जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by कौनैण शेख
06-03-2018
Kaunainshaikh77@gmail.com
१) माझ्या आजोबां ना आकारी पड जागा नविन अविभाज्य शर्ती ने इ़.स.१९२६ मध्ये मीलालि आहे
२) सदर जमीनीचा भोगवटदार २ आहे
३) भोगवटदार १ करता येइल का?
४) कृपया ,,, शासन महसुल व वनवभाग ठराव क्र, एलएनडी १०८३/२७९२५/सीआर-३६७१/ग-६ दि,८/९/१९८३ उप्लब्ध करावा,
Question by अमोल चव्हाण
06-03-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार माझा प्रश्न आहे की --थोरल्या भावाच्या पत्नी ने स्वताच्या भावाच्या मुलाच्या नावाने ९५ आर ३२ ग कुळाची जमिनीचे आमच्या ,वडिलांनी खरेदी केलेली जमीन न अ शर्थीने शेरा आहे जमिनीचे व घराचे मृतूपत्र RAGISTER झाले आहे ते फसउन केले आहे.ते दोघेपण मयत आहेत ते आम्हाला मान्य नाही ,परंतु मंडळ अधिकारी ,व तलाठी आमची वारसाची नोंद घातली नाही ,मंडळ अधिकारी यांनी निकाल व आदेश त्याच्या बाजूने दिला आहे ,आम्ही हरकत घेतली आहे ,आम्ही कोर्टात ,अपील केली आहे जमीन सध्या आमच्या ताब्यात आहे जमीन एकत्रीकरण आहे वाटणी झाली नाही
मृतुपत्र मध्ये घराचा सुधा उल्लेख आहे
(घराची नोंद वारसाने आमच्या नावाने झाली आहे ,ग्रामपंचायतिने आमची नोंद घातली आहे ,सामने वाल्याने त्यावर हरकत घेतली नाही,
मृतूपत्राला मुद्दे
1)मृतूपत्राला फिजिकल मेडिकल फिट चा दाखला जोडला नाही
त्यावेळेला आजारी होत्या वय 72 वर्षे होते
2)मृतूपत्रवर मिळकतीचा कुठून आली त्याचा उल्लेख नाही
3) मृतूपत्रवर साक्षीदार यांचे नाव चुकीचे आहे
4) मृतूपत्र बरोबर साक्षीदारांची ओळख पत्रे नाहीत आणि साक्षीदार त्या गावाचे नाहीत पत्ता चुकीचा आहे
5) आणि मृतूपत्रात फक्त एवढेच लिहिले आहे कि मृतूपत्र लिहून ठेवते कारण माझा भाचा सांभाळ करतो आणि पुढेही करील म्हणून मृतुपत्र करत आहे
परंतु त्याने मृतुपत्र करून पंधरा वर्षे झाली त्याने सांभाळले नाही किवा आला पण नाही .परंतु आमच्याकडे डॉक्टर चे फाईल पेपर आहेत व सांभाळलेले पुरावे पण आहेत
यावर काय उपाय योजना करता येतील साहेब कृपया लवकर मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती
Question by mahadev pawar
05-03-2018
002atul@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी
या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
त्यात पुढील बाब समाविष्ट करत आहे
१. ८ अ ला केव्हापासून नाव लागले आहे ?
२. १२ वर्षाहून अधिक काळ नाव लागले असेल त्या बहिणीनं विरद्ध , adverse possession चा दावा दाखल करू शकता
३. जेवढे क्षेत्र विकणाराचे हिस्स्यात येईल , तेवढ्या क्षेत्रास , मिळकत पॅट्रिक्स आपले नाव दाखल होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadev pawar
03-03-2018
002atul@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी
आपण जो ८ अ चा उतारा म्हणत आहे तो कोणता ? ग्रामपंचायती चा घर पट्टी उतारा आपल्याला म्हणायचे आहे का ?
गावठाणाचा सर्वे झाला असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड आवश्यक .
