जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर
मि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर
सर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर
तारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार
मध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय
तहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्या



एकनाथजी
१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.
२. जर फेरफारही मिळत नसेल
अ. जमीन सध्या कोण कसत आहे ?
ब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का
३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय,
श्री. किरण पानबुडे साहेब,

कृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.

रोहिदास हरिभाऊ काळे
नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती

Question by mahadev pawar
17-03-2018
002atul@gmail.com

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी


होय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,
ग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,
पण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे
ग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,
मी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,

सर प्लीज मदत,मार्गदर्शन करा
थोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .
या बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही
जमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व मी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.
सर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखादा व्यक्ती /सोसायटी इमारतींबाबत म.न.पा.मध्ये कर भारत असेल तर आज रोजी शहरी भागात बिनशेती परवानगी आत शिथिल झाल्याने शासनाकडे बिनशेती कर भरणे गरजेचे आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
माननिय मोहदय,

माझा प्रश्न आहे कि, कोणत्याही विषया संदर्भात ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावा विरोधात हरकत घेता येते का?

कळावे हि विनंती.
आदरणीय मोहदय,

१) माझा असा प्रश्न आहे कि, एखाद्या गावठाणातील किंवा शेत जमिनी वर तार-कुंपण किंवा वॉल-कंपाऊंड भिंत बांधायची असेल तर ग्रामपंचायत परवानगी ची आवश्यकता असते का?

२) अर्ज कश्या प्रकारे करता येईल व त्या सोबत काही उतारे द्यावे लागतील का?

३) जर परवानगी आवश्यक असेल तर किती दिवसात परवानगी देणे ग्रामपंचायत ला बंधन कारक आहे?

४) जर ग्रामपंचायत परवानगी देत नसेल तर काय करावे?

कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
नमस्कार सर , माज्या काकांनी माज्या वडिलाना बक्षिसपत्राने जागा वडिलांच्या नावे करून दिलेली आहे. तर ती जागा आम्हाला विकता येते का? वडील ह्यात असताना आणि ह्यात नसताना याचे काही नियम आहेत का ? असतील तर सांगावे हि नम्र विनंती.
सर ' अडवलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मी तहसीलदारांकडे विनंती अर्ज केला होता पण तो रस्ता मला मोकळा करून दिला नाही.स्थळ पाहणीत माञ असे लिहिले आहे की रस्ता मोकळा करून दिला आहे. सरळ पाहणी तहसिलदार यांनी स्वत: केली आहे.योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
कृपया
मला करमणुक कर विषक माहिती हवी होती
माझया कडे एका चित्रपटगृह चालकाने एक पडदा चित्रपटगृहास दोन पडदा चित्रपटगृह करणे बाबत परवानगी मागीतली आहे.
करिता मार्गदर्शन करावे

