जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रोहिदास सखाराम पाबळे
10-09-2017
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर,
तुकडेबंदी कायद्यविषयी परिपत्रक किंवा जी आर असल्यास मिळावा निवासी झोन मध्ये २ आर किंवा ३ आर चा दस्त नोंद होतो का
निवासी जमीन वापर विभागास ( झोन ) तुकडेबंदी कायदा लागू नाही . नवीन शासन कायदे दुरुस्तीनुसार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश मुळे
10-09-2017
shivkantgirhe1@gmail.com
आदरणीय सर,
नमस्कार ग्रामपंचायत चा असेसमेंट उतारा (नमुना न. 8 ) हा मालकी पुरावा असतो का ?मला एक घर विकत घ्यायचे आहे पण त्या घराच्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड नाही सर्वे झाला आहे पण घर मालक हे मुल मालक असून त्यांची ग्रामपंचायत ला १९७७ पासून नोंद आहे .
फक्त नमुना न 8. वर खरेदी खात केल्यास काही अडचण येणार नाही ना? मी कायद्याने त्या जागेचा मालक होईल कि नाही ? कृपया माहिती द्यावी
ग्रामपंचायत चा अससेसमेंट उतारा हा मालकी पुरावा नाही . तो केवळ कर भरण्याकरता चा नमुना आहे
खरेदी खत हे मालकी पुरावा आहे
खरेदी पूर्वी पेपर नोटीस द्या
Title Search रिपोर्ट घ्या
मगच खरेदी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
08-09-2017
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माझी शेतजमीन कोरेगाव तालुक्यात आहे माझा प्रश्न आहे कि आमचा गट नं ३७३ आहे,आमच्या शेतातून ग्रामपंचायत कडून पानंद रस्त्याचे काम चालू आहे ,परंतु साहेब सदर रस्ता आमच्या जागेतून जास्त जात आहे ,शेजारील शेतकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाही ,तरी ग्रामपंचायतिने रस्त्याचे काम सुरु केले आहे ,आमचे जास्त नुकसान होत आहे ,ग्रामपंचायतीला सांगून सुद्धा कि भूमापन क्र सिमारेसेवरून रस्ता काढण्यात यावा परंतु ,ग्रामपंचायत व गावातील पुढारी यांनी काम चालू ठेवले आहे,पानंद रस्त्याला आम्ही अडवणूक केली नाही ,पानंद रस्ता आम्हाला सुद्धा हवा आहे ,परंतु आमचे जास्त नुकसान होत आहे ,यावर काय करावे ,
कृपया मार्गदर्शन करावे
हि विनंती
गावनकाशावर पाणंद रस्त्याचे जेवढे क्षेत्र ( Alignment ) आहे त्याप्रमाणे ग्राम पंचायत तेवढ्या रुंदीचा रस्ता तयार करू शकते . पाणंद रस्त्याचे रुंदीपेक्षा पंचायत जाडा रुंदीचा रस्ता तयार करू शकत नाही . जर तुमच्या जागेतून रस्ता तयार केला तयार , प्रथम पंचायतीस , तुमची तेवढी जागा संपादित करावी लागेल व त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल .
मात्र तुमच्या जागेतून रस्ता न जाता , जमीन खोदाई या मुले नुकसान होत असेल तर , पंचायतीने , जमीन पूर्ववत करून देणे आवश्यक .ग्राम पंच्यातीस त्या बाबत मागणी करा . आवश्यकते प्रमाणे , आपणास न्यायालयात हि जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vinayak
06-09-2017
vibhutevm@gmail.com
भो व २, आदिवासी किंवा इतर कोणत्याही शर्त असलेल्या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँक प्राधिकृत अधिकाऱ्याच्या परवानगी अथवा ना हरकती शिवाय कर्ज देऊ शकते का
नाशिक जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार बँकांना वर्ग २ व आदिवासी जमिनीवर कर्ज देण्याच्या सूचना आहेत
भविष्यात कर्ज थकल्यास वसुली वेळी बँक अशा जमिनी जिल्हाधिकारी पूर्वपरवानगी शिवाय विक्री करू शकते का
वर्ग २ व आदिवासी खातेदार यांची जमीन सक्षम प्राधिकाऱ्याचे परवानगीशिवाय , विक्री , गहाण अथवा अन्य मार्गाने हस्तांतरण करता येत नाही .मात्र आताचे कर्ज माफीचे अनुषंगाने , जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त परिपत्रक काढले आहे . भविष्यात , कर्ज थकल्यास , बँक जिल्हाधिकारी / शासन यांची परवानगी घेऊनच , विक्री करू शकतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sharadchandra wani
06-09-2017
sd_wani@rediffmail.com
नमस्कार सर, माझी जळगाव ज़िल्हायात शेत जमीन आहे. माझे धारण क्षेत्र ०.८४ आर + ०.०३ आर पोट खराब (अ वर्ग ), परंतु या संपूर्ण गटात कुठेही पडीत किंवा नापीक क्षेत्र नाही. संपूर्ण ०.८७ आर क्षेत्र लागवडी खाली आहे. महोदयास विनंती कि हे ०.०३ आर पोट खराब (अ वर्ग ) क्षेत्र लागवडीच्या क्षेत्रात ७/१२ उतरल्यावर परिवर्तित करता येईल काय? जर करता येत असेल तर त्याची कोणती पद्धती आहे. हया संबंधी संपूर्ण मार्गदर्शन व्हावे हि महोदयास विनंती.
Question by सागर माणिक पाटील
02-09-2017
sagar.brfl@gmail.com
सर ,
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर दिनांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय
१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .
२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .
३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .
४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का ?
५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .
६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का ?
सर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.
.
आपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .
१. एकूण क्षेत्र किती होते ?
२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले ?
३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले ? पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही ?
४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का?
उपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून
पाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .
जमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मोहन शिंदे
31-08-2017
kalyanip8855@gmail.com
नमस्कार सर,
मला दोन प्रश्न विचारायचे आहेत
1.माझे गावात वडिलोपार्जित घर आहे त्या गावाचा सिटी सर्वे झाला असून माझे किवा वडील,आजोबा यांचे प्रॉपर्टी कार्ड ला नोंद नाही जागा गावाच्या मधोमध आहे व हि जागा वडिलोपार्जित असून कोणाचीही खरेदी केलेली नाही जर प्रॉपर्टी कार्ड दुसर्याच्या असेल तर काही अडचण येणार नाही ना ?
३० वर्षापासून जागा आमच्या ताब्ब्यात असून तिथे आमचे घर आहे व ग्रामपंचायत ला नोंद पण आहे पूर्वीपासून
2. आमचा तालुका असून मागच्या वर्षी ग्रामपंचायत ची नगर पंचायत झाली असून सिटी सर्वे होत असतो का आणि नवीन सर्वे झाला तर आमचे नाव येऊन जाईल ना १९८१ पासून सर्वे झालाच नाही गावात.सिटी सर्वे किती वर्षाला होत असतो ?
सिटी सर्वे झाला असेल तर , पुन्हा सर्वे होण्याचा प्रश्न उद्भवत नाही . मिळकत पत्रीकेस आपले नाव दाखल नसल्यास आपण , जिल्हा अधीक्षक भूमी अंबिलेख यांचेकडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवा
31-08-2017
shivkantgirhe@gmail.com
नमस्कार सर,
सिटी सर्वे किती वर्षातून एकदा होत असतो आणि त्यात नमुना नंबर 8 वरून दुरुस्त्या होतात का ?
एखाद्याचे सिटी सर्वे ला नाव नाही पण नगर परिषद ला नमुना न.८ वर आहे अशा प्रकरणात याचा सिटी सर्वे वर नाव आहे तो व्यक्ती गैर फायदा घेऊ शकतो का ? सदरील जागा वडिलोपार्जित असून 27 वर्षापासून आमच्या ताब्यात व नमुना न.8 ला नावावर आहे. please हेल्प
सिटी सर्वे एकदाच होतो . जर मिळकतीस , आपले नाव दाखल नसेल तर आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज दाखल करा . मात्र , सिटी सर्वे झाल्यापासून आज पर्यंत काय केले ? म्हणजे झालेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल . तसेच आपला विलम्बमाफ होणे हे महत्वाची बाब आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yash Waghmode
31-08-2017
yash.waghmode101@gmail.com
नमस्कार सर !...
श्री किरण पाणबुडे सर आपणांस दूरध्वनीवरून संपर्क साधण्याची परवानगी मिळावी . व आपला वेळ दूरध्वनी क्रमांक मिळावा .हि नम्र विनंती .
