जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अभिजीत
08-07-2017
abhijitkadam55@gmail.com
महोदय शासनाच्या आदेशान्वये ७/१२ अभिलेख आँनलाईन तयार करण्याचे काम सुरू आहे परंतु यात अनेक चुका झाल्या आहेत विशेषता आणेवारीत असणारी जी क्षेञ आहेत याबाबत कारण संबंधित गटाची आणेवारी १६ आणे जर भरली नाही कींवा जास्त झाली तर ७/१२ आँनलाईन होत नाही परंतु आमच्या गावातील दप्तर नुकतेच नुतन करणयात आले आहे यामध्य जे खातेऊतारे तयार केले आहेत यात आणि पुर्वीचे ऊतारे यात बरीच तफावत झाली आहे ती एकञित गटातील क्षेञाबाब कारण सामान्य लोकांना आणेवारी काढता येत नाही तरीही पुर्वी जे खाते ऊतारे दिले यावरूनच माझ्या आजोबांनी मृत्युपञ केले आहे याची नोदं ७/१२ अभिलेखात होऊन २ वर्ष होऊन गेली आहेत पण आता तलाठ्याने जे नविन खाते ऊतारे केलेले आहेत यात जमिन कमी केलेली आह याचे कारण पुर्वीचे खाते ऊतारे आणेवारी नुसार नव्हते असे कारण तलाठी देत आहे माञ पुर्वीचे खाते ऊतारे सन १९६५ पासुन २०१६ पर्यत तेच होते यात बदल झाला व क्षेञ जास्त झाले त्यामुळे आंनलाईनला अडचन येत आहे मृत्युपञातील दुरूस्ती १५५ खाली दुरूस्त करता येईल यात तलाठी आम्हाला दोष देत आहे मार्गदर्शन करा
Question by SHAIELSH KARHALE
08-07-2017
karhaleshailesh226@gmail.com
प्रिय सर,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करण्यात येतो कि मी शैलेश दत्तराव कऱ्हाळे वय २० वर्ष व्यवसाय शिक्षण रा. डिग्रस कऱ्हाळे ता. जि. येथील रहिवासी असून माझ्या वडिलाच्या नावाने या गावी एक गुंठा जमीन आहे. पण सर ती जमीन आमच्या ग्रामपंच्यायतने ग्रामपंचायतला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने लावली आहे. पण सर त्या व्यक्तीजवळ ती जागा नावाने असल्याचा कोणत्याही प्रकारचा महसुली पुरावा नाहीये. तरी पण तो व्यक्ती म्हणतो कि ती जागा माझी आहे.
माझ्या वडिलाच्या म्हणजे दत्ता गंगाराम कऱ्हाळे या नावाचे पुरावे माझ्याजवळ १९८३ पासून आहेत. तरीपण खोट्या खरेदीपत्रा आधारे तो व्यक्ती आमची उर्वरित जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तो मला म्हणतो माझ्या वडिलाने तुझ्या वडिलाच्या आजोबाकडून हि जागा विकत घेतली आहे व या जागेचा येणे सुद्धा केला आहे. सर मला सांगा ती जागा माझ्या वडिलाच्या नावाने १९८३ च्या ९(३) ९(४) च्या नक्कालेनुसार व नमुना नंबर १२ नुसार नावाने आहे. सध्या सातबारा माझ्या वडिलाच्या नावाने असतांना येणे कसा शक्य आहे सर रजिस्ट्री नाही काही नाही. NA Order no. 1980 NAA CR/1453 दि. 21/11/1989 चे अभिलेख पहावयास मिळाले नाही. तलाठी साहेबांनी नमुना नंबर २ कसा निर्गमित केला याची कृपया आपण चौकशी करावी. गट नं. 642 चा नमुना नं. २ माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे यांच्या नावाने सुद्धा आहे. माझे वडीलाचा मृत्यू झाला आहे.