मात्र घर पट्टी रजिस्टरला ला आपले वडिलांचे नाव कसे लागले कारण आपले म्हणण्यानुसार जागा , विकत देणाऱ्याच्या वडिलांची आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
01-03-2018
amol.chavan25@rediffmail.com
सर नमस्कार ,
१) आमची वर्ग २ ची जमीन आहे आम्हाला जमिनीची मोजणी करून घ्यायची आहे ,परंतु भूमी लेखा ऑफिस मध्ये फाळणी उपलब्ध होत नाही,
२) फाळणी नसताना आमचे शेत्र बरोबर निघेल का ?
3) व मोजणी कश्या प्रकारे करतील ?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by सत्यजित कोल्हे
01-03-2018
kolhesatyajit@gmail.com
सर ऑनलाईन फेरफार काढता येतात का ?
Question by Goroba Pawar
01-03-2018
gorobap@gmail.com
नोंदणीकृत साठे कराराची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद घेता येते का?
जर घेता येत असेल तर कोणत्या कायद्याने किंवा शासन निर्णयानुसार घेता येते.
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
28-02-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय मोहदय,
गावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन
आम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.
सध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.
माझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.
माझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.
कृपया पर्याय सांगावे हि विनंती.
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
28-02-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय महोदय,
प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?
गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:
१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).
२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)
३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)
४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.
५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).
७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.
६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.
८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.
जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
१. संपादित जागेवर , भूखंड तयार केले आहेत म्हणजे , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी करण्यात येत आहे . भू खंडाचे वाटप झाले म्हणजे , त्याचा वापर झाला आहे असे आहे . त्या वर , लोकांनी घरे बांधली नाहीत म्हणून वापर झालेला नाही असा निष्कर्ष काढता येणार नाही . प्रांताधिकारी कार्यालयाकडून असे भूखंड काढून घेण्यात येऊन , गरजू लोक्कांना वाटप केले जाऊ शकतात
२. जमिनीचे संपादन जुन्या कायद्यानुसार झालेले आहे . त्यामुळे मा न्यायालयाने , जागेचा वापर संपादन प्रयोजनासाठी झालेला नाही असा निष्कर्ष जरी काढला तरी , जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी वापरण्याची आहे . अन्य सार्वजनिक प्रयोजसाठी आवश्यक नसल्यास , त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SAGAR
28-02-2018
Sagar_shinge@rediffmail.com
Sir mi class 3 padavar shasan sevet ahe. Mala rajyamnatrkade punrikshan arj karnyacha kalavadhi kiti asto yachi mahit milel ka? Mi sachiv yanchya shist va apeal niymachya shikashevar apeal karnar ahe
Question by गणेश शिंदे
27-02-2018
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या व्यक्तीस धरणग्रस्त/प्रकल्पग्रस्त असल्याने पुनर्वसनात जमीन मिळाली असल्यास तिची विक्री करणेकामी शासकीय परवानगीची आवश्यकता असते का?किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
आपली संपादित झालेली जमीन वर्ग २ ची असल्यास , आपणास शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीचा धारणा प्रकार हा वर्ग २ असतो व पर्यायाने आपणास विक्री परवानगी आवश्यक असते . मात्र जर आपली संपादित जमीन वर्ग २ ची नसल्यास , परवानगीची गरज नाही .( पुनर्वसन कायदा १९९९)
मात्र काही प्रकरणात जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत जमीन प्रदान करण्यात आलेली आहे ( ज्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता - कोयना प्रकल्प ग्रस्त अथवा पुनर्वसन कायदा लागू केला नाही ) त्या अंतर्गत , जमीन वाटप झाल्यापासून १० वर्षापर्यंत , हस्तांतरण न करणे बाबत अट आहे . १० वर्षानंतर , जमिनीचा धारणाधिकार वर्ग २ जाऊन , जमीन वर्ग १ होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय सिसोदे
