जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रवि मेंडके
23-06-2017
aumendke@gmail.com
नमस्कार सर
मला सेतसंधी इनाम म्हणजे काय ?सेतसंधी इनाम जमीनीची खरेदी कश्याप्रकारे करता येते? नविन शर्त म्हणुन शेतीसाठी जमीन खरेदीस परवानगीची आवश्यकता आहे का?
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
23-06-2017
ngpatil@rcfltd.com
नमस्कार साहेब- माझा प्रश्न असा आहे कि सम्भाव्य बिनशेति जर असेल तर ग्रामपंचायत परवानगीने छोटे प्लॉट पाडू शाकतात का? व जर तशी परवानगी नसेल तर मग शासन खरेदीविक्री करतांना बिनशेतिच्या दराप्रमाणे स्टाम्पडुटी वसूली का केली जाते?
नाही
आपणास जिल्हाधिकारी यांची विकास परवानगी घेणे आवश्यक
मुन्द्रानक शुल्क , बिनशेती दराने द्यावे लागणार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिलकुमार शिंदे
23-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
महाराष्ट्र खाजगी वन कायदा अन्वये चौकशी चालू आहे . या कायद्या अंतर्गत ,(३०.८.७५ ) वन सदृश्य जमीन १२ हे वरील , शासनास नाहीत होते व १२ हेक्टर चे आतील क्षेत्र खातेदारास परत करण्यात येते . दि . ३०.८ ७५ रोजी सध्याचे मालकाचे नावावर किती क्षेत्र होते ?
१२ हेक्टर वरील क्षेत्र शासनाकडे नाहीत होणार आहे . त्या अनुषंगाने निर्णय घ्या .
सध्या स्थितीत आपण खरेदी करू शकता परंतु वरील श्यक्य अधीन राहून व परिणाम स्वरूप
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनिलकुमार शिंदे
23-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब
बांधकामाबाबत शासनाच्या कोणत्याही परवानगी नसताना गृहनिर्माण संस्था नोंदणी कर्ता येते का ? नोंदणी बाबत गृहनिर्माण संस्थेने जमीन विकत किंवा भाडे तत्वावर घेतली नाही. बिन शेती आदेश झालेले नाहीत. विकास आराखडा महानगर पालिकेने मंजूर केला नाही. यू.एल.सी ची परवानगी घेतली नाही. संस्थेने बांधकाम केले नाही. त्याचे वितरण संस्थेने केले नाही. संस्थेमधील रूम (खोल्या ) , सदनिका नोंदणीकृत केल्या नाहीत. संस्था नोंदणी निबंधकाने संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र दिले आहे. नोंदणी प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असे आहे. व त्याचे वर्गीकरण भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था असे आहे. महानगरपालिकेची घरपट्टी ,पाणीपट्टी , लाईट बिल सभासदांच्या नावे येत आहे. संस्थेच्या नावे येत नाही. पूर्वी एका विकासकाने जमीन मालकांकडून विकासकरार व कुलमुखत्यार पत्र करून घेतले आहे. ते साध्या स्टॅम्प पेपर वर केले आहे. ते नोंदणीकृत केलेले नव्हते. जमीनीचे मालक मयत झाल्यावर जमीन मालकच्या वारसांनी दुसर्या विकासकास जमीन नोंदणीकृत कन्व्हेंस डिड करून विकली आहे. आता संस्थेला संस्थेच्या सातबारा नावे करावयाचा आहे. तो सातबारा संस्थेच्या नावे होईल का ? संस्थेचे रि डेव्हलपमेंट करण्यास संस्था पात्र आहे का ? कृपया मार्गदर्शन मिळावे
Question by Anil Ayanna Chalmal
23-06-2017
anil.chalmal@sil.sharp-world.com
I am Originally from AP (weaver Community) and Born on 1.8.66 and brought up in Maharashtra. My caste is mentioned as Koshti instead of Thogati (Sub-caste in Weaver Community) In Maharashtra Caste list it is mentioned as Thogati sr.No. 161. I have only caste certificate issued by our community. Now I request you to how I can get Thogati Caste Certificate? Request you prompt reply.