सर तो मला म्हणतो कि मी ताब्याच्या आधारे कोर्टात जाऊन भांडण करेन तुला जमीन देणार नाही. जी जागा माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे याच्या नावाने होती ती जागा त्याने ११/१०/२०१३ मध्ये नमुना नंबर ८ ला लावली. ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले हे कोर्ट मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही. त्यांनी सुद्धा माहित असतांना त्या खोट्या कागदाच्या अधारे ती जमीन त्या व्यक्तीच्या नावाने लावली कारण त्या वेळेस सर त्या व्यक्तीची बायको ग्रामपंचायत ची सदस्य होती.. हि माझी नम्र विनंती आहे. मी या अर्जासोबत त्या व्यक्तीचे जे कागतपत्रे आहेत ते व माझ्या वडिलाचे कागतपत्रे pdf स्वरुपात पाठवत आहे कृपया आपण ते बघावे व चौकशी करावी ही नम्र विनंती.
आपले कथनावरून , जमिनीचा ७/१२ आपले वडिलांचे नावावर आहे . तसेच गाव नमुना नंबर २ ला हि वडिलांचे नाव आहे . त्यामुळे तसे घाबरण्याचे कारण नाही .
ग्राम पंचायत रेकॉर्ड ला , त्या व्यक्तीचे नाव आहे . त्या विरुद्ध आपण गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा .
जमिनीचा ताबा , त्या व्यक्तीकडे २० वर्षावून आधी काळ असेल तर तो आपण विरुद्ध adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करू शकतो .तत्पूर्वी आपणच , त्यास आपले मिळकतीतून काढून टाकणे बाबत न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh patil
08-07-2017
shingarei20@gmail.com
नमस्कार सर.
मा.ना.तहसिलदार साहेब यांनी रजिस्टर्ढ मुत्युपञचा प्रलंबित फेरफार निकाली काढले आहेत.आपिल कालावधी संपला आहे मा.तलाठी व मंडलआधिकारी साहेब 7/12 स नोंद घेतील का..नोंद घेण्यासाठी अर्ज करावे लागेल का सर..
मा.उपजिल्हाधिकारी साहेबांकडे आपिल दाखल झाली आहे.फ्कत अापिल केस चालु आहे जमिनीवर स्टे वगैर काही नाही.
Question by Swapnil Bharat bansode
07-07-2017
Swapnil bansode 033@.gmail
Mazya panjobachya nanter chulat ajobani ekm mahnun sarv jamin tynchya nave keli ani aamche ajoba gharatil thorle asun tynche nav aaj kutech nahi Sat barywar ani te laun hi det nahit tr plz suggestion dya me KY karu
जमीन अजूनही चुलत आजोबांचे नावावर असल्यास , ये .कु . मॅ. च्या पोटातील इतरांची नावे ७/१२ सादरी दाखल करणे बाबत तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
06-07-2017
pankajkagane@gmail.com
हक्कसोड पत्र आणि मृत्युपत्र या दोन्ही दस्तऐवजांची नोंदणी कोणत्या कार्यालयात केली जाते सर ?
हक्क सोड पत्रकाची व मृत्य पत्राची नोंदणी , दुय्यम निबंधक कार्यकाळात केली जाते
मृत्य पात्राची नोंदणी ऐच्छिक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
06-07-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
१.एका व्यक्तीचे जातीचे प्रमाण पत्र साठी जोडलेले आवश्यक कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीला माहिती अधिकारात देता येईल काय ?
२. पोलीस पाटील पदाचे भरतीसाठी झालेल्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एका उमेदवारांची दुसऱ्या उमेदवारास माहिती अधिकारात देता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by मुकुंद नागरगोजे बीड
06-07-2017
mukundnagargoje401@gmail.com
राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी एखाद्या दुकानदाराचे दुकान अथवा व्यवसाय गेल्यास त्याला कोणत्या पुराव्या आधारे संपादनाचा मोबदला दिला जातो? आणि ते पुरावे कोणकोणते ते सांगा?
राष्ट्रीय महामार्ग कायदा , कलम ३ आ ची अधिसूचना काढण्या पूर्वी , जागेची संयुक्त मोजणी केली जाते . या मोजणीत दुकानाचा / व्यवसाय जागेचा उल्लेख केला जातो . अश्या जागेचे मुल्याकंन , दुकानाचे मुल्याकंन करून नुकसान भरपाई दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शेख फयाज अहेमद
05-07-2017
thisisfmshaikh@gmail.com
एका जमीन मालकाने स्वतची जमीन दस्त करून नियजित लि.कंपनीस खरेदी दिली व 7/12 वर, कंपनी व त्यातर्फे मुख्य प्रवर्तक महणून स्वताच्या नावाची नोंद केली आता तोच व्यक्ति कंपनी अस्तीत्वात आली नाही असे अर्ज देऊन 7/12 वरील कं.चे नाव कमी करून केवल त्याचेच नाव ठेवण बाबत विनंती केली आहे. असे करता येईल का? उपाय काय आहे
खरेदी दस्तात, काय नमूद आहे ?