९९२१७११९९९
हा नम्बर whatsapp साठी हि आहे . आपण त्या द्वारे हि माझ्याशी संपर्क साधू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मोमीन झ मी
29-08-2017
shanmomin1989@gmail.com
सर, माझ्या आणि माझ्या शेजाऱ्या मध्ये म्हाडा ची एक सामायिक भिंत आहे. काही दिवस पूर्वी माझ्या शेजारीने त्याचे घर बांधकाम करण्यासाठी काढले. त्या वेळेस त्याने आम्हाला सामायिक भिंत पडून परत एक नवीन भिंत बंधू असे बोले पण आर्थिक आणि वेळे च्या अडचणी मुळे आम्ही ती नाकारली. आणि त्याला सामायिक भिंत वापरण्यास सांगितले. पण त्याने नवीन भिंत घेतली आणि त्या वेळेस मुंडेरीचा भाग तोडला. आता माझ्या घराच्या भिंतीत पाऊसच पाणी येतोय आणि भिंतीच मजबुती कमी झाली. शेजारी आता आम्हाला दुरुस्ती पण करू देत नाही आणि सामायिक भिंती चे पैसे मागतोय.
रेजिस्त्री अनुसार सामायिक भिंत कोणी तोडू शकत नाही आणि हक्क पण दाखवू शकत नाही. आम्ही त्याला हे लक्षात आणून दिले पण तो काही ऐकत नाही आणि पैसे साठी अडून बसलाय.
आम्हाला एक इंच सुद्धा मिळाली नाही आणि तो ती सामायिक भिंत विकत घ्या म्हणून मागे लागलाय. भिंती मध्ये पाणी शिरल्या मुळे भिंत कमकुवत झाली आहे आणि त्या मुळे माझ्या कुत्म्बाला जीवाचा धोका आहे. मला सामायिक भिंतीतली त्याची जागा विकत घ्यायची नाही ये आणि दुरुस्ती करायची आहे. तर मी आता काय करू. Please advice मी.
आपण ज्या क्षेत्रात राहतात त्या म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार देऊ शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दाजी करे
29-08-2017
dajikare@gmail.com
सर नमस्कार
माझ्या वडिलांच्या नावे एकाच तालुक्यात दोन गावात जमीन आहे व वडील वारल्यानंतर वारसनोंदी आईच्या प्रतिज्ञापत्राद्वारे केल्या दोन्ही गावाचा एकच तलाठी असल्यामुळे एकाच प्रतिज्ञापत्रातून दोन्ही गावाचा उल्लेख करून त्या तलाठ्याकडे ते सर्व कागदपत्रे जमा केली पण त्या तलाठ्याने एकाच गावातील जमिनीवर वारसनोंद केली पण दुसऱ्या गावातील जमीन हि वडिलांच्याच नावावर आहे वारस नोंद झालेली नाही तर मी आत्ता त्या जमिनीवर वारसनोंद करण्यासाठी काय करू कृपया मार्गदर्शन करावे.
एका गावातील वारस नोंद करून दुसऱ्या गावातील वारस नोंद तलाठी नाकारू शकत नाही . आपण हि बाब तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
एका गावातील वारस नोंद करून दुसऱ्या गावातील वारस नोंद तलाठी नाकारू शकत नाही . आपण हि बाब तहसीलदार/ प्रांत अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
28-08-2017
rahul9619309796@gmail.com
आमची वडीलोपाजीत सामाईक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझे आजोबा व त्यांचे ५ भाउ असे ६मुख्य हीसेदारहोते या आमच्या सर्व आजोबांचे निधन झल्या नंतर वारस तपासणी होऊन त्यांच्या सर्व लहान थोर वारसादारांची नावे सात बारा वर लागलेली आहेत, त्याजमिनीतील ४ गुंटे जमीन आम्ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावाला बक्षीस देणार आहोत,सात बारावर जेवढी नावे आहेत त्यानी सर्वानी बक्षीस पत्रावर साही करणे जरूरी आहे काय की मुख्य ६ हीसेदार साही करू शकतात काय, तसेच या सात बारावर काही १८ वर्षा खालील मुलांचीही नावे आहेत तर त्यांचीही साही लागेल काय याची आपण माहिती देणे. धन्यवाद
मिळकत वडिलोपार्जित असल्याने , आजोबांपासून ४ पिढ्या यांचा या मिळकतीत प्रत्येकाचे जन्मापासून हक्क आहे . त्यामुळे सर्व Coparcener यांच्या वाक्षरया आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin dhere
24-08-2017
dheres91@gmail.com
सर मी लागवड योग्य जमिन 22 गुंठे खरेदी केली आहे. पण मंडळ अधिकारी यांनी तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग नोंद रद्द असा शेरा मारला आहे. तर सर फेर नोंद धरण्यासाठी काय करावे
आपण ज्या जिल्ह्यात राहतात , त्या जिल्ह्याचे बागायत , जिरायत व एकपिकी क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र किती आहे याची माहिती घ्या .
