जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) पीकपाहणीस नाव लावणे साठी अत्ता अर्ज करता येईल का ,पिकपाहणीस नाव कधी लावता येईल जमीन आम्हीच कसतो आहे,,
२) शेतात सध्या भाजीपाला लागवड केली आहे त्याकरिता पीकपाहणीस नाव दाखल करता येईल का?
कधी पिकपाहिनीस नाव लावता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे नम्रविनंती..
पिकपाहणीस नाव लावणेसाठी , आपण जमीन कायदेशीररितीने कसत असाल तर , अर्ज करता येईल .
जमीन कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , आपल्या कसवणूकीस , जमीन मालकाची तोंडी अथवा लेखी संमती असणे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

आमची जमीन सामायिक आहे आणि या सामायिक जमिनीमध्ये आमचे घर आहे , घरपट्टी आमच्या नावाची आहे तसेच आमची वहिवाट आमची आहे , पूर्वीपासून जमीन आम्हीच कसत आहोत , जमिनीचा दस्त आम्हीच भरत आहोत आणि या सामायिक जमिनीमध्ये काही लोकांनी बेकायदेशीर नावे नोंद केली आहेत सदर गोष्टीला 5० वर्षे झाली आहेत , या लोकांची नावे इतर हक्कांमधून निघून गेली आहेत आणि तसा सरकारमान्य फेरफार आमच्या कडे जुने कागदपत्र काढल्यावर मिळाला त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत पण हे करताना आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे ही विनंती

1) या अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत कमीत कमी समजा दोन वर्ष गेली आणि या दरमयान आमचे पडीक घर जर पडले तर त्या घरावर किंवा घर ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीवर प्रतिवादी अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत स्टे आणू शकतात का

2) अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत पडीक घर जर पडले तर आम्ही परत बंधू शकतो का


3) प्रतिवादी याच्या मुंबईमध्ये राहत असल्याला लोकांचे पत्ते आम्हाला माहित नसतील तर त्यांचे गावचे घराचा पत्ता दिला तर चालेल का
१. नवीन सुधारणेनुसार , अपील दाखल झाल्यानंतर , त्याचा निकाल १ वर्षात देण्याचे बंधन , अपिलाय अधिकारी यांचेवर आहे .
२. आपले नाव ७/१२ सदरी दाखल आहे काय ? आपले नाव ७/१२ सादरी असल्यास , घर जरी पडले तरी आपण ते बांधू शकता .
३. प्रतिवादी यांचे पट्टे उपलब्ध नसल्यास , त्यांना द्यावयाची नोटीस , म.ज .म .अ. च्या कलम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , जागेवर नोटीस बजावणी करण्याची तरतूद आहे . तसेच जमीन ज्या भागात आहे , तेथील जास्त circulation असलेल्या वृत्तपत्रात नतीस प्रसिद्ध करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या जमिनीवर रस्त्यासाठी भुसंपादन झाले आहे ती जमीन आमची मोठे बंधु वहिवाट करतात आम्ही पण त्या जमिनीला वारस आहोत त्याचा मोबदला कसा मिळेल
जमीनजर संपादित झाली असेल तर , आपले बंधू जमीन कसे कसत आहेत ?
वारस असल्यास , आपणास मोबदला मिळेल . मात्र आपले नाव अधिकार अभिलेख सादरी दाखल आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर मनपा. हददीत महार वतन जमीन ७/ ८ वर्षांपूर्वी बिनशेती प्रयोजनार्थ जुन्या शर्तीवर करण्यात आली होती. त्यावेळी चालू बाजारभावाच्या ५०% नजराणा भरण्यात आला होता. आज रोजी सदर जमिनीचा वापर बिनशेतीसाठीं करावयाचा असल्यास चालू बाजारभावानुसार फरकाची रक्कम भरावी लागते का? किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
आदरणीय सर, (अ) ने विकत घेतलेला प्लॉट र.जी. आधारे 1991 मध्ये विकत घेतला व त्याने (ब) ला 1993 मध्ये रजिस्टरी आधारे विकला, तोच प्लॉट (क) ने रजिस्टरी आधारे 1997 ला विकत घेतला, 'अ' आणि 'ब' ह्या दोघांचा फेर झाला नाही, आता 'क' ला फेर चढवायचा आहे या साठी काय करावे लागेल
दोन्ही नोंदणीकृत दस्त व की चा दस्त , सादर करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या मालकीचे क्षेत्र आहे परंतु त्यावर भोगवटदार म्हणुन देवस्थानचे प्रथम नाव आहे तशेच त्या जमिनिला लागुन वनक्षेत्र आहे तरी मला माझ्या नावावर असलेल्या एकुण क्षेत्रापैकी काही आवश्यक क्षेत्र वनखात्याला देऊन वनखात्याची जागा मला शेती व शेती पुरक व्यवसाय व शेतामध्ये ये-जा करण्याकरिता शेत रस्त्याकरिता मिळेल का... त्याकरिता कोणती कार्यपध्द्त आहे काय करावे लागेल ..............
जमीन देवस्थानची आहे . आपण केवळ वहिवाटदार आहेत . त्यामुळे आपणास हि जमीन वन विभागास देता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया,तालुक्यातील mobile tower वसुली बाबत मार्गदर्शन करावे