केवळ कायदेशीर व्यक्तीच मिळकत खरेदी करू शकते . जसे , नैसर्गिक व्यक्ती - माणूस किंवा कायदेशीर व्यक्ती - कम्पनी , न्यास , महामंडळे इत्यादी .
जर कम्पनी incorporate झाली असेल तर , कम्पनीस कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्राप्त होतो व कंपनी जमीन खरेदी करू शकते व कम्पनीचे नावावर जमीन दाखल करता येते . या ठिकाणी कम्पनी प्रस्तावित / नियोजित आहे , म्हणजे कम्पनी incorporate झालेली नाही . त्यामुळे कम्पनी जमीन खरेदी करू शकत नाही . पर्यायाने कम्पनीचे नावावर जमीन दाखल होऊ शकत नाही .
खरेदी खतात कम्पनी तर्फे संचालक म्हणून व्यक्तीचे नाव नमूद असेल , तर प्रत्यक्षात जमीन कम्पनीसाठी खरेदी केलेली आहे . कम्पनी incorporate झालेली नसल्याने , जमीन कम्पनीचे व पर्यायाने व्यक्तीचे नावे दाखल होऊ शकत नाही / दाखल करता येणार नाही .
मिळकत शेती स्वरूपाची असेल , तर , कम्पनी शेती मिळकत खरेदी करू शकत नाही . कलम ६३ चा भंग होऊन , कलम ८४ की प्रमाणे कारवाई प्रस्तावित करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
05-07-2017
www.roraj8@gmail.com
आदरणीय सर,
ग्रामपंचायत हद्दीतील सिटी सर्वेच्या जाणे-येणेच्या बोलतील अतिक्रमण ग्रामपंचायने नोटीस देऊनही सदर व्यक्ती उत्तर देत नाही तर पुढील कार्यवाही काय करावी व या बाबत अधिकार कोणाचे आहेत.?
Question by शेख फयाज अहेमद
05-07-2017
thisisfmshaikh@gmail.com
एका जमीन मालकाने स्वतची जमीन दस्त करून नियजित लि.कंपनीस खरेदी दिली व 7/12 वर, कंपनी व त्यातर्फे मुख्य प्रवर्तक महणून स्वताच्या नावाची नोंद केली आता तोच व्यक्ति कंपनी अस्तीत्वात आली नाही असे अर्ज देऊन 7/12 वरील कं.चे नाव कमी करून केवल त्याचेच नाव ठेवण बाबत विनंती केली आहे. असे करता येईल का? उपाय काय आहे.
नियोजित कंपनी हि कायद्याचे दृष्टीने Legal Person नाही . त्यामुळे नियोजित कंपनीस जमीन खरेदी करता येत नाही .
सदरचा व्यवहार हा कुळकायद्याचे तरतुदी विरुद्ध आहे . त्याप्रमाणे कलम ८४ क प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रतिभा संखे
05-07-2017
vishalpsankhe@rediffmail.com
माझ्या वडिलांच्या नावे जमीन आहे.मी त्याची मुलगी आहे. वडिलांचे 2010 रोजी मृत्यू झाले आहेत.सदर जमिनी वर वारस नोंद(फेरफार) साठी तलाठी जवळ अर्ज दिले सोबत१)वारस दाखला,2)मृत्यू दाखला 3)प्रतिद्यापत्र जोडले आहेत. तरीही तलाठीने वारस नोंद(फेरफार) केले नाही आहे.तलाठीचे असे म्हणणे आहे की तुमच्या भावांचा फेरफार करण्यास विरोध आहे.तरी मी काय करावे.
भावाचा विरोध आहे म्हणून म्हणून तलाठी नोंद करणे टाळू शकत नाही .
वडिलांना जे वारस असतील त्या सर्वांची नवे ७/१२ सादरी वारस म्हणून लावणे आवश्यक आहे .