Question by Ajay kamble
09-03-2018
kambleajay4u@gmail.com

नमस्कार आदरणीय सर, मी 2010 मध्ये home loan घेऊन flat खरेदी केला. मी applicant आणि वडील coapplicant आहेत. Flat माझ्या च नावावर आहे. तेव्हा वडिलांनी आणि मी दोघांनी मिळून थोडी टोकण अमाऊण्ट भरली. आणि तेव्हा गरज लागली म्हणून personal loan काढला. पण 2010 ते आतापर्यंत मी एकटाच (home loan) emi and personal loan भरत आहे. 2014 मध्ये माझ्या job चा problem झालेला. तेव्हा मला 3 month payment मिळत नव्हता. त्या वेळेस मी बाहेर रात्रंदिवस काम करुन वणवण फिरुन आणि मित्रांकडून घेऊन emi and personal loan (emi) भरले. कारण दोन्ही रक्कम मोठी आहे. त्या वेळी वडिलांनी एकदाही विचारले नाही की loan कसे भरावे आणि मदत ही केली नाही. त्या नंतर मला job मिळाला. परंतु त्या office मधे पगार लेट मिळायचा. त्यामुळे emi तारीख निघून जायची. Emi amount bounce व्हायची. मी fine सहीत सगळी ammount भरायचो. वडील govt.servant (police) आहेत. Coapplicant ची जबाबदारी असते की applicant ला ammount (emi) वेळेवर भरता आली नाही तर त्यांनी भरावी. परंतु तेव्हा वडिलांनी मदत केली नाही. विचारले सुध्दा नाही. मी वडिलांना त्रास नको म्हणून मी माझ एकटाच home loan, personal loan भरुन घरात पण रूपये देत होतो. नंतर 6 महिन्यांनंतर मला चांगला job मिळाला. पण 2010 ते आता पर्यंत माझी स्वतः ची काही सेव्हिंग नाही, गाडी नाही काहीच नाही. सगळा पगार home loan, personal loan भरुन घरात खर्च करायला देण्यात जातो. मी 2016 मध्ये love marriage केले. आणि घरी न जाता रेन्ट वर रुम घेऊन राहतोय. लग्नानंतर 5 महिन्यांनी आई चांगले बोलायला लागली. माझ्या बायको बरोबर बोलु लागली. नंतर 7-8 महिन्यानी आई वडील बोलू लागले की वडिलांचे octomber 2018 मध्ये retiredment झाले नंतर reception करुन आम्हाला घरात घेतील आपण एकत्र छान राहूया. आणि जस retiredment झाली तस आई वडिलांनी विचार बदलला की 500000 देतो तु तुझ नवीन घर घे. आई बोलते flat माझ्या नावावर कर. आई बोलते वडिलांची retiredment व्हायची होती म्हणून आम्ही तुझा वापर केला. या घरात यायचे नाही. तु तुझ बघ आता. नवीन लोन घे. मला लहान भाऊ आहे. त्याच आता शिक्षण पूर्ण झाले. तो शांत बसलाय. मी घर आधी च घेतले त्यामुळे घर कमी किमतीत मिळाले. आणि माझ home loan and personal loan लवकर संपेल. आता घराच्या किमती फार वाढल्यामुळे आणि परत लोन चालू करणे मला आता अशक्य आहे. माझी स्वतः ची काहीच सेव्हिंग नाही. पगार home loan, personal loan, rent देण्यात जातो. मी आम्हाला घरात घेतो या आई वडीलांच्या शब्दावर विश्वास ठेवून home loan, personal loan, rent भरून आणि आईला ही रुपये देत राहिलो. माझी आतापर्यंत ची मेहनत रात्रंदिवस केलेले कष्ट मी फक्त घर आणि घरातले यांच्यावर खर्च खूप केला. माझ काम मला रांत्रदिवस करावे लागते. 10 वर्ष झाली मी काम करून सगळ घर सांभाळतोय. पण मी आता शून्यात आहे. मी हे वडिलांना सांगितले की माझी काही सेव्हिंग नाही आपण एकत्र राहूया तर वडील बोलतात आम्हाला जमणार नाही आणि की तुझ नाव बदल करून घे. म्हणजे वडिलांच आणि आडनाव बदल मग तु घरासाठी भरले तेवढे आणि आम्हाला जमेल तेवढे च रुपये आम्ही तुला देतो. नाव बदल तरच देतो नाहीतर काही च मिळणार नाही. नाव pan card, aadhar card वर दिसले तरच देणार. मी नावात बदल केला तर मला कधीच property वर आणि कुठेही हक्क मिळणार नाही त्यामुळे मी नावात बदल केला नाही. आता माझ्या flat ची किंमत तिपटीने मिळेल जर विकला तर. यामध्ये माझे कष्ट दिसत नाहीत. माझा भाव शांत राहिला आहे. भाऊ आईवडिलांच्या बाजूने आहे. मी आता शून्यात आहे. कारण आईवडिलांचा विचार करून सगळे रुपये मी home loan , personal loan rent आणि घरात आईला देऊन खर्च करत राहिलो. मी परत लोन नाही घेऊ शकत. मला माझे घर हवे आहे. कारण माझे कष्ट मेहनत त्यात आहे. माझे लोन कमी कमी होत आहे. घर देत नाहीत आई वडील. मी बोललो की तुमचे मला काही नको. तुमची सेव्हिंग तुम्हाला च ठेवा. तुम्ही सुरुवातीला दिले ते रुपये मी परत देतो. भावाला 150000 पगार आहे अस आई वडील बोलतात. मी काय करू. माझे घर मला कसे मिळेल. भांडण नको शांतपणे आणि प्रेमाने सगळ करु पण तस होत नाहीये. मी काय करू. Pls.help sir
नमस्कार सर माझ्या आजोबानी व त्याच्या भावाने सन १९५५ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने जागा खरेदी केलेली आहे. सदर नोंदणीकृत खरेदिखतचा फेरफार नोंदवण्यात आलेला आहे. सदर नोंदणीकृत खरेदीखतामध्ये एकूण १८ ७/१२ होते . फेरफार देखील १८ ७/१२ साठी मजूर करण्यात आलेला आहे. परंतु तत्कालीन तलाठी यांनी फक्त ५ चा ७/१२ उतारावर खरेदीदारांची नावे नोंदवलेली आहेत. राहिलेल्या ७/१२ वर मूळ मालकाच्या वारसाची नावे आता ७/१२ सदरी दाखल आहेत. सर आता मला फेरफारच पूर्ण अंमल देण्यासाठी काय करावे लागेल.
नमस्कार सर,
माझ्या मालकीच्या काही ७/१२ उतारा सदरी महसूल अभिलेखा मध्ये कुठलाही फेरफार न होता परस्पर एका व्यक्तीचे नावं नोंदवण्यात आलेली आहेत. ७/१२ च्या मूळ बुकात हे नाव घुसवलेली दिसते. यासंदर्भात कुठे दाद मागता येईल.