Question by vikram
15-11-2017
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर ,आपण करीत असलेल्या मार्गदर्शनासाठी खूपच धन्यवाद .मल्ल अशे विचारायचे आहे कि माझे आई आणि दौन बहिणींनी दिवाणी कोर्टात तडजोड होऊन हकासोडपत्र तिघींनि माझ्या नावे जमिनीतील सर्व हक्क सोडला आहे . तसा हुकूम नाव कोर्टात झाला आहे ,पण माझ्याकडून एक चूक झाली कि ती कागद पत्रे तलाठी ऑफिसला नोंदवाली नाही ,त्या मुळे ७/१२ वर त्या तिघींचीच नावे राहिली व आता ती जमीन त्यांनी एकाला विकली आहहे .त्याचा दस्त बनून तो तलाठी यांच्याकडे नोंद करण्या साठी अल्ला आहे .त्याला मी हरकत घेतली आहहे व तो दस्त बेकादेशीर आहहे त्यांची नोंद धरू नये म्हणून विनंती केली आहहे तर तलाठी माझे विनंती मान्य करील का ? मला प्रांत साहेबानी त्याचे आदेश माझ्या विरुद्व दिला आहहे .मी फुडें काय करू कृपया मार्गदर्शन करा हि नम्र विनंती. नोंद धरण्यासाठी किती कालावधी असतो ?ती चूक सुधारू शकतो का ?
१. कोर्टाचे तडजोडनाम्याप्रमाणे , हक्कसोड दस्त नोंदणीकृत केला का ? दस्त नोंदणीकृत केला असल्यास , आपले दस्त अगोदरचा असल्याने आपल्या जमिनीतील हक्कास कोणतीही बाधा येणार नाही .
२. मात्र केवळ कोर्टात तडजोड नामाझाला असेल व हक्क सोड दस्त नोंदणीकृत नसेल तर , आपणास प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करून काही उपयोग होणार नाही .
३. उपरोक्त अनु क्र २ मधील स्थिती असल्यास , आपणास ज्या दस्तांनी आई व बहिणीने तिसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे तो दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी दाखल करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका महिलेने तिची जमीन एका संस्थेला 1975 साली विकली होती आणि काही कारणास्तव खरेदी खत करण्याचे राहून गेल्याने 1985 साली खरेदी खत नोंदणी करण्यासाठी दाखल करण्यात आले तद्नंतर ते खरेदी खत 2015 साली नोंदणीकृत केले पण या दरम्यान त्या महिलचा मृत्यू झाला आणि वारसाने सदरची मिळकत नवर्‍याच्या नावे झाली व त्याने ती तिसऱ्या व्यक्ती ला नोंदणी कृत खरेदी खताने विकली आणि तो खरेदी खत फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी यांचेकडे आलेला असुन त्या फेरफार नोंदी ला त्या मुळ संस्थेने हरकत घेतली आहे
१. २०१५ साली दस्त नोंदवण्यात आला .
२. मात्र त्या पूर्वी महिलेच्या नवऱ्याने ती जमीन , दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे .
३. ज्या व्यक्तीने जमीन विकली आहे ती महिला मयत आहे . त्यामुळे फार काही उपयोग होईल असे वाटत नाही
४. मात्र जर जमिनीचा ताबा , संस्थेकडे असेल , व संस्थेने खरेदी किंमत अथवा त्याचा काही भाग , महिलेस दिला असल्यास , मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५३ अ चा आधार घेऊन न्यायालयात दिवाणी दाखल करून , दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे तो दस्त रद्द करून , संस्थेची मालकी जाहीर करून मिल्ने बाबत दावा दाखल करता येऊ शकेल .
५. चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार -माझा प्रश्न आहे की आम्हाला कुळकायद्याने ३२ ग वर्ग २ ची जमीन १९६५ मध्ये मिळाली आहे ,परंतु चारी बाजूच्या शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे ,आम्हाला मोजणी करायची आहे ,त्यासाठी तालुक्याला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये अर्ज केला होता .परंतु जमिनीच्या गटाचा उतारा मिळाला ,परंतु सर जमिनीच्या फाळणीचे उतारा मिळणार नाहीत ,सापडत नाहीत ,रेकॉर्ड जीर्ण झाले आहे असे सांगण्यात आले ,तर साहेब फाळणीचे उतारे मिळण्यासाठी कुटे अर्ज करावा लागेल,व मोजणीसाठी काय करावे लागेल ,साहेब मार्गदर्शन करा
१. किंमत निश्चित झाली त्याचवेळेस , जमिनीची जोंनी करून घेणे आवश्यक होते .
२. हिस्सा मोजणी नकाशा उपलब्ध नसेल तर , वहिवाटीप्रमाणे , मोजणी केली जाते
३. आपले प्रकरणात , शेजारील खातेदारांनी , अतिक्रमण केले आहे , त्यामुळे ते त्यांनी अतिक्रमित केले क्षेत्र त्यांचे वहिवाटीखाली असल्याचे दाखवणार .
४. शेजारील खातेदार बरोबर चर्चा करून , प्रश्न सुटू शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर दुय्यम सेवा परीक्षा पास असल्यास महसूल अहर्ता परीक्षेला बसण्या करिता 3 वर्ष कनिष्ट लिपिक म्हणून सेवा आवश्यक आहे काय
"अ" नावाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला "ब, क, ड" इत्यादी तीन आपत्ये आहेत. "अ" ने मृत्युपत्र करुन सर्व मिळकत "ड" च्या नावे केली. मृत्युपत्राप्रमाणे संपूर्ण सातबारे "ड" च्या नावाने झाले.
"ब" नावाचा मुलगा मयत झाला, त्याचा मुलाला सदर जागेवर हिस्सा मिळूशकेल का ? त्यासाठी काय करावे लागेल ? सदर जागा ही वडिलोपार्जीत आहे. सदर जागा "ड" च्या ताब्यात आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
हो . ब च्या मुलाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक आहे .
अ ला केवळ त्याचे हिस्स्याला योनीच्या मिळकतीचे मृत्य पत्र करता येते . वरील उदाहरणात , अ त्याची तीन अपत्ये , म्हणजे अ हयात असताना वाटप झाले असे तर , मिळकतीचे ४ हिस्से झाले असते . अ स्वतः , व तीन अपत्यांचा प्रत्येकी १ हिस्सा . अ केवळ एकूण मिळकतीपैकी १/४ हिस्सायचे मृत्यपत्र करू शकला असता .
ब च्या मुलास , त्याचे वडिलांचे हिस्स्यास येणाऱ्या १/४ हिस्सा वेगळा करून मिल्ने व त्याचा ताबा मिल्ने करता , The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र वरील उदाहरणात , अ कधी मयत झाला आहे ?
२००५ नंतर जर मयत झाला असेल व अ ला मुली असतील तर , मुलींनाही हिस्सा देवा लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