तलाठी फार तर तक्रार नोंद म्हणून , तहसीलदार यांचेकडे सादर करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल जाधव
05-07-2017
rahuljadhav5200@gmail.com
नमस्कार सर ,
माझ्या मालकीची विकत घेतलेली भोगवटा वर्ग १ ची जमीन असून मी इतर मी म ज म अ १९६६ चे कलम ३६ क चा शेरा नोंदवलेला आहे. सध्या त्या जमिनीची अदलाबदल करावयाची असून बदली मिळणारी जमीन हि भोगवटादार वर्ग १ ची आहे संबधीत व्यक्ती हे खुल्या प्रवर्गातील आहे ? तरी जमीन अदलाबदलीची तरतूद कळनेस विनंती आहे .
३६ क चा शेरा म्हणजे शासनाचे पूर्व परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतनास (ज्यामध्ये अदलाबदलास) निर्बंध आहेत . आपण शासनाची परवानगी घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज पाटील
04-07-2017
pankaj25782@gmail.com
सर्वे नंबर-३१६-१, २८१, २८० येथील जमीन मधील संरक्षित कुळ हक्क व न्याय परत मिळणे बाबत.
माझे आजोबा मयत कै. जोमा धाया पाटील हे संरक्षित कुळ म्हणून सन-१९५० हक्काचें पत्रक -६(अनु क्र. १२२०) मध्ये नोंद आहे. त्याच्या मृत्यूनंतर सदर जागा वारस ह्क्क्नुसार माझे वडील मयत कै. कृष्णा जोमा पाटील याचा नावे नोंद झाली आहे.
सदर काही कारणास्तव मी अज्ञान व माहिती नसल्यामुळे मला सदर जागे संदर्भात माहिती नव्हते आणि तसचे कधी सरकारी दाप्तर्मधून आमच्या नावे कधी पत्र व नोटीस देण्यात आली नाही.
तरीही सदर जागे मधील आमचे संरक्षित कुळ हक्क व अधिकार डावलण्यात व नष्ट करण्यात आले आहे. जागे मधील झालेले बेकायदेशीर विक्री वव्यहार कुळ कायदाचा उल्लंघन करून व अनधिकृत नोंदी याची चौकशी करून आम्हाला आमचे कुळ कायदेनुसार आमचे हक्क व अधिकार कसा मिलणार. आणि भूसंपादन अवॉर्ड मध्ये आमचा नावाचा व नोटीस पण देण्यात आली नाही
पंकजराव
आपले वडिलांचे नाव केंव्हा कमी झाले ? ज्या फेरफाराची नाव कमी झाले तो फेरफार पहा . फेरफार पहिल्या नंतर आपणास , कळेल कि आपले अथवा वडिलांचे नाव का कमी झाले . नाव कमी झाल्याचे कारण कळल्या नंतर पिढीला दिशा ठरवता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वकील चौधरी
03-07-2017
vakilchaudhari123@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न
शेत जमिनीचा British कालीन रेकॉर्ड जमिनधारकाला पाहता येतो का? कसे
तालुका अभिलेख कक्षात उपलब्ध असेल तर आपणास ब्रिटिश कालावधीतील रेकॉर्ड पाहता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेशकुमार मिश्रा
29-06-2017
formattor@yahoo.com
नमस्कार सर, नोंदणी महनिरीक्षक कार्यालयाचे 3846/2005/710 दि .10/05/2006 हे परिपत्रक तसेच महसूल व वन विभागाचे परिपत्रक क्र .0/3092/प्र क्र 25/ल-6,दि.07/05/1992 हे परिपत्रक
कोठे मिळू शकतील याबाबत क्रुपया मार्गदर्शन करावे
सदर परिपत्रक mohsin7-12.blogspot.in वर महसूल कायदे या हेड खाली कलम 85 चा अधिक अर्थ स्पष्ट करणेबाबत या नावाने आहे प्राप्त करून घ्या
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by विनायक बुवाजी पाटील
29-06-2017
Vbpatil96@gmail.com
न्यासाच्या (ट्रस्ट) जमिनीला कुल कायदा लागू होतो ka
न्यासाच्या जमिनीला कुल कायदा लागू होतो .