Question by devendra tandel
06-03-2018
jyotitandel82@gmail.com

सर माझा प्रश्न आहे कि
१. १९३२ पासून संरक्षित कुल असूनही जमिनीस मालकाने १९६२ साली कुल नोंद कमी केली व ३ महिन्यांनी दुसऱ्या व्यक्तीस विकली परंतु मालकाचे वडील मयत असतानाही त्याची नोंद न करता मालकाच्या मुलाने कुलमुख्तियार करून विकली आता कुळाचे नातेवाईक त्या जमिनीवर दावा सानू शकतात का
२. तसेच संरक्षित कुल नोंद कमी करता येते का
१) माझ्या आजोबां ना आकारी पड जागा नविन अविभाज्य शर्ती ने इ़.स.१९२६ मध्ये मीलालि आहे
२) सदर जमीनीचा भोगवटदार २ आहे
३) भोगवटदार १ करता येइल का?
४) कृपया ,,, शासन महसुल व वनवभाग ठराव क्र, एलएनडी १०८३/२७९२५/सीआर-३६७१/ग-६ दि,८/९/१९८३ उप्लब्ध करावा,
साहेब नमस्कार माझा प्रश्न आहे की --थोरल्या भावाच्या पत्नी ने स्वताच्या भावाच्या मुलाच्या नावाने ९५ आर ३२ ग कुळाची जमिनीचे आमच्या ,वडिलांनी खरेदी केलेली जमीन न अ शर्थीने शेरा आहे जमिनीचे व घराचे मृतूपत्र RAGISTER झाले आहे ते फसउन केले आहे.ते दोघेपण मयत आहेत ते आम्हाला मान्य नाही ,परंतु मंडळ अधिकारी ,व तलाठी आमची वारसाची नोंद घातली नाही ,मंडळ अधिकारी यांनी निकाल व आदेश त्याच्या बाजूने दिला आहे ,आम्ही हरकत घेतली आहे ,आम्ही कोर्टात ,अपील केली आहे जमीन सध्या आमच्या ताब्यात आहे जमीन एकत्रीकरण आहे वाटणी झाली नाही
मृतुपत्र मध्ये घराचा सुधा उल्लेख आहे
(घराची नोंद वारसाने आमच्या नावाने झाली आहे ,ग्रामपंचायतिने आमची नोंद घातली आहे ,सामने वाल्याने त्यावर हरकत घेतली नाही,
मृतूपत्राला मुद्दे
1)मृतूपत्राला फिजिकल मेडिकल फिट चा दाखला जोडला नाही
त्यावेळेला आजारी होत्या वय 72 वर्षे होते
2)मृतूपत्रवर मिळकतीचा कुठून आली त्याचा उल्लेख नाही
3) मृतूपत्रवर साक्षीदार यांचे नाव चुकीचे आहे
4) मृतूपत्र बरोबर साक्षीदारांची ओळख पत्रे नाहीत आणि साक्षीदार त्या गावाचे नाहीत पत्ता चुकीचा आहे
5) आणि मृतूपत्रात फक्त एवढेच लिहिले आहे कि मृतूपत्र लिहून ठेवते कारण माझा भाचा सांभाळ करतो आणि पुढेही करील म्हणून मृतुपत्र करत आहे
परंतु त्याने मृतुपत्र करून पंधरा वर्षे झाली त्याने सांभाळले नाही किवा आला पण नाही .परंतु आमच्याकडे डॉक्टर चे फाईल पेपर आहेत व सांभाळलेले पुरावे पण आहेत
यावर काय उपाय योजना करता येतील साहेब कृपया लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती

Question by mahadev pawar
05-03-2018
002atul@gmail.com

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी
या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
त्यात पुढील बाब समाविष्ट करत आहे
१. ८ अ ला केव्हापासून नाव लागले आहे ?
२. १२ वर्षाहून अधिक काळ नाव लागले असेल त्या बहिणीनं विरद्ध , adverse possession चा दावा दाखल करू शकता
३. जेवढे क्षेत्र विकणाराचे हिस्स्यात येईल , तेवढ्या क्षेत्रास , मिळकत पॅट्रिक्स आपले नाव दाखल होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mahadev pawar
03-03-2018
002atul@gmail.com

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी
आपण जो ८ अ चा उतारा म्हणत आहे तो कोणता ? ग्रामपंचायती चा घर पट्टी उतारा आपल्याला म्हणायचे आहे का ?
गावठाणाचा सर्वे झाला असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक .
मात्र घर पट्टी रजिस्टरला ला आपले वडिलांचे नाव कसे लागले कारण आपले म्हणण्यानुसार जागा , विकत देणाऱ्याच्या वडिलांची आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार ,
१) आमची वर्ग २ ची जमीन आहे आम्हाला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे ,परंतु भूमी लेखा ऑफिस मध्ये फाळणी उपलब्ध होत नाही,
२) फाळणी नसताना आमचे शेत्र बरोबर निघेल का ?
3) व मोजणी कश्या प्रकारे करतील ?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
सर ऑनलाईन फेरफार काढता येतात का ?

Question by Goroba Pawar
01-03-2018
gorobap@gmail.com

नोंदणीकृत साठे कराराची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेता येते का?
जर घेता येत असेल तर कोणत्या कायद्याने किंवा शासन निर्णयानुसार घेता येते.
नोंद घेता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय मोहदय,

गावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन
आम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.

सध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.

माझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.

माझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.

कृपया पर्याय सांगावे हि विनंती.
बक्षीस पत्र करा अथवा वाटप पत्र करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.

जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात

२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SAGAR
28-02-2018
Sagar_shinge@rediffmail.com

Sir mi class 3 padavar shasan sevet ahe. Mala rajyamnatrkade punrikshan arj karnyacha kalavadhi kiti asto yachi mahit milel ka? Mi sachiv yanchya shist va apeal niymachya shikashevar apeal karnar ahe

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3