Question by anand salve
23-06-2017
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , मी आमच्या जमिनीचा ऑनलाइन फेरफार पहिला त्यावर प्रवलंबीत फेरफार नं ४६९१ असे दिसत आहे याचा अर्थ काय आहे त्याबद्दल काही माहिती हवी असल्यास काय करावे ?
सदर फेरफार हा त्या उताऱ्यावरील असून तो मंजूर झालेला नाही ...तलाठी कार्यालयात जाऊन तो फेरफार आपण पाहू शकता
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by रविन्द्र
22-06-2017
ravindrakhekade@gmail.com
दुसरी वेळ
मा.सर
सर आमचे गावामध्ये सन १९७१-१९७२ मध्ये सिंचन तलाव तयार झालेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात आलेली आहे.तलाव पूर्ण झालेनंतर जवळपास ४०-५० हेक्टर जमीन शिल्लक राहीलेली आहे.अतिरिक्त जमीनीचा वापर ३ वर्षात होऊ शकला नाही व पुढील १० वर्षात होणार नसेल तर त्या अतिरिक्त जमिनी जिल्हाधिकारी यांचेकडे सुयोग्य मोबदला घेऊन वर्ग करणेबाबत चा म.शा.प.दि.२६/०७/२००२ मध्ये नमूद केलेले आहे.
सदर जमीन १९७१-१९७२ मध्ये संपादित केली त्यावेळी मूळ मालक अन्य व्यक्ती होत्या पण सन १९८५ पासून ०१ हे.60 आर जमिनीवर वहीती माझे आईची आहे आहे व सन १९९५ पासून सदर जमिच्या पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे माझेआईकडे आहेत.सदर जमिनीला लागून नदी असल्याने नदीमुळे अतिरिक्त जमीन तयार झाली असून ति 60 आर चे आसपास आहे सन २०१० पासून माझी आई एकूण ०२.हे २० आर जमीनिची वहीती पाटबंधारे विभागाकडून वार्षिक करार नाम्यानुसार पावत्या व करारनामे करून वहीती करीत आहे.
वरील पद्धतीने माझे आई कडे जमीन वाहितीत आहे.म.ज.म.अ.१९६६ चे खंड 1 मधील प्रकरण ३ मधील भाग तीन मधील नियम १० ते २१ प्रमाणे माझी आई मा.तहसीलदार यांचे मार्फत जमीन मिळणे बाबत अर्ज सादर करू शकेल काय आणि जमीन ७ किव्वा १२ प्रमाणे मिळू शकेल काय.तसेच सादर जमीन देणे बाबतचे अधिकार कोणाला आहेत.कृपया याबाबत मार्गदर्शन होनेस विनंती आहे
१.६० हे आर क्षेत्र आपण पाटबंधारे विभागाकडून भाडे कराराने आपली आई कसत आहे . या क्षेत्राचे लागत ६० आर क्षेत्र मलई क्षेत्र निर्माण झाले आहे . मात्र पाटबंधारे विभागाकडील क्षेत्र आपली आई भाडे कराराने कसत असल्याने ते क्षेत्र आपले मालकीचे होऊ शकत नाहीय . पर्यायाने मलई क्षेत्र आपणास मिळू शकत नाही . मलई क्षेत्र लगतचे खातेदारास केवळ मिळू शकते . या प्रकरणात , लगतचे खातेदार , पाटबंधारे विभाग आहे . आपण नाही .