जर न्यासाचे उत्पन्न , न्यासाचे उद्दिष्ट साठी वापरण्यात येत असेल व न्यास नोंदणीकृत असेल तर फक्त किंमत ठरत नाही
कृपया कलाम ८८ बी वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by anilkumar shinde
28-06-2017
anilkumarshinde1967@gmail.com
नमस्कार साहेब,
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतूदीस अधीन राहून असा शेरा सातबारा मधील इतर हकात नोंद केली असल्यास ती जमीन विकत घेता येते का ? विकत घेतल्यास सातबारामध्ये कब्जेदार सादरी विकत घेणाराचे नाव दाखल होईल का ? त्यासाठी वन विभागाची परवानगी घेणे जरुरीचे आहे का? त्याचा काही नजराणा शासनास भरावा लागेल का ? समजा रीतसर दस्त केल्यास सातबारामध्ये नावं लावण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती .
विकत घेण्यावर निर्बंध नाहीत .
अश्या जमीनीचे ७/१२ वर इतर हक्क सदरी खालील नोंदी असतील
१. २२ या चौकशी वर प्रलंबित
२. वनेतर कामास बंदी
२२ या चौकशी अंती जे क्षेत्र पुनर्स्थापित केले जाते त्या ठिकाणी कब्जेदार सदरी नाव लावले जाते .
मात्र जे क्षेत्र शासन जमा होते , त्या ठिकाणी शासनाचे नाव लावले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांचे सातबारा वरील नावात दुरुस्ती करायची आहे.
त्यांचे सातबारा वरील नाव मुकिंद आहे पण त्यांच्या काही रेकॉर्डला व माझ्या रेकॉर्ड ला मुकुंद असे नाव आहे तर मला मुकुंद हेच नाव ठेवायचे आहे
तसेच नावामध्ये काही प्रॉब्लेम असल्यास वडिलांनंतर माझे नाव वारस लावण्यास काही अडचणी येऊ शकतील का ?
कृपया उत्तर द्या.
आपण नाव दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat@gmail.com
नमस्कार सर,
माझा स्वतः मालकीचा चाळीमध्ये रूम असून तो मी भाड्याने दिला आहे याला ३ वर्ष झाली
परंतु मी त्याचे अग्रीमेंट / करार काही केले नाही तर ते करणे जरुरी आहे का?
तसेच १०० रु स्टॅप पेपरवर अग्रीमेंट करता येऊ शकते का ? त्याला रोटरी करणे आवश्यक आहे का ?
तसेच मी सध्या वाई येथे राहत असून माझा रूम भाड्याने दिला आहे तो बोईसर(पालघर) येथे आहे तर मी वाई या ठिकाणी अग्रीमेंट करू शकतो का ? मला बोईसर ला करावे लागेल ?
leave and license agreement करावे . ते नोंदणीकृत आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
महोदय,
सातबारा/जमीन विषयक माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यासाठी - उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज करावा कि तहसिल कार्यालयात अर्ज करावा ?
७/१२ विषयी मंडळ अधिकारी यांना जण माहिती अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे . मंडळ अधिकारी यांचे कडे अर्ज
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश मुकुंद अनपट
26-06-2017
umeshanpat45@gmail.com
नमस्कार सर,
मी केशरी रेशनिंग कार्डधारक असून २ वर्ष झाले मला रेशनिंग कार्ड काढून पण अजून मला धान्य मिळत नाही
नवीन रेशनिंग कार्डधारकांना अजून धान्य सुरु झाले नाही असे तेथील रेशनिंग मालक सांगत आहे तरी मी यासाठी कोठे दाद मागावी
तसेच याबाबत माहिती अधिकारांतर्गत मी कोठे अर्ज करावा?
Question by गणेश शिंदे
26-06-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,महार वतनाची जमीन ९९ वर्षाच्या नोंदणीकृत भाडेकरकाराने घेता येते का? किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विंनती....
Question by विनायक बुवाजी पाटील
26-06-2017
Vbpatil96@gmail.com
एक व्यक्ती १९५४ पासून संरक्षित कुल aahe पण त्याचबरोबर मालकाने 1956 पासून ट्रस्ट ला (देवस्थान न्हवे) jaminiche मालकी अधिकार दिले आहेत .तर ti vyakti जमिनीचे कुल कायद्यानुसार मालक ahe का ?