बहुतांशी जिल्ह्यात खालील प्रमाणभूत क्षेत्र आहे
बागायत - ५ गुंठे
एकपिकी -१५ गुंठे
जिरायत २० गुंठे प्रमाण
तुकडेबंदी कायद्याचा भंग होईल असे वाटतं नाही .
या शिवाय , प्रश्नाधीन जमीन , रहिवासी , औद्योगिक , वाणिज्य जमीन वापर क्षेत्रात ( झोन) मध्ये असल्यास , त्या क्षेत्रास , तुकडेबंदी कायदा लागू होत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
23-08-2017
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
शासन निर्णया नुसार शासनाने मूळ मालकांच्या नावे पूर्वी असणाऱ्या जागेला सरकार चे नाव लावून मूळ मालकांचे नाव रेघे खाली लावले असेल, तर अश्या जमिनी मूळ मालकांच्या नावे होतील त्या बाबत माहिती मिळावी -
१. सरकार चे नाव लावून मूळ मालकांचे नाव रेघे खाली लावले असेल तर मिळू शकते का?
२. मूळ मालकाचे नाव कमी करून जर मुलकी पड अशी नोंद असेल तर मिळू शकते का?
३. ४ ते ५ मालक आहेत व एका मालकाने त्याच्या हिस्श्या च्या जागेचे ६ पाठीची रक्कम काही काळ भरली व बाकीचे हिसेदारानी त्याच्या हिस्श्या ची रक्कम न भरल्याने ज्या मालकाने ६ पाठीची रक्कम भरली त्यांनी ती परत मागितली असेल तर त्यांना आताच्या निर्णयाचा लाभ मिळेल का?
४. शासनाचे नाव लागून शासनाने जर ती कुळांच्या नावे केली असेल, तर अशी जमीन मूळ मालकाला मिळू शकते का?
कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
राजे ,
कोणत्या शासन निर्णयाने जमीन शासनाचे नवे दाखल झाली आहे ? कृपया ७/१२ वरील सर्व फेरफार पाहिल्यास आपणास जमिनीची इतंभूत माहिती मिळेल . त्या माहितीचे आधारे , मूळ मालकांना जमीन परत मिळेल कि नाही हे कळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
23-08-2017
swati.swami@yahoo.com
३ वर्षाची रजा कर्मचारी यांना घेता येईल का ? कोणत्या नियमानुसार कृपया मार्गदर्शन व्हावे .
Question by दिनेश निकम
22-08-2017
dfn1106@gmail.com
सर,
आपले शतशः आभार. आपण हि वेब साईट काढली व गरजू लोकांनां मदत करता.
मी शासकीय कर्मचारी असून मला तहसील मधून माझे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढायचे आहे. माझी ग्रॉस सॅलरी गृहीत धरतील कि फक्त बेसिक.का करपात्र उत्पन्न ?
उत्पन्न दाखल्यासाठी ग्रॉस सॅलरी गृहीत धरली जाते .
मात्र त्याचा वापर प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबत आपले पाल्यासाठी दाखला मिळण्यासाठी करण्याचा असेल तर , पगारापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दाजी करे
21-08-2017
dajikare@gmail.com
नमस्कार सर
माझ्या सावत्र आईचा मृत्यू २३-१०-२०१६ रोजी झालेला आहे आणि मृत्यूची नोंद करणे राहून गेले आहे. तरी कृपया आत्ता नोंद करण्यासाठी काय करावे लागेल व मृत्यू झाल्यापासून किती दिवसात नोंद करावी लागते याविषयी मार्गदर्शन करावे.