जे क्षेत्र संपादन प्रयोजनासाठी पाटबंधारे विभागाने उपयोगात आणले नाही , ते कसेंटरची विक्री लिलावाने करावयाची आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dipak Dabhade
21-06-2017
dipak1may1989@gmail.com
सर आम्ही जागेअभावी ग्रामपंचायत जागेवर गावठाणात घर बांधलेले आहे नियमानुसार ते अनधिकृत आहे ते नियमित करण्यासाठी आम्ही दंड भरण्यास तयार आहोत, सदर अतिक्रमण रासत्यपासूनपन 1000 फुटावर आहे कुणालाही त्याचा त्रास नाही, नियमित करण्यासाठी कुणाकडे अर्ज करावा लागेल, कृपया मार्गदर्शन मिळावे
ग्राम पंचायत ती जागा देण्यास तयार असणे आवश्यक आहे
जिल्हा परिषद या बाबतीत निर्णय घेऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
21-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A नावाच्या व्यक्तीच्या जमीनीच्या ७/१२ वर फक्त A चे नाव आहे, त्याचा B नावाचा लहान भाऊ याने हक्कसोड पत्र लिहून दिलेले होते म्हणून त्याचे नाव ७/१२ वर नाही. मग आता त्या व्यक्तीचा लहान भाऊ त्या जमीनीच्या ७/१२ वारस म्हणून माझे नाव नोंदविण्यात यावे म्हणून तलाठी साहेबांना अर्ज केला तर नाव नोंदविण्यात येईल काय ? याबाबत योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
21-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीने आपल्या वडीलोपार्जीत मिळकतीवरील आपला हक्क हक्कसोड पत्राव्दारे जर सोडून दिला तर सदर व्यक्ती त्या मिळकतीवर आपला हक्क पुन्हा दाखवू शकतो का सर ? याबाबत योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
Question by राकेश
20-06-2017
r.kakare@gmail.com
संरक्षित कुळ म्हणजे नक्की काय, सविस्तर सांगावे.
7/12 ला संरक्षित कूळ एकाच व्यक्ती च नाव असेल आणि 10-12 वर्ष्यानी एकत्र कुटुंबातील नावे अर्ज देऊन दाखल केली असतील तर ती नावे कमी करू शकतो का.
सविस्तर माहिती द्यावी ही विनंती
सौरिक्षीत कुल म्हणून कोणाचे नाव लागले होते ? सध्या ज्याचे नाव लागले आहे त्याचेच प्रथम सौरीक्षीर कुल म्हणून नाव लागले आहे का ? का या व्यक्तीचे नाव , कुळाचे वारस म्हणून लागले आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
19-06-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,BND खाली अतिक्रमण काढून मिळणेबाबत .....याचा अर्थ काय होतो. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
Question by पंकज कागणे
18-06-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपीक संवर्ग ) या संदर्भात आहे.
3 विषयात या पूर्वीच्या परीक्षेत सूट मिळाली होती म्हणून फक्त 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली. प्रश्न खालील प्रमाणे : -
प्रश्न - सदर परीक्षा सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेवून जर परीक्षा दिली तर राहीलेल्या प्रत्येक विषयात कमीतकमी 60 % गुण प्राप्त केले तरच संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण केली जाते का सर ? या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
mohsin7-12.blogspot.in या संकेत स्थळावर विभागीय दुय्यम सेवा परीक्षा लेख दिला आहे तो वाचावा
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by Dipak Dabhade
18-06-2017
dipak1may1989@gmail.com
सर, आम्ही गरजेपोटी जागेअभावी गावठाणात ग्रामपंचायत जागेवर घर बांधलेले आहे, ते नियमानुसार अनधिकृत समजले जाणार आहे, घर गावाच्या मुख्य रस्त्या पासून 500 फूट व गल्लीपासून 200 फूट लांब आहे, सदर अतिक्रमनाचा कुणालाही अडथळा वा त्रास नाही, ते नियमित करण्यासाठी आम्ही दंड ही भरण्यास तयार आहोत, परंतु त्यासाठी काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती
Question by Vinayak बुवाजी patil
17-06-2017
Vbpatil96@gmail.com
एखादी व्यक्ती संरक्षित kul ahe vजमिनीचा आकार शासनाला त्याच्या हस्ते गेली 60वर्षे भरत असेल तर ती व्यक्ती त्या जमिनीचा मालक होऊ शकते kay कारण इतर अधिकारात जनरल ट्रस्टचे नाव आहे खरेदी बाबत विचारणा केली असता ट्रस्टची परवानगी घ्यावी लागेल व जमीन हि ट्रस्टच्या मालकीची आहे तुम्ही फक्त कुल आहेत मालक ट्रस्ट आहे असे सांगितले जाते तर कुळाचा जमिनीवर अधिकार आहे ka
सदर न्यासास कलम ८८ बी अन्वये जिल्हाधिकारी यांनी प्रमाणपत्र दिले नसेल तर , किंमत ठरू शकते
न्यासाचे परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajay Sonare
17-06-2017
ajaysonare@rediffmail.com
1) Can I purchase the land having remark "Vane" in other rights(Etar Hakka) due to supreme court order in 2005.