मालकी हक्क दिले आहेत म्हणजे काय ?
जर न्यास जमिनीचे मालक म्हणून ७/१२ सादरी दाखल असेल व कुल कायदा कलम ८८ बी च्या तरतुदी निकषात न्यास बसत असेल तर , कुल मालक होऊ शकणार नाही व न्यास मालक राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री. अमोल सोमनाथ कोरडे
26-06-2017
amolkorde007@gmail.com
नमस्कार सर/मॅडम.....
आमच्या पणजोबांना 5 मुले होती. त्या पाच मुलांपैकी एक मुलगा घर सोडून परगावी गेला होता. त्याच काळात पणजोबांना इतर 4 मुलांच्या नावे जमिनीची वाटणी करून दिली. आमचे आजोबा हे त्या 5 जणांमध्ये सर्वात लहान आहेत.
तत्कालीन वाटणी नुसार-
1)गट न. 838 मधील 2.91 हे. क्षेत्रात पुढील प्रमाणे वाटणी झाली-
73+73+73+72
2)गट न. 926 मधील 2.65 हे. क्षेत्रात पुढीलप्रमाणे वाटणी झाली-
66+66+66+67
कालांतराने पाचवा भाऊ परत आला व त्याने ह्या चौघांकडे त्याच्या हिस्स्याची मागणी केली. त्यावेळी ह्या चौघांनी त्यांची मागणी नाकारली.
त्यानंतर पाचव्या भावाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. सदर दाव्या बाबत मा. न्यायालयाने पाचवा हिस्सा द्यावा लागेलच व वादी यांना त्यांचा 1/5 हिस्सा देण्यात यावा असा हुकूमनामा दिला.
तर मा. न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार सदर मिळकतीचे सरस निरस वाटप व्हायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. त्या पाच भावांपैकी दोघांनी बाकी तिघांना असे सांगितले की मा. न्यायालयाने पुढील प्रमाणे वाटप करण्याचा हुकूमनामा दिला आहे. त्या वाटण्या पुढीलप्रमाणे-
1)गट न. 838 मधील 2.91 हे. क्षेत्राचे-
58+58+58+58+59
2)गट न. 926 मधील 2.65 हे . क्षेत्राचे-
73+72+40+40+40
नवीन पाचवा हिस्सा न. 3 प्रमाणे व माझ्या आजोबांचा हिस्सा न. 5 प्रमाणे.
आणि अश्या प्रकारच्या वाटण्याचा फेर सुद्धा पडला आहे. त्यात -
फे. न. 1959 -
कोर्ट हुकूमनामा व मा. तहसीलदार साहेब यांच्याकडील अर्ज यानुसार सरस निरस मानाने ते आपसात वहिवाटीत असलेले क्षेत्राचे प्रमाणे त्यांची नावे क्षेत्र खलील प्रमाणे दाखल करावे असा दि. 13/1/1984 चा आदेश आहे.
त्यानंतर दि. 5/8/1987 रोजी सदर क्षेत्रांवर पुनर्वसन कायदा लागू झाला.
त्या आधी म्हणजे दि. 17/6/1987 गावातील एक इसमाने गट ना. 926 मधील माझ्या आजोबांच्या नावावरील 40 आर क्षेत्र स्वतःच्या नावावर करून घेतले. सदर इसमाकडे त्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत. कारण आजोबांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही कागद कधीच लिहून दिलेला नाही. अर्जदाराच्या तक्रार अर्जावरून सदर नोंद मजूर झाल्याचा फेर पडला आहे.
त्यानंतर दि. 10/7/1998 रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचा आदेश फे. न. 6911 मध्ये झाला. त्या आदेशानुसार फे.न. 1959 व तो मंजूर झाले बाबतचे आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. व 1978 च्या नोंदी पूर्ववत आणण्यात येत आहेत.
त्यानंतर मा. जिल्हाअधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. 27/6/2008 रोजी पुनर्वसनावरील निर्बंध उठविण्यात आले.
त्यानंतर दि. 7/3/2012 रोजी संगणकातील झालेल्या चुका दुरुस्तीसाठी मूळ 7/12 प्रमाणे संगणकीय 7/12 दुरुस्त घेणे साठी नोंद करण्यात आली.