26-02-2018
143hasislovemail143@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांचा लांबचा चुलत भाउ यांनी त्यांचा लाबचा नात्यातील व्यक्तींकडून जमीन विकत घेतली होती १९९० साली परंतु शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे
तसेच मग त्यांचाकडून माझ्या वडिलांनी तीचापैकी काही भाग विकत घेतला १९९२ साली तो पण शासनाची परवानगी न घेता फक्त ७/१२ त्यांचे नावे करून चुलत भाऊ म्हणून फेरफार नोंद केली आहे
आणि वरील दोघेही अडाणी आहेत व जमीन ही नवीन शर्तीची आहे व त्या वेळेस वर्दी वरून नोंदी व्हायचा तर जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांचा वर्दीवर सह्या देखील आहेत
आता २०११ पासून मूळ मालक यांनी जमिनीची नोंद चुकीची आहे ती रद्द व्हावी म्हणून खटला चालवलेला आहे त्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी मूळ मालक यांचा बाजूने निकाल दिलेला आहे
सदर बाबतीत आता उच्च न्यायालय येथे खटला चालू आहे सदर बाबतीत आम्ही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे
मूळ मालका कडून ज्यांनी जमीन घेतली ते आता मयत आहेत व त्यांचा कडून माझ्या वडिलांनी घेतली होती
जर का नोंद बोगस होती तर मूळ मालक यांनी 20 वर्ष का नोंद रद्द करणेस सांगितले नाही
धन्यवाद
अडाणी पण हे कारण होऊ शकत नाही .जमीनखर्डेची करून किती दिवस झाले आहेत ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by dnyandeo kale
25-02-2018
dnyandeokale2@gmail.com
Sir
We have a agricultural land and it is waterlocked by three sides(east north and south) of jayakwadi dam but land is not aquired. We r project affected farmer our village is displaced for dam. From our previous village to this land there was a strait road to cultivate the land but now from our new village to this land no any road available to us. Our new village to land distance is only 500 meters but tahsildar suggested us a road that is another village to our land which is 9 km. Is this tahsildar division is practical? and 1 km road of that 9 km is in water of dam as per map and 2km is private of another farmers they r not allows us to transit. That total road is not reasonable access for us as compare to 500 meters. In this 500 meters there is boundary of survey no. Nevertheless tahsildar rejected our application then what we should do.
You can see our news on zee helpline Dhorsade dist. Ahemednagar project afected villagers. statement of tahsildar is also(YouTube)
१. Under Mamletdar 's Court Act , Mamletdar has a power to remove impediments on ways or customary roads . In your case , the road which you are referring is not a customary way .
2. Mamletdar does not have power to direct farmers to give access / road to other farmer to reach his holdings for cultivation not there is any such law .
3. you will have to use which goes from other village
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश मुथा
25-02-2018
dmuthadhule@yahoo.co.in
नमस्कार सर, 'अ' यास तहसीलदार धुळे. यांचे कडून 6 -8 -१९८१ ला रहिवासी एन ए ऑर्डर ची परवानगी मिळाली आहे. वरील जमिनीचा लेआउट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी न घेता तहसीलदार धुळे यांनी लेआऊटला विनातारखेची मंजुरी दिली आहे व त्या प्रमाणे प्लॉट पाडून तलाठी यांनी सात -बारा उताऱ्यावर भोगवटादार सदरी प्लॉट नंबर व मालकाचे नाव आले आहे, उताऱ्या वर रहिवास प्रयोजना करिता लिहिले आहे.
वरील प्लॉट नगर रचनाकार यांचे कडून मंजुरी नसतांना विकत घेतल्यास.प्लॉट चे टायटल क्लीयर राहील का व सरकारी बँकेतून कर्ज घेता येईल का.
Question by शंकर काकडे
24-02-2018
shankarbkakade@gmail.com
माननीय श्री पाणबुडे सर
आमच्या गावाशेजारी मोठे डोंगर आहे काही लोक तो डोंगर खोदून माती विकतात . तो डोंगर फॉरेस्टर च्या आरक्षणात असेल तरीहि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीची हानी होत आहे , झाडे तोडली जातात, तर ह्या लोकांची तक्रार कुठे करावी कि काय करू माती विकणे थांबवण्यासाठी आपण योग्य ते मार्गदर्शन करावे ...