2)Can I purchase the land having remark "Vane" & " Need permission from central government for non forestry work" other rights(Etar Hakka) due to supreme court order in 2005.
If Yes please tell the procedure of sale.
The entry vane has to be in the Occupants column and not in other right's column . may be 22 A inquiry under The Private Forest Act pending . it is not advisable to purchase the property .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सोमनाथ कसबे
17-06-2017
kasabe.somanath@gmail.com
नमस्ते सर
मला १ एकर शेती घ्यायची आहे .परंतु त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर साधे कुल म्हणून अन्य एका नावाचा समावेश आहे.कृपया मार्गदर्शन करावे .
इतर हक्कात साधे कुळाचे नाव आहे . सदरचे कुळाचे नाव कृषक दिन अथवा त्या पूर्वीचे असल्यास , तो मानीव खरेदीदार आहे . सध्याचा मालक याचा केवळ विकेरी किंमत एवढा हितसभांड मिळकतीत आहे . त्यामुळे ३२ ग किंमत निश्चित करून , कुल मालक झाले वर , परवानगी घेऊन त्याचेकडून मिळकत घ्यावी .
जर कुळाचे नाव कृषक दिनांनंतरचे असेल व एक वर्षाचे आत कुळाचे नाव ३२ ग किंमत निश्चित झालेली नसेल , तर मालक व कुल यांचेकडून एकत्रित मिळकत खरेदी करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Balaji sawant
16-06-2017
Balaji.sawant44@gmail.com
नमस्कार मी
शेत वहिवाटी साठी रस्ता मिळावा म्हणून मा. तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केला होता त्या वर नायब तहसीलदार यांनी निकाल दिला आहे तो रस्ता नैसर्गिक पाण्याचा प्रवाहातून आहे असे त्यांनी नमूद केले आहे परंतु निर्णय देताना प्रवाहाच्या विरूद्ध देण्या ऐवजी प्रवाहाच्याच बांधावरून दिला आहे तो निर्णय बदलून घेणे साठी काय करावे लागेल उपाय सुचवा
सदर निकाल हा मामलेदार कोर्ट अंतर्गत दिला असल्याने त्यावर अपील अर्ज न करता पुनरीक्षण अर्ज प्रांत अधिकारी यांचेकडे करावा...
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by हेमंत भरविरकर
15-06-2017
h.bharvirkar@gmail.com
नमस्कार सर ७/१२ उतारावरून जुने चार आणे हिस्सा पध्दतीचे वाचन कसे करावे ? मि सहकार संस्था मध्ये नोकरी करतो.
mohsin7-12.blogspot.in या संकेत स्थळावरील आणेवारी लेख वाचावा ..
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by Mahesh patil
15-06-2017
shingarei20@gmail.com
नमस्कार सर..कॅवेट दाखल केल्या नंतर आम्हाला न बोलवत एकतर्फी उपजिल्हाधिकारी साहेबांनी स्टे order..दिली..आणि दोघांना पण सुनावणी तारीख दिली...आणि सुनावणी च्या दिवशी आमचे म्हणणे मांडलतो त्यानंतर स्ठे काढण्यात आला...या नंतर आम्ही तलाठी साहेबांन फेर साठी अर्ज करू शकतो का सर तलाठी सांहेब फेर घेतील का..
Question by अनिलकुमार शिंदे
15-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब
कुळ कायदा कलम 43 ची जमीन असताना जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता कोणत्याही विकसबरोबर विकास करार व कुलमुखत्यार करता येते का ? त्याने कोणतीही शासनाची परवानगी न घेता चाळी बांधल्या असतील व नोंदणी करून खोल्या विकल्या नसतील तर खोल्या धारकांना त्या खोल्याचे कायदेशीर मालक होता येईल का ? विकासकला बंकेमार्फत पैसे दिले आहेत. अश्या परिस्थितीत जमिनीबाबत खोल्या धारकांना अधिकार मिळतील का ? कृपया मार्गदर्शन मिळावे.
कुळकायद्याखालील जमीन , हि कसण्यासाठी असते . त्यामुळे परवानगी न घेता त्याचा विकास करणे म्हणजे , कुल कायद्याचा शर्थ भंग आहे .