त्यानंतर दि. 11/1/2013 मध्ये एक फेर पडला . तो पुढील प्रमाणे-
फे. न. - 14325-
आदेश-
दि. 11/1/2013 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये मा. तहसीलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्रमांक 465/2012 दि. 7/1/2013 नुसार फे. न. 1959 ची स्थिती कायम करून फे. न. 6911 हा रद्द करण्यात यावा.
एप्रिल 2016 मध्ये माझ्या चुलत भावाला शेतकरी दाखला त्याच्या शैक्षणिक कामी हवा होता. त्यावेळी आम्ही आजोबांच्या नावाचा 7/12 आणि 8अ उतारा काढला. त्यावेळी आमच्या लक्षात आले की आजोबांच्या नावे गट न. 926 मध्ये 27 आर क्षेत्र आहे. त्यावेळी आजोबांना विचारना केली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या भावांनी काय काय उद्योग केले त्यांना काहीच कळत नाही. आजोबा त्याकाळात दारू च्या आहारी गेलेले होते. त्यांना गट न. 838 मध्ये 35 आर क्षेत्र शिल्लक होते. काही जमीन पाझरतालावकडे वर्ग झाली होती. पाचही भावांना त्यावेळेस त्याचे सारखे पैसे मिळाले होते. त्या राहिलेल्या 35 आर क्षेत्राची खरेदी आमच्या मधल्या चुलत्यांनी घेतली आहे. सदर 98000 पैकी फक्त 40000 रु फक्त आजोबांना दिले बाकीचे दिलेच नाही. अन मागितले तर भांडण करायचे.
926 मधील 40 आर क्षेत्र पण त्याच चुलत्यांनी त्या इसमाकडून विकत घेतले आहे. 210000 ची खरेदी दाखवली आहे. परंतु सदर इसमाला फक्त 50000 दिले आहेत. अन त्या इसमाने पण तेव्हड्याच 50000 रु मध्ये जमीन देऊन टाकली कारण त्या इसमाने बोगस नोंद करून घेतलेली होती व जमीन आजोबांच्याच ताब्यात होती.
मुलाकडेच जमीन असल्यामुळे आजोबांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
माझ्या वडिलांनी फेब्रुवारी 2011 मध्ये बँक कर्ज आणि खाजगी देणेदारी ला कंटाळून आत्महत्या केली. आजोबांचा सांभाळ मीच करतो. वडिलांचे बरेचशे कर्ज मी फेडत आलोय. आता फक्त एक बँक शिल्लक आहे. आजोबांनी डिसेंबर 2016 मध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला गट न.926 मधील 27 आर क्षेत्राचे नोंदणीकृत दस्ताने बक्षिसंपत्र करून दिले. सदर दस्तानच्या आधारे डिसेंबर 2016 मध्ये मा. तलाठी साहेबांनी कच्ची नोंद करून घेतली व नोटीस बजावली की 15 दिवसांनी नोंद मंजूर होईल असे सांगितले. 15/01/2017 ला सदर नोंद मंजूर झाली व 7/12 अन 8अ ला माझी नोंद झाली. माझ्या नावे तसा 7/12 व 8अ ही निघतोय.
सदर 7/12 confirmed असल्याने डिजिटल signature वाला 7/12 ही माझ्या नावासह निघतोय.
परंतु मला आता मा. तहसीलदार आहेब यांच्याकडे म. ज. म. अधि. 1966 चे कलाम 155 अन्वये दुरुस्तीची नोटीस आली आहे. आमच्या चुलत चुलत्यांच्या तक्रार अर्जानुसार सदर नोटीस आली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या नावे 73 आर क्षेत्र होते. अन ते आता 52 आर झाले आहे. मला बक्षिसंपत्र दिलेली जमीन आमच्या आजोबांची नाहीच . त्यांनी राजकीय दबाव महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आणला आहे. त्यांचे वकील माघार घ्या नाहीतर 420 ची केस दाखल करेल असे म्हणत आहे. अजून एक ही तारीख झालेली नाही. आजोबा अन मी दोन तारखांना गेलो परंतु काही कारणास्तव तारखा झाल्या नाहीत. म्हणून मी आजोबांसोबर निवासी नायब तहसीलदार साहेबांकडे गेलो अन त्यांना विचारणा केली की साहेब दोन तारखांना आम्ही आलो पण मा. तहसीलदार साहेब दुसऱ्या कामात असल्यामुळे तारखा झाल्या नाहीत. माझे आजोबा हे खूप वयस्कर आहेत अन ह्या पावसाळी अन ढगाळ वातावरणाचा त्यांना खूप त्रास होतो. तर पुढील तारखेपासून मी एकटाच आलो तर चालेल का? तर त्यांनी नोटीस बघितली अन आम्हाला म्हणाले तुम्ही दोघे नाही आलात तरी चालेल. ह्या केस चा निकाल आम्हीच इथे घेतो. अन निकाल आधीच झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यावरील राजकीय दबाव साफ दिसत होता.