आपण उप वनसौरक्षक/ परिक्षेत्र वन अधिकारी यांचेकडे तक्रार करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sharadchandra Devidas Wani
24-02-2018
sd_wani@rediffmail.com
आमच्या वडिलांनी १९८६ मध्ये आम्ही ३ भावांच्या नावे एक बखळ जागा विकत घेऊन ठेवली आहे.त्या जागेच्या खरेदीखतात रुंदी २९ फूट आणि लांबी ९० फूट असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र एकूण ११२.५ चो.मी.क्षेत्रफळ असे लिहिले गेले आहे.प्रत्यक्षात ती जागा २९ x ९० असून आमचे तब्यत आणि वहिवाटीखाली आहे. उतरल्यावर २४८.५ चौ मी. ऐवजी ११२.५ चौ.मी. दिसते. आता त्या जागेच्या क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी काय करावे लागेल कोणत्या कलमाखाली आणि कोणाकडे अर्ज करावा लागेल या संदर्भात मार्गदर्शन व्हावे हि महोदयास विनंती.
१. जागा गावठाणातील आहे का ?
२. गावठाणातील जागा असल्यास जागेचा सिटी सर्वे झाला आहे का ?
३. जागा गावठाणातील व सिटी सर्वे झालेली नसल्यास , संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्राम पंचायतीकडे अर्ज करा
४. सिटी सर्वे झालेला असल्यास , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
23-02-2018
shankarbkakade@gmail.com
माननीय पाणबुडे सर
उल्हासनगर येथे असलेल्या जीन्स कारखाने कोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आले पण ते कारखाने तेथून स्थलांतरित होऊन आमच्या गावाच्या आत आले आहेत त्या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे आमची जमीन पूर्णतः
नापीक होईल, जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होतील सूक्ष्मजीव जमीन सुपीक करण्याचे काम करतात , जर तेच नष्ट झाले तर जमीन नापीक होईल , काही लोकांचा उदरनिर्वाह शेतीमुळे होतो , पावसाळ्यात सगळेच भात लागवड करतात, तर त्या जीन्स कारखान्याची तक्रार कुठे करावी व आम्ही काय करावे कि जेणेकरून तो कारखाना बंद होईल व आमच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचतील, आपण मार्गदर्शन करावे.
गावात आलेल्या जीन्स कम्पनी बंद करणे हे या वर उपाय हाऊ शकत नाही
मात्र या कम्पनी यांना Consent to Establish व consent to operate या परवानग्या घेणे आवश्यक आहे . या परवानगी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळातर्फे दिल्या जातात . तसेच या कम्पनी यांनी Effulent treatment plant बसवणे आवश्यक आहे .
प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दुर्गादास जोशी
23-02-2018
jsdurgadas26@gmail.com
नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by सीमा सावंत
22-02-2018
sawantseema176@gmail.com
नमस्कार सर , माझ्या वडिलांची व काकांची सामाईक एन ए जमिन आहे त्यातील २ गुंठे जमिन काकांनी वडिलांची बनावट सही करुन बक्षीसपत्राने सार्वजनिक विहीरीसाठी दिली ग्रामपंचायतीला १९८३ मध्ये दिली.तरी सदर जमिन माझ्या वडिलांना परत मिळू शकते का?
१९८३ पासून आपण काय करत होता ?
वडील हयात असतील तर , फौजदारी तक्रार दाखल करा
NA मिळकत परवानगी शिवाय विभागणी करता येत नाही मात्र आता त्या जागेवर सार्वजनिक विहीर आहे त्याचे काय करणार
आपण त्याची नुकसान भरपाई मिल्ने बाबत दिवाणी दावा दाखल; करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Balaji sawant
22-02-2018
Balaji.sawant44@gmail.com
नमस्कार सर
द्रुतगती महामार्गावरील ज्या जाहिराती असतात त्या जागेवर कोणाचा अधिकार असतो जाहिरात त्या ठिकाणी लावण्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते यासाठी काही रक्कम भरावी लागते का कृपया सविस्तर माहिती देण्यात यावी
Question by अमोल चव्हाण
20-02-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि , आम्ही दोघे भाऊ आमची सामाईक मधील आणेवारी घर मिळकत आहे ,परंतु माझा मोठा भाऊ २००३ ला मयत झाले ,त्यानंतर त्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव ८ अ ला लागले ,पत्नी १६-०२-२०१६ ला मयत झाली ,त्यांना कोणी वारस ,मुलबाळ नाही ,आम्ही ग्रामपंचायतिला अर्ज दिला त्यानी नाव कमी करून दिले व नावापुढे कंस केले परंतु ,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होणार ,आणि ग्रामपंचायत कर भावाच्या पत्नीच्या नावानेच देत आहेत,,८ अ च्या उतार्यावर पूर्ण नाव कधी कमी होण्यासाठी काय करावे लागेल ,कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
मयत व्यक्तीचे नाव कंसात टाकले म्हणजे त्या व्यक्तीचे नाव कमी झाले असा होता .