A गावातुन B गावचे विभाजन झाले. विभाजन मध्ये A गावा मध्ये पूर्वीचे गावठन समविश्ठ झाले. आणि B गावा मध्ये गावठन नाही. पण B गावात नकाशा मधे पाडे ची नोंद आहे तर त्याना गावठन समजुन या मध्ये इमारत चे बांधकाम करायचे आहे. तर B गावा मधील जे पाडे आहेत त्यांनाच गावठन समजुन त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देणे बद्दल शासन निर्णय आहे का ?
जो पाडा त्यास गावठाण जाहीर करणे आवश्यक आहे .मग त्या नंतर बांधकाम परवानगी ग्राम पंचायत देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) ए कु पुढारी फेरफार आव्हानात करताना सगळे ७/१२ अभिलेख पण अर्जासोबत जोडायचे का?
२) गावातील मुलांसाठी क्रिकेट व इतर खेळ खेळण्यासाठी मैदान हवा आहे तर मैदान मिळणेसाठी काय करावे लागेल?
३) गावातील तलाव दुरुस्त करायचा कारण बांध तुटला आहे, नीट बांधकाम करायचा आहे, तर जलशिवार योजनेअंतर्गत होऊ शकेल तर कुठे अर्ज करावा लागेल आपण योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती .
1. हो
२. जिल्हाधिकारी यांचेकडे ग्राम पंचायतीने अर्ज करावा
३. आपण तहसीलदार यांना भेटून , तलाव दुरुस्त कातणे बाबाबत विंनती करा . सदरचे काम लेबर बजेट मध्ये समाविष्ट करावे लागेल . तसेच त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांनी वर्ष २००४ मध्ये इगतपुरी, जि. नाशिक येथे फ्लॅट विकत घेतला होेता. सदर इमारतीमध्ये एकूण १६ फ्लॅट होते. त्यापैकी फक्त ४ फ्लॅट विकले गेले. दोन वर्षानंतर सदर इमारतीच्या मालकाने इतर (१२ फ्लॅट) दुस-्या व्यक्तीस विकले. त्याने तिस-्या व्यक्तीस विकला. आम्ही जेव्हा सदर व्यक्तीस भेटून आमच्या फ्लॅटची घरपट्टी आमच्या नावावर करून देणेबाबात विचारले तेव्हा त्यांनी नकार दिला. नगरपालिकेत याबाबत विचारले असता तुम्ही त्यांची एन ओ.सी. आणा असे सांगितले. तसेच सर्व फ्लॅटवर सदर नविन मालकाच्या नावाची नोंद नगरपालिकेत झालेली आहे. आता घरपट्टी थकीत राहिल्याने नगरपालिकेतील कर्मचारी सील लावण्याबाबत सांगत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण आपले खरेदी खत नगरपालिकेत सादर करा . अर्ज द्या .
नगरपालिका आपली घर पती लावण्यासाठी तुम्ही ज्याच्याकडून घर घेतले त्याला नोटीस देईल . त्याने प्रतिसाद दिला ठीक . त्याने जर प्रतिसाद दिला नाही तर , घरपट्टी आपले नावावर करणे नगरपालिकेस बंनधन कारक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्याकडे
भोगवटादार वर्ग - २ विविध कायद्या खालील नवीन शर्तीने, वतन खालसा कायद्या नुसार शर्तीस पात्र
इतर अधिकार :-नवीन अविभाज्य शर्त (शर्तीचा भंग -७००) आहे
१) ही जमीन मी विकू शकतो का ?
२) यातील शर्ती मला शासनाच्या कोणत्या निर्णयात मिळतील ?
३) भोगवटादार २ मधून भोगवटादार १ करण्यासाठी शासनास नजराणा भरावा लागेल काय ? असेल तर किती ?