या मिळकतीवरील खोल्या , या नोंदणीकृत दस्ताशिवाय विकल्या असतील तर , खरेदी घेणारे मालक होऊ शकत नाहीत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अतुल भास्कर पाटील
14-06-2017
market4atul@yahoo.co.in
आमच्या शेतीच्या ७/१२ वर पुढीलप्रमाणे बोझा आहे, "महाराष्ट्र शासन (पाट बंधारे) जळगाव जल संपदा विभा. यांचा जमिन सपाटी करणाचा यांचा र रू 3034.32/- ( 842 )".
हा बोझा उतरवण्यासाठी काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा.
त्यासंबंधी काही GR असेल तर कृपया मला माझ्या ई-मेल वर पाठवा.
Question by अनिलकुमार शिंदे
14-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
Question by अनिलकुमार शिंदे
14-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
एका जमीन मिळकतीबाबत बक्षीस पत्र 1968 साली करण्यात आले होते. ते बक्षीस पत्र नोंदणी करण्यात आले न्हवते. सध्या बक्षीस पत्र लिहून देणार व लिहून घेणार दोन्ही मयत झाले आहेत. बक्षीस पत्र करण्यापूर्वी बक्षीस देणारे यांनी दत्तक विधान कायदेशीर हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे केले होते. बक्षीस पत्र लिहून देणारे मयत झाल्यानंतर वारस हक्काने दत्तक मुलाचे नाव त्याच्या जमीन मिळकतीस सातबारा सादरी दाखल झाले आहे. बक्षीस पत्राने दिलेली जमीन मिळकत बक्षीस धारकाच्या ताब्यात आहे. सातबारा दत्तक मुलाचे नावे आहे. जमिनीचा कर शासकीय देणी घेणी दत्तक मुलगाच करतो आहे. बक्षीस धारक सघ्या दत्तक मुलास जमिनीचा ताबा देत नाहीत. दत्तक मुलास ताबा मिळण्यासाठी काय करावे लागेल. बक्षीस पत्र धारक याच्या नावाची नोंद सातबारा मध्ये होऊ शकते का ? त्यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का ? असल्यास कोणता कायदा ?
Question by अनिलकुमार शिंदे
14-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब
बांधकामाबाबत शासनाच्या कोणत्याही परवानगी नसताना गृहनिर्माण संस्था नोंदणी कर्ता येते का ? नोंदणी बाबत गृहनिर्माण संस्थेने जमीन विकत किंवा भाडे तत्वावर घेतली नाही. बिन शेती आदेश झालेले नाहीत. विकास आराखडा महानगर पालिकेने मंजूर केला नाही. यू.एल.सी ची परवानगी घेतली नाही. संस्थेने बांधकाम केले नाही. त्याचे वितरण संस्थेने केले नाही. संस्थेमधील रूम (खोल्या ) , सदनिका नोंदणीकृत केल्या नाहीत. संस्था नोंदणी निबंधकाने संस्थेस नोंदणी प्रमाण पत्र दिले आहे. नोंदणी प्रमाण पत्र गृहनिर्माण संस्था असे आहे. व त्याचे वर्गीकरण भाडेकरू सहभागीदार गृहनिर्माण संस्था असे आहे. महानगरपालिकेची घरपट्टी ,पाणीपट्टी , लाईट बिल सभासदांच्या नावे येत आहे. संस्थेच्या नावे येत नाही. पूर्वी एका विकासकाने जमीन मालकांकडून विकासकरार व कुलमुखत्यार पत्र करून घेतले आहे. ते साध्या स्टॅम्प पेपर वर केले आहे. ते नोंदणीकृत केलेले नव्हते. जमीनीचे मालक मयत झाल्यावर जमीन मालकच्या वारसांनी दुसर्या विकासकास जमीन नोंदणीकृत कन्व्हेंस डिड करून विकली आहे. आता संस्थेला संस्थेच्या सातबारा नावे करावयाचा आहे. तो सातबारा संस्थेच्या नावे होईल का ? संस्थेचे रि डेव्हलपमेंट करण्यास संस्था पात्र आहे का ? कृपया मार्गदर्शन मिळावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