ग्राम पंचायतीचे निदर्शनास आणून देऊन , घरपट्टी आपले नावावर पाठविण्याबाबत अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पद्माकर राठोड
19-02-2018
padmakarias2017@gmail.com
कोकण -1 व कोकण-2 यांच्या नोटीफिकेशन
Question by pravin mudpe
19-02-2018
spmudpe@gmail.com
sir,mazhya vadilanchya nave vadiloparjit va kahi self acquired jamin aahe.7/12 vadilanchya nave aahet.mazha bhau vatanisathi shetat shetat yevun kame karu det nahi.courtcha manai hukum nastana to shet padun thevanyas sangato aahe.ghari mitwun ghenyas tayar nahi.to asi adavanuk kaydyanusar karu shakato ka? ase karat aslyas amhi kay karave.yacha kaydeshir marg suchavava
१.वडिलोपार्जित जमीन , भावाचे हिस्स्याप्रमाणे त्याचे नावावर करुणदेने आवश्यक आहे .
घरी मिटवून घेण्यास का तयार होणार नाही जर तुम्ही त्यास त्याचे हिस्स्याची जमीन त्याचे नावावर करून दिल्यास .
वडिलांचे स्व कष्टार्जित जमिनीवर त्याचा कोणताही हक्क नाही . अनु कर १ ची पूर्तता करूनही , तो आपणास शेती कास्म्यास अडथळा अनंत असेल तर , त्याचे विरुद्ध The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुमेध गोरे
19-02-2018
sumedhgore@gmail.com
माझे दिवंगत पणजोबांचे नावे इनाम वर्ग ६ब ची जमिन आहे. भुधारणा पद्धती् भोगवटादार वर्ग १ आहे. मागिल वर्षी माझे वडिलांनि त्यावर स्वतःची वारसनोंद करुन घेतली आहे.
सदर जमिनीच्या सात बारा उतार्यावर इतर हक्का मधे कुळाची नोंद असुन ४३ ला् पात्र व इनाम वर्ग ६ ब कुळाची खरेदी घेता येत नाही असे दोन शेरे आहेत.
असे असताना कुळाने ३२ग खाली तीस वर्षापुर्वी अर्ज करुन खरेदी किंमत ट्रेझरी मधे भरली. व आत्ता माझे वडीलांनि स्वतःची वारसनोंद करुन घेतल्या नंतर ३२म प्रमाणपत्रा साठी अर्ज केला आहे.
"एकदा इनाम वर्ग ६ब कुळाची खरेदी घेता येत नाही" असा शेरा असताना तसेच आमचे नावे भुधारणा प्रकार वर्ग १ असताना त्या कूळास असे ३२म प्रमाणपत्र मिळु शकते का...?
त्याची वैधता काय...?
कृपया मार्गदर्शन करावे
Question by राहुल दत्तात्रय जोशी
18-02-2018
joshi0297@gmail.com
सर, जमीन एन.ए करण्यासाठी कोणाची परवानगी आणि किती दिवसात जमिण एन.ए. करता येते.याची सखोल माहिती दया. आणि एन.ए.च्या प्रक्रीयेमध्ये झालेले बदल आणि एन.ए. ची सोपी प्रक्रिया सांगा. आणि त्यासाठी लागणारा खर्च किती येईल याचीही माहिती दया?
आता जमीन NA करण्याची गरज नाही / जमीन NA करणे हि संकल्पना अस्तित्वात राहिलेली नाही . ( नवीन कलम ४२ बी, ४२ क व ४२ ड )
आपण नियोजन प्राधिकरणाकडे बांधकाम परवानगी मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