Question by सचिन गणेश धनमाने
21-08-2017
sachinpapa@gmail.com
माझ्या आजोबाच्या नावने असलेली जमीन डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड कॉलेज साठी जमीन इ.स १९९२ मध्ये संपादित केलेली आहे तर मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का ?
जर मिळेत असेल तर काय करावे लागेल
जमीन संपादन करताना त्या वेळचा पुनर्वसन कायदा १९८६ लागू केला असेल तर आपणास प्रकल्प दाखला मिळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
20-08-2017
shankarnkakde@gmail.com
महोदय सर
३२ ग नुसार जमिनीची किंमत ठरल्या नंतर ती रक्कम कोणाला मिळते जमीन मालकाला मिळते का ?
जर जमीन मालकाला मिळत असेल तर आमच्या बाबतीत असा झाला आहे कि आमचे मालक म्हणून नाव कमी करण्यात आले आहे. व फेरफार मध्ये कारण दिले आहे कि कलम ३२ ग नुसार खरेदी करून मालकांची नावे कमी करण्यात आले आहे. परंतु आम्हाला मालक म्हणून कोणतीही रक्कम मिळालेली नाही व मालक म्हणून ३२ ग दाव्याची नोटिसा सुद्धा आलेली नव्हती तर या प्रसंगी काय केला पाहिजे ?
३२ ग ची रक्कम मूळजमीन मालकांनाच मिळते . रक्कम मिळाली नसल्यास आपण , शेत जमीन न्याय्यधिकरण म्हणजे , तहसीलदार कार्यालयात , संपर्क साधा . आपणास निश्चित रक्कम मिळेल .
हि रक्कम जमीन शेत साऱ्याच्या जास्तीत जास्त २०० पट असते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dattatray
18-08-2017
gavadedatta@yahoo.com
Namaskar Sir,
Mi kul Kayda Kalam 32 antargat case 21/11/2015 roji dhakhal keleli ahe. Hi case 6/4/2017 roji nikali kadanyasathi tahsildar sahebanni band keli parantu adyap nikal dilela nahi. Tar case nikali kadnyasathi kahi kalavadhi ahe ka?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत , दाखल अपील प्रकरणाचा निकाल १ वर्षात ( प्रकरण दाखल झाल्यापासून ) देणे आवश्यक आहे . आपला कुळकायदा कलम ३२ ग अंतर्गत दावा आहे . त्यास जमीन महसूल कायद्याच्या तरतुदी लागू नाहीत . मात्र शासने मा उच्च न्यायालयात अर्धन्यायिक प्रकरणात अनुसरायच्या कार्य पद्धतीबाबत शपथ दाखल केले आहे . शासनाने या बाबत , तीच कार्यपद्धत अनुसरणे बाबत निर्देश दिले आहेत . ते निर्देश कुल कायद्या खालील प्रकरणास लागू आहेत .
या निर्देशानुसार प्रकरण बंद झाले पासून ४ आठवड्यात निकाल देणे आवश्यक आहे . एप्रिल मध्ये प्रकरण बंद होऊन हि निकाल दिलेला नसल्यास , आपण हि संबंधीत बाब प्रांताधिकारी / जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
17-08-2017
rahul9619309796@gmail.com
आमची वडीलोपाजीत सामाईक जमीन आहे. या जमिनीमध्ये माझे आजोबा व त्यांचे ५ भाउ असे ६मुख्य हीसेदार होते या आमच्या सर्व आजोबांचे निधन झल्या नंतर वारस तपासणी होऊन त्यांच्या सर्व लहान थोर वारसादारांची नावे सात बारा वर लागलेली आहेत, त्या जमिनीतील ४ गुंटे जमीन आम्ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावाला बक्षीस देणार आहोत,सात बारावर जेवढी नावे आहेत त्यानी सर्वानी बक्षीस पत्रावर साही करणे जरूरी आहे काय की मुख्य ६ हीसेदार साही करू शकतात काय, तसेच या सात बारावर काही १८ वर्षा खालील मुलांचीही नावे आहेत तर त्यांचीही साही लागेल काय याची आपण माहिती देणे. धन्यवाद
सर्वांची संमती आवश्यक आहे . कारण मिळकत वडिलोपार्जित आहे . अश्या वडिलो पार्जित मिळकतीमध्ये , पुढील ४ पिढ्यांना जन्मताच मिळकतीत हक्क आहे . वाटणी न झाल्याने , नक्की कोणाचे हिस्स्याची जमीन मंदिरासाठी जात आहे हे निश्चित नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय
16-08-2017
gavadedatta@yahoo.com
मा महोदय,
मी कुळ कायदा कलम ३२ अंतर्गत केस दाखल केलेली आहे. हि केस निकाली काढण्यासाठी मा तहसीलदार हवेली यांनी दि. ०६/०४/२०१७ रोजी बंद केली. परंतु ४ महिने गेल्यानंतरही केसचा निकाल काही दिला गेला नाही. तरी कृपया मला मागर्दशन करावे कि , केस निकाली काढण्यासाठी काही कालावधी असतो का? , यासाठी मला कोणाकडे दाद मागावी लागेल?