आपल्याकडे कोणत्या वतन कायद्याखालील जमीन आहे त्याचा तपशील विगत करा . म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

7/12 वर आदिवासी जमीन आहे की नाही हे कसे ओलखावे?

एका आदिवसी मित्राची60 एकर जमीन दुर्गम ठिकाणी आहे.
मुख्य रस्त्यापासून काही अंतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची असून काही जमीन वन खात्याची आहे. त्या ठिकाणी एका देवीचे छोटे मंदिर असून आजु बाजुच्या 15 ते 20 गावच्या लोकांची खुप श्रद्धा आहे.

रस्ता नाही मला त्यातील 20 एकर जमीन कृषिपर्यत्न आणि पवन चक्की साठी हवी असल्यास विकत घेता येईल का?
त्या जागेत आधी 40 ते 45 परिवारची आदिवासी वस्ति होती रस्ता नसल्याने त्यांना स्तलान्तर करावे लागले त्यांना परत त्या जागी जायचे आहे.
मला त्या जमिनीत वाट मिळू शकते का?
१. वर्णनावरून जमीन हरित वापर विभागातील आहे . आपण जर शेतकरी असाल तर आपणास जमीन खरेदी करता येईल .
२.आदीवासी व्यक्तीच्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात ३६ अ नुसार शासनाचे परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा असतो .
३. मात्र प्रस्तावित खरेदी करावयाची जागा व रस्ता या मध्ये वन विभागाची जमीन असल्यास , त्यामधून जाण्यासाठी वन विभागाची अडचण येऊ शकते . पक्का रस्ता आपण बंधू शकणार नाही . मात्र वन विभागाचे परवानगीने कच्चा रस्ता वापरू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझा गाव मु.देवपे,ता.पो.मुरबाड,जि.ठाणे या गावचा रहिवासी आहे.
सर मी गेले सन १९५५ सालापासुन एका जागेवर घरल बांधले आहे. त्याच जागेवर माझे भाईबद राहतात. पण 1982 साली माझ्या चुलत आजोबाने तिच जागा माझ्या आजोबाच्या भावाकडुन विकत घेतली. पण आज काही घरगुती वादामुळे मला ते धमकी देतात.कि तुझा घर अतिक्रमण आहे आणि तु ते खाली कर....हे कितपत योग्य आहे.
तर कृपया मला मार्गदर्शन करावे ही विंनती...
१९५५ पासून आपले घर आहे . आपण या जागेचे Adverse Possession तत्वानुसार , जमीन जरी आपल्या भावबंदची असली , अश्या स्थित आपण मालक जाहीर होऊ शकता .
आपले भाऊ बंद आपणास कायदेशीर पद्धतीचा अवलंब केल्या खेरीज जमिनीतून बेदखल करू शकत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पोट खराब (अ) वर्गाची शेत जमीन लागवडीच्या क्षेत्रात बदलण्या ची पद्धत काय? अर्ज कुणाकडे करावा लागेल.
अधीक्षक भूमिअभिलेख