आमचे चुलत चुलते पण आजोबांना म्हणत होते की मी तुमच्यावर 420 ची केस दाखल करेल. माझी वरपर्यंत पोहच आहे अन पहिल्याच तारखेला निकाल लावून दाखवतो.
रेकॉर्ड रूम वाले कर्मचारी पण आम्हाला चुकीचे फेर देत नाहीयेत. चुकीचे म्हणजे ज्यात खाडाखोड केलेली आहे. फे. न. 1959 मध्ये तर खूप खाडाखोड केलेली आहे.
वकील साहेबांना ही भेटलो पण ते म्हणाले की राजकीय हस्तक्षेप आहे सो काही उपयोग होणार नाही.
सर, कृपया मार्ग सुचवा. मी आपल्या संकेतस्थळावरील खूप सारे प्रश्न अन त्यांची उत्तरे वाचली आहेत अन वाचत आहे. खूप माहिती अन ज्ञान मिळत आहे यातून. पण अशा प्रकारची एक ही केस याठिकाणी अजून पर्यंत आढळून आली नाहीये. कृपया मला योग्य तो मार्ग सुचवा अन काही प्रश्नांचे निरसन करा.
1)मा. तहसीलदार साहेब हे 1966 चे कलम 155 अंतर्गत मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश रद्द करू शकतात का?
2)मा. न्यायालयाच्या आदेशानुसार 1/5 हिस्सा सरस निरस वाटप द्वारे कलाम 85 किंवा नोंदणीकृत दस्ताने मा. तहसीलदार साहेब यांनी करायला हवे होते का?
3) खाडाखोड करून नोंद केलेला फेर ग्राह्य धरला जातो का?त्यावर खाडाखोड केलेल्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाहीये.
4) मा. तहसीलदार साहेबांनी राजकीय दबावाखाली चुकीचा निर्णय दिल्यास कोणाकडे अपील करावी लागेल?
5)नोंदणीकृत बक्षिसंपत्र महसूल अधिकारी रद्द करू शकतात का?
6)माझा 6 महिन्यांपूर्वी मंजूर झालेला फेर मा. तहसीलदार साहेब रद्द करून माझे नाव 7/12 मधून कमी करू शकतात का?
7)नोंदणीकृत दस्त अथवा इतर कोणतेही पुरावे नसता फक्त तक्रार अर्जावरून नोंद मंजूर करता येते का? सदर मंजूर नोंदी विरुद्ध अपील करता येईल का? अन कुठे करता येईल?
8) मा. न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार सरस निरस वाटप झालेले नसल्याचा कोठे अपील करावी?
Question by sadik
25-06-2017
sadik11m@rediffmail.com
सर एका शेतकऱ्याने ५ का ७ फूट चा असलेला सर बांध फोडून १ फुटाचा ठेवलाय तरी आता सर बांध फोडल्याने आमचा शेतीत वाहतुकीसाठी रास्ता बंद झाला आहे.तहसीलदारांकडे तक्रार अर्ज केल्यास तो सर बांध पहिल्या सारखा मिळू शकेल का तो आहे तसा मिळ्वण्यासाटी काय करावे लागेल
२) सर बांध चे रेकॉर्ड कुठे मिळेल व त्यासाठी कोणते नकाशे व कागदे कडवे लागतील कळावे
आपण मामलतदार कोर्ट कायद्याखाली तहसीलदार यांचे कडे अर्ज करा .
बांधाचे रेकॉर्ड नसले तरी , परंपरागत रस्ता, रिकामा करून देण्याचे या कायद्याने तहसीलदार यांना अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
