केला व जमीन जायना विकली त्यांचे ७/१२ सादरी नावं लावण्याचा हुकूम दिला.आता फुडें मी दिवाणी न्यालयात दावा देखील दखल केला आहे तो दस्त रद्ध करण्यासाठी .त्या साठी अजून काय कागत तो दावा मजबूत करण्यासाठी लागतील कृपया मार्गदर्शन कराल का ?
Question by rajesh kahare
27-01-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
खातेदाराने नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले त्यानंतर खातेदार मरण पावला तलाठ्याने सदर मृत्यूपत्राचा फेरफार घेतला व त्यासंबधीत सर्व वारसांना फेरफाराची नोटीस दिली त्यावर आक्षेप दाखल झाला प्रकरण विवादग्रस्त मध्ये नोंदवून पुढील आदेश करीत तहसील कार्यालयात पाठविले .कार्यालयाने प्रकरण पंजीबध्द करून रीतसर सर्व वारसांना नोटीस दिली .प्रकार आदेशाकरिता असून कोणत्या कलम मध्ये आदेश पारित करावा? .नोंदणीकृत मृत्यूपत्राला सत्यता प्रमाणपत्र लागेल काय ? कि तलाठ्याने , ज्याचे नावे मृत्यूपत्र करून ठेवले आहे तो फेरफार नोंद कायम ठेवावा ?
मृत्य पत्रास कोणती हरकत आली .
हरकत असल्यास प्रोबेट करून आणण्यास सांगावे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
26-01-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय महोदय,
प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीन जर वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:
१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (१९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (१९६६).
२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (१९७४)
३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)
४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि १९८० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.
५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).
६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.
७) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस कसत आहेत.
कृपया आपल्याकडून जमीन मालक (वारस) यांना जमीन मिळवण्याच्या दृष्टीने मोलाचे योग्य मार्गदर्शन मिळेल हि नम्र विनंती करत आहे.
Question by विशाल बा पाटील
24-01-2018
vishalbpatil07@gmail.com
आम्ही कसत असलेला काही भाग सरकारी मोजणी मुळे बाजूचे गट नंबर मध्ये गेला असून आम्हाला आमचे गट नंबर मध्ये कसण्यास फारच कमी शेत जमीन शिल्लक राहिलेली आहे. कारण आमच्या गट नंबर मधील इतर सहधारकांनी सदर गट नंबर मध्ये अतिक्रमण केले आहे. ते त्यांचे नावे असलेल्या धारण क्षेत्रा पेक्षा जास्त जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून शेती करीत आहेत. अतिक्रमण केलेले लोक मोजणीकरिता सहमती देत नाहीत. आम्हाला आमची शेत जमीन परत मिळणेबाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.
सह्धार्क संमती देत नसतील तर न्यायालयात जाने हाच एक पर्याय
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