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांचा मृत्यु १९७६ मध्ये व आईचा १९९६मध्ये झाला.त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये असून मुलीचे लग्न १९७५ मध्ये झाले आहे. वडिलांचे नावाने स्वकष्ठीत घर आहे जे त्यांनी १९३० मध्ये विकत घेतले होते. सदर घराची मालकी कुणाकडे जाईल.
घराची मालकी मुलगा व मुलगी या दोघांकडे जाईल .
या ठिकाणी वडील मयत आहे , त्यामुळे हिंदू वारसा कायद्या प्रमाणे , दोन्हीही अपत्यांना घरामध्ये हक्क आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर शेतात जाण्यासाठी शेतकऱयाला जाण्यासाठी पायवाट रास्ता आहे परंतु सादर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी बैलगाडीचा रास्ता पाहिजे तसा रस्ता देता येतो काय किंवा कोणत्या कलमा मध्ये देता येतो
धन्यवाद सर
म.ज.म.अ १९६६ चे कलम १४३
या कलमानुसार तहसीलदार , शेतीवर जाण्यासाठी किती वाजवी मार्गाची आवश्यकता आहे याची पडताळणी करून निर्णय घेणे अपेक्षित आहे .
शेती किफायतशीर कसण्यासाठी शेतीची मशागत करणे , पिकाची वाहतूक करणे या साठी बैलगाडी शेतात घेऊन जाणे आवश्यक आहे .
कलम १४३ वाचा . बैलगाडीचा रस्ता देता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नगर भूमापन हद्दी मधील शेती मिळकती चे मोजणी काम नगर भूमापन अधिकारी कार्यालयांनी केले असल्यास हिस्सा फॉर्म नंबर १२ भरता येतो का? असल्यास कुठल्या नियम प्रमाणे
महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) वहिवाटदार जर कुळ बनला असेल तर त्याविरुद्ध अपील कुठे करावे ?
२) एक व्यक्तीने २००७ साली कुळकायदा घोटाळा करून म्हणजे फेरफार बघितला त्यावर ३२ग ची खरेदी उल्लेख असून दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांचे नाव टाकले , मुळात त्याच्या वडिलांनी कधीच जमीन कसली नव्हती व घोटाळा करून कुळ दाखल केलेले व नंतर रोख पैसे घेऊन ७०ब चा स्टॅम्प पेपर वर
डिकलरेशन वर सही सुद्धा केली आहे पुरावा स्टॅम्प पेपर आहे आमच्याकडे पण २००७ ला परत त्याच्या मुलाने जमीन विकण्यासाठी पेपर मध्ये नोटीस दिली आम्ही त्याबद्दल कोर्टात हरकत सुद्धा घेतली पण २ सुनावणी नंतर त्याने आमच्याकडचे पुरावे बघितले व परस्पर जमीन विकली ह्याच प्रकरणात पिकपाहणी त्याच्या मुलाने लाच देऊन गायब केली पिकपाहणीच उपलब्ध नाही १९४६ पासून आमचेच ताब्यात जमीन आहे, तर त्यांनी ३२म चे प्रमाणपत्र पण नाही घेतले, कोणत्या अधिकाऱ्याची विक्रीसाठी परवानगी सुद्धा नाही घेतली विकलेली जमीन कशी परत मिळू शकते कुठे केस दाखल करावी लागेल, तो व्यक्ती कुळाच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाही व आमच्या कुटुंबातील आहे आमचे १च कुलदैवत आहेत पण आम्हला वंशावळ नाही माहिती ?