जमीन महसूल ( सुधारणा ) कायदा २०१६ नुसार , अधिकार अभिलेख व जमीन महसूल कायद्या अंतर्गत असलेली अपील प्रकरणे १ वर्षाचे आत निकाली काढणे बंधन कर्क आहे .
आपली केस , कुल कायद्याअंतर्गत आहे व ती अपील नसून , दावा आहे . त्यामुळे वरील तरतूद आपली प्रकरणी लागू होणार नाही . तथापि , अर्धन्यायिक प्रकारणांबाबत , शासनाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार , प्रकरण बंद झाल्यापासून , ३-४ आठवड्यात निकाल देणे आवश्यक आहे . आपले प्रकरणांत , ५ महिना कालावधी होऊन गेलेला आहे . त्यामुळे निकाल देणे आवश्यक आहे . हि बाब आपण माँ. जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून द्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक पवार सहायक कार्यकारी अभियंता, परभणी
16-08-2017
ashokpawar97@gmail.com
शासन च्या सिंचन प्रकल्प काम साठी केले गेलेल्या भूसंपादन पोटी चुकून जास्ती दिला गेलेला मावेजा शेतकर्या कडून वसूल करण्याची पद्धत काय आहे ?
होय.
Section 17 -3 (B ) ऑफ The Land Acquisition Act (3B) The amount paid or deposited under section (3A), shall be taken into account for
determining the amount of compensation required to be tendered under section 31, and where
the amount so paid or deposited exceeds the compensation awarded by the Collector under
section 11, the excess may, unless refunded within three months from the date of Collector's
award, be recovered as an arrear of land revenue
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश kahare
16-08-2017
rajeshkahare@gmail.com
सर भो .वर्ग २ चे जमिनीचे नोंदणीकृत मृत्युपत्र आहे .परंतु त्याचा अंमल होण्यापूर्वीच वारसाचा फेरफार झाला .सदर मृत्युपत्र धारकाने तक्रार दाखल केली कि मला सदर मृत्यूपत्राचे आधारे माझ्या नावाने नोंद होणे बाबत आदेश व्हावा .त्यानंतर कुटुंबातील सर्व लोकांनी आपसी करून सदर नोंदणीकृत मृत्यूपत्रा फेरफार न घेता १००/- स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणीपत्र केले व त्याच वाटणीपत्रात दोन बहिणी व एक भाऊ यांचा हक्क सोडल्याचा लेख आहे .या सर्वांना केलेले वाटणीपत्र व हक्क सोडल्याचा लेख यावर फेरफार होणेबाबत आदेश आपल्या कार्यालयाकडून पाहिजे आहे
मृत्यपत्र कोणी केले आहे व त्यास शासनाने जमीन प्रदान केली होती का त्यास वारसाहक्काने (प्रदान) जमीन प्राप्त झाली होती ?
जर शासनाने ज्यास जमीन प्रदान केली होती त्यानेच जर मृत्यपत्र केले असेल तर , मृत्यपत्राची नोंद होणे आवश्यक . मात्र जर जमीन वारसाहक्काने प्राप्त झाली असेल तर , coparcenry मधील केवळ त्याचे हिस्स्यापुरते , असा मयत इसम त्याचे हयातीत मृत्यपत्र करू शकतो . उर्वरित क्षेत्राचे वाटप वारस हक्कानेच होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कांबळे अ वि
15-08-2017
9730302091myself@gmail.com
महार वतन संदरभात माहिती हवी आहे .
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