३) कुळकायद्यात कुळाच्या व्याख्येत कोणताच कुळ बसत नाही व कुळ व पिकपाहणी ला नाव दाखल केल्यानंतर कधीच नोटीस दिली नाही अशा कुळवहिवाट विरुद्ध कुठे अपील करावे?
४) तलाठ्यांना कुळ दाखल करण्याचा हक्क असतो का?
५) सामनेवाले यांच्याकडे कुळ सिद्ध करणेसाठी कोणते पुरावे लागतील?
आपण योग्य ते मार्दर्शन करावे विनंती.,
आपणास प्रांताधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल
खाडाखोड केली आहे असे आपले म्हणणे आहे .आपण फौजदारी कारवाई हि करू शकता .
तलाठ्यांना कुल दाखल करण्याचा अधिकार नाही
एखादी व्यक्ती कुल आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मामलतदार म्हणजे तहसीलदार यांना कुल कायद्याअंतर्गत आहे
कुळकायद्याचे कलम २(१७) २(१८) व कलम ४ वाचा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय सर
एक व्यक्तीने असा अर्ज केला कि ह्या सर्वे नंबर ची जमीन १२ वर्षांपासून माझ्या कब्जेवहिवाटीत आहे व ह्या जमिनीवर वेग-वेगळ्या प्रकारचे पीक घेत आहे फेरफारामध्ये कोणताही कायदेशीर दस्त नाही अशी नोंद मंजूर करून तलाठ्यांनी ७/१२ सादरी त्यांचे नाव दाखल केले ह्या बद्दल कुठे अपील करावे आपण मार्गदर्शन करावे .,
कब्जावहिवाटीखाली आहे म्हणून जमिनीस नाव लावण्याचा अधिकार ना तलाठी ना तहसीलदार यांना आहे . Adverse - Possession या तवाच आधार घेऊन एखादी व्यक्ती कब्जाहक्काने एखादी जमीन १२ वर्षाहून अधिक काळ कस्त असेल तर त्यास मालक म्हणून घोषित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
जर कोणतीही परवानगी ना घेता कुळकायदा जमिनीची विक्री झाली असेल तर कलम ८४ क क अन्वये तक्रार कुठे दाखल करावी न्यायालयात कि उपविभागीय अधिकारी यांकडे व कोणते पुरावे सादर करावे शर्तभंग झाली हे सिद्ध होण्यासाठी ?
२) ८४क क अन्वये २००७ साली झालेले शर्तभंग त्यामध्ये झालेली जमीन विक्री खरेदीखत रद्द करता येईल का? तर कुठे रद्द करण्यासाठी केस दाखल करावी?
३) ४३ च्या शर्तीस पात्र जमिनीची शर्तभंग झाल्याप्रकरणी? जमीन शासनजमा होईल का? कि मूळ मालकांना परत मिळेल., मार्गदर्शन करावे,;
आपण प्रत्येक वेळेस अनेक प्रश्नांची उत्तरे देतात त्यामुळे आम्हाला जमीन परत मिळवता येईल आदरणीय श्री किरण पाणबुडे सर आपणास व संजय कुडेटकर सर आपणास साष्टांग नमस्कार मनापासून आभारी ..
८४ k खाली कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत . आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
८४ क क च्या नवीन सुधारणेनुसार , खरेदीदारास दंडाची रक्कम भरून , त्याचा अवैध व्यवहार नियमित करू शकतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